प्रित तुझी माझी... ❤️ भाग 31

" पप्पा काल सकाळी मी ऑफिसला जात असताना ऑफिस जवळ मला अधिकारी भेटले, तेव्हा आमचं दोघांचं तिथे बोलणं झालं, अधिकारी मला वाटेल ते बोलले, वाईट चालीची मुलगी वगैरे, समर च त्यांच्या मुलीशी आधीच लग्न जमलं होतं आणि मी मधे आली असे आरोप केले",...... वीणा


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........    

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार..... 
 
©️®️शिल्पा सुतार
.......  

"काय झाल ते सांगणार का वीणा ताई आता, मी ओरडेन ह",...... वहिनी 


" बरं मी सांगते वहिनी, पण तू अजिबात घाबरू नकोस, आपल्याला धोका आहे ग",..... वीणा 


"काय झालंय कसला धोका",...... वहिनी 


 वीणा ने वहिनीला सगळं सांगितलं,...... 


"अधिकारी मला धमकी देत आहेत, तशी मी त्यांना घाबरत नाही, पण समरला आणि आपल्या फॅमिलीला काही धोका झाला तर काय करावे, या विचारात मी आहे, तुच सांग आता वहिनी मी काय करू",.... वीणा 


" Danger आहेत का ते ताई, एवढ घाबरून कस चालेल ताई ",....... वहिनी 


" मी माझ्या साठी नाही घाबरत, मी कुठलीही गोष्ट फेस करायला तयार आहे, पण जेव्हा वेळ माझ्या जवळ च्या व्यक्तिंची येते मी रिस्क नाही घेवू शकत, उगीच लाइटली नाही घेता येणार हे सगळ, हो ते लोक danger आहेत, मला काल ते खूप बोलले, आज ही समर च्या मागे आहेत ते काहीही करू शकतात",.... वीणा 


" पण हेच स्थळ का हवय त्यांना ",...... वहिनी 


" परांजपे फॅमिली श्रीमंत आहे त्यांचा, कारभार मोठा आहे, म्हणून मागे लागले असतिल त्यांच्या, अधिकारी साहेबांच म्हणणं आहे की त्यांच आधी ठरलं होतं, मी मध्ये आली",.... वीणा 


" म्हणजे समरने त्यांच्या स्थळाला हो सांगितलं होत का",..... वहिनी 


"नाही ग वहिनी ते अधिकारी एकाच बाजूने सगळे ठरवत होते, या लोकांना त्याची काहीच कल्पना नव्हती, आता ते एकटेच राग धरून बसले आहेत आणि त्यात मलाच धमक्या देत आहेत ",...... वीणा 


" पण मग त्यांना परांजपे चा राग आला आहे तर त्यांनी परांजपे शी भांडावं ना, तुम्हाला का बोलत आहेत ",...... वहिनी 


" हेच तर मग आहे ना वहिनी, त्यांना परांजपेंना दुखवायचं नाही, आपण बरे सापडतो गरीब त्यांना, त्यांचं म्हणणं आहे की मी जर समजलं नकार दिला तर परस्पर काटा मोडला जाईल ",...... वीणा 


" असे का करता आहेत ते ताई, आणि तुम्ही असा नकार दिला तर काय होणार आहे, लगेच समर काय चालला जाणार आहे का, बालिश पणा आहे ",.... वहिनी 


" हे त्यांना समजत नाही ना पण वहिनी, विश्‍वासाच नात काय असत, ते फक्त मलाच बोलत आहेत आणि मला समजत नाही आहे काय करता येईल, ते कितपत डेंजर आहे हे समजत नाही, कोणाची तरी मदत घ्यावीच लागेल या बाबतीत",... वीणा 


" काय करता येईल आपल्याला, एक काम करा ना तुम्ही गुपचुप हे सगळं समर ला सांगून द्या ",..... वहिनी 


" नाही ग वहिनी असं करता येणार नाही समर ने डोक्यात राग घालून घातला आणि तो त्या लोकांची भांडायला गेला एकटा तर मी काय करणार आहे",..... वीणा 


