Login

प्रित तुझी माझी... ❤️भाग 41

आता सगळं लवकर लवकर ठरवाव लागणार आहे, घरच्यांना तर घाई झाली आहे लग्नाची, आपल्या मनात आहे ते व्हायला थोडा वेळ लागेल, समरला लवकरच मला सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे, तो बोलेल सगळ्यांशी, सगळ्या गोष्टी अरेंज व्हायला थोडा वेळ जाईल च... वीणा विचार करत होती.....



ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


आशिष च्या घरचे निघाले, सोहा त्यांच्याशी बोलायला पुढे गेली होती,


"तुम्हा सगळ्यांना भेटून खूप छान वाटल, या आमच्या कडे सगळ्यांनी ",.... आशिषची आई


अगदी एका दिवसात खूप छान ओळख झाली होती सगळ्यांची....


त्यांच्या गाड्या पुढे गेल्या, समर स्वतः वीणाला सोडायला एक गाडी चालवत होता, सकाळ प्रमाणे आई बाबा दादा प्रकाश एका गाडीत होते


" येतो आम्ही मम्मी पप्पा", ........ वीणा समर सोबत कार मध्ये पुढे बसली, तिच्या जवळ आरू होती


"समर आपण आधी प्रीति ला तिच्या घरी सोडू मग आम्हाला घरी सोड",..... वीणा


"चालेल तू म्हणशील तस मॅडम, मी तुझ्या शब्दांबाहेर आहे का",....... समर


वहिनी प्रीती खूप हसत होत्या...


" समर बघ या दोघी कश्या हसता आहेत आपल्याला, तुझ्या मुळे ",........ वीणा


"हसू दे काही हरकत नाही",...... समर


प्रीतीच घर आल..." चला येते मी वहिनी वीणा समर अभी आरु बाय, आज खूप एन्जॉय केल मी दिवस भर आणि once again congratulations dear वीणा समर पार्टी बाकी आहे ह",... प्रिति


" हो नक्की करू आपण पार्टी, हो ना अभी आरू",.... समर


हो.... मुल खुश होती....


समरने गाडी आईस्क्रीम शॉपला उभी केली मुलांसाठी आईस्क्रीम घेतल घरच्यांसाठी पार्सल घेतल....


" पुरे समर आता किती मुलांचे लाड ",..... वहिनी रागवत होती


सगळे घरी आले.... आई बाबा आले होते आधी


" छान झाला नाही आजचा प्रोग्राम",.... बाबा


"हो ना, थोडा चहा करू का समर " ,...... आई


"आई अग आईस्क्रीम आणलं आहे, थांब मी आणते सगळ्यांसाठी" ,..... वीणा ने सगळ्यांना आईस्क्रीम दिलं


सगळे छान बोलत बसले होते.....


"चला बाबा, मी निघतो आता उशीर होतो आहे",..... समर


" वीणा ताई समर ला बाहेर पर्यंत सोडून ये ",..... वहिनी


वीणा त्याच्याशी बोलायला बाहेर गेली


आई वहिनी आवरत होत्या


समरने वीणा चा हात हातात घेतला,.... "आज मी खूप खुश आहे वीणा, किती छान सरप्राईज दिल ना आपल्याला सगळ्यांनी, काहीच कल्पना नव्हती, पण खूप छान झाला प्रोग्राम, तुझ्या बाबांनी दिलेली अंगठी चेन मी कायम जपून ठेवेन वीणा आणि आज तू खूपच सुंदर दिसते आहेस, काही तरी बोल वीणा",.... समर


"मला काही सुचत नाही समर, अगदी भारावल्यासारखे झाल आहे, किती प्रेम करतात सगळे आपल्यावर, आपली जबाबदारी वाढली आहे आता, खूप खुश ठेवायचा सगळ्यांना ",...... वीणा


" हो वीणा आणि तुला ही खूप thanks dear",...... समर


का.....


