
ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........
सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....
©️®️शिल्पा सुतार
.......
समर वीणा छान गप्पा मारत बसले होते, दार वाजलं सोहा आत आली,.... "सॉरी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब केलं का"
" नाही ग ये",...... समर
"वीणा तुझ्याशी खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत, मी खूप खुश आहे तुमच्या दोघांसाठी, बरं झालं मम्मी-पप्पांनी लगेच होकार दिला",....... सोहा
"हो ना, thanks, तुझ्याबद्दल सांग ना सोहा थोड, आशिष बद्दल सांग, कुठे भेटले होते तुम्ही, आज बोलवल असत त्यांनाही ",....... वीणा
" अरे हो आपल्या लक्षातच राहिले नाही, बोलवतेस का आशिष ला ",...... समर
" नको आज तो खूप बिझी आहे ",..... सोहा
"आपण चौघं कुठेतरी भेटू, नाहीतर एक काम करू आपण चौक विकेंडला पिकनिकला जाऊ ",...... समर
" आयडिया छान आहे",....... सोहा
सोहाने वीणाला बाकीच घर दाखवल, समर वीणा सोहा खाली आले, खाली जेवणाची तयारी होतच आली होती, खूप छान बेत केला होता स्वयंपाकाचा, जेवण झाल, सगळे हॉलमध्ये येऊन बसले, मम्मी आणि आजी किचनमध्ये काहीतरी बोलत उभ्या होत्या, मम्मी लगेच रूममध्ये गेली, वीणा ला रूम मध्ये बोलवलं, सोहा वीणा ला रूम मध्ये घेऊन गेली
"ये वीणा बस ",..... मम्मीने खूप छान ड्रेस वीणा ला प्रेझेंट दिला, आजीने सोन्याच्या दोन बांगड्या वीणाच्या हातात घातल्या
"आजी मम्मी मी नाही घेऊ शकत हे प्रेझेंट खूप महाग आहे",....... वीणा घेतच नव्हती,
आजीने बळजबरी केली,..... "असू दे ग आमच्याकडून तुला प्रेझेंट, तुझ्यासमोर काहीच नाही या वस्तू",
" हो ग तुला घ्यावेच लागतील आणि रोज वापर या बांगड्या",........ मम्मी
वीणा ने उठून आजी आणि मम्मी च्या पाया पडल्या, आजीने खूप छान गजरा वीणाच्या डोक्यात माळला, वीणा च्या डोळ्यात अश्रू होते
"काय झालं वीणा",...... मम्मी
"काही नाही, तुमच्या सगळ्यांच प्रेम बघून खूप भरल्यासारखं झालं मला, तुम्ही सगळे खूप चांगले आहात, मला इकडे येण्याच्या आधी खूप टेन्शन आलं होतं, वाटलं होतं कसे असतील सगळे, पण तुम्ही सगळ्यांनी मला लगेच आपलंसं केलं, खूप छान वाटल आज मला",...... वीणा
सगळे बाहेर हॉलमध्ये आले,
" चल वीणा मी तुला घरी सोडून येतो",..... समर
वीणाने पप्पा आणि आजोबांच्या पाया पडल्या
" तुम्ही सगळे या आता आमच्याकडे",.......पप्पा
" हो नक्की वीणा, तुझ्या बाबांचा फोन नंबर आहे का? दे मी फोनवर बोलतो त्यांच्याशी",..... पप्पांनी वीणाच्या बाबांना फोन लावला, ते दोघं बराच वेळ फोनवर बोलत होते पप्पांचा चेहरा हसरा वाटत होता, त्यांनी फोन ठेवून दिला
वीणा आणि समर निरोप घेवून घराकडे निघाले, पूर्ण गाडी भर वीणाच्या गजर्याचा सुगंध खूप छान येत होता, तुला गजरा खूप छान दिसतो,
