Aug 09, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 28

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 28

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


सरांचा अंदाज बरोबर होता..... खूपच साधी आणि छान वाटत होती वीणा.......


"हे पॅटर्न तू तयार केले आहेस का"?,.... सर


"हो सर", ..... वीणा


"हुशार आहेस, तुला गारमेंट मशिन बद्दल बरीच माहिती आहे",..... सर


"हो कंपनी च्या वेअर हाऊस मशीन आले की आम्ही पॅटर्न सेट करतो, प्रेझेन्टेशन बनवतो त्यानुसार एकदा मशीन सेट करतो ",....... वीणा


खूप छान माहिती देत होती वीणा, परांजपे सरांना खात्री पटली कि मुलगी खूप हुशार आहे, आपला एवढा मोठा बिजनेस आहे, तो सांभाळायला मुलगी हुशार आहे...


" मी समरचा पप्पा आहे ",..... सर


" हो सर मला माहिती आहे, thank you sir" ,...... वीणा लाजत होती


"कश्या बद्दल", ...... सर


"असाच,... तुम्ही खूप supportive आहात, खूप छान वाटले तुम्हाला भेटून",...... वीणा


"एक सांगू का वीणा मला काल समरने सांगितल तुझ्या बद्दल तेव्हा पासून मी विचार करत होतो कशी असेल वीणा, मी जसा विचार केला तशीच आहेस तू एकदम साधी हुशार, माझ्या मुलाने हिरा पसंत केला आहे ",...... सर


वीणा लाजत होती.....


"आज येणार ना संध्याकाळी घरी",.... सर


"हो येणार आहे, मला बोलायच होत थोड",.... वीणा


"हो बोल ना बेटा",..... सर


"मी खूप साध्या घरची मुलगी आहे, तुम्ही विचार करणार नाही काहीही नाही माझ्या कडे, समर ला हि मी हेच बोलली होती ",....... वीणा


" त्याने काय फरक पडतो बेटा, तू चांगली आहेस, हुशार आहेस, तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केल तुम्ही आनंदी आहात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी आणि तुला एक गोष्ट सांगतो, आधी आमची ही कंपनी एक छोटासा workshop होती काहीही नव्हतं माझ्याकडे, मी ही खूप मेहनत घेतली, खूप काम केल, मला जाणीव आहे परीस्थितीची, तू काळजी करू नकोस ",...... सर


वीणा नीट ऐकत होती सगळ,...." मी खूप nervous आहे, मला काहीही माहिती नाही, तुमच्या कडे कस वागतात बोलतात, मला सांगाल का काही ", ...... वीणा


" त्यात काय विशेष मला ही माहिती नाही वागण्या बोलण्याच्या पध्दती , खूप साधे आहेत आमच्या कडे सगळे तू काळजी करू नकोस, आपण एक काम करू या का तूला संध्याकाळी काही अडचण आली तर मला विचार, मी तुझी मदत करेन, संध्याकाळी नाही तर कधीही काही लागल तर सांग मला, मी आहे ",....... सर


" हो सर, आता बर वाटतय ",..... आता वीणा खुश होती.......सरांना काम होतं सर आत मध्ये निघून गेले, परांजपे मॅडम मीटिंग मध्ये बिझी होत्या, त्यामुळे त्यांची आणी वीणाची ऑफिसमध्ये भेट झाली नाही....


वीणाच एक टेन्शन कमी झाल्यासारखं वाटत होतं, परांजपे सर खूप चांगले होते, सरही हि खूप खुश होते, समोरची पसंत खूप चांगले आहे, एकदम गोड मुलगी आहे वीणा, त्यांना तर अस झालं होतं कधी समर आणि वीणा च लग्न होतं


वीणा प्रशांत प्रीती यांचं ट्रेनिंग देवून झालं, बराच वेळ झाला होता, तिघे कॉफी घेत होते, समरहि आला तेवढ्यात शॉप मध्ये, समर साठी कॉफी मागवली


"कस झालं ट्रेनिंग",..... समर


"चांगलं झालं",..... प्रिति


"चला मी तुम्हाला सगळ्यांना सोडतो ऑफिस मध्ये, आणि वीणा तुला एक तास आधी निघता येईल का? आपण तुझं सामान घेऊन घरी जाऊ ",...... समर


प्रशांत आणि प्रीती हसत होते....


