Login

प्रित तुझी माझी...❤️भाग 36

आई-बाबांनी दुकानात जाऊन समर साठी चेन आणि अंगठी पसंत केले, खूप खुश होते बाबा, समोरच्या दुकानातुन समर साठी ड्रेस टॉवेल टोपी घेतली

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

ऑफिस संपलं विणा घरी जायला निघाली, तिने ठरवल आज समर ला भेटायच नाही उगीच चिडवतो तो मला, आपली कामे करून घेवू म्हणुन तिने वहिनीला फोन केला


" वहिनी तू टेलर कडे जाऊन आली का",..... वीणा


"हो उद्या सकाळी ब्लाउज देणार आहेत ते",... वहिनी


"आपल्याला हवे तसेच डिझाईन सांगितलेस ना" ,...... वीणा


" हो सिम्पल आणि छान ",.....वहिनी


" Thank you वहिनी, सोहाच गिफ्ट घ्यायला येतेस का मेन रोड पर्यंत मी येतेच आहे पंधरा मिनिटात",...... वीणा


" हो चालेल येते, काय ठरलं पण काय घ्यायचं", ?...... वहिनी


"प्रीती म्हणते की फेंग शुई एखादं लकी दे तर गिफ्ट घेऊया का? ",..... वीणा


" चालेल ना, येते मी मग बघू म्हणजे कसं काम होऊन जाईल आपलं ",.... वहिनी


वहिनी मेन रोडवर आली, वीणा आणि वहिनी शॉपिंगला गेली, खूप सुरेख गिफ्ट निवडलं सोहा साठी आणि ते पॅक करून घेतलं


" समरचं काय झालं वीणा, काही बोलला का तो आपल्या बिल बद्दल ",..... वहिनी


" नाही वहिनी तो काही सांगत नाही, आता मी सारखा विचारणार नाही त्याला, चांगलं नाही वाटत, आपणच जायला नको होतो त्याच्या सोबत, तू बघितल ना वहिनी मी किती वेळा बोलली समर ला की तुझा ड्रेस घे आणि मग आपण इकडे वापस येवून आपली शॉपिंग इथे करणार होतो पण तो जायला तयार नव्हता ",....... वीणा


"हो ग, पण घरी ओरडतील आपल्याला आता",..... वहिनी


" काय करणार समर बोलला मी बोलेन बाबांशी",..... वीणा


" ठीक आहे काय करणार आता, जाऊ दे ",...... वहिनी


" वहिनी आज ते अधिकारी समरच्या ऑफिसला आले होते माफी मागत होते ",...... वीणा


" आता कशाला आले ते भेटायला ",..... वहिनी


" हो ना मी पण तेच म्हणत होती, माझी सुद्धा माफी मागणार आहेत म्हणे ते ",.... वीणा


" कशाला आता, भेटू नका तुम्ही त्यांना ",..... वहिनी


" नाही ग मी सांगितलं की माझ्याशी नाही बोललं तरी चालेल",..... वीणा


"बरोबर आहे, झाल का आपल काम आता अजून काही बाकी आहे का ",...... वहिनी


" पार्लरला कधी जायचं आहे वहिनी, आता जायचं का? एक दोन तास लागतील",...... वीणा


" हो मला पण वेळ नाही उद्या",..... वहिनी


" चालेल मी आईला फोन करून सांगते",..... वीणा


" स्वयंपाक रेडीचा आहे तसा, काही प्रॉब्लेम नाही",......वहिनी


वीणा ने घरी फोन केला,....." मी आणि वहिनी पार्लरला जातो ",


" हो जा, लवकर या ग घरी ",..... आई


" रात्री नऊ पर्यंत येऊ, तुम्ही जेवून घ्या ",..... वीणा


" हो चालेल नीट या ग",..... आई


वहिनी आणि वीणा पार्लरला गेल्या


" काय करायच आहे? तुमचं केस कापायचे आहेत का",?......


