Aug 16, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 39

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 39


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

जेवण झालं, समर बराच वेळ विचार करत होता वीणा साठी काय करता येईल, प्रितीने सांगे पर्यंत मला काही माहिती नव्हत की वीणा किती साध आयुष जगते आहे, मी विचार केला नव्हता त्याबद्दल, मी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, नुसत बोलत होतो तिला टॅक्सीने ये, वीणा ला माझा राग आला असेल का, नाही आता या पुढे मी वीणा ची पूर्ण काळजी घेईल, प्रिती शी बोलून जाणून घ्यायला हव काय काय अडचणी आहेत वीणा च्या लाइफ मध्ये


आजी आली तेवढ्यात,....... "समर मला एक आयडिया सुचली आहे , तुझं लग्न असेल तेव्हा फायनल कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू, दोघी बाजूच, म्हणजे वीणाच्या घरच्यांना आणि वीणा ला खर्चाचा प्रश्नच येणार नाही, तुला कशी वाटते ही आयडिया, आपण त्यांना सांगायचं नाही, आधीच बुक करून टाकायचं, त्यातच सगळी खरेदी येईल, दागिने येतील, लग्नाच्या दिवसाचा खर्च मेकअप सगळे येईल त्यात, कशी आहे आयडिया ",..


" हो आजी चालेल खूप छान आयडिया आहे ही ",..... समर


" तस आपण ठरवू पुढे काय होत ते, पण मला आत्ता सुचलं म्हणून तुला सांगून ठेवल",..... आजी


" आजी तू उगाचच नाही एवढी हुशार",....... समर आता खूप खुश होता एक प्रॉब्लेम solve झाला, आता प्रश्न होता यायचं जायचं बघू आता काय करायचं आहे ते,


वीणा कडे सगळ्यांचे जेवण झालं.....


" आत्या आज आजी बाबांनी आम्हाला खाऊ आणला ते बाहेर गेले होते दोघं",...... अभी


" कुठे गेले होते आई बाबा आज, मला ही द्या तो खाऊ ",...... वीणा


"अगं काही नाही तुझ्या बाबांना थोडे कपडे हवे होते म्हणून बाहेर गेलो होतो",........ आई


"मग आम्हाला सांगायचं ना आणि आत्ताच परवा कपडे घेतले तेव्हा किती रागवत होती आई तू की आम्हाला कशाला आणले कपडे",......... वीणा


आई गडबडली.........


" नाही म्हणजे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे हव ते, sorry ",....... वीणा


" तसं काही नाही आम्ही दोघं असेच बाहेर गेलो होतो फिरायला",........ बाबा


" खूप छान झाल, मग संध्याकाळचं जायचं दोघांनी फिरायला मस्त ",........ वीणा


सगळे छान हसत होते.......


" प्रकाश तू गेला होतास का समरच्या ऑफिसला ",....... वीणा


" नाही समरचा फोन आला होता की सोहा च्या साखरपुडा नंतर भेटू आपण ",........... प्रकाश


" हा बरोबर आहे आता तो धावपळीत आहे ",....... वीणा


" हो सोमवारी करेन मी फोन ",...... प्रकाश


" बाबा आपण बोललो होतो तसच झाल, आज मला अधिकारी भेटले होते सकाळी",........ वीणा


"काय म्हटले ते",...... बाबा


"सुरू आहे का अजून अधिकारी प्रकरण",..... दादा


" हो ना, आधी त्यांची मुलगी निशा आली होती बोलायला नंतर अधिकारी आले भेटायला, काही नाही बोलत होते आमच्याकडून तुम्हाला काही त्रास होणार नाही",....... वीणा


" बर झाल बोलून घेतल या पुढे काही संबंध नाही आपला आणि त्यांच्या",.... बाबा


"कशी आहे हो ताई निशा? तीच च स्थळ सांगून आलं होतं ना समर ला",...... वहिनी


"चांगली आहे निशा, तिला अजिबात आवडल नाही तिचे वडील माझ्याशी असं वागले ते, तिनेच त्यांना ओरडलं खूप, नाहीतर अधिकारी कसले माघार घेणार होते",....... वीणा