"आजीने दिला आहे गजरा आणि ह्या बघ बांगड्या त्या पण आजींनी दिल्या ",...... वीणा खुश होती,
"खूप छान दिसत आहे तुझ्या हाताला या बांगड्या वीणा, कधी काढू नको आता या बांगड्या",..... समर
"हो , डिझाईन किती छान आहे ना, समर आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही, खूप प्रेम दिलं तुझ्या घरच्यांनी मला आज ",...... वीणा
" आणि माझं काय? माझा तर नंबरच लागला नाही",...... समर हसत होता
" चूप रे तू", ..... वीणा समरला मारत होती
घर आलं समर ने गाडी बाजूला पार्क केली, तो स्वतः वीणाला सोडायला घरी आला, दादा वहिनी मुलं बाजूच्या रूम मध्ये होते, घरी आई बाबा आणि प्रकाश होते, समर वीणा आत आले, बसले,
" कसा झाला interview प्रकाश",..... समर
"चांगला झाला, 15 दिवसांनी जॉईन होतोय मी महेश इंजीनियरिंग ला ",.... प्रकाश
"तुझ खूप अभिनंदन, मस्त काम झाल, माझ्या कडे एक काम आहे, एका मशीन मध्ये मला चेंजेस हवे आहेत, तू एक दोन दिवसात येवून जा ऑफिस ला, जमल तर एक छोट प्रोजेक्ट करायच आहे तुझ्या सोबत ",..... समर
"Ok , अरे वा, ही तर मोठी संधी आहे माझ्या साठी, thanks, पण संध्याकाळी जमेल मला",..... प्रकाश
"चालेल यायच असेल तेव्हा सांग मी गाडी पाठवतो",..... समर
" चहा करू का थोडा ",.... आई
"नको आई मी निघतो आता, खूप उशीर झाला आहे, उद्या ऑफिस आहे " ,..... समर
बाबा बाहेर पर्यंत सोडवायला आले, समर घरी निघून गेला
वीणा आवरायला आत गेली आई आली मागे,..... "कसे आहेत ग लोक ते, ",
"आई खूप चांगले आहेत, खूप व्यवस्थित वागले सगळे, मला ड्रेस आणि या बांगड्या दिल्या प्रेझेंट ",..... वीणा लाजत होती
" खूप छान दिसते आहेस ग तु, बांगड्या ही मस्त, ",.... आई
"प्रकाश महेश इंजीनियरिंग शी झाल का पुढच बोलून",..... वीणा
" त्यांनी पंधरा दिवसात जॉईन व्हायला सांगितलं आहे, आणि उरलेल्या पंधरा दिवसाचे पैसे नवीन कंपनी जुन्या कंपनीला देऊन टाकले, जेव्हा मी जॉईन होईल तेव्हाच नवीन प्रोजेक्टचं काम सुरू होईल सगळे राइट्स माझ्या हातातच राहतील ",...... प्रकाश
" हे छान झालं बर का तुझं काम प्रकाश, आता उद्या जुन्या कंपनीत जाणार ना",....... वीणा
" हो अजून पंधरा दिवस तरी जावे लागेल",...... प्रकाश
" बाबा तुम्हाला समरच्या पप्पांनी फोन केला होता ना ",.... वीणा
" हो खूप चांगले लोक दिसत आहेत ते खूप छान बोलण झाला आमचं, आता पुढे काय ठरल आहे ",.... बाबा
" अजून काही ठरलं नाही बाबा, आता खूप उशीर झाला ना मग आम्ही निघालो, आपण एकदा सगळेजण जाऊ या त्यांच्याकडे किंवा त्यांना इकडे बोलवु",...... वीणा
" चालेल, तू खुश आहेस ना" , ..... बाबा
हो बाबा.....
प्रकाश वीणाला समरच्या घराबद्दल, घरातल्या लोकांबद्दल सगळं विचारत होता, विणा त्याला एक एक गोष्ट सांगत होती, भाऊ बहीण खूप आनंदात होते, आई-बाबा त्यांचे बोलणे ऐकत होते.....
