Login

प्रित तुझी माझी... ❤️भाग 35

" हो कपल अंगठी बुक केलेली आहे, सोहा साठी नेकलेस सेट बुक केला आहे, आशिष साठी चेन सगळं झाल आहे, परवा त्यांचे लोक घरी येउन सगळ देवून जातील ",.... मम्मी

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

समर शॉपिंग करून घरी आला, सोहा मम्मी अजून आले नव्हते, आजी-आजोबा सगळ्यांची वाट बघत होते, पप्पा आजी-आजोबांशी बोलत बसले होते,


"कुठे गेला होतास, आज उशीर झाला घरी यायला",....... पप्पा


" मी वीणा बरोबर शॉपिंग ला गेलो होतो तिलाही कार्यक्रमासाठी शॉपिंग करायची होती",....... समर


"अरे वा मजा आहे तुझी",...... पप्पा


आजी आजोबा छान हसत होते, सोहा आणि मम्मी आल्याच तेवढ्यात सोहा खूप खुश दिसत होती, मदतनीस काकूंनी शॉपिंग च्या सगळ्या बॅग घरात आणून ठेवल्या, आल्या आल्या मम्मीने आजीला काय काय शॉपिंग केलं ते दाखवायला सुरुवात केली...


"हे इकडचे पॅकेट सगळे गिफ्ट आहेत ते व्यवस्थित पॅक करायचे आहेत ते नीट ठेव ",..... मम्मी मदतनीस काकूंना सांगत होती


" तू पण आत्ताच आला का समर",...... मम्मी


"हो मम्मी मी पण वीणा सोबत शॉपिंग ला गेलो होतो, मी एक कुर्ता घेतला",....... समर


"अरे वा बरं झालं, आम्ही पण तुला एक कुर्ता आणला आहे एक सकाळी घाल आणि एक संध्याकाळी घाल ",...... मम्मी


"आमच्यासाठी आणला आहे का काही",..... पप्पा विचारत होते


" तुम्ही यायला हव होत सोबत, खूप धावपळ झाली आमची दोघींची, हो सगळ्यांसाठी ड्रेस आणले आहेत",...... मम्मी


" अगं आपले ब्लाऊज आता शिवून मिळतील का आता",........ आजी


" हो उद्या संध्याकाळपर्यंत मिळतील, ती बुटीक वाली माझी मैत्रीणच आहे सगळ्यांचे सेट तयार करूनच घ्यायचे आहेत, पण तुम्हाला आवडली ना साडी ",...... मम्मी


" छान आहे प्रश्न नाही, ज्वेलरी चं काय झालं ज्वेलरी घेतली गेली का ",........ आजी


" हो कपल अंगठी बुक केलेली आहे, सोहा साठी नेकलेस सेट बुक केला आहे, आशिष साठी चेन सगळं झाल आहे, परवा त्यांचे लोक घरी येउन सगळ देवून जातील ",.... मम्मी


" चला चांगलं झालं, झालीच आहे बरीच तयारी ",..... आजी


" तुम्ही केटरर्स बुक केला का"?,.... मम्मी


"हो सगळं कॉन्ट्रॅक्ट दिलेल आहे, सकाळी नाष्टा चहा, संध्याकाळचा चहा, लंच, डिनर, सगळं त्याला सांगितल आहे ",...... पप्पा


" फुलं खुर्च्या वगैरे सगळं सांगितल आहे ना",...... मम्मी


" सगळं झालेला आहे काहीच काळजी करू नको",......


" एवढी धावपळ करण्यापेक्षा हॉटेल मध्ये प्रोग्रॅम केला असता",......सोहा


" नको जास्त पाहुणे नाहीत आणि सगळे घरी येतील आपल्या तेच बर वाटेल, मागे केवढा मोठा हॉल आहे खास प्रोग्रॅम साठी आपण बनवलेला तिथे बर पडेन आणि कॉन्ट्रॅक्ट तर दिल सगळ, ही आजची खरेदी करावी लागेली असती आपल्याला ",...... पप्पा