" समर एवढा चीडेल का"?,..... वहिनी 


" मला जर कोणी त्रास दिला तर तो चिडेल",....... वीणा 


" मग अजून कोण आहे त्यांच्या बरोबरीच, समरच्या वडिलांना सांगता का ",..... वहिनी 


" हो मी पण तोच विचार करत होती काय करू",..... वीणा 


"सांगून द्या ना त्यांना ",..... वहिनी 


" पण मी वहिनी मला कुठे जाता येणार नाही, अधिकारी साहेबांचे लोक माझ्या पाळतीवर आहेत असं वाटत आहे आणि समरच्या पप्पांना भेटायचं म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागेल आणि हे अधिकारी साहेबांना समजलं तर मी काय करू मी ",...... वीणा 


" आपण एक काम करूया आपण आत्ताच त्यांच्याशी फोनवर बोलूया आणि मग ते म्हटले भेटायला ये तर मग बघू कसं करायचं ते",..... वहिनी 


" हो चालेल",...... वीणा 


आई आली आत मध्ये, वीणा आणि वहिनीने आईला सगळं सांगितलं, आईचा चेहरा खुलला होता, काल पासून आईला टेन्शन होतं, 


" कशी वाटते आयडिया आई",....... वीणा 


" बर झाल, योग्य निर्णय घेतला तुम्ही दोघींनी, सांगून बघा परांजपे साहेबांना सगळ",....... आई 


वाहिनीच्या फोन वरून वीणाने परांजपे सरांचा फोन डायल केला..... 


" Hello कोण बोलतय",..... पप्पा 


" Pappa मी वीणा",..... 


" वीणा बोल बेटा काय झाल, हा वेगळा नंबर आहे का तुझा",...... पप्पा 


"हो पप्पा, हा वहिनीचा नंबर आहे, एक अडचण आली आहे, मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे",....... वीणा 


"हा बोल बेटा काय झालं",....... पप्पा 


" पप्पा मला काल अधिकारी भेटले होते, त्यांनी मला समरला भेटायला मनाई केली आहे ",...... वीणा 


"त्यांचा काय संबंध पण आपल्याला असं सांगण्याचा, आणि ते तुला कसे ओळखतात",...... पप्पा 


" त्यांचं म्हणणं आहे की मी समजला नकार द्यावा आणि तसं नाही केले तर समरच्या जीवाला धोका आहे आणि माझ्या पण घरच्या लोकांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे मी समरला याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये आणि आज मी ऑफिसला गेलेली नाहीये, मला आता समजत नाही आहे मी काय करू, तुम्हाला आधी सांगावं म्हणून मी फोन केला",....... वीणा 


" हे काय चाललं आहे, अधिकारींना परस्पर तुला धमकी द्यायचं काय कारण आहे, काय प्रकार आहे हा सगळा, कधी झालं हे सगळं, नीट सांग ",...... पप्पा चिडले होते 


" पप्पा काल सकाळी मी ऑफिसला जात असताना ऑफिस जवळ मला अधिकारी भेटले, तेव्हा आमचं दोघांचं तिथे बोलणं झालं, अधिकारी मला वाटेल ते बोलले, वाईट चालीची मुलगी वगैरे, समर च त्यांच्या मुलीशी आधीच लग्न जमलं होतं आणि मी मधे आली असे आरोप केले",...... वीणा 


"हे बघ वीणा तू त्यांच्या बोलण्या कडे लक्ष देवू नको फालतूपणा आहे हा, पण आमचं आणि त्यांच असं काही ठरलं नव्हतं, समर आणि निशा कधीच भेटले नाहीत एकमेकांना, निशाला त्याबाबतीत काही माहिती नसेल",..... पप्पा 


" मग अधिकारी साहेब का वागले माझ्याशी असे",..... वीणा 


"तू मला का लगेच फोन करुन का नाही सांगितलं नाही हे सगळं",...... पप्पा 


" काल मला काहीही सुचत नव्हतं काय करावं ते, मला असं वाटलं की ते एवढं सिरीयसली नसतील बोलले निघेल काही तरी मार्ग यातून, पण आज परत त्यांचा फोन आला होता आणि अधिकारी साहेब समरच्या पाळतीवर आहेत, समर आज सकाळी माझ्या ऑफिसला गेला होता तेव्हा अधिकारी साहेब त्याच्या मागे होते मला त्यांनी फोन केला होता की मी जर समरशी ब्रेकप नाही केला तर समरच्या जीवाला धोका आहे, मला खूप भीती वाटते आहे पप्पा",..... वीणा 


