Aug 18, 2022
कथामालिका

प्रीत तुझी माझी... ❤️भाग 37

Read Later
प्रीत तुझी माझी... ❤️भाग 37


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


परांजपे सर मॅडम निघाले....


" गाडी ज्वेलर्स कडे घ्या, खरेदी करून घेवू आता, खरंतर आपण वीणाच्या आई-वडिलांना ईकडे घेऊन यायला पाहिजे होतं, सोबत करायला हवी होती खरेदी ", ......परांजपे मॅडम


"नको पण, बर झाल आपण त्यांना बोललो नाही की आमच्या सोबत ज्वेलर्स कडे चला, असं नको करायला आपण, कारण त्यांना जे घ्यायचं ते ते घेतील, उगाच त्यांना असं नको वाटायला आपण काहीच घेऊ शकत नाही आणि सगळे परांजपे घेतात, इतर गोष्टींपेक्षा त्यांचा मानपान जपणं खूप महत्त्वाचा आहे आता ",....... सर


" हो बरोबर बोलत आहात तुम्ही, त्यांना जे घ्यायचं ते ते घेतील, नाही तर आपण करणारच आहोत, त्यांना वाईट नको वाटायला, पण काही म्हणा वीणा चे आई वडील खूप चांगले आहेत, छान वाटतं ना या लोकांसोबत",..... मॅडम


" हो बरोबर, एकदम साधे आहेत हे लोक",...... सर


दोघ दुकानात गेले, समर वीणा, आशिष सोहा साठी कपल अंगठी घेतल्या, सोहा वीणा साठी नेकलेस सेट बांगड्या सेट घेतल्या, आशिष समर साठी लॉकेट घेतले,


" तुला काही बघायचा आहे का तुझ्यासाठी",....... सर


"नाही मी लग्नाची वेळ करेल सेट स्वतःसाठी",...... मॅडम


"अग घे आता काहीतरी, तसही लग्न लवकरच करायचे आहेत आपल्याला मुलांचे, रविवारी पुढची तारीख काढून घेवू " ,..... सर


"हो चालेल, आईंन साठी घेवू या का मीना काम भरलेल्या बांगड्या, त्यांना खूप हौस आहे, त्या दिवशी आशिष च्या आजी च्या हातात तश्या बांगड्या आई खूप बघत होत्या",.... मॅडम


"ठीक आहे घे, पण ती बोललेलेच अग मला कशाला आणल आता काही, कुठे घालते मी दागिने",..... सर


सर मॅडम दोघ हसत होते, एकदम उत्साहाचा वातावरण निर्माण झाल होत, खरेदी झाली


" आता आपण घरी जाऊ आणि दागिने आजी कडे देवू खूप मोठ काम झाल आज, एवढी खरेदी घेवून फिरायला नको ",....... मॅडम


मम्मी पप्पा घरी आले..


" काय म्हटले वीणा चे आई बाबा, भेटले का ते आवडली का त्यांना आयडिया ",..... आजी


" हो भेटले त्यांना खूप आनंद झाला, तेही आता साखरपुड्याच्या तयारीला लागले आहेत, दोघं खूप खुश होते ",....... मॅडम


" आम्ही अजून वीणाच्या घरच्यांना भेटलेलो नाही आहोत, साखरपुड्याच्या दिवशी होईल भेट ",....... आजी


"हो ना त्यांना आपल्या घरी भेटायला बोलवायचं राहूनच गेल, फक्त पप्पा जाऊन भेटून आले आहेत त्यांना
आज भेटली वीणा च्या आईला खूप छान आहेत त्या, जशी वीणा आहेना तसे तिचे वडील आहेत अतिशय बोलके आणि खूप आपलेपणा वाटतो त्यांच्यासोबत",...... मॅडम


" अरे वा चांगले लोक भेटले आहेत आपल्याला, त्यांना सांगितलं ना सकाळपासूनच यायला ",..... आजी


" हो त्यांना सांगितला आहे सकाळपासून या ",.... मॅडम


"हे दागिने बघा जरा, या कपल अंगठ्या दोघी जोडीं साठी, सोहाचा नेकलेस, वीणा चा नेकलेस, लॉकेट दोघ मुलांना , आई यात तुमच्या साठी बांगड्या आहेत ",..... मॅडम