"सगळ्या गोष्टींसाठी माझ्या आयुष्यात येण्या साठी मला हो बोललीस किती समजूतदार आहेस तू, आज मी खूप खुश आहे ",..... समर


"पुरे किती कौतुक, आज आजींची खूप धावपळ झाली, किती गोड आहे तुझी आजी समर",...... वीणा


"हो आमच्या घरचा बॉस आहे आजी, खूप छान आणि उत्साही आहे ती सगळ सांभाळते पाहिल्या पासुन ",...... समर


खूप छान....


" आता आता तरी सांग कधी करू या लग्न ",..... समर


"एक सांगू का समर आता खर्च पुरे झाला, लग्न करतांना काहीतरी आपल्या दोघांना आवडेल असं करूया म्हणजे कसं आहे माझ्या डोक्यात एक गोष्ट मी सांगेन तुला नंतर",...... वीणा


" चालेल माझी माझी एक गोष्ट ऐकशील का वीणा",....... समर


" बोल ना समर",...... वीणा


" मी तुझ्यासाठी हे क्रेडिट कार्ड घेतलं आहे, तू हे प्लीज घे ना, गैरसमज करून घेऊ नको यात, मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे की तु काही घेऊ शकत नाही, पण मला असं वाटतं की यापुढे तू या कार्ड हून तुझा सगळा खर्च करावा",..... समर


" तुला माहिती आहे समर मला हे कार्ड घेता येणार नाही",...... वीणा


" प्लीज विणा माझं एकदा ऐक, मला पण थोडी जबाबदारी घेऊ दे सगळ्या गोष्टीची, यापुढे लग्नाची शॉपिंग असेल घरच्यांना काही वस्तू घ्यायच्या असतील प्लीज घे हे कार्ड मी तुझ्या घरच्यांना आपलं म्हणतो म्हणून मला असं वाटतं आहे की मी जबाबदारी घ्यायला पाहिजे, आणी कार्डचे पेमेंट मी स्वतः करणार आहे ते परांजपे इंडस्ट्रीवर नाही टाकणार प्लीज ",...... समर


वीणा ने कार्ड घेतलं,....." थँक्यू समर, तू असा कसा आहेस एवढा चांगला, यापूर्वी माझ्या आयुष्यात असेच लोक आले होते की ज्यांना खर्च म्हणजे अंगावर काटा यायचा, त्यांना असं वाटायचं की सगळा खर्च मी करावा, आणि तू एक आहेस जो माझी सगळी जबाबदारी द्यायला तयार आहेस तुला माहिती नाही आत्ता माझ्या मनात तुझ्याविषयी काही फिलिंग आहेत, तुला हो म्हणून मी एक चांगला डिसीजन घेतला आहे ",...... वीणा


बराच वेळ समर आणि वीणा बोलत होते दोघे इमोशनल झाले होते......


" मी निघतो आता वीणा आपण उद्या भेटू",...... समर


वीणा घरी आली तिने क्रेडिट कार्ड व्यवस्थित तिच्या पाकीटात ठेवून दिलं आणि आवरायला गेली


" आई तो ज्वेलरी बॉक्स कुठे आहे त्यात हे सगळे दागिने ठेवायचे आहेत दोन झाले आता बांगड्यांचे सेट, नको इतके, हा सेट मी त्यांना वापस करणार आहे कशाला एवढे दागिने ",.... वीणा


" हो बरोबर आहे, मागे पण तू त्यांच्या घरी गेली होती तेव्हा त्यांनी तुला बांगड्या दिल्या होत्या",.... आई


वीणा ने दागिने व्यवस्थित काढून ठेवले.....