" फक्त फेशियल करा",....... वीणा


दोघींचा पार्लर च काम झाल्यावर दोघी घरी आल्या, सगळे घरी आले होते, आईने अभि आणि आरुला जेवायला वाढून दिलं होतं, वीणा आणि वहिनीने पुढची जेवणाची तयारी केली


"बाबा आज समरच्या ऑफिस मध्ये अधिकारी आले होते, माझ्याशी पण ते बोलणार आहेत , अस ऐकल आहे, काय करू मी",.... वीणा


"ते जर तुझ्याशी बोलायला आले तर नीट बोलून घे, विषय संपवून टाक, आपला काही त्यांच्याशी पुढे संबंध नाहीये",...... बाबा


"ठीक आहे बाबा",..... वीणा


आवरून झालं समरचा फोन आलाच तेवढ्यात


" काय करते आहेस वीणा",..... समर


" आत्ताच जेवण झालं ",.... वीणा


" आज उशीर झाला का", ?........ समर


" हो मी आणि वहिनी पार्लर गेलो होतो, परवा कार्यक्रम आहे ना सोहाचा म्हणून",... वीणा


"तुला काही गरजच नाही, पार्लर ची",..... समर मुद्दाम वीणा ला हसू येईल अस करत होता


" काहीही काय रे, फक्त फेशिअल केलं ",..... वीणा


" बरं झालं मी किती घाबरलो होतो, मी म्हणणार होतो तुला अजिबात केस कापायचे नाही, तुझे केस खूप छान आहेत वीणा ",........ समर


दोघं बराच वेळ बोलत होते.....


"तुझं झालं का जेवण समर",..... वीणा


" मम्मी पप्पा यायचे आहेत अजून, आता बसूच जेवायला",.... समर


"आज का उशीर झाला एवढा",...... वीणा


" सोहा च्या प्रोग्राम ची तयारी सुरू आहे ना, ते गेले असतील खरेदीला, काही घ्यायच असेल ",..... समर


मम्मी पप्पा घरी आले, ते फ्रेश होऊन आले सगळे जेवायला बसले,


"आज अगदी कमालच केली ना अधिकाऱ्यांनी",..... पप्पा


"हो ना डायरेक्ट ऑफिस मध्ये आले",..... समर


"एक मिनिट कोण आला होत आज ऑफिस मध्ये"?,...... सोहा


" अधिकारी आणि निशा आले होते माफी मागायला, आणि ते वीणा ची पण माफी मागणार आहेत, खूपच गोड बोलत होते ते, निशाच घेऊन आली असेल त्यांना माफी मागायला",..... समर


"बोलायला नको होत त्यांच्याशी ",....... सोहा


"अस नाही करता येत बेटा, ते प्रॅक्टिकल्स होवुन भेटायला आले आपण तसच वागायचं आपण",.... पप्पा


" पप्पा तुम्हाला जमेल हे",.... सोहा


आवरून झाल मम्मी-पप्पा रूम मध्ये आले


" मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे ",.... पप्पा


" बोला ना",..... मम्मी


"हे अधिकारी प्रकरण खूप जड गेल असत आपल्याला, कारण अधिकारी म्हणावे तितके साधी व्यक्ती नाहीत खूप वरपर्यंत हात आहेत त्यांचे, असे मोठे मोठे प्रॉब्लेम ते त्यांच्या कॉन्टॅक्ट ने चुटकीसरशी सोडवतात, मंत्रालयातही ओळख आहे त्यांची, त्यांच्या निशा ला आवडलं नाही हे सगळं म्हणून त्यांनी माघार घेतली असेल, बहुतेक निशाने त्यांना खूप रागवलं असणार ",...... पप्पा


" हो मलाही तसंच वाटत आहे पैसे कॉन्टॅक्ट कसलीच कमी नाहीये अधिकाऱ्यांकडे ",....... मम्मी


"मला काय वाटतं आहे माहिती आहे का आपण आशिष आणि सोहा सोबत वीणा आणि समोरच आहे साखरपुडा करायचा का? नाही तरी सगळी तयारी झालीच आहे आपली, कपडे घेतले गेले आहेत, वीणाला फक्त दागिने घ्यावे लागतील",....... पप्पा


