Aug 09, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 25

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 25

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


"झाली का तुमची तयारी आजी आजोबा",..... समर


"हो हो आलो आम्ही" ,...... आजी आजोबा आज अतिशय छान दिसत होते, मुळातच सुंदर आजी तयारी केली की बघत बसव अशी दिसायची, आजोबा आजी खाली आले


समर रेडी होता पण त्याच मन नव्हत कशात....


"सोहा झाल का तुझ? लंचला जायच आहे आटोप, नाही तर संध्याकाळी पोहोचू आपण ",..... समर


"हे अति होतंय ह, उलट तुलाच लक्ष्यात नव्हत मी तुझ्या आधी रेडी होती ",...... सोहा आलीच खाली, पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस, तशीच मॅचिंग ज्वेलरी खूप छान दिसत होती ती, खूप खुश होती ती,......


" तुला घाई होणारच ग आज, झोपली की नाहीस काल ",...... आजी


"आजी काय ग",..... सोहा लाजत होती


समर शांत बसला होता.....


"समर प्लीज टेंशन घेवू नको, मम्मी पप्पा नक्कीच तुझ्या बद्दल विचार करतील, रिलॅक्स" ,...... सोहा


"मला काही सुचत नाहीये, आता झाल असत बोलण पप्पांशी तर किती बरं झालं असतं, मी आधीच सांगायला हव होत त्यांना ",...... समर


" आज सांगशील, काळजी नको करू, मी आहे, आजी आजोबा आहेत, तुझ्या बाजूने don\"t worry... आम्ही तुला एकट पाडणार नाही",...... सोहा


" Thank you dear",...... समर


"चल आता मूड ठीक कर",..... सोहा


सोहा समर आजी आजोबा निघाले.....


"मम्मी पप्पांना फोन करून बघ सोहा",..... आजी


"हो आजी.", ..... सोहा


सोहाने फोन लावला,..... "कुठे आहात तुम्ही मम्मी-पप्पा"


"आम्ही निघालोच आहोत कुठे येऊ आम्ही",..... मम्मी


"आपण एक ठिकाण फिक्स करू, तिथे भेटू आणि मग सोबत जाऊ ",...... सोहा


"ठीक आहे मग तुम्ही मॉल जवळ या, आम्ही पोहोचतो तिकडे पंधरा मिनिटात ",...... मम्मी


"काय झालं कोणाचा फोन होता",..... पप्पा


" सोहा चा फोन होता, निघाले आहेत ते सगळे, आपल्याला मॉल जवळ बोलावलं आहे ",....... मम्मी


" ठीक आहे", ....... पप्पा


" सोहा आशिष ला सांगून दे की आम्ही निघालो आहोत",........ समर


" तिला तर चान्स हवा आशिषशी बोलायचा, सोहाच झाल की समर च लग्न आमच्या ",..... आजी


" आधी मला पप्पांशी तर बोलू दे",...... समर हसत होता


"होईल रे सगळं नीट मला माहिती आहे",....... आजी


मम्मी पप्पा भेटले रस्त्यात, सगळे आशिष च्या घरी पोहोचले.....


शांत कॉलनीत आशिष च्या घरच्यांचा टुमदार बंगला होता, आजूबाजूला छान आंब्याचे सिताफळाचे पेरूचे झाड होते, फुलझाडं ही बरेच होते, छोटीशी बागच त्यांनी तयार केलेली होती, बंगला आजूबाजूचं वातावरण खूप स्वच्छ आणि प्रसन्न होतं, आशिष चे आई वडील आणि आशिष बाहेरच उभे होते, आजी आजोबांना सोहाने हळूच खाली उतरवून घेतलं, आशिष पुढे आला साथ द्यायला, सगळे आत मध्ये गेले.....


