Login

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 42

मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचं आहे आई बाबा, आता मी समर ला भेटून आले आणि आमचा असं ठरतं आहे की लग्नात जास्त खर्च नको करायला त्याऐवजी अकरा जोडप्यांचे लग्न लावून त्यांना संसारोपयोगी वस्तू द्यायच्या तुम्हाला काय वाटत आहे ",....... वीणा
ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार

.......

दुपारी चार वाजता समरने प्रकाशला परांजपे इंडस्ट्रीमध्ये बोलवून घेतल, प्रकाश आला, समरने त्याला केबिनमध्ये बोलावून घेतलं, प्रकाश प्रोजेक्ट डिटेल्स घेऊन आला होता, दोघा मागच्या शॉप मध्ये गेले, काय करायचं आहे ते समर समजून सांगत होता, त्यावर प्रकाश ने त्याच्या आयडिया दिल्या, दोघ बराच वेळ बोलत होते, प्रोजेक्ट खूप छान होत .....


"लवकरच या कामाची सुरुवात करू , पण तुला या कामाबद्दल मोबदला घ्यावा लागेल प्रकाश, या नवीन प्रोजेक्ट मध्ये मी तुला भागीदारी ऑफर करतो" ,...... समर


"समर एवढी भागीदारी म्हणजे जास्त होतं, " ,..... प्रकाश


"सगळा प्लॅन तुझा आहे, काम तू जास्त करणार आहेस, मला आवडला हा प्रोजेक्ट, यात तर भागीदारी गरजेची आहे ",....... समर


परांजपे सर आले शॉप मध्ये प्रकाशने आणि समरने त्यांना प्लॅन समजून सांगितला....


"खूप छान प्लॅन आहे हा तुमचा दोघांचा, छान एक्झिक्युट करा, ऑल द बेस्ट ",...... सर


सर आत निघून गेले.....


प्रकाशही घरी गेला....


समर पप्पांच्या केबिन मध्ये गेला,..... "पप्पा आत्ता प्रकाश ने जे प्रोजेक्ट च काम सुरू केल आहे ना माझ्यासोबत, मी त्याला भागीदार करून घेणार आहे त्यात आणि ते काम आपल्या नवीन इंजिनिअरिंग युनिट मध्ये सुरू करणार आहोत आम्ही",...


"चांगली आयडिया आहे, काही हरकत नाही",..... सर


" आता प्रकाश कडे गुंतवणुकीसाठी पैसे नाहीत, पण ह्या प्रोजेक्ट मध्ये जो सेल होईल त्यात त्याला काही पर्सेंटेज देणार आहे मी ",....... समर


" चालेल काही हरकत नाही आहे go ahead",...... सर


आज समर बराच वेळ मीटिंगमध्ये बिझी होता, त्यामुळे तो संध्याकाळी विणायला भेटायला गेला नाही, वीणा ऑफिसहुन घरी आली, आई फराळाची तयारी करत होती, एक ऑर्डर आली होती, दादा वहिनी भाजी आणायला गेले होते, अभी आरु अभ्यास करत होते


"आज लवकर आलीस का वीणा तू",...... आई


"हो आई आज समर थोडा बिझी होता आणि प्रकाश पण आज समरला भेटायला गेला होता, बहुतेक तीच मीटिंग सुरू असेल, आई एक ना आता हे फराळाच ऑर्डर घेण् बंद कर ग, किती थकतेस तू",...... वीणा


"अग काय त्यात, मला आवड आहे, चहा करू का ग",...... आई


"आवड बिवड काही नाही पुरे आता काम, किती करणार तू, मीच करते चहा तू घेणार का "?,....... वीणा


समर ऑफिस हून घरी गेला, सोहा घरी होती,......


