Login

प्रित तुझी माझी...❤️भाग 33

"आम्ही इथे तुझी माफी मागायला आलो आहोत वीणा, तुला खूप त्रास झाला, का करतात काही लोक असे काय माहिती, आम्ही आहोत तुझ्या सोबत don't worry ",...... पप्पा



ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

आजी आजोबा सगळ ऐकत होते, वीणा साठी त्यांना खूप वाईट वाटत होत, तिला किती बोलले काही कारण नसतांना, वीणा ला वाईट वाटत असेल, आपण तिला भेटायला पाहिजे, सांगायला पाहिजे आम्ही आहोत तुझ्या साठी.........


"मला असं वाटत आहे की तुम्ही लोकांनी वीणा च्या घरी आता जायला पाहिजे आणि तिला पाहिजे आहे आम्ही आहोत तुझ्या साठी ",..... आजी


"हो बरोबर बोलते आहेस तू आजी, मी जाऊन येतो वीणा कडे",...... समर


"थांब समर मी पण येतो तुझ्यासोबत, वीणा कडे",........ पप्पा


"हो जावून या भेटून या वीणा ला, तिला तिकडे सेफ वाटत नसेल तर इकडे ये म्हणा",.... मम्मी


पप्पा आणि समर वीणा कडे जायला निघाले...


वीणा च आवरण सुरु होत, आई वहिनी वीणा स्वयंपाक घरात काम करत होते, बाबा टीव्ही बघत होते, दादा मुलांचा अभ्यास बाजूच्या रूममध्ये घेत होता, प्रकाश फोनवर बोलत होता,....


दार वाजलं, बाबांनी उठून दार उघडलं, दारात समर आणि त्याचे वडील होते, बाबांना दोन मिनिटं समजलच नाही काय करावं


"या ना आत",..... समर आणि पप्पा आत आले


"वीणा समर आला आहे, परांजपे साहेब पण आले आहेत",..... बाबा


वीणा बाहेर आली, तिला खूप आनंद झाला होता, पप्पा आणि समर कॉटवर बसले, वीणा ने त्यांना पाणी दिलं समर विणा कडेच बघत होता


"आम्ही इथे तुझी माफी मागायला आलो आहोत वीणा, तुला खूप त्रास झाला, का करतात काही लोक असे काय माहिती, आम्ही आहोत तुझ्या सोबत don\"t worry ",...... पप्पा


" काहीही काय पप्पा तुम्ही माफी मागायची काहीही गरज नाही, मी एकदम Ok आहे " ,....... वीणा


"हो परांजपे साहेब तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही",..... बाबा


"नाही कसं विणा ला किती त्रास झाला या सगळ्यामुळे, आम्ही आधीच विचार करायला पाहिजे होता या गोष्टीचा, पण आता नाही, यापुढे वीणा ला किंवा तुम्हाला सगळ्यांना कसलाच त्रास होणार नाही",....... पप्पा


" नाही हो चालायचं या गोष्टी थोड्याफार ",...... बाबा


"वीणा आता आमच्या घरची होणारी सून आहे, आणि हा त्रास तीला समर मुळे झाला आहे ",..... पप्पा


" नाही पप्पा काही प्रॉब्लेम नाही ",.... वीणा


" वीणा तुला अजून ते अधिकारी जास्त काही बोलले नाही ना तू सगळं सांगितलं आहे ना आम्हाला आणी तु कोणालाच घाबरू नकोस कोणीही आपला काहीही वाकड करू शकत नाही ",..... पप्पा


" वीणा खूपच सोशिक आहे म्हणूनच काळजी वाटते, मी बोललो आहे तिच्याशी, आता ओके आहे सगळं, तुम्ही काळजी करू नका ",..... बाबा


" वीणा बेटा तू उद्यापासून रेग्युलर ऑफिसला जायला सुरुवात कर तुला यापुढे कसलाही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन ",...... पप्पा


" हो पप्पा तुम्ही प्लीज घाबरू नका आम्हाला सवय आहे या गोष्टीची, मी घेईन काळजी ",..... वीणा


आईने चहा आणला, तेवढ्यात वहिनी जाऊन दादा ला बोलवुन आली, बाबांनी सगळ्यांशी ओळख करून दिली, दादा प्रकाश समर पप्पा बाबा छान बोलत बसले होते


" या रविवारी आमच्या सोहा चा साखरपुडा आहे तर तुम्ही सगळे आमच्या घरी या कार्यक्रमाला ",..... पप्पा


" सगळे म्हणजे सगळ्यांनी यायचं",..... समर


हो.....


