प्रित तुझी माझी... ❤️ भाग 45

समर एकटाच खूप खुश होता मंगळसूत्र बघून, अतिशय सुंदर वीणा वर हा सेट खूप छान दिसेल, काहीही मागत नाही ही किती साधी आहे सदोदित दुसर्‍याचा विचार करते, मी तुला खूप सुखी ठेवेन वीणा.....ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

" बघ मी तुला म्हटले होते ना समर ऐकणार नाही तु उगीच त्याच्याशी बोलत बसली",...... वीणा


"हो ना",...... प्रिति


प्रीती ने सचिनला फोन लावला, त्याला कॉन्ट्रॅक्टर बद्दल सगळं सांगितलं,....... "कार्यक्रमाचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिल आहे, माझं आत्ताच झालं समर शी बोलण, तो ऐकत नाही, तो म्हणतो आहे की हीशोबाचा नंतर बघू",..


"तुला काय वाटतय प्रीती",... सचिन


"नंतर देवून टाकू पैसे आपण, आपल कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांनी नाही घेतले पैसे तर तेवढ्या किमतीच गिफ्ट घेवून देवू एखादी चांगली वस्तू दागिने वगैरे",...... प्रिति


" हो चालेल",..... सचिन


" मग देवू का मी त्या लोकांना अपॉइंटमेंट",..... प्रिति


" हो चालेल",...... सचिन


वीणा घरी आली, कॉन्ट्रॅक्ट वाले आले घरी, त्यांनी वीणा कडुन सगळी माहिती घेतली, घरात किती लोक आहेत, किती खरेदी आहे, काय काय घ्यायच आहे प्रत्येक फॅमिली साठी किती बजेट आहे.....


"खरेदी तीन भागात करावी लागेल, एका भागात पुरुषांचे कपडे घेवू, दुसऱ्या भागात आई वहिनी आणि मुलांचे कडे घेवू, तिसरा भाग वीणा ची खरेदी करू",....


"माझी खरेदी सेपरेट का",...... वीणा


"नवरीची खरेदी नवरदेवा सोबत होईल, तुम्हाला काय घ्यायचं ते सगळ याची लिस्ट करून ठेवा, आम्ही सांगू त्या दुकानात येऊन मग आपली खरेदी लवकर होईल",......


" हे छान झालं वीणा नाही का, त्यांनी सांगितलं तेव्हा जाऊन खरेदी करून यायचं ",..... आई


हो ना.... वीणा


वीणा ने समरला फोन लावला,....." आत्ता इथे आमच्याकडे लग्नाच्या खरेदीसाठी कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्या एक मॅडम आल्या होत्या, त्यांनी सांगितला आहे की आपली दोघांची खरेदी सोबत आहे ",...


अरे वा..... समर


" तर आपल्या दोघांना काय काय घ्यायच आहे",...... वीणा


"मी काय घेणार, तू सांग",....... समर


" मला तर काहीच सुचत नाहीये ",..... वीणा


" कुर्ता पायजमा आणि रिसेप्शन साठी फॉर्मल घेईन, ठरवू आपण तस ",..... समर


" आणि त्या मॅडम बोलत होत्या की दागिने खरेदी तुम्ही तुमची करा, पण आपलं ठरलं होतं ना की दागिने घ्यायचे नाही ",...... वीणा


" मग तुला मंगळसूत्र वगैरे नको आहे का",..... समर


"हो हव आहे, तो विचार मी केला नाही ",...... वीणा


" मग तेच घ्यायचं बोलत असतील ते, जावंच लागेल ना ते घ्यायला, तुझ्या पसंती तिने घ्यायचं ना",..... समर


" हो मलाच माझ्या पसंतीने घ्यायच आहे ",..... वीणा


"कपडे घेतले की घेवून टाकू दागिने ",...... समर


"सोहा ची सुरू झाली का खरेदी",..... वीणा


" तिची खरेदी कधी बंदच नसते",...... समर हसत होता


"का चिडवतो रे तू तिला",..... वीणा


" तू इकडे आली म्हणजे कळेल तुला",..... समर


सगळ्यांची कपड्याची खरेदी पूर्ण झाली......


