Login

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 47

सगळं कसं स्वप्नवत सुरू होतं, वीणा ला विश्वास बसत नव्हता, एक वेळ अशी आली होती वीणाच्या आयुष्यात की तिला असं वाटत होतं की आपल समरशी लग्न होतं की नाही, आणि आज या क्षणाला ती समरचे अर्धांगिनी झाली होती

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


सगळे नाश्ता साठी हॉल मध्ये आले, वीणा जावून आजी आजोबा मम्मी-पप्पांना भेटली, सोहा आशिष च्या घरच्यांशी बोलत होती,


आता या तिघी नवरदेव नवरींचा छान ग्रुप तयार झाला होता, सगळे उत्साही होते...


"वाटत आपण पिकनिक आलो आहोत",... आशिष सचिन ने एकमेकांनची ओळख करून घेतली


"हो आता ओळख झाली आहे ना, आपण अस छान नेहमी भेटायला पाहिजे, नेहमी",.... समर


फोटोग्राफर आला,...... "आता नाश्ता झाला की तयार व्हा आपली सगळ्यांची सोबत फोटो शूट आहे" ,


वीणा सोहा प्रीती छान तयार झाल्या, अजून कपडे घेवून ते मागच्या बगिच्यात गेले, आधी सगळ्या जोडप्यांचे सेपरेट फोटो काढले, मग तिघांचे एकत्र ग्रुप फोटो घेतले, खूप मजा आली, कोणी मोठे आजुबाजूला नव्हते...


दुसर्‍या राऊंड ला साडी वर फोटो काढायचे होते, जो जसे रेडी होतील तसे फोटो काढायचे ठरले प्रीतीच झाल फोटो शूट, ती आणि सचिन आवरायला आत गेले,


सोहा आशिष फोटो काढून घेत होते, सोहा मॉडर्न तयारीत खूप छान दिसत होती,


वीणा आली तेवढ्यात तयार होवुन, नेव्ही ब्ल्यू सिल्क च साडी केस मोकळे सोडलेले थोडासा मेकअप, बांगड्या, समर बघत बसला तिच्याकडे, एखाद्या पिक्चर चे हीरोइन सारखी वीणा सुंदर दिसत होती....


"समर काय हे, असा का बघतोस",..... वीणा लाजली होती


"तू केवढी सुंदर दिसते आहेस वीणा, बर झाला पण तुला या साड्या घेतल्या",..... समर


आधी वीणा चे सेपरेट फोटो घेतले, मग दोघांचे कपल फोटो झाले, समर जाऊन अभी आणि आरू ला घेवून आला, त्या दोघांचे पण फोटोग्राफरने फोटो घेतले, वहिनी खुश होती, मुल खूप खुश होते,..


खूप छान फोटो काढून झाले, लंच झाला, वीणा आई एका रूम मध्ये होत्या, बाबा प्रकाश सोबत होते, जरा वेळ आराम केला, संध्याकाळी संगीत होत , तयारी साठी पार्लेर वाली येणार होती, सगळ्यां मुलींनी अनारकली घालायचा ठरवला, सविता वहिनी एवढी छान दिसत होती ड्रेस मध्ये,


"वहिनी तू असे ड्रेस घेत जा, आज दादा बघत बसेल तुझ्या कडे",...... वीणा


वहिनी लाजली होती..


सगळे प्रोग्राम साठी हॉल मध्ये आले, समर समोर उभा होता, वीणा आत आली, तिचा जांभळा अनारकली, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, हातात बांगड्या छान मेकअप केलेला होता, समरनेही त्याच कलरचा मॅचींग दुपट्टा कुर्ता पायजमा घातला होता, दोघांनी एकमेकांन कडे बघितल....


