प्रीत तुझी माझी... ❤️ भाग 49 अंतीम

"Thank you तर मी बोलायला पाहिजे तुला dear, तू मला होकार दिला, माझ आयुष्य एवढ छान केल, मला पाहिल्या नजरेत तू खूप आवडली होती तेव्हा वाटल, हीच माझी बायको, माझी अर्धांगिनी, तू मला ज्या प्रकारे समजून घेते, कोणीच हे करू शकत नाही",...... समर

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

समर निघाला वीणा बाहेर पर्यंत आली


" उद्या लवकर ये घरी वीणा मी वाट बघेन",...... समर


" तू येशील का उद्या घ्यायला",...... वीणा


" बहुतेक पप्पा मम्मी येतील",...... समर


" ठीक आहे",....... वीणा


समर सोहा कडे पोहोचला, तिकडे ही छान पूजा झाली, घर खूप सुरेख सजवल होत त्यांनी , सोहा खूप सुरेख दिसत होती, समर आशिष छान बोलत बसले होते, सोहाला घेवून सगळे घरी आले


वीणा ने प्रीती ला फोन केला,..... "झाली का पूजा? काय सुरू आहे, मी आई कडे आली आहे",...


"हो झाली पूजा आता निघतो आहोत घरी जायला मी आणि आई बाबा",...... प्रिति


वीणा खूप खुश होती, या आपल्या छोट्याश्या घराच महत्त्व तिला आज समजल होत, सासरी महाल जरी असला तरी माहेरच्या घराची ऊब वेगळीच असते, किती छान वाटत तिथे, आपले आई बाबा घरचे सगळे दादा वहिनी त्यांचे मूल प्रकाश सगळे किती छान आहेत, लहान पणी पासुन च्या सगळ्या आठवणी आहेत या घराशी जुळलेल्या


" आज आपण खूप एन्जॉय करायच ह वहिनी, संध्याकाळी खूप जास्त स्वैपाक नको करायला, भाजी पोळी करू, चार पाच दिवस झाले खूप खाण सुरू आहे",....... वीणा


"मी करेन बरोबर तुम्ही बसा",.... वहिनी


आई बाबा आनंदात होते....


सोहा घरी आली,..... "किती छान वाटतय आपल्या घरी",...


" काय झाल ग",..... पप्पा


" काही नाही पप्पा आपल्या कडे मला वेगळच रीलॅक्स वाटत ",...... सोहा


" होईल तिकडची ही सवय बेटा",...... पप्पा सारखे सोहाच्या आसपास होते


समर ने वीणा ला फोन लावला,....... "आमची काही आठवण वगैरे येते की नाही मॅडम ",..


" तुझा विचार करत होती मी की तू सोहा घरी पोहोचले की नाही तेवढ्यात तुझा फोन आला ",...... वीणा


" काय करते आहेस ",..... समर


" आई बाबांची कंपनी एन्जॉय करते आहे",........ वीणा ,


"सोहा ही खूप खुश आहे इकडे येवून, तुम्ही मुली ना खरच hats off, आपल घर सोडून सासरी नवा संसार थटायचा कस जमत तुम्हाला ",...... समर


" मला अवघड वाटतय, पण आहात तुम्ही सगळे सोबत",..... वीणा


दुसर्‍या दिवशी वीणा सासरी जाणार होती, पप्पा मम्मी येणार होते घ्यायला .......


"तुला अजून काय लागत ते सामान घे तुझ वीणा ",..... आई


"हो आई मला ड्रेस न्यायचे आहेत, ऑफिस साठी लागतील ",..... वीणा


वीणा ने बॅग भरली मग वहिनी ला स्वैपाक करायला मदत केली.....


मम्मी पप्पा आले, बाबानी खुर्च्या टाकल्या...


"आमच्या कडे बसायला जागा कमी आहे",..... बाबा


" काही हरकत नाही हो, मन मोठ पाहिजे, वागण चांगल हव, आणि छान वाटत तुमच्या कडे, मला आवडत",...... पप्पा

गप्पा झाल्या, जेवायला बसले सगळे, छान अंगत पंगत बसली होती,


"आम्हाला आता निघाव लागेल, वीणा आटोप" , ......मॅडम ,


वीणा ने तयारी केली..


आईचे डोळे भरून येत होते, पण सारख रडण बर नाही म्हणून ती गप्प होती


जड पावलांनी वीणा सासरी आली....


सोहाला घ्यायला संध्याकाळी येणार होते, वीणा सोहा भेटल्या, खूप छान वातावरण झाल होत, समर खूप खुश होता


संध्याकाळी सोहाच्या घरचे आले, वीणा किचन मध्ये मदत करत होती


"वीणा बेटा जा तू जावून बस पुढे ",..... मम्मी


" नाही मम्मी तुम्ही बसा मी करते इकडे",....... वीणा


दोघींच आवरल, जेवण झाल, सोहा वीणा, मम्मी ला भेटली, मम्मी हॉल मध्ये गेली....


