प्रित तुझी माझी... ❤️ भाग 46

त्यात एक गोष्ट छान आहे म्हणजे समर, त्या मुळे काही वाटत नाही, किती आधार वाटतो त्याच्या, आपल काहीही चुकल तर तो आहे, काहीही हव तर तो आहे, ही भावना खूप छान आहे, किती छान वागतो तो माझ्याशी, किती हसवतो, शेवटी आयुष्यात जोडीदार समजूतदार आणि आपल्या सांभाळणारा हवा मग सगळ्या गोष्टी सहन



ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

वीणा घरी आली.....


"अजून किती दिवस ऑफिस आहे वीणा, किती कमी दिवस राहिले लग्नाला, परवा कार्यक्रम सुरू होतील, बस ग जरा आरामात माझ्या जवळ, उद्या परत धावपळ आहे, आपल्याला फायनल तयारी करायची आहे",...... आई


"वहिनी काय काय काम बाकी आहेत आपली ",..... वीणा


"आपल्याला पार्लर ला जायचं आहे ताई उद्या",..... वहिनी


"हो जाऊ, आई तू ही येशील का फेशियल कर",..... वीणा


"हो आई तुम्ही ही चला ",........ वहिनी


" काहीही तुम्ही मुली जाऊन या",....... आई


" यावच लागेल तुला",...... वीणा


" अग त्या 11 जोडप्यांची तयारी झाली का सगळी",..... आई


" हो आई सांसारिक वस्तू घेवून झाल्या, लिस्ट रेडी आहे",...... वीणा


वहिनी स्वैपाक करत होती....


" सविता अग बॅग भरून झाल्या आहेत ना",...... आई


"हो आई",..... वहिनी


"इकडे ये जरा, दादा ला बोलव",..... आई


दादा आला,....


"सविता स्वैपाक राहू दे, हे घे पैसे, तू आणि दादा जावून तुझ्या साठी नेकलेस सेट घेवून या",...... आई


"काहीही काय आई, नको मला काही दागिने वगैरे, राहू द्या पैसे, अजून लग्नाचे सगळे कार्यक्रम बाकी आहेत, लागतील पैसे ",..... सविता वहिनी


" आहेत ग पैसे सविता आणि हे पैसे मला तुझ्या बाबांनी दिले आहे तुला द्यायला, तुला माहिती आहे ना तुझ आणि दादाच कुठल्या परिस्थितीत लग्न झाल, मंगळसूत्राच्या दोन वाट्या आणि पाच मणी याशिवाय तुला कधीच काही घेतल नाही, आता जमतं आहे पैशांचा तर घेऊ ग सविता नेकलेस, आता नाही म्हणू नकोस, आणि छान घे घसघशीत, मॅचिंग कानातले ... पूर्ण सेट घे ",...... आई


" आत्ता नको आई, खरच ",..... सविता


"हे बघा तुम्ही दोघं जाणार नसलात तर मी आणि वीणा जाऊन घेवू सविताला नेकलेस, लग्नात नाही घालायचा तर मग केव्हा घालायचा",........ आई


" ठीक आहे आई आम्ही आता नाही उद्या सकाळी जाऊ, आता खूप उशीर झालेला आहे दोन तीन तास तरी लागतील ",...... सविता


" हे घे मग पैसे",..... आई


" तुमच्याजवळ राहू द्या उद्या सकाळी जातांना घेईन",..... सविता


चालेल....


वीणा दोघींकडे कौतुकाने बघत होती,.... "घ्यायचा ना वहिनी लगेच, मी असती तर लगेच जाऊन घेऊन आले असती",


" हो माहितीये वीणाताई म्हणून तर साखरपुड्याची वेळी नेकलेस केल्यावर आईंना एवढ्या रागवल्या होत्या, तुमच्या एवढी काळजी घ्या घरातल्यांची कोणीच करत नाही",....... सविता वहिनी


"तुमच्या सगळ्यांचा एकमेकांचं कौतुक झाले असेल तर जेवायला बसुया का"?,..... दादा


सगळे हसायला लागले....