"वीणा तुला सगळेच रंग खूप छान दिसतात",..... समर


"तू ही खूप छान वाटतो आहे ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये",...... वीणा


प्रोग्राम सुरु होण्याच्या आधी फोटोग्राफर ला सगळ्या जोड्यांचे फोटो घ्यायचे होते, तीनही जोड्या बाजूचे गार्डन मध्ये गेल्या खूप सुरेख फोटो काढून घेतले, समरच लक्ष वीणा वरून हटतच नव्हत, सगळे आत आले


संगीत समारंभ सुरू झाला, सगळे छान एन्जॉय करत होते, कपल डान्स ने सुरुवात झाली, मम्मी पप्पा, आई बाबा, आशिषचे आई बाबा, दादा वहिनी, प्रिती सचिन च्या घरचे सगळे एकदम एकमेकात रमले होते, आधी आशिष सोहा ने डान्स सुरु केला, मग समर ने सचिन प्रीती ला उठवल, तो वीणा कडे आला, वीणा मुलांना घेवून बसली होती, समर बरोबर डान्स करायचा वीणा खूप खुश होती, दोघ छान डान्स करत होते, बाकीचे थकले, यंग कपल आता मस्त एंजॉय करत होते....


"प्रीती समर कुठे आहे, आता माझ्या सोबत होता",.... वीणा


"काय माहिती आता एवढ्यात तर इथे होता समर",...... प्रिति


तेवढ्यात दोन-तीन डान्सर आल्या आणि सगळ्यांना खुर्चीवर बसवलं, अचानकच पंजाबी म्युझिक वाजू लागलं बरेचशे डांसर स्टेजवर नाचायला लागले, समर चा सरप्राईज डान्स परफॉर्मन्स सुरू झाला, सगळे आश्चर्य चकित झाले,...


दील चोरी सागा हो गया वे की करिये की करिये
नैनो मे किसी के खो गया वे की करिये की करिये....


समरचा परफॉर्मन्स खूप छान झाला, तो वीणा कडे बघून नाचत होता, सगळे वीणा कडे बघत होते, वीणा ला आता अवघडल्या सारख झाल होत...


I go crazy के जब बजदे पंजाबी वेडिंग साॅन्ग...


पंजाबी डान्सर सोबत आता सगळे यंग कपल समर बरोबर नाचत होते, एक छान गोल केला होता त्यांनी, समरने पुढे होऊन वीणा ला उचलून घेतलं, मस्त धमाल सुरू होती, वीणा ने कशीबशी तिची सुटका करून घेतली आणि बाजूला जाऊन उभी राहिली, प्रीती तिच्या बाजूलाच होती, प्रीती मस्त हसत होती,


"काय हसते आहेस प्रीती तू, ईथे माझी काय हालत होते आहे ",.... वीणा लटक्या रागात होती


"छान डान्स केला नाही समरने",..... प्रिति


" समर काय करेल ना मला ते समजत नाही, सगळेच आहेत ग इथे, नसेल बघितलं ना कोणी",..... वीणा


" एवढं टेन्शन घेऊ नको वीणा",.... प्रिति अजूनही हसत होती


प्रीती गप्प बसणार का...


" कधी केली समरने एवढी डान्सची प्रॅक्टिस तुझ्यासोबत वीणा वहिनी ",..... सोहा मुद्दाम चिडवत होती,..... "छान झाला नाही समरचा डान्स ",...

" सोहा आता तू चिडवू नकोस मला ...... माझ्यासाठीही सरप्राईज आहे हे ",... वीणा हसत होती


समोरचा डान्स झाल्यानंतर. त्याने सगळ्यांना डान्स साठी ओढल, बराच वेळ सगळे नाचत होते...


आजी नुसती बसून डान्स बघत होती सगळ्यांनी आजीला फोर्स केला,.... "नको ग मला कुठे जमणार आहे डान्स ",..


"मग एक गाण तरी म्हण आजी ",...... सोहा


आजीने एक छान गाणं म्हटलं सगळे आजीच्या आजूबाजूला बसले होते....


"आज सुरेख झाला नाही संगीत चा प्रोग्राम",...... आजी आणि आजोबा आनंदात होते


सगळे खूप थकले होते जेवण झाल, रूम मध्ये आले ते, आवरून झाल, आई खुश होती, वीणा तिचे आणि आईचे कपडे नीट ठेवत होती....


समर सारखा मेसेज करत होता, वीणा ला राग आला होता त्याचा...


