Login

प्रित तुझी माझी... ❤️भाग 44

"हो ना, आम्हाला हुंडा द्यायचा ही नाही आणि घ्यायचा आहे नाही, हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यात आपल्याला पडायचंच नाही, आपले मुलं खुश आहे हेच खूप आहे, आणि हुंडा तेच लोगो घेता ज्यांना आपल्या कर्तुत्वावर विश्वास नाहिये, दुसऱ्याकडून घेतलेले पैसे किती दिवस पुरणार आहेत",..... परांजपे सर



ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

प्रीती ने सचिनला सगळं सांगितलं समर काय म्हणतोय ते..... जरा वेळाने सचिनचा फोन आला,..... "प्रीती तुला तुझ्या आई बाबांना घेऊन इकडे येता येईल का? माझे आई बाबा बोलत आहे कि भेटूनच बोलूया आपण ",...


" हो चालेल येतो आम्ही तिकडे",..... प्रिति


"जेवायला या इकडे, आई बोलते आहे",.... सचिन


" ठीक आहे",...... प्रीती आई बाबांना घेऊन सचिन कडे पोहचली


" तुम्ही म्हणता आहेत तसा मुहूर्त लगेच आहे पण पुढच्या महिन्यात, होईल ना तयारी आपली",..... सचिन ची आई


"हो आपल्याला खर्च कमी करायचा आहे सगळ, होईल सगळ काही काळजी करू नकोस ",..... सचिन


"चालेल मग आपण ही हो सांगू या का वीणा ला",...... प्रिति


प्रीती ची आई सचिन ची आई ठरवत होत्या काय करता येईल, खरेदी वगैरे काय करावी लागेल,.....


सचिन प्रीती छान बोलत बसले होते.... " तुला चालेल ना पण सचिन, सगळ घाईत होत आहे",...... प्रिति


" काहीही अडचण नाही प्रीती , तू खुश आहेस ना ते महत्वाच आहे माझ्या साठी ",..... सचिन


"मग आपण करायचा का वीणा ला फोन आता की मी उद्या ऑफिस मध्ये सांगू",...... प्रिति


"आता कळवुन दे फिक्स आहे ना सगळ",...... सचिन


प्रीती ने वीणा ला फोन लावला...


"आमच बहुतेक हो आहे वीणा, आम्ही ही जॉईन होवू तुमच्या सोबत लग्नाला",..... प्रिति लाजत होती,


"खूप छान बातमी दिली प्रीती, किती ग छान आपल सोबत लग्न, मी समर ला सांगते ",..... वीणा


" प्रीती सचिन चा होकार आहे समर",.... वीणा


" वा छान झाल, त्यांच ही नाव लिहून घ्या लिस्ट मध्ये",.....समर


" आता पुढे काय करायच ते फोन वर बोलून ठरवू",..... सर


सोहा वीणा एका बाजूला बसुन लिस्ट करत होत्या.....


" काय काय लागत ग संसार उपयोगी वस्तू",...... सोहा


वीणा सांगत होती सोहा लिहीत होती.......


" मानपानच काय ते ठरवून घ्या आधी ",...... गुरुजी


"हो ना, आम्हाला हुंडा द्यायचा ही नाही आणि घ्यायचा आहे नाही, हुंडा देणे-घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यात आपल्याला पडायचंच नाही, आपले मुलं खुश आहे हेच खूप आहे, आणि हुंडा तेच लोगो घेता ज्यांना आपल्या कर्तुत्वावर विश्वास नाहिये, दुसऱ्याकडून घेतलेले पैसे किती दिवस पुरणार आहेत",..... परांजपे सर


" तुमचं एकदम बरोबर आहे परांजपे सर मी आपला आठवण करून दिली",....... गुरुजी


सगळे घरी आले....


बाबानी प्रकाश दादा वहिनी ला तिकडे काय ठरलं ते सांगितल.... खूप चांगले विचार आहेत परांजपे फॅमिलीचे, खरच शिकण्यासारखे आहे त्यांच्या कडून, आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा, खूप आवडल मला......