" हो बरोबर बोलतात आहात तुम्ही",...... वहिनी


आवरुन झाल उद्या काय काय काम आहेत त्याच्या वीणा विचार करत होती, परवा सोहाचा साखरपुडा तिकडे वेळ जाईल,


सकाळी लवकर आवरून वीणा ऑफिसला आली


" वीणा मी खरच येवु का सोहाच्या साखरपुड्याला, माझ कोणी ओळखीच नाही ग तिकडे, समर बोलतो आहे सकाळ पासून ये ",..... प्रिति


" हो मग काय तुला यावच लागेल, मी आहे समर आहे, आई बाबा दादा वहिनी सगळे आहेत की ओळखीचे आणि तिकडे होईल ओळख बाकीच्यांशी",........ वीणा


" ठीक आहे, तू साडी नेसणार आहेस का",..... प्रिति


"हो सकाळी ड्रेस संध्याकाळी साडी, इकडे ये हा बघ माझ्या साडी चा फोटो",...... वीणा


" मस्त आहे ग, महाग वाटते आहे",...... प्रिति


" हो समरने घेतली मला फर्स्ट साडी",.... वीणा


"मजा आहे",..... प्रिति


" काल झाल का सचिनशी बोलण? काय ठरवल तुम्ही"?,......... वीणा


" सचिन म्हणतोय लग्न लवकर करू बाकी प्रोग्राम नको",...... प्रिति


" ओ हो घाई झाली की का सचिनला",........ वीणा


"अग उगीच कश्याला खर्च, त्या पेक्षा तो पैसा भविष्यासाठी सेव करू शकतो आपण",..... प्रिति


"खूप छान विचार आहेत ह",...... वीणा


वीणा विचार करत होती आपण असच काही तरी करायला हव, नको उगीच खर्च, पण समर ला सांगणार कस


वाहिनीचा फोन आला,......." ताई आज एक दोन तास लवकर याल का घरी, मेहंदी आर्टिस्ट येणार आहे, आता समर च्या आई त्यांचा फोन आला होता",.


"काय चाललय वहिनी? अग कस जमेल मला",.... वीणा


आईने वहिनी कडुन फोन घेतला....


"वीणा अग परांजपे मेहंदी आर्टिस्ट पाठवणार आहेत संध्याकाळी आता फोन येवून गेला, तू लवकर ये, मेहंदी आर्टिस्ट ला संध्याकाळी 6 पर्यंत वेळ आहे ",..... आई


" काय हे बघते मी लवकर येतं आला तर ",.... वीणा


" प्रीतीला घेवून ये ग",..... आई


" तिला कस जमेल, बघते सरांना विचारून,
कोणी ठरवला हे सगळ",..... वीणा


"तुझ्या सासुबाईंनी, नको सांगू का त्यांना",..... आई


" आई थांब, नको करू फोन मी येईन लवकर",.....वीणा


आई खुश होती.....


"प्रीती आई चा फोन होता आपल्याला 5 वाजेपर्यंत घरी बोलावलं आहे",...... वीणा


"का पण? मी पण का"?,....... प्रीती


" हो मेहंदी वाली येणार आहे ",..... वीणा


"साखरपुडा सोहाचा आहे ना मग आपण काय मेहंदी लावायची आणि मी घरी कशी जाणार तिथून एवढी मेहंदी लावून",...... प्रीती


"तुला यावच लागेल, आपण विचारू सरांना ",..... वीणा


लंच ब्रेक नंतर वीणा सरांच्या केबिन मध्ये गेली,......
" सर आज मला आणि प्रीती ला एक तास आधी जाता येईल का घरी ",...


" काय विशेष शॉपिंग का",..... सर


" घरी काम आहे, समर च्या घरी प्रोग्राम आहे ना,
त्याच्या बहिणीचा साखरपुडा आहे, तर थोड काम आहे",.... वीणा


" अरे वाह, हो जा, काही मीटिंग्स वगैरे आहे का बघून घे एकदा वीणा ",..... सर


"हो सर प्रीति ही येईन माझ्या सोबत",..... वीणा


"ठीक आहे काही काम असेल तर प्रशांत ला सांगून जा",..... सर


येस सर Thank you....


