प्रित तुझी माझी... ❤️भाग 26

पप्पा अधिकारी साहेबांच प्रपोजल मान्य करू नका प्लीज, मी हे लग्न नाही करू शकत, मला एक मुलगी आवडते, तिच्या बद्दल बोलायचे आहे मला तुमच्याशी, मी मम्मीला तसं कालच सगळं सांगितलं होतं, तुमच काय बोलण झाल अधिकारी साहेबांशी",.... समर

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


वीणा संध्याकाळी घरी आली


"कसा झाला कार्यक्रम, ठरलं का लग्न प्रीतीचं",..... आई


"हो आई ठरल, खूप छान झाला कार्यक्रम, मस्त आहे मुलगा स्वतःचा फ्लॅट आहे त्यांचा आणि मुलगा पण चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, मेन म्हणजे ज्याने त्याने आपला खर्च करायचा असे ठरले आहे , आज सुपारी फोडली नंतर लगेच साखरपुडा आणि लग्न आहे ",...... वीणा


" अरे वा छान झालं ह प्रीतीचं ",....... आई


" हो आई, आज प्रीती आणि सचिन खूप खुश होते, काका काकू पण खूप खुश होते",......... वीणा ,


" समर चा काही फोन, त्याने सांगितलं का त्याच्या आई-बाबांना तुझ्याविषयी",...... आई


समरचा विषय काढताच वीणा चा चेहरा थोडा उतरला, हे आईच्या नजरेतून सुटलं नाही....


"काय झालं बरी आहेस ना? कसलं टेन्शन आहे का वीणा",...... आई


" आई समर ने त्याच्या आईला सांगितल आहे माझ्याबद्दल, पण अजून बाबांशी बोलण अजून झालं नाही, आणि एक प्रोब्लेम आला आहे, ते काल कार्यक्रमाला गेलेले ना, तिथे एक स्थळ समरला सांगून आलेला आहे ",...... वीणा


"काय सांगतेस काय? कोण आहे ग मुलगी? त्यांच्या सारखी श्रीमंत आहे का"?, ....... आईलाही टेन्शन आलं होतं


"मला काही विशेष माहिती नाही पण समर म्हणतो आहे की श्रीमंत आहेत ते लोक मला सावध राहायला सांगितलं आहे",....... वीणा


"काही धोका आहे का व त्या लोकांपासून आपल्याला, त्याच्या घरच्यांच काय म्हणण आहे ",..... आई


" माहिती नाही आई मला अजून, समरशी बोलणं झालं नाही माझं, समरची बहीण सोहा... तिच ही आज लग्न जमत आहे ते सगळे लोकं तिकडे आहेत तिच्या सासरी, रात्री बघते फोन करून समरला ",.... वीणा


" ठीक आहे पण तू काळजी करू नको",.... आई


" नाही आई",..... वीणा,......" दादा वहिनी कुठे गेले ",


" ते गेलेत बाहेर, मुलांना फिरायला घेवून गेले",...... आई


" तू आवरून घे, चहा ठेऊ का मी तुझा ",.....आई


"हो थोडासा ठेव",..... वीणा


बाबा प्रकाश आले आत दोघ खूप आनंदी होते...


वीणा,.... आई..... प्रकाश अति आनंदात हाका मारत होता


" काय झालाय प्रकाश",.... वीणा


"गोड आणा काही तरी खायला ",..... बाबा


" काय झालं आहे, सांगा तरी",..... आई


" आई आता फोन आला होता नवीन कंपनीतून, त्यांनी माझ प्रोजेक्ट एक्सेप्ट केल, मला नौकरी लागली, पगार ही चांगला आहे",...... प्रकाश


आई वीणाला खूप आनंद झाला होता, वीणा अजून डिटेल्स विचारात होती, ........ " कधी आहे जॉइनिंग डेट, काय म्हटले ते लोक रेजिगनेशन वगैरे कधी द्यायचा आहे ",..... वीणा


" लवकरात लवकर जॉईन व्हायला सांगितल, पण मला एक महिन्याची नोटिस देवी लागेल जुन्या कंपनीत, उद्या बोलवलं आहे महेश इंजीनियरिंग मध्ये बोलून घेईन सगळं मग इकडे रीझाईन करीन",.... प्रकाश


