Aug 16, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 30

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️ भाग 30ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

लंच ब्रेक झाला वीणा डबा घेऊन जेवायला गेली, प्रीती ही आलीच मागे,...


"काय झालं आहे वीणा तू अजिबातच बोलत नाहीयेस, मला नाही सांगणार का, कोणी काही बोललं का तुला, अशी का करतेस ",.... प्रिति


" काही नाही झाल आहे प्रीती, माझ डोक दुखत आहे, तब्येत बरी नाही एवढच",.... वीणा


"तू समर शी भांडली का, काय झालं, हे मला अस तू गप्प बसलेली आवडत नाही ",...... प्रिति


" नाही ग तो कशाला भांडेल माझ्याशी, तुला माहिती आहे ना तो किती प्रेम करतो माझ्या वर",...... वीणा


" मग काय झालं आहे ",....... प्रिति


" मी तुला नाही सांगू शकत जे झाला आहे ते, तु मला उगाच सारखं काय झालं.. काय झालं, करू नकोस आणि प्लीज सारखा समरचा विषय इथे काढू नकोस ",.... वीणा


" काय बोलतेस काय वीणा तू, नक्कीच काहीतरी झालं आहे ",..... प्रिति


तशी विणा डबा घेऊन दुसरीकडे जाऊन बसली,.. "हे बघ प्रीती माझा आधीच मूड तो खराब आहे, तू उगाच मला त्रास देऊ नको, मला थोडा वेळ दे, मी भांडणे ह तुझ्याशी ",...


वीणा ने तिचा डबा खाल्ला आणि ती जागेवर जाऊन बसली


" काय झालं आहे आज? तुम्ही सगळे एवढे शांत का", ?...... प्रशांत विचारत होता


"नाही माहिती काय झालं आहे, वीणा कोणाशीच बोलत नाही आज, काल ती समर सरांच्या घरी जाणार होती, तिकडे काय झालं तेही सांगत नाहीये, नक्की तिकडे काहीतरी झालं असेल, नाहीतर वीणा किती गडबड करते ऑफिसमध्ये ते तुला माहिती आहे ना, आपण ऐकलं नाही तरी बळजबरी आपल्याला सगळं सांगते, कान बंद केले तरी कानात ओरडते, आज एकदमच गप्प झाली आहे ती, मला खूप काळजी वाटते आहे तिची ",..... प्रिति


" तू विचारलं नाही का तिला काय झालं ",..... प्रशांत


" सांगत नाहीये ती विचारलं मी, ",...... प्रिति


" जाऊदे, तिला थोडा वेळ तर एकटा राहू दे नंतर सांगीन ती ",...... प्रशांत


ऑफिस सुटलं वीणा भरकन घरी निघून गेली......


प्रीती बाहेर आली, बस स्टॉप पर्यंत, तिला समर येतांना दिसला


"हाय प्रीती, वीणा कुठे आहे "?,...... समर


"माहिती नाही... ती खूप पटकन घरी चालली गेली ",....... प्रिति


" तिचा फोन का बंद आहे आणि "?,...... समर


" माहिती नाही मला तिचा फोन बंद आहे का? ",...... प्रिति


"तुम्ही दोघी नेहमी सोबत असता ना, मग आज काय झाल, वीणा गेली ही घरी एवढ्यात ",...... समर


"माहिती नाही रे काही समर, वीणा upset आहे, सकाळ पासून अस सुरू आहे",...... प्रिति


"तू सगळ्या गोष्टी चे उत्तर माहिती नाही का देते आहे",..... समर


"कारण मला खरंच माहिती नाही वीणाला काय झालंय ते ? आज सकाळपासून ती गप्प आहे, मी तिला खूप वेळा विचारलं की काय झालं? ती सांगत नाही आणि काल ती तुमच्याकडे आली होती ना? तिथे काही झालं का "?,....... प्रिति


"काहीच नाही, उलट आम्ही खूप खुश होतो, मी काल रात्री तिला घरी पण सोडवायला गेलो होतो , घरी पण सगळे खूप खुश होते, मग काय झालं असा अचानक ",....... समर


" काय माहिती ",...... प्रिति


" ठिक आहे, चल तुला सोडू का कुठे ",.... प्रिति समर बरोबर करी निघाली


" प्रीती तुला हरकत नसेल तर तू मला तुझा मोबाईल नंबर देशील का? आणि प्लीज घरी गेल्यावर वीणा ला फोन कर कि काय झालं आहे",...... समर


" नक्की, मी करते मग तुला फोन समर काय झाल काय माहिती",....... प्रिति


" मी आज तिला वीस-पंचवीस फोन केले, तिचा फोन लागत नाही",....... समर


प्रीतीने समरला फोन नंबर दिला........