" पुरे झाल्या आता गप्पा , जरा आराम करा, उद्या ऑफिस असेल ना",..... आई
वीणा ला अजिबात झोप येत नव्हती, दिवसभर झालेला सगळा घटनाक्रम डोळ्यासमोर येत होता, तिला विश्वासच बसत नव्हता की आज ती समरच्या घरी जाऊन आली, हातातल्या बांगड्या किती सुंदर आहेत, गजरा सगळ स्वतःच स्वतः बघत होती, आज समरने मला किती प्रेमाने मिठी मारली, किती छान वाटत होतं त्याच्यासोबत, एक विश्वासाचं प्रेमाचं नातं आहे समर सोबत, मला कधीच तो परका असल्यासारखं वाटत नाही,
तेवढ्यात समर चा मेसेज आला,.. "मी घरी पोहचलो आहे, थोड्या वेळा पूर्वी तू माझ्या सोबत या रूम मध्ये होती, आपण कधी सोबत राहू अस ",
"येईल तो दिवस लवकरच, झोप आता उद्या ऑफिस आहे ना ",..... वीणा
" ओके तू ही आराम कर",...... समर
" हो पण मला झोपच येत नाही आहे",..... वीणा
"मलाही",...... समर
" पण चल मी आता झोपते माझ्यामुळे बाकीचे डिस्टर्ब नको व्हायला ",...... वीणा
" उद्या भेटशील का वीणा ",..... समर
" हो उद्या ऑफिस झाल्या नंतर भेटू ठीक आहे चल गुड नाईट",.......वीणा
गुड नाईट..... समर
.......
अधिकारी साहेब आज सकाळीच उठले, एक प्लॅन त्यांच्या डोक्यात पूर्ण तयार होता, लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे, नाहीतर परांजपे साहेब हातात लग्नपत्रिका देतील, त्यापूर्वी आपल्याला आपलं काम करायला पाहिजे, डिटेक्टिव भोसलेंना हातात धरून अधिकारी साहेबांनी वीणा बद्दल सगळी चौकशी करून घेतली होती, ती कुठे राहते, काय काम करते, किती वाजता घरी जाते, किती वाजता वापस येते, घरात कोण कोण आहे, घरची परिस्थिती कशी आहे, सगळं समजल्यानंतर त्यांना वाटलं हे खूप सोपं काम आहे,
"मी निघतोय ऑफिस ला जायला",..... अधिकारी
"त्या मुलीला भेटणार ना आज",.... मॅडम
"हो, पण हे सगळ निशा ला समजता कामा नये, हे आपल्यात राहू दे ",...... अधिकारी
"हो बरोबर आहे तुमच, होईल ना हो सगळ नीट",..... मॅडम
"तू काळजी करू नकोस, मी आहे ना ",...... अधिकारी
.........
वीणाचा सगळ आवरलं होतं, सकाळी दादा आणि प्रकाशही ऑफिसला जायला रेडी होते, बाबांच् आवरायचं होतं
"सांगा ना वीणा ताई काय काय झाल तिकडे, घर कस आहे त्यांच, समर शी काय बोलण झाल, पटापट सांगा ",..... वहिनी
"संध्याकाळी बोलू वहिनी, मला उशीर होतो आहे " ,.....वीणा हसत होती
"अस काय? काल तुम्ही का नाही उठवल आम्हाला, आता थोड तरी सांगा",..... वहिनी
"नाही, वहिनी त्रास देवू नकोस, उशीर होतो आहे",.... वीणा
" थोड तरी काही सांगा, हे काय अस, आता आम्ही संध्याकाळची वाट बघत बसायची का?",...... वहिनी
"तिला बांगड्या आणि ड्रेस दिल्या आजींनी, खूप छान आहेत घरचे, घर ही खूप मोठ आहे त्यांच ",...... आई सांगत होती
" अरे वा ताई, मस्त, खूप छान आहेत ताई बांगड्या वापरून टाका आता ",..... वहिनी
वीणा लाजत होती, आई वहिनी कौतुकाने बघत होत्या
" आई मी निघते ऑफिसला ",..... वीणा
वीणा ऑफिसला निघाली
" थांब ना मी येतो आहे तुझ्यासोबत, मला त्या साईडला जायचं आहे ",...... म्हणून विणा आणि प्रकाश सोबत निघाले वीणा बस स्टॉप वर पोहचली
अरे हे काय वीणा सोबत कोण आहे हे? , अधिकारी साहेब बस स्टॉप जवळ एका कार मध्ये होते, त्यांनी विचार केला होता की आपल्याला इथे बस स्टॉप वरच वीणाला एकटीला गाठता येईल आणि तिच्याशी थोडं बोलता येईल
बस आली बस मध्ये विणा आणि प्रकाश बसले, अधिकारी साहेबांनी बसचा पिच्छा केला, वीणा चा ऑफिसचा बस स्टॉप आला ती खाली उतरली
अधिकारी साहेब मागेच होते, त्यांनी पटकन बाजूला गाडी पार्क केली, आणि ते विणाशी बोलायला म्हणून घाईघाईने पुढे आले
"एक्सक्युज मी मिस विणा",..... अधिकारी
"एस", ....... वीणा
"तू वीणा आहेस ना",..... अधिकारी
"हो सर पण मी तुम्हाला ओळखलं नाही",.... वीणा
"मी माझी ओळख करून देतो मी आहे अधिकारी",...