" दादा वहिनी प्रकाश मुलांनाही आणायचं आई-बाबा सगळे",.... समर


बाबा आशिष बद्दल परांजपे साहेबांना माहिती विचारत होते, मस्त गप्पा सुरू होत्या त्यांच्या, आता वातावरण छान हलकं झालं होतं


"वीणा ताई जा समरला बाजूची रूम दाखवा",..... वहिनीने समर आणि वीणा ला भेटायला मदत केली


" हो जा तुम्ही बघून या बाजूची रूम",.... बाबा परांजपे सरांना सांगत होते


"मी बसतो इथेच तुमच्याशी बोलत, समर तू जा",..... पप्पा


समर ला खूप आनंद झाला होता, समर आणि वीणा बाजूच्या रूम मध्ये गेले अभी आरु होते सोबत, वहिनीने खूप सांगितल मुलांना जाऊ नका, पण मुलं कसले ऐकताना, समर ने दोघांना खाऊ आणला होता म्हणून दोघ त्याच्या आजुबाजुला असायचे तो आला की, आत मध्ये गेल्यानंतर समरने विणाचा हात हातात घेतला, बराच वेळ ते दोघ तसेच शांत उभे होते,


"आज तू मला आता एका गोष्टीचं प्रॉमिस कर वीणा कधीही काहीही होऊ दे तू माझ्यापासून अशी कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाहीस",....... समर


" मला भिती वाटत होती, धोका कितपत आहे ते समजत नव्हत, मी सांगणार होती तुला ",..... वीणा


"मी तुला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही काळजी करू नकोस ",...... समर


" सॉरी मी ही यापुढे तुला सगळं सांगत जाईल मला अगदी वाटलंच होतं दुपारी की सांगून द्याव तुला सगळं पण मला असं वाटलं की ते लोक तुझ्या पाळतीवर आहेत धोका होण्यापेक्षा न सांगितलेलं बरं",...... वीणा


" आणि तू मला काय नकार द्यायचा विचार केला होतास का मला आत्ता आई सांगत होत्या ",.... समर रागावला होता


" काय झालं ते सगळा गोंधळ झाला, पण मी सॉरी बोलली ना, अरे तू ऐकायला हवा होत ते अधिकारी एवढे बोलले मला, मला भीती वाटत होती की तुला काही व्हायला नको, मी रात्रभर विचार करत होती याबद्दल, दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की तुझ्या पप्पांना सगळं सांगून देऊ जे होईल ते होईल आणि वहिनी ने खूप मदत केली मला, वहिनी मुळेच मला खूप धीर मिळाला",........ वीणा


" It\"s ok पण तू काहीही झाल तरी असा विचार करणार नाहीस या पुढे, विचार कर माझ काय होईल",..... समर


"मी काही करणार नव्हते अस, मी हार मानणारी नाही, प्लीज परत एकदा sorry",.... वीणा


" ठीक आहे, कार्यक्रमाला सगळ्यांना घेऊन ये, आपण हा प्रोग्राम झाल की भेटू आरामात, खूप धावपळ होते आहे सध्या ",....... समर


"हो चालेल, घरी कसे आहेत सगळे आजी-आजोबा मम्मी सोहा सगळे",.... वीणा


"ठीक आहे आजीला तुझी खूप काळजी वाटते आहे ",..... समर


"झाली का सगळी साखरपुड्याची तयारी",....... वीणा


" कशातच काही नाही अजून, आता दोन तीन दिवसापूर्वी तर भेटून आलो आम्ही त्या लोकांना आणि आता कालपासून तर हे अधिकारी प्रकरण झालं, आज दिवसभर बिझी होतो, बघू आता मम्मी-पप्पा करतील उद्या परवा तयारी ",.... समर


