Aug 09, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 27

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 27

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

आई-बाबा, दादा-वहिनी, प्रकाश सगळे जेवत होते, वातावरण एकदम आनंदी होतं, वीणा ही खूप आनंदात होती,


" मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे",..... वीणा


"बोला ना ताई",..... वहिनी


"काय ग बोल ना ",...... आई बाबा दादा प्रकाश सगळे वीणा कडे बघत होते


" समरने त्याचा घरी सांगितलं आमच्या बद्दल, त्याच्या घरच्यांचा होकार आहे, आणि उद्या मला त्यांनी भेटायला बोलावले आहे",...... वीणा


" अरे वा फोन आल होता का समर चा",..... आई


" हो आता एवढ्यात बोलण झाल आमचं ",....... वीणा


"बर झाल बाई एक टेंशन कमी झाल",....... आई


"मला माहिती नाही उद्या मी त्यांच्या घरी जाऊन काय बोलणार आहे, मी कधीच त्याच्या घरच्यांना कोणालाच बघितलं नाही, ऐकुन आहे त्यांच्या बद्दल फक्त, आई वहिनी दादा बाबा प्रकाश काहीतरी सांगा ",...... वीणा


" काही काळजी करू नकोस, तू जशी आहेस तशी भेट त्यांना", ...... दादा बोलला, प्रकाशने ही मान डोलवली


" वहिनी मी उद्या कोणता ड्रेस घालू ",...... वीणा


" नवीन ड्रेस घाला ताई तो व्हाइट गुलाबी ",..... वहिनी


" गप्प बस ग वहिनी, last time किती सजवून पाठवल होत तुम्ही मला समर ला भेटायला , आता नको, साधी तयारी हवी आहे मला",.... विणा


सगळे हसत होते...


"एकदम छान दिसत होत्या तुम्ही ताई त्या दिवशी, व्हाइट पिंक कलर सूट होतो तुम्हाला",.... वहिनी


" हो ना किती छान झाली होती तुझी तयारी", ..... आई


" नाहि ह सारखा काय तोच ड्रेस,काहीही, किती अवघड झालं होतं मला तेव्हा ",.... वीणा


"नवीन घेतलेला कुर्ता घाला",.... वहिनी


" चालेल ना, पण दिवस भर ऑफिस आहे, मग जाणार आहे मी तिकडे, सगळी तयारी खराब होईल",... वीणा


" ऑफिस मध्ये तयार व्हा निघताना, प्रीती असेल ना सोबत ऑफिस मध्ये",..... वहिनी


" हो बघते काय करायचा ते, मला टेंशन आला आहे",...... वीणा

....
अधिकारी सर रात्री बर्‍याच वेळ जागे होते, खरंतर त्यांना काहीही फरक पडत नव्हता समर च काही का असेना, जगात काय तो एकटाच मुलगा आहे का eligible ? पण मिसेस अधिकारी याबाबतीत अडून बसल्या होत्या, त्यांचं म्हणणं होतं की समर परांजपे हाच निशा साठी चांगला जोडीदार राहील, त्यामुळे अधिकारी सरांचा नाईलाज झाला झाला होता, त्यामुळे ते त्या दिवशी परांजपे साहेबांना भेटायला गेले होते आणि तिथेच त्यांना परांजपे कुटुंबियांचा रागच आला होता, त्यांना अपेक्षा होती की परांजपे कुटुंबियांना खूप आनंद होईल आणि ते लगेच निशाच्या स्थळाला होकार देतील, पण झालं उलटच, स्वतःचा इगो त्यांना दुसऱ्याच्या आनंदापेक्षा महत्त्वाचा होता,


आज बहुतेक येईल मिस्टर भोसले यांचा फोन, मग बघू काय करायचं ते,...... अधिकारी साहेब विचार करत होते


आपल्या डॅडी मम्मी यांच्या डोक्यात काय प्लान शिजतो आहे, निशाला या गोष्टीची काहीही कल्पना नव्हती, तिला जर हे समजल असत तर अजिबातच आवडल नसत हे वागण,


निशा चे गोल्स क्लियर होते, कामावर फोकस होता तिचा, एक चांगली नवी विचाराची मुलगी होती ती, तिला जर समजलं तिच्या घरचे असे करत आहेत तर तिने कडाडून विरोध केला असता