"हॅलो.... पण माफ करा मी तुम्हाला ओळखते का?, काही काम आहे का तुम्हाला माझ्याशी? ",.... वीणा
"तु मला नाही ओळखत पण मी तुला ओळखतो",.... अधिकारी
" बोला ना सर काय काम आहे",..... वीणा
"आपण कॉफी घेऊया का ",.... अधिकारी
"मला ऑफिसला उशीर होतो आहे, इथेच काय काम आहे ते सांगितलं तर बरं पडेल, नाहीतर मी जाते ",...... वीणा
" ठीक आहे मग मी स्पष्टच बोलतो, समर परांजपेंना तू ओळखतेस ना ",..... अधिकारी
हो.... वीणा
" माझ्या मुलीचे स्थळ समर साठी आलं होतं पण समरचा तुझ्याबरोबर लग्न करायचा विचार आहे म्हणून समरने हे स्थळ नाकारलं ",..... अधिकारी
" हो मला माहिती आहे ते",..... वीणा
" तर आता माझं असं म्हणणं आहे की तू समरला नकार दे",..... अधिकारी
" पण मी असं का करू? माझा समर वर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघे लग्न करणार आहोत, मी जरी समरला नकार दिला तरी तो तुमच्या मुलीशी लग्न करायला होकार देईल का? तुम्हाला विश्वास वाटतो आहे का"?,.... वीणा
" ते पुढे काय करायचं आम्ही आमचं बघून घेऊ, फक्त मी तुला काय सांगतो तिकडे लक्ष दे, उगीच हुशारी माझ्या समोर चालणार नाही ",...... अधिकारी
अधिकारी साहेब बराच वेळ विणाशी काहीतरी बोलत होते..................
ते बोलत असताना वीणा चा चेहऱ्यावरचा रंग उडत होता, तिला सुचत नव्हतं काय करावं, अधिकारी साहेबांचा चेहरा खुलला होता..
" सर तुम्ही असं का करत आहेत माझ्यासोबत ",..... वीणा
" कारण मला माझ्या मुलीसाठी समरच स्थळ हव आहे, हवा तेवढा पैसा घे आणि हो बाजूला, तू आहेस कोण ग, तुझ्या मुळे सगळ अडल आहे, छान ठरल होत आमच या आधी , अशी कशी मध्ये आलीस तू, माझ ऐकल नाहीतर तुझ्या घरच्यांना धोका आहे, समर ला हि मी सोडणार नाही, मी काहीही करू शकतो समजल का",....... अधिकारी सर धमकी देत होते
" या जगात बाकीचे मूल नाहीत का, माझा समर का हवा तुम्हाला ",...... वीणा
" तुझा समर, कधी पासून?, तू मध्ये आली आहेस आमच्या समजल का? आणि कोण आहेस तू साधा जॉब करणारी मुलगी, पैसे साठी मागे लागली ना तू समर च्या, तुझ्या सारख्या लोकांना मी चांगल ओळखून आहे, तू काय आहे ना हे लवकरच मी परांजपे साहेबांना सांगणार आहे, तेव्हा बाजूला व्हायच आमच्या पासून, तुझ्या सारख्या एखाद्या मुलाला पकड आणि कर लग्न, बरे श्रीमंत घरचे चांगले मूल ही अश्या मुलींना पसंत करतात ",........ अधिकारी
"अश्या म्हणजे कश्या, का तुम्ही मला अस बोलता आहात, तुम्हाला माहिती तरी आहे का माझ्या बद्दल काही, प्लीज तुम्ही जा इथून, ठीक आहे तुम्ही म्हणता तसे मी करेल, पण माझ्या घरच्यांना आणि समर ला काही होता कामा नये",....... वीणा
" तुला करावच लागेल मी म्हणतो ते, कोणाला सांगू नको हे, समजल का ",...... अधिकारी
"Please अस करु नका सर, माझ खूप प्रेम आहे समर वर, तुम्ही अस वागताय , पण त्याने काहीही साध्य होणार नाही",...... वीणा रडत होती
" आम्ही आमचं बघून घेऊ, तुझ्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेव, मी सांगितलं तसंच वागली नाही तर माझ्याहुन कोणी वाईट नाही ",...... अधिकारी