जेवण झालं आई बाबा फिरायला निघाले


" काय झाले आहे आज सकाळपासून तुझा मूडच नाहीये",...... बाबा

" जसं वीणाच लग्न जवळ येत आहे असं मला खूप कसंतरी होत आहे, पोरगी आपली सासरी चालली जाईल",..... आई


" ती तर जनरीत रीतच आहे, कोणाला चुकली आहे ती जनरीत",...... बाबा समजावत होते


"मी विणा शिवाय नाही मी राहू शकत, मला रडू येत आहे हो सारख ",..... आई


" असं बोलून कसं चालेल, सविता पण आलीच ना आपल्या घरी लग्न होऊन, तिचे आई वडील कसे राहत असतील, तू फक्त एवढाच विचार कर की समर सारखा चांगला जावई आपल्याला मिळाला आहे, केवढा करतो तो समर आपल्यासाठी आणि मुलगी गावातच राहणार आहे काही दूर जाणार नाही, आणि तू बघते आहेस ना वीणा आणि समर किती खुश आहेत, तू नाराज होऊ नकोस, समर खूप छान ठेवेल आपल्या वीणाला, आत्ता बघितलं ना तिचा शब्द न शब्द झेलतो तो ",...... बाबा


" हो ते समजत आहे मला, पण एका आईचं मन,... त्याचं काय करावं"?,....... आई


" तुला थोडं तुझं मन घट्ट करावाच लागेल, वीणा खुश आहे ना अजून काय हवं, जर राहुल शी वीणा च लग्न झालं असतं तर काय झालं असतं, रोज उठून नवीन मागण्या, मी बोलणारच होतो त्या विषयावर विणाशी, त्याआधीच वीणाने निर्णय घेतला ते बरं झालं",....... बाबा


" हो तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, बर झाल् पण त्या आधीच्या स्थळापासून सुटका मिळाली आणि अगदी चमत्कार झाल्यासारखा समर आपल्या आयुष्यात आला, मुलगा खूपच छान आहे, परांजपे पण चांगले आहेत",...... आई


" हो ना..... मग चिंता कसली करतेस,",.......बाबा


" आता तुमच्याशी बोलून मला बरं वाटत आहे",....... आई


" वीणा ची आठवण आली की फोन करायचा समर लगेच घेऊन येईल तिला संध्याकाळी आपल्याकडे",....... बाबा


" हो बरोबर बोलत आहात तुम्ही ",....... आई


घरात दादा वहिनी प्रकाश वीणा अभी आरु बोलत बसले होते, आज आईस्क्रीम पार्टी करायची का आपण?...


"हो चालेल आई-बाबा बाहेर गेले आहेत, ते येतीलच तेवढ्यात, करूया पार्टी ",....... वीणा


" अभी चल आपण आईस्क्रीम घेऊन येऊ",..... प्रकाश


घरात खुप उत्साहाचं वातावरण होतं......


"वहिनी तू कशी काय ग आमच्यात येवढी मिसळून गेली आहे, माझं पण असंच होईल का लग्नानंतर, समरच्या घरच्यांन बरोबर मी एवढेच कम्फर्टेबल राहिल का",..... वीणा


" हो ताई सुरुवातीला वाटतं असं की आपण दुसऱ्याच्या घरी कसं राहणार, पण ते घर कधी आपलं होऊन जात हे समजत नाही, त्या घरचे लोक आपले होतात, त्यांची आपण कधी काळजी घ्यायला लागतो ते समजत नाही ",..... वहिनी


" मला जमेल ना ग वहिनी सगळं ",..... वीणा


" न जमायला काय झालं वीणा ताई आणि तुमच्याकडे तिकडे तर काहीच प्रॉब्लेम नाही स्वयंपाक नाही केला तर बाई आहे कामाला, पण तरी तुम्ही कामाची सवय सोडू नका, रोज घरच्यांसाठी काही ना काही करत राहा, प्रत्येकाची काळजी घेणे, स्वयंपाकात एखादा पदार्थ करणे, सगळे जेवले आहेत का की नाही बघणे, व्यवस्थित करत जा",....... वहिनी