" आज कसा काय लवकर आलास तू समर",...... सोहा


"आज खूप काम होत ऑफिस मध्ये, बर झाल तु घरी आहेस मला तुझ्याशी बोलायच आहे थोड",...... समर


" काय झाल",...... सोहा


" काल साखरपुड्याच्या कार्यक्रमानंतर मम्मी पप्पा यांनी गुरुजींना आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायला सांगितला होता, त्यात असं ठरत आहे की एक रिसॉर्ट बुक करू आणि सगळ्या फॅमिलीने तिथे जाऊ आणि सगळे प्रोग्राम तिकडेच होतील",....... समर


ओके...... सोहा


" तर वीणाला असं वाटत आहे की आपण थोडं पैसे वाचवले आणि त्यातून थोडं समाजकार्य केलं तर बरं पडेल",...... समर


" पण म्हणजे नक्की करायचं काय आहे आपल्याला ",........ सोहा


" तेच तर वीणा ला आपल्याशी सगळ्यांची बोलायचं आहे उद्या भेटून बोलू या का ",....... समर


" चालेल ना आपण भेटून बोलू",...... सोहा


" आणि तशी काही बळजबरी नाही, तुला आणि आशिष ला जर ही आयडिया आवडली नाही तर तुम्ही वेगळा डिसिजन घेऊ शकता, जे आम्हाला आवडलं तेच तुम्ही करायचं असं कंपल्सरी नाही ",...... समर


" ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण आधी वीणा ला भेटू आणि बोलून बघु तिचं काय म्हणणं आहे, मग आम्ही दोघे ठरवतो आम्हाला काय करायचं आहे ते ",...... सोहा


आजी आली तेवढ्यात बाहेर,......" काय ठरतं आहे तुमचं दोघांचं ",..


" पुढे लग्न कसं करायचं ते ठरवतो आहोत आम्ही, म्हणजे प्रोग्राम वगैरे ",...... सोहा


" अरे वा छान विषय सुरु आहे तुमचा ",..... आजी


प्रकाश घरी आला, दादा आणि बाबा हि आले होते घरी, वीणा जेवणाची तयारी करत होती, प्रकाश फ्रेश होऊन आला, आई ताट करत होती....


" आज मी परांजपेंच्या कंपनीत गेलो होतो, दुपारी समर ने फोन करून मला बोलावून घेतलं होतं",........ प्रकाश


" काय ठरलं मग झालं का काम",....... वीणा


"हो मी समरला माझा नवीन जे प्रोजेक्ट आहे ते दाखवलं, ते त्याच्या नवीन मशीन साठी अप्लाय होत आहे, हे झालं तर नवीन इंजीनियरिंग युनिटमध्ये आमचं काम सुरू होईल, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी त्या प्रोजेक्ट मध्ये बहुतेक भागीदार असेल, माझं खूप मोठे स्वप्न यांने पूर्ण होऊ शकत",...... प्रकाश


सगळ्यांना खुप आनंद झाला होता.....


" मी आधी नाहीच म्हटलं होतो त्यांना पैसे घ्यायला, मला एक्सपिरीयन्स हवा आहे, पण समर ने ऐकल नाही",...... प्रकाश


" याचे पैसे तुला कसे मिळतील, सॅलरी वगैरे आहे का?, म्हणजे मी असच विचारतो आहे ",..... दादा


"जेव्हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि हे प्रॉडक्ट विकले जाईल तेव्हा पर्सेंटेज वर मला पैसे मिळतील, प्रोजेक्ट माझ्या नावावर राहील आणि खूप छान अनुभव आहे हा, त्या आधी ही प्रोजेक्ट उभा करायला पैसे ची मदत होईल समर ची",...... प्रकाश


" समर खूपच करतो आहे ह आपल्यासाठी सगळं, आपल्या सगळ्यांच नशीब चांगलं की आपल्याला समर सारखा जावई भेटला",..... बाबा


" हो ना माझा तर नोकरीचा प्रश्न समरने चुटकीसरशी सोडवला, त्यानंतर आता मला किती काम मिळाले ऑफिस मधून आणि प्रमोशन सुद्धा मिळू शकत मला",..... दादा


वीणा समर बद्दल सगळं कौतुक ऐकत होती, तिला समर बद्दल एकदम अभिमान वाटत होता....