"खूपच छान आयडिया आहे",.....मम्मी


"पण आपण हे त्या दोघांना कळू द्यायचं नाही, उद्या वीणाच्या आई-वडिलांना भेटू आणि त्यांच्याशी बोलून बघू, ते जर हो म्हटले तर लगेच दागिन्यांची खरेदी करून घेऊ",..... पप्पा


" चालेल खूप छान आयडिया आहे ही, मला तर खूपच आनंद झाला आहे, खरच नको सांगू या दोघांना, वेळेवर सरप्राईज देऊ",...... परांजपे मॅडम च्या डोळ्याची झोप उडून गेली होती, काय करू काय नाही असं झालं होतं त्यांना,


"एकच घागरा घेतला आहे हो वीणा ला काल पण, समर म्हणत होता ना ते दोघं गेले होते शॉपिंगला तिथून नवीन साडी आणली आहे वीणाने ती नेसेल बहुतेक ती समरच्या पसंतीची असेल",.......मम्मी


" हो तसंच वाटत आहे मला",..... पप्पा


"त्या दोघांसाठी कपल अंगठी घ्यावी लागेल, वीणा साठी नेकलेस बांगड्यांचा सेट घ्यावा लागेल, खुपच छान व ठरवले तुम्ही, झालीच आहे सगळी तयारी तर काही हरकत नाही",..... मम्मी


" आपण हे आजी-आजोबांना सांगायचं का ",.......पप्पा


"हो त्यांच्याशी बोलून बघू, त्यांना विचारून बघू चला मग खाली जाऊ",..... मम्मी


" थांब मी आधीच हळूच जाऊन बघतो, समर किंवा सोहा नाहीये ना खाली, नाहीतर ती सोहा सगळ्या बातम्या फोडते",..... पप्पा


हो ना..... मम्मी


पप्पा जाऊन बघून आले कोणी नव्हतं खाली मग ते आजी-आजोबांच्या रूममध्ये गेले


"येऊ का आत मध्ये, झोपले तर नाही ना तुम्ही, थोडं काम आहे",.... पप्पा


" या ना, विचारतोस काय असा ",......आजी


दोघ मध्ये गेले, तसं पप्पांनी दार लावून घेतलं, पप्पा आजी जवळ जाऊन बसले, मम्मी आजोबां जवळच्या खुर्चीवर बसली


"अरे काय झालं आहे",..... आजी


"महत्वाचं बोलायचं आहे",..... पप्पा


बोला...... आजी आजोबा एकमेकांन कडे बघत होते


"आता आपली कार्यक्रमाची सगळी तयारी झालीच आहे ना, तर आम्हाला दोघांना असं वाटत आहे की सोहा आशिश सोबत वीणा आणि समरचा पण साखरपुडा करून घेवु या का आणि हे सरप्राईज असणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं दोघांना",..... पप्पा


आजी-आजोबांना खूप आनंद झाला होता,...... "खूप छान आयडिया आहे ही, नाहीतरी खूप लोक उगाच आपल्या मुलांच्या मागे आहेत",


"हो ना तेच, अजून त्रास होण्यापेक्षा व्यवस्थित ठरवलंच आहे तर साखरपुडा उरकून घेऊ आणि लगेचच जवळचा मुहूर्त बघून लग्न करून टाकू ",...... मम्मी


" मला आवडली तुमची आयडिया",...... आजी


" तुम्हाला काय वाटत आहे आजोबा",....... मम्मी


"खूप छान आयडिया आहे ही, मला तर खूप उत्साही वाटत आहे",........ आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता


आम्ही उद्या सकाळी विणा च्या घरी जातो तिच्या आई वडिलांशी बोलतो आणि पुढचे ठरवतो


" पण वीणा घरी असेल ना त्यावेळी",..... आजी


" नाही ती ऑफिसला गेल्यावर जाऊ मग, तिथूनच आम्ही पण ऑफिसला जाऊ आणि तुम्ही हे सोहा किंवा समर ला सांगणार नाही आहात, स्पेशली आई तुमचे ते दोघं मुलं खूप लाडकी आहेत",..... मम्मी


" नाही...... नाही सांगणार मी सरप्राईज आहे ",......आजी


" हो ",..... मम्मी


"वीणा च्या आईला सांगा की वीणाच्या हातावर मेंहेंदी काढायला",..... आजी


" हो ते लक्षात ठेवते ",....... मम्मी


एकच उत्साह संचारला होता, चौघांची डोळ्यावरची झोप उडून गेली होती, आता कधी एकदाचा रविवार येतो आणि कार्यक्रम होतो असं झालं होतं,


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पप्पांनी वीणाच्या बाबांना फोन लावला,...... "माझा फोन आला आहे हे कोणाला सांगू नका",...