" मला तर सुचतच नाही आहे काही, मी तुला फोन करेन सारखा वहिनी ",....... वीणा


" हो चालेल ना",....... वहिनी


" अभी आरू शिवाय मी कशी राहणार आहे काय माहिती",...... वीणा


" जास्त इमोशनल नका होवू ताई, आईंकडे बघा, त्यांना त्रास नको व्हायला ",...... वहिनी


"हो गप्प गप्प वाटते आहे ना आज आई",....... वीणा


" हो ना, समरची आई बिझी असतात, पण आजी आहे खूप छान त्या संभाळून घेतील तुम्हाला, साखरपुड्याच्या कार्यक्रमातही किती छान वागल्या होत्या त्या आपल्याशी",...... वहिनी


" हो ना खूप चांगल्या आहेत त्या",...... वीणा


प्रकाश आइस्क्रीम घेऊन आला, छान छोटीशी आईस्क्रीम पार्टी झाली, वीणा घरच्यांबरोबर मनमुराद आनंद घेत होती, दोन दिवसांनी रिसॉर्टला जायला निघायचं होतं, मनात थोडं दुःख होतं घरच्यांना सोडून जायचं आणि समर बरोबर लग्न होणार याचा खूप आनंद होत होता.......


समोरच्या घरी ही तीच परिस्थिती होती आज जेवणात पप्पांचा लक्षच नव्हतं, सोहला ही खूप वाईट वाटत होतं जेवण झालं, पप्पा पुढे येवून बसले सोहा आजी त्यांच्या जवळ येवून बसल्या,


"आजी लग्न म्हणजे आनंद आणि दुःख एकत्र अस का ग असत ",...... सोहा


"असच असत बेटा, तुला तुझ घर नवरा मिळेल तो आनंद, आणि आई बाबांच घर सुटेल ते वाईट वाटत, पण ते पूर्वी च्या काळी तेव्हा सासरी असलेल्या मुलीला माहेरी येता यायचं नाही, कोणी घ्यायला गेल तर पाठवायचे घरचे, तुझ सासर गावात आहे, काळजी करू नकोस, आशिष किती चांगला आहे ",....... आजी


" हो आजी, तुझ पण असंच होत का आजी, तू नाही जायची का माहेरी ",..... सोहा


" नाही ग, तुझे आजोबा किती चांगले आहेत माहिती आहे ना, ते कधीच मला काहीही बोलले नाहीत ",....... आजी


" आशिष ला मीच सांगेन काही पाठवू नकोस सोहाला दोन तीन वर्ष माहेरी ",...... समर


"दादा......, आजी सांग ग याला काही , तुझ स्वातंत्र एका दिवसाच आहे समर , नंतर आहे वीणा वहिनी बॉस म्हणून तुझ्या आयुष्यात ",..... सोहा


" बॉस वरुन आठवल, तुला आपल ऑफिस जॉईन करायच आहे मॅडम, आणि मी तुझा बॉस असेन",....... समर


" ऑफिस करेन मी जॉईन, पण पप्पा असतिल माझे बॉस, तू नाही",...... सोहा पप्पांकडे प्रेमाने बघत होती


" तुझी अशी सुटका नाही सोहा, मला तुझी मदत हवी आयुष भर",...... समर


मम्मी पप्पा कौतुकाने समर कडे बघत होते, किती समजूतदार आहे हा, दुःखाचा प्रसंग पण त्यांने कसा पटकन आनंदात बदलवला, बहिणीला सांगितलं की तुझी मला गरज आहे, एका मुलीसाठी माहेरी आपण हवं आहोत हे खूप आनंद देणारं असतं.......


वीणा सकाळी उठली.....


" आज फायनल पूर्ण तयारी करून रेडी हव आपण",...... वहिनी


आज पासून वीणाची सुट्टी होती...


नाश्ता जेवण सगळ वीणा च्या आवडीच होत, आज पूजा होती घरी, देवाला नैवेद्य दाखवला, आज पासून बाबा घरी होते, दादा प्रकाश यांनी उद्या पासून सुट्टी घेतली होती, सकाळी वहिनी दादा सोबत जावून नेकलेस सेट घेवून आली, नंतर दादा ऑफिस ला गेला, वहिनी खुश होती, आत्या बाबा घरी असल्याने मुलांना खूप मजा वाटत होती...


