Login

प्रीतबंध.भाग -५३

तुझ्या माझ्या प्रेमाचा एक गंध.. प्रीतबंध!
प्रीतबंध.
भाग -५३

मागील भागात :-
सत्या, राशी आणि इतर मित्रमंडळ महाबळेश्वरला आलेले असताना सनसेट पॉईंटला भेट द्यायला जातात. तिथे अभी आणि राशी एकमेकांच्या हाताच्या साहाय्याने हार्टशेप तयार करून आकाशातील तांबडा रंग हृदयात साठवत असताना सत्या त्यांचा फोटो काढतो.

आता पुढे!

"..हे इटुकले इटुकले प्रेमाचे क्षण देखील खूप गोड असतात. त्यांना नको ना मिस करू." तिथी तिचे हात हातात घेत सूचकपणे म्हणाली.

त्यावर ती गोड हसली. खरंच तर होतं हे! मघाशी त्याचे बोलता बोलता इतरांपासून वेगळं नेणं, तिच्या बोटात बोटे गुंफुन आकाशातील रंग हृदयात सामावून घेणं, तिच्या कटीवर हात ठेवून तिला हळूच जवळ ओढणं.. सारंच किती गोड होतं.. हवंहवंस!

तिने ते आठवून अभीकडे एक कटाक्ष टाकला. त्याची नजर तिच्यावर अजूनही खिळली होती.

आता अंधार पडायला आला होता. थोडावेळ तिथे घालवल्यानंतर परत सर्वजण रिसॉर्टकडे निघाले.


"खूप सुंदर अनुभव होता हा! जस्ट अनेझिंग." गाडीमध्ये नेहमी असणारा धिंगाणा घालणारा ग्रुप शांत झालेला बघून रौनक एकेकाकडे बघून म्हणाला.

"कसला अनुभव?" मंजिरी.


"हाच गं. सनसेटचा. किती सुंदर आकाश दिसत होतं यार!"


"हम्म. खरंच. आजचा संपूर्ण दिवस खूप धमाल गेलाय." तिथी म्हणाली.


"दिवस धमाल होताच, आता रात्र देखील भारी असेल." सत्या.

"म्हणजे?" राशीसह तिघींनी एकत्रच विचारले.


"ते तर रात्रीच कळेल ना." त्यांचे चेहरे बघून उत्सुकता ताणायाची सत्याला लहर आली.


"सत्या, इट इज नॉट फेअर यार. स्पष्ट काय ते सांग ना." चेहरा लटकवून तिथी.


"अगं, एक सरप्राईज आहे, ते आत्ताच स्पष्ट कसे सांगणार?" तिच्या डोक्यावर टपली मारत तो.


"प्लीज, सरप्राईज नको ना. तुझे सरप्राईजेस जीवघेणे असतात यार." मंजिरी म्हणाली. तिचा स्वर उगाचच राशीला हळवा भासला.


"असं का म्हणतेस? याने तुला काही त्रास दिलाय का?"


"असं काही नाहीये मॅडम. रात्रीची अरेंजमेंट बघून तुम्ही जाम एक्सायटेड व्हाल." मंजिरीकडे कटाक्ष टाकत तो.


"येस! सत्या असेल आणि एक्सायटमेंट नसेल असं कधी झाले आहे का? आपण नक्कीच एंजॉय करू." रौनकच्या चेहऱ्यावर रौनक आली होती.


"सर्वांनी शार्प नऊ वाजता डिनर साठी रेडी असा. डिनर झाले की पुढच्या टास्कसाठी तयार रहा."


"टास्क? मला तर ऐकूनच भीती वाटतेय."

'येडे, इट इज फन टास्क." तिथीच्या बालिशपणावर एक फटका बसलाच.

"ओके बॉस!फन है तो डन है. आम्ही अगदी शार्प नऊला रेडी असू. बाय! भेटूच." तिथीने त्याला अंगठा दाखवला आणि सगळे आपापल्या रूममध्ये पांगले.

_______

"अभ्या, काय झाले? तू अजूनही राशीशी बोलला नाहीस का?" सनसेट पॉईंटवरून परतल्यापासून शांत शांत असलेल्या अभीला सत्याने छेडले.


"हम्म. चान्स नाहीच मिळाला." खिन्नपणे तो.


"वा रे! चान्स असा मिळत नसतो, तो शोधावा लागतो. आज रात्री शेवटचा चान्स आहे. याही संधीचे सोने केले नाहीस तर मग राशीला कायमचे हरवशील हो. ती एकदा का घरी परत गेली की तुझ्या हातात डायरेक्ट लग्नाची पत्रिका आणि अक्षता ठेवायला भेटेल. तूच नीट विचार कर."