जेवण झालं वीणा च आवरुन झाल...


समर चा फोन आला,...." उद्या भेटू या का वीणा? आशिष सोहा ही येतील भेटायला, तुझ्या मनात काय आहे ते बोल, म्हणजे पुढच् ठरवायला बरं पडेल, तस सांगू आपण घरच्यांना",...


"हो चालेल", .... वीणा


"मी सांगतो तुला सोहा ला विचारून, कुठे भेटायच",..... समर


"Thank you समर तू प्रकाश ला एवढी मदत केली",...... वीणा


"मी नाही तोच मला मदत करतो आहे, एवढा हुशार आहे प्रकाश",...... समर


"समर तू खूप छान सपोर्ट करतो आहे माझ्या फॅमिली ला",.... वीणा


"मी काही केल नाही, तुम्ही सगळे खूप हुशार आहात, आणि ही माझी पण फॅमिली आहे",..... समर


वीणा ऑफिस ला आली, आज ही एका कंपनीत जायच होत प्रेझेंटेशन ला त्यात समर सोहा ला भेटायच आहे,...... "आज मी खूप बिझी आहे प्रिति ",.


" वीणा ऐक काल सचिन चे आई बाबा आले होते माझ ही लवकर ठरू शकत मुहूर्त ",..... प्रिति


" काय बोलतेस खूप आनंदाची बातमी दिली",..... वीणा


"रविवारची येणार आहेत सचिन चे आई बाबा आमच्याकडे तेव्हा फिक्स डेट होईल",...... प्रिति


"मग खुश ना मॅडम, आपल लाइफ किती बदलते आहे ना प्रीती, मी पण आज भेटते आहे समर आणि सोहाला पुढच् ठरवून घेवू लग्न कस करायच ते"...... वीणा


ऑफिस सुटलं समर वीणाला घ्यायला आला


"कुठे भेटणार आहे सोहा आणि आशिष आपल्याला",..... वीणा


" ते येणार आहेत अर्ध्यातासात कॉफी शॉप वर आपण पोहोचू तोपर्यंत ",..... समर


" दोन दिवसापासून खूप बिझी आहेस तु ",........ वीणा


" हो ना प्रकाश बरोबर काल मीटिंग होती, मध्ये अजून दोन-तीन क्लायंट आले होते आजही खूप मिटींगला होत्या ",..... समर


"आम्ही पण आज कंपनीत गेलो होतो प्रेझेंटेशन साठी",.....वीणा


" कस झाल प्रेझेंटेशन, बर्‍याच ऑर्डर आहेत ह तुमच्या कंपनी कडे",....... समर


"चांगलं झालं प्रेझेंटेशन, काम काम जोरात सुरू आहे, हो ना काम भरपूर असत ऑफिस मध्ये ",....... वीणा


दोघं कॉफी शॉप ला पोहोचले सोहा आणि आशिष आलेच तेवढ्यात समरने सगळ्यांसाठी कॉफी ऑर्डर केली


" बोल रे दादा वीणा वहिनी, काय प्लान आहे तुमचा लग्नाबद्दल",....... सोहा


" म्हणजे आम्ही असे ठरवत आहोत की खर्च कमी करून त्या पैशाचा चांगला वापर करता येईल ",.... वीणा


"काय प्लॅन काय आहे",.... आशिष


"म्हणजे मला असं वाटत आहे की आपला जेवढा खर्च आहे तेवढ्यात जर 11 गरजू लोकांचं लग्न लावल आणि त्यांना संसार उपयोगी वस्तू दिल्या तर खूप छान होईल म्हणजे तुम्ही सगळे बघा तुमचा काय विचार आहे ते ",....... वीणा


" विचार खूप छान आहेत तुझे विणा वहिनी मला चालण्यासारख आहे हे, उगाच खूप महागाचे कपडे घ्यायचे त्यात तर किती गरजू लोकांना मदत होईल मग हे सामुदायिक विवाह सारखं करायचा आहे का ",...... सोहा