आज समर वीणा चा नंबर होता, दोघ लवकर निघाले ऑफिस मधून वीणा बोलली होती वहिनीला,..... "तू चल सोबत",


" खूप काम आहेत ग, समर आहे ना सोबत ",..... वहिनी मुद्दाम आली नाही


वीणा समर खरेदी ला गेले, अतिशय सुंदर शॉप मध्ये खाली जेन्ट्स चे कपडे वरती साड्या होत्या, त्याच्या वरती ड्रेसेस घागरा वगैरे होते....


"तुला जे हव ते छान ड्रेस घे वीणा",..... समर


"काय रे पण कोणी आल नाही आपल्या सोबत, तू सांग तुझी पसंत, तेच घेईन मी ",....... वीणा


"मुद्दाम आले नसतील ते, काम ही खूप आहेत, 15 दिवस राहिलेत मॅडम लग्नाला ",..... समर खुश होता


आधी संगीत साठी अनारकली ड्रेस घेतला छान घेरदार, मेहंदी साठी ड्रेस घेतला सुंदर हिरवा, मग घागरा घेतला ब्राऊन, खाली येवून लग्नासाठी शालू निवडला, हळदीची साडी घेतली,.....


"लाल शालू घेवू का समर प्लीज सांग ",.... वीणा


" हो तुला खूप छान दिसेल ",..... समर


बर्‍याच शालू मधुन वीणा ने एक खूप छान लाल शालू पसंत केला, लगेच ब्लाऊज स्टिचिंग पिको फॉल बद्दल ती दुकानात ठरवत होती तो पर्यंत समर अजून साड्या बघत होता


"वीणा इकडे ये, एक दोन मॉडर्न साड्या घे ना वीणा, अश्या प्लेन सिल्क टाइप ",..... समर


" त्या टीव्हीत असतात तश्या का? काहीही काय समर",..... वीणा


"खरच घे मला आवडतात तश्या",..... समर


"आपल्याला स्विझर्लांड ला जायचा का ?? तेव्हा घालू का त्या साड्या मी बर्फात, गाण कोण म्हणणार, मी कोणी सुंदर नटी नाही समर, तुझा हिरमोड होईल मला त्या साडीत बघून ",.... वीणा


"तू किती सुंदर आहेस हे माझ्या पेक्षा कोणाला जास्त माहिती, ऐक माझ, प्लीज घे ना साड्या वीणा" ,...... समर


"समर आपण नंतर घेऊ या त्या साड्या, आपण खरेदी ला नंतर येवू, आता बघ आलेले सगळे बघता आहेत आपल्याकडे",....... वीणा


वीणाने सगळ्या साड्या समर च्या पसंतीच्या घेतल्या , वीणा खुश होती, वीणा च्या सगळ्या साड्यांवर मॅचिंग दुपट्टे समर साठी घेतले कुर्ता पायजमा दुपट्टा खूप छान खरेदी झाली, एक दोन फॉर्मल सेट ही घेतले, बाकीचे लोक गेले,


" तू खुश आहेस ना वीणा",...... समर


"हो खूप, अरे किती खरेदी केली आपण",.... वीणा


"चल आपण अजून ड्रेसेस घेवू तुला",.... समर


"अरे कशाला",.... वीणा


"हे सगळे कपडे प्रोग्राम साठी आहेत, आपण नंतर फिरायला जाऊ तेव्हा लागतील ना ड्रेस",..... समर


वीणा खूप लाजली होती...