" हो बरोबर आहे, घरी ठेवू कार्यक्रम ",..... आजी


सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह ओसंडून वाहत होता,


" चला मग आता लवकर फ्रेश होऊन या जेवायला बसू या भूक लागली आहे खूप ",..... पप्पा


मम्मी सोहा समर आवरायला गेले, जेवण झालं, मम्मी ज्याची त्याची खरेदीच्या ज्याच्या त्याच्या हवाली करत होती, वीणा च्या घरच्यांसाठी काय काय आणलं हे आजी स्वतः बघत होती, एवढा वय झालं तरी एखादा प्रोग्राम असल्यावर आजीचा उत्साह अगदी वाखाणण्याजोगा होता, आजोबा आजीकडे कौतुकाने बघत होते, मम्मी आमंत्रणाचे फोन करण्यात मग्न होती, समर विचार करत होता की माझ्या ही लग्नात अशी धावपळ होईल का? या विचारानेच त्याला खूपच छान वाटत होतं, हसू येत होतं, सोहा आलीच तेवढ्यात त्याच्या बाजूला


"झालं का शॉपिंग मॅडम माझं कार्ड दे",...... समर


"कुठे काय तुझ्या कार्डवर काहीच घेतलं नाहीये मी अजून",..... सोहा


"म्हणजे काय याला काय अर्थ आहे, आज झाली नाही एवढी शॉपिंग, माझं कार्ड दे अजुन किती वस्तू घेणार आहेस",.... समर


"अरे..... तू काय बोलला होतास की तुला जे हवं ते घे, मग मी उद्या जाईन ला शॉपिंग ला तेव्हा घेईल",.... सोहा


" का भांडता आहात तुम्ही दोघं, लहान आहात का आता लग्न होईल दोघांच ",..... आजी ओरडत होती


समर सोहा दोघ हसत होते


" तू काय घेतलं दादा आज ",.... सोहा


" मी एक कुर्ता-पायजामा घेतला ",..... समर


" बस एवढच घेतलस, तीन तास बाहेर होता ना तू, ",...... सोहा


" अरे मग वीणा ने शॉपिंग केल ना",.... समर


" वीणा ने काय घेतल",...... सोहा


"तिने साडी घेतली ड्रेस घेतला, माहिती नाही ग इतक ",....समर


" हो का, जस तुझ लक्ष नव्हत, म्हणजे तू शॉपिंग बॅग उचलायची प्रॅक्टिस आत्तापासून करतो आहेस तर ",..... सोहा


" नको चिडवू त्याला, तुझी मेहंदी वाली कधी येणार आहे ग ",.... आजी जवळ समर अजून सरकून बसला


" परवा येणार आहे ती आजी",.... सोहा


दादा आणि प्रकाश ऑफिसहुन आले, दोघं फ्रेश होऊन आले, सगळे जेवायला बसले,


" आज काय झालं अभी अगदी एकच पोळी ",.... दादा


" पप्पा आज आम्ही पिझ्झा खाल्ला",.... अभी


" अरे वा मज्जा आहे, कोणी आणला होता",..... दादा


"मम्मीने आणला होता",.... अभी


" आज आम्ही दोघी शॉपिंग ला गेलो होतो",..... वहिनी


"हो प्रोग्राम आहे ना, मिळाल्या का सगळ्या वस्तू, आपल्याला जायच आहे का सगळ्यांना नाही तर आई बाबा तुम्ही जा वीणा सोबत",.... दादा


"नाही ह दादा तुम्ही सगळे येणार आहात, तुम्ही जर घरी राहिले तर समर येईल घ्यायला तुम्हाला ",..... वीणा


" हो येतो आम्ही, जाऊ सगळे",..... दादा


" खूप छान झाली शॉपिंग आमची पण एक गडबड झाली आपल सगळं बिल समर ने दिलं ",..... वहिनी


" ते कसं काय समर आला होता का तुमच्या दोघींसोबत खरेदीसाठी ",..... दादा


" हो समरच आम्हाला घेऊन गेला होता मॉलमध्ये ",...... वहिनी


"मॉल मधून शॉपिंग केली तुम्ही दोघींनी, अरे वा, किती झालं बिल ",..... दादा


" ते माहिती नाही",...... वहिनी


" म्हणजे ? अरे मग तुम्ही विचारलं सुद्धा नाही का समर ला किती बिल झाल ते ",...... दादा