"सत्या, नको रे असा जखमेवर मिठ चोळू. काहीही झालं तरी आज मला बोलावेच लागेल. इस जालीम प्यार का दर्द तुम नही समझोगे मेरे दोस्त, बहोत मिठा होता है." अभी बेडवर स्वतःला झोकून देत डोळे मिटत म्हणाला.


"प्यार का दर्द!" सत्या स्वतःशीच हसला.

प्रेमातील दुःख काय असते हे त्याच्याखेरीज आणखी कोण चांगल्याने जाणू शकणार होता?


आताशा कुठे सात वाजले होते. रूममध्ये आल्यावर थोडावेळ आराम, शॉवर आणि आवरण्यात दोन तास संपून गेले. जेवण्यासाठी राशी, मंजिरी आणि तिथीची तिकडी आली तेव्हा साडेनऊ वाजले होते.


"काय म्हणाली होतीस? शार्प नऊ हं? अर्धा तास उशीर झालाय मॅडम." हातातील घड्याळ पुढे करत सत्या भुवई उंचावून म्हणाला.

"तीन तीन सुंदर मुलींना आवरायला एक्स्ट्रा अर्धा तास लागतोच. प्रत्येकी अर्धा तास म्हणजे हिशोबाने दिड तास आम्ही उशिरा यायला हवे होते; पण तुमचा विचार करून केवळ दहा दहा मिनिटं आम्ही जास्तीची घेतली, याची तर कुणाला कदरच नाही." मंजिरी नाक मुरकत म्हणाली.


"ओह सॉरी! मी माफी मागतो. तुम्ही इतक्या लवकर आलात त्याबद्दल संपूर्ण पुरुषमंडळ आपले आभारी आहे." सायंकाळी थोडी दुखावलेली मंजिरी तिच्या मूळ रूपात परतलेली बघून त्याचा खट्याळपणा जागा झाला.


"थॅंक यू!" मंजिरी किंचित खाली झुकली आणि हास्यांची कारंजी पुन्हा फुलली.

नेहमीसारखी मस्ती करत एकदाचे जेवण आटोपले आणि आता पुढे सत्याने काय प्लॅन केलाय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.


"सो माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही किती वाट बघता आहात ते दिसतच आहे, तेव्हा वेळ न दवडता सगळ्यांनी बाहेर जाऊया."


"इतक्या थंडीत?" अंगावरचा श्रग घट्ट ओढत तिथी.


"थंडीतच तर मजा असते. चल तर खरी."

एव्हाना सर्व बाहेर आले होते. बाहेर लॉनमध्ये एका बाजूला लाकडं गोळा करून तिथे आग लावली होती. तिथल्या गारव्यामुळे सगळ्यांची पावले आपोआप तिकडे खेचल्या गेली.


"वॉव! कॅम्पफायर! सत्या यू आर ग्रेट यार. कसल्या भन्नाट आयडिया तुला सुचतात?" मंजिरीने आनंदात गिरकी घेतली.


"मग, मी आहेच ग्रेट!" टीशर्ट ची कॉलर टाईट करत तो.


सगळे शेकोटीभोवती गोल गोल बसले होते. वातावरणातील कुंद गारवा आणि शेकोटीची ऊब.. एक परफेक्ट कॉम्बिनेशन तयार झाले होते. तिथी, मंजिरी, राशी, अभी, रौनक आणि सत्या.. त्यांचे वर्तुळ पूर्ण झाले होते. शेकोटीतील प्रकाशात सर्वांचे चेहरे तेजस्वी दिसत होते.


"चला, आपण काहीतरी खेळूया. गाण्याच्या भेंड्या.. काय म्हणता? गर्ल्स वर्सेस बॉईज!" प्रश्न आणि उत्तरही तिथीचेच.


"चालेल, चालेल. बॉईज आर आल्वेज रॉक्स!" रौनकने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.


"ओये, आधी गाणी गाऊन तर दाखवा. आला मोठा बॉईज रॉक्स म्हणणारा." त्याला कोपराने ढोसत तिथी.

"अरे, अरे.. भांडू नका. आणि हे काय लहान मुलासारखं गाण्याच्या भेंड्या खेळताय? त्यापेक्षा दुसरं काहीतरी.." राशीकडे चोरटी नजर टाकत अभी म्हणाला.


"मग दमशराज? गर्ल्स वर्सेस बॉईज. बघूया एक्टिंगमध्ये कोण बाजी मारतो ते." तिथी.


"चालेल चालेल. माझा अभिनय तुम्ही बघा तर खरं." रौनक.


"मुलं अभिनयात किती समोर असतात ते अनुभवाने ठाऊक आहे. त्यापेक्षा ट्रुथ ऑर डेअर? व्हॉट से?" सत्याकडे बघून मंजिरीने थेट विचारले.