" मला लवकर निघायला काही हरकत नाही पण मला सरांना विचारावं लागेल",...... वीणा


" काही हरकत नाही मी थांबेल पाच मिनिटे बाहेर ",...... समर


सगळे निघाले... समर प्रशांत वीणा प्रीती ऑफिस आले, तिघ उतरून आत गेले, सर त्यांच्या केबिन मध्ये होते, विणा आत सरांच्या केबिन मध्ये आली


" सर मला थोडं बोलायचं आहे ",.... वीणा


" ये वीणा, कस झाल ट्रेनिंग? , व्यवस्थित चालते आहेत ना मशीन? , प्रेझेंटेशन दिलं का? ",...... सर


" हो सर सगळं व्यवस्थित झालं, मी उद्या रीपोर्ट देते, सर मी आज एक तास लवकर जाऊ का, म्हणजे आता जाऊ का लगेच घरी",.... वीणा


" हो चालेल ना, कुठे जायचं आहे, म्हणजे प्रीती हि सोबत येते आहे का, काही प्रॉब्लेम तर नाही ना, टॅक्सी वगैरे अरेंज करू का? ",....... सर


" नाही सर नको टॅक्सी , मी एकटी जाणार आहे, प्रिती आहे ऑफिस मध्ये ",...... वीणा


शिपाई काका आत आले,....." सर समर परांजपे सर आपल्या ऑफिस बाहेर उभे आहेत ",.....


" त्यांना बोलव आत मध्ये, कशाला आले आहेत ते, आत मध्ये का नाही आले",....... सर


शिपाई काकांनी समर ला सांगितल,...." तुम्हाला आत बोलावल आहे ",.


" नाही मी ठीक आहे बाहेरच, मला लगेच निघायचं आहे, वीणा ला पाठवून द्या ",....... समर


शिपाई काका आत आले,..... "सर ते आत येत नाही आहेत, त्यांनी वीणा मॅडम ला लवकर बोलवल आहे ",


"वीणा तू समर सरांसोबत जाणार आहेस का, काय? , आम्हाला ही सांग ",...... सर


" हो सर मी आज समर सरांच्या घरी जाणार आहे, त्यांच्या घरच्यांना भेटायला",...... वीणा लाजत होती


"म्हणजे मला समजलं नाही",..... सर


" सर मी आणि समर लग्न करतो आहोत, म्हणजे अजून ठरायचं आहे, म्हणजे आमच ठरलेल आहे ",..... वीणा ची गडबड झाली होती


" काय बोलतेस? कधी ठरलं हे सगळं आणि आम्हाला कधी सांगायचं, खूप अभिनंदन तुझ ",..... सर


वीणा छान हसत होती,... "सर मी निघू का ",


" हो तू जा, समर वाट बघत असेल ",..... सर


वीणाने सामान घेतल,..." चल प्रीती मी निघते, ठीक वाटते आहे ना मी, ड्रेस वगैरे ठीक आहे ना ",


" हो मस्त don\"t worry काय झालं तिकडे ते सांग नंतर",.... प्रिति


हो....