" मला कशाला आणल्या ग बांगड्या मी घालते का आता दागिने",...... आजी


सर मॅडम आजोबा हसत होते, आजी कौतुकाने बांगड्या घालून बघत होत्या


"आवडल्या का आई बांगड्या ",..... मॅडम


" हो किती छान आहेत, अश्या आशिष च्या आजी कडे होत्या",...... आजी


" आम्ही निघतो आता ऑफिस ला जायला, कपाटात ठेवा दागिने आई, की मी ठेवून देवू ",...... मॅडम


" तु तुझ्या हाताने ठेव, चावी मला देऊन दे" ,..... आजी


मम्मीने सगळी खरेदी कपाटात ठेवली आणि लॉक लावून आजी कडे चावी दिली


"अजून काय आणायचं राहिला आहे का",.... मॅडम


"नाही बाकी सगळं कॉन्ट्रॅक्ट दिल आहे ना, काही आठवलं तर मी करते फोन",.... आजी
.......

विणा ऑफिसला येतच होती...... रस्त्यात तिला अधिकाऱ्यांची गाडी दिसली, omg आता हे इथे काय करता आहेत, बहुतेक हे अधिकारी असतील, काय करावं? बाबा बोलले तसं व्यवस्थित बोलून घेऊ का त्यांच्याशी? , ती पुढे बस स्टॉप वरून पुढे चालत गेली, गाडीतून ईशा उतरली, तेवढ्यात वीणाचा फोन वाजला, कालच नंबर होता तो....


"मी निशा बोलते आहे वीणा, आम्ही इथे बस स्टॉप जवळ आहोत पाच मिनिटं बोलता येईल का तुला, बळजबरी नाही, तू हो बोलशील तर बोलू आपण",...... निशा


"हो चालेल निशा, काही हरकत नाही " ,........ वीणा थांबली, निशा समोरून आली


समर बोलत होता तशी खरच खूपच छान आहे निशा, एकदम सुंदर आणि कॉन्फिडन्ट, वाटतय तिनेच अधिकारी सरांना नीट केल असेल....


" हाय मी निशा अधिकारी ",...... निशा


हाय...... वीणा बोलली


" तुला वेळ असेल तर कॉफी घेवू या का आपण, अस इथे कस बोलणार",...... निशा


"पुन्हा केव्हा तरी, thanks, मला उशीर होतोय ऑफिस सुरू व्हायला पाच मिनट बाकी आहेत",..... वीणा


"Ok no problem, तुझ्या शी थोडसं बोलायच होत, आय एम सॉरी वीणा, माझे डॅडींन मुळे तुला उगाच खूप त्रास सहन करावा लागला, यापुढे आमच्याकडून तुला काहीही त्रास होणार नाही आणि तसं काही वाटलं तर तू मला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकते, आत्ता ज्या नंबर वरून मी फोन करते तो नंबर माझाच आहे तो सेव करून ठेवा",...... निशा


" थँक यु सो मच निशा मला तुम्हाला भेटून खूप चांगल वाटल आणि माझ्या मनात तुमच्या विषयी काहीही राग नाहीये",....... वीणा


" समर आणि तुला पुढच्या आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा",...... निशा


" थँक्यू मी निघू का, मला उशीर होतोय ऑफिसला जायला",....... वीणा


निशा वीणा कडे बघत होती, अतिशय सुंदर सालस लांब मोठे केस, बसने ऑफिसला आलेली मुलगी, आता परांजपेंची सून होणार आहे, उद्या त्यांच अख्ख ऑफिस हॅण्डल करेल ही, किती लकी आहे ही, पण तेवढीच कॉन्फिडन्ट, खरच खूपच साधी आणि छान वाटते आहे वीणा, कामात खूप हुशार असेल ही, गुणी असेल खूप, समर ची चॉईस अशी साधी नसेलच,


त्या दोघी बोलत असतानाच अधिकारी साहेब गाडीतून उतरले या दोघींना जवळ आले,.... "मला माहिती आहे वीणा की तुला माझ्याशी बोलायचे अजिबात इच्छा नाही, पण जो काही प्रकार झाला त्याबद्दल मी खूप दिलगिरी व्यक्त करतो, आणि तुझी माफी मागतो, मला असं वाटतं की तू यापुढे आमच्याबद्दल मनात किंतु ठेवू नकोस",


