प्रीत तुझी माझी... ❤️भाग 38

दादा मुलांचा अभ्यास घेत होता ,..... "बरीच तयारी सुरु आहे तुमच्या सगळ्यांची, साखरपुडा सोहाचा आहे, एवढा खर्च काय करत आहात तुम्ही सगळे, एक तर सगळ्यांना नवीन कपडे घ्यायची गरजच नव्हती",.....



ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

आई बाबा खरेदी करून घरी आले, खूप खुश होते ते, घरी सविता वहिनी मुलांना जेवायला वाढून देत होती,


"काय करायचं हो आता? हातातल्या पिशव्या बघून मुलं विचारतील काय आणलं आहे ते",..... आई


"ही मुलांची खाऊ ची पिशवी तू तुझ्या हातात घे आणि मुलं ही पिशवी बघतील तोपर्यंत मी ही सगळी खरेदी कपाटात ठेवतो",.... बाबा


" चालेल असंच करूया",.... आई


"एका दिवसाचा प्रश्न आहे, या आधी कधी अस केल नाही आपण",...... बाबा


" हो ना, त्यामुळे सुचत नाही काय करावे ते ",..... आई


आणि झालं तसंच आजी-आजोबा आल्यावर मुलांना खूप आनंद झाला, हातातली पिशवी बघून काय आणले आहे म्हणून मुले पळत आले....


" आधी जेवून घ्या अभी आणि आरु हा तुमच्या साठी खाऊ आणला आहे, पण जेवण झाल्यानंतर संध्याकाळी हा खाऊ मिळेल, तर हा खाऊ मम्मी जवळ द्या",.......आई


मुलं खुश होते..... तोपर्यंत बाबांनी ती शॉपिंग ची पिशवी कपाटात ठेवली, वहिनीने आई बाबांना जेवायला वाढलं, ती पण जेवायला बसली


" झाली का खरेदी? काय घ्यायला गेले होते आई-बाबा तुम्ही ",....... वहिनी


" आम्ही थोडे कपडे घ्यायला गेलो होतो, पण हवे तसे कपडे मिळाले नाही, मग मुलांना खाऊ घेतला, देवळात जाऊन आलो",....... आई


"अच्छा, मला पण टेलर ला फोन करायचा आहे जेवण झाल्यानंतर लक्षात द्या मला",...... वहिनी


" वीणा ची साडी कशी आहे ग छान आहे ना, काल धावपळीत बघितली पण लक्ष्यात नाही ग आता ",...... आई


" हो आई खूप छान आहे विणा ताईंची साडी, पांढरी गुलाबी एकदम रिच वर्क आहे त्याच्यावर, समरने स्वतः पसंत केली आहे ती साडी, छान लेटेस्ट डिझाईन चा ब्लाऊज शिवायला टाकले आहे ताईंनी",..... वहिनी


आईला समाधान वाटलं,......." आपल्या साड्या मिळतील ना वेळेत",


" हो आज संध्याकाळी देणार आहे ते, नाही तर मी जरा वेळाने जाऊन बघूनच येथे जवळच आहे टेलर ",...... वहिनी


"हो चालेल, तू कोणती साडी नसणार आहेस",..... आई


" काल आणलेली नवीन नेसू का " ,..... वहिनी


"हो नेस, दोन साड्या लागतील, एक जातांना एक प्रोग्रॅम ला, मेकअपच सामान, गजरे मेहेंदी चे कोन वगैरे काय लागत ते मागवून घे ग आज संध्याकाळी",...... आई


"एवढी तयारी करायची आहे का आपल्याला आई",..... वहिनी


"अग हो थोड तरी नटा, एकदम साध नको दिसायला आपण तिकडे ",..... आई


जेवण झालं...


" मी जरा ऑफिसला जाऊन येतो, हाफ डे लागेल आज, येतो संध्याकाळी, काही आणायचं आहे का येतांना ",..... बाबा


" काही आठवत नाहीये सामनाच, आठवलं तर जाऊ आपण नंतर",..... आई


बाबा ऑफिसला निघून गेले, जातांना त्यांच्या कपाटाची चावी आईकडे दिली..