" काय चाललय समर, कश्याला सारखा मेसेज करतोस",...... वीणा


"काय झालं, कसा वाटला माझा डान्स",..... समर


" छान होता पण सगळ्यांसमोर तू मला का उचलून घेतल, आणि डान्स साठी ओढलं",..... वीणा

" तू गडबडून गेली होतीस का तेव्हा, तू रागावलीस का माझ्यावर ?",.... समर


" हो. खूप रागावली मी ",..... वीणा


" इट्स ओके यार आपले लग्न आहे दोन दिवसांनी",.... समर हसत होता


" सगळे होते समोर आजी आजोबा बाबा पप्पा वगैरे ",....... वीणा


"नसेल दिसल त्यांना, थोड तर चालणारच ग ",...... समर


" अस केल तर मी बोलणार नाही तुझ्या शी",..... वीणा


" दोन दिवस वीणा फक्त",.... समर


" नाही बोलत मी तुझ्या शी जा, तू असाच मला त्रास देणार आहे का ",..... वीणा


" अरे यार मी तिकडे येवू का तुझा राग काढायला ",.... समर


" नको आई झोपली आहे ",..... वीणा


" मग सांग राग गेला, नाही तर मी येईन तिकडे ",...... समर


" गेला माझा राग Ok",...... वीणा हसत होती


दोघं छान चॅटिंग करत बसले होते....
......


दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता, सकाळी नाश्त्यानंतर कार्यक्रम होता, मेहंदी आर्टिस्ट सकाळी आल्या होत्या, हॉल मध्ये छान बसायची व्यवस्था केली होती,


"भरपूर नाश्ता करून घ्या छान सगळ्यांनी",...... आजी


नाश्ता झाला...


आधी सगळ्या नवरीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात झाली, नंतर बाकीच्या मेहंदी लावणार होते..


समर आशिष सचिन मध्ये मध्ये येऊन बघत होते कशी मेहंदी काढली जाते ते... मुद्दाम त्रास देत होते,


समरच सगळ लक्ष वीणा कडे होत, वीणा मुद्दाम त्याच्या कडे दुर्लक्ष करत होती...


"चला मुलांनो, समर आशिष सचिन, आता तुमच्या हातावर मेहंदी काढून घ्या, चल समर आटोप लवकर",..... आजी


"नाही आम्ही नाही काढणार मेहंदी, मला नाही आवडत आजी",..... समर


"मग कशाला सारखे घेऊन बघत आहात इकडे काय चाललय ते",...... आजी


"आम्ही कुठे त्रास देतोय , मुलींची मेहंदी काढून झाली तर फोटो ग्राफरने बोलवल आहे, ते सांगायला आम्ही आलो आहोत ",..... समर येवून वीणा जवळ बसला


सगळे हसायला लागले,....


" उठ आधी तिथून समर, आता जर का परत इकडे आले तर पकडून तुम्हाला पण मेहंदी काढण्यात येईल",...... आजी


बराच वेळ असाच हसी मजाक मध्ये गेला......


मेहंदी लावून झाल्यानंतर मेहंदीचे फोटो शूट झालं, तिघे कपल छान एकत्र एन्जॉय करत होते


आता सगळे कार्यक्रम उद्या सकाळी होते, आधी हळद नंतर लग्न, सगळे आरामात होते, मेहंदी काढल्याने काही करता येत नव्हत, लंच कसा तरी केला चमच्याने, सगळे आपल्या जोडीदाराला मदत करत होते


मुलांना तर तो चान्स हवा होता,


"वीणा चल आपण जेवू या, मी जेवण घेवून येतो",..... समर


समर ने छान ताट वाढून आणल, स्वतः वीणा ला खाऊ घातल,


"किती छान वाटतय नाही अस तुझ्या सोबत वीणा ",..... समर


वीणा लाजली होती


आशिष सोहा, सचिन प्रीती... छान रमले होते गप्पांमध्ये....