" हो आपण आपले लग्न त्यांच्या सोबत करू शकतो किवा आपल एक दिवस आधी करू, घरचे काय म्हणतात ते बघू आणि अकरा लोकांचे लग्न आपल्या सोबत करता येईल ",...... वीणा


" पण यासाठी बघावं लागेल कोण गरजू आहेत अरेंजमेंट करावी लागेल, घरच्यांना नाही आवडली आयडिया तर लग्ना नंतर आम्ही करू हे सामूहिक विवाह चा",...... समर


" का नाही आवडणार आयडिया छान आहे, आपल्या कडे आपण वाढदिवसाला करतो नेहमी दान डोनेशन ",..... सोहा


"हो ते ही आहेच ",..... समर


" पण आशिष तुला पटल आहे ना हा विचार ",..... समर


" हो खूप चांगला विचार आहे मला तर खूप चांगलं वाटत आहे, आमच्या कडे ही काही प्रॉब्लेम नाही, मी विचार करतो आहे की पुढे काय करता येईल कोणाला कॉन्टॅक्ट करता येईल",....... आशिष


" आपण घरच्यांशी बोलून बघू त्यांना हा विचार सांगून बघू त्यांना आवडलं तर पुढे करू काहीतरी नाहीतर आपण एखादी रक्कम पण दान देऊ शकतो चालेल ना पण सगळ्या मताने ठरवू काय करायचं आहे ते ",....... वीणा


सगळे ठरवत होते काय करता येईल.....


" पण साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान झाला आपला",...... समर


" हो मस्त सरप्राईज मिळालं",...... वीणा


" फोटो आले का आपले व्हिडिओ शूटिंग पण घेतली आहे ना",..... सोहा


" नाही अजुन नाहीत केले मेल त्याने फोटो, चालेल आपण आता घरच्यांशी बोलून बघू तसं आपण पुढचं ठरवु",...... आशिष


" हो चालेल, मग परत भेटून ठरवू आपण सगळ",...... सोहा


Ok.... वीणा


"तू येते आहे का सोहा माझ्यासोबत घरी", ..... समर


"नाही मी आशिष सोबत येईन घरी" , ...... सोहा


"ठीक आहे मग आम्ही निघतो",...... समर


समर ने वीणा ला घराजवळ सोडल,..... "घरी येतोस का"?,..


"नको वीणा मी निघतो आता, मी पण बोलून बघतो घरी",..... समर


"तुला पटले ना माझे विचार? कारण मला माहिती आहे समर लोकांना लग्न करायला ही खूप अडचणी येतात, पैसे नसतात, घरात काही नसते, खूप त्रास आहे, आपण कोणताही जास्तीचा खर्च नाही करणार, फक्त आपण महाग कपडे दागिने न घेता त्यात बचत करून हे करू शकतो, जास्त लोक बोलवण्या पेक्षा ओळखीच्या लोक मित्र मैत्रिणी बरोबर प्रोग्राम करू, तेवढ्यात आपल दान धर्म होईल ",..... वीणा


" मला पटले आहेत तुझे विचार don\"t worry, गरजू लोकांना मदत करून आशीर्वाद मिळतील आपल्याला, आपण नवीन आयुष्याची सुरुवात आशीर्वादाने करू, चांगल आहे no problem at all, आमच्या कडे मम्मी पप्पा नेहमी गरजूंना मदत करतात ",....... समर


" आमच्या कडे ही माझे बाबा जेव्हा जमेल तेव्हा खूप लोकांना मदत करतात, खूप समाधान असत तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर, मला आपल्या आयुष्याची सुरुवात अशीच करायची होती ",...... वीणा


दोघ बर्‍याच वेळ बोलत होते......