"अवघड असत वीणा वहिनी सासरी, सगळ नवीन वाटतय ",..... सोहा


"हो ना मलाही काही सुचत नाहीये ",...... वीणा


" काळजी घे तू" ,...... समर


" हो तू ही",..... वीणा


सोहाला सासरी गेली


मॅडम किचन मधे आवरत होत्या आजी आली तेवढ्यात


"अग काय ते समर वीणा ची खोली सजवली की नाही ",........ आजी


" नाही आई, समर ला नाही आवडत तो नाही बोलला, फक्त स्वच्छ करून घेतली",....... मॅडम


मॅडम बाहेर आल्या,........" समर वीणा ला घेवून जा खोलीत, तीच सामान खालच्या खोलीत आहे, ते ही ने वरती",..


समर वीणा ने वरती सामान नेल......


खूप स्वच्छ आणि छान वाटत होती रूम


समर ने वीणा ला लाल गुलाबाचे फूल आणि चॉकलेट दिल


Welcome to my life n my room.....


वीणा छान हसत होती...


" मला जास्तीच डेकोरेशन कॅन्डल वगैरे आवडत नाही वीणा, म्हणून जास्त डेकोरेशन केल नाही ",...... समर


"हो मला ही नाही आवडत, नंतर त्या वस्तू वाया जातात",..... वीणा


be comfortable.....


"हो मला तुझ्या सोबत आवडत तस ही",..... वीणा


समर छान हसत होता


"तुझा पासपोर्ट सोबत आणला ना, उद्या तिकीट काढावे लागतील स्वित्झर्लंड चे ",...... समर


" कधी जायच आपण, खूप खर्च नाही का होणार ",..... वीणा


" पुढच्या आठवड्यात जाऊ या मॅडम आणि हा आपण आपला पर्सनल खर्च करतो आहोत, चालेल ना, आता काय बाबा तुला विचारून मला सगळ कराव लागेल ",..... समर


खूप आनंदी होते दोघ.....


दोघ बाल्कनीत येवून बसले,..... "आता पुढे काय प्लॅन आहे वीणा, दोघ मिळून ठरवू"... समर


"समर thank you सगळ्या गोष्टीं साठी, तू ज्या प्रकारे सगळ्यांशी वागतो, माझी, माझ्या घरच्या बाकीच्यांची काळजी घेतोस खूप छान, तू मला असा कोणी परका वाटत नाही ",....... वीणा


"Thank you तर मी बोलायला पाहिजे तुला dear, तू मला होकार दिला, माझ आयुष्य एवढ छान केल, मला पाहिल्या नजरेत तू खूप आवडली होती तेव्हा वाटल, हीच माझी बायको, माझी अर्धांगिनी, तू मला ज्या प्रकारे समजून घेते, कोणीच हे करू शकत नाही",...... समर


दोघ इमोशनल झाले होते...


समरने वीणा चा हात हातात घेतला,....." तू मला प्रॉमीस कर वीणा कुठलेही गैरसमज आपल्यात होणार नाहीत, काहीही झाल तरी नीट बोलून प्रश्न सोडवायचे ",..


प्रॉमीस......


दोघ बर्‍याच वेळ बोलत बसले होते, सुरेख अश्या सहजीवनाला आता सुरुवात झाली होती, जिथे खूप प्रेम, विश्वास होता एकमेकांबद्दल......


पाच वर्षां नंतर......


वीणाने आता परांजपे इंडस्ट्री जॉईन केली, मुळातच हुशार समर वीणा ने अजून 4-5 कंपनी उघडल्या, त्यांना एक मुलगा होता


सोहा आशिष चा बिझनेस ही खूप छान सुरु होता, त्यांना एक मुलगी होती


प्रकाश ने त्याची फॅक्टरी सुरू केली होती, दादा आता प्रकाश ला हेल्प करत होता, आई बाबा आता 3 Bhk त शिफ्ट झाले होते,


प्रिती वीणा च्या कंपनीत होती मोठ्या पोस्ट वर, तिला एक मुलगा होता


समर वीणाने एक सेवाभावी संस्था सुरू केली होती त्यात ते अनेक वृद्धाश्रम अनाथाश्रम यात सेवा देत होते....


समाप्त....
........


प्रित तुझी माझी लिहितांना...

नमस्कार..

श्री स्वामी समर्थ

सर्व प्रथम वाचकांचे खूप आभार, खूप प्रेम मिळाल या कथे दरम्यान, तुमचं प्रेम असच राहू द्या.....