"हो गुड, आधी सगळे अपॉइंटमेंट लेटर वगैरे हातात मिळवुन घे आणि जर लवकर जॉईन व्हायचं असेल तर डिफरन्स चे पैसे नवीन कंपनीला द्यायला सांग, कंपनीचे रुल्स अॅन्ड रेगुलेशन्स बद्दल समजून घे आधी मग रीझाईन कर ",..... वीणा


ती जेव्हा प्रकाशला माहिती देत होती तेव्हा आई-बाबा कौतुकाने सगळं ऐकत होते


" आता काय प्रोग्राम आहे पार्टी करू या का? आजचा दिवस सेलिब्रेट करायलाच पाहिजे",..... वीणा


" चालेल दादा वहिनी केव्हा येणार आहेत? मुलांशिवाय मजा नाही, फोन कर त्यांना ",..... प्रकाश


वीणा ने दादाला फोन केला, प्रकाश बद्दल त्यांना सांगितल, दादाला खूप आनंद झाला,....." आम्ही येतो आहोत घरी, जवळच आहोत, येतो दहा मिनिटात", ....


" काय करूया कसं करायचं सेलिब्रेशन",..... प्रकाश


" बाहेरून जेवण ऑर्डर करू, केक मागवायच्या का? ",... वीणा


" नको खर्च उगाच, तुमच्या मुलांन पुरतच मागवा सगळं, होईल अर्ध्या तासात स्वयंपाक",...... आई


"आई प्लीज, कर ग एखादेवेळी एन्जॉय",...... प्रकाश


"हो ग आई, यावेळी आम्ही अजिबात ऐकणार नाही, आनंदाची गोष्ट आहे ही ",.....वीणा


" हो आनंद तर झाल आहे मला, ठीक आहे काय करायचं ते करा मी काय करू ते सांग ",..... आई


" आई बाबा छान तयारी करा फक्त आणि पुढे येवून बसा",.... प्रकाश


हो,...... वीणा प्रकाश खूप खुश होते, आई बाबा आवरायला आत गेले


दादा वहिनी आले, प्रकाश ची आनंदाची बातमी ऐकुन खूप आनंद झाला होता त्यांना, येतांना ते फुल घेवून आले होते, पेढे ही आणले, ही सगळी तयारी बघून प्रकाश भारावून गेला


" दादा वहिनी काय करू या ऑर्डर ",..... वीणा


"पाव भाजी, चायनीज नूडल्स, घेवू या का? आणि आई बाबांसाठी पोळी भाजी ही घ्या थोडी ",..... वहिनी


वीणाने जेवण ऑर्डर केल.......


मुल खूप आनंदात होते,..... "केक कोण कट करणार आहे आम्ही दोघ का",..... अभी


"हो तुम्ही दोघ", ...... प्रकाश


खूप आनंदी वातावरण होत.....

......

आशिष च्या घरून सगळे निघाले..... घरी आले, आजी आजोबा मम्मी पप्पा सगळे खुश होते, समर त्याच्या विचारात होता, आता बोलू का पप्पांशी की नको, थकले असतिल ते सकाळ पासून बाहेर आहेत, रात्री जेवण झाल्यावर बोलतो आरामात, एवढी घाई बर नाही वाटत....


स्वैपाक करणार्‍या काकूंना मस्त चहा करायला सांगितला मम्मीने...


सोहा समरला इशारा करत होती बोल अस.... समरची हिम्मत होत नव्हती....


"सकाळी कुठे गेले होते मम्मी पापा तुम्ही",..... सोहाने मुद्दाम विषय काढला


"आम्ही अधिकारी साहेबांना भेटायला गेलो होतो",.... पप्पा


"का पण कालच भेटलो ना आपण त्यांना",..... सोहा


"त्यांनी इन्हव्हाईट केल होत नाश्ता साठी आम्हाला",..... पप्पा


"काय विशेष",..... आजी


" त्यांच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू आहे, त्यांना आपला समर पसंद आहे, त्यांची मुलगी निशा साठी",..... पप्पा