वीणा ने वहिनी ला फोन करून सांगितलं,......" आम्ही येतोय 5 वाजे पर्यंत ",..


समर चा फोन आला तेवढ्यात,..... " संध्याकाळी मी येतो तुला घ्यायला",....


" नाही मी आणि प्रीती लवकर घरी जाणार आहोत",.... वीणा


" का, काय झाल",..... समर


" काही नाही घरी मेहंदी आर्टिस्ट येणार आहेत तर मेहंदी लावायला लवकर जाणार आहोत",..... वीणा


"बापरे तुमच्या लोकांचा मोठा कार्यक्रम दिसतो आहे, पण साखरपुड्याचा सोहाचा आहे ना, तू का एवढी मेहंदी काढते आहे, विचार काय आहे",...... समर


"मी पण तेच विचारलं होतं आईला की मी कशाला एवढी मेहंदी काढायची, तर तुझ्या मम्मीने पाठवली आहे मेहंदी आर्टिस्ट, बहुतेक सगळेच मेहंदी काढणार आहेत",....... वीणा


" मला तर तुझे काही विचार खरे वाटत नाही वीणा, काय चाललंय तुझं",...... समर


" समर तू कशाला मला चिडवतो आहेस ",..... वीणा


" बरोबर आहे वीणा, तु विचार केला आहे का मग आपल्या लग्नाबद्दल, की आपण दोघं मिळून ठरवायचं पुढे काय करायच ते",...... समर


"मी नाही विचार केला ठेव तू फोन मला काम आहेत",...... वीणा लाजत होती


" फोन ठेव वगैरे नाही, कधी करायचं आपल लग्न",..... समर


वीणा छान हसत होती,....." आधी सोहाच लग्न होऊन जाऊ दे मग बघू आपण",


" हे मला असं चालणार नाही मला फिक्स तारीख सांगा",....... समर


" अरे ते काय माझ्या हातात आहे का",..... वीणा


" मग आपण दोघं मिळून ठरवु आता लवकर ",...... समर


"काय चाललय समर आज",....... वीणा हसत होती


"ठीक आहे, आपण बोलणार आहोत या विषयावर उद्या, मग एन्जॉय करा तुम्ही मेहंदी प्रोग्राम, मला पाठव फोटो तुझे",....... समर


" हो नक्की समर",..... वीणा


पाच वाजले, वीणा आणि प्रीती घरी पोहोचल्या, घरी मेहेंदी आर्टिस्ट ऑलरेडी आल्या होत्या


" कोणाकोणाच्या हातावर मेंदी काढायची आहे",.....


"तुम्ही किती लोकांच्या हातावर काढणार, किती हातच सांगितलय",....... आई


" तसं काही नाही, तुम्ही किती ही सांगा",.....


आईने सगळ्यांचे नाव दिले, वहिनी चहा करत होती,


" चहा नाश्ता करून घ्या मुलींनो, मग बसा मेहंदी काढायला",..... आई


" वीणा अगदी लग्न खर घरच वाटत आहे ग तुमच",...... प्रीती


" होना वीणा च्या लग्नात किती धावपळ होणार आहे आपली काय माहिती ",..... आई


तिकडे परांजपे कडे पण धावपळ उडाली होती, मेहंदी आर्टिस्ट आलेल्या होत्या, मम्मी निघाली होती ऑफिसहुन, सोहा वरती गेली होती आवरायला, आजीने मदतनीस काकूंना चहा पाण्याची व्यवस्था करायला सांगितली, आजी खूप खुश होती,


आजीने वीणाच्या आईला फोन लावला,...... "आल्या का तिकडे मेंदी आर्टिस्ट",...