"किती वाजता आहे साखरपुडा",.... वीणा


" संध्याकाळी असेल बहुतेक साखरपुडा पण तुम्ही दुपारपासूनच या तशी मम्मी करेलच फोन आईंना",..... समर


वीणा आणि समर बराच वेळ बोलत होते आता जरा दोघांना बरे वाटत होतो


"हे कोण आहेत आत्या तू यांच्याशी लग्न करणार का",.... अभी


"हो बेटा", ... वीणा


"ते चांगले आहेत", ..... अभी


"खाऊ मिळाला तर लगेच चांगले ",.... वीणा


समर वीणा दोघ हसत होते,.... "काय म्हणतोय अभी वीणा",.. समर


वीणा लाजत होती,....


"लवकर विचार करू या आता आपण आपल्या लग्नाचा",.... समर


"चल काही तरी",..... वीणा


समर वीणा वापस आले....


"चला आम्हाला निघायला हव ",.... पप्पा


बाबा बाहेर पर्यंत सोडायला आले


"काही काळजी करू नकोस वीणा, काही वाटल तस तर सांग ",..... पप्पा


हो....


पप्पा समर निघाले


"किती साधे आहेत ना हे लोक एवढे श्रीमंत असून एकदम down to earth",..... दादा


हो ना.... बाबा


पप्पा समर घरी आले


"कशी आहे वीणा? भेटली का",...... मम्मी


" हो मम्मी वीणा एकदम ठीक आहे",..... पप्पा


जेवण झाल....


मम्मी पप्पा रूम मध्ये आले


" आज फारच दमलो ना, किती ते टेंशन बर वीणा ला सुचल आपल्याला सांगायला ",...... मम्मी


"हो ना अधिकारींनी घोळ घालून ठेवला त्यांना वाटला वीणा गरीब आहे ती काय करेल",..... पप्पा


"कस आहे हो वीणा च घर घरची माणसे ",.... मम्मी


"एकदम साधे माणसे आहेत ते, घर साध स्वच्छ, सगळे मस्त राहतात, विचार खूप छान आहेत त्यांचे, मला आपल्या दोघांच्या पूर्वी च्या घराची आठवण आली, खूप छान आहेत वीणा च्या घरचे, काही श्रीमंत लोक कसे विचारांनी वागायला खराब असतात, त्या पेक्षा साधे बरे, मी त्यांना सोहाच्या साखरपुडा साठी आमंत्रण दिल तू ही नंतर फोन करून टाक",....... पप्पा


" आता लगेच होईल का रविवारी कार्यक्रम? धावपळ होईल, पुढच्या आठवड्यात ठेवू या का प्रोग्राम ",..... मम्मी


" नाही होणार धावपळ ,मी आहे ना मदतीला, ठरलय तस करू आपण ",...... पप्पा


" काही खरेदी झाली नाही आपली, आशिष ला कपडे घ्यावे लागतील, अंगठी घ्यावी लागेल, त्याच्या घरच्यांना कपडे घ्यावे लागतील, सोहाची तयारी करावी लागेल, खूप काम आहेत",...... मम्मी


"अजून आहेत दोन दिवस करू उद्या पासून तयारी, तू काळजी करू नकोस",...... पप्पा


परांजपे मॅडमने लिस्ट करायला घेतली...


समर बर्‍याच वेळ आजी जवळ बसुन होता


" झाली का भेट वीणाशी कस वाटतय आता ",....... आजी


" आजी खूप छान वाटतय",..... समर


" म्हणून पाठवले तुला तिकडे, एवढ सगळ झाल, तिला भेटायला हव होत तू ",...... आजी


" Thank you आजी, तुला कस समजत माझ्या मनातलं",..... समर


सोहा चा फोन सुरु होता....


