प्रित तुझी माझी... ❤️ भाग 43

"मी तर काहीच काम करत नाहीये समर, फक्त इच्छा व्यक्त केली असा कार्यक्रम करायचा आणि त्याबद्दल मी काहीच प्रयत्न करत नाही मला पण काहीतरी करायला पाहिजे ना",..... वीणा
ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

दादा आणि प्रकाश घरी आले, वीणा वहिनी सोबत बोलत बसली होती, वीणाने दादा आणि प्रकाशला सगळं सांगितलं, त्यांना विणाचे विचार खूप आवडले,


"पैसे कमी असले की किती त्रास होतो हे आपल्याला बरोबर माहिती आहे, उगाच महागाचे कपडे इतर खर्च करण्यापेक्षा जे खरच गरजु आहेत त्यांना मदत केलेली नेहमी चांगली",..... दादा


" हो ना, मला ही खूप आवडले तुमचे दोघांचे विचार",....... प्रकाश


" नाहीतरी आता साखरपुड्याला किती खर्च झाला, दागिने पण भरपूर आहेत, तेच घालता येतील" ,........ वीणा


"हो ना खरच आपल्यासाठी जास्त आहे तो खर्च",...... वहिनी


समर ने वीणा ला फोन केला....


"माझ झाल आता घरी बोलण, घरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला एकदा सगळ्यांना भेटून पूर्ण प्रोग्राम ठरावाव लागेल",........ समर


" इकडे ही काही प्रॉब्लेम नाही",....... वीणा


" मम्मी च्या ओळखीचे आहेत एक सेवाभावी संस्था तिथे आज मम्मी चौकशी करणार आहे नंतर सांगेन ती आपल्याला",....... समर


" Ok त्यांच्या बर्‍याच ओळखी आहेत ह ",..... वीणा


" मम्मी करते बरच सोशल वर्क",....... समर


वीणा च्या बाबांनी समरच्या पप्पांना फोन केला,...... "आमचं झालं बोलणं वीणा शी, तिचं म्हणणं पटत आहे आम्हाला ",..


" हो मुलांचे विचार चांगले आहेत, काही हरकत नाही असा प्रोग्राम करायला, पण मी मुलांना सांगितलं की आदल्या दिवशी तुमचं लग्न करू आणि दुसऱ्या दिवशी सामूहिक विवाह सोहळा करू, कसं वाटत आहे तुम्हाला? मी आशिष च्या बाबांशी पण बोललो त्यांना काहीच अडचण नाही ",........परांजपे सर


" मला त्याबद्दल तुमच्याशी थोडसं असं बोलायचं होतं, माझ्याकडे वीणाच्या लग्नासाठी पैसे साठलेले आहेत आपण सगळा खर्च वाटून घेऊन",..... बाबा


" हो नक्कीच मी सांगेन तुम्हाला",....... परांजपे सर


" आता पुढे काय करता येईल",..... बाबा


" आता एक सामाजिक संस्था आहे त्यांना आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत, जे गरजू असतील त्यांची माहिती आपल्याला तिथून मिळेल, किती खर्च होईल ते आपल्याला समजेल मग पुढे बघू कोणता मुहूर्त धरायचा वगैरे, एकदा आपण सगळे भेटू परत आणि पूर्ण ठरवून घेऊ कार्यक्रम काय असेल ते ",...... परांजपे सर


" हो हे योग्य राहील",....... बाबा


वीणा च्या बाबांनी वीणाच्या आईला सगळी कार्यक्रमाची माहिती दिली,....." हे असं सगळं ठरत आहे, चांगल आहे ना ",..


" चांगला विचार करत आहेत मूल, मुलांच्या आयुष्याची सुरुवात एवढी चांगली होणार असेल तर काय हरकत आहे, मुहूर्त वगैरे कधी काढता आहेत ",...... आई


"ते विचारणार आहेत गुरुजींना, आपण परत एकदा सगळे भेटु आणि मग सगळ फिक्स करू ",...... बाबा


"तुम्ही बोलले ना की आपल्या बाजूने वीणाच्या लग्नाचा खर्च आपण करू ते",...... आई


"हो मी सांगितलं त्यांना की आम्ही आमच्या बाजूचा खर्च करू",..... बाबा


"बरं झालं ",..... आई
......

