प्रित तुझी माझी... ❤️भाग 32

" मी परांजपे सरांच्या ऑफिस मधून आलो आहे, परांजपे सर खूप नाराज आहेत तुमच्या वर, हे काय करता आहात तुम्ही सर, मिस वीणाशी तुम्ही अस डायरेक्ट बोलायला नको होत, परांजपे सरांनी तसं तुम्हाला लग्नाचं वचन दिलं नव्हतं, तुम्हाला हे शोभत नाही अस वागण",..... मिस्टर प्रभाकर



ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

समर चा फोन येवून गेल्या नंतर वीणा ला जरा बर वाटत होत, बर झाल वहिनी ला सांगितल, तिने योग्य सल्ला दिला, आई आणि वहिनी ही समाधानी दिसत होत्या, बाबांना दादाला प्रकाश ला फोन करायला हवा....


वीणा ने बाबा प्रकाश आणि दादाला फोन करून जे सगळं झाला आहे ते सांगितलं, दादा तर रागवलाच...


"काय हे केव्हा झाल सगळ? कश्याला एकटीने सहन केलं मला सांगायला पाहिजे होतं",..... दादा


"तुम्ही लोक चिडतात म्हणून भीती वाटते ",....... वीणा


प्रकाश ही आश्चर्य चकित झाला,..... "एवढ झाल घरी मला काहीही माहिती नाही, वीणा तू या पुढे सगळ आम्हाला सांगणार आहेस",


" तुम्हा लोकांना आज च्या दिवस हा हाफ डे घरी येता येईल का? आजच्या दिवस काळजी घ्यायला हवी ",...... वीणा


"हो चालेल येतो आहोत आम्ही लवकर ",.... दादा


दादा बाबा प्रकाश लवकर घरी आले, वीणा ने त्यांना काय झालं ते पूर्ण सांगितलं, प्रकाश आणि दादा रागवले वीणा ला, अश्या गोष्टी लगेच सांगायच्या आम्हाला, कशाला ऐकुन घेतल त्यांच..


" हो दादा प्रकाश मला काही सुचत नव्हत, आता तिकडे अधिकारींन कडे काय होतंय ते कळेलच संध्याकाळपर्यंत",...... वीणा


" पण त्या लोकांची हिम्मतच कशी झाली आपल्याला असं बोलायची, त्यांनी वीणा वर जे आरोप केले ते मला अजिबातच आवडलेले नाहीत, कोणीही येत काहीही बोलत, चांगल खडसवायला हव होत ",... प्रकाश


" हो ना किती चुकीच आहे ते, जाऊ द्या, आता आपल्याला माहिती झाल ना, ते लोक कसे आहेत, सावध राहू या आता, त्या लोकांचा जास्त विचार करण्यात काहीही अर्थ नाही",..... दादा


" समर च्या घरी सगळे ठीक आहेत ना, तू केला होता का त्यांना फोन ",..... बाबा


" हो बाबा झाल बोलणं "...... वीणा
...........

मिस्टर प्रभाकर अधिकारी सरांच्या ऑफिस मध्ये पोहोचले, अधिकारी सरांनी त्यांना केबिनमध्ये बोलवले, ते कोण आहेत कुठून आलेत हे अधिकारी साहेबांना माहिती नव्हत....


" मी परांजपे सरांच्या ऑफिस मधून आलो आहे, परांजपे सर खूप नाराज आहेत तुमच्या वर, हे काय करता आहात तुम्ही सर, मिस वीणाशी तुम्ही अस डायरेक्ट बोलायला नको होत, परांजपे सरांनी तसं तुम्हाला लग्नाचं वचन दिलं नव्हतं, तुम्हाला हे शोभत नाही अस वागण",..... मिस्टर प्रभाकर


अधिकारी सर घाबरले जरा......