जरा वेळाने प्रिती प्रशांत वीणा कंपनीत प्रेझेन्टेशन साठी गेले, प्रेझेन्टेशन खूप छान झालं, ऑर्डर फिक्स झाली, सरही आले थोड्यावेळात, सगळ्यांच्या कामावर सर खूप खुश होते, सगळे सरांच्या गाडीने ऑफिसला परत आले,


अर्धा तास होता अजून ऑफिस सुटायला, वीणाने समर ला मेसेज केला,..... "अर्ध्या तासात निघणार आहे मी, तुला यायचं आहे का मला भेटायला",


" हो चालेल कुठे येऊ मी",..... समर


" आमच्या ऑफिस जवळचे ये आम्ही ऑफिसला परत आलो आहोत प्रेझेंटेशन देऊन",..... वीणा


ऑफिस सुटलं पाच मिनिटात समर आलाच, प्रीती आणि वीणा समोरून येतच होत्या


"hi वीणा प्रीती, चला आपण कॉफी घेऊया ",..... समर


"नको मी घरी निघते, मला पण सचिन ला फोन करायचा आहे, नंतर कधी तरी, आज समर तू बघ जरा, एक तर तुमच पहिल्यांदा भांडण झालय ",.... प्रिति हसत होती


"हो, thank you प्रीती",.... समर


वीणा दोघांकडे बघत होती..


" आपण एकदा भेटूया प्रीती चौघेजण ",.... वीणा


" हो चालेल या विकेंडला नाही जमणार कारण हा सोहा चा साखरपुडा आहे, प्रिती तू ये साखरपुड्याला, सॉरी अस रस्त्यावर आमंत्रण देतो आहे", .......समर


" It\"s ok काही हरकत नाही, मी बघते मला जमल तर नक्की येईन ",.... प्रिति


" कस जमत वगैरे काही नाही, यायच म्हणजे यायच",...... समर


" हो ग प्रीती तू ये ना मला सोबत होईल",....... वीणा


"ठीक आहे मी येईन ",...... प्रिति


" पुढच्या विकेंडला नक्की भेटायचं ना",.... समर


" चालेल ना तस मी ठरवते, सचिन ला हि सांगते ",.... प्रिति


" तुझं ठरलं काही लग्नाची तारीख",..... समर


" अजून काही ठरली नाही पुढच्या सहा महिन्याने काढू मुहूर्त" ,...... प्रिति


अरे वा......


" ठीक आहे मी निघते ",...... प्रिति


"रविवारच लक्ष्यात ठेव, तू आली नाहीस तर मी स्वतः येईन घ्यायला तुला, वीणा सोबत सकाळ पासून ये",..... समर


"ठीक आहे येईन मी ",..... प्रिति


प्रीती निघून गेली समर आणि वीणा गाडीत येऊन बसले समर ने वीणा साठी खूप मोठं चॉकलेट आणि फुलं आणले होते, ते त्याने वीणा ला दिले


" हे कशाला आणि आता",...... वीणा


" तुला सॉरी बोलायला आणले आहेत हे फुलं",..... समर


" सॉरी तर मी तुला बोलायला पाहिजे",.... वीणा


" जाऊदे आता तो विषय, आपण भांडायला नको या पुढे" ,...... समर


"माझ चुकलाच मी तुला सांगायला हव होत सगळ",..... वीणा


"कुठे जाऊया कॉफी घेऊया का ",...... समर


"हो चालेल",..... दोघं कॉफीशॉपमध्ये येऊन बसले


"काय म्हटले अधिकारी",...... समर


" आधी फक्त निशा आली बोलायला, आमचं बोलणं झाल्यानंतर अधिकारी सर आले ते बोलले कि आमच्याकडुन यापुढे तुला काहीच त्रास होणार नाही, निशा बोलली की तुला जर पुढे काही त्रास झाला तर किंवा काही वाटल तर माझा पर्सनल नंबर आहे तुझ्याकडे, यावर तु मला कॉन्टॅक्ट कर, अगदी पाचच मिनिटं बोललो आम्ही, ते बोलत होते चहा कॉफी घ्यायची का? पण मी नाही सांगितलं आणि कारण ऑफिसला उशीर होत होता" ,...... वीणा