दुपारनंतर फायनल पॅकिंग झाल, समर चे सारखे फोन येत होते,


"समर तू मला काही काम करू देणार का, मी काही तरी विसरेन ह घरी",...... वीणा


"अस कस? काही विसरलीस तर स्पेशल गाडी पाठवेन मी",....... समर


"बर सांग का फोन केला होता",...... वीणा


"असच तुझी आठवण येत होती, आपल्या लग्नाला आता फक्त चार दिवस राहिलेत, ",...... समर


वीणा च्या चेहर्‍यावर लाली पसरली होती...


" पण तू बोलत का नाही माझ्याशी आज",...... समर


" अरे काम आहेत, उद्या पासून प्रोग्राम आहेत ना आपले, आम्हाला पार्लेरला जायच आहे अजून ",....... वीणा


" मी मागे ही तुला बोललो होतो, तुला पार्लेर ला जायची काही गरज नाही",...... समर


"पुरे समर आता, प्लीज ठेव फोन ",...... वीणा


" काय अस? होणार्‍या नवर्‍याशी कोणी अस बोलत का? जरा म्हणून प्रेमाचे दोन शब्द नाही ",..... समर


" समर........ मी फोन ठेवेन ह आता, बर उद्या संगीत आहे ना संध्याकाळी ",.... वीणा


" हो त्या आधी दुपारी प्री वेडिंग फोटो शूट आहे आपल, तर तुझे ड्रेस सोबत घे, सिल्क च्या साड्या ही घे",..... समर


" एवढे कपडे काय रे",..... वीणा


"एका बॅगेत बसतील सगळे कपडे आणि तुला कुठे धरून बसायचे आहेत बॅग, प्रीती ला सांगून दे जास्तीचे कपडे आणायला",..... समर


" ठीक आहे मी आवरते आता",..... वीणा ने फोन ठेवला


दुसर्‍या दिवशी सकाळी निघायच होत रिसॉर्ट वर आधी सामानाची गाडी येणार होती, दागिने सोडून सगळ सामान त्यात पुढे जाणार होत, मागून टॅक्सी केल्या होत्या, त्यात घरची मंडळी जाणार होती ...


प्रितीला वीणा ने फोन केला,...... "झाली का तयारी फूल",


"हो आमची झाली, तुझी झाली का",..... प्रिति


"हो सकाळी टॅक्सी येईल भेटू रिसॉर्ट वर, उद्या आपल प्री वेडिंग फोटो शूट आहे, वेगवेगळे कपडे ही घे",..... वीणा


"अरे हे कधी ठरल",...... प्रिति


"मला आता च समजल, समर चा फोन आला होता ",..... वीणा


जेवण झालं,.... "चला आपल्याला पार्लेरला जायचं आहे आपल्याला" ,..... आई वीणा वहिनी पार्लर ला गेल्या, तिघी संध्याकाळी घरी आल्या....

" आता जेवण बाहेरून मागवून घ्या, सकाळ च आहे थोड",..... आई


वीणा फायनल बॅग भरत होती....


" एवढे कपडे का घेतले वीणा ताई ",...... वहिनी


" वहिनी आमच उद्या फोटो शूट आहे",...... वीणा


दादा प्रकाश घरी आले, सगळे बिझी होते आज, वीणा तिची बॅग भरून झाल्यावर प्रकाशला मदत करत होती, आई बाबा ही लिस्ट बघून सामान पॅक करत होते,


"दागिने व्यवस्थित एका छोट्या बॅगेत ठेवा, थोडे पैसे सोबत ठेवु या",...... आई


" ही पर्स तुझ्या जवळ राहू दे प्रोग्राम मध्ये",...... बाबा


हो......