वीणा घरी आली, घाईघाईने आत आवरायला निघून गेली


"वीणा काय झालं? आज तू उशिरा येणार होती ना? चहा ठेऊ का ग तुझा ",......... आई


वीणा काहीच बोलली नाही....


" वीणा अग मी तुझ्याशी बोलते आहे",...... आई


" कुठे गेले घरचे सगळे",...... वीणा


"दादा बाबा प्रकाश यायचे आहेत ऑफिस हून, तुझी वहिनी बाजूच्या रूममध्ये आहे मुलांचा अभ्यास घेते आहे",........ आई


" आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण तू मला प्रॉमिस कर कुणाला सांगणार नाही आणि जर कोणी गोष्ट सांगताना कोणी आलं तर विचारू नको पुढे सांग अस, मी नंतर सांगेन काय झालं ",..... वीणा


" हो काय झालाय पण एवढ",...... आई


" मी त्यादिवशी बोलले होते ना की समरला एक श्रीमंत स्थळ आल आहे ",..... वीणा


" हो त्याचं काय ",..... आई


" ते आज अधिकारी मला भेटले होते, ते मला म्हणत आहे की समरला नकार दे",...... वीणा रडायला लागली


आई उठून विना जवळ गेली,......." समर बोलत होता तुला सावध रहा म्हणून, काय गं काय झालं हे, तू रडू नको बर आधी मला सगळं नीट सांग ",


" आज सकाळी मी ऑफिसला जायला निघाले ना तर ऑफिस जवळ अधिकारी भेटले, त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीसाठी त्यांना समरच स्थळ पसंत आहे, पण समर ला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून समर निशा च स्थळाला होकार देणार नाही, जर मी समर ला नकार दिला तरच त्यांचं काम होईल आणि मी जर त्यांचा ऐकलं नाही तर समरच्या जीवाला धोका आहे आणि दादा आणि प्रकाश चा पण जॉब जाईल आणि आपल्या सगळ्या फॅमिली च्या जीवाला पण धोका आहे, मी काय करू आई मला समजत नाही, समरला मी हे सगळं सांगू शकत नाही जर मी समर ला हे सगळं सांगितलं तर तो चिडून त्या लोकांशी बोलायला जाईल एकटाच, त्याच्या जीवाला धोका आहे ग, आणि आपल्या पण घरी सगळ्यांनाच धोका आहे तरीच मला समर म्हणत होता की सावध रहा काय करू मी मला काही समजत नाहीये",...... वीणा


" हे काय होऊन बसलं वीणा, आता काय करायचं आहे पुढे",..... आई


"आई मी समर ला नकार देणार आहे",..... वीणा


" काहीही काय बोलतेस तू वीणा, तू अस काहीही करणार नाही ",...... आई


" मग काय करू मी तू सांग ",..... वीणा


" निघेल काहीतरी मार्ग यातून, एवढा नकार द्यायची घाई करू नको ",....... आई


" घाई काय आई, यापुढे मला त्याच्याशी बोलायचं सुद्धा नाही, समर ला कस टाळू मी मला समजत नाही, समजा जर आता इथे समर आला तर त्याला सांग मी अजून घरी आलेली नाही ",...... वीणा


" काय ग समर येणार होता का इकडे",..... आई


" हो आज आमच् संध्याकाळी भेटायचं ठरलं होतं आणि मी दिवसभर त्याचा फोनही घेतलेला नाहीये, तर बहुतेक तो ऑफिस जवळ आला असेल, मी नसेल तर तो येईलच घरी ",...... वीणा


" काय होऊन बसलं हे, बाबांना दादाला सांगू का ",.... आई


वीणा परत रडायला लागली,......" आई तु हे प्लिज आता तरी दादा आणि बाबांना सांगू नको, बाबांना तर मुळीच नको, त्यांना टेन्शन येत ग सगळ्या गोष्टीच, मला विचार करू दे काय करता येईल, मी सांगते जस योग्य वाटेल तेव्हा "


"हो नाही सांगणार",.... आई


"आणि ते अधिकारी मला वाईट चालीची मुलगी असं बोलले, ते बोलले की मी पैशासाठी समरच्या मागे लागली आहे, हे ऐकून तर मला खूप वाईट वाटलं आई, मी अशी मुलगी आहे का? म्हणूनच मी आधी समरला नाही म्हणत होते, मला माहिती आहे की खूप फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात, ते खूप श्रीमंत आहेत, आपण सामान्य, सगळे लोक माझ्याच कडे बोट दाखवत आहेत",...... वीणा