"खूप छान प्रोग्राम ठरला बाबा काही हरकत नाही",...... प्रकाश


" आपल्याला काय तयारी करावी लागेल ते सांगा पण नाही तर वेळेवर धावपळ होईल",..... वहिनी


" बाबा खर्चाच मला ही सांगा",..... दादा


"हो मला ही ",..... प्रकाश


"हो आहेत थोडे पैसे आमच्या कडे, मी बोललो आहे परांजपे ना आपल्या बाजूचा खर्च आम्ही करू अस",.... बाबा


"बर झाल, चला छान ठरला प्रोग्राम, वीणा तू खुश आहेस ना",..... दादा


" हो दादा पण प्रोग्राम मोठा असणार आहे धावपळ होईल",.... वीणा


" करू बरोबर काही प्रोब्लेम नाही,",..... दादा


" कॉन्ट्रॅक्ट देतील सगळ्या गोष्टीच अस वाटतय ",..... वीणा


" हो, तरी आम्ही आहोत ना, होईल सगळे मिळून ",.... प्रकाश


" आत्या तुझ लग्न आहे का"?,....... अभी विचारात होता


वीणा लाजली सगळे हसत होते......


"वीणा आणि सविता आपल्या सगळ्या कामांची लिस्ट करून घ्या, काय काय घ्यायचा आहे ते मागवून घ्या, मुलांचे कपडे, सगळ्यांचे 3-4 जोड कपडे हवे तिकडे तसे हळू हळू खरेदी सुरू करा, एक-दीड महिना आहे आता, जास्त वेळ नाही",..... आई


हो आई...... वहिनी


वीणा ला तर सुचतच नव्हतं काही, सगळं किती पटापट ठरलं, अगदी दोन-तीन महिन्यांपूर्वी सुद्धा किती वेगळे होतं माझं आयुष, किती एकटी होते मी तेव्हा, काहीच नव्हत आयुष्यात तेव्हा, रोज उठायचं ऑफिसला जायचं, मग राहुल शी लग्न जमलं तो काळ तर किती कठीण होता, रोज उठून त्याच्याशी भांडण, पैशासाठी मारामारी, किती बोलायचे त्याच्या घरचे मला, राहुलला तर पाच रुपये खर्च करायचे नसायचे, नशीब चांगल की ब्रेक अप झाला....... आणि एक दिवस अचानकच एक राजकुमार माझ्या आयुष्यात आला, समर माझा समर, आणि माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं, नुसतं माझंच नाही तर घरच्यांना सुद्धा, त्यांनाही समर ने आपलंसं केलं, किती करतो तो माझ्यासाठी, दादाच्या नोकरी चा प्रॉब्लेम नीट झाला, समर ने प्रकाश बरोबर इंजिनिअरिंग युनिटमध्ये काम सुरू केलं, माझ्या म्हणण्याप्रमाणे आता तो साध्या पद्धतीने लग्न करायला तयार झाला, खरंच खूपच चांगला आहे समर, त्याला नेहमी सगळे सुख भेटू दे देवा, कुठल्याही गोष्टीची कधीच कमी नको व्हायला, विचार करता करता वीणाला ला झोप लागली......


दुसऱ्या दिवशी सकाळी कधी ऑफिसला पोहोचु असं झाल् होत वीणा ला, कधी प्रीती भेटते आणि तिचं काय बोलणं झालं सचिनशी हे तिला ऐकायचं होतं....


वीणा ऑफिस ला आली,....... "काय बोलणं झालं प्रीती? सचिन काय म्हटला खुश असेल ना तो खूप",...


वीणा थांब ग...... प्रिति हसत होती,......" तू मला सांगितल्यावर मी सचिन ला फोन केला होता, त्यालाही पटला हा विचार",


" सचिन अर्ध्या पायावर तयार असेल ना ",..... वीणा


" वीणा अग थांब जरा, जा मी नाही सांगत काही",........ प्रिति


"Sorry प्लीज बोल",..... वीणा


"घरी आई बाबांना सांगितल आम्ही दोघांनी, मग आम्ही संध्याकाळी सचिनच्या घरी गेलो होतो, त्याच्या आई-बाबांना पण पटला आहे हा विचार, पण आम्ही आमच्या लग्नाचा खर्च करू आणि सामूहिक विवाहात ही कॉन्ट्रीब्युशन करू",...... प्रिति


"हो चालेल प्रीती, तुमच्या दोघांचे पण किती छान विचार आहेत ",...... वीणा


" कधीची ठरली आहे ग तारीख ",...... प्रिति


" दीड महिना आहे अजून, आपल्याला लिस्ट करावी लागेल काय काय घ्यायचं काय काय नाही",..... वीणा


हो....