"काय झालं आहे",.... बाबा


"काही नाही, मी जे सांगतो ते ऐका, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, विणा ऑफिसला गेली की सांगा, काही घाबरण्यासारखं नाही आहे, आनंदाची बातमी आहे पण समर वीणाला कळू द्यायची नाहीये, म्हणून सांगितले की मी या ऑफिसला गेल्या नंतर सांगा",...... परांजपे


" हो चालेल ती निघाली की मी तुम्हाला फोन करतो",...... बाबा


" तुम्हाला नाही जायचं आहे ना ऑफिसला लवकर",..... परांजपे


" नाही मी थांबतो तुमच्यासाठी, मी जरा उशिराने जातो",....... बाबांच्या चेहऱ्यावर हसू होतं ते आईकडे बघत होते


वीणा ऑफिसला जायची तयारी करत होती, बाबा तसेच बसून होते कॉटवर,


" आवरा ना, तुम्हाला जायचं नाही का आज ऑफिसला",....... आई


बाबा काहीच बोलले नाहीत,


"आई मी निघते ऑफिसला जायला, वहिनी मी करून बघते टेलर ला फोन आणि मग तुला सांगते ब्लाउज रेडी असतील तर जाऊन घेऊन ये, नाहीतर मी संध्याकाळी येताना घेऊन येईन",...... वीणा


" हो चालेल ताई ",..... वहिनी


वीणा ऑफिसला गेली, दादा प्रकाश गेला, वहिनी आवरत होती, हे घर आवरुन तिकडच रूम आवरायला ती गेली, तसं बाबांनी आईला सांगितलं की,......" आत्ताच परांजपे यांचा फोन आला होता, त्यांना आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यांनी सांगितलं वीणा ऑफिसला गेल्या नंतर कळवा, तर मी त्यांना फोन करतो",...


"हो का, काय बोलायचं असेल त्यांना", ?..... आई


"त्यांनी सांगितलं काळजी करू नका आनंदाची बातमी आहे",........ बाबा


" ठीक आहे मग तुम्ही फोन करून बघा",....... आई


बाबांनी फोन लावला आणि परांजपे सरांना,....... "वीणा आत्ताच ऑफिसला गेली आहे ",..


" ठीक आहे मग आम्हाला दोघांना तुम्हाला भेटायला यायचं आहे ",..... परांजपे


"या ना मग घरी घरी कोणी नाही का सविता आहे फक्त घरी",..... बाबा


"सविता सांगून देईन पण मग काय करायचं बाहेर भेटायचं का ",....... परांजपे


"हो चालेल ",..... बाबा


" मी पत्ता देतो तुम्ही तिकडे या ",...... परांजपे सरांनी बाबांना पत्ता दिला, आई बाबा रेडी झाले


" सविता आम्ही बाहेर जाऊन येतो, जरा थोडं सामान घ्यायचं आहे",...... आई


" काय घ्यायचा आहे आई तुम्ही कशाला थकता मी जाईल की ",...... वहिनी


" नाही ग आम्हाला दोघांना थोडं काम आहे ",..... आई


" ठीक आहे जाऊन या तुम्ही दोघं पण लवकर या",..... वहिनी


आई बाबा दिलेल्या पत्त्यावर पोहोचले कॉफी शॉप होत ते, परांजपे सर आणि मॅडम ही आल्या, दोघं खूप आनंदी दिसत होते, आत मध्ये गेले परांजपे सरांनी नाश्ता आणि कॉफीची ऑर्डर दिली


