ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........
सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....
©️®️शिल्पा सुतार
.......
©️®️शिल्पा सुतार
.......
सोहा आवरुन खाली आली, पप्पा मम्मी नाश्ता करत होते,
"या रविवारी साखरपुडा ठरलाय लक्ष्यात आहे ना, आशिष त्यांना फोन करून आठवण दे ",..... पप्पा
"आता दोन तीन दिवसांनी लगेच ",..... सोहा
"हो तसच ठरल होत ना आपल मागच्या रविवारी", .....पप्पा
"कस होणार? काही शॉपिंग नाही झाली माझी, कपडे पार्लर मेहेंदी सगळ होईल का मम्मी ",...... सोहा
"रेडीमेड मिळतात ड्रेस ज्वेलरी ती घेता येईल, पार्लर ला आदल्या दिवशी जाऊ ",...... मम्मी
"पण एवढी घाई का"?,..... सोहा
" समर च बघितल ना, अधिकारींनी किती त्रास दिला वीणा ला, लोक उगीचच मागे लागतात, त्यापेक्षा ठरलय ना लग्न, मग करून टाकू पटापट",....... पप्पा
" आता एका पाठोपाठ दोघांचे लग्न करून टाकणार आम्ही",...... मम्मी
" सोहा आपण दोघी जाऊ या शॉपिंगला तुझ कॉलेज झाल की तू डायरेक्ट ऑफिसला ये",...... मम्मी
" ठीक आहे मम्मी , तू आशिष च्या मम्मी शी बोलून घे आज ",..... सोहा
" मी माझ्या फ्रेंडला सांगून ठेवते, तिच्या boutique ला फोन करून जाऊ , त्यांचा टेलर देईल एका दिवसात ब्लाऊज शिवून ",...... मम्मी
" वीणा साठी ही एक सेट तयार करू",...... सोहा
" हो घेवू या, ते काम झाल की ज्वेलरी घेवू ",...... मम्मी
"तुम्ही रविवार साठी केटरर बूक करा, फुल मिठाई लागतील, गिफ्ट काय द्यायचे, वीणा च्या घरचे पाहिल्यांदा येणार आहेत त्यांना ही गिफ्ट घ्यावे लागतील ",....... मम्मी पप्पांशी बोलत होती पप्पा सगळे कामे लिहून घेत होती
"पाहुणे कोण कोण येणार आहेत",..... सोहा
"कोणी नाही आपण घरचे, काका काकू, वीणा च्या घरचे, आशिष च्या घरचे ",...... मम्मी
चालेल.....
समर ऑफिसला आला मिस्टर दीक्षित आलेच मागून
" आज काय काय मीटिंग आहेत मिस्टर दीक्षित",..... समर
त्यांनी माहिती दिली,
"उद्या मिस्टर प्रकाश आहेत ना वीणा चा भाऊ त्यांना ऑफिस मध्ये बोलवुन घ्या त्यांच्याबरोबर ते नवीन प्रोजेक्ट आहे ते सुरू करायचे आहे",...... समर
"कोण सर वीणा त्या साई इंटरप्राईजेस च्या का ",..... दीक्षित
" हो, प्रकाश बहुतेक पाच नंतर येतील, त्यांच्या वेळे नुसार सगळ ठरवता येईल, नंतर मला कळवा ",...... समर
मिस्टर दीक्षित गेले....
समरने वीणा ला फोन लावला
" बोल समर",...... वीणा
" काय करते आहेस, आज संध्याकाळी भेटणार का",...... समर
" हो चालेल, नवीन ऑर्डर आली आहे त्याच काम सुरू आहे ",.... वीणा
"मी येतो तुला घ्यायला",...... समर
" हो चालेल",...... वीणा
" ऑफिस बाहेर मी आल्यावर कळवतो तेव्हा बाहेर ये, आज वेळेवर मिळाली ना टॅक्सी काही प्रॉब्लेम नाही आला ना ",..... समर
" नाही आला काही प्रॉब्लेम, हो मिळाली वेळेवर टॅक्सी",...... वीणा
वीणा बोलली खरं किती टॅक्सीने आली, त्यानंतर तिलाच वाईट वाटत होते की कशाला खोटं बोललो, पण कस काय सांगणार समरला, बघू नंतर सांगते शांतपणे, समजून सांगू
लंच ब्रेक मध्ये वहिनी चा फोन आला......