सकाळी नाश्ता वगैरे करून मम्मी-पप्पा ऑफिसला आले


" काय करायचा आहे आता पुढे ",...... परांजपे सर


" आता मी जाऊन त्या संस्थेच्या संचालिका त्यांना भेटून येते, त्यांचं मॅरेज ब्युरो शी कॉन्ट्रॅक्ट आहे, बघू तिकडे काही माहिती मिळते का",...... परांजपे मॅडम बाहेर गेल्या",.....


थोड्यावेळाने गुरुजींचा फोन आलाच,....... "पुढील महिन्यात दोन तीन मुहूर्त आहेत लग्नाचे",


" चालेल तुम्ही मला मुहूर्त मेसेज करून द्या मी जरा घरच्यांशी बोलतो आणि मग कळवतो तुम्हाला लागोपाठ दोन तीन दिवस येतील असे जरा दोन तीन मुहूर्त बघा आमचे कार्यक्रम दोन दिवस लागोपाठ असतील",...... सर


"ठीक आहे चालेल मी तुम्हाला एक दोन तासात फोन करतो ",..... गुरुजी


परांजपे मॅडम आल्या,....." त्या संचालिका करता आहेत कॉन्टॅक्ट, कळेल आपल्याला किती लोक आहेत रेडी सामुदायिक विवाह साठी ",


" छान काम झालं चला इकडे पण गुरुजींचा फोन आला होता, त्यांना पण मी लागोपाठ दोन तीन दिवसाचे मुहूर्त काढायला सांगितले ",..... सर


समर आत आला परांजपे मॅडमने त्याला सगळी माहिती दिली,....." डोनेशन सामानाचा तू आणि वीणा सोहा ठरवून घे समर",...


हो,.....


वीणा नुकतीच ऑफिसला आली,...


" आज काय काय काम आहे वीणा? काय चाललय तुझ लक्ष कुठे आहे? ",.... प्रिति


" प्रीती ऐक ना मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे",..... वीणा


"बोल वीणा",.... प्रिति


"आम्ही असं ठरवत आहोत की आमच्या लग्नाला सोबत इतर अकरा जोडप्यांचे पण लग्न लावायचे आणि त्यांना संसार उपयोगी वस्तू द्यायच्या ",..... वीणा


"चांगला विचार आहे वीणा, नको करायला खूप खर्च, , कधी काही ठरलं का तारीख वगैरे ",...... प्रिति


"नाही अजून काही ठरलं नाही ठरेल या आठवड्यात, तुझं काय ठरलं लग्नाचं, झाल का काल काही बोलण, ",...... वीणा


"आमचा अजून काही ठरलं नाही, रजिस्टर करायच की वैदिक पद्धतीने आम्ही ही नाही करणार एवढा खर्च, "....... प्रिति


समोर चा फोन आला,..... "वीणा आत्ता मम्मी जाऊन आलीत सेवाभावी संस्थेमध्ये ते लवकरच कळवणार आहेत लिस्ट ज्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करायच आहे त्यांचे नाव वगैरे कळवतील",..


"मी तर काहीच काम करत नाहीये समर, फक्त इच्छा व्यक्त केली असा कार्यक्रम करायचा आणि त्याबद्दल मी काहीच प्रयत्न करत नाही मला पण काहीतरी करायला पाहिजे ना",..... वीणा


" एवढ्या सगळ्या गोष्टीचा टेन्शन नको घेऊ वीणा, मम्मीची आहे ओळख तिकडे, करता आहेत ते काम, सांगतील ते एक दोन दिवसात ",...... समर


" किती जोडपे रेडी आहेत आत्तापर्यंत",...... वीणा


" ते अजून समजले नाही आज संध्याकाळपर्यंत समजेल,
आता तु त्या जोडप्याने संसारोपयोगी वस्तू काय काय द्यायच्या त्याची लिस्ट कर",........ समर


"ओके मी आणि सोहा मिळून ती लिस्ट करतो आणि कळवते मी तुला संध्याकाळपर्यंत",....... वीणा