समर सोहा आजी आजोबांना धक्काच बसला


समर मम्मी कडे बघत होता,...." मम्मी काय आहे हे सगळ? , मला आता टेंशन येत आहे,तुझ झाल का पप्पांशी काही बोलणं",...... समर


" नाही मी कशी बोलणार",..... मम्मी


"काय झालं आहे समर ",..... पप्पा


" पप्पा मला तुमच्याशी थोड बोलायच आहे, तुम्ही थकलेले आहात का, रात्री बोलायच का" ?,....... समर


" मी जरा चहा घेतो मग फ्रेश होऊन येतो मग बोलू आपण, तुला जे सांगायच असेल ते सांग ",.... पप्पा


चहा झाला, आजी-आजोबाही रुम मध्ये गेले आराम करायला, जाताना सांगून गेले समरला जे मनात आहे ते सगळं बोलून घे पप्पांशी आणि नंतर काय झालं ते आम्हाला सांगा,


"समर आता हा चान्स सोडू नको, नीट मनमोकळ बोलून घे ", ..... सोहाही रूम मध्ये गेली,


मम्मी रूम मध्ये होती, पप्पा फ्रेश होऊन आले, समर खालीच वाट बघत होता, पप्पा येऊन समोर जवळ बसले


" पप्पा अधिकारी साहेबांच प्रपोजल मान्य करू नका प्लीज, मी हे लग्न नाही करू शकत, मला एक मुलगी आवडते, तिच्या बद्दल बोलायचे आहे मला तुमच्याशी, मी मम्मीला तसं कालच सगळं सांगितलं होतं, तुमच काय बोलण झाल अधिकारी साहेबांशी",.... समर


" आम्ही अधिकारी साहेबांना हेच सांगितला आहे की आम्ही आधी समर शी बोलतो, मग तुम्हाला कळवतो, तुझ्या मनात काय आहे , तुझं मत काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय आम्ही कशाला होकार देऊ तिकडे अधिकारी साहेबांना, तू सांग तुला सांगायचे ते",..... पप्पा


" पप्पा मी सिंगापूरला जाऊन आलो , त्यानंतर साई इंटरप्राईजेसचे वीणा प्रीती मशीनच्या डेमो साठी इकडे आपल्या ऑफिस मध्ये आले होते, तेव्हा मी वीणाला पहिल्यांदा बघितलं, वीणा ला काहीच माहिती नव्हतं की माझ्या मनात काय आहे तिच्याबद्दल, पण मला वीणा पहिल्यांदा भेटली तेव्हाच आवडली होती, वीणा खूप साधी आणि गोड आहे पप्पा, एकदम आपल्या मम्मी आणि आजी सारखी, तुम्हाला सांगतो तिने पहिल्यांदा मला नकार दिला होता, बऱ्याच वेळा सांगितल्या नंतर तिने मला होकार दिला, पप्पा मला वीणा सोबतच रहायच आहे आणि त्या साठी मी काहीही करायला तयार आहे, ",...... समर


पप्पांनी सगळं ऐकून घेतलं,......" एवढे दिवस झाले का नाही सांगितलंस मला, आपण दोघ मित्र आहोत ना, तुला माझ्यावर विश्वास नाही का",..


" माझं चुकलं पप्पा मी सांगायला पाहिजे होतं तुम्हाला ",..... समर


" काल तुझ्या मम्मीला कळत नसतं तर काय झालं असतं तुला कल्पना आहे का? आज आम्ही त्या अधिकारी साहेबांना शब्द देऊन आलो असतो, अर्थात तुला विचारल्याशिवाय पुढची गोष्ट केली नसती, असे काही महत्त्वाच्या निर्णय आम्हाला जरा सांगत जा तुम्ही दोघं",...... पप्पा


"आय एम सॉरी पप्पा, पण मला माहिती नव्हतं तुम्ही कसे रीयॅक्ट व्हाल, मी तुमच्या पासून ही गोष्ट लपवायला नको होती ",..... समर


" ठीक आहे, आता झालं ते झालं, वीणाला आता ऑफिस मध्ये बोलव, आम्हाला तिला भेटायचं आहे ",.... पप्पा


" Thank you पप्पा, खरच ना, तुम्हाला माहिती नाही माझ्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे",....... समर


" मला थोडं ऑफिस च काम आहे, मेल चेक करतो मी",...... पप्पा


"Ok पप्पा मी ही फ्रेश होऊन येतो",..... समर


सगळे जेवायच्या वेळी भेटले, मम्मी पप्पा अजून खाली यायचे होते समरने सोहा आजी-आजोबांना सांगितलं की माझं बोलणं झालं पप्पांशी आणि पप्पांना काहीही प्रॉब्लेम नाहीये वीणा ला भेटायला ऑफिस मध्ये बोललेले आहे उद्या, मम्मी पप्पा आले तेवढ्यात खाली......


