ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........
सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....
©️®️शिल्पा सुतार
.......
©️®️शिल्पा सुतार
.......
वीणा ला काही सुचत नव्हता ती सारखी समर कडे बघत होती...
"काय झाल वीणा",..... समर
"मला विश्वास बसत नाही की आपल लग्न झालं आहे , मला झेपेल का ही जबाबदारी , सगळ्यांच्या अपेक्षांना मी पूर्ण पडेल ना",..... वीणा
"तू काही काळजी करू नको घरच्यांची वीणा, काही प्रॉब्लेम नाही, सगळे समजूतदार आहेत आणि काही हव असेल तर मी आहे ना",..... समर
" तुझा खूप आधार वाटतो मला ",...... वीणा
दोघ बर्याच वेळ हात हातात घेऊन बसले होते.....
दिवस भर धावपळ झाली, संध्याकाळी रिसेप्शन होत
तिघी जोड्या छान तयार होवुन सगळ्यांन मध्ये मिसळल्या होत्या, तिघी खूप सुंदर दिसत होत्या, वीणा प्रिती सोहाने घागर घातला होता , घागर वीणा वर शोभून दिसत होता,
आता प्रोग्राम साठी बरेच पाहुणे आले होते, वीणा प्रीतीच्या ऑफिसचे सर , प्रशांत, वीणा प्रीतीच पूर्ण ऑफिस इकडे आल होत, Mr दीक्षित, समरचे मित्र, ऑफिसचे लोक, परांजपे सर खूप धावपळीत होते, प्रत्येकाच स्वागत करत होते
"सगळ्या प्रोग्राम ला का आला नाहीस प्रशांत, मला राग आला आहे ",..... वीणा
"थोड काम होत अर्जंट ऑफिस मध्ये, तुम्ही दोघी सुट्टीवर आहात, माझी धावपळ होते, कधी जॉईन होताय तुम्ही दोघी, मला बोर होतय ऑफिस मध्ये ",...... प्रशांत
"तस काही फिक्स नाही, वाटल तर सुट्टी वाढवू नाही तर लगेच ही जॉईन होवू",...... वीणा
"हो माझ ही फिक्स नाही",...... प्रिति
सोहा चे मित्रा मैत्रिणी आल्या होत्या रिसेप्शन ला, ती तिच्या ग्रुप मध्ये रमली होती...
खूप छान गिफ्ट मिळाले तिघी जोडप्यांना.....
रिसेप्शन साठी जेवणाचा थाट वेगळाच होता, वेगवेगळ्या प्रकार च्या डिशेस चा बुफे लावला होता, मुलांची मजा होती
"नुसत आईस्क्रीम खायचा नाही ह अभी आरु, नंतर लगेच शाळा आहे, सर्दी होईल",..... सविता वहिनी
आई बाबा छान बसुन सगळा प्रोग्राम बघत होते, दोघांच्या चेहर्यावर समाधान होते..
बर्या पैकी पाहुणे येवून गेले, परांजपे सर मॅडम आता छान सगळ्यांमध्ये बसले होते, मस्त गप्पा सुरू होत्या सगळ्यांच्या...
" चल आपण पाणी पुरी खाऊ वीणा",..... समर वीणा पाणी पुरी खायला गेले
"हनिमून फिक्स आहे ना मग वीणा स्विझरलँड ला जाऊ या ना ",....... समर
"समर नंतर बोलू ना आपण कोणी ऐकेन",..... वीणा
"ऐकु दे आता आपल लग्न झालं आहे आणि मी माझ्या बायकोशी बोलतो आहे ",..... समर
" लगेच कस जमेल पण आपण थोड्या दिवसांनी जाऊ या का",...... वीणा
"नाही लवकर ठरवू ट्रीप ",...... समर
वीणा च्या गालावर अजून लाली चढत होती
" काय बोलण चाललय मॅडम",..... वहिनी
" ये ग वहिनी पाणी पुरी खा ",...... वीणा
" वहिनी तुम्ही सांगा वीणा ला, ती बोलते नंतर जाऊ फिरायला ",....... समर
" समर........ वहिनी तू ऐकू नको ग याच",...... वीणा लाजून चूर झाली होती
"फार महत्वाचा चालायला वाटतं तुमच डिस्कशन, चालू द्या मी हे हे सांगायला आले की समर वीणा,.... परांजपे सर बोलवतात आहे तुम्हाला, कोणी तरी ऑफिस मधून आलेत तुमची ओळख करून द्यायची आहे ",........वहिनी
दोघ तिकडे गेले...