बराच वेळ समर विणा बोलत बसले, नंतर समरने वीणाला मेन रोड वर सोडल, समर घराकडे निघाला,


वीणा ने वहिनीला फोन केला,......." जायच आहे का टेलर कडे? मि आली आहे मेन रोडवर ",.


"रेडी आहेत ब्लाऊज ताई, मी येते तिकडे, आपण येऊ अर्ध्या तासात घरी ",....... वहिनी


वहिनी मेन रोड वर आली, वीणा आणि वहिनीने टेलरच काम पूर्ण केलं....


"काही घ्यायचा आहे का वहिनी अजून",....... वीणा


" हो आईंनी सांगितलं मेकअप च सगळं सामान घ्यायला सांगितले आणि गजरे पण घ्यायला सांगितले आहे ",........ वहिनी


"एवढं कशाला? काय गरज आहे इतक्या तयारीची, साखरपुडा सोहाचा आहे आपण का एवढं नटायचं",...... वीणा


"ते मला माहिती नाही आईंनी सांगितले आहे सामान आणायला, परत आपण आणलं नाही तर त्या ओरडतील",..... वहिनी


" चल काय घ्यायचा आहे ते घेवू या, पण माझ्याकडे सगळं आहे लिपस्टिक काजळ आणि पावडर हेच तर लागतं ना, आरु साठी घे छान सेट hair accessories ",..... वीणा


"हो मेहंदीचे कोन ही सांगितले आहेत त्यांनी",....... वहिनी


" अरे बापरे आता मेहंदी पण आपण लावायची का",...... वीणा


" हो आई बोलल्या कि जरा तयार व्हा, नाहीतर तिकडे सगळे छान दिसतील आणि आपण खूपच साधे दिसू",..... वहिनी


" आई पण नाही ऐकणार नाही , चल",...... वीणा आणि वहिनी दुकानात गेल्या सामान घेतलं घरी आल्या आईजवळ सगळं सामान दिलं


" काय ग एवढंच आणलं का सामान",...... आई


"अजून काय आणायचं होतं आई ",...... वीणा


" यात तयारीच काहीच दिसत नाहीये",...... आई


"म्हणजे काय आणायचं होतं, आरु साठी आणलय बेल्ट टिकल्या",..... वीणा


"लिपस्टिक वगैरे आणायच्या जरा, तुमच्या दोघींसाठी काही नाही आणला का ",...... आई


"आम्ही काय लहान आहोत का? आणि आहे ना आमच्याकडे लिपस्टिक टिकल्या, काय गरज आहे नवीन सामानाची",...... वीणा


"गजर्याची ऑर्डर दिली का ग ",...... आई


" हो सांगितला आहे, गजरे रविवारी सकाळीच घ्यावी लागतील",..... वहिनी


दादा मुलांचा अभ्यास घेत होता ,.....
"बरीच तयारी सुरु आहे तुमच्या सगळ्यांची, साखरपुडा सोहाचा आहे, एवढा खर्च काय करत आहात तुम्ही सगळे, एक तर सगळ्यांना नवीन कपडे घ्यायची गरजच नव्हती",.....