"आज येता आहेत ना ताई तुम्ही लवकर आपल्याला खरेदी ला जायचं ते लक्षात आहे ना",..... वहिनी
" उद्या जाऊया का वहिनी आज संध्याकाळी समर येणार आहे ऑफिसला, नाहीतर मग मी त्याला अर्धा तास भेटते आणि लवकर येते मग जाऊ आपण उशीर झाला रात्री तरी काय हरकत नाही",....... वीणा
"चालेल तुम्ही या मग ठरवू आपण ",.... वहिनी
" वहिनी तू लिस्ट बनवून ठेव काय काय घ्यायचं आहे आणि कुठल्या कुठल्या दुकानात जायचा आहे ते पण ठरवून ठेवा म्हणजे आपल्याला शॉपिंग करायला सोपे जाईल आणि आपल्या साड्या वरचे ब्लाऊज शिवून येणार आहेत का लगेच",..... वीणा
" माझ्या ओळखीचे आहे टेलर त्यांच्याशी बोलणं झाला आहे उद्या सकाळी दिले तरच होईल काम त्यासाठी आज शॉपिंगला जावंच लागेल",..... वहिनी
" हो बघते मी वहिनी, येते लवकर ",..... वीणा
" ऐक ना प्रीती आज संध्याकाळी मला आणि वहिनीला शॉपिंग ला जायचं होतं आणि समरही म्हणतोय की आपणही भेटू संध्याकाळी काय करावं समजत नाही",.... वीणा
" तू समर ला भेट आणि त्याला सांग की मला घरी सोडून दे, रस्त्यात तुम्हाला बोलता येईल आणि घरी गेले की लगेच वहिनी बरोबर शॉपिंगला जा",...... प्रिति
" किती हुशार आहेस ग तू, ही आयडिया बरी पडेल ",........ वीणा
प्रिती हसत होती.....
सोहा ऑफिस मध्ये आली ती समर ला भेटायला केबिन मध्ये आली
" आज कसा काय इकडे चक्कर कॉलेज झाल्यावर तुझी आशिष समोर हजेरी असते ना ",..... समर
" हो ना जशी ऑफिस सुटलं की तुझी वीणा समोर हजेरी असते ",.... सोहा..... " मम्मीने बोलवलं मला shopping ला जायच आहे आम्हाला",.......
"मजा आहे बाबा शॉपिंग काय, साखरपुडा काय, एक काम कर, मला ही एक कुर्ता आण",....... समर
"तू वीणा सोबत जा शॉपिंग ला, मला वेळ नाही, या पुढे वीणा च्या पसंतीने घे कपडे",........ सोहा
समर हसत होता.....
" केवढा खुश झाला तो बापरे ",...... सोहा
" चूप ग तू, जा बर शॉपिंग ला",..... समर
" बर माझ्याकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे",.... सोहा
" काय? सांग ना",...... समर
" हे असं नाही सांगणार तू त्या बदल्यात मला काय देशील ते सांग ",..... सोहा
" अरे हे काय असं सारखं हे दे ते दे",..... समर
" जाऊदे मग तुला नसेल ऐकायच तर मी जाते, पण आज मम्मी पप्पा डायनिंग टेबलवर तुझ्या बद्दलच बोलत होते",..... सोहा
काय.......
"तुला तर ऐकायचं नाही ना मग तुला जाऊ दे ",.....सोहा
" काय हव आहे ते जरा पटापट सांगा ",..... समर
" ये हुईना बात, मला मोबाईल मेकअप किट ड्रेस ज्वेलरी खूप काही हव आहे",...... सोहा
" आता जरा आशिष ना त्रास देत जा",...... समर
" ठीक आहे मग तु मला नसेल देत तर मी काहीही सांगणार नाही ",..... सोहा
" सांग बाई सांग, तुला जे घ्यायच ते घे, शॉपिंग कर माझं कार्ड घेऊन जा",...... समर
" सकाळी मम्मी पप्पा बोलत होते की आता ते तुझ आणि वीणा च लग्न पण लवकरच लग्न करून टाकणार आहेत",...... सोहा
" काय बोलतेस काय ",.... समर
" आहे की नाही ब्रेकिंग न्यूज, पप्पा बोलत होते की अधिकारी सारखे लोक मध्ये येतात आणि त्रास होतो, त्या पेक्षा समर च ही लग्न लवकर करून टाकू ",....... सोहा
समर खूप आनंद होत होता, त्याच्या चेहर्यावर ते स्पष्ट दिसत होत, सोहा त्याला फार चिडवत होती,.......