छान डिनर झाल बराच उशीर झाला होता, खूप थकले होते सगळे सगळे लवकर झोपले
दुसर्या दिवशी सकाळी पासून खूप पाहुणे येत होते, 11 जोडप्यांच आज सामुदायिक विवाह सोहळा होता, त्यांच्या घरच्या सगळ्यांन साठी खूप छान व्यवस्था करण्यात आली होती, समर वीणा जातीने लक्ष देत होते, चहा नाश्ता घ्या सगळ्यांना सांगत होते, आता बाकीचे सगळे मंडपात आले होते
एका बाजूला मंडप ओळीने होते, त्याच्या समोर संसार उपयोगी वस्तू ज्या द्यायच्या होत्या त्या मांडल्या होत्या
परांजपे सर मॅडम, वीणा च्या घरचे सगळे कामाला लागले होते, कोणालाही काहीही कमी पडू नये अस वाटत होत त्यांना
वीणा आज खूप सुंदर दिसत होती, छान हिरवी साडी नेसली होती ती, थोडासा मेक अप त्यात मंगळसूत्र, खूप तेज आल होत चेहर्यावर, समर च सगळ लक्ष् वीणा कडे होत, हे तिला समजत होत, त्या मुळे वीणा च्या गालावर अजून लाली चढत होती..
बाकीचे आवरुन आले आधी सगळ्यांचा नाश्ता झाला, पुढचे प्रोग्राम सुरु झाले
11 जोडपी मंडपात आले, त्यांच्या घरच्यांना खुर्चीवर बसायची विनंति केली, माईक वर मंगलाष्टक सुरू होते, लग्न लागलं, सगळ्या नवरदेव नवरींनी एकमेकांना हार घातले, सुंदर सनई च्या सुरांनी वातावरण एकदम छान झाल होत, सगळ्यांच्या पुढच्या पूजा सुरू होत्या एका बाजूला जेवण सुरु होते, संसार उपयोगी वस्तू ज्याच्या त्याला दिल्या, खूप धावपळ होत होती, एक एक प्रोग्रॅम छान पार पडत होता
प्रोग्राम खूप छान झाला, घरचे सगळे खुश होते, सगळे आता जेवायला बसले, पण वीणाला आता जेवण जात नव्हतं, कारण जरा वेळाने विदाई होती, तिचे सारखे डोळे भरून येत होते, पण ती काहीतरी गप्पांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवत होती, कसं तरी जेवण झालं,
"काय झालं वीणा, चेहरा का उतरला तुझा",..... दोनदा समरने विचारलं
"काही नाही मी ठीक आहे",...... वीणा
सामुदायिक विवाह सोहळा खूप छान पार पडला, अगदी वीणाच्या मनासारखं सगळं झालं होतं सगळ, त्यामुळे ती समाधानी होती, बरेच पाहुणे गेले होते, आता तिकडे आवर सावर सुरू होती,
वीणा रूम मध्ये आले आई आणि वहिनी पण मागे आल्या
" वीणा तुझी बॅग भरून घे",.... आई