" हे खूपच डेंजर सुरू आहे, तू मला लगेच सांगायला ला पाहिजे होतं, तुला धमकी दिली, समरच्या जीवाला धोका पोहोचवतात म्हणजे काय, तू ऐकून घ्यायचं नव्हतं, त्या लोकांना मी सोडणार नाही, तू अजिबात काळजी करू नको वीणा, अशा लोकांना कस सरळ करायचं मला चांगलं माहिती आहे, बरं झालं तू मला सांगितला आज, समरला या बाबतीत माहिती आहे का नाही की अधिकाऱ्यांनी तुला धमकी दिली",...... पप्पा 


" पप्पा समरला याबाबतीत काहीच माहिती नाही",.... वीणा 


" काय करायचं आता, तुला मला आत्ता भेटायला येईल का",..... पप्पा 


" अधिकारी सरांचे माणस माझ्या पाळतीवर आहेत, जर मी इथून आपल्या ऑफिस मध्ये आली तर त्यांना सगळं समजून जाईल मला भीती वाटते आहे त्यांनी माझ्या घरच्यांना काही केलं तर",...... वीणा 


" तू काळजी करू नकोस वीणा, मी बघतो काय करता येईल ते, तू घराबाहेर निघू नकोस आणि आज संध्याकाळी घरच्यांनाही सगळ सांगून दे आणि त्यांनाही अलर्ट रहायला सांग",....... पप्पा 


" पप्पा पण आता काय करायचं आहे पुढे, परत अधिकारी यांचा फोन आला तर ",....... वीणा 


"मी आत्ताच समर सोहा आणि तुझ्या मम्मीला सगळं सांगतो, तू काळजी करू नकोस, पुढे काय ठरतंय ते कळवतो मी ",...... पप्पा 


परांजपे सरांना काही सुचत नव्हतं, काय फालतूपणा आहे हा, त्या अधिकाऱ्यांची हिम्मतच कशी झाली वीणा ला असं बोलायची, वीणा आमच्या घरची होणार सून आहे, वीणाच्या घरचे त्या घरी सुरक्षित नाहीत आणि वीणा ला यायला जायला सुद्धा गाडी घ्यायला पाहिजे


परांजपे सरांनी मिस्टर दीक्षित यांना आत बोलवलं, त्यांना दोन तीन कामे सांगितले 


परांजपे मॅडम च्या केबिन मध्ये सर गेले, 


"काय झाल एवढ कसल टेंशन आहे",....... मॅडम 


 "तुला कस समजल",..... सर 


"चेहरा कसा झाला आहे तुमचा, काय झालं आहे",...... मॅडम 


सरांनी समर ला आत बोलवल, समर आत आला, त्याच्या चेहेरा उतरलेला होता, 


"पप्पा मी घरी जाऊ का मला अजिबात बर वाटत नाही, काही महत्त्वाची मीटिंग असेल तर उद्या ठेवू या का",.... समर


" अरे ऐक जरा इकडे वीणा चा फोन आला होता",....... पप्पा 


" काय झालं, इकडे फोन आला होता का, काय म्हटली वीणा",....... समर


" आत्ताच वीणा चा फोन आला होता इकडे, तिला काल अधिकारी जाऊन भेटले, त्यांनी तिला धमकावलं की समरला नकार दे, त्यांना निशा च लग्न तुझ्याशी करायचा आहे, आज ही अधिकारी तुझ्या मागे होते तू वीणा च्या ऑफिस ला गेला होतास ना सकाळी, त्यांनी त्या नंतर वीणा ला फोन केला की समर आता एकटा आहे आम्ही काहीही करू शकतो त्याला तू नकार दे ",...... पप्पा 


हे सगळं ऐकून समर अवाकच झाला,..... 