वीणा गाडीत घेऊन बसली, समर खूप आनंदात होता


"खरंच वाटत नाहीये ना की आपण माझ्या घरी सोबत जात आहोत ",.... समर


"हो ना किती छान झाला आपल्या दोघांच्या घरच्यांनी होकार दिला",...... वीणा


" पण तू आता अशी गप्प गप्प राहणार का",..... समर


"मला टेन्शन आल आहे की मी तुमच्या घरी जाऊन काय बोलणार आहे, काय करणार आहे ",...... वीणा


" काही टेन्शन घेऊ नको, आमच्या घरचे सगळे खूप साधे आहेत",..... समर


" आज तुझे बाबा आता ऑफिस मध्ये भेटले होते",..... वीणा


" काय बोलतेस पप्पा भेटले होते तुला काय म्हटले ते ",...... समर


" तुझे बाबा खूप छान आहेत, खूप चांगले बोलले ते माझ्याशी, मशीन ची माहिती विचारली, बर्‍याच वेळ बोलत होतो आम्ही, सर लवकरच घरी येणार आहेत आज, आमच दोघांची खूप पटेल अस वाटत आहे",....... वीणा


"हो पप्पा खूप साधे आहेत, प्रेमळ ही आहेत, खूप सपोर्ट करतात ते नेहमी नीट वागतात ",....... समर


समर बोलत होता वीणा त्याच्या कडे बघत होती


आज किती टेंशन फ्री दिसतो आहे समर, काल किती टेंशन मध्ये होता, बर झाल त्याच्या घरच्यांनी सपोर्ट केला, किती छान असाच रहा dear.....


" काय झाल वीणा? का बघते अशी माझ्याकडे, विचार काय आहे",.... समर


वीणा हसायला लागली....


"सांग ना ",...... समर


"तू छान दिसतो आहेस आज, एकदम innocent वाटतो आहेस मला ",...... वीणा


समर लाजला,.... "विचार काय आहे, जायच ना आमच्या घरी भेटायला सगळ्यांना आपण, की दोघांनी फिरून यायचा बाहेर कुठे",.....


" नाही... घरी जाऊ तुझ्या परत सुट्टी मिळणार नाही",..... वीणा


"तुम्ही मुली ना लगेच माघार ह, घाबरली का, आधी का बघत होतीस मग माझ्या कडे ",.... समर


वीणा लाजत होती ,.... "तुझ्या घरचे वाट बघत असतिल",


" हे अस तू छान दिसत राहशील तर मी कशी गाडी चालविणार वीणा, please अस नको करूस ",...... समर


" खरच.... माझा ड्रेस ठीक आहे ना, सूट होतो ना मला ",...... वीणा


" हो एकदम Ok तू खूप छान दिसते आहेस",..... समर


दोघा घरी आले, मम्मी पप्पा यायचे होते अजून घरी, सोहा ही नव्हती आली


किती आलिशान घर आहे समरच, मोठ गेट सिक्युरिटी गार्ड, आत जायला रस्ता, दोघी बाजूने गार्डन सुरेख, फुल झाडे , तीन मजली घर, एकदम सुंदर, हा तर एक महाल आहे, मी इथे अजिबात सूट होत नाही, माझा कुर्ता किती साधा आहे, वीणा अजून नर्वस झाली


"काय झाल वीणा, चल उतर खाली",...... समर


" मला नाही सुचत काही समर , मला माझ्या घरी सोड",... वीणा


"अरे काय झालं, कसल टेंशन आहे, मी आहे ना सोबत आणि तू एकदम सुंदर दिसते आहे, काळजी कसली करतेस तुझ्या चेहर्‍यावर कर्तबगारीचा तेज आहे, तू कॉन्फिडन्ट वाटते आहेस आणि काळजी नको करू चल आत",.... समर


"तुझे बाबा का नाही आले अजून, ते बोलले होते, ते राहतील माझ्या सोबत ", ........वीणा


" येतील ते, तो पर्यंत तू आजी आजोबांना भेट",...... समर घरात गेला, आजी आजोबा त्यांच्या रूम मध्ये होते, वीणाला सोफ्यावर बसायला सांगितले