"नाही सर काही प्रॉब्लेम नाहीये, माफी मागू नका तुम्ही माझी, चला मी येते",.... वीणा निघून गेली तिथं तिथून


वीणा ऑफिसला आली, प्रिती प्रशांत आधीच आलेले होते,


" प्रीती ऐक ना ",........ वीणा


"बोला मॅडम, तुझा ऐक ना ऐकल नाही तर ऑफिस कामाला सुरुवात होणार नाही माझी ",..... प्रिति मस्त लाइट मूड मध्ये होती


" आता येताना मला अधिकारी आणि निशा अधिकारी भेटले होते, पाच मिनिट बोलले ते दोघं माझ्याशी",.... वीणा


"आता कशाला आले होते ते भेटायला",..... प्रिति


"आता माझा आणि समरचं लग्न ठरलं आहे, त्यांना परांजपे यांच्या शी संबंध खराब करायचे नसतील, म्हणून हे माफी मागायचं नाटक असेल ",...... वीणा


" हो मलाही तेच वाटत आहे",....... प्रिति


सर आले, ऑफिसच्या कामाला सुरुवात झाली, नवीन ऑर्डर आली होती, त्याचं खूप काम होतं आज ऑफिसमध्ये, त्यामुळे सगळे बिझी होते,


समरचा मेसेज आलास तेवढ्यात,......" good morning वीणा, आलीस का ऑफिस ला ",


" हो आता च आली मी, आज मिस्टर अधिकारी आणि निशा अधिकारी भेटले होते",...... वीणा


लगेच समर ने तिला फोन केला,... "बोल ग वीणा, आलीस का ऑफिसला? कुठे भेटले होते तुला अधिकारी?


" मी ऑफिसला आली ना, बसमधून उतरल्यानंतर बस स्टॉप समोर ते उभे होते" ,.... वीणा


"पण तू तर ऑफिसला टॅक्सीने येते ना",.... समर


वीणा ला कळून चुकले तिची काय चूक झाली आहे बोलतांना,......" नाही समर मी बसने आली आज",


" तू कशाला एवढी रिस्क घेते तुला मी सांगितलं होतं ना की टॅक्सीने जा म्हणजे घरापासून एकदा टॅक्सी पकडली की ती ऑफिसच्या गेटपर्यंत असते त्यामुळे कोणाशी भेटायचा प्रश्नच येत नाही",....... समर ला खूप राग आला होता त्याने रागाने फोन ठेवून दिला


वीणा डोकं धरून खाली बसली...


" काय ग काय झालं वीणा? कोणाचा फोन होता? ",..... प्रीती


" समरचा फोन होता आणि मी त्याला घाईघाईत सांगून दिलं की अधिकारी भेटले होते बस स्टॉप समोर तर त्याला आता कळलं की मी टॅक्सीने येत नाही आणि बसने येते आहे",...... वीणा


"मग काही बोलला का तो",...... प्रिति


" हो चिडला तो माझ्यावर, बोलला की तू कशाला एवढी रिस्क घेते आणि त्याने रागाने फोन ठेवून दिला काय करू आता मी",..... वीणा


" त्याला परत फोन कर आणि बोलून त्याच्याशी",.....प्रिति


वीणा ने परत समोर ला फोन लावला समजने फोन उचलला,...... " हे बघ वीणा तु मला अजिबात परत फोन करू नको मला तुझ्याशी काही बोलायचं नाही ",...


" एक मिनिट समर ऐकून तर घे मला माहिती आहे की तू माझ्या चांगल्यासाठीच मला सांगत होता कि टॅक्सीने ये मी तुझा ऐकायला हवा होतो आय एम सॉरी प्लीज",..... वीणा


" ठीक आहे मला आता खूप काम आहे मी ठेवतो फोन",...... समर


" अरे काय अजून राग गेला नाही का",...... वीणा


तसा समरने मी फोन ठेवून दिला


" काय गं, काय झालं? काय म्हटला समर ",..... प्रिति


" अगं काही नाही तो चिडलेलाच आहे अजून माझ्या वर, मी सॉरी बोलली, त्याला तरी त्याने सांगितले की तो बिझी आणि फोन ठेवून दिला, नाहीतर मी फोन ठेवत असली तर किती बोलणं लांबवतो तो",...... वीणा काळजीत होती