" विचारलं पण तो सांगत नाही ",..... वहिनी


" छान चाललय तुमच, ठीक आहे उद्या विचारून घ्या, आपल्या खरेदी चे पैसे समर ला देऊन टाका ",...... दादा


आवरून झालं, वहिनी केलेले शॉपिंग नीट कपाटात ठेवत होती, गिफ्ट द्यायचे कपडे बाजूला काढून ठेवले, ते नीट पॅक करावे लागतील, मुल तिथे बाजूला खेळत होते


" चुरगळू देऊ नका ते गिफ्ट द्यायचे कपडे",..... आई रागवत होती


दादा आणि प्रकाश ला खूप कपडे आवडले होते


"वीणा ऐक ना आज मला समरच्या ऑफिस मधून फोन आला होता, समरला माझ्यासोबत एक प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, माझ इंजीनियरिंग नॉलेज त्याला वापरायचा आहे एका मशीन साठी",.... प्रकाश


" अरे वा खूप छान, पण तुला वेळ आहे का",.... वीणा


"संध्याकाळचे दोन तीन तास मी परांजपे अंड कंपनी मध्ये जाईल, समर महेश इंजीनियरिंग वाल्यांची बोलून घेणार आहे, थोडे दिवस एक दोन तास आधी लवकर सुट्टी झाली तर चांगलंच आहे, बघु सकाळी लवकर जाता आले तर जाईन मी ऑफिसला",..... प्रकाश


" पण तू खूप थकशील रे तसं",...... वीणा


" नाही ग मला आनंद वाटतो आहे कामात काही तरी करायला मिळत आहे हे खूप आहे माझ्यासाठी ",...... प्रकाश खुश होता


आवरून झालं, वीणा पुस्तक वाचत पडली होती, आई-बाबा टीव्ही बघत होते, प्रकाशही काही तरी वाचत होता, वहिनी दादा मुलं बाजूच्या रूममध्ये झोपायला गेले


वीणाने समर ला मेसेज केला


" तुझ्यामुळे आज मला घरी सगळे खूप रागवले ",..... वीणा


" का काय झालं",..... समर


"तू आमच्या शॉपिंगचे पैसे का नाहीस घेतले, आमचं किती बिल झाले आहे ते आत्ताच्या आत्ता मला कळव",..... वीणा


"तुझ्यात आणि माझ्यात आता तुझं माझं राहिला आहे का वीणा? तू खर्च केला काय आणि मी खर्च केला काय सारखच आहे ",..... समर


"अरे पण त्यात गिफ्ट आहेत ना, त्याचे तरी पैसे आम्हाला देऊ दे ",...... वीणा


" ठीक आहे, मी नंतर सांगतो हिशोब, आता सारखं किती बिल झालं तेच बोलू नकोस ",..... समर


" बर बाबा राहिलं, तू सांग काय बोलू या मग",.... वीणा


" उलट तू माझ्याकडे तर शॉपिंगचा हट्ट करायला पाहिजे, मला खूपच छान बायको मिळाली आहे, की जी काहीच मागत नाही, हे असं कायम राहील का?? की ही आता तात्पुरते कंडिशन आहे ",...... समर


" तुला काय वाटतय मी कशी असेन, लग्ना नंतर कशी वागेन मी ",.... वीणा


"काय माहिती माझ हे पहिलंच लग्न आहे ",..... समर हसत होता


" तात्पुरती आहे ही कंडिशन नंतर मी किती त्रास देईल तुला बघ ",...... वीणा


" बापरे माझ काही खर नाही म्हणजे",.... समर


" चूप रे,.... तू ही ना",....... वीणा


"मग आता झाला आहे हिशोब, सारख विचारू नको किती बिल झाल",..... समर


"अरे काय हे, बाबा रागावतील मला",...... वीणा


" मी बोलेन बाबांशी, don\"t worry ",..... समर


बऱ्याच वेळ समर आणि विणा बोलत होते, वीणा च्या मनात आलं होतं की समरला सांगुन द्यावं की मी आज टॅक्सीने गेली नव्हती ऑफिसला, पण तिने तो विषय टाळला


वीणा चा सकाळी आवरून झालं, चला मी निघते ऑफिसला जायला,...... "वहिनी तुम्ही जाणार आहात ना टेलर कडे, लगेच द्यायला सांग ह कपडे ",