सकाळ झाली अधिकारी सर नाश्त्याच्या टेबलवर येऊन बसले निशा ही आली नाष्ट्याला..... सगळे गप्प होते


" काही प्रॉब्लेम आहे का डॅडी",...... निशा


" नाही काहीच नाही ",..... डॅडी


" का काय झालं ",...... मम्मी


" तुमचा चेहरा किती टेन्शनमध्ये असल्यासारखा झाला आहे, मम्मी पण गप्प आहे, तुम्ही दोघं माझ्यापासून काही लपवत तर नाही ना, काही असेल तर सांगून द्या, मी प्रॉब्लेम solve करेल ",....... निशा


" काहीही नाही बेटा, काल थोडी झोप आली नाही, बाकी काही नाही, ठीक आहे,",...... डॅडी


"Dr काकानी फोन करू का",.... निशा


"नाही बेटा काही गरज नाही त्याची",..... डॅडी


" अस असेल तर काही प्रॉब्लेम नाही",.... निशा


निशा ऑफिस ला निघून गेली,....... "बघितलं ना किती चांगली आहे निशा, आपल्याला थोडं काही झालं की किती काळजी करते, अगदी थोडा चेहरा उतरला तरी तिच्या लक्षात आलं, लगेच डॉक्टरांना बोलवू का म्हणत होती, एवढी चांगली मुलगी आपली , किती लकी असता तो समर परांजपे, पण परांजपेंना नको आहे एवढी चांगली मुलगी" ,........ अधिकारी मॅडम परत तेच तेच बोलुन स्वतःला त्रास करून घेत होत्या


अधिकारी सरही विचार करत होते, आता त्यांना खूपच राग आला होता, खरंतर परांजपे अजून काहीही बोलले नव्हते त्यांच्याशी, पण तरीही अधिकारी सरांनी सगळ स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलं होतं, आपला अपमान झाला आहे आणि त्याचा बदला मी घेणारच असे विचार होते त्यांचे,....... "मिस्टर भोसलेंचा फोन का आला नाही काय माहिती अजून "?,....... चिडचिड करीतच मिस्टर अधिकारी ऑफिसला जाण्यासाठी तयारी करायला उठले
....

वीणा ची ही सकाळची कामाची धावपळ होत होती, सकाळचा स्वयंपाक झाला होता तिचा, आज आईला ही लाडू ची ऑर्डर द्यायची होती, आईची धावपळ सुरू होती, वहिनी मुलांना तयार करत होती, वीणाने मुलांचे लंच बॉक्स आणून दिले, रिक्षा आली, अभी आरु शाळेत गेले, प्रकाशही आवरून तयार होता, वीणा उठली आणि कपाटातन तिने प्रकाशला पांढरा शर्ट काढून दिला,


"अरे वा किती छान शर्ट आहे हा, कधी आणला",...... प्रकाश


" काल दादा आणि वहिनींनी येताना आणला तुझ्यासाठी , आज तुला जायचं आहे ना महेश इंजीनियरिंग मध्ये, हा शर्ट घालून जा",....वीणा


" थँक यु सो मच, पण पाहिल्या दिवशी घालू का जॉइन होईल तेव्हा",...... प्रकाश


"तेव्हा अजून एक आणू आजचा दिवस चांगला आहे प्रकाश घाल हा शर्ट ",....... बाबा


आई-बाबा कौतुकाने बघत होते, पांढरा शर्ट प्रकाश ला खूप छान दिसत होता, दादा वहिनींनी एवढा विचार केला प्रकाशचा, प्रकाश ला खूप छान वाटत होत,


दादा आला तेवढ्यात आत,.....


"हे बघ दादा कसा दिसतो आहे मी",..... प्रकाश


" खूप छान दिसतो आहेस तू , तुला ऑल द बेस्ट, तुझी अशीच वारंवार वर प्रगती होत राहो, खूप शुभेच्छा",.….... दादा


"Thank you दादा, आई आज डबा नको आहे मला",....... प्रकाश


"का रे, घेवून जा डब्बा",..... आई


"दुपारून नवीन कंपनीत जावे लागेल, डबा खायला वेळ मिळणार नाही",...... प्रकाश


" ठीक आहे पण जसा वेळ मिळेल तसं कॅन्टीन मध्ये काहीतरी खाऊन घे",....... आई


"हो कॅन्टीनमध्ये खाऊनच निघेन",....... प्रकाश


प्रकाश आवरून ऑफिसला गेला, तो जेव्हा तयार होत होता तेव्हा सगळे त्याच्याकडे एखाद्या हिरोला बघितल्यासारखे बघत होते.....