"कोणाशी बोलते आहे सोहा आजी ",.... समर


" कोण असणार दुसर आशिष, त्याला सांगते आहे ती काय काय झाल इकडे",....... आजी


" साखरपुडा आहे ना रविवारी",..... समर


" हो ना आजी वीणा च्या घरचे येणार आहेत सगळे, पप्पांनी आमंत्रण दिल",...... समर


"तरीच एवढा खुश आहेस",.... आजी


जेवण झाल वीणा मागच आवारात होती आई बाबा काही तरी हिशोब करत बसले होते दादा वहिनी ही मध्ये मध्ये काही तरी सांगत होते


" काय सुरू आहे ",.... वीणा


" सोहा चा साखरपुडा आहे तर आपल्या जायच आहे सगळ्यांना कपडे घ्यावे लागतील तिकडे गिफ्ट द्यावा लागेल ",...... आई


" या गोष्टीचा मी विचार केला नाही",.... वीणा


"जास्त आहे का खर्च? मला ड्रेस आहे नवीन बाबा, मुलांना घ्या फक्त कपडे",.... वीणा


"हो बाबा आम्हाला ही कपडे आहेत",... वहिनी


" ते काहीही चालणार नाही सगळ्यांनी छान कपडे घ्या",... बाबा


"पण एवढा खर्च झेपेल का आपल्याला",..... वीणा


"होईल तेवढं करायच आपल्याकडून वीणा, तुझ्या सासूबाई आणि सासरे आजी आजोबा यांना कपडे घेऊ, सोहा साठी गिफ्ट घेऊ, लगेच दोन दिवसात आहे कार्यक्रम उद्या जावंच लागेल खरेदीसाठी",..... बाबा


"आई वहिनी मी काय घालू साडी नेसू की ड्रेस घालू",....वीणा


"साडी नेस ग",... आई


"हो ग साडी नेसा",... वहिनी


"पण मला सवय नाही आहे साडीची, तिथे दिवसभर कसं होणार, काही काम सुचणार नाही",.... वीणा


"तिथे कुठे जाऊन आपल्याला काम करायचा आहे नुसतं मिरवायचं तर आहे",.... वहिनी


" सकाळी ड्रेस घाला संध्याकाळी प्रोग्रॅमला साडी",..... वहिनी


"खर्चाचं कसं करणार आहोत आपण माझ्याकडुन ही पैसे घ्या",.... वीणा


"सगळ्यांकडून घेऊ चिंता करू नका",.... बाबा


सगळे आवरून झोपायला गेले, वीणा ही पुस्तक घेऊन वाचायला बसली, बर झाल आलेल संकट गेल, नाही तर किती मुश्कील झालं असतं, समर आज लगेच मला भेटायला आला, खुपच छान वाटतय,..... तिने समर ला good night चा मेसेज पाठवला...


सकाळी सगळं आवरून वीणा ऑफिस ची तयारी करत होती, समर चा फोन आला


"वीणा ऑफिसला टॅक्सी ने जा",..... समर


"समर तू टेंशन घेवू नको मी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही",..... वीणा


"नाही पण तरी ही तू टॅक्सी ने जाणार आहेस",....... समर


"ठीक आहे", ..... वीणा


वीणा विचार करत होती कस काय परवडणार आपल्याला रोज टॅक्सीने जाण येण, सगळा पगार त्यात संपायचा, हे समर ला कस सांगणार, काय करू आता, बसने जाते, प्रोग्राम चा ही खर्च आहे एवढा, आई बाबा काय काय करतील......


वीणा बस ने ऑफिसला आली, प्रीती यायची होती अजून, प्रशांत आलेला होता,


"काय झालं वीणा काल का आली नव्हती तु",...... प्रशांत


वीणा ने प्रशांतला जे झालं ते सगळं सांगितलं, ते दोघ बोलत असतानाच प्रीती आली, तीघ मिळून बराच वेळ बोलत होते, प्रशांतला हे आश्चर्यच वाटलं की हे श्रीमंत लोक कसे दुसऱ्यावर दबावात आणतात,..... "किती वाईट वागले ते वीणा तुझ्या शी, वीणा तू सांगायला हवं होता आम्हाला",