सकाळ पासून हळदी ची गडबड सुरू होती, सगळ्यांना हळद लागली, वीणा ची हळद दादा वहिनी च्या हातून होती, अतिशय सुंदर पिवडी साडी नेसलेली वीणा खूप छान दिसत होती, छान एक वेणी हातात बांगड्या, सोज्वळ रूप खूपच छान, आधी समर ला हळद लागली मग त्याची उष्टी हळद वीणा कडे आली, दादा वहिनीने हळद लावायला सुरुवात केल्यानंतर वीणा च्या डोळ्यात पाणी होत, दादाने त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांने जर वीणा कडे बघितलं असतं तर तो ही रडायला लागला असता, आई-बाबा प्रकाश अभी आरु सगळ्यांनी वीणाला हळद लावली, हातात चूडा भरला, मेहंदीने रंगलेले हात त्यात हिरव्या चूडा वीणा ला शोभून दिसत होता...


मेक अप आर्टिस्ट आले तेवढ्यात, लग्नासाठी आवरा चला पटापट, सगळ्यांची धावपळ उडाली, तयारी झाली लाल शालू त वीणा अतिशय सुंदर दिसत होती, आई वहिनी आल्या तिला दागिने घातले, आई च्या डोळ्यात पाणी होत, तिने वीणा कडे डोळे भरून बघितल, प्रीती रेडी होती, प्रीतीची आई प्रीतीची झालेली बघून दागिने घालून देत होती


सोहा ही खूपच छान दिसत होती, आजी तिथेच बसली होती, सगळ्या सामना कडे लक्ष देवून होती ती , मम्मी आली तिने तिघी मुलींची दृष्ट काढली, चला मुलींनो मांडवात,


" आपले नवरदेव मुल तयार झाले का",.... आजी


"हो मी आता तिकडून आले, चला आई आपण मांडवात जाऊ",..... मॅडम


"सामानाच्या कपातला लॉक लाव ग मग निघू",..... आजी


या वयात ही आजी किती छान सगळ सांभाळतात, सगळ्यांना कौतुक वाटत होत


सगळे मांडवात आले....


लग्न घटिका आली जवळ थोड्या वेळे च्या अंतरावर तिघी लग्न होते आधी प्रीती मग सोहा शेवटी वीणा च


खूप सुरेख तीन मंडप सजवले होते, फुलांची आरास अतिशय सुंदर होती, मंडपाच्या चारी बाजूला कळशी यांचे डेकोरेशन होतं, त्याला केळीचे खांब बांधलेले होते, छान पडदे सोडलेले होते, आजुबाजुला बसायची व्यवस्था होती, छान सोफे अरेंज केले होते....


मंडप बघून वीणा ला धड धड होत होती, किती महत्वाचा दिवस आहे हा आज माझ्या साठी, माझ आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे आजपासून , अवघे काही तास, माझं आणि समरच लग्न होणार, उद्या तर मी सासरी जाणार, आई बाबा कसे राहणार आहेत माझ्याशिवाय काय माहिती, मी तरी कशी राहणार आहे त्यांच्या शिवाय, समरला आणि मला आशिर्वाद द्या देवा,


सगळे छान फोटो काढून घेत होते, आधी प्रीती सचिन च लग्न लागल, वीणा पुढे होती तिच्या जवळ, काका काकू इमोशनल झाले होते, त्यांच्या पुढच्या पूजा सुरू होत्या, प्रीती आणि सचिन के सात फेरे सुरू झाले, सगळे खूप आनंदात होते...


सगळे सोहा आशिष च्या मंडप जवळ जवळ आले, आजी आजोबा खुर्ची वर बसले होते, मम्मी पप्पा समर वीणा मंडप मध्ये होते आशिष च्या घरचे सगळे जमले, मम्मी पप्पा खूप इमोशनल झाले होते,


सोहा आणि आशिष खूप खुश होते, हेच मम्मी पप्पांसाठी खूप होतं, समर खूप शांत उभा होता, इतर वेळी तो सोहाच नाव घ्यायच एक संधीही सोडायचं नाही तो, आज मात्र नवरीचा रूपातील आपल्या बहिणीला बघून त्याचं मन भरून आलं होतं