"तू दोन मिनिट बस मी आजीला बोलावून आणतो ",....... समर आत निघून गेला


वीणा एकटीच हॉल मध्ये बसली होती, खूप मोठा हॉल होता, सोफा सेट छान सजवलेले होते, कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती घरात, ठीक ठिकाणी गालिचे अंथरले होते, सुंदर फुल होते, मला अजिबातच एवढ्या मोठ्या घरात सुचणार नाही, या घरात कोणी आहे की नाही असं वाटत आहे, यांचा हॉल तर आपल्या पूर्ण घरापेक्षा दुपटीने मोठा आहे, तेवढ्यात स्वयंपाक वाल्या काकू पाणी घेऊन आल्या, विणा उठून उभी राहिली, त्यांनी हसून वीणाला पाणी दिलं त्या आत निघून गेल्या


आजी-आजोबा रूममध्ये टीव्ही बघत होते,.... "काय रे समर आज लवकर आला का"


"आजी वीणा आली आहे बाहेर, चल ना तिला भेटायला",.... समर


"तिला कशाला हॉलमध्ये बसवल, तिला इकडे घेऊन ये, अजून बाकी कोणी आले नाही ना",..... आजी


"नाही आजी सोहा आली नाही अजून मम्मी पप्पा ही ऑफिसहून यायचे आहेत",....... समर


समोर बाहेर गेला,...." चल वीणा आजी ने आत मध्ये बोलवलं आहे ",....


" समर मला काही सुचत नाहीये, तुमच्या घरी कोणी नाही का",...... वीणा


" येतील मम्मी पप्पा सोहा, तू टेंशन फ्री रहा ",...... समर


समर वीणाला घेऊन आत केला


आजी-आजोबांची रूम प्रशस्त होती, एका साईडला कॉट होता, दुसऱ्या साईडला सोफा होता, आजोबांसाठी आराम खुर्ची होती, आजी आजोबा सोप्यावर बसून टीव्ही बघत होते, वीणा आत गेली, आजी उठून उभी राहिली, वीणा ने जाऊन आजी-आजोबांच्या पाया पडल्या, आजीने तिला स्वताच्या बाजूला बसून घेतलं, आजोबा कौतुकाने वीणा कडे बघत होते....


समरची आजी किती सुंदर आहेत, एकदम आपल्या आई सारख्या दिसता आहेत त्या, किती तेज आहे चेहर्‍यावर त्यांच्या


"किती सुंदर आहेस तू वीणा, एकदम सालस, आमचा समर खूप लकी आहे",...... आजी


"तुमच्या पुढे काहीच नाही मी",....... वीणा


"घरी कोण कोण असत तुमच्या",.... आजोबा मुद्दाम वीणाला बोलत करत होते


वीणा प्रश्नांची उत्तर देत होती


"आम्हाला वाटले होत तशीच आहेस तू वीणा",....... आजी,


" आजी आजोबा तुम्ही ही खूप छान आहात, तुमच घर मोठ मस्त आहे, आजी पण मला जमेल का इकडे ऍडजेस्ट व्हायला ",..... वीणा


" का नाही जमणार बेटा, तू खूप हुशार आहेस आणि इथे काही प्रॉब्लेम नाही सगळे बिझी असतात फक्त काम आणि ऑफिसची चर्चा, दुसर्‍याला त्रास द्यायला वेळ नाही इथे",........ आजी


" तस नाही आजी",....... वीणा


सोहा आली तेवढ्यात, तिला समरने सांगितल वीणा आजी च्या खोलीत आहे


सोहा वीणाला भेटायला आजीच्या खोलीत गेली, आजी आणि वीणा छान गप्पा मारत बसले होते,


" ये ग सोहा",.... वीणा ही आहे सोहा आणि सोहा ही वीणा, आजीने ओळख करून दिली


दोघी एकमेकींना भेटल्या, दोघींच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता, वीणाचा टेन्शन आता अर्ध कमी झालं होतं


"काँग्रॅजुलेशन सोहा तुझं लग्न जमलं ना" ,....... वीणा


" तुलाही काँग्रॅच्युलेशन वीणा वहिनी",....... दोघीजणी हसायला लागल्या


मम्मी पप्पा आले तेवढ्यात, ते दोघेही आजी-आजोबांचे रूम मध्ये आले, वीणा मी उठून उभी राहिली