" इतर जोडप्यांना काय संसारोपयोगी वस्तू द्यायच्या त्याची लिस्ट करायची आहे, काल केली थोडी लिस्ट आम्ही दोघींनी, सोहा तिची लग्नाची खरेदी सेपरेट करणार आहे, मी माझी खरेदी करणार आहे ",......वीणा


"काय काय घेणार आहेस तु वीणा ",...... प्रिति


" जास्त नाही मेहंदी साठी ड्रेस, हळदीची साडी, लग्नासाठी शालू आणि रिसेप्शन साठी घागरा सगळं मी साध आणि छान बघणार आहे खूप महाग नाही आवडत मला",...... वीणा


" मलाही नाही आवडत महाग साड्या, लग्नानंतर सुद्धा वापरले गेले पाहिजे कपडे... त्या साड्या ",....... प्रिति


"हो बरोबर आहे तू काय खरेदी करणार आहे प्रीती",..... वीणा


" मी ही दोन-तीन साड्या आणि घागरा घेणार आहे अजून ठरलं नाही तसं, आपण दोघी ठरवायच का",.... प्रिति


हो चालेल... वीणा


" काय ठरवत आहे तुम्ही दोघी मला सांगाल का? की यावेळी सुद्धा मला न घेताच प्रोग्राम कराल ",.....प्रशांत


" नाही रे प्रशांत, एवढा चिडू नको, तुला बोलवल्या शिवाय आता लग्न होणार नाही आमच्या दोघींच ",...... वीणा


" दोघींच म्हणजे? प्रीती तू पण लगेच करते आहे का लग्न",...... प्रशांत


" हो प्रशांत काल संध्याकाळी काय झालं माहिती आहे का, समर वीणा भेटले ऑफिस बाहेर ते ठरवत होते त्यांच्या लग्ना बद्दल , समर ची इच्छा आहे की मी आणि सचिन ने ही त्या दोघांसोबत लग्न करावं आता तिघांचे लग्न सोबत आहे, समरच्या बहिणीच सोहाच, वीणाचं आणि माझ, दुसऱ्या दिवशी सामूहिक विवाह असेल आणि संध्याकाळी रिसेप्शन ",...... प्रिति


" भरगच्च कार्यक्रम ठरला आहे मग तुमचा ",...... प्रशांत


" हो ना माझा विचारच नव्हता, आम्ही सहा महिन्यांनी मुहूर्त काढणार होतो, पण काल माझं पण सचिन शी बोलणं झालं आणि त्याला पण ही आयडिया आवडली, तू पण एखादी मुलगी पसंत कर ना प्रशांत तुझं पण आमच्यासोबत होऊन जाईल लग्न ",..... प्रिति


" काहीही तुम्ही दोघी सगळ्यांचे लग्न लावल्यावर लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असे दिसत आहे",....... प्रशांत हसत त्याच्या टेबलवर निघून गेला


पुढचे पंधरा दिवस असेच निघून गेले ठरवण्यात काय करायचा आहे, आता अकरा जोडपे फिक्स झाले होते, फक्त लग्नाची तयारी करायची बाकी होती...... परांजपेंनी सगळ्यां प्रोग्रामच कॉन्ट्रॅक्ट दिलं होत, वीणा ला काही माहिती नव्हता,


लग्नाच्या आधीची खरेदी, नवरदेव नवरीचे कपडे दागिने डेकोरेशन, घरच्यांचे कपडे, राहण्याची व्यवस्था मेहंदी हळद लग्न दुसर्‍या दिवशीचा सामूहिक विवाह नंतरच रिसेप्शन, सगळं होत कॉन्ट्रॅक्ट मध्ये, आता ते वीणा सोहा प्रीती सोबत मीटिंग करणार होते...


परांजपे सर आणि मॅडम यांनी सगळ छान अरेंज केल होत, कुठल्याही गोष्टीची कमी राहू नये अस त्यांना वाटत होतं, खूप सिम्पल पण चांगली व्यवस्था करणार होते ते...