सोहा आणि आशिष चे सात फेरे झाले, पुढची पूजा सुरू होती, ती पूजा झाल्यावर वीणा आणि समरच लग्न होत , वीणा सोहा जवळ बसुन होती, आशिष ने सोहाला मंगळसूत्र घातल, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या , पप्पा मम्मी आजी आजोबांन जवळ बसलेले होते, पप्पांचे सारखे डोळे भरून येत होते


सगळे आता वीणा आणि समरच्या मंडपाजवळ आले, आई दादा वहिनी बाबा प्रकाश अभी आरु सगळे मंडपाजवळ उभे होते, नवीन लग्न झालेली जोडपे प्रीती सचिन, सोहा आशिष हे उपस्थित होते, आजी-आजोबा मम्मी पप्पा खूप खुश होते


समर सारखा वीणा कडे बघत होता, ज्या गोष्टीची खुप वाट बघत होते आता ते लग्न लागणार आहे, मी काय एवढा नर्वस आहे, सुचतच नाहीये काही, विश्वास बसत नाही, मंगलाष्टकं सुरू झाल, गुरुजींनी दोघांच्या हातात हार दिले, मंगलाष्टक संपली दोघांनी एकमेकांना हार घातले, सगळेच आणि टाळ्या वाजवत होते, आई बाबा एकमेकांचा हात धरून सुरु असलेला सोहळा बघत होते,


आजी आजोबा मम्मी-पप्पा सगळेच इमोशनल झाले होते, पुढची पूजा सुरू झाली, सात फेरे झाले, आजीने मंगळसूत्र समर कडे दिल, समर ने ते वीणाच्या गळ्यात घातल,


सगळं कसं स्वप्नवत सुरू होतं, वीणा ला विश्वास बसत नव्हता, एक वेळ अशी आली होती वीणाच्या आयुष्यात की तिला असं वाटत होतं की आपल समरशी लग्न होतं की नाही, आणि आज या क्षणाला ती समरचे अर्धांगिनी झाली होती, समरचा हात पूजा करतांना तिच्या हातात होता, दोघं खूप भावुक झाले होते, गुरुजी मंत्र म्हणत होते, दोघं मनात ते मंत्र दोघांना साठवून घेत होते, अतिशय मंगलमय वातावरण झाल होत, घेतलेल्या सातफेरे सात वचन एकमेकांची साथ देण्याचे दोघांनी मनोमन ठरवलं होतं, मी तुला खूप खुश ठेवेल वीणा, मी सुद्धा तुझी पदो पदी साथ देईल समर, कुठलेही संकट आले होते मी आधी पुढे होईल, दोघांच्या मनातील विचार थांबत नव्हते.. समर अचानक खूप serious झाला होता, दादा प्रकाश कडे तो बघत होता, काही काळजी करू नका मी आहे वीणा साठी हे जणू तो सांगत होता, वहिनी वीणा सोबत होती, आई बाबा मुलांना सांभाळत होते


मंगळसूत्र खूप छान शोभत होत वीणा ला, खूप तेज आल होत तिच्या चेहर्‍यावर


सगळ्या जोडप्यांनी उठून मोठ्यांचा नमस्कार केला, वीणा प्रीती एकमेकींना भेटल्या, सोहा समर मम्मी पप्पांन सोबत बसले होते, आता पुढे काही कार्यक्रम नव्हता, पाहुण्यांची पंगत झाली, बरेचसे लोक घरी गेले


घरच्यांची जेवणाची पंगत बसली, तिघेही जोडपे मध्यभागी बसले होते, अतिशय आनंदी आणि खेळकर वातावरण होतं, जेवण वाढलं गेलं, नवरदेव नवरी ने एकमेकांना घास भरवले, मस्त जेवण झाल


उद्या चा दिवस महत्त्वाचा होता उद्या होत सामुदायिक विवाह सोहळा.....
...........

कथा संपत आली आहे, वाचकांनी जे काही प्रेम समर वीणा ला दिल, ते अगदी भारावून टाकणार आहे, खूप प्रेम आणि आभार....

🎭 Series Post

View all