"या रविवारी आमच्या सोहा चा साखरपुडा आहे, आम्हाला असं वाटत आहे की त्यासोबत आपण समर आणि वीणा चा पण साखरपुडा करायचा का", ?....... परांजपे


आई आणि बाबांना खूप आनंद झाला,......." हो चालेल छान आयडिया आहे, नाही तरी सगळी तयारी तर झालीच आहे, आपण हे सिक्रेट ठेवायचा आहे, आपण त्यांना सरप्राईज देऊ, त्यांना कळू द्यायचं नाही, तुम्ही दोघं पण ही बातमी कुठेच सांगू नका, दादा वहिनी प्रकाश कोणालाच नाही" ,


" कसं करायचं आहे मग त्यादिवशी ",..... बाबा


" सोहा आणि आशिष चा साखरपुडा झाला की वीणा आणि समरला लगेच पुजेला बसवु",...... परांजपे


" हो चालेल",...... बाबा


" मी वीणा साठी घागरा घेतलेला आहे, तो नंतर मी तिच्या हातात देईन ",..... मम्मी


" चालेल, एक साडी घेतली आहे काल तिने सोहाच्या साखरपुडा साठी खूप छान आहे ती तिला संध्याकाळी नेसायला सांगू ",... आई


"छान होईल अजून काही तयारी करावी लागेल का ",.... बाबा


" उद्या वीणा च्या हातावर मेहंदी काढून द्या",.... मम्मी


" हो ती तयारी करावीच लागेल ",.... आई


"अजून काहीच नाही सगळी तयारी झाली आहे, फक्त आम्ही तुमच्या होकाराची वाट बघत होतो तुम्ही सगळे सकाळी लवकर या दुपारी जेवण झालं की चार नंतर कार्यक्रम आहे ",...... परांजपे


"हो चालेल",.....बाबा


चौघांच्या चेहऱ्यावरचा उत्साह ओसंडून वाहत होता, मम्मी आई ठरवत होत्या काय काय करता येईल, चहा नाश्ता झाला चौघे बाहेर आले


" चला आम्ही तुम्हाला सोडतो घरी आणि मग आम्ही ऑफिसला जाऊ ",..... परांजपे


"नाही तुम्ही निघा आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे मग आम्ही घरी जाऊ",...... बाबा


"चालेल, काही वाटल तर फोन वर बोलू ", ....... म्हणून परांजपे सर आणि मॅडम ऑफिसला जायला निघाले


काय काय करायला लागेल पुढे हेच विचार मॅडमच्या डोक्यात होते......


आई आणि बाबा घराकडे निघाले,..... "खूपच आनंदाची बातमी दिली परांजपेंनी, आपल्याला ही तयारी करावी लागेल, समर साठी सोन्याची चैन घेऊ कपडे घेऊ अंगठी ही घ्यावी लागेल,


" मग जायचं का बघून यायचं का सगळं सामान",.... आई


" चालेल, जाऊ या आता, कारण घरी कोणालाच सांगता येणार नाही",..... बाबा


आई-बाबांनी दुकानात जाऊन समर साठी चेन आणि अंगठी पसंत केले, खूप खुश होते बाबा, समोरच्या दुकानातुन समर साठी ड्रेस टॉवेल टोपी घेतली


"इतर खर्च ते लोक करू देणार नाहीत बरं झालं अंगठी आणि चेंन चांगली घेतली",....... आई


" हो ना मुलगा चांगला आहे खूप ",...... पप्पा


"वीणा साठी पण बघायचं का हो काहीतरी, तिने आणलेली साडी तशी खूप छान आहे आणि महागातली पण आहे, नेकलेस सेट बघायचा का तिच्यासाठी? बसत आहे का आपल्या बजेटमध्ये ",?........ आई


" हो मागे दादा ने दिलेले 75 हजार रुपये आहेत अजून, कार्ड आहे माझ्याकडे बँकेत जायची गरज नाही 75000 अजून पैसे टाकून अंगठी चेन आणि नेकलेस सेट बसवु",........ बाबा


" चालेल", ........


आई-बाबा खूप खुश होते, काय काय घेऊ आणि काय काय नाही असं त्यांना झालं होतं.........

🎭 Series Post

View all