"कपडे खरेदी वगैरे कधी करणार आहेस वीणा",...... आई


"हो आई या आठवड्यात करून घेऊ सगळं",..... वीणा


"लग्नाला फक्त एकच महिना बाकी आहे",........ आई


"वहिनी कधी जायचं खरेदीला",..... वीणा


" वीणा ताई समर ला विचारून घ्या नाहीतर आपण दोघी जायचं प्लॅन करायचो आणि समर ही यायचा ",....... वहिनी हसत होते


"वहिनी काय चिडवतेस मला, पण छान कपडे घेतलेला मागच्या वेळी आपण समर सोबत ",...... वीणा


"हो मग बिल पण तसच आलं होतं तेव्हा",..... वहिनी


"हो बरोबर आहे, या वेळी समर ला नको सांगायला, मुलांनाही तीन चार नवीन जोड लागतील कपड्याचे ते ही बघून घे वहिनी, एकदम जावून घेवून घेवू",........ वीणा


", सगळ ठिक आहे ताई पण पैशाचं काय करायचं आहे? एवढी सगळी खरेदी करायची म्हणजे पैसे भरपूर लागतील",..... वहिनी


" आहेत पैसे माझ्याकडे साठवलेले लग्नासाठी, आपण ते वापरू",..... वीणा


" असं नको करायला ताई आपण, घरात एक छोटीशी मीटिंग घेऊ आणि त्यात खर्चाबद्दल सगळं डिस्कस करून घेऊन आणि मगच खरेदीला सुरुवात करू" ,...... वहिनी


" चालेल आज आपण जेवण झालं कि बसू जरा वेळ सगळे मिळून हिशोब करून घेऊन",...... वीणा


समर चा फोन आला,...... " काय करते आहेस वीणा",.


"खरेदी काय काय करायचे ते ठरवतो आहे, तुझे कपडे ठरले का काय काय घालणार आहेस ते",...... वीणा


"तेच मी सांगायला फोन केला होता की सगळ्या गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, कपडे सिलेक्ट करण्या पासून, लग्नाचा प्रोग्राम, जेवण, राहाण्याची व्यवस्था, सगळ एकत्रच आहे, ते लोक तुला कॉन्टॅक्ट करतील, घरात किती मेंबर काय काय घ्यायचं ते सगळं त्यांना सांगून दे",...... समर


" अरे पण कशाला आम्ही घेऊ ना काय घ्यायचं ते ",..... वीणा


"आता ठरलं आहे, तुझं म्हणणं मी ऐकलं ना, आता माझं म्हणणं तू ऐक, कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याप्रमाणे तुला वागावे लागेल",...... समर


" ठीक आहे, yes boss...... काय करणार आता तू बोलला म्हणजे ऐकावच लागेल ",...... वीणा


जेवण झालं,...


" सगळ्यांनी जरा वेळ बसा आपण नंतर काय काय खर्च आहे ते सगळ हिशोब करून घेऊ",..... वहिनी


" अगं वहिनी मी आता समर चा फोन आला होता, त्यांनी सगळ्या गोष्टीचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ते लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि ते खरेदीला ही मदत करतील",..... वीणा


"अहो पण ताई कस करणार अस, आपण जायच का त्यांच्या सोबत खरेदीला ",..... वहिनी


" ते मला अजून काही माहिती नाही त्या लोकांचा फोन आला की समजेन बहुतेक एखाद्या दुकानात बोलावतील ते आपल्याला ",..... वीणा


" ठीक आहे",..... वहिनी


" हो मलाही आला होता परांजपेंचा फोन, सगळ्या गोष्टीच कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्यानुसारच करायच आहे आपल्या खरेदी, सगळ्यांनी काय काय घ्यायचं त्याची लिस्ट करून ठेवा, एक-दोन दिवसात ते लोक कॉन्टॅक्ट करतील आपल्याला",....... बाबा


घरातल्या सगळ्यांना काय काय कपडे हवे वहिनी लिस्ट करत होती, वीणा आणि आई तिला एक एक गोष्टी सुचवत होत्या,