" सॉरी बेटा मी बोललो होतो तुला की मी लवकर येईल पण थोडा कामात उशीर झाला",...... पप्पा विणाशी बोलत होते सगळे आश्चर्यचकित झाले, या दोघांची कशी काय ओळख


"पप्पा तुम्ही वीणा ला ओळखतात आधीच",..... सोहा


" हो आमची ओळख झाली आहे आज दुपारीच ट्रेनिंग च्या दरम्यान, वीणा खूप हुशार आहे ह तिला खूप माहिती आहे मशीन बद्दल, सोहा तू ऑफिस जॉईन केल्यावर तुला मदत होईल वीणा ची",..... पप्पा


"हो, वीणा वहिनी मला मदत करायची ह ",..... सोहा


वीणा ने पुढे होऊन मम्मी पप्पा यांच्या पाया पडल्या, समर ची मम्मी विणा कडेच बघत होती, छान आहे मुलगी हुशार वाटते आहे


" चला आपण सगळे जण हॉलमध्ये बसू",..... सगळेजण बाहेर गेले, सोफ्यावर बसले, वीणा उभी होती


" ये बेटा बस इकडे. कोण कोण आहे तुझ्या घरी, काय करता तुम्ही सगळे, सगळं सांग मला, एक मिनिट तू काही घेतलं का आल्यापासून? तुला काय आवडेल कॉफी की सरबत आणि आता जेवून जा",...... मम्मी


वीणा काही बोलत नव्हती, ती गडबडून गेली होती, "सगळेच कॉफी घेणार आहेत ना, मी काकूंना कॉफी करायला सांगतो",...... समर आत गेला


" तुला आमचा समर पसंत आहे ना आई "?,..... मम्मी विचारत होती


तसे सगळे हसायला लागले.....


" अरे म्हणजे हिला विचारायला नको का तिला पसंत आहे की नाही हे सगळं, नाहीतर उगाच आपला समर तीच्या मागे मागे करत असायचा आणि ती दडपणात येऊन हो बोलायची ",..... मम्मी


"नाही मॅडम तसं काही नाही ",..... वीणा


तसे परत सगळे हसायला लागले......


"हे बघ आणि मला मम्मी बोल आणि यांना पप्पा, मॅडम सर वगैरे नको बोलू",..... मम्मी


वीणा आता बरीच रिलॅक्स झाली होती, खूप छान होते समरच्या घरचे, एवढे श्रीमंत असुनही हे लोक वाटत नाही आपल्या सारखेच आहेत साधे, एवढा मोठा कारभार समर ची मम्मी हँडल करतात, पण घरात अगदी साध्या बनून राहतात, समरचे पप्पा तर खूपच छान आहेत, सोहा ही चांगली आहे पण सगळ्यात जास्त आवडले ते आजी आजोबा, किती प्रेमाने चौकशी करत आहेत माझी आल्यापासून, आणि ते सगळे समर पेक्षा जास्त माझी काळजी घेत आहेत, वीणा भारावून गेली होती, कॉफी आलीस तेवढ्यात, सगळ्यांनी कॉफी घेतली, सगळे मस्त गप्पा मारत बसले होते,


" वीणा तू आजी-आजोबांशी बोलत बस, समर तू वीणाला आपलं घर दाखवलं का? तुम्ही लोक घर बघा तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन येतो",..... मम्मी पप्पा रूम मध्ये गेले


"मी पण आलीच आवरून, समर वीणा ला घेऊन ये माझ्या रूम मध्ये",...... सोहा रूम मध्ये गेली