" तू कशाला वाईट वाटून घेते आहेस वीणा, तुला माहिती आहे ना की तू कशी आहे, आणि खूप चांगले आहेत समरच्या घरचे आणि त्यांनीच मागणी घातली ना तुला, आपल्याला सगळ माहिती आहे काय खरं आहे ते, कोणी काहीही बोलल तरी तू मनाला का लावून घेते ",...... आई


"हो आई पण बोलणार्‍यांचे तोंड कुठे धरता येते",...... वीणा


" मग दुर्लक्ष करायचं अशा लोकांकडे, अशा थोड्या वाईट लोकांसाठी तू चांगल्या लोकांना नकार देणार आहेस का, समर ला नको शिक्षा देवू ग",..... आई


" काय करू मग आई मी, ",...... वीणा


" तू हे शांतपणे हे सगळ समर ला का नाही सांगून देत, अधिकारी फक्त तुलाच धमकी देत असतिल कदाचित ते समर समोर टिकणार नाहीत ",..... आई


" नाही सांगता येत ते कसे वागतील समरशी, तुला माहिती नाही ते लोकं किती डेंजर आहेत, आज मला त्यांनी ज्या भाषेत धमकी दिली आहे तू ऐकलं असतं ना तर तुला समजलं असतं, मी पूर्ण दिवस ऑफिसमध्ये कसा घालवला हे माझं मलाच माहिती",..... वीणा


वीणा च्या फोनवर प्रीतीचा फोन वाजत होता , वीणा ने तो उचलला नाही, बहुतेक ती आणि समर बाहेर आले असतील, सॉरी समर मला तुला भेटायला येता येणार नाही, आज अधिकारी आले नसते तर मी आता धावत मेन रोड पर्यंत आली असती, विणा दादाच्या रूम मध्ये जाऊन बसली, म्हणजे इकडे घरी समर जरी आला तरी ती भेटणार नाही, वीणाच्या डोक्यात सारखे विचार चालू होते की काय करता येईल? , कोणाशी बोलता येईल? अधिकारी पावरफुल आहेत म्हणजे त्यांना टक्कर देणारे पावर फुल हवे कोणीतरी, अजिबात सुचत नव्हतं तिला काहीच,


समर घरी आला, त्याचा अजिबात लक्ष नव्हतं कशात,


"काय रे काय झाल समर, आज लवकर कसा आलास तू",....... आजी


"काही नाही आजी, मला थोडा चहा हवा आहे, काकूंना चहा द्यायला सांग",...... समर रुममध्ये निघुन गेले


तुला काय झालं आहे आज वीणा, आज माझ्याशी का नाही बोललीस, काल रात्री पर्यंत सगळ ओके होतं, काय प्रॉब्लेम झाला आहे तो नक्की आजच झालेला आहे, काल सकाळपासून वीणा चा फोन बंद आहे, उद्या सकाळी मी लवकर जातो आणि वीणा ला भेटतो, नक्की तिला माझा राग आलेला आहे कि काय झालं आहे ते समजुन द्यायला पाहिजे, मला माहिती आहे की नक्की काही तरी प्रॉब्लेम आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करता येईल, वीणा च्या बाबांचा नंबर होता पप्पांकडे खाली डायरीत लिहिलेला


समर खाली गेला, नंबर मिळाला, समरने नंबर डायल केला


"Hello बाबा मी समर बोलतो आहे",..... समर


"हो बोल बेटा" ,...... बाबा


"वीणा कुठे आहे",.... समर


"मी घरी जातो आहे आता, काय झाल",... बाबा


"बाबा तुम्ही घरी गेले की वीणाला फोन करायला सांगाल का"?,.... समर


"हो काय झालय? वीणा चा मोबाईल लागत नाही का",.....बाबा


"नाही लागत, सकाळ पासून ट्राय करतो आहे मी",..... समर


बाबा घरी आले,......"वीणा समर चा फोन आला होता, तुझा फोन लागत नाही, तू त्याला फोन कर" ,.....