वीणा घरी आली आई बाबा बोलत बसले होते


"मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचं आहे आई बाबा, आता मी समर ला भेटून आले आणि आमचा असं ठरतं आहे की लग्नात जास्त खर्च नको करायला त्याऐवजी अकरा जोडप्यांचे लग्न लावून त्यांना संसारोपयोगी वस्तू द्यायच्या तुम्हाला काय वाटत आहे ",....... वीणा


" अरे वा, खूप चांगला विचार आहे वीणा, आमची काही हरकत नाही पण एकदा सगळ्यांशी बोलून घे, तसे कोणी नाही बोलणार नाही ",...... बाबा


" हो बहुतेक त्यांच्या घरीही काहीही प्रॉब्लेम नाही आणि आशिष आणि सोहाला ही काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना ही मान्य आहे हे",........ वीणा


" ठीक आहे मग मी उद्या बोलतो परांजपे साहेबांशी फोनवर की कसा अॅरेंज करता येईल हा प्रोग्राम, असे जोडपे ज्यांना गरज आहे त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागेल, बघावे लागेल संसार उपयोगी वस्तू म्हणजे काय द्यायचं, कितीपर्यंत, प्रत्येक जोडप्यावर किती खर्च करायचा, हे सगळं आधी ठरवून घ्या",.......बाबा


" हो बाबा माझे काही पैसे साठले आहेत ते पैसे मी या कामासाठी वापरणार आहे ",....... वीणा


" चालेल चांगले विचार आहेत ",...... बाबा


समोर घरी पोहचला मम्मी-पप्पा ऑफिसहून आले होते,.." सोहा नाही आली का तुझ्यासोबत घरी",..


" येतेच आहे ती रस्त्यात आहे, सोहा आल्यावर आम्हाला दोघांना तुमच्याशी थोडं बोलायचं आहे",.... समर


चालेल.....


समर फ्रेश होऊन आला, सोहा आली होती घरी, ती मम्मी पप्पांशी बोलत बसली होती, आजी आजोबा पण होते जवळ


"ये समर आत्ताचा मला सोहाने तुमच्या सगळ्या प्लॅन बद्दल सांगितलं, काहीच हरकत नाही, खूप छान विचार आहेत तुमचे, आपण असं करू या तुम्हा मुलांचे लग्न एक दिवस आधी करूया आणि दुसऱ्या दिवशी सामुदायिक विवाह पद्धतीने अकरा जोडप्यांची लग्न करून म्हणजे आमची सुद्धा तुमच्या लग्नाची हौस होईल आणि तुमच्या मनात जो चांगला विचार आहे तो पण साध्य होईल",....... पप्पा


" हो चालेल पप्पा काही हरकत नाही, पण आता आपण हा प्लॅन कसं काय आमलात आणायचा? मम्मी पप्पा तुमच्या ओळखीची आहे का अशी एखादी सेवाभावी संस्था जिथे आपल्याला असे गरजु जोडपे मिळतील, काय करायचं पुढे ",...... समर


" हो मी बघते माझ्या ओळखीच्या आहेत एक दोन संस्था, सोशल वर्क करणाऱ्या बायकांचा एक ग्रुप आहे, तिथे मी जॉईन आहे त्यांना विचारते मी उद्या, मग तुला सांगते बजेट वगैरे काय आहे ते पण फिक्स करावे लागेल, म्हणजे प्रत्येक जोडप्याला साधारणता संसारोपयोगी वस्तू किती रुपयापर्यंत घ्यायच्या, त्यांच्या घरचे किती लोक या लग्नाला येऊ शकतात, त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था वगैरे सगळं बघावे लागेल ",..... मम्मी


"मम्मी तुला बरीच माहिती आहे याबद्दल",..... सोहा


" हो तुझी मम्मी सोशल वर्क ग्रुप मध्ये बरेच वर्ष कार्यरत आहे, पूर्वी आम्ही असे प्रोजेक्ट बरेच केले आहेत आणि ते सक्सेसफुल झाले, आणि ते लोक सुखी आहेत ",........ पप्पा


समोर आता खुश होता आपण जे म्हणतो आहे ते घरच्यांना पटलं हे बरं झालं वीणा ला सांगाव लागेल मम्मी पप्पा काय म्हटले ते.......