" अरे आता निघतो आहोत का आपण फिरायला",....... , समर हसत होता, तो वीणा कडे बघत बसला, किती छान दिसते ही, लग्नाला अजून 15 दिवस आहेत


"नको अरे इतके ड्रेस ",.... वीणा


" नौटंकी नको चल पटकन ",..... समर


समरनै वीणा साठी अजून 3-4 ड्रेस घेतले, लेगिग्स टॉप, जीन्स टॉप एक दोन वन पीस,


" एवढे कपडे समर ",.....वीणा


"असू दे ग एकदा ही काही गिफ्ट घेतल नाही मी तुला",..... समर


"साडीच काय चल घेवू आता",.... समर


"अरे मला नाही चांगल्या दिसत साड्या, वेळ ही नाही साड्या घालायला, एवढ्या नको ऐक तरी",..... वीणा


समर ने वीणा साठी अतिशय छान मॉडर्न प्लेन सिल्कि साड्यांची खरेदी केली गुलाबी क्रीम कलर एक नेव्ही ब्ल्यू साड्या घेतल्या, त्याच कलर मध्ये थोड लाइट रिच वर्क होत त्यावर


" ह्या अश्या साड्या आवडतात मला वीणा ",..... समर


वीणा ने साड्यांची फोटो काढून घेतले लग्नाच्या साड्या तिथे पिको फॉल साठी दिल्या...


बाकीचे ड्रेस घेवून वीणा घरी आली समर ने तिला बाहेर सोडल, आत नाही येत मी घरी उशीर होतोय....


"Thank you समर, न मागता खूपच मिळत आहे मला, मी तुला शब्दात नाही सांगू शकत आता मला काय वाटतय तुझ्या बद्दल ते",..... वीणा


"तू खुश आहेस ना, मला तेच हव आहे, आणि तू मला सांगितल नाहीस वीणा कुठे फिरायला जायच ते",.... समर


"मी निघते समर",..... वीणा


"अरे सांग ना, त्यात लाजण्यासारखे काय आहे ",..... समर


" आपण नंतर बोलू उशीर होतो ",.... वीणा


" मी गाडी च लॉक उघडण नाही, आधी सांग",.... समर


" तू मला दोन तीन ठिकाण सांग त्यातून मी एक निवडते, मला काहीही आयडिया नाही, आम्ही कधी कुठे गेलो नाही फिरायला",...... वीणा


" सिल्की साड्या घेतल्या तर स्विझरलँडला चलतेस का",...... समर


वीणा आश्चर्याने बघत होती,......


"मी खर बोलतो आहे तुझ्या तोंडून पहिल्यांदा स्विझर्लांड निघाल ना, तिकडे जाऊ या का ",...... समर


" हो चालेल, मला विश्वास वाटत नाही ",...... वीणा


घरी दादा बाबा प्रकाश आले होते, स्वैपाक झाला होता सगळे वीणा ची वाट बघत होते...


वीणा ने वाहिनीला आई ला सगळे फोटो दाखवले, आरू ही त्यांच्यात सामील होती, बाबा कौतुकाने वीणा कडे बघत होते....


"या बॅग मध्ये काय आहे ताई ",........ वहिनी


"ड्रेस आहेत वहिनी समर ने घेवून दिले",....... वीणा


एवढे....


"हो ना अजीबात ऐकत नाही तो दुकानात",..... वीणा


"अहो बघा जरा, समर कडून शिका जरा",.... वहिनी


दादा हसत होता,..... "घेवू ह तुला ही", ....


"खरच दादा तू आणि वहिनी मस्त फिरून या",..... वीणा


"हो तुझ लग्न झाल की ठरवू आम्ही",..... दादा


वहिनी खुश होती ती दादा कडे बघत होती...


समर घरी आला, आजी आजोबा मम्मी पप्पा जेवत होते,....." चल समर",.....


"हो मी आलोच फ्रेश होऊन, सोहा कुठे आहे",...... समर


" ती काय फोन वर बोलते आहे, ती थांबली आहे तुझ्या साठी जेवायला ",....... मम्मी


समर फ्रेश होऊन आला, सोहा समर जेवायला बसले, आजच सोहाची ही खरेदी झाली होती....