गुरुजींनी बरेच मुहूर्त काढून दिले परांजपे सरांनी मॅडमला सगळे मुहूर्त दाखवले


" मी आधी जोडपे अरेंज करते मग आपण मुहूर्त काढू यातून ",.... मॅडम


" हो चालेल, ते आधी अरेंज व्हायला हवेत",...... सर


तेवढ्यात मॅडमला फोन आला, मॅडम बराच वेळ बोलत होत्या फोन ठेवल्यानंतर त्या सरांच्या केबिनमध्ये गेल्या,....... "सात-आठ जोडपे आहेत रेडी, सेवाभावी संस्था वाल्या मॅडम बोलल्या कि तुम्ही तारीख काढा बाकीचे जोडपे अरेंज होतील तो पर्यंत",...


" ठीक आहे मग मी आशिष च्या बाबांना आणि वीणा च्या बाबांना फोन करून सांगतो भेटायचं का आपण सगळ्यांनी",...... सर


"चालेल ते योग्य राहील भेटून बोलू म्हणजे कोणाचं काय मत आहे तेही नीट कळेल ",...... मॅडम


परांजपे सरांनी वीणाच्या बाबांना फोन लावला,....." आज संध्याकाळी भेटता येईल का, काही मुहूर्त काढले आहेत, ठरवून घेवू भेटून ",...


" हो चालेल कुठे यायचं आहे",..... बाबा


" इकडे ऑफिस मध्ये या, येण्या आधी सांगा मी गाडी पाठवतो",.... सर


"हो चालेल",..... बाबा


परांजपे सरांनी आशिष च्या वडिलांनाही ऑफिसमध्ये बोलावून घेतलं....


पाच वाजता विणा ची आई बाबा घरून निघाले, बाहेर मेन रोड वर गाडी आली होती घ्यायला,


" आम्ही जाऊन येतो सविता, परांजपेंच्या ऑफिसला गुरुजी येणार आहे तिथे मुहूर्त काढायचा आहे लग्नाचा",..... आई


" हो चालेल काय झालं ते कळवा नंतर येताना टॅक्सीने या",..... सविता


हो.....


बाबांनी विणाला फोन करून सांगितलं,..... "परांजपेंच्या ऑफिस मध्ये आम्ही जातो आहोत, काय ठरतं ते सांगतो पुढे ",


" चालेल ना ",.... वीणा


"तुला एक दोन महिन्यात मुहूर्त काढला तर चालेल ना ",..... बाबा


" हो चालेल बाबा काही हरकत नाही आता आपलं महत्वाचं नाही आहे अकरा जोडपी अरेंज झाली की तो मुहूर्त महत्त्वाचा आहे ",...... वीणा


" बरोबर आहे तुझं वीणा ",..... बाबा


वीणाचे आई-बाबा ऑफिसमध्ये पोहचले आशिष चे आई-बाबा पण निघालेच होते यायला, समर जाऊन आई-बाबांना भेटला, त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसायला सांगितलं, परांजपे सर मॅडम आले, आशिषचे आई बाबा आले,


" आपण एक काम करूया का, आपण गुरुजींना इकडेच बोलवुन घेऊया का म्हणजे इथे लगेच फिक्स होईल सगळं",...... मॅडम


" हो चालेल मी करतो गुरुजींना फोन",...... परांजपे सरांनी गुरुजींना फोन करून ऑफिसमध्ये बोलवून घेतलं


समर ने सगळ्यांसाठी कॉफी सांगितली...


"आपण वीणा सोहा आणि आशिष ला ही ते बोलवुन घेऊया, नाहीतरी आता ऑफिसची वेळ संपलीच आहे, म्हणजे आज सगळं होऊन जाईल फिक्स",....... सर


" चालेल, मुलांचे काय विचार आहेत ते ही समजतील",.... बाबा


समर वीणाचा ऑफिस जवळ आला वीणा प्रीती आल्या बाहेर,


"वीणा समर आला बघ ",...... प्रिति


Hi समर....


hi प्रीति.....