" OMG काय आहे हे, त्यांची हिम्मत कशी झाली वीणाशी बोलायची ",..... परांजपे मॅडम 


" हो ना, मला ही फार राग आला आहे, त्यांना अस वाटत असेल की वीणा च्या मागे कोणी ही नाही, तर अस नाही, वीणा शी कस ही वागल तर मला चालणार नाही, मी अस सोडणार नाही अधिकारींना",......पप्पा 


" ओ माय गॉड किती डेंजर आहे हे, तरीच मी काल पासून विचार करतो आहे कि वीणा माझ्याशी का नाही बोलत , कशी आहे विणा पप्पा",........ समर


"वीणा ठीक आहे, तिच्या वहिनीचा नंबर आहे माझ्याकडे तू नंतर तिला फोन करून बघ तिच्या फोनवर फोन करू नको तो फोन बहुतेक अधिकारी साहेबांनी टॅप केला आहे",..... पप्पा 


" ऐवढे का मागे लागले आहेत पण आपल्या ते, अश्या धमकीला आपण घाबरणार आहोत का? ",...... समर


"वीणा तेच बोलत होती ती तिच्या साठी नाही तर तुझ्या साठी घाबरून गेली होती, बरं नशीब त्यांनी अजून काही केलं नाही समर तू पण अजिबातच एकटा-दुकटा बाहेर जाऊ नको",....... पप्पा 


" पप्पा प्लीज मला permission द्या मला बघायच आहे अधिकारी काय करतील ",........ समर 


"नाही अजिबात समर, ही वेळ कोण किती ताकदवर आहे या साठी नाहिये, आपल्याला अधिकारी यांच्याशी काहीही घेणे नाही, कोणी कुठे जाणार नाही, आपल्या पैकी कोणी अधिकारींशी बोलणार नाही",...... पप्पा 


"मग आता काय पुढे, कस हॅन्डल करणार आहोत आपण हे",..... समर 


" मला ही असं वाटतं की आपण त्यांच्याशी आता डायरेक्ट बोलायला नको, आपणही एक माणूस हायर करू, तो जाऊन अधिकारी साहेबांशी बोलेल, त्यांना समजून सांगेल, काय गैरसमज झाले आहे ते दूर करेन, म्हणजे त्यांनी ऐकलं नाही आणि परत वीणाला त्रास दिला तर मग आपण देवु त्यांना आपल्या भाषेत समज, पण तो पर्यंत शांततेत घेवू या आपण हे सगळ ",...... मम्मी 


" तुझी मम्मी बोलते आहे ते हो हे योग्य राहील, शिकलेले चांगले लोक ही असे करतात, काय करणार आता ",...... पप्पा 


 अधिकारी मॅडमने एक फोन फिरवला त्यांना मिस्टर प्रभाकर यांना लगेच ऑफिसमध्ये भेटायला बोलवल 


आधी सोहाला फोन लाव तिला घरी रहायला सांग आशिष लाही अलर्ट व्हायला सांग


मम्मीने फोन लावला,....." सोहा तू आजी-आजोबांचं जवळच थांब ",... 


" हो मी घरी आहे काय झालं आहे",.... सोहा 


मम्मी ने सोहाला सांगितल सगळ..... 


"तेव्हाच आम्ही बोलत होतो पार्टीला जायची काही गरजच नव्हती, तुम्ही ऐकल नाही आमच, उगीच समरला त्यांच्या घरी नेलं",...... सोहा


"झाल ते झाल, आम्हाला काय माहिती ते असे निघतील, पण तू घरी घराबाहेर जाऊ नकोस",....... मम्मी 


" ठीक आहे मम्मी ",...... सोहा


मिस्टर दीक्षित घरची सेक्युरिटी वाढवा, वीणा च्या घरची पण सिक्युरिटी वाढवा..... 
 