"हो ना मी पण तेच म्हणत होती वीणाला",.... प्रिति


"मला टेंशन आल होत, सुचत नव्हत काही, मी तुम्हाला दोघांनी सांगणार होते, मी त्यादिवशी विचार करत होती की काय करता येईल पुढे, चला कामाला लागु आता",...... वीणा


सर आले त्यांनी प्रशांत ला आत बोलवलं


" त्या दिवशी समर कडे काय झालं सांग ना या गडबडीत राहून गेल ते सगळ",..... प्रिति


" अरे हो, मी समर कडे गेले, खूप मोठा छान बंगला आहे त्यांच्या, तीन मजली, समोर गार्डन वगैरे मस्त, आई बाबा आजी आजोबा सोहा सगळे खूप चांगले आहेत, समर ची रूम खूप छान आहे, इकडे ये मी तुला समरचे लहानपणीचे फोटो दाखवते, त्याच्या रूम मध्ये फ्रेम करून ठेवले आहेत, समरच्या आईने मला ड्रेस दिला, आजीने या बांगड्या, कश्या आहेत ",...... वीणा


"खूप छान आहेत, मस्त दिसतात तुला ",.... प्रिति


वीणाने प्रीती ला सगळे फोटो दाखवले.....


" खूप छान वाटत होत तिकडे समर जवळ" ,..... वीणा


"मस्त आहेत फोटो , ओहो लग्नाची घाई झाली का मॅडम",....... प्रिति


" काहीही काय ग प्रीती ",..... वीणा लाजत होती


"प्रीती ऐक ना समरच्या बहिणीचा सोहा चा साखरपुडा आहे रविवारी, आम्हाला तिकडे जायचं आहे मला खरेदी ला जायचं आहे, तर काय काय घेऊ मी, समरच्या आई आणि आजीसाठी साडी घ्यायची आहे",..... वीणा


"कोणी आहे का सोबत ",..... प्रिति


" हो आई वहिनी वगैरे कोणी तरी येतील ",..... वीणा


" आज मी सकाळी ऑफिसला येत होती ना तर समर चा फोन आला होता, त्याचं म्हणणं आहे की मी टॅक्सीने ऑफिसला याव, आता तूच सांग प्रीती टॅक्सीने ऑफिसला येणार परवडणार आहे का मला, मी काय सांगू समरला, हे अधिकारी प्रकरण झाल्यापासून समर खूप घाबरलेला आहे माझ्यासाठी" ,...... वीणा


" मग काय ठरवल आहे तू, टॅक्सी ने आलीस का तू ",..... प्रिति


" नाही ग बस ने आली मी, पण त्याला सांगू नकोस ",...... वीणा


" अग पण समर ला समजल तर चिडेल तो ",..... प्रिति


" रविवारी आम्हाला त्यांच्याकडे कार्यक्रमाला जायचं आहे तो खूप खर्च आहे, काय काय करणार ग, घरात आहेत सगळे नोकरीला पण सगळ्यांचे पगार खूप कमी आहेत, पुढे आमच्या लग्नाचा खर्च कसा होणार आहे प्रीती",..... वीणा चिंता करत होती


"हो ग बरोबर बोलते आहेस तू",..... प्रिति


" तुझी कुठे पर्यंत आली लग्नाची तयारी ",..... वीणा


"आमचाही खूप खर्च होतो आहे, खरेदी बाकी आहे अजून ",..... प्रिति


"साखरपुड्याची तारीख ठरली का तुझी",..... वीणा


"नाही अजून पण आता ठरेलच",..... प्रिति


"झालं का तुझं काही बोलणं सचिनशी? या गडबडीत ते विचारायचच राहिलं",.... वीणा


" हो काल आलेला फोन",.... प्रिति


"कधी म्हणतात ते लग्नाची तारीख काढायची",.... वीणा


" अजून एवढ्यात नाही, सहा महिन्याने असेल बहुतेक, मला ही पैसे साठवावे लागतील",..... प्रिति


वीणा ही विचार करत होती पैसे जमवावे लागतील........

🎭 Series Post

View all