" प्रीती तू येतेस का आमच्या सोबत ",..... वीणा


" नाही वीणा मला जातांना थोड सामान घ्यायचा आहे",..... प्रिति


वीणा कार मध्ये बसली...


"आपल्याला ऑफिस मध्ये जायचं आहे वीणा",...... समर


"हो मला बाबांचा फोन आला होता सगळे जमले आहेत ना तिकडे",..... वीणा


"हो गुरुजी पण येणार आहेत मुहूर्त काढायला आज बहुतेक फायनल तारीख कळेल, मी खूप खुश आहे",..... समर


" पण माझा निर्णय बरोबर आहे ना समर का मी उगीच सगळ्यांना माझ ऐकाव लागत आहे",..... वीणा


"नाही तसं काही नाही, नाही तर लग्नानंतर आपण केला असतं डोनेशन वगैरे, काही प्रॉब्लेम नाही वीणा, खूप छान डिसीजन आहे हा तुझा, तुला वाटलं ना आता आपण असच करू, बघू आता मम्मी पप्पा काय म्हणत आहेत, सात-आठ जोडपी आहेत गरजु, तारीख पुढच्या एखाद्या महिन्यापर्यंत ठरेल तोपर्यंत मिळतील अजुन जोडपी, प्रीती च लग्न कधी ठरत आहे? तिला आणि सचिनलाही आपल्याबरोबर जॉईन करून घेऊया का? म्हणजे सोहा आशिष, समर वीणा, प्रीती सचिन, तीन जोडपे आपण आहोत हो, जर कोणी मिळाल नाही तर ",..... समर


" मी तर हा विचारच केला नव्हता समर, मी उद्या विचारून बघते प्रीतीला, त्यांना चाललं तर ते हो म्हणतील, आपला मुहूर्त पण जवळच आहे ना, तशी ती मला बोलत होती की ते पण लग्नाचा जास्त खर्च करणार नाहीये, चालेल ना आपल्याला जॉईन व्हायला काहीच हरकत नाही त्यांना",.... वीणा


" तू आत्ता बोलते का तिच्याशी फोनवर म्हणजे मग ती संध्याकाळी सचिनशी बोलू शकते ",..... समर


" हो चालेल ",.... वीणा ने प्रीती ला फोन लावला


"बोल ग वीणा आत्ताच गेलीस ना तू काही राहिलं का ऑफिसमध्ये ",..... प्रिति


" नाही ग, तुझ्याशी बोलायचं होतं थोडं, प्रीती तू आज सचिनशी बोलून बघ घरच्यांशी पण बोलून बघ, आम्ही जेव्हा लग्न करतो आहोत त्याच मुहूर्तावर तुला आणि सचिन ला पण आमच्या सोबत लग्न करता येईल का"?,....... वीणा


"पण तुम्ही लोकांचे मुहूर्त लगेच आहे का",..... प्रिति


"हो बहुतेक एक दोन महिन्याचं असेल ",..... वीणा


"मी काम करते आधी आई बाबांशी आणि सचिनची बोलून घेते, तरी आम्हाला डिसिजन घ्यायला दोन-तीन दिवस लागतील ",...... प्रिति


" काही हरकत नाही प्रीती तू घे तुझा डिसिजन, जर तुम्हाला जमत असलं तर आमच्याबरोबर लग्न करायला काही हरकत नाही म्हणजे तीन जोडपी तर घरचेच होतील",....... वीणा


"हो चांगला विचार आहे तुझा विणा मी घरी बोलून बघते",....... प्रिति


वीणा ने फोन ठेवला


" चांगला विचार केलास तू समर प्रीती बोलली कि ती विचार करणार आहे आणि घरच्यांशी आणि सचिन अशी बोलणार आहे",..... वीणा


समर वीणा ऑफिस ला पोहोचले, आशिष आणि सोहा पण येतच होते, मुलं यायला थोडा वेळ होता, गुरुजी येतच होते, सगळे छान गप्पा मारत होते, एकदम उत्साहाचं वातावरण होतं......


गुरुजी आले, सोहा आणि आशिष ही आले...