"जा ग तू सोहा खूप काम आहे, उगीच मध्ये मध्ये करतेस ",....... समर खूपच लाजत होता
" अरे एहसान फरामोष, एवढी आनंदाची बातमी दिली आणि मला घालवतोस इथून, ठीक आहे तेरे लिये कुछ भी, जाते मी, मला माहिती आहे तू अधिकारींना मनातल्या मनात thank you बोलत असणार, त्यांच्या मुळे होणार आहे लवकर लग्न",..... सोहा
" समर ला सुचत नव्हत काही, सांगू का वीणाला सगळ की थांबू, नको घाई करायला अजून न्यूज कन्फर्म नाहिये",...... समर
सोहा मम्मी च्या केबिन मध्ये आली, नुकतीच मीटिंग आटपून मम्मी आली
" सोहा जेवून घे आधी मग निघू, पप्पा समर यांना बोलव ",....... मम्मी
सगळ्यांनी लंच आटोपला....
"आम्ही दोघी जातोय शॉपिंग ला, तुम्हाला काही आणायच आहे का",...... मम्मी
नाही समर केबिन मध्ये निघून गेला....
"आजी आजोबा तुमचा समर चा ड्रेस आणते मी ",...... मम्मी
" हो चालेल ",...... पप्पा
सोहा खुश दिसत होती...
संध्याकाळी समर वीणा ला घ्यायला आला.....
"बर झाले लवकर आलास तू समर, मला आता घरी सोड",....... वीणा
" काय ग लगेच घरी जायचं घाई आहे का तुला",.... समर
" हो वहिनी चा फोन आला होता की आम्हाला शॉपिंग ला जायचं आहे सोहा चा साखरपुडा आहे ना मग कपडे शिवून मिळायला पाहिजे",..... वीणा
"मी पण तुला म्हणणार होतो की आपण शॉपिंग ला जायचं का मला ही ड्रेस बघायचा आहे तुझ्या पसंतीचा आपण असं करूया का, तुझ्या घरी जाऊन वहिनीला घेऊन सोबत आणि आपण तिघे शॉपिंग करून घेऊ",..... समर
" पण तुला ड्रेस कुठे घ्यायचा आहे आधी आपण तुझा ड्रेस घेऊ मग तू मला घरी सोड",..... वीणा
वीणाच्या मनात होतं की हा मोठ्या दुकानात जाईल तिथे एकुण एक ड्रेस हजार रुपया पर्यंत असतात, मी आणि वहिनी तिकडे शॉपिंगला गेलं तर काहीच परवडणार नाही
" काय विचार करते आहेस वीणा तुझी वहिनी नाही बोलेल का आपल्यासोबत यायला ",...... समर
" नाही तसं काही नाही पण तिला आत्ता काम असेल आपण जावून येऊ मग आम्ही दोघी जाऊ शॉपिंग ला",......वीणा
समरने ऐकलं नाही.... "तू वहिनीला फोन कर काम राहू दे आपण जाऊन येऊ",
वीणा ने नाईलाजाने वहिनीला फोन केला........" वहिनी मी आणि समर येत आहोत तुम्ही तयार करा रहा आपण जाऊन समर सोबत शॉपिंगला"
" पण आपले दुकान ठरले होते ना ताई समर बरोबर शॉपिंग ला जाऊन कसं चालेल आपल्याला",..... वहिनी
" सांगते मी तुला नंतर तू चल तर खरी ",..... वीणा
समर गाडी मध्ये मेन रोडवर थांबला,..... वीणा तू वहिनीला घेऊन ये",
वीणा घरी आली वहिनी तयारच होती....." काय झालं ताई आपल्याला त्यांच्यासोबत जायचं आहे का शॉपिंग ला",
" अगं समर ऐकतच नाहीये आपण जाऊ त्याच्यासोबत आणि त्याचा ड्रेस घेऊन झाला की आपणही इतर ड्रेस बघितल्या सारखं करू आणि वापस येऊ आणि आपण इथेच आपल्या गल्लीत कपडे घेऊन",...... वीणा
चालेल....... वहिनी
दोघी गाडीत घेऊन बसल्या......