"हो जाणार आहे मी आपले ब्लाऊज शिवायला टाकते",.... वहिनी


" सोहा ला गिफ्ट काय घ्यायच आहे? तिच्या कडे सगळच असेल, काय द्यावा हा मोठा प्रश्न आहे",...... वीणा


" ठरवू संध्याकाळी",.... वहिनी


वीणा ऑफिसला आली प्रिती प्रशांत आलेलेच होते


" गेली होतीस का शॉपिंग ला काल, मिळाली का साडी ",..... प्रिति


" हो मी समर आणि वहिनी गेलो होतो",..... वीणा


वीणा ने प्रीतीला काल काय काय घेतलं ते सांगितलं....


" खूप छान ड्रेस मिळाले मुलांना आणि समर ने पिझ्झा ही घेतला मुलांसाठी खूप खुश होते मुल",.... वीणा


"समर छान आहे वागायला",..... प्रिति


" हो ना, अगं सोहा ला काय गिफ्ट घ्यायचं ते सजेस्ट कर",...... वीणा


"तिला लकी feng chui गिफ्ट दे काहीतरी",..... प्रीती


"हो, छान आयडिया आहे, तसंच काहीतरी द्यावे लागेल बर झालं सुचवलं",...... प्रिति


" काल समरने बिल भरलं घरी बाबा खूप रागवले आम्हाला",....... वीणा


"It\"s ok होणारा नवरा आहे तुझा",...... प्रिति


"ऐक ना प्रीती मी परत समरशी खोट बोलले की मी टॅक्सीने आली अस",..... वीणा


"आज झाल का बोलण तुमच",..... प्रिति


"नाही काल विचारात होता तो, काय करू सांगून देवु का त्याला मी सगळ",..... वीणा


"हो सांगून दे गैरसमज नको कुठले",......


वीणा चा फोन वाजत होता unknown नंबर होता ऑफिस टाइम होता म्हणून वीणा ने फोन कट केला


समर ऑफिस ला आला, त्याच काम करत होता


"सर तुम्हाला भेटायला मिस्टर अधिकारी आले आहेत",..... मिस्टर दीक्षित


"काय? ते काय करता आहेत इथे? , पप्पा कुठे आहेत? ",..... समर च्या कपाळावर आठ्या होत्या


"सर आले नाहीत अजून",....... मिस्टर दीक्षित


"पाठवा त्यांना आत, कॉफी ही पाठवा ",..... काय हिम्मत आहे या माणसाची समर विचार करत होता


मिस्टर अधिकारी हाथ जोडत आत आले, त्यांच्या सोबत निशा ही होती


समर उठून उभा राहिला


"मी इथे तुमची माफी मागायला आलो आहे, शक्य असेल तर मला माफ कर समर",..... अधिकारी


"No worries सर, be comfortable, आणि प्लीज हात वगैरे जोडू नका ",...... समर


निशा आज पहिल्यांदा समरला नीट बघत होती, आपले डॅडी या मुलासाठी एवढ्या खालच्या पातळीवर का गेले याची तिला खात्री पटली, हा समर खूप छान आहे, किती well behave आहे, किती handsome डॅशिंग दिसतो आहे ऑफिस मध्ये, एकदम बॉस, पण तिने तिचे विचार झटकले


" माझा तुम्हाला त्रास द्यायचा विचार नव्हता हे कस काय झाल माझ्या हातून काय माहिती मी वीणाची ही माफी मागणार आहे",...... अधिकारी


"काही प्रॉब्लेम नाही सर एवढी काळजी करू नका",..... समर


परांजपे सर आले ते सरळ समर च्या केबिन मध्ये आले


तसे अधिकारी उठून उभे राहिले, हात जोडून ते परांजपे सरांकडे बघत होते......," मला माफ करा "


तस परांजपे सरांनी त्यांचे हाथ खाली केल


" एवढी काळजी करू नका अधिकारी, तुम्ही भेटायला आले तेच खूप आहे ",.... परांजपे सर


Hello uncle


Hello young lady


निशा खूप confident वाटत होती


"डॅडी अतिशय चुकीच वागले तुमच्याशी specially वीणाशी मी त्यांच्या वतीने माफी मागते, मला माहिती असत हे सगळ तर मी अस होवू दिल नसत",....... निशा