वीणा ने बराच वेळ धरलेला धीर आता सुटला, ती वहिनीच्या गळ्यात पडून रडायला लागली, आईने तिथे पलंगावर बसून घेतले, दोघींनी आईला सावरल,
"हे असं काय करायचं ताई, रडू नका, आईंन कडे तर बघा",..... वहिनी
वाहिनीने आई वीणा ला समजवले
वहिनी, वीणा, आई बॅगा घेऊन बाहेर आल्या, बाहेरही तीच परिस्थिती होती, सोहा समर मम्मी-पप्पा आजी-आजोबा खुर्चीवर शांत बसले होते, मम्मीने सोहाचा हात घट्ट धरला होता,
"चला आवरा लवकर आपल्याला पाच वाजता रूम ताब्यात द्यायच्या आहेत ",..... समर ने पुढाकार घेतला, त्याला माहीत होतं सगळे इमोशनल झाले आहेत
प्रीती हि आली आवरून, आल्या आल्या तिने वीणाला घट्ट मिठी मारली, दोघी रडायला लागल्या, सचिन समर सविता वहिनी सगळे पळत त्या दोघींना सावरायला गेले,
चहा झाला आता,
प्रीती सासरी गेली, प्रीतीच्या आई-बाबांना वीणा ने सांभाळल, समजावल, समरने त्यांना टॅक्सीत बसवलं
"चल समर आता आम्हाला निघाव लागेल",..... आशिष
सोहा सासरी जाणार म्हणून ऑलरेडी आजी आजोबा मम्मी-पप्पा भाऊक झाले होते, आता समर सुद्धा शांत झाला होता एकदम
सोहा सगळ्यांना भेटत होती, शेवटी ती आजी-आजोबा मम्मी पप्पा जवळ आली, पप्पांना मिठी मारून रडायला लागली, सगळे शांत झाले होते, समर पुढे गेला पप्पांना शांत केलं
"सोहा पुरे आता आता रडू नकोस, आजी-आजोबांच्या तब्येतीचा विचार कर, हसून भेट बरं त्यांना" ,...... आता सोहा समरला मिठी मारून रडत होती, ते बघून मम्मी-पप्पांना अजूनच रडू आले, सगळे भावूक झाले होते
खूप टॅक्सी आल्या, आशिष च्या घरची सजवलेली गाडी आली त्यात आशिष सोहा बसले, पप्पा सोहा जवळ उभे होते
" सांभाळा आमच्या सोहाला खूप अल्लड आहे ती",..... पप्पा
"तुम्ही काहीही काळजी करू नका सोहाची",...... आशीष
"आशिष सांभाळ रे स्वतःला, काही वाटल तर मी आहे, कधीही फोन कर " , ........ समर मुद्दाम चिडवत होता त्या दोघांना, दोघ छान हसत होते
"दादा तू बघ आता तुझ, वीणा वहिनी ला मी छान टिप्स देणार आहे तुला छळायच्या ",...... सोहा
बाकीच्या टॅक्सीत घरची मंडळी बसली त्यांना निरोप दिला
आई-बाबा दादा-वहिनी प्रकाश साठी सुद्धा बाहेर टॅक्सी आली तेवढ्यात, एवढा वेळ धरलेला धीर विणा कडून सुटला, तिने बाबांना मिठी मारली,......