वीणा ला झोप येत नव्हती रात्री, उद्या पासून प्रोग्राम सुरू होतील, कस असेल माझ पुढच आयुष्य समर सोबत, कस वाटेल त्यांच्या घरी, तिथून सकाळी उठून ऑफिस ला जाण वगैरे जमेल का, त्यांच्या स्वैपाकाच्या पध्दती, समर च्या घरचे सगळे श्रीमंत, आपल्याला काहीच माहिती नाही वागण बोलण कस करायचा ते, टेंशन येत होत तिला सगळ्या प्रोग्राम च.....


त्यात एक गोष्ट छान आहे म्हणजे समर, त्या मुळे काही वाटत नाही, किती आधार वाटतो त्याच्या, आपल काहीही चुकल तर तो आहे, काहीही हव तर तो आहे, ही भावना खूप छान आहे, किती छान वागतो तो माझ्याशी, किती हसवतो, शेवटी आयुष्यात जोडीदार समजूतदार आणि आपल्या सांभाळणारा हवा मग सगळ्या गोष्टी सहन करायची तयारी असते.....


दुसर्‍या दिवशी सगळे लवकर उठले चहा झाला आवरुन झाल, थोड्या वेळाने टॅक्सी येणार होती प्रकाश बॅग मोजून घेत होता,


"वीणा चल देव पूजा करून घे",....... आई


सगळे देवा पुढे बसले, हे घरी होणारे कार्य एकदम छान निर्विघ्नपणे पार होवू दे, सगळ्यांनी हात जोडले, वीणा ने उठून आई बाबांच्या पाया पडल्या, सगळ्यांच्या डोळ्यात आसू होते...... प्रकाश दादा वहिनी इमोशनल झाले होते


"चला, पुरे झाल आता कोणी रडू नका, अतिशय सुंदर आयुष पुढे आहे, वीणा मस्त खुश रहा",.... बाबानी छान आशीर्वाद दिला


वीणा आता छान हसत होती....


गाडी आली बाहेर, त्यात दादा प्रकाशने बॅग नेवून ठेवल्या, बॅग पुढे गेल्या, टॅक्सी आली त्यात आई बाबा प्रकाश बसले,


दुसर्‍या टॅक्सीत वीणा वहिनी दादा मुल होते


समर डायरेक्ट रिसॉर्ट वर येणार होता सगळ्यांसोबत


वीणा च मन खुप भरून आल होत, ती वाहिनीचा हात हातात घेवून बसली होती, वाहिनीला समजत होत्या तिच्या भावना, बर झालं आई बाबा दुसर्‍या टॅक्सीत आहेत, आई ही काल पासुन अबोल झाली आहे, सोहा प्रीती ला ही असच वाटत असेल का, विचार करत ते रिसॉर्ट ला पोहोचले


अतिशय सुंदर होत रिसॉर्ट, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार हॉटेल, मोठ गेट, सुंदर रस्ता, आजूबाजूला खूप छान बागा होत्या, पाण्याचा कारंजा होता, हॉटेल च्या बर्‍याच बिल्डिंग होत्या, गाडी पुढे वळून रिसेप्शन कडे गेली, बऱ्याच टॅक्सी उभ्या होत्या तिथे, म्हणजे समर प्रीती वगैरे आलेले दिसत आहेत, आई-बाबांची टॅक्सी पण पोहोचली, आपण शेवटी आहोत वाटतं,


जशी टॅक्सी थांबली समरने पुढे होऊन वीणाच्या कार चा दरवाजा उघडला, आपला हात पुढे केला, वीणा खाली उतरली, छान ढोल वाजायला लागला, सगळे नाचायला लागले, अतिशय आनंदाचे वातावरण झालं होतं, दादा वहिनी मुलं त्यात सामील झाले, आई-बाबा पण खूप खूष दिसत होते, हे बघून वीणा ला समाधान वाटलं, सगळे एकमेकांना छान भेटत होते,


"आता आपल्याला चार-पाच दिवस खूप मजा करायची आहे, अजिबात कसलं टेन्शन घ्यायचं नाही, मस्त खायचं प्यायचं धमाल करायची, होना मुलांनो",...... समर


अभी आरू ने होकार दिला, परत समरने ढोल वाल्यांना इशारा केला सगळे नाचायला लागले..........








🎭 Series Post

View all