" खूप छान आणि मोठी गाडी आहे तुमची समर खुपच छान वाटत आहे ",..... वहिनी
" गाणे लावू का वहिनी",..... समर
" लावा लावा रेडिओ लावा",...... वहिनी
खूप छान मोठ्या मॉलमध्ये समोर वीणा आणि वहिनी पोहचले....
" काय काय घ्यायचा आहे तुम्हाला",....... समर
"आम्हाला मुलांना कपडे घ्यायचे आहेत आम्हाला साड्या दादा बाबा प्रकाश ला कपडे",....... वहिनी
चला मग......
तसं वहिनी आणि वीणा एकमेकींकडे बघत होत्या...
" केडिट कार्ड सोबत आणल आहे का ताई सोबत, समजा घ्यावाच लागला तर ",...... वहिनी
" हो आहे सोबत काही काळजी करू नको ",..... वीणा
" काय बोलत आहात तुम्ही दोघी मला पण सांगा ना ",.... समर
" काही नाही आम्ही कपड्या बद्दल डिस्कस करत होतो",.... वीणा
"चला आधी मुलांचे कपडे घ्यायचे का",..... समर
" नाही समर तुझा ड्रेस घेऊन पण आम्ही आरामशीर कपडे",... वीणा
"तुला मला इथून घालवायची घाई झाली आहे का? केव्हाचा बघतो आहे मी की तू कपडे घे आणि घरी जा असं म्हणते आहेस तू ",....... समर उगीच रागवल्या सारख दाखवत होता
" नाही रे, तसं काही नाही तू ही ना ",.... वीणा
वीणा ला आणि वहिनीला आता घाम फुटला होता...
लहान मुलांच्या सेक्शन ला आले ते, दोघ मुलांचे वय सांगितले, अतिशय छान छान ड्रेस सेल्समन दाखवत होता दोन सुरेख फ्रॉक आरुसाठी आणि टी शर्ट पॅन्ट अभी साठी अजून एक कुर्ता-पायजमा वहिनीला पसंत पडला वहिनीने डोळ्यानेच वीणाला विचारलं काय करू...
" घे वहिनी किती छान ड्रेस आहेत",..... वीणा
पुढे मेन्स सेक्शन मध्ये छान कुर्ता पैजामा बरेच होते, कार्यक्रम साखरपुड्याचा आहे त्यामुळे सगळ्यांनी कुर्ता-पायजमा घालायचं ठरलं होतं, त्यामुळे आता फक्त साईज सांगून तीन चार कुर्ता पैजामा वीणा ने पसंत केले, वहिनी तिकडे कुर्ता पायजमा वर जॅकेट बघत होती
वीणा आणि समर काउंटरवर उभे होते
"मी कुठला घेऊ यातला",...... समर विचारत होता
"समर तू तो व्हाइट घे, तुला व्हाईट कलर खूप छान दिसतो, तू नेहमी व्हाइट शर्ट घालतो ना तेव्हा खूप हँडसम दिसतो",........वीणा ,
समर वीणा कडे बघतच राहिला...
वीणा ला समजले की ती काय बोलली आहे, दोघ हसायला लागले, समर लाजत होता....