"आम्हालाही भेटायचं आहे वीणाला",...... आजी


"का तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना आजी आणि सोहा, तुम्ही नाही भेटल्या का वीणा ला अजून ",...... मम्मी


"हो, आम्ही अजून नाही बघितलं वीणा ला",...... सोहा


"मग तुम्ही असाच पाठिंबा देत आहात का समरला ",..... मम्मी


" हो कारण आम्हाला माहिती आहे की समरची निवड चांगलीच असेल ",....... सोहा


" तुम्हाला काय वाटत आहे आजोबा, पुढे काय कराव ",..... पप्पा


"मला असं वाटत आहे की विणाला भेटायला तुम्ही घरीच बोलवुन घ्या, ऑफिसमध्ये न भेटता घरीच बर वाटेल, म्हणजे आम्ही सगळे भेटू शकतो वीणा ला, ऑफिसमध्ये उगाच अवघडल्यासारखे होईल",....... आजोबा


" ठीक आहे समर तू वीणा ला आपल्या घरी बोलवुन घे उद्या संध्याकाळी ",....... पप्पा

समरला खूप आनंद झाला होता एक खूप मोठं वजन डोक्यावर उतरल्यासारखे वाटत होतं तो तिथेच खाली मान घालून बसला


" काय झालं आहे समर",...... मम्मी


" मम्मी पप्पा आजी आजोबा सोहा थँक यु व्हेरी मच आज मला किती छान वाटत आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना शब्दात नाही सांगू शकत, माझ्या मनावरचं खूप मोठं दडपण कमी झाल आहे, love you" ,....... समर


"चल बोर करू नको ह एवढं",..... सोहा बोलली तसे सगळे हसायला लागले...


समोर आजीकडे आनंदाने बघत होता,.... "चला जेवून घ्या , थकलोय आज खूप, तुम्हा मुलांना तर झोप येणार नाही आज पण आम्हाला विश्रांतीच गरज आहे",..... आजी


जेवण झाल, समर ला अस झाल होत की कधी ही आनंदाची बातमी वीणा ला देवू, मी फोन करून येतो, मम्मी हो बोलली,


समरने वीणाला फोन लावला....


"हॅलो वीणा काय करते आहेस",.... समर


" बर झाल तु फोन केला मी तुझ्या फोन ची वाट बघत होते, झाल का घरी बोलण काही",... वीणा


" माझा आत्ताच मम्मी पप्पांशी झालं बोलणं त्यांनी तुला घरी भेटायला बोलावलं आहे",.….. समर


"काय बोलतोस समर, खूप आनंदाची बातमी दिली आहेस तू, पण मला घाबरायला वाटत आहे, मला खरच बोलवलं आहे का? काय म्हटले तुझे आई बाबा",.... वीणा

" पप्पा बोलले तू आधी सांगायला हव होत, आम्हाला काही प्रोब्लेम नाही",.... समर


" अरे व्वा छान झाल इकडे ही एक आनंदाची बातमी आहे प्रकाश ला नोकरी लागली आहे, आम्ही पण आज इकडे पार्टी करतोय छोटीशी, आज आम्ही ही खूप थकलो आहोत, पण खूप आनंदी आहोत आम्ही सगळे",....… वीणा


" congratulations सांग प्रकाश ला, enjoy करा मस्त, Miss you वीणा, उद्या भेटू, मला अस झालाय कधी बघेन तुला",....... समर


"हो उद्या नक्की भेटू, मी nervous आहे समर, उद्या मला सांग मी काय करू कशी बोलू सगळ्यांशी",.... वीणा


"टेंशन घेवू नको वीणा तू आहे तशीच चांगली आहेस",....समर


मम्मी पप्पा रूममध्ये आले.......