"असं करतात का वीणा, तुला कणखर व्हावे लागेल, छान घरी जा तुझ्या, मस्त राहा तिकडे, तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा खूप सुखी रहा बेटा",...... बाबा
"मला नाही जमणार बाबा हे, मी तुमच्या शिवाय नाही राहु शकत",........ वीणा
"असं करतात का वीणा ? का नाही जमणार तुला? तुझ आयुष्य खूप छान आहे, आताशी सुरुवात झाली तुझ्या नव्या आयुष्याला, तू आयुष्यभर आमच्या सोबत नाही राहू शकत, आणि विचार कर तुझे सासर किती छान आहे, तुला यापुढे त्यांचं मन सांभाळायचं आहे, तू जप सगळ्यांना ",..... बाबा समजावत होते
"बाबा पण असं का असतं, आत्ता बघितलं ना प्रीती सोहाला किती त्रास झाला सासरी जाताना ",...... वीणा
" ही जनरीतच आहे बेटा, तुझी आई पण आली आपल्या घरी लग्न करून माझ्यासोबत संसार करायला, सविता सुद्धा आली दादासोबत संसार करायला, आता त्या दोघी घराचा एक हिस्सा बनून गेल्या आहेत, त्यांच्याशिवाय आपण कोणीही जगू शकत नाही, त्या ठरवतील ती पूर्वदिशा असते, तसं तुझं सुद्धा होईल बेटा, तू तुझ्या घरात रमशील, नंतर तुला आमच्याकडेच करमणार नाही, आणि तुला आठवण आली तर यायचं घरी काही लांब घर नाही",....... बाबा
समर, दादा आणि प्रकाश शी बोलत होता, दादाच्या डोळ्यात पाणी होते
"दादा प्रकाश तुम्ही वीणाची काहीच काळजी करू नका",..... समर
" हे काय सांगण झालं का समर, आम्हाला माहिती आहे तू किती चांगला आहेस आणि वीणा ची किती छान काळजी घेशील, पण मन तरीही भरून येत आहे",....... दादा
" सहाजिकच आहे, आम्हाला पण आता सोहा सासरी गेली तर वाईट वाटतय",....... समर
टॅक्सी आली आई-बाबा दादा-वहिनी प्रकाश अभी आरु सगळे घरी गेले, एका कारमध्ये आजी आजोबा मम्मी पप्पा बसले, आणि सजवलेल्या गाडीत समर वीणा बसले, सगळे घराकडे निघाले, समरने वीणाचा हात हातात धरून ठेवला होता, वीणा अजूनही थोडी रडत होती,
"तू काहीच काळजी करू नको वीणा, मी आहे",...... , समर वीणाची खूप काळजी घेत होता, मुद्दामून तिला बोलतं करत होता, वीणा तरी शांत होती
"खर तर आता मी घाबरायला हव, माझ स्वातंत्र गेल, आणि पर्मनंट बॉस आलाय मला",...... समर मुद्दामून थरथरत असल्या सारख दाखवत होता
वीणा हसायला लागली, आता समर ला बर वाटत होत
समर वीणा घरी पोहोचले....
"अरे बाहेर थांबा, तुझी मम्मी आत स्वागताची तयारी करते आहे",..... आजी
समरने वीणा ला बसायला खुर्ची दिली, आतून पाणी मागवल, तो वीणा ला एकदम comfortable ठेवत होता, वीणा एकदम अवघडून गेली होती, सोहा असती तर बर झाल असत,
"समर मी ठीक आहे, तू एवढी काळजी करू नकोस, थोडी इमोशनल झाले होते एवढच, सोहा पोहोचली का घरी",..... वीणा
"त्यांच ही वेलकम सुरू असेल, डिस्टर्ब नको व्यायला, मेसेज पाठवतो तिला",...... समर
तिकडे आई बाबा दादा वहिनी प्रकाश घरी पोहोचलो
दादाने दार उघडल, सगळे आत येवून बसले, केव्हाची सगळ्यांची काळजी घेणारी वहिनी आता एकदम इमोशनल झाली होती, ती रडायला लागली
आई उठून सविता जवळ गेली, दादा ही सविता ला समजावत होता, बाबा एकदम गप्प होते, वीणा सासरी गेली तर घरात भकास वाटत होत, मुल ही घाबरली होती, आरु मांडीवर येवून बसली
"आई का रडते आहे तू? आत्या कुठे आहे? ",..... अभी
"बेटा आत्या च लग्न झाल, ",....... सविता
समर कडे स्वागताची तयारी पूर्ण झाली, समर वीणा चा हात हातात घेऊन दारात उभा होता
आधी परांजपे मॅडमने वीणा समर ला ओवाळल, पाणी भाकरी तुकडा ओवाळून टाकला, माप ओलांडून, कुंकू मिश्रित पावलांनी वीणा ने घरात प्रवेश केला....