" खर्चाचं कस ठरलं आहे बाबा",....... वीणा


" ते नंतर कळेल, मी त्यांना सांगितला आहे का आमचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला सांग ",..... बाबा


" आम्हालाही सांगा सगळ खर्च वगैरे",..... दादा


"नाही आपण आत्ताच ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवू",...... वहिनी


" हो चालेल",...... वीणा


दुसर्‍या दिवशी वीणा ऑफिस ला आली


" प्रीती काल समर चा फोन आला होता, अग कॉन्ट्रॅक्ट दिला आहे पूर्ण कार्यक्रमाचा, आपल्याला फक्त बॅग घेवून जायच रिसॉर्ट ला",..... वीणा


" दिल असेल त्यांनी कॉन्ट्रॅक्ट ",..... प्रीती


" तुझं काय ठरलं आहे खरेदीच, केली नाहीस ना काही खरेदी, तु ही आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये ",...... वीणा


" मी कशाला असेल वीणा, मी समर ला सांगितल होतो की आमचा खर्च आम्ही करू",...... प्रिति


दुपारी वीणा ला फोन आला आज संध्याकाळी खरेदी च ठरवायला कॉन्ट्रॅक्ट टिम कडून एक जण घरी येणार होते, घरी वीणा ने वहिनीला फोन करून सांगितलं....


प्रीतीच्याही फोनवर फोन आला, तिलाही ते लोक अपॉइंटमेंट मागत होते, प्रितीने अपॉइंटमेंट दिली नाही, ती वीणा कडे आली,..... "वीणा अग काय, मी पण आहे का त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, तू समर ला फोन लाव जरा, मला बोलायचं आहे त्याच्याशी",..


"अगं हो आहेस तू, मी तेच तर बोलत होते तेव्हा, किती छान असू दे ना",..... वीणा


" नाही तू आधी समरला फोन लाव",..... प्रिति


वीणा ने समर ला फोन लावला


"बोल वीणा, तुला काही करमत नाही वाटतं माझ्या शिवाय",..... समर


" काहीही काय रे समर, प्रीती ला बोलायच आहे तुझ्याशी थोडं, प्रीती शी बोल" ,..... वीणा


वीणा ने फोन प्रीतीला दिला,..... "समर तुम्ही लोकांनी कार्यक्रमाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे का"?,..... प्रिति


हो....


" मलाही आता त्या लोकांचा फोन आला होता, पण आम्ही तर तुला सांगितलं होतं ना की आमचा खर्च आम्हाला करू दे, या कॉन्ट्रॅक्ट वाल्यांना आम्ही आमचा पैसे दिले तर चालतील का",..... प्रिति


" नाही फूल कॉन्ट्रॅक्ट एकत्र आहे पैशाचं आपण नंतर बघू ते, तू त्या लोकांची अपॉइंटमेंट घे आणि ठरवून घे सगळ",...... समर


असं कसं.....


" आता सोबत कार्यक्रम आहे तर तुला माझं ऐकावच लागेल आणि तुही मला माझ्या बहिणीसारखी आहे आणि नंतर तू मला नंतर पैसे दे चालेल ",...... समर


" मला सांग आत्ताच किती पैसे होत आहेत ते",..... प्रिति


" आत्ता नको तू नंतर दे मी लक्ष्यात ठेवेन",.... समर


"अरे पण समर तू घेतो का पैसे आमच्याकडून, नेहमी अस करतोस ",..... प्रिति


" हो यावेळी घेणार आहे मी तुझ्याकडुन पैसे आणि पार्टि सुध्दा ",...... समर


"ठीक आहे मी सचिनशी बोलते आता, तो काय म्हणतो आहे या कॉन्ट्रॅक्ट बद्दल मग मी तुला सांगते",...... प्रिति


"काही म्हणणार नाही सचिन, तो काही म्हटला तर मला फोन करायला सांग, छान ठरवून घ्या तुम्ही सगळ, कशाला तुम्ही दोघी एवढ्या काळजी करतात तू आणि वीणा, नंतर तुम्हालाच वाटेल कि बर झाल आपण समरचा ऐकलं किती छान झाला कार्यक्रम",.... समर


" हो तु तर ठरवतो खूपच छान, पण आम्हालाही थोडं काही करू दे",..... प्रिति.....