"तुला काय वाटतं आहे कशी असेल वीणा ",.... पप्पा


" समर म्हणतो आहे ना की साधी आहे, ती पण समरची निवड चुकणार नाही, लहानपणी पण कुठली गोष्ट घ्यायला सांगितली की एकदम चांगली गोष्ट घ्यायचा तो, आणि इतक्या वर्षात त्याचं कोणावरही प्रेम नव्हतं, चांगली मुलगी असेल वीणा, गुणांची खाण असेल, तुम्ही त्याला समजून घेतलं हे खूप बरं केलं",..... मम्मी


"माझं पण प्रेम आहे की समर वर आणि आपलंही लव मॅरेज आहे, लव मॅरेज मध्ये किती जीवाची धाक दुक होते हे आपल्याला माहिती आहे, उगाच आपण नाही म्हणायचो आणि मुलांनी वेगळाच निर्णय घेतला तर काय करणार आपण",....... पप्पा


"वीणा ला भेटून घेऊ, पण ती खूप साध्या घरची मुलगी आहे",..... मम्मी


" काही हरकत नाही आपल्याला पैशाशी काही देण घेण नाही, आपल्या मुलांचा आनंद हा महत्त्वाचा आहे",..... पप्पा


" तुम्ही आनंदात आहात ना",..... मम्मी


" हो मला बरं वाटत आहे ",.... पप्पा


" अधिकाऱ्यांना काय सांगायचं",..... मम्मी


" हो तो खूप मोठा प्रश्न आहे, जर समरच वीणा सोबत काही नसतं तर निशा एक चांगली मुलगी होती, जाऊ दे तो विषय आता बंद ,आता आपल वेगळ ठरले आहे , आता आपण अधिकारी यांच्याशी काहीच नको बोलायला, त्यांचा फोन आल्यावर मी बघतो काय सांगायचं ते, हे मॅटर खूप चांगल्या पद्धतीने हॅडल करावे लागणार आहे, त्यांना राग वगैरे नको यायला, चांगले लोक आहेत ते ",........ पप्पा


" हो ना पण त्यांनी असं कसं डायरेक्ट समरला मागणी घातली, आता हल्ली मुलं पहिलेच जोडीदार पसंत करतात, बऱ्याच ठिकाणी असंच होतं, त्यांनी असं कसं डायरेक्ट गृहीत धरलं की समरचं काहीच नसेल, की त्यांना असं वाटत असेल की आपल्या निशाच स्थळ यांच्या समोर आल म्हणजे ते होच म्हणतील, तुम्ही बघितलं का अधिकारी सर आणि मॅडम यांचा चेहरा उतरला होता ",.... मम्मी


" मी एक काम करतो त्या दोघांशी व्यवस्थित बोलूनच घेतो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही",..... पप्पा


" चालेल शेवटी आपल्या मुलांचं आनंद कशात आहे तेच आपल्याला करायचा आहे, बाकी ते दुसरे अधिकारी किती का श्रीमंत असेना, आपल्याला काय त्याचं, बरोबर आहे ना",...... मम्मी


" श्रीमंती खूप पहिली आहे आपण, प्रेम ही महत्त्वच असत आयुष्यात ",.... पप्पा


हो....... मम्मी


वीणा आणि वहिनी पुढे बसले होते गप्पा मारत, मुल गाण्यावर डान्स करत होते, आई बाबा तयार होत होते, दादा प्रकाश बोलत बसले होते, आई बाबा तयार होवुन बाहेर आले, येवून काॅटवर बसले, ऑर्डर आली, वीणा आणी वहिनीने ऑर्डर केक व्यवस्थित काढून घेतला


"चला प्रकाश, दादा, आई बाबा, प्रकाशने मुलांसोबत केक कापला वीणा फोटो घेत होती, परत म्युझिक वर मुल प्रकाश दादा नाचायला लागली, सगळे कौतुकाने बघत होते


" जेवण छान आहे नाई",........ आई


" हो ना..... उगीच नाही म्हणत होतीस तू ",..... प्रकाश


"मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे ", ........ वीणा......
🎭 Series Post

View all