" काही काळजी करू नको बेटा सगळ झाल नीट आता",..... परांजपे सर


"मी निशा च्या प्रेमात आंधळा झाला होतो, तिला हे सगळ आवडत नाही, माझ चुकलच, मी अस करायला नको होत ",..... अधिकारी


परांजपे सर अधिकारी सर मॅडम ला भेटायला दुसर्‍या केबिन मध्ये गेले


निशा समर च्या केबिन मध्ये होती समर ला सुचत नव्हत काय बोलाव


"कोणता प्रोजेक्ट सुरु आहे सध्या निशा",... समर


निशा तिच्या कामाबद्दल बोलत होती....


बोलायला खूप मोकळी आहे निशा, बर्‍याच वेळ ते दोघ बोलत होते,...... "समर खरच मनापासून sorry, डॅडी ही ना उगीच त्रास दिला तुम्हाला ",


अधिकारी सर आले तेवढ्यात निशा आणि ते वापस गेले


समर परत कामाला लागला


त्याने जरा वेळाने वीणाला फोन लावला


"बोल समर",.... वीणा


" तुला माहिती का ईकडे कोण आलं होतं",... समर


" कोण",.... वीणा


" मिस्टर अधिकारी आणि त्यांची मुलगी निशा आले होते",...... समर


" का कशाला आले होते आता ते आता",..... वीणा


"माफी मागायला आले होते, तुझी ही माफी मागणार आहेत ते आता",..... समर


" मला त्यांना अजिबात भेटायचं नाहीये, माझी माफी मागितली नाही तरी चालेल आणि कशी आहे ती निशा",..... वीणा रागात होती


समरला तर चान्स सापडला विणा ला चिडवायचा,......" खूप सुंदर आहे निशा, एवढी कॉन्फिडंट वाटत होती आज, तीच घेऊन आली होती तिच्या वडिलांना इकडे, सगळ्यांशी एवढी छान बोलत होती व्यवस्थित एकदम, मिस्टर अधिकारी मम्मी पप्पांशी बोलायला दुसऱ्या केबिनमध्ये गेले तेव्हा ती माझ्यासोबतच होती ईकडे, माझ्या केबिन मध्ये, आम्ही दोघं खूप छान गप्पा मारत बसलो होतो ",....


वीणा ला खूपच राग आला....


" झाल्या का मग मस्त गप्पा मारून, तुझ पोट भरलं असेल गप्पांनी, मला कशाला फोन केला आहेस मग",...... म्हणून रागाने वीणाने फोन ठेवून दिला


समरने परत वीणा ला फोन लावला,......" काय झालं फोन कट झाला होता का", ?...... त्याला माहिती होतं वीणा ने रागाने फोन ठेवला आहे...


" नाही फोन मी ठेवला होता, तुझं झालं आता इतकं छान निशाशी बोलणं आता कशाला बोलतो आहेस माझ्याशी",... वीणा


"अरे थांब इतकं चिडू नकोस, मी गंमत करत होतो" ,..... समर


" ते काही का असेना मला थोडं काम आहे मी फोन ठेवते",..... वीणा


" आज भेटणार का संध्याकाळी",.... समर


" नाही अजिबात वेळ नाही आहे मला बाहेर जायचं आहे",...... वीणा


" कुठे जायचं आहे मी पण येऊ का",.... समर


" समर तुला सारखं माझ्याबरोबरच यायचं असतं का सगळीकडे",....... वीणा अजूनही चिडली होती


" हो मग एकुलती एक होणारी बायको आहे माझी तू ",..... समर


वीणा ला हसू आलं, वीणा चा राग गेला आहे हे बघून समरला बरं वाटलं


"मला खरंच नाही भेटायचं त्या अधिकाऱ्यांना तू सांगशील का समर त्यांना ",..... वीणा


" आता मी काय त्यांना फोन करणार नाही, उगाच परत मी त्यांच्याशी बोललो तू रागावशील ",..... समर


"बरं ठीक आहे",......वीणा विचार करत होती अधिकारी भेटले तर काय बोलायच.......