"असू दे रे दादा काही हरकत नाही, कपडे लागतातच",..... वीणा


"मला तर परांजपेंनी कडे जायचं टेन्शन आलेला आहे, श्रीमंत लोकांकडे कसं उठता-बसता काहीही माहिती नाही आपल्याला ",..... वहिनी


" अगं वहिनी तू टेन्शन घेऊ नको, ते सगळे खूप साधे लोक आहेत, मी हि पहिल्यांदा समर कडे गेली होती ना तर मला असं टेन्शन आलं होतं, पण ते सगळे आपल्या सारखेच आहेत फक्त घर मोठ आहे ",........ वीणा


" आपण सगळ्यांनी सकाळपासून जायचं आहे का, ",...... दादा


" हो दादा सकाळपासूनच बोलवलं आहे आणि जर नाही आलास तू तर समर स्वतः घ्यायला येईल, प्रीती लाही सकाळपासून बोलवलं आहे ",....... वीणा


" प्रीती ला हि आहे का आमंत्रण, बापरे, ",...... दादा


आई खूप उत्सुक होती, आनंदी दिसत होती,....." उद्या लवकर ये ऑफिसहून वीणा मेहंदी लावू उद्या सगळ्यांनी हाताला ",


" हो बरं झाला आठवलं, आई आपल्याला मेहंदी लावायची काय गरज आहे? साखरपुडा तर आहे, तो ही सोहा चा ",....... वीणा


" लावा ग मेहंदी, छान दिसतात हात" ,...... आई


"एक तर मला चांगली मेहंदी काढता येत नाही",..... वीणा


" मग कुणी मेहंदी आर्टिस्ट असेल तर तिला बोलवा",.... आई


" एवढा खर्च करायची खरच काहीही गरज नाही, वहिनी छान काढते मेंहेंदी, वहिनी तु मला काढून दे",..... वीणा


" हो चालेल",..... वहिनी


बाबा आलेच तेवढ्यात,..... " काय चाललं आहे, धावपळ सुरू आहे ह तुमची ",.....


" मेहंदी वगैरे लावायची तयारी सुरू आहे ",..... आई


" आजच लावणार का उद्या लावायची मेहंदी",....... बाबा हि खूप खुश होते, ते आवरायला आत मध्ये गेले


समर घरी आला, घरी खूप उत्साहाचं वातावरण होतं, समर त्याच्याच विचारात होता, काय करता येईल, वीणा एवढी टेन्शन मध्ये राहते आहे, तिला रोजच्या खर्चाचा सुद्धा खूप टेन्शन आहे, लग्नाचा खर्च कसा होईल या साठी ती पैसे साठवते आणि आपण मस्त मजेत आहोत काहीतरी करायलाच पाहिजे


आजी आली तेवढ्यात बाहेर आजी खूप खुश होती, अतिशय प्रेमाने ती समोर कडे बघत होती


" काय झालं आजी खूपच खुश आहेस",...... समर


" छान वातावरण झाला आहे नाही घरातलं, म्हणून मी आनंदी आहे, मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे",..... आजी


काय.....


आजीने समर ला बांगड्या दाखवल्या...


"अरे व्वा आजी मजा आहे तुझी आजी , नवीन आहेत का",....... समर


"हो आजच आणल्या तुझ्या मम्मी पप्पांनी, मला अश्याच हव्या होत्या, त्यांना कस समजल असेल ",....... आजी


" समजत आजी, आपल्या माणसांना काय हव हे कोणा कोणाला समजत, माझ्या सारखे लोक फार कमी असतात, ज्यांना कळत नाही समोरच्याला काय हवय ते, आजी तू ना उत्साहाचा झरा आहेस स्ट्रेस बस्टर आहेस, किती निरागस आहेस ",..... समर


" काय रे काहीही, पण तू का असा चेहरा करुन बसला आहेस, आणि असा का बोलतो आहेस ",..... आजी


" आजी आज माझं आणि वीणाचं थोडसं भांडण झालं",....... समर


" का काय झालं कशामुळे झाले भांडण ",....... आजी


" अधिकाऱ्यांनी वीणाला धमकी दिली होती ना मागे, तेव्हा मी वीणा ला बोललो होतो तू टॅक्सीने ऑफिसला जात जा, तेव्हा ती हो बोलली, आज समजल ती बसने जात होती ऑफिस ला, आज परत अधिकारी वीणा ला भेटायला गेले होते, बस स्टॉप वर, तर मी वीणा वर चिडलो की तू टॅक्सीने का जात नाहीस ऑफिसला ",...... समर