वहिनी आत आली,....." हे घ्या वीणा ताई तुमचा नेकलेस सेट आणि कानातले ",


" अरे हो, हे काय नवीन सेट कोणी घेतला",...... वीणा


" तो आईबाबांनी घेतला आहे तुमच्यासाठी, आम्हाला ही माहिती नव्हत, नीट ठेवा तो आधी, हे बघा ताई मला परांजपे मावशीने बांगड्या दिल्या या पण ठेवा तुमच्या सेटमध्ये",....... वहिनी


" नाही वहिनी तुझ्या बांगड्या वापरून टाक तुला दिल्या आहेत ना ",...... वीणा


" पण एवढ्या एकदम सोन्याच्या बांगड्या घालायची सवय नाहीये ",....... वहिनी


" छान दिसत आहे तुला वापर ग",...... वीणा


आई आत आली.....


" एवढा एकदम नेकलेस सेट का केला ग मला? आणि बजेट कसे ऍडजेस्ट केलंस तू ",..... वीणा


" केलं ते आम्ही, तुझ्या लग्नासाठी आहेत काही पैसे बाजूला आमचे, तू काही काळजी करु नको वीणा ",..... आई


"नाही मला हे अजिबात आवडलं नाही, एवढा खर्च करायची गरज नव्हती, आता लग्नाच्या वेळी काही घेऊ नका, हा सेट घालेन मी आणि जर गुपचूप काही घेतलं तर मी रागवेन आता",... वीणा


" गिफ्ट खूप छान दिले आहेत परांजपेंनी",...... वहिनी


" काय काय आहे ग त्यात",...... वीणा


"सगळ्यांना कपडे आहे अभी आरुला कपडे आहेत खेळणी आहेत, त्यात सविताला पण बांगड्या दिल्या",..... आई


" हो ना खूप झालं त्यांच्याकडून गिफ्ट",..... वहिनी


" आधी तुझे दागिने ठेवून दे कपाटात ",..... आई


वीणा ने सगळं सामान व्यवस्थित कपाटात ठेवलं कुलूप लावून चावी आईकडे दिली दादा वहिनी मुले बाजूच्या रूम मध्ये आराम करायला गेली, प्रकाश काहीतरी काम करत बसला होता


"आता काय काम काढला आहे प्रकाश कर आराम ",.... वीणा


"सकाळपासून मेल बघितल्या नाही जरा बघून घेतो काही महत्त्वाचं असतं तर",..... प्रकाश


"तुला ऑफिस आहे ना वीणा उद्या",.... आई


" हो जावे लागणार आहे ऑफिसला",..... वीणा


"परांजपे यांनी दिलेली मिठाई ने ग ऑफिसमध्ये द्यायला",.... आई


" ठीक आहे ",..... वीणा


बाबा टीव्ही बघत होते वीणा जाऊन बाबांजवळ बसली,......" वीणा बेटा तू खुश आहेस ना ",..


हो बाबा..... वीणा


"छान झाला नाही आजचा कार्यक्रम ",..... बाबा


"हो बाबा खूप छान झाला कार्यक्रम आणि तुम्ही कशाला एवढा नेकलेस सेट घेतला मला",......वीणा


"असू दे ग काय त्यात, एवढा विचार नको करू बेटा ",.....बाबा


"समर ला अंगठी आवडली, तो बोलत होता तुझ्या वडिलांनी दिलेली अंगठी आणि चेन मी जपून ठेवणार आहे, बाबा आता एक सांगू का लग्नाला नको करू या एवढा खर्च",..... वीणा


"पण काही खर्च झालं नाही बेटा विशेष, एवढा खर्च तर होणारच, परांजपे यांचा झाला असेल खर्च, मी बोलणार आहे त्यांच्याशी खर्च वाटून घेवू ",......बाबा


"कोणाचा का असे ना, पण झाला असेल ना खर्च, तोच मला नको आहे, लग्न साध्या पद्धतीने व्हायला हव आणि ते जे पैसे उरतील चांगल्या कामासाठी वापरायला पाहिजे",......वीणा


"तुझे विचार चांगले आहेत बेटा बोलुया आपण या विषयावर नंतर आता आराम करा सकाळपासून धावपळ सुरू आहे",......बाबा