आशिष चे आई वडील आजी आजोबा खूप साधे आणि चांगले वाटत होते, परांजपे मॅडम आणि सर आज जाऊन आशिष च्या आजोबांच्या पाया पडल्या, आशिष च्या आई-वडीलांनी परांजपे आजी आजोबांच्या पाया पडल्या, सगळ्यांनी एकमेकांशी ओळख करून घेतली, खूप छान आनंदी वातावरण तयार झालं होतं, दोघी कुटुंब कम्फर्टेबल आहे हे बघून सोहा आणि आशिष खूश झाले होते


दोघ बाजूची आजी-आजोबा खूप छान गप्पा मारत होते, परांजपे सर मॅडम हि खूप कम्फर्टेबल होते, घरातलं चांगलं वातावरण बघून परांजपे सर खूप खुश झाले होते, त्यांना जी सोहाची काळजी होती ती आता बर्‍याच अंशी मिटली होती, मी आलेच जरा म्हणून आशिष ची मम्मी उठली,


"हे बघा जास्त काही करू नका जे काही केले असेल ते चालेल आम्हाला, नाहीतर मी मदतीला येते",..... परांजपे मॅडम आत गेल्या


आशिष च्या मम्मी ने दोघी आजींना नाही आत मध्ये बोलवल, त्यांनी स्वतः फिरून गार्डन दाखवलं घर दाखवल, आजी तर खूप उत्साही होत्या, किचनही छान होता, ऐस पैसे मोठं, किचन मध्ये एक मदतनीस स्वयंपाक करत होती,


बाहेर आशिष चे पप्पा आणि परांजपे साहेब एवढे गप्पात रंगले होते ही जणू ते खूप जुने मित्र होते, अगदी इंडस्ट्री पॉलिटिक्स वातावरण कोणताही विषय त्यांनी सोडला नव्हता


आशिष ने सोहा आणि समरला फिरून पूर्ण घर दाखवल, दोन मजली टुमदार घर सोहाला खूप आवडलं


जेवणाचा बेत छान केला होता त्यांनी वरण-भात, मसाले भात, दोन भाज्या,श्रीखंड, पुरी, भजी, कोशिंबीर, खूप छान जेवण झाले सगळ्यांचे...... एक एक पदार्थाला खूप चव होती, सोहाच सासर बघून आजी आजोबा खुश होते,


सगळे गप्पा मारायला हॉलमध्ये येऊन बसले, आता पुढे काय करायचं आहे, आशिष आणि सोहा, तसे ते दोघ लाजले......


" सोहा ची परीक्षा झाली की या दोघांच्या लग्नाची तारीख धरू, तिला पुढे शिकायचं आहे पण ती लग्न झाल्यावर शिक्षण पूर्ण केरेन, पुढच्या रविवारी तुम्ही आमच्याकडे या तेव्हा आमच्याकडे घरगुती एंगेजमेंट चा कार्यक्रम आपण करून टाकू" ,....... मम्मी पप्पा आजी आजोबांकडे बघत होते, आजी-आजोबांनी मानेनेच होकार दिला


सोहा आणि आशिष साठी हे सरप्राईज होतं, खूप आनंदात होते ते दोघे, समर ही खुश होता, आशिषने समरला मिठी मारली, सगळे खूप आनंदात होते, सोहाचा विश्वासच बसत नव्हता, खरंच तिच्या पुढच्या रविवारी साखरपुडा ठरतो आहे, बऱ्याच वेळ गप्पा मारत बसले होते सगळे........
..........

अधिकारी सर आणि मॅडम घाई-घाईने घरी आले, मॅडम बर्‍याच वेळ तश्याच खुर्चीत बसून होत्या,


"आवर आता, अशि का बसून आहेस? टेन्शन घेऊ नको, मी बोललो ना तुला मी सगळं ठीक करतो",...... अधिकारी सर


"हो मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका",..... मॅडम


लगेच तयार होऊन अधिकारी सर ऑफिसला गेले, त्यांनी मॅनेजरला तातडीने बोलावून घेतले


"बोला सर",...... मॅनेजर


"आलेत का ते मिस्टर भोसले",..... सर


"हो सर ऑन द वे आहेत, ते येतीलच, काही अर्जंट काम आहे का",...... मॅनेजर


"थोड पर्सनल आहे, बोलू आपण नंतर",...... सर


"ठीक आहे सर, काही लागला तर सांगा",..... मॅनेजर


पाच मिनिटातच मिस्टर भोसले आले, लगेच ते अधिकारी सरांच्या केबिनमध्ये गेले, बराच वेळ त्या दोघांमध्ये मिटिंग सुरु होतील, अधिकारी सर सर्व काही त्यांना सांगत होते, मिस्टर भोसले सगळं कागदावर टिपून घेत होते,