संगितल्याप्रमाणे मिस्टर प्रभाकर ऑफिसमध्ये आले आले आले ते पप्पांच्या केबिनमध्ये गेले


 पप्पांनी त्यांना पूर्ण केस समजून सांगितली, मिस्टर अधिकाऱ्यांचे नंबर वगैरे सगळं त्यांनी घेतलं, वीणा च्या घरचा पत्ता घेऊन तिथली सिक्युरिटी वाढवली, परांजपे सरांच्या बंगल्याचे सिक्युरिटी वाढवली 


"मी लगेच एका तासात काम सुरू करतो सर, तुम्ही काळजी करू नका, प्रॉब्लेम काही फार मोठा वाटत नाहीये, फक्त त्यांनी दुसरे लोक हायर केले नसावे, कारण अशा गुंड लोकांना काहीही दया-माया नसते, मी लगेच बोलतो अधिकाऱ्यांशी, त्यांची समजूत काढतो, तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट देतो ",......... मिस्टर प्रभाकर 


समर त्याच्या केबिन मध्ये आला, त्याने वहिनीचा नंबर वर फोन फिरवला फोन वीणा ने उचलला


"मी समर बोलतो आहे वीणा",...... 


तशी वीणा रडायला लागली..... 


" वीणा सांभाळ स्वतःला",...... समर 


" तुझा आवाज ऐकुन रडू आल मला",........ वीणा 


" का सहन केले एवढ दुःख काल पासून, माझी काय अवस्था झाली आहे, तुला माहिती आहे का, आपलं काय ठरलं होतं कुठल्याही परिस्थितीत एकमेकाला सगळं सांगायचं, तू एकटीने का सहन केलं हे सगळं, मला का नाही सांगितलं, या पुढे अस करु नकोस ",.... समर 


" तुझ्या जीवाला धोका होता समर मला असं वाटलं होतं की तू एकटा त्या लोकांची भांडायला गेला तर, तुझ्या साठी मी घाबरले, मी विचार करत होती काय कराव म्हणून सांगितल नाही ",..... वीणा 


" मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकत नाही वीणा, यापुढे जास्त काही प्रॉब्लेम झाला तर तू मला आधी सांगणार आहेस, अधिकारी साहेबांनी अजूनच काही तुला जास्त धमकी दिली नाही ना की जी तू मला सांगत नाहीस,..... समर 


" नाही हे एवढच आहे, पण हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, लाईटली घेऊ नको, मला तुझी आणि घरच्यांची खूप काळजी वाटते आहे समर, काय ठरलं तिकडे",..... वीणा 


" मम्मी पप्पा काहीतरी ठरवत आहेत, त्यांनी एक एजंट हायर केला आहे, ते लोक हे असा प्रॉब्लेम सॉल्व करायला माहीर असतात, पण तू घराबाहेर निघू नको आणि आत्ताच दादा बाबा प्रकाश ला फोन करून सगळं सांगून दे, मुल आले का शाळेत तून घरी",......... समर 


" हो मूल आले आहेत घरी, आता तुम्ही पण कोणीच घराबाहेर निघू नका, हा प्रॉब्लेम सॉल्व होईल ना समर",...... वीणा 


" थोडा गैरसमज झाला आहे, होईल सॉल्व तू काहीच काळजी करू नको",...... समर


"तू कुठे एकटा जाऊ नकोस, घरी कसे आहेत सगळे आजी आजोबा",....... वीणा 


"सोहा आहे त्यांच्या जवळ काळजी करू नकोस, Please प्रीतीला फोन कर ती खूप काळजीत आहे"........ समर 


"हो लगेच करते प्रीती ला फोन, पुढे काय झाल अधिकारी काय म्हटले ते सांग ",....... वीणा 


समर ला आता विणाशी बोलून बरं वाटत होतं जरा, कालपासून तो खूप बेचैन होता, नक्की काय झाल समजायला मार्ग नव्हता, आणि अधिकारी खूप चुकीच वागले आहेत, त्यांनी वीणाशी अस वागायला नको होत, वीणा ला दुखावून त्यांनी खूप मोठी चुक केली आहे, किती त्रास झाला आम्हाला दोघांना, त्यांना अस वाटत असेल वीणा ला कोणाचा सपोर्ट नाही तर मी आहे वीणा साठी आणि तिच्या घरच्यां साठी, आपण वीणा साठी चांगल घर आणि गाडी घ्यायला पाहिजे, वीणा तिकडे सुरक्षित नाही ........ 
 

🎭 Series Post

View all