" तुम्ही परस्पर वीणाला गाठून असं तिला धमकी दिली, तुम्हाला काय वाटलं वीणा च्या पाठीशी कोणी नाही का? , परांजपे सर खूप नाराज आहे, त्यांनी मला तुम्हाला जाब विचारायला पाठवल आहे, तुम्ही वीणा आणि समरचा पिच्छा करणे सोडून द्या, त्यांना एकटा सोडा, नाहीतर आम्हाला लीगल ॲक्शन घ्यावी लागेल, आमच्याकडे तुमच्याविरुद्ध पुरावा आहे, तुम्ही वीणा ला जो फोन केला आहे त्याच रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, जर तुम्ही त्यांचा पिच्छा सोडला नाही तर वाईट होईल ",....... मिस्टर प्रभाकर


प्रभाकर सर रागारागाने अधिकारी साहेबांशी बोलत होते, अधिकारी सर ऐकून घेत होते, त्यांचा आवाज खूप मोठा होता, तो आवाज ऐकून निशा आत मध्ये आली आली


"काय चालला आहे डॅडी? कोण आहेत हे",..... निशा


निशा ला बघून अधिकारी सर अजून गडबडले,...... "तू तुझ्या केबिन मध्ये जा बेटा, मी येतो तिकडे मग बोलू",


" नाही डॅडी मी आत जाणार नाही, कोण आहेत हे आणि का मोठयाने बोलता आहात तुम्ही माझ्या डॅडी सोबत? , आणि तुम्ही का ऐकुन घेता आहेत डॅडी, ओ मिस्टर तुमची एवढ्या मोठ्याने, आमच्या ऑफिसमध्ये बोलायची हिम्मत कशी झाली ",...... निशा


" तुम्ही कोण आहात? तुम्ही कशाला मध्ये बोलता आहात? आणि मी का एवढ्या मोठ्याने बोलतो आहे हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही अधिकारी साहेबांना विचारा ना, त्यांना काय गरज आहे आमचे क्लायंट परांजपे यांच्या मुलाला आणि होणाऱ्या सुनेला धमकी द्यायची, अधिकारी साहेब दोन तीन दिवस पासून मिस वीणा यांना धमकावत आहेत, त्यांना घराबाहेर जाण मुश्किल झाला आहे, अधिकारी साहेबांनी गुंड त्यांच्या पाळतीवर लावले आहेत, एकदा तुम्ही विचार अधिकारी साहेबांना की त्यांनी असं का केलं? मी येतो अधिकारी सर, मी जे सांगितलं आहे त्याचा विचार करा, तुमच्या कडून परांजपे सर किंवा त्यांच्या कुटुंबीयांना काहीही त्रास होता कामा नये, त्यांचा पिच्छा सोडा नाही तर आमच्या कडून तुम्हाला त्रास होईल",....... मिस्टर प्रभाकर निघून गेले


निशा स्तब्ध होऊन सगळे ऐकत होती,...... "डॅडी what is this, हे खरं आहे का, काय सुरू आहे हे? आणि का पण तुम्ही अस केल, मला समजेल का, कोणीही येवून तुम्हाला अस बोलून जात, अस का वागले तुम्ही "? ,


"निशा आपण बोलू नंतर, मला थोडा वेळ दे, cool down ",..... अधिकारी


"नाही मला आता सांगा डॅडी काय आहे हे मॅटर? तुम्ही धमकी दिली? हो की नाही? हे खरं आहे का? काय आहे हे? मिस्टर प्रभाकर सांगत आहेत हे काय आहे? तुम्ही का ते परांजपे कुटुंबीयांना त्रास देत आहेत",....... वीणा


" हो हे खरं आहे, मी धमकी दिली, पण ऐकुन तर घे मी काय म्हणतो ते",....... अधिकारी


निशा रागारागाने केबिन मध्ये चालली गेली.....


अधिकारी सर निशा च्या मागे गेले,..... " निशा थांब, तू त्या मिस्टर प्रभाकर यांचे काहीही ऐकू नकोस, माझ ऐक तरी , कारण तर ऐकुन घे",


" तुम्हाला काय वाटतं डॅडी, मी तुमची चौकशी नाही करू शकत का? अर्ध्या तासात कळून जाईल मला की तुम्ही असं का केलं, पण मला हे तुमच्या तोंडून ऐकायचं आहे" ,....... निशा


"ठीक आहे आपण घरी गेल्यावर बोलू",....... अधिकारी
........