"ही माहिती खूप कॉन्फिडेंशीयल आहे मिस्टर भोसले, प्लीज हे कोणाला कळता कामा नये, एकदम हुशारीने वागा",....... सर


"तुम्ही काहीच काळजी करू नका सर, अगदी या कानाच त्या कानालाही कळणार नाही" ,........ मिस्टर भोसले


दोघांची मीटिंग सुरू असताना निशा आत मध्ये आली तसे दोघे एकदम गप्प बसले....


" आय एम सॉरी डॅडी, काही महत्त्वाचं बोलत आहात का तुम्ही ",...... निशा


"तू आज कशी काय इकडे? आज सुट्टी नाही का तुला?",....... सर


" डॅडी मला खूप महत्त्वाचं काम होतं, म्हणून मी आली होती ऑफिसला, माझं काम झालं, मला वाटलं तुमचे काम झाले असेल तर सोबत घरी जाऊन म्हणून मी कडे आली होती, तुमचं काम झालं की बाहेर या मी माझ्या केबिन मध्ये आहे, सोबत जाऊ घरी ",........ निशा


निशा तिथून निघून गेली....


"माझं काम झालं की मी सांगतो सर तुम्हाला",...... मिस्टर भोसले निघून गेले


किती समजूतदार आणि चांगली मुलगी आहे निशा, कसलीच कमी नाही तिच्यात, अधिकारी सरांना परत एकदा तिच्यावर गर्व वाटला, अशी चांगली मुलगी ज्याला बायको म्हणून मिळेल त्याच किती चांगलं होईल, परांजपे फॅमिलीला हे समजत की नाही का? आमचा मुलगा बोलेल ते आम्ही करू अस बोलले ना ते, एवढं नक्की आहे पण मी त्यांना सोडणार नाही, मी बोलेल तेच त्यांना कराव लागेल, आज सरळ सरळ त्यांनी मला तोंडावर सांगितल की बघू... तुमच्या प्रपोजलच, आम्ही स्विकारल नाही, माझा आणि माझ्या मुलीचा अपमान करता का? त्यांना माहिती नाही अधिकारी काय चीज आहे, एक दिवस त्यांच्या मुलाचं स्थळ मी निशा साठी करून आणेन..........अजून काय करता येईल, अधिकारी सर त्यांच्या विचारात हरवले


अधिकारी सरांनी मॅडमला फोन लावला......


"आपलं काम झालं आहे बघ, आत्ताच इथे डिटेक्टीव भोसले आले होते, त्यांना मी समर परांजपे ची सगळी चौकशी करायला सांगितली, ते काय म्हणता आहेत काय नाही एक दोन दिवसात कळेलच, तोपर्यंत परांजपे सरांचा फोन येईलच, तू खूप काळजी करत बसू नकोस घरात",.... सर


"नाही मी ठीक आहे, निशा पण आली आहे ना ऑफिसला केव्हा वापस येत आहात तुम्ही दोघं, लवकर या घरी ",.... मॅडम


" ठीक आहे", .... सर
..............

रविवारची सुट्टी असल्यामुळे आज सगळेच घरी होते, वीणा आणि आईने घर आवरायला काढलं होतं, दादा वहिनी भाजी आणायला गेले होते, तेवढ्यात प्रीतीचा फोन वाजला


" बोल प्रीती आज कशी आमची आठवण झाली",..... वीणा


" आज आम्ही सचिनच्या घरी जात आहोत बहुतेक लग्न ठरेल तू येते आहेस का माझ्यासोबत, मला धड धड होते आहे",...... प्रिति