"आधी देवघरात जा दर्शन घ्या देवाच",..... आजी
दोघांनी देवाला नमस्कार केला, मग मोठ्यांना नमस्कार केला
"आता सारख नाही ह पाया पडायच्या पुरे झाल ",.......मॅडम
पप्पांनी सोहाला फोन लावला ते पोहोचले होते, घरी स्वागत सुरू होत,
वीणा आज खालच्या रूम मध्ये होती, परांजपे मॅडम तिच्या सोबत होत्या
आवरुन झाल, जेवण झाल, खूप दगदग झाल्याने वीणा ने लवकर झोपून घेतल तिला अजिबात त्या घरात काही सुचत नव्हत
दुसर्या दिवशी सकाळी सत्यनारायण पूजा होती, जरा वेळाने घरातल्या बाकीच्यांना सोहा कडे जायच होत, तिकडे ही पूजा होती, इकडे वीणाचे आई बाबा येणार होते पूजेला, त्या नंतर वीणा माहेरी जाणार होती
सगळे लवकर उठले, समर आवरुन रेडी झाला, देवघरात पूजा मांडली जात होती, वीणा तिच्या रूम मध्ये रेडी होत होती, लाल केशरी अशी साडी ती नेसली होती, परांजपे मॅडम तिला दागिने घालायला मदत करत होत्या,
आजी आत आली, तिच्या हातात गजरे होते,..... "हे माळ वीणा",..
"केवढी सुंदर दिसते आहे वीणा आज, काळा टीका लाव ग पाया ला",...... आजी
समर आत आला, मम्मी गुरुजी बोलवत आहेत तुला, मॅडम गेल्या बाहेर, वीणा समर एकमेकांना कडे बघत होते, वीणा लाजली होती,...... "आजी कोण आली हि सुंदर अप्सरा आपल्याकडे",..... आजी वीणा हसत होत्या
"चला मी बसते पुढे..... समर वीणा ला घेवून ये बाहेर",...... आजी
आजी बाहेर गेली, आता रूम मध्ये समर वीणा दोघेच होते, समरने पुढे होवुन वीणा चा हात धरला....
" समर सोड हात, काय हे",..... वीणा
" अग आजी बोलली ना की वीणाला घेवून ये बाहेर, म्हणून हात धरून नेत होतो मी, तुला बाहेर, तुला काय वाटलं",...... समर
"तू जा बर छळू नको मला",..... वीणाने बाजूच्या उशी ने समरला दोन तीन फटके मारले
"काही खर नाही लग्ना नंतर माझ",.... समर खूप लागलय अस दाखवत होता
समर वीणा बाहेर आले...
आई बाबा आले, वीणा जावून दोघांना भेटली,....." दादा वहिनी प्रकाश मुल नाही आलेत का" ? ,
" नाही ग ते आवरता आहेत" ,...... आई
पूजा झाली, जेवण झाल आम्ही निघतो आता, समर त्यांना सोडायला आला नंतर तो सोहा कडे जाणार होता
वीणा घरी आली, अभी आरु एकदम भेटले
"आत्या तू कुठे गेली होतीस",..... अभी
"आत्या आता तिच्या घरी राहणार, रोज आत्याला भेटायचा आग्रह करायचा नाही ",....... दादा समजावत होता
समर ने मुलांसाठी खाऊ आणला होता, मुल खुश होते, तो आरामशीर कोट वर येवुन बसला, वहिनी ने चहा ठेवला
"वीणा तू केव्हा येणार घरी ",...... समर
" उद्या येतील सकाळी बहुतेक पप्पा मम्मी मला घ्यायला , आजी सांगत होत्या, अशी रीत आहे ",...... वीणा
"ठीक आहे मी निघतो",..... समर सोहाच्या घरी निघाला...........