" आता काय ग, भांडू नका तुम्ही, तू एकदा समर ला खरी परिस्थिती सांगून दे ना, त्याला काय माहिती असणार आपला घर खर्च वगैरे ",..... प्रिति


" बघू, सांगेन एखाद्या वेळी, आता काय करायचं ते बघते , जाऊ दे, मला आता काम करू दे, प्रेझेंटेशन तयार करायचा आहे, सर ओरडतील, आज जायच आहे का आपल्याला त्या नवीन कंपनी प्रेझेंटेशन साठी ",...... वीणा


" हो वाटतं दुपारून जावं लागेल",....... प्रिति


म्हणजे आज संध्याकाळी पण समरची भेटणार नाही होणार नाही, काय करावे लंच ब्रेक नंतर परत करुन बघते त्याला फोन, जाऊ दे, आता किती खर्च का होईना टॅक्सीने जायचं, प्रीती बोलते तसं मी आधीच सांगायला पाहिजे होतं समरला याबद्दल, आता नेमका सोहा चा साखरपुडा आहे आणि हा असा फुगून बसला तर कसं होणार...... वीणा कामात बिझी झाली


लंच ब्रेक झाला वीणा ने समजला मेसेज पाठवला,..... "झालं का जेवण",...


तिकडं रिप्लाय आला नाही, तिने "सॉरी",... चा मेसेज परत पाठवला


जरा वेळाने समर ने फोन बघितला,...... "तुला माहितीये का वीणा मला तुझी किती काळजी आहे, अधिकारी तुझ्याशी कसे वागले मला किती राग आला होता तेव्हा, पण पप्पा बोलले की काहीही गरज नाही त्यांच्याशी भांडायची, म्हणून मी गप्प बसलो, काही गरज नाही आहे ना तुला लोकल ट्रान्सपोर्ट वापरायची, आजही परत अधिकारींनी तुला बस स्टॉप वरच गाठलं, का अशी करतेस तू",..... समरने मेसेज पाठवून दिला


वीणा चा फोन तिथेच टेबल वर होता, तीच जेवण झाल आणि ती हात धुवायला आत गेली, प्रीती तिथेच बसलेली होती, रिप्लाय देत नाही म्हणून समरने परत फोन केला, फोन वाजत होता समर च नाव दिसलं, प्रीती ने फोन उचलला


" अरे समर मी प्रीती बोलते आहे" ,...... प्रिति


"वीणा कुठे आहे",.... समर


" ती फ्रेश व्हायला गेलेली आहे, का भांडतात तुम्ही यार" ,....... प्रिति


"तुझ्यापर्यंत आलं का रिपोर्ट लगेच",...... समर


"नाहीतर काय, इथे वीणा एवढस तोंड करून बसली आहे, मग मी विचारलं तिला काय झालं",...... प्रिति


" बघ ना प्रिती, वीणा काय सारखी बसने ये जा करते, मी तिला सांगितलं होतं टॅक्सीने जा ",...... समर


तसं प्रीतीने बघितले की वीणा येत नाही अजून.......


" समर तुला एक सांगू का, आमच्या सॅलरी मध्ये टॅक्सीने येणं-जाणं परवडत नाही, आमचं घर ते ऑफिस हे अंतर टॅक्सीने पाचशे रुपये घेतात, दिवसातून दोनदा टॅक्सी वापरायची म्हणजे हजार रुपये, रोज कस काय परवडणार आहे, अर्ध्याच्या वर सैलरी टॅक्सी वर खरच खर्च होते, परत घरात खर्च आहेच आणि वीणा तुमच्या लग्नासाठी पैसे पण साठवते आहे, ज्वेलरी घ्यावी लागेल, घरच्यांना कपडे, तू असं तिच्यावर चिडू नकोस , तिला समजून घे, वीणा चा तू विचार कर ना, ती कसं करते आहे तीच तिला च माहिती, अरे आम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो",........ प्रिति


समर विचार करत होता की हा विचार मी का नाही केला,......" बरोबर बोलते आहेस तू प्रीती, पण तू हे मला सांगितलं हे विणाला सांगू नको, मी करतो जरा वेळाने वीणा ला फोन",... समरने फोन ठेवून दिला