कथा लिहायला इरा सारखा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला..... संजना मॅम, योगिता मॅम खूप thanks....

माझ्या अमृतवेल ग्रुप च्या फ्रेंड्स ज्यानी मला लिखाणा साठी प्रोत्साहन दिल, खूप thank you शीतल, मेघा, ऋतुजा, अनुराधा, दीप्ती .....

ही कथा कशी सुचली,..... एक दिवस इरा फेसबुक पेजवर कादंबरी लेखन स्पर्धा सुरू होणार आहे अस समजल, माझ्या सगळ्या मैत्रिणी बोलल्या तू लिही, पण हिम्मत होत नव्हती, एकदम 30 भाग जास्त होतात, कथा पूर्ण नाही झाली तर असे बरेच विचार मनात येत होते, मग त्यासाठी प्रित तुझी माझी लिहायला घेतली, पाहिले 10 भाग आधी लिहून झाले, पण पोस्ट करू की नको अस वाटत होत, विचार केला स्पर्धेत भाग घेण्या पेक्षा असच पोस्ट करू या

हिम्मत करून केली पोस्ट कथा, वाचकांनी खूप प्रेम दिल या कथेला, खूप छान कमेंट्स प्रत्येक भागाला येत होत्या, लिखाणाचा अजून हुरूप आला, thank you friends तुम्ही खुप छान एनकरेज केल

घरचे माझे नियमित वाचक माझे वडील सुधाकर निकुंभ, माझी आई नलिनी निकुंभ, माझी बहिण रंजना ताई, दीपा, नयना, स्नेहल, सारिका, अमृता, माझा भाऊ आनंद, माझी प्रिय मैत्रीण स्मिता, प्रत्येक भाग वाचले त्यांनी, छान काॅम्नेट्स ही देत होते ते, खूप छान सपोर्ट केला

माझे मिस्टर गणेश सुतार, मुल समृद्धी, सुयश, हे ही ग्रेट सपोर्ट सिस्टम आहेत, नेहमी पाठींबा देतात, बर्‍याच वेळ घरच काम थांबवून भाग लिहून पूर्ण केले, त्या वेळी या सगळ्यांची खूप मदत झाली,

माझ्या कथेत जास्त ट्विस्ट नव्हते, सगळी कडे आनंदी वातावरण होत, पण मला माझी कथा तशीच हवी होती, आपल्या नेहमीच्या जगण्यात किती तरी टेंशन आपण फेस करतो, निदान कथा वाचतांना आनंद मिळाला पाहिजे अस वाटल मला...

समर आणि वीणा अतिशय सुंदर जोडपं, खूप प्रेम मिळाल या जोडी ला, अतिशय समजूतदार वीणा, स्वतः च्या पायावर उभी, अन्याय सहन न करण, स्वतः सोबत इतरांचाही विचार करण, घरच्यांना सपोर्ट करण, खूप छान,.... समर ने खूप छान सांभाळ सगळ्यांना, श्रीमंत घरचा मुलगा पण अजिबात गर्व नाही, शिकलेला, मोठ्यांशी आदराने वागणारा, फॅमिली ला सांभाळणारा, ज्याच्या वर विश्वास ठेवता येईल असा,...

त्यांच्या घरचे लोक ही खूप छान समजूतदार होते, बाबा आई, दादा प्रकाश, मस्त सगळे, सविता वहिनी आधी चिडलेली दाखवली होती, पण ती परिस्थिती मुळे तशी होती, दादा चा पगार होत नव्हता, घरात खर्चायला पैसे नव्हते, चीड चीड होणारच, पण समर ने दादा ला सपोर्ट केला, त्याच ऑफिस नीट सुरू झाल वहिनी ही नंतर खुश राहु लागली...

प्रकाश अतिशय हुशार पण त्याला पैशा अभावी स्वतःच काही करता येत नव्हत,...

समर ची आजी माझ आवडत characters किती समजूतदार आणि गोड, सूनबाई करिअर ओरीएंटेड तर पूर्ण घरचा भर अजून सांभाळला अशी आजी strong women

प्रीती ही छान मैत्रीण

परांजपे सर मॅडम यांनी श्रीमंती खूप बघीतलेली श्रीमंत लोकांना बरेच चांगले वाईट अनुभव येतात, लोक आपल्या स्वार्थ साठी नीट वागतात त्यांच्या शी, पण त्यांना चांगल्या माणसांची पारख असते

शेवटी थोडा सामाजिक संदेश दिला आहे, आपल्या कडून होईल तेवढ दान किवा मदत समोरच्याला करायला हवी...

परत एकदा वाचकांचे खूप आभार .......

©️®️शिल्पा सुतार







🎭 Series Post

View all