आता साड्यांची खरेदी, वीणा आणि वहिनी आतल्या स्टोअर मध्ये गेल्या समर साईडला उभा होता अतिशय सुंदर सुंदर साड्या दाखवत होते वहिनीला काय बघू काय नाही असं होत होतं हळुच वहिनी विना जवळ येत बोलली,..... "ताई आज आपलं बिल नक्की दहा हजाराच्या आसपास आहे",
"काय करते वहिनी क्रेडिट कार्डने बिल भरून टाकू नंतर नंतर करू ऍडजेस्ट",..... वीणा
"आणि समरच्या आई आजी यांना पण साड्या घ्यायच्या होत्या त्याचं काय, समरचे वडील आणि आजोबा यांना कपडे घ्यायचे होते ना",...... वहिनी
" हो हो घेऊया तर"".......वीणा ,
"सोहाला काय गिफ्ट घ्यायचं मला काही समजत नाही, काही ठरल का",....... वहिनी
वीणाने पाच सहा साड्या पसंत केल्या, ती समर कडे बघत होती समरने खूप सुंदर पांढरी गुलाबी अशी साडी आधीच पसंत करून वीणा ला दाखवली,.... "ही साडी तूच ठेव वीणा",
वीणा छान हसत होती, वहिनी त्या दोघांबरोबर शॉपिंग एन्जॉय करत होती
समर चे वडील आणि आजोबांसाठी पण वीणा ने दोन ड्रेस पसंत केले, मुलांसाठी कपडे घेऊन झाले होते आता फक्त सोहाच गिफ्ट बाकी होतं ते आता घरी सगळे मिळून ठरवणार होते आणि उद्या घेणार होते
बिल करण्यासाठी तिघे जण रांगेत उभे राहिले, वहिनी सगळे कपडे व्यवस्थित आहे की नाही ते बघत होती, एखाद्याचे जरी कपडे राहिले तरी परत येण्या साठी आता वेळ नव्हता, बिल तयार झालं तसं समरने पटकन त्याचं कार्ड दिलं सगळं बिल समरने भरलं, मधेच वीणाने सांगितले की आमचे बिल वेगळ करा, समरने सांगितलं की नाही एकत्र करा, थोडीशी ओढाताण होऊन शेवटी समरने बिल भरलं, तीघ बाहेर आले.....
"समर तु हे पैशाचं किती झाले ते आमचा आम्हाला सांगा, आम्हाला आमचा खर्च करू दे, बाबा ओरडतील ह आम्हाला ",...... वहिनी
"हो बरोबर बोलते आहे वहिनी",...... वीणा
"हो मी सांगेन तुम्हाला किती झालं तुमचं बिल, चला आता आपण जरा काहीतरी खाऊ या, भूक लागली आहे खूप ",...... समर
तीघ फूड कोर्ट ला गेले समरने तिघांसाठी पिझ्झा घेतला, खूप छान गप्पा मारत बसले ते, मुलांसाठी पण मोठा पिझ्झा पार्सल घेतला, ते घराकडे निघाले बराच उशीर झालेला होता...
" समर घरी चलतोस का",..... वीणा
" नाही आता खूप उशीर झाला आहे, मी घरी जातो, मला उद्या एक मोठी मिटींग आहे त्याची तयारी करायची आहे, पिशव्या नेता येतील ना घरापर्यंत तुम्हाला",....... समर
" काही प्रॉब्लेम नाही, काही जड नाहीत पिशव्या, आम्ही जाऊ",....... वीणा
वहिनी आणि वीणा घरी आल्या,
"खूप छान झाली नाही खरेदी, सगळं बिल समर ने दिलं, पण असं चालणार नाही, वीणा ताई तुम्ही उद्या समरला विचारून घ्या किती बिल झाला आणि त्याच्या अकाउंटला पैसे टाकून द्या ",...... वहिनी
" हेच वाटत होतं मला, अस होईल वहिनी, म्हणून मी समर ला बोलत होती की आम्ही जाऊ आमच्या शॉपिंगला",....... वीणा
घरी आई बाबा टीव्ही बघत होते, वहिनीने पिझ्झा मुलांना खायला दिला, आई बाबांना दिला, वहिनीची बडबड सुरू होती कुठे गेलो किती छान शॉप होते मोठा moll होता, आई बाबा कौतुकाने सगळ ऐकत होते
" आम्हाला नको पिझ्झा, मुलांना दे ",..... आई
" अगं खाऊन तर बघ किती छान आहे",.... वीणा
मुलांना खूप आनंद झाला होता एक तर नवीन कपडे त्यात पिझ्झा
बाबा रागवलेच,..... "कश्याला समर ला बिल देवू दिल तुम्ही, आपल गिफ्ट आहे ना त्यात",
"त्याने दिल बळजबरीने",...... वीणा
" उद्या त्यांचे पैसे वापस कर",..... बाबा
हो बाबा........