आता दादा आणि बाबांनी आवरायला घेतलं....


" आई मी निघते ग मला उशीर होत आहे, खूप काम आहे ऑफिस ला ",..... वीणा


" नीट जा वीणा ",....... आई


"आज बहुतेक मला यायला उशीर होईल कारण मला समरच्या घरी जायचं आहे, तसं मी तुला फोन करून सांगेल",...... वीणा


" हो चालेल जाऊन ये ",.... आई


"नीट तयार व्हा ताई, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीट द्या ",..... वहिनी हसत होती


"हो वहिनी, interview आहे का माझा तिथे, उगीच चिडवते ही, काय माहिती मी आज काय बोलणार तिकडे जावून, चल येते bye ",........ वीणा


वीणा ऑफिसला निघाली ऑफिसमध्ये आज कामाची खूप धावपळ होती, मशीन परांजपे इंडस्ट्री मध्ये पोहोचले होते, आज वीणाला प्रशांत प्रीतीला परांजपे इंडस्ट्री जायचं होतं ट्रेनिंग घेण्यासाठी....


वीणा ऑफिस मध्ये आली, प्रीती नुसतीच आली होती


"Hi प्रीती.... मी इकडे आहे",..... वीणा


"दिसतय ते मला वीणा, काय नवीन प्रकार आहे हा",.... प्रिति


" अग मला वाटला तू खयालोमे असशील, सचिन पुढे तुला काही सुचत नसेल, तुला मी सचिन वाटली तर ",..... वीणा


" अस काहीही काय ग वीणा, नीट आहे मी एकदम, दिसते आहे मला तू, नाटक बंद कर, काम खूप आहेत ",..... प्रिति


"सांग ना कस वाटतय",...... वीणा


"नॉर्मलच आहे मी, का ग? ",...... प्रिति


" किती बोर तू, झोपली की नाही? की सचिनचे स्वप्न पडत होते? ",..... वीणा


" अस काहीही झाल नाही वीणा, मी नॉर्मल आहे, प्लीज स्टॉप धिस, काम सुरू कर ",...... प्रिति


" हो हो वैतागते काय अशी?, म्हटलं काल लग्न ठरलं रात्रभर गप्पा मारत बसली असशील ",....... वीणा


"मस्त झोपली मी शांत ",...... प्रिति


" किती बोर आहेस ग तू, बर ऐकना, मला तुला एक गोष्ट सांगायची होती, पण जाऊ दे आमच्याशी कोण बोलत बाई, मी ऑफिस च काम करते",...... वीणा


" बोल बाई बोल, तू ना वीणा एखादी गोष्ट सांगायची असेल तर पटकन सांगत जा, किती गोल गोल फिरवते, समर च काही खर नाही",..... प्रिति


सर आले तेवढ्यात, ...." आज ट्रेनिंग आहे परांजपे इंडस्ट्रीत, वीणा प्रीति प्रशांत all set ?


Yes सर.....


"प्रेझेंटेशन ट्रेनिंग मटेरियल रेडी आहे का , टेलर दादा आले का",.... सर


"Yes सर, टेलर दादा दुपारी येतील",..... प्रशांत


"Good, लागा कामाला, मी सांगतो केव्हा निघायचा",..... सर


"बोल ग वीणा पटकन ",..... प्रिति


"मला आज समर च्या आई बाबांनी भेटायला बोलवलं आहे",..... वीणा


"काय सांगतेस काय? अरे वा मजा आहे एका मुलीची, काय झालंय? काय कसं काय ठरलं हे सगळं",..... प्रिती


"समर बोलला काल त्याच्या बाबांशी आणि त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही, ते बोलले विणाला भेटायला बोलावून घे, नक्की काय बोलणार मी त्यांच्याशी सुचत नाही मला ",.... विणा


"आता आपण तिकडे चाललो आहे त्यांचा कंपनीत, तेव्हा भेटणार का त्यांना",..... प्रिति


"नाही घरी जायच आहे त्यांच्या संध्याकाळी, समर घ्यायला येणार आहे ",.... वीणा


" OMG वीणा मस्त, सासर बघून घे ",..... प्रिति


" मला धड धड होते, काय बोलतील त्याचे आई बाबा माझ्याशी ",...... वीणा


"काही नाही, तुला बघून सगळे शांत होतात, एवढी गोड आहेस तू टेंशन घेवू नको",..... प्रिति
.......