समर घरी आला घरात आवरासावर सुरू होती ,खूप सामान इकडून तिकडे नेले जात होत, केटरिंग वाल्यांची गाडी आलेली होती, मम्मीने सगळ्यांचा हिशोब करून पैसे दिले, मम्मी पप्पांची गडबड सुरू होती, आजी आजोबा सोहा बोलत बसले होते, समर येऊन आजी जवळ बसला


"मग काय आज खुश ना ",....आजी


" हो आजी थँक्यू एवढा छान प्रोग्राम कोणी ठरवला",..... समर


" सगळं तुझ्या पप्पांनी ठरवल",.... आजी


" आणि अधिकारी साहेबांमुळे पण तुमचा साखरपुडा लवकर झाला",..... सोहा चिडवत होती


"फोटो कोणी काढले आहेत मला दाखवा सगळे फोटो",..... समर ,


" हो फोटोग्राफरने काढले फोटो आणि व्हिडिओ पण घेतला आहेत तो नंतर पाठवणार आहे सगळं",......सोहा
.....

दुसऱ्या दिवशी आवरून वीणा ऑफिसला आली, प्रशांत प्रीती आलेले होते


"हाय प्रशांत प्रीती ",.....वीणा


प्रशांतने तोंड फिरवून घेतलं ....


"अरे काय झालं प्रशांत, तुला राग आला का, काही बोलत का नाहीस तु, प्रीती तू सांगितलं का प्रशांत ला साखरपुड्या बद्दल ",....वीणा


"हो आणि तो रागवला आहे आता तू मला प्रोग्राम ला बोलवलं आणि त्याला नाही सांगितलं असं त्याला वाटत आहे",..... प्रिति


"प्रशांत ऐक तरी अरे मलाच माहिती नव्हतं की माझा साखरपुडा आहे, आम्ही सोहा चा साखरपुड्याला गेलो होतो, विचार वाटलं तर समर ला, अगदी संध्याकाळी कळला मला दहा मिनिटात की साखरपुडा आहे माझा, प्लीज राग सोड",...... वीणा


" मग तेव्हा नाही का तुम्हाला मला सांगता येत मी आलो असतो पटकन",..... प्रशांत


"हो रे चुकलं आमचं तेव्हा लक्ष्यात आल नाही पण आता जेव्हा पार्टी करून तेव्हा यायचा आहेस तू, प्लीज ही मिठाई घे ना आता राग सोड",....... वीणा


तेवढ्यात सर आले,...... "काँग्रॅच्युलेशन्स वीणा, मला फार राग आला आहे, परवा तु मला विचारूनच घरी गेली तेव्हा सांगितला नाही साखरपुड्याचा आज अगदी अचानकच समजलं मला सकाळी, मला बोलावलं असतं तर मी लगेच आलो असतो तुमच्याकडे प्रोग्राम ला",....


" सॉरी सर पण आम्हालाच माहिती नव्हतं साखरपुडा आहे, घरच्यांनी सरप्राईज दिलं तुम्ही प्रीती ला विचारा",...... वीणा


" हो सर असंच झालं पाच मिनिट आधी कळालं की वीणा आणि समर चा साखरपुडा आहे, आम्ही समर च्या बहिणीच्या साखरपुड्याला गेलो होतो",...... प्रिति


"ठीक आहे पण आता पार्टी हवी तुमच्या सगळ्यांकडून आणि मी समर ला फोन करणार आहे अभिनंदनाचा, तुझं काय ठरलं आहे पुढे वीणा, तू परांजपे इंडस्ट्री जॉईन करणार आहे का? की आहे ती नोकरी कंटिन्यू करणार? ",....... सर


" मी काहीच ठरवलं नाही अजून असं पण बहुतेक मी हीच नोकरी कंटिन्यू करणार, मी खरच कम्फर्टेबल आहे इथे, पण तिकडे गरज लागली तर तस एक्स्ट्रॉ काम करेन बघु अजून काही ठरवलं नाही मी",........ वीणा


सगळे आनंदात होते....