"नो प्रॉब्लेम! मी तर काहीही खेळायला रेडी आहे." अग्नीमध्ये लाकडाचा तुकडा टाकत तो.

"ओके, ठरलं तर मग. प्ले द म्युझिक अँड पास द.." ती इकडेतिकडे बघत बोलायची थांबली. पास करायला तिला काहीच सापडत नव्हते.

"..हं, पास द स्कार्फ!" राशीच्या गळ्यात अडकवलेला स्कार्फ खेचत ती म्हणाली.

"अगं.."

"काय? गेम खेळण्यापुरताच तुझा स्कार्फ वापरतोय आपण. कायमस्वरूपी कोणाला देणार नाही आहोत." मंजिरीच्या वक्तव्यावर राशीने डोक्याला हात मारला.

सत्याने मोबाईलवर गाणी सुरु केली आणि मंजिरीने स्कार्फला गोल गुंडाळून त्याचा बॉल तयार करून एकमेकांकडे पास करायला सुरुवात केली. म्युझिक थांबले तेव्हा रौनकच्या हातात स्कार्फवजा बॉल होता.


"चल बोल आता. सत्य की धाडस?"


"हं?" मंजिरीच्या प्रश्नावर त्याने गोंधळून पाहिले.


"अरे वेड्या, डेअर की ट्रुथ?" ती.


"हं, असं बोल ना. मी तर बाबा सत्य सांगणार. डेअर नकोच." तो.


"ओके! मग सांग, कोंबडी आधी की अंडं?" मंजिरीचा प्रश्न.


"अरे, हा काय प्रश्न आहे? असे लॉजिक नसलेले प्रश्न मला विचारणार आहेस?"


"हो, तुला उत्तर मात्र लॉजिकली द्यायचे आहे हं आणि
तेही खरंखुरं उत्तर." गर्ल्सगँगला टाळी देत मंजिरी.


"काहीही काय यार?"


"मग तुला याचे उत्तर येत नाही असे डिक्लेअर तरी कर म्हणजे तू हरला आहेस हे आम्ही घोषित करू." तिथी.

"ए, असं काही नसतं हं. मी देतो ना उत्तर. तुम्हाला काय घाबरतो का? लिसन, अकॉर्डिंग टू नेचर्स लॉ, आधी कोंबडी मग अंडं. झालं समाधान?"


"ओये, मग विदाउट अंडं कोंबडी कशी आली?" मंजिरी.

"ॲक्च्युली हा मुख्य प्रश्न नाहीये, तरीही सांगतो की ती कोंबडी टेस्ट ट्यूब बेबीची निर्मिती आहे. नाऊ नो अदर क्वश्चन." तो.


"अरे? टेस्ट ट्यूब बेबी? हे कसलं लॉजिक आहे?"


"हेच खरं लॉजिक आहे डॉक्टर मंजिरी. नाऊ प्लीज गो अहेड! मी तुमच्या पूर्ण प्रश्नाची उत्तर दिली आहेत." सत्याकडे बघून डोळा मारत तो.


"यस, रौनक इज राईट. आय थिंक त्याचं लॉजिक बरोबर आहे. आता परत सगळ्यांनी रेडी व्हा." म्युझिक स्टार्ट करत तो.

मंजिरीने त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले. तोवर म्युझिक सुरु झाले होते तेव्हा नाईलाजाने हातातील स्कार्फ तिने पुढे पास केला.

"डेअर ऑर ट्रुथ?" म्युझिक थांबल्यावर तिथीच्या हातात स्कार्फ बघून रौनक विचारायला पुढे आला.

"ऑफकोर्स ट्रुथ! सत्य के सिवाय मै कुछ ना बोलूंगी." गंभीर चेहरा करून नाटकी सूर लावत तिथी.

"अच्छा? मग सांग, लग्नानंतर तुझ्या नवऱ्याने हनिमूनसाठी महाबळेश्वर ऐवजी दुसरे ठिकाण बुक केले तर तू काय करशील?" त्याच्या प्रश्नाने एकच हशा पिकला.

"तर ते ठिकाण कॅन्सल करून मी महाबळेश्वरलाच त्याला घेऊन येईन. स्टुपिड, किती इझी प्रश्न विचारला रे? यात मार्क्स कट व्हायचे काही चान्सच नव्हते." त्याचे नाक ओढत तिने मंजिरीला टाळी दिली आणि वातावरणात पुन्हा हास्याची लहर उमटली.

मोबाईलमधले म्युझिक पुन्हा सुरु झाले होते. आता बॉल कोणाच्या कोर्टात असेल? अभी की सत्या? आणि ते काय निवडतील? सत्य की धाडस?

स्टे ट्यून्ड!
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
फोटो गुगल साभार.
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

सदर कथेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून youtube चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास ईरा कडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.


0

🎭 Series Post

View all