" मी आज एका संस्थेला कॉन्टॅक्ट केला होता 7-8 जोडपे आहेत त्यांच्याकडे जे सामूहिक विवाह मध्ये लग्न करायला तयार आहेत" ,.... परांजपे मॅडमने माहिती दिली


"आता आम्ही येतांना समरने सुचवलं की प्रीतीच सुद्धा लग्न आपल्यासोबत होऊ शकत, ती आज तिच्या घरच्यांना विचारणार आहे, त्यांना जमेल तर ते आपल्याला जॉईन होतील, तर तिचं पण नाव घ्या सगळ्यांमध्ये",.... वीणा


"चालेल ना मग हे तर खूपच छान होईल, घरचे तीन जोडपे",..... मॅडम


" अजून दीड महिन्यांनी छान मुहूर्त आहे लग्नाचा लागोपाठ दोन-तीन दिवस चांगले मुहूर्त आहेत तुम्हाला तो वेळ निवडता येईल तोपर्यंत तुम्हाला तयारी करायला ही वेळ मिळेल",..... गुरुजी


" चालेल का तुम्हाला सगळ्यांना ",.... परांजपे सर


" हो चालेल काही हरकत नाही माझी परीक्षा पण तोपर्यंत होऊन जाईल ",.... सोहा


" पुष्कळ वेळ मिळतो आहे तयारीला काही हरकत नाही",.... वीणा ची आई, आशिष च्या आई ने होकार दिला


" वीणा सोहा तुम्ही दोघींनी लिस्ट केली का संसार उपयोगी वस्तूंची ",..... परांजपे मॅडम


वीणा सोहा एकमेकींकडे बघत होत्या,....." आम्ही दोघी दुपारी बोललो आहोत या बाबतीत, आम्ही दोन दिवसात लिस्ट करून देतो, बजेट काय ठरवायचं आहे",..


"बजेट तुम्हीच ठरवणार आम्हाला काही प्रॉब्लेम नाही",..... परांजपे सर


" ठीक आहे आम्ही सांगतो",..... वीणा, सोहा


" म्हणजे यानिमित्ताने घरात काय काय लागत याचा आपण तुम्हाला अंदाज येईल ",.... गुरुजी


समर हसत होता


" पुढच्या दीड महिन्याचा मुहूर्त द्यायचा का मग",...... सर


सगळ्यांनी होकार दिला, सगळे गप्पांमध्ये बिझी होते, काय करता येईल काय काय घ्यायचा आहे, एकच उत्साह संचारला होता, समोर विणाकडे आनंदाने बघत होता


" आता आपण सगळं ठरवून घेऊ आदल्या दिवशी मुलांचे लग्न करू, प्रीती हो म्हटली छान होईल , दुसऱ्या दिवशी सामूहिक विवाह सोहळा आणि या सगळ्या जोडप्यांचे रिसेप्शन ठेवू, असा दोन दिवसांचा कार्यक्रम असेल आपला, सामूहिक विवाह सोहळा वाले जोडपे त्या दिवशी आले तरी चालतील"....सर


" सगळ्यांना आवडली ना ही कल्पना",.......


" हो छान ठरल आहे ",.....


प्रीती घरी आली तिने आई बाबांना सांगितल वीणा काय म्हटली ते.....


" छान वाटत आहे मला हा प्लॅन, काही हरकत नाही, पण सचिन च्या घरच्यांशी बोलावं लागेल ",..... प्रिति ची आई


" मी सचिन शी बोलून घेते",...... प्रिति


प्रीतीने सचिन ला फोन लावला त्याला पूर्ण माहिती सांगितली वीणा आणि समरचा काय प्लॅन आहे तो


"खूप चांगले विचार आहेत त्यांचे, मला तर आवडला आहे विचार, नाही तरी आता आपल्याला एक दोन चार महिन्यात करायचं होतं ना लग्न, मी एक काम करतो आज संध्याकाळी घरी गेलो की आई-बाबांशी बोलतो, आपण रात्री परत फोनवर बोलू


" चालेल जर तुम्ही लोक बोललेत आम्ही येऊ शकतो तिकडे मग बसून बोलू सगळ


" चालेल मी घरी गेलो की सांगतो तसं",....... सचिन


🎭 Series Post

View all