"काय बोलतेस प्रीती, खूप आनंदाची बातमी दिली, नक्की लग्न ठरवणार आहे ना आज, की डायरेक्ट त्यांच्या घरी राहण्यासाठी बॅग सोबत घेतली आहे ",...... वीणा लाइट मूड मध्ये होती


" इथे मला काही सुचत नाही आहे वीणा आणि तू काय गम्मत करते आहेस, येते आहेस का लवकर सांग मला सोबत होईल तेवढी",...... प्रिति


" सचिन असेल ना तिथे तुझ्या सोबतीला, की त्याच्याकडे बघून अस तुला धडधड होते आहे, उगीच कशाला बाई आम्ही सोबत?? कबाब मे हड्डी..... हेच बोलली होती ना तू, आता कळलं मला त्यादिवशी तुझी किती गरज होती",........ वीणा


" आता माफी मागू का मग मी तुझी, ऐ बाई पुरे झाल नाटक आणि लवकर तयार हो",........ प्रिति


" आम्ही आज घर आवरायला काढला आहे तरी मी आईला विचारते",....... वीणा


" मी आहे आई सोबत, प्रकाश आहे, तु जा प्रीती सोबत मी आणि आई मिळून आवरू सगळ",........ बाबा


" बाबा मी ही आहे की",..... वहिनी, .... दादा वहिनी आलेच तेवढ्यात बाहेरून


वीणाने प्रीती ला फोन करून सांगितले की मी येते आहे,


" ठीक आहे वीणा, तू तयार राहा आम्ही येतो तुला घ्यायला, फोन केला की मेन रोड वर ये ",....... प्रिति


वीणा तयारीला लागली, त्याआधी तिने समोर ला मेसेज पाठवला, समरने सांगितलं होत की तो आज मम्मी पप्पांन सोबत आहे म्हणून फोन केला नव्हता


"मी प्रीती सोबत तिच्या प्रोग्रामला जाते आहे , बहुतेक आज संध्याकाळी भेटायला यायला जमेल की नाही माहिती नाही",...... वीणा


" ठीक आहे आम्हाला येथे उशीर होईल असं वाटत आहे, जमलं का लग्न प्रीतीच",...... समर


"हो ठरल्या सारख आहे, आज बहुतेक पुढचे कार्यक्रम ठरतील, सोहाचं काय ठरलं, काय चालल आहे तिकडे",........ वीणा" आत्ताशी आम्ही आलो आहोत इकडे, गप्पा सुरू आहेत, बहुतेक पुढची बोलणी होतीलच, आपल्या लग्नाची अशी बोलणी कधी होतील वीणा ",....... समर


वीणा लाजली होती,.. "होतील लवकरच, सगळ तुझ्या मना प्रमाणे होईल ",......


" मलाही बहुतेक आज संध्याकाळी पप्पांशी बोलायचं आहे त्यामुळे मी पण तुला म्हणणार होतो की आज नको भेटायला, कशी दिसते आहेस तू मला फोटो पाठव ",..... समर


" काहीतरीच काय समर",...... वीणा


" प्लीज फोटो पाठव नाहीतर मी हा कार्यक्रम सोडून तिकडे येईल ",...... समर


ठीक आहे....... वीणा ला हा समरचा हट्ट आवडत होता, वीणा ने सेल्फी काढला आणि समरला पाठवून दिला


" वा किती छान दिसते आहेस तू वीणा, मी तुझ्याबरोबर हवा होतो आता, कधी आपल्याला सोबत राहायचे दिवस येतील, दोन तीन दिवसा पासुन भेटलो ही नाही आपण ",...... समर


" लवकरच येतील ते दिवस, चल बाय, मला प्रीतीचा फोन येतो आहे",....... वीणा


" अरे काय असं, बोल जरा वेळ प्लीज",...... समर


" जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मेसेज टाकून ठेवेल",...... वीणा


खूप खुश होती वीणा.... प्रीती चा फोन आला तशी वीणा मेन रोड वर जावुन उभी राहिली...