" हो आल्या आहेत",..... आई


"वीणा आली का ऑफिसहुन",..... आजी


" हो वापस आली आहे, आवरते आहे ",...... आई


"काही समजलं नाही ना मुलांना आपल्या प्लॅन बद्दल",...... आजी


" नाही नाही अजून तरी काही समजलं नाही ",...... आई


मॅडम ऑफिसहुन आल्या, फ्रेश होवुन आल्या सोहा आली खाली तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणीही होत्या सोबत शनाया ही होती त्या सोबत


"या ग मुलींनो मेहंदी लावून घ्या ग, हाय शनाया",..... आजी


Hi आजी....


" आजी आम्ही कशाला लावायचे मेहंदी सोहा लावेल ",......

"काढायची पद्धत असते मेहंदी थोडी थोडी लावा",......आजी


दोन-चार मैत्रिणी व्हिडीओ शूट करत होत्या...


" थांबा ग मम्मी ला येऊ द्या खाली मग मेहंदी सुरू करू",..... सोहा


मॅडम आल्या खाली सगळ्या मुली डिझाईन बघत होते कुठल्या काढायची ते, सोहा च्या हातावर मेंदी काढायला सुरुवात झाली, आई आणि आजी कौतुकाने बघत होते तिच्याकडे

" मला माहिती आहे तुला मनातलं काय वाटत असेल, मुली खूप लवकर मोठ्या होतात नाही ",..... आजी


" हो ना पण तिच्या तिला मनासारखं सासर मिळालं यापेक्षा चांगली गोष्ट नाही डोळ्यासमोर राहील मुलगी",.... मम्मी

आजी खूप खुश द्या होत्या...


"तिकडे विणा कडे सुरू झाला का कार्यक्रम ",....... मम्मी


" हो मी आत्ताच फोन केला होता वीणा च्या आईला, वीणा आली आहे ऑफिस हुन",.... आजी


वीणा च्या घरी......
"वीणा कोण आहे चला मेहेंदी लावायला",....

" आधी लहान मुलांच्या हातावर काढा, आरू चल काढ मेहेंदी",.... वीणा


आरु च्या हातावर मेहंदी काढून झाली


"वीणा चल आता तुझा नंबर दोन तीन आर्टिस्ट आहे पटापट नंबर लावा ग, चल ग प्रीती, सविता मेहंदी काढून घे ",..... आई


" आई पण मी दोन्ही हाताला मेहंदी काढली तर संध्याकाळचा स्वयंपाकाच काय करायचं ",..... सविता वहिनी


"राहू देते स्वयंपाकाचं दादाला सांगू स्वयंपाकाचं, नाही तर बाहेरून जेवण मागवून घ्या ",..... आई


वीणा प्रीती वहिनी सगळ्या आनंदात होत्या वीणा ची बरीचशी शी मेहंदी काढून होत आली होती, तिने एका मेहंदी आर्टिस्ट ला रिक्वेस्ट केली की माझे फोटो काढ, तिने वीणाचे खूप छान फोटो काढले, डिझाईनचे फोटो काढले वीणाने एका हाताने ते सगळे फोटो समरला पाठवले, समर चा फोन आला.....


"अरे वा सुरू झाल वाटतं मेहंदी काढण्याचं काम",... समर


" हो कशी वाटते आहे माझी मेहंदी डिजाइन",..... वीणा


"मला तर मेहंदी पेक्षा जिने मेहंदी लावली आहे तीच खूप आवडते",....... समर


"पुरे ह समर सारखं काय रे, चल मी ठेवते फोन, इथे सगळ्यांसमोर बोलता येत नाही ",...... वीणा


" अग ऐक ना वीणा, मला आता दोन ओळी सुचत आहेत तुझ्याबद्दल ",...... समर


"नको आता नको, आता मी बिझी आहे, दुसऱ्या हातावर मेहंदी काढायची आहे",..... वीणा


"अरे असं काय बोल ना जरा वेळ",..... समर


"नाही चल बाय",..... वीणा


" याला काय अर्थ आहे, बोल की जरा वेळ",..... समर


वीणा ने फोन ठेवून दिला, खूप सुरेख मेहंदी वीणाच्या हातावर काढून झाली, वहिनी प्रीती, आई सगळ्यांनी मेहंदी लावली