अधिकारी साहेब ऑफिसला आले, अपेक्षित होत तस डिटेक्टिव भोसले यांचा फोन आला, अधीरतेने अधिकारी साहेबानी फोन उचलला, ......." बोला केली का तुम्ही काही चौकशी आणि किती तो उशीर फोन करायला, शुल्लक काम होत "?,...


" हो सर I am sorry, मी माहिती गोळा केली आहे", ..... भोसले समर बद्दल सगळी माहिती त्यांना देत होते


"Ok अस आहे का हे प्रकरण, काही विशेष नाही माझ्यासाठी, मला वाटला खूप मोठा प्रॉब्लेम असेल" ,........ एका पेपर वर अधिकारी साहेबांनी डिटेल्स लिहून घेतले


"पुढे काय करता येईल याचा ते विचार करत होते, आधी वीणाला भेटल पाहिजे, आपण तिला समजवून बघू, समर ला नको दुखवायला.... तेच सोप पडेल, समर महत्वाचा आहे आपल्या साठी", ...... आता थोड बर वाटत होत अधिकारी साहेबांना, त्यांनी फोन करून मिसेस अधिकारी यांना सगळी माहिती दिली...
.......

लंच नंतर वीणा प्रीती प्रशांत परांजपे इंडस्ट्रीत पोहोचले, जाण्या आधी वीणाने समरला मेसेज केला होता


वीणा पोहोचली फॅक्टरीत, समर ट्रेनिंगला शॉप जवळ हजर होता, वीणाला भेटून त्याला फार आनंद झाला


"Hi वीणा, प्रीती, प्रशांत",.... ...... समर


"Hi सर.",........ वीणा मुद्दाम चिडवत होती


"काहीही call me समर",.....


"तुम्ही दोघ येता आहेत ना ट्रेनिंग साठी, का इकडेच गप्पा मारत बसणार",...... प्रिति


"येतो ग थांब थोड , आज आम्ही दोन तीन दिवसानी भेटलो आहे, बोलू तर दे थोड, तुला ही खूप Congratulations प्रीती, मग आमची कधी भेट होणार सचिन साहेबांशी",..... समर


प्रीती लाजत होती सगळे हसायला लागले..., " भेटू आपण सगळे मस्त पार्टी करू ",......


"पण कपलला entry असेल, प्रशांत तुला येता येणार नाही ",...... प्रिति


" प्रशांत तुझ राहील लग्न आता, तू केलय का पसंत कोणाला ",...... समर


"नाही सर, अजून एक दोन वर्षांनी लग्न करणार आहे मी ",...... प्रशांत


" शोधू आपण तुझ्या साठी मुलगी ",....... समर


" वधू वर संशोधन झाल असेल तर ट्रेनिंग साठी आलो आहोत आपण हे विसरू नका, चला काम सुरू करू ",..... प्रिति


सगळे आत गेले...


वीणा टेलर काका डिझाईन ठरवत होते,......


"कोण आहेत तुमच्या इथले या मशीनचे ऑपरेटर प्लीज इकडे या",..... वीणा


प्रशांतने मशिनची सगळी टेक्निकल माहिती दिली, टेलर काकानी त्यांना पॅटर्न दिले, एक दोन शिवून दाखवले, वीणाने चेक केले करेक्ट आहे का ते, मग ऑपरेटर त्यांनी मशीन चालवली,


पूर्ण ट्रेनिंग मध्ये समर वीणा सोबत होता, तिच्या मागे मागे करत होता, तिच्याशी मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होता


"समर तू थांबणार आहे का जरा वेळ, सगळे बघता आहेत आपल्या कडे, काय चाललय ",...... वीणा लटक्या रागात म्हणाली