"झाली का खरेदी दादा वीणा ची, काय काय घेतल",...... सोहा


" हो झाली वीणा ने लाल शालू घेतला, घागरा घेतला",...... समर


" तू कोणता घेतला आहेस ",..... आजी


" मी पण रेड शालू घेतला आहे पण डार्क आहे कलर",....... सोहा


"तुझ्या सोबत आशिष आला होता का शॉपिंग ला ",...... समर


"हो, त्याची झाली शॉपिंग, आजी मम्मी ची पण झाली शॉपिंग काल , शालू तिकडे शॉप मध्ये दिला पिको फॉल साठी म्हणून आजीला दाखवता आला नाही, मी दाखवते तुला फोटो जेवल्यानंतर ",....... सोहा


आजी कोणी काय घेतल हे आजी कौतुकाने ऐकत होती


" पत्रिका आल्या नाहीत आपल्या अजून छापुन",..... पप्पा


" मी करतो उद्या फोन ",....... समर


" सगळ झाल ना घेवून समर, दागिने कधी घेणार ",...... मम्मी


" उद्या जाऊ बहुतेक, तू येशील का मम्मी ",..... समर


"नाही जमणार बहुतेक, उद्या एक मीटिंग आहे माझी, आता एकमेकांन साठी थांबू नका, वीणा च्या पसंतीने घेवून टाक दागिने, आजी लिस्ट देतील ते आण समर",...... मम्मी


" काय ग", ...... आजी


" आई ते जोडवी, साखळ्या, मणी मंगळसूत्र ते सांगा समरला, आणि सोहा ची खरेदी बघून घ्या आई , काही राहील तर सुचवा, आपल्या दोघींसाठी नेकलेस सेट आहेत त्यात आवडले का ते सांगा ",...... मम्मी


" अग कश्याला आणला मला नेकलेस? आहेत ग भरपूर दागिने",...... आजी


"आजी तू आता अजून छान दिसशील एवढे छान दागिने साड्या, बाकीच्या सगळ्या फिक्या पडतील तुझ्या समोर ",...... समर


" समर काय रे",....... आजी


सगळे हसत होते, आजोबा कौतुकाने आजी कडे बघत होते,


"आहेच माझी आई किती छान",...... पप्पा


" हो खरं आहे आजी खूप सुंदर आहे",..... सोहा,...


मम्मी ने पण भाग घेतला आता यात,......" पूर्वी पासून आई तुम्ही अगदी नीट नेटक्या राहतात, किती छान ",....
.......

दागिने कॉन्ट्रॅक्ट मध्ये नव्हते ते आपल्याला स्वतःला जाऊन घ्यायचे होते


आज दागिने घ्यायचे होते, सोहानी तिच्या पसंतीचे दागिने घेतले होते....


"प्रीती आपण सोबत घ्यायचे का दागिने",..... वीणा


" हो चालेल", .... प्रिति


सगळ्यांच संध्याकाळी भेटायचा ठरल....


वीणा समर प्रीती सचिन एकत्र दुकानात पोहोचले,
अतिशय सुंदर मंगळसूत्र दाखवत होते ते, एक मोठ एक छोट असे दोन मंगळसुत्र दोघींनी पसंत केले....


समर ला एक नाजूक मंगळसूत्र खूप आवडल होत ते वेस्टर्न ड्रेस वर छान दिसेल,.... "वीणा हे बघ किती छान वाटते डिझाईन",


"अरे पण किती घेणार",...... वीणा


"ते छोट नको घेवू मग",...... समर


"नाही...... मला आवडतात काळे मणी सिम्पल डिझाईन",...... वीणा


"मग हे ही घे. ",....... समर


त्याला सोन्याच्या दोन वाट्या पाच मणी लावून तयार केल, आजीने सांगितलेले जोडवी साखळ्या त्या ही वीणा च्या पसंती च्या घेतल्या


वीणा ला जस आवडत तस काळे मणी असलेल खूप छान एक मंगळसूत्र समर ने गुपचुप डायमंड पेंडंट लावून घेतल, त्यावर मॅचिंग इयर रिंग, बाजूला पॅक करून घेतला अतिशय सुंदर सेट तयार झाला होता पेंडंट सेट मधले हिरे खूप चमकत होते, हा सेट तो वीणा ला गिफ्ट देणार होता पाहिल्या रात्री,.....