प्रीतीने तिच्या भावाला फोन करून घ्यायला बोलवलं


"अग प्रीती जायची घाई कशाला करतेस जेवून जा आता",..... आई


" नाही काकू जाते मी खूप उशीर झाला आता",...... प्रिति


" प्रीती तू उद्या नऊ वाजेपर्यंत इकडे ये इथूनच आपण समर कडे सगळे सोबत जाऊ, संध्याकाळी घालण्यासाठी छान साडी सगळं सेट घेऊन ये",...... वीणा


"हो चालेल तसं मी तुला करते सकाळी फोन, येते मी",....... प्रिति


प्रीती घरी गेली सगळ्यांची मेंदी काढून झाली


"किती झाला ग पेमेंट तुमचा",...... आई


" सगळ्यांचा पेमेंट झाला आहे काकू, परांजपेंनी आम्हाला बुक केलं आहे, एंगेजमेंट मेकअप साठी पण बुक केलं आहे",....


आईने आई कडुन थोडे पैसे त्यांना दिले.....


"नाही काकू आम्ही नाही येऊ शकत हे",....


" अगं सहज माझ्याकडून घ्या",...... आई,


त्या मेहंदी आर्टिस्ट गेल्या


आई वहिनी वीणा आरु सगळ्या हातांना मेंदी लावून बसून होत्या


" आता काय करायचं आहे आई ",..... वहिनी


"आता वाट बघू दादा प्रकाश तुझे बाबा जे आधी येतील त्यांना कामाला लावू",......... सगळ्या हसत होत्या


दादा आलास तेवढ्यात ऑफिसहुन,...... "हे काय सगळ्यांनी हाताला मेहंदी लावली का? सविता चहा ठेव",


"नाही रे दादा आज वहिनी चहा करणार नाही, तूच आमचा सगळ्यांचा चहा ठेव आणि नंतर रात्री चा स्वयंपाकही कर",....... वीणा


वहिनी छान हसत होती..


"अरे याला काय अर्थ आहे, कोणकोण घेणार आहे चहा",........ दादा चहा ठेवायला आत मध्ये गेला


सोहाची मेहंदी काढून झाली मम्मी आजी सोहाच्या मैत्रिणी सगळ्यांनी छान मेहंदी काढली, मेहंदी आर्टिस्ट वापस गेली, खूप प्रसन्न वातावरण होत, सगळ्या मुली छान गप्पा मारत बसल्या होत्या, त्यांच्यातच आजी रमल्या होत्या, मम्मी मस्त मजा बघत बसली होती,


समर आलास तेवढ्यात घरी, घरात गर्दी बघून तो गडबडून गेला,.... "सगळ्यांनीच मेंदी लावली आहे का आज? चालू द्या चालू द्या तुमचा कार्यक्रम, मी वरती बसतो",....... समर वरती रूम मध्ये निघून गेला


सोहा च्या मैत्रिणी पण वापस गेल्या पप्पा ऑफिस हुन आले, सगळे हॉलमध्ये जमले होते, समर मुद्दामून सोहा ची मेहंदी ला हात लावायचा प्रयत्न करत होता,


सोहा चीडली,..... "मम्मी सांग ना याला काही",..


" अरे आज तरी भांडू नका",.... आजी


"याला सांग आधी आजी, लांब हो समर एकदम, माझी मेहंदी खराब होईल",..... सोहा


"अरे आज तुम्ही लोक कसे जेवणार आहात, दोघी हातांना मेहंदी लावली दिसते आहे",..... पप्पा


" बऱ्यापैकी सुकली आहे आमची मेहंदी, आम्ही चमच्याने जेऊ शकतो",..... मम्मी


" वीणा ने पण मेहंदी काढली आहे ना ग मम्मी आज",..... सोहा

हो....

" म्हणूनच हा समर आपल्याला त्रास देतो आहे, नाही तर बरं असतं तो वीणा शी फोनवर बोलत असतो, आपल्या डोक्याला ताण नसतो",....... सोहा


" मी बोलत असतो का रोज फोन वर? , तुझ्या इतकं फोन आपल्या घरात कोणीच वापरत नाही सोहा",..... समर


सगळे हसत होते.......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now