" बाबा मला नाही बोलता येणार समरशी, एक प्रॉब्लेम झाला आहे",..... वीणा बाबांना सगळ सांगत होती


" प्रॉब्लेम मोठा आहे हा, काय करता येईल ",..... बाबा


" बाबा आता नको बोलायला समरशी",..... वीणा


"मग मी काय करू आता समरला काय सांगू"?,...... बाबा


"सांगा मी झोपली आहे अस",...... वीणा


" पण मला अस वाटत की तू हे सगळ समर ला सांगून दे" ,........ बाबा


" हो बाबा पण आता नको, मला विचार करायला वेळ द्या, समर एकटा आहे घरी तो काहीही निर्णय घेईल मला भीती वाटते की काही नको व्हायला ",...... वीणा


समर चा फोन आलाच, बाबांनी सांगितल की वीणा झोपली आहे,


"बाबा please सांगा काय झालाय, मला माहिती आहे वीणा झोपली नाही" ,......... समर


" तू नंतर वीणा शी बोलून घे व्यवस्थित, मला आता काही सांगता येणार नाही समर, येवढच सांगतो वीणा एकदम ठीक आहे़ काळजी नसावी",...... बाबा


"ठीक आहे बाबा",..... समर विचार करत होता नक्की काही तरी मोठा प्रॉब्लेम आहे, आता ही वीणा बोलली नाही माझ्याशी


सकाळ झाली रात्रभर अति विचार करून करून वीणा च डोकं दुखत होतं,..... "आई आज मी ऑफिसला जात नाही, मी तसं सरांना कळवते मी जरा वेळ झोपते",


"काय गं, काय झालं, जास्त आहे का त्रास, डॉक्टर कडे जायचं का",...... आई


"नाही मला दुपारून थोडं काम आहे मी आता जरा वेळ झोपते, वहिनी मी तुझ्या रूम मध्ये जाऊन झोपू का जरा वेळ",...... वीणा


"हो जाना ताई, काय झालं आहे बरं नाही वाटत का"?........ वहिनी


" डोक दुखतंय, बाकी काही नाही ",..... वीणा तिचा फोन घेऊन वहिनी चा रूम मध्ये गेली


समर वीणाच्या ऑफिस जवळ कार घेऊन उभा होता, नऊ वाजून गेले तरी वीणा आली नव्हती, प्रीती आली तेवढ्यात समोरून


"काय झालं समर आज सकाळी सकाळी इकडे काय करतो आहेस? काल झालं का काही बोलण वीणाशी ",.... प्रिति


" माझं काहीच बोलणं झालं नाही , ती माझा फोन उचलत नाही, काय नक्की काय झालं काल ते जरा मला एकदा नीट सांगशील का ",..... समर टेंशन मध्ये होता


"हो, काल सकाळी वीणा थोडी उशिरा आली होती ऑफिसला, तीच्या चेहर्‍यावर प्रचंड टेंशन होतं, वाटल जस वीणा खूप रडली आहे, मी विचारल तिला की रडली का तू तर ती काही बोलली नाही, रोज आल्यानंतर खूप बडबड करणारी वीणा काल खूप शांत होती",..... प्रिति


" म्हणजे हे सगळं काल सकाळपासूनच झाला आहे तर ",.... समर


" हो लंच ब्रेक मध्ये पण तिने एकटीनेच डबा खाल्ला",.... प्रिति


" आणि आज काय झालं अजून का नाही आली वीणा",..... समर


" माहिती नाही मला काय ति फोन उचलत नाहीये कोणाचा",.... प्रिति


" माझ्या बद्दल काही बोलली का ती ",...... समर


" मी विचारलं वीणा ला की समरच्या घरी गेली होती तर काय झालं,ती बोलली काही नाही नॉर्मल होतं सगळं, पण ती बोलली की समरच नाव नको काढू माझ्या समोर ",...... प्रिति ,


"माझा राग आला का? मी काय केल अस? , काय झाला आहे? ",..... समर


"काहीतरी नक्की झाल आहे",..... प्रिति


" दुसरा प्रॉब्लेम आहे काहीतरी पण कस समजेल आपल्याला ",...... समर


" करू काही तरी तू सध्या तरी टेंशन घेवू नको ",..... प्रिति


" चल मी जातो ऑफिसला, जर वीणा आली तर तू मला कळव , मग मी बघतो काय करायचं ते",..... समर ऑफिसला निघून गेला


विणाला झोप लागली नव्हती, ती विचार करत होती काय करता येईल, तिला एकच व्यक्ती समोर दिसत होती ती म्हणजे समरचे पप्पा, नको पण त्यांना कसं सांगणार ते लगेच समरला सांगतील, नुसताच गोंधळ होतो आहे, काय करू, वीणा चा फोन वाजत होता, अधिकारी साहेबांचा फोन होता, वीणा ने कॉल रेकॉर्डिंग ला लावला