अधिकारी साहेब तिथून निघून गेले
वीणा च्या डोळ्या अश्रु थांबत नव्हते, तिला काही सुचत नव्हते काय काय करावे, गरीब असण म्हणजे गुन्हा आहे का? गरिबाला स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा हक्क नाही आहे का? मी माझ्या मना प्रमाणे प्रेम नाही करू शकत नाही का? किती बोलले ते मला आज,
समर आय एम सॉरी पण मला अधिकारी साहेब म्हणतात ते करावाच लागेल, तुझ्या साठी माझ्या घरच्यांसाठी, पण मी खरंच सांगते माझं तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे
वीणा तिथे बाकावर बसली, बॉटल मधले पाणी पिल, काय कराव तिला सुचत नव्हत, एक मन सांगत होत नको ऐकु अधिकारींच जावून सगळ समरला सांगून दे, पण यात खूप धोका होता, नक्की काय मॅटर आहे हे समजले पाहिजे, सध्या समरशी बोलायला नको, हेच योग्य राहील,
समर ला हि धोका आहे, तो उगीच एकटा भांडायला गेला त्यांच्याशी तर प्रॉब्लेम होईल आणि घरचे... आता थोड नीट होतय, दादा वहिनी आताशी सेटल झाले, किती खुश आहेत ते, प्रकाश ला आता नौकरी लागली, नको या श्रीमंत लोकांपेक्षा दूर राहिलेल बर
मनाचा दृढनिश्चय करून विणा ऑफिसला आली, प्रीती आधीच आलेली होती, वीणा शांतपणे तिच्या जागेवर बसली, प्रीतीला आश्चर्यच वाटलं रोज एवढा उत्साहाचा झरा असलेली विणा एकदम शांत? काहीतरी झालय बहुतेक घरी,
"हाय वीणा काय झालं आज एकदम शांत आणि उशीर झाला आहे तुला अर्धा तास ",...... प्रिति
"काही नाही ग प्रीती थोडी बस लेट झाली त्याच्यामुळे उशीर झाला",..... वीणा
"एक मीनट, वीणा रडली का तू आज",...... प्रिति
वीणा ला वाटलं होतं की उठाव आणि घट्ट मिठी मारावी प्रीतीला आणि तिला सगळ सांगून द्यावा काय झाला आहे ते, काय म्हटले अधिकारी, सगळं सगळं, पण तिने काहीही सांगितल नाही
" नाही मी कशाला रडेल",..... वीणा
" काल गेली होतीस का तू समर कडे? काय झालं ते सांग ना पटापट? मला वाटलं तू आल्या-आल्या मला खूप त्रास देशील, अगदी तिकडे काय झालं काय नाही हे सांगून त्रासून सोडशील, ओहो बांगड्या नवीन आहेत का मॅडम",...... प्रिति
"नाही ग प्रीती, तू तुझ काम कर, असं काही झालं नाही तिकडे, तू मला त्रास देवू नको ",....... वीणा
" सगळे व्यवस्थित आहे ना तिकडे? समर चे आई बाबा वगैरे व्यवस्थित वागले ना तुझ्याशी",....... प्रिति
"हो ठीक आहे तिकडे सगळं, प्रीती माझ जरा डोकं दुखत आहे, मला थोडा वेळ देशील का? मी सांगते तुला सगळं नंतर ",..... वीणा कामाला लागली
प्रीती आश्चर्याने वीणा कडे बघत होती, पण दुखत असेल डोक बहुतेक म्हणून प्रीती ही कामाला लागली
वीणा विचारच करत होती काय करावे आता, समरच आपल्यावर एवढ प्रेम आहे की त्याला काही सुचत नाही, कस काय टाळता येईल त्याला, काय करावं, किती मोठं संकट आहे हे डोक्यावर,
तेवढ्यात समोरचा मॅसेज आलाच,....., "आली का ऑफिसला? काय करते आहेस वीणा",..
वीणाने समरचा नंबर ब्लॉक केला आणि फोन ठेवून दिला........