समर एकटाच खूप खुश होता मंगळसूत्र बघून, अतिशय सुंदर वीणा वर हा सेट खूप छान दिसेल, काहीही मागत नाही ही किती साधी आहे सदोदित दुसर्‍याचा विचार करते, मी तुला खूप सुखी ठेवेन वीणा.....


दोघींनी त्यांच्या आवडीचे मंगळसूत्र घेतले बांगड्या घ्यायला वीणा ने नकार दिला,..... "आहेत दोन सेट बांगड्यांचे",...


एक छोटा नेकलेस सेट मीना आणि प्रीती दोघींनी घेतला, प्रितीने बांगड्या घेतल्या...


खरेदी झाल्यावर चौघे मस्त कॉफी शॉप मध्ये गेले, आज पहिल्यांदाच भेटत होते समर सचिन, मोकळ्या स्वभावाचा सचिन आवडल होता समरला


"तुम्ही खूप करता आहात आमच्या साठी ",.... सचिन


"मी काही नाही केल पप्पा करता आहेत सगळ, don\"t worry, प्रीती माझी बहिण आहे",..... समर


मस्त ग्रुप तयार झाला होता त्यांच्या... आपण नंतर छान पिकनिक वगैरे प्लॅन करू......


आता जवळपास लग्नाची सगळी तयारी झाली होती, लग्नाला अगदी आठ दिवस बाकी होते. पत्रिका छापून आल्या होत्या


एक दिवस वीणा आई बाबा वहिनी देवाला जाऊन आले, पहिली पत्रिका देवाजवळ ठेवली, जास्त आमंत्रण नव्हती द्यायची, आई-बाबा पत्रिका घेऊन परांजपे न कडे गेले, त्यांना पत्रिका दिली, नंतर ते आशिष च्या घरी गेले, त्यांच्या घरी जायचा पहिलीच वेळ होती, त्यांना पत्रिका दिली, दोघी घरी लग्नाची धावपळ सुरू होती......


कॉन्ट्रॅक्ट दिला तरीसुद्धा दिवसभर एवढं काम होत, आई वहिनी वीणा यांची धावपळ होत होती...


तीन दिवस आधीपासून कार्यक्रम सुरू होणार होते, आधी संगीत, दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदी, नंतर हळद दुपारून लग्न... दुसर्‍या दिवशी सामूहिक विवाह, नंतर रिसेप्शन


सगळ्यांचे नावाच्या वेगवेगळ्या बॅगा तयार केल्या होत्या वहिनी ने, तिकडे वेगवेगळे रूम होत्या म्हणजे मग सामान इकडे तिकडे व्हायला नको,


वीणा आणि प्रीती ने आणि तिने पंधरा दिवसाचे ऑफिसला सुट्टी घेतली होती


वीणा ऑफिस ला पोहोचली सर आले तेवढ्यात , वीणा केबिनमध्ये गेली


"सर तुमच्यासाठी पत्रिका घेऊन आली आहे मी",..... वीणा


प्रीती आली मागून,..... "सर ही माझी पत्रिका",....


"चांगल आहे चला, तुमच्या दोघांच सोबत लग्न आहे, वीणा प्रीती तुमच खूप अभिनंदन, खूप छान काम करता आहात तुम्ही, असंच समाजकार्य पुढे चालू राहू द्या",..... सर


बाहेर येऊन दोघींनी प्रशांतला पत्रिका दिली,


"प्रशांत सगळ्या कार्यक्रमांना यायचा आहे, तिकडे चार-पाच दिवस कार्यक्रम आहे, तुझी कपड्यांची बॅग घेऊन ये ",..... वीणा


" काय काय घ्यावे लागेल मला वीणा ",..... प्रशांत


" प्रशांत अरे चार-पाच दिवस कार्यक्रम आहे त्याप्रमाणे ड्रेस आण",..... वीणा


प्रीती प्रशांत ला हसत होती......... असू दे ग प्रीती इनोसंट आहे तो.........


🎭 Series Post

View all