वीणा आजी-आजोबांचे जवळ आरामात बसली होती,


" चल वीणा तुला घर दाखवतो",...... गार्डन पासून सुरुवात केली समरने


" समर तुझं घर किती छान आहे, मला इकडे येण्याकडे येण्याआधी खूप दडपण आलं होतं, पण तुझ्या घरचे सगळे चांगले आहेत, किती व्यवस्थित बोलले माझ्याशी आणि तू एकदम तुझ्या आजी सारखा आहेस, एकदम चांगला, दुसऱ्याची खूप छान काळजी घेतोस, तू प्रेमाने वागतो" ,...... वीणा


"पुरी झाली तारीफ मॅडम, गार्डन आवडलं का तुला",.... समर

" हो खूप आवडलं, किती प्रसन्न वाटत आहे, माझ स्वप्नं होत हे अस गार्डन, आपण इथे चहा घेत जाऊ ",..... वीणा


" तू म्हणशील तस",..... समर


दोघ आत आले, समर विणा ला त्याची रूम दाखवायला घेऊन गेला, वरती एक छोटासा हॉल होता त्याच्या आजूबाजूला बेडरूम होत्या, मोठी रूम मम्मी पप्पांची होती, तीन छोट्या बेडरूम होत्या, कोपर्‍यातली रूम समरची होती, रूम ला सुंदर पांढरा रंग होता, रूम अतिशय स्वच्छ होती, अभ्यासासाठी टेबल होता बाजूला, मोठा कॉट, एक छोटा सोफा होता, समरचे वेगवेगळे फोटो फ्रेम करून एका भिंतीला लावलेले होते, ते फोटो बघून वीणा पळत भिंतीकडे गेली,... "हे सगळे तुझे लहानपणीपासून चे फोटो आहेत का रे",


"हो जे छान आले आहेत ते मम्मीने फ्रेम करून असे तयार केलेले आहेत" ,...... समर


वीणा ने मोबाईल काढून त्यात ते समरचे फोटो काढून घेतले,..... "मस्त आहे तुझी रूम" ,


"तुझी नाही आपली" ,...... समर


"किती छान दिसत आहेस तू फोटोत , तो लहानपणीचा फोटो किती गोड आहे" ,....... वीणा


" मी आताही तेवढाच गोड आहे बघायच का"?....... समर मुद्दाम वीणा ला चिडवत होता,


वीणाला समजल समर काय म्हणतोय ते, ती तिथून बाहेर धावायला लागली, समरने पुढे होवुन वीणा चा हाथ धरला, वीणाला हळूच मिठी मारली, वीणा त्याच्या सहवासात खूप छान आनंदी होती,


"आपण असाच राहू ना समर नेहमी",..... वीणा


" हो वीणा आता कोणी आपल्याला वेगळं करू शकणार नाही",...... समर


" प्लीज मला वचन दे तू मला कधीच सोडून जाणार नाहीस",....... वीणा


"काय हे, प्रॉमीस, मी अजिबात तुला कधी अंतर देणार नाही" ,..... समर


"सोड रे कोणी येईल" ,..... वीणा


" कोणी येणार नाही त्यांना माहिती आहे आपण माझ्या रूम मध्ये आहोत",...... समर खूप खुश होता......


" वीणा इकडे ये, मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे" ,...... समर ने ड्रॉवर उघडलं, त्यातून वीणाचा पांढरा गुलाबी रुमाल बाहेर काढला


" अरे हा माझा रुमाल कसा काय तुझ्याकडे ",....... वीणा


" त्या दिवशी गाडीत राहिला होता ",...... समर


"असा का ठेवला आहे आणि तो, इकडे दे ",..... वीणा


" नाही तो माझा आहे आता रुमाल",...... समर


"अरे पण मी दिवसभर वापरलेला खराब असेल तो रुमाल",....... वीणा


" नाही खूप छान आहेत तो रुमाल मी तुला देणार नाही",....... समर


रूम ला लागून छान छोटीशी बाल्कनी होती, सुंदर गार्डन सजवला होत तिथे, अतिशय प्रसन्न वातावरण होत, दोघे जण तिथे बोलत बसले, किती छान आणि रिलॅक्स वाटत आहे ना आज.........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now