काल पासुन आपल्या सोबत प्रिती ही टेंशन मध्ये होती


" आई मी प्रितीला फोन लावून बोलून घेते तिच्याशी बोलते जरा ",..... वीणा


" वीणा तू काल पासुन जेवलेली नाहीस, आधी जेवण कर मग बोलत बस फोन वर",....... आई


जेवण झाल, वीणा ने प्रितीला फोन लावला


Hi प्रीती......


" Hi वीणा कुठे आहेस तू, फोन उचलायची सवय गेली का तुझी, किती फोन केले मी तुला, नॉर्मल झाली का तू, काय झाल होत, आज ऑफिस ला का नाही आलीस ",....... प्रिति


"अग हो किती ते प्रश्न, अग फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे, sorry dear मला तुझ्याशी बोलता आल नाही, खूप वाटत होत तुला सगळ सांगून द्यावे ",...... वीणा


" काय झाल आहे ते सांग ना, ते सोडून सगळे बोलते आहेस तू ",......... प्रिति


वीणा ने प्रितीला सगळ सांगितलं


"कोण आहेत हे अधिकारी omg ",..... प्रिति


" त्यांच्या मुलीच लग्न त्यांना समर शी करायचा होत, ते पप्पांचे मित्र होते, industrialist आहेत ",....... वीणा


" काय बोलतेस तू वीणा, त्यांनी तुला धमकी दिली होती का त्या दिवशी, किती सहन केल एकटीने, आता काय ठरलं मग" ,...... प्रिति


"मी आता समर च्या पप्पांशी बोलले पाहिले, आता ते ठरवता आहेत काय करता येईल, त्यांना ही खूप राग आला आहे ",...... वीणा


" समर शी बोलण झाल ना तुझ, तो खूप टेंशन मध्ये होता तो ",........ प्रिति


" हो आताच बोलण झाल, त्याने सांगितल तू खूप काळजीत होती, sorry dear once again ",...... वीणा


प्रीती मुद्दाम चिडली आहे अस दाखवत होती,....." आता का केला आहेस फोन मग, तू सांगायला पाहिजे होत मला काल, मी मदत केली असती तुझी , का बोलतेस आता , तुला माहिती आहे का मी रात्र भर तुझा विचार करत होती",


" राग सोड ग, माझा प्रॉब्लेम होता, किती चीडशील, तुला माहिती नाही ते अधिकारी किती बोलले मला, कालचा दिवस मी ऑफिस मध्ये कसा काढला माझ मलाच माहीती",...... वीणा


" उद्या येणार का ऑफिस ला ",..... प्रिति


" हो येणार आहे मी ",..... वीणा


" तू समर शी लवकर लग्न करून घे वीणा, तुझ्या समर च्या मागे बरेच लोक असतिल",...... प्रिति


प्रिती अस बोलली तशी वीणा लाजत होती....


चल भेटू उद्या मग bye


Bye
........

अधिकारी सर निशा दोघ घरी आले......


" आज कसे काय लवकर आलात तुम्ही दोघ, चला फ्रेश होऊन या, मी खायला आणते काही तरी ",...... अधिकारी मॅडम


निशा रागाने रूम मध्ये निघून गेली......


निशा...... निशा.....