" काय बोलले अधिकारी आज ही वाईट बोलले का ते वीणा ला पुढे काय झालं",..... आजी


" आजी मला खूप वाईट वाटत आहे, मी उगीच वीणा ला बोललो, तीच्या मैत्रिणीने मला सांगितलं की आमची सगळ्यांची परिस्थिती नाही आहे टॅक्सीने जायची, त्यामुळे विणा टॅक्सीने जात नव्हती व मला खोटे सांगायची कि ती टॅक्सीने आली, आज तिच्या तोंडून निघून गेले की बस स्टॉप वर अधिकारी भेटले होते",....... समर


" तू तिला कार का नाही घेऊन देत",.... आजी


" लग्ना नंतर बघू आधी आजी सगळं, ती खुप स्वाभिमानी आहे, ती अशी घेणार नाही गाडी, काय करू मी मला काही समजत नाही, पैशाची मदत नाही करता येणार वीणा ला आणि तिला आमच्या लग्नाचही टेन्शन आहे ती लग्नासाठी पैसे साठवते आहे",....... समर


आजी पण विचारात होती, ..... "तुला शक्य असेल तर तू वीणा ला घ्यायला सोडायला जात जा ",


" पण रोज जमेल का मला, संध्याकाळी ठीक आहे पण सकाळी जमणार नाही",...... समर


" मला असं वाटत आहे की तू एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, तसं बस ने जायला काही रिस्क असती तर स्वतः वीणा गेली नसती",...... आजी


" हो बरोबर बोलते आहेस आजी तू",...... समर


" प्रेमात सहवासात जास्त टेंशन घ्यायच नाही समर, जे जस होईल, समोर येईल, ते तस स्विकारत पुढे जायच",........ आजी


" हो आजी मी उगीच बोललो आज वीणा ला",..... समर


" तस नाही समर, तुला काळजी वाटली वीणाची, साहजीक आहे, काही काळजी करू नकोस",...... आजी


समर ला आजीशी बोलून बर वाटल...


मम्मी पप्पा आले घरी, सोहा नेहमीप्रमाणे फोन वर बोलत होती..


" नंतर बोलायला काहीतरी बाकी राहू दे सोहा, चल आता जेवायला",....... समर तिला चिडवत होता


" जसं काही तू बोलतच नाही वीणा शी, जेवण झाल्यावर तू करणार आहे फोन तिला, मला माहितीये",.... सोहा


" पप्पा आज अधिकारी आणि निशा अधिकारी वीणा ला भेटले",....... समर


"कुठे, ",.... पप्पा


" तिकडे वीणा च्या ऑफिस बाहेर बस स्टॉप वर भेटले",..... समर


"ती काय भेटायची जागा आहे का ",..... पप्पा


" हो ना, ते नेहमी असेच करतात ",..... समर


" काय म्हणाले",..... पप्पा


"ते म्हटले वीणा ला आमच्याकडून यापुढे तुला काहीही त्रास होणार नाही",...... समर


" हिंमत करून बघा म्हणा परत त्रास द्यायची चांगलाच धडा शिकवू",...... पप्पा


"जास्त नाही बोलले ते पाच एक मिनिटे बोलले",...... समर


ओके...


जेवण झाल आजी आई किचन मध्ये आल्या....


"उद्या केव्हा येणार आहे मेहंदी लावायला",..... आजी


" संध्याकाळी येणार आहे बहुतेक",..... मम्मी


" तिकडे वीणा कडे पाठव एकीला मेहंदी काढायला, पॅकेज घे तीच मेक अप मेहंदीच",..... आजी


"हो घेतल आहे आई मेहंदी काढून देणार, प्रोग्राम च्या दिवशी चा मेक अप आहे त्यात, उद्या वीणा च्या आई ला सांगते फोन करून ",.... मम्मी


हो छान आजी समाधानी वाटत होत्या.....


🎭 Series Post

View all