"बघु दे I don\"t care, तू अशीच रोज या ऑफिसला यावी, आपण सोबत काम कराव,.. अस वाटतय",..... समर


"समर प्लीज जा ना, थोड काम होवू दे, मी ओरडेल ह आता तुला",...... वीणा


" झाल ना ट्रेनिंग, किती आहे अजून? येत ग ऑपरेटरला सगळ, चल आपण चहा घेवू",...... समर


"नाही, आम्हाला ऑफिस मध्ये रीपोर्ट द्यावा लागेल ",..... वीणा


" काय चाललय समर? वीणा अजिबात लक्ष नाही तुझ, टेलर काका नुसते बसुन आहेत, नेक्स्ट डिझाईन दे ",..... प्रिति ओरडत होती


" प्रीती इकडे ये, पुरे हे ट्रेनिंग आता, येत ऑपरेटरला सगळ ",...... समर


" समर ट्रेनिंग झाल की वीणा येणार आहे ना तुझ्या घरी, आता आम्हाला काम करू दे, तू बॉस आहेस का मी इथली",...... प्रिति


प्रशांत छान हासत होता.....


मिस्टर दीक्षित आत आले....," समर ऑफिस मध्ये क्लायंट आले भेटायला "


समरच लक्ष नव्हतं मिस्टर दीक्षित काय सांगताय त्याकडे, त्यांनी परत हाक मारली,


" समर अरे दीक्षित सर आलेत", ....... वीणा


बोला.....


" क्लायंट आलेत महत्त्वाची मीटिंग आहे, येताय ना सर",..... दीक्षित


"आत्ता आहे का मीटिंग, काही important आहे का ",...... समर


"हो सर, तुम्ही सेट केली ना ही मीटिंग",..... दीक्षित


"कधी"??, ..... समर जायला तयार नव्हता


"सर..... झालाय काय ",...... दीक्षित


"हो आलोच ",..... समर वीणा कडे आला,...." मला थोड काम आहे, मी येतो 15 मिनीटात तू जाऊ नकोस, इथे थांब मी येईन सोडायला",.....


प्रशांत प्रीती हसत होते..... काही खर नाही समरच


मिस्टर दीक्षित सगळ बघत होते, ट्रेनिंग सुरू होत, समर कामासाठी निघून गेला,


" कुठे आहे आज समर दुपारपासून",..... परांजपे सर विचारत होते


" सर ते साई इंटरप्राईजेस मधनं ट्रेनिंग साठी आले आहेत ना सगळे, तिकडेच होते समर साहेब, आता क्लायंट आले आहेत मीटिंग सुरू आहे ",..... दीक्षित


"सुरू झाली का ट्रेनिंग",..... परांजपे सर


"हो सर ट्रेनिंग सुरु आहे ",...... दीक्षित


ट्रेनिंग सुरू आहे म्हणजे विणा पण नक्कीच आली असेल तिकडे,..... परांजपे सर नवीन शॉप कडे गेले,


आत मध्ये ऑपरेटर्स काही तरी बघत होते, नवीन पॅटर्न ची डिझाईन एक दोन मुली ठरवत होत्या, जसे परांजपे सर आत गेले सगळे उठून उभे राहिले, प्रशांत पुढे गेला


"हॅलो सर, मी प्रशांत साई इंटरप्राईजेस मधून आलो आहे",.....


सर आत गेले त्यांनी मशीन बघितल्या पॅटर्न बघण्यासाठी ते वीणा आणि प्रीती उभी होते तिथे आले,


हॅलो सर.....


"हॅलो हे पॅटर्न आहेत का? ",..... सर


"हो सर, प्रेझेन्टेशन ही आहे आमच्या सोबत, तुम्हाला प्रेझेंटेशन बघायचा आहे का"?,....... प्रीती


" नाही त्याची काही गरज नाही" ,...... सर अंदाज लावत होते की कोण वीणा असेल, ही जी दुसरी शांत वाटते आहे आणि एकदम गोड दिसते आहे तीच बहुतेक वीणा असेल


पुढचा पॅटर्न दाखवण्यासाठी प्रिती प्रशांत शी बोलत होती परांजपे सरांनी वीणा कडे बघितलं वीणाने ही हसून सरांकडे बघितलं


" तू वीणा आहेस का ",..... सर


हो सर...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now