त्याला आता खूप वाईट वाटत होतं आपण नुसतंच वीणा वर प्रेम करतो, तिला काय लागतं काय नाही हे कधी बघतच नाही आपण, एकदा तरी विचारला आहे का आपण तिला कि त्यांचा घर खर्च कसा चालतो किंवा सॅलरी कशी वापरते, पैसे पुरतात का तिला, खूपच गिल्टी फील होत होत समरला, उगीच चिडलो वीणा वरती, ती तरी काय करेल, घर खर्च असेल खूप, आता काय करू या वीणा ची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, तिला जर पैसे दिले तर ते तिला अजिबात आवडणार नाही, खूप स्वाभिमानी आहे ती, त्या दिवशी तिच्या शॉपिंग च बिल भरल ते ही आवडल नव्हत तिला, बर झाला जरा प्रीती शी बोलणं झालं, किती मोठी चूक करत होतो आपण,


वीणा फ्रेश होऊन आली,


"वीणा तुझ्या फोन फोन वर समर चा फोन आला होता, मी उचलला दोन मिनिटे बोलली त्याच्याशी, तो तुला जरा वेळाने फोन करणार आहे" ,........ प्रिति


"ओह्ह मिस केला मी तो फोन, चिडला आहे का ग तो",...... वीणा


" नाही ग चिडलेला नाही वाटला, उलट तुझ्या काळजीत होता",....... प्रिति


" तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि खूप काळजी करतो म्हणूनच तर मी त्याला सांगायला पाहिजे होते टॅक्सीत प्रकरण, पण मी आता ठरवले आहे किती जरी खर्च झाला तर तरी टॅक्सीने जाणार यामुळे मला जरा घरात खर्च करायला अवघड जाणार आहे पण समर च मन सांभाळायला पाहिजे मला",...... वीणा


प्रीती विचार करत होती की उगीच बोललो समर ला, हे सगळं पण जाऊदे हे त्याला कळण गरजेच आहे, तो पहिल्यापासून खूप श्रीमंत आहे त्याला माहीतच नाही की मध्यम वर्गीय लोकांचे काय प्रश्न आहेत ते, वीणा आणि समर असे कपल आहे की त्यात एक खूप श्रीमंत आणि एक मध्यमवर्गीय आहे, मी काही बोलली नसती तर ते समरला कसं कळल असत की काय प्रॉब्लेम आहे वीणाला, समर करेल आता हेल्प काहीतरी


वीणा जागेवर आली तिने मोबाईल बघितला समोर चा मेसेज आलेला होता आधीचा, omg खूपच चिडलेला दिसतो आहे समर,....... "आय एम सॉरी समर मी यापुढे रोज टॅक्सीने जाईल आणि येईल, तू म्हणशील तसंच करूया, पण तू रागवू नकोस असं, तू सकाळपासून चिडला आहे तर माझं कामात मन लागत नाही, आज मला दुसर्‍या कंपनीत प्रेझेन्टेशन साठी जायचं आहे, तूच सांग मला मी तिकडे कसं प्रेझेंट करणार माझं काम" ,....... तिने मेसेज send केला


समर तो मेसेज वाचला त्याला अजूनच वाईट वाटायला लागलं उगीच चिडलो आपण वीणावर, आपण तिला समजून घ्यायला पाहिजे होतं, वीणाच्या जीवनात अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत हेच आपल्याला काही माहितीच नाही, त्यांने वीणा ला मेसेज टाईप केला,...... "नो प्रॉब्लम वीणा, आय एम सॉरी, तुझ्यावर कसलेही बंधन नाहीयेत, तुला बसने जायचं असेल तर तू जाऊ शकते, मी असं तुला सांगायला नको होत, तू तुला जसं वाटेल तसं राहा, हे मी रागाने नाही तर प्रेमाने बोलतो आहे, आणि मला कुठल्याही गोष्टीचा राग आला नाही, थोड्यावेळ काळजी वाटली होती, एवढंच, कुठल्या कंपनीत जाते आहे तू, जर तुझं काम झाल्यावर फोन केला तर मी येईल तुला घ्यायला",


वीणा ने मेसेज वाचला तिला बरं वाटलं,...." हो चालेल मी माझं काम झाल्यावर करते फोन, खरंच राग गेला आहे ना तुझा ",


"हो अगदी खरच राग गेला आहे माझा, मी तुझ्यावर रागावू शकत नाही",..... समरचा मेसेज बघून वीणा ला खूप बरं वाटलं आणि ती कामाला लागली.........
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now