" काय झाल हो, ही निशा अशी का रागवली ",...... मॅडम


" अग परांजपेंना समजल बहुतेक आपण वीणा वर प्रेशर टाकत होतो ते, वीणाने सांगितल असेल त्यांना, त्यांचा माणूस आला होता ऑफिस ला, खूप जोरात बोलत होता तो माझ्याशी, निशाने ते एकल, काही तरी गोंधळ आहे म्हणून ती आली आत, तर त्या माणसाने निशाला सगळ सांगितल, खूप गोंधळ झाला आहे",....... अधिकारी साहेब


" आता काय हो, काय करणार आहोत आपण ",...... मॅडम


" तू काळजी करू नकोस, बघू आता काय करायचं, तू चलतेस का माझ्या सोबत निशा च्या रूम मध्ये, तिची समजूत काढावी लागेल, मी तेव्हा ही तुला बोलत होतो ना की वीणा शी आपण नको बोलायला, आता झाली चूक निस्तरायला हवी",....... अधिकारी


दोघ निशा च्या रूम मध्ये गेले......


" निशा प्लीज दार उघड",........ सर


"Please डॅडी तुम्ही जा इथून, मला अजिबात बोलायच नाही तुमच्याशी, मला थोडा वेळ हवा आहे, मी प्रचंड चिडलेली आहे, तुम्ही जा ",....... निशा


"निशा अग ऐकुन तर घे प्लीज, एकदा बोल आमच्याशी",..... अधिकारी


"निशा अग मी मम्मी प्लीज दार उघड हे सगळ तुझ्या डॅडींनी माझ्या सांगण्यावरून केल, प्लीज बोल आमच्याशी सगळ तुझ्या साठी केल आम्ही ",...... मॅडम


निशाने दार उघडल......


डॅडी मम्मी आत मध्ये गेले, निशा खिडकीजवळ दोघांकडे पाठ करून उभी होती....


" निशा अगं काहीतरीच बोल आमच्याशी, मला माहिती आहे तुला आमचा राग आला आहे, जे मनात आहे ते बोल पण बोल काहीतरी ",....... डॅडी


" काय बोलणार आहे मी डॅडी मम्मी, ज्या गोष्टीची मला चीड आहे तेच तुम्ही दोघं करता आहात, का तर म्हणे माझ्या साठी, मी सांगितल होत का, माझ्यासाठी म्हणजे कसं हे जरा सांगणार का ",..... निशा


" परांजपे सरांचा समर आम्हाला तुझ्यासाठी पसंत होता, पण त्यात त्याने ऑल रेडी एका मुलीला पसंत केला आहे,
फॅक्टरीच्या उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं परांजपे सरांना भेटलो आणी त्यांना समर साठी तुझ स्थळ सुचवलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही समरला विचारून तुम्हाला सांगतो, आमच्या मुलगा जो डिसीजन घेईन या बाबतीत आम्ही त्याचा विचार घेवू ",.... अधिकारी


" मग काय म्हटले ते, त्यांनी नकार दिला का तुम्हाला, म्हणून तुम्हाला एवढा राग आला ",...... निशा


" नाही त्यांच अजून आमच्याशी काही बोलणं झालं नाही त्याआधीच मी समरची चौकशी केली तर मला असं समजलं की त्याचे एका मुलीवर प्रेम आहे",....... अधिकारी


" म्हणून तुम्ही त्या मुलीला धमकी देत होते की समरला नकार दे ",..... निशा


हो......


" का पण, तुम्ही असं का करत होते, तुम्ही एकदा मला विचारलं का की तुझं काय म्हणणं आहे, दुसऱ्याला बळजबरी करायचीच कशाला, कुठल्या गोष्टीची, अशा गोष्टी काही धमक्या देऊन होतात का? किती खराब वागणार तुम्ही? माझ्या साठी ती कोण मुलगी आहे तिला धमकी देतात, ते परांजपे अंकल काय विचार करत असतिल, आणि त्या मुलीचा काय दोष समर तिच्या वर प्रेम करतो आहे तर डॅडी हे एकदम चुकीच वागले तुम्ही",...... निशा खूप चिडली होती


" हे सगळे माझ्या मुळे झाल आहे तुझे पप्पा बोलत होते जगात काय हाच एक मुलगा आहे का, पण मला वाटला की समर तुझ्यासाठी योग्य राहील, ओळखीचे लोक आहेत, तुझी काळजी वाटत होती ग मला ",...... मम्मी