"तू अजून समरला नकार दिला नाही का वीणा",..... अधिकारी


"मी बोलत नाही आहे त्याच्याशी कालपासून अजून काय करू",...... वीणा


"नुसत न बोलून काय होणार आहे, तू त्याला स्पष्टपणे लग्नाला नकार दे, भांडण कर, काहीही कर, पण मला ब्रेकअप झालेला हवा आहे",........ अधिकारी


" तुम्ही असं करू नका मला ते शक्य नाही",..... वीणा


" ठीक आहे मग मी मला जे करायचं ते करतो, आता समर तुझ्या ऑफिस बाहेर आहे आणि तू घरी आहेस ",....... अधिकारी


" तुम्ही पाळत ठेवली का आमच्या वर ",...... वीणा


" अजून समजल नाही तुला मी किती danger आहे , समर एकटा आहे कार मध्ये काहीही होवु शकते",...... अधिकारी


"थांबा सर मी समरला भेटणार नाही, बोलणार नाही, पण त्याच्याशी भांडण करून वगैरे मला जमणार नाही",...... वीणा


" असं चालणार नाही मला, उद्यापर्यंत मला रिझल्ट हवा आहे, नाहीतर समरच्या आणि तुझ्या घरच्यांच्या जीवाला धोका आहे त्यांनी रागाने फोन ठेवून दिला",......... अधिकारी
.....

" काय म्हटली हो ती मुलगी होईल का आपला काम ",...... अधिकारी मॅडम


" होईल मग न व्हायला काय झाल, काल बोललो मी तिच्याशी तेव्हा पासून भेटलेली नाही ती समर ला ",...... अधिकारी


" कोणाशी बोलले तुम्ही डॅडी" ,...... निशा आलीच तेवढ्यात तिथे


"अग काही नाही असच ऑफिसच काम होत, काय म्हणतेस तूझ काय चाललय, काल उशिरा आलीस तू घरी बेटा",...... अधिकारी


" हो डॅडी एका एम्प्लॉईचा प्रॉब्लेम झाला होता थोडा तो सोडवला",..... निशा


" काय झाल होता",....... अधिकारी


" एका मुलीला एक माणूस त्रास देत होता, धमकी देत होता, त्या माणसाला नीट केल, प्रॉब्लेम सॉल्व केला, चांगल पोलिसात दिल त्या माणसाला ",....... निशा


"कसे खराब आणि अप्पलपोटी माणसं असतात ना या जगात, आपल्याला काही हवं असलं त्यासाठी दुसऱ्याला त्रास देतात, मला ना डॅडी अशा लोकांचा खूप राग येतो, कोणावर अन्याय झालेला मला सहन होत नाही, अशा घाणेरड्या वृत्तीच्या लोकांना वेळेवर सरळ केलं पाहिजे" ,........ निशा हे सगळं बोलत होती तेव्हा अधिकारी मॅडम सरांकडे बघत होत्या आणि अधिकारी सर खाली बघत होते


आपणही हेच करत आहोत की, आपल्या लेकीसाठी दुसऱ्याच्या लेकीला त्रास देत आहोत, आणि जिच्या साठी आपण हे करतो आहोत त्या निशा ला हे असं वागणं आवडत नाही, काय करत आहोत आपण हे, खरंच चुकत आहे का आपलं, पण काही का असेना मला या वेळी परांजपे कुटुंबीयांचा रागच आलेला आहे, आमच्या मुलीचं स्थळ करायचं नव्हतं तर कशाला एवढे संबंध वाढवले, आता समरचं निशा शी लग्न होवो अगर न होवो मी वीणा आणि समरच्या नात्यात तेढ निर्माण करणारच......
.......

वीणा ला समजत नव्हतं काय करावं? अधिकारी समर च्या मागे पाळत ठेवून होते, त्याला काही झाल तर काय करू मी, ती रडायला लागली....


वहिनी आली आत मध्ये आवरायला,....... "काय झालं ताई, का रडत आहात",..... वहिनी घाबरून गेली


" काही नाही ग वहिनी, मला समजत नाहीये काय सुरू आहे ते",..... वीणा


"तुम्ही आज ऑफिसला पण गेल्या नाही, डोकं दुखतंय म्हणताय, काय झालंय काय नक्की",...... वहिनी


"काही नाही वहिनी ठीक आहे मी",...... वीणा


" नसेल सांगायचं तर नका सांगू, पण काही वेळेस माझ्याकडे सोलुशन असलं तर, मी मदत करू शकते तुम्हाला ",...... वहिनी


वीणा विचार करत होती, वाहिनीला हाताशी धरून काही तरी करता येईल.............


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now