प्रीती चे आई बाबा, वीणा, प्रीतीचा भाऊ, सगळे मिळून सचिनच्या घरी गेले, स्वतःचा फ्लॅट होता सचिनचा, सचिनच्या घरी त्याचे आई-वडील आजी होते, छान वातावरणात होत सगळ, शिकले-सवरलेले सुशिक्षित वाटत होते, सचिनच्या घरच्यांनी प्रीति आणि घरच्यांचे स्वागत केलं


छान हँडसम होता सचिन चेहऱ्यावरून वागण्या बोलण्यात वरून समजूतदार वाटत होता, वीणा प्रीती सचिन खूप छान गप्पा मारत बसले होते


एक वेगळीच खुशी सचिन आणि प्रीती च्या चेहऱ्यावर होती, वीणा ला त्या दोघांना बघून समर ची आठवण येत होती, आपल कधी असं लग्न जमेल, आज समर किती टेन्शन मध्ये आहे, देवा सगळ ठीक होऊ दे, सगळं समरच्या मनासारखं होवु दे


प्रीती आणि सचिन च लग्न जमलं, लवकरच मुहूर्त काढायचा ठरल, देणं घेणं विशेष नव्हतं, ज्याने त्याने आप आपला खर्च करायचा ठरल, लग्नानंतर प्रीती जॉब कंटिन्यू करेल, सगळं चांगलं घडलं होतं, खूप आनंदित होते प्रीती आणि सचिन


वीणा प्रितीच्या आजूबाजूला होती,...... "प्रीती अजूनही चान्स आहे नकार द्यायचा असला तर बघ",


" गप्प बस ग तू वीणा",..... प्रिति


"अगं कसा दिसतो आहे सचिन, काही विशेष हँडसम नाहीये, दातही पुढे आहेत त्याचे ",...... वीणा


"नसू दे हँडसम आणि त्याचे दात व्यवस्थित आहेत, तो कसाही असला तरी मला आवडतो",...... प्रिति


" ओहो मॅडम, इश्क विश्क प्यार व्यार",...... वीणा


" तू जरा गप्प बसणार का वीणा",....... प्रिति


" आता का? मला चिडवताना काहीच वाटत नव्हतं का? थांब जरा मी सचिनशी जाऊन बोलते, सांगते त्याला तुझ्याबद्दल सगळं ",...... वीणा


" वीणा छळू नको ग, तुझ लग्न व्हायचं आहे अजून, मी अशीच तुला त्रास देईल ह",...... प्रीती


" मग सांग मला त्रास देशील का यापुढे",..... वीणा


" नाही नाही, मी तुला त्रास देतच नव्हते, उलट मी तुला समरला हो बोल असं सांगत होते",...... प्रीती


सचिनची आई बाबा पूजेच्या तयारीत होते, छोटासा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला, सचिनची आई जेवणाच्या तयारीला लागली, वीणा प्रीती मदतीला गेल्या


" ही तुझी मैत्रीण आहे का प्रीती",...... काकू


" हो आई ही वीणा ",.......प्रिति


" वीणा कुठे राहतेस ग तू, प्रीतीच्या ऑफिसमध्ये आहेस का कामाला",...... काकू


"हो काकू आम्ही लहानपणापासून दोघी सोबतच आहोत, शाळा कॉलेज आणि ऑफिसला सोबतच",.....वीणा .


"किती छान", ..... काकू


" आई आता वीणाचही लग्न जमत आहे ह ",...... प्रिति


"अरे वा किती छान, कोण आहे मुलगा",...... काकू


" खूप श्रीमंत स्थळ मिळालं आहे तिला",...... प्रिति


" काहीही काय ग प्रीती, चुप्प बस",...... वीणा लाजत होती


काकू कौतुकाने वीणा प्रीती कडे बघत होत्या.....


प्रीतीचा कार्यक्रम खूप छान झाला, प्रीती आणि सचिन छान बोलत बसले होते,......" उद्या ऑफिस झाल्यावर भेटायचं का प्रीती",


" चालेल ना सचिन",...... प्रिति


वीणा समर सोबत फोनवर चॅट करत होती, ज्येष्ठ मंडळी गप्पांमध्ये गुंग होती..........

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now