" कस काय मम्मी, तो समर योग्य माझ्या साठी, जो मुलगा आधी पासुन दुसर्‍या मुलीवर प्रेम करतो तो कसा काय योग्य माझ्या साठी? please सांग, काय विचार करता तुम्ही दोघ असा? मला त्या समर त्याच्या गर्लफ्रेंडची आणि परांजपे अंकलची माफी मागितली पाहिजे ",...... निशा


"निशा प्लीज मी मागतो माफी त्यांची, आता करतो फोन, पण तू अशी चिडू नकोस ग आमच्या वर, तुझा राग आम्ही सहन नाही करू शकत ",..... डॅडी


" डॅडी तुम्ही मला वेळोवेळी नीट वागायचे सल्ले दिले, तुम्ही असे करतात? , एवढ आंधळ प्रेम करू नका माझ्यावर, होईल माझ ही लग्न, एवढी घाई का करतात तुम्ही दोघ ",...... निशा


" मी आता जातो त्यांची माफी मागतो, पण तू रागवू नकोस ग",...... डॅडी


" नको डॅडी माझ्या साठी नको, तुम्हाला वाटत असेल तर माफी मागा, माझ्या मुळे झाल आहे हे सगळ मला भेटावा लागेल त्यांना आणि या पुढे तुम्ही दोघ मला न विचारता अस काही करणार नाही मला अजिबात आवडलं नाही ह हे ",....... निशा
......

अधिकारी साहेबांनी मिस्टर प्रभाकर याना फोन केला


" या पुढे आमच्या कडून परांजपे फॅमिलीला काही त्रास होणार नाही, वीणाला ही काही त्रास होणार नाही, मी माफी मागतो ",..... अधिकारी


" तुम्ही जी पळत ठेवली आहे समर वीणा वर, त्यांच्या फोन टॅप केले त्याच् काय"?,...... मिस्टर प्रभाकर


"नाही मी नाही केले फोन टॅप आणि पाळत ही नाही ठेवली, त्या दिवशी मी ऑफिसला जातांना मला समर दिसला वीणा च्या ऑफिस जवळ, त्याच्या फायदा घेवून मी वीणाला सांगितल की समरला धोका आहे, पण माझा तसा काही विचार नव्हता, तुम्ही म्हणाल तर मी परांजपे सरांची माफी मागायला तयार आहे ",..... अधिकारी


" मी बोलतो त्यांच्याशी आणि सांगतो तुम्हाला",...... मिस्टर प्रभाकर
......

समर घरी आला आजी आजोबा हॉल मध्ये बसलेले होते


" काय झाल समर? वीणा ठीक आहे ना? , हे अधिकारी तेच ना तुम्ही पार्टीला गेले होते त्यांच्या कडे, वीणा ला भेटलास का तू ",....... आजी


"हो आजी तेच, मला एवढा राग येतोय ना त्यांचा ",..... समर


"मला तेव्हा च आवडल नव्हत तुम्ही तिकडे जाता आहेत ते, ते लोक खूप आग्रहच आमंत्रण देत होते तुम्हाला",..... आजी


" हो ना, बर थोडक्यात झाल हे, समजा काही जास्त केल असत त्यांनी तर ",..... आजोबा


सोहा आजी आजोबा सगळे काळजीत होते


मम्मी पप्पा आले घरी....


"काय झाल पप्पा, आला होता का मिस्टर प्रभाकर यांचा फोन ",..... समर


" हो आला होता फोन, ते जावून आले अधिकारी यांच्या कडे, तिथे त्यांची मुलगी निशा ही होती, तिला काही कल्पना नव्हता या प्रकारची, मिस्टर प्रभाकर यांनी तिला सगळ सांगितल, आता बघू पुढे काय होत" ,..... पप्पा


" आता काय करायचं पुढे, मला वीणा च्या सुरक्षिततेची भीती वाटते",...... समर


" हो मला ही",...... पप्पा


वीणा आणि तिच्या घरच्या साठी चांगली व्यवस्था करायला पाहिजे.......










🎭 Series Post

View all