परांजपे इंडस्ट्री मध्ये सुद्धा मिठाई वाटली जात होती सगळेजण आश्चर्य व्यक्त करत होते समर सरांचा पण साखरपुडा झाला, सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं ते मिस्टर दीक्षित यांना वीणा मॅडम नेहमी येत होत्या ईकडे तेव्हा माहितीच नव्हतं की त्यांच्याशी समर सरांचा लग्न ठरलं आहे


वीणा ला दुपारी लंच टाइम मध्ये समर चा फोन आला


"हाय वीणा काय चाललय ",.... समर


" हाय समर, अरे इकडे सगळे रागवले आहेत माझ्यावर , प्रोग्राम ला बोलवलं नाही म्हणून, प्रशांत, आमचे सर",...... वीणा


"हो का, इकडे ही आश्चर्य वाटत आहे सगळ्यांना की आपला ही साखरपुडा झाला काल, तुला माहिती आहे का, आपल्या साखरपुड्यानंतर तुझे आई बाबा माझे आई बाबा आणि आशिष चे आई बाबा.. गुरुजींशी बोलले, लग्नाचा मुहूर्त लवकरच काढायचा आहे, त्यासाठी त्यांचा विचार आहे की एक रिसॉर्ट बुक करायचा आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून तिकडेच राहायला जायचं, सगळे कार्यक्रम एकत्र साजरे करायचे, तू काल म्हणत होती ना तुझ्या डोक्यात काहीतरी विचार आहेत, काय आहे ते सांगशील का? नाही तर सगळ ठरवतील आई बाबा ",..... समर


" समर माझ्या डोक्यात विचार आहे की लग्नाचा खर्च तर होईलच, त्यासोबत थोडं सामाजिक कार्य पण करावं, तुला कसा वाटतो आहे माझा हा विचार",........ वीणा


" चांगला आहे विचार, पण म्हणजे नक्की काय करायचं आहे आपण? ",...... समर


"सांगेन मी तुला भेटून पण यात आपण आपल्या घरच्यांना पण मन दुखवायला नाही पाहिजे आणि थोडं आपल्या मनाचं पण करायला पाहिजे",....... वीणा


" चालेल ना तू म्हणशील तसं करू आपण पण मी खूप खुश आहे ",...... समर


"मी पण खुप खुश आहे, इकडे ऑफिस मध्ये प्रशांत रागवलेला आहे, एकदा भेट त्याला, नाहीतर आपण असं करू या ना छोटीशी पार्टी अरेंज करू आणि त्याच आपल्या मित्र-मैत्रिणींना सगळ्यांना बोलवु सगळे राहून गेले आहेत",..... वीणा


" सरप्राईज साखरपुडा झाला आपला, आपल्यालाही माहिती नव्हत",...... समर


" हो ना खूप छान झाला कार्यक्रम सगळेच छान दिसत होते, सोहा खुश आहे ना",....... वीणा


" हो ती खूप खुश आहे",...... समर


" आपल्या सोबत सोहाच लग्न आहे, आपल काही ठरलं तर त्यांना ही विचारू उगीच त्यांना आपले विचार पटले नाहीत तर बळजबरी नको ",....... वीणा


"बरोबर बोलते आहेस तू वीणा, सगळ आपण ठरवतो आहे, एक काम करू आपण सोहा आशिष शी एकत्र बसुन बोलू या का, त्यांना सांग तू तुला काय वाटतय ते ",........ समर


" हे छान होईल आपण भेटून बोलू, तू बोल सोहाशी केव्हा भेटायच ते ,",.......वीणा


आता सगळं लवकर लवकर ठरवाव लागणार आहे, घरच्यांना तर घाई झाली आहे लग्नाची, आपल्या मनात आहे ते व्हायला थोडा वेळ लागेल, समरला लवकरच मला सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजे, तो बोलेल सगळ्यांशी, सगळ्या गोष्टी अरेंज व्हायला थोडा वेळ जाईल च... वीणा विचार करत होती.....