प्रित तुझी माझी... ❤️भाग 24

मला खरंच निशाची खूप काळजी वाटते हो, हा एक चांगला मुलगा नजरेत होता, तर ते लोकही विशेष इंट्रेस दाखवत नाही, लाखात एक अशी आपली मुलगी आहे, वैभव म्हणाल तर तेही काही कमी नाही, आपल्याला वाटलं होतं की आपण प्रपोजल टाकलं की ते लोक लगेच पाघळतील, पण हे झालं वेगळंच",....... मॅडम

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

मम्मी पप्पा रूम मध्ये आले.....


"खूप छान झाला नाही प्रोग्राम",..... पप्पा


"हो ना",...... मम्मी


"हे असे चांगले लोक आपल्या ओळखीचे आहेत, मस्त वाटल ना तिकडे, पाहुण्यांची ठेप किती छान ठेवली त्यांनी ",...... पप्पा आनंदी होते


मम्मी तिच्या विचारात होती, समर बद्दल बोलू का आता यांच्याशी की नंतर सांगू , समजत नाही काय करू , वीणाची चौकशी केली आहे मी, बघू कसे लोक आहेत ते, नंतर बोलू का यांच्याशी, वीणा चांगली असेल तर काहीच प्रश्न नाही पण जर काही प्रॉब्लेम असेल तर मग यांच्याजवळ विषय काढायचं काही प्रश्न नाही, मीच परस्पर हे प्रकरण मिटवून टाकेल, तेवढी धमक आहे माझ्यात,........


"काय ग काय विचार करते आहे",...... पप्पा


"काही नाही हो जरा थकायला झालं आहे, झोपूया आपण",....... मम्मी


समर बराच वेळ वीणा शी बोलत बसला होता, फोन वर बोलतांना वर वर तो दाखवत होता की काही टेन्शन नाही आहे पण खरंतर आज त्याला टेन्शन आला आता होतं, मम्मी काही रिऍक्ट झाली नाही आज, ही वादळापूर्वीची शांतता नाही ना, खरंच का गेलो होतो आपण अधिकारी यांच्या पार्टीला, पप्पांच्या मनात काही दुसरं तर नाही ना, हे प्रकरण वाढण्याच्या आधी मला पप्पांशी बोललं पाहिजे, कारण पप्पा माझ्या आयुष्याचा फार महत्त्वाचा भाग आहेत त्यांना हे सगळी गोष्ट विश्वासात घेऊन सांगायलाच पाहिजे
......

बाबा ऑफिसहून आले, सगळे जेवायला बसले,


"कसा झाला तुझा इंटरव्यू प्रकाश",...... बाबा विचारात होते


"चांगला झाला इंटरव्यू बाबा, बहुतेक काम होऊन जाईल माझं",....... प्रकाश


"चांगल आहे ",..... बाबा


दादा वहिनी आई वीणा सगळे कौतुकाने प्रकाश कडे बघत होते...


जेवण झाल आणि दादा आणि वहिनी ने एक चेक बाबांना दिला.......


" काय आहे कसला चेक एक लाख चा",....... बाबा


" बाबा माझे राहीलेले सगळे पैसे मिळाले आणि पगार वाढ ही झाली आहे, मागे तुम्ही तुमची F D मोडली, प्लीज हा चेक घ्या",...... रमेश


बाबा आई कडे बघत होते,...... " एक काम कर हे पैसे अभी आरु च्या नावाने गुंतव भविष्यात कामाला येतील",


" हो बाबा करता येईल त्यांच्या साठी ही, पण तुमचे मेहनतीचे पैसे प्लीज घ्या, आणि आम्हाला ते अडीअडचणीला कामे येतात ",..... दादा


" ते पैसे कुठे वाया जात नाहीत तू प्लीज मुलांच्या नावे गुंतवणुक कर ",...... बाबा


" आई तू तरी सांग",...... दादा


" अरे राहू दे रे दादा, आमच्याकडे राहिले काय तुझ्या कडे राहिले काय एकच आहे, लगेच काय वापस करतो आम्ही काय कोणी परके आहोत का "?,....... आई


"वीणा तू तरी घे ",........ दादा


" असू दे दादा मुलांच्या नावे बाजूला ठेव",....... वीणा


" दादाने चेक वापस घेतला उद्या FD करतो",....... दादा

आई बाबांच्या चेहर्‍यावर समाधान होत....


दादा वाहिनीच्या डोळ्यात पाणी होत.... खूप दिवसाने इतकं छान वातावरण झालं होत घरातलं, कसलच टेन्शन नाही, आई बाबा वीणा प्रकाश रमेश दादा वहिनी सगळेच खुश होते

....

नाश्त्याच्या टेबलवर आज समर मुद्दामच लवकर आला होता, जर पप्पा इथे भेटले तर तो थोड बोलून बघणार होता, मम्मी पप्पा खाली आले नाहीत, आजी आली तेवढ्यात,....


"आजी मम्मी पप्पा कुठे आहेत",..... समर


"आहेत ते त्यांच्या रूम मध्ये",..... आजी


"नाश्ता नाही करायचं का आज त्यांना, काय झालंय",.... समर


"एवढी काय वाट बघतो आहे तु त्यांची",.... आजी


"मला पप्पांशी लवकरात लवकर बोलायला पाहिजे आजी",.... समर


"तू झोपला की नाहीस काल, एवढी काळजी नको करू ",....... आजी


" टेंशन आल आहे आजी ",..... समर


"आम्ही आहोत तुझ्या सोबत, एवढी काळजी करू नकोस, तुझे आजोबा ही बोलले की तस काही असेल तर ते स्वतः बोलतील तुझ्या मम्मी पप्पांशी ",......... आजी


" हे असं झालं ना तर खूप छान होईल आजी, बरं झालं तुम्ही माझ्या बाजूने आहात आता मला खूप आधार वाटतो आहे",..... समर


" हे सगळ ठीक आहे अरे, पण आज सुट्टी नाही का आरामात उठणार असतील ते ",...... आजी


सोहा आलीच तेवढ्यात खाली...


"तू रेडी नाही झालास का दादा अजून ",.... सोहळा सोहा


" कुठे जायचं आहे",.... समर


" तू विसरला का आपल्याला आशिष कडे जायचं आहे ना आज",.... सोहा


" लगेच जायचं आहे का ",..... समर


"हो त्यांनी लंच ला बोलवलं आहे आपल्याला सगळ्यांना, आजी तुला माहिती आहे ना हे सगळं ",...... सोहा


" हो आम्ही पण तयारच होतं आहोत आता, चहा घेतो आणि तयारी करतो ",..... आजी


मम्मी पप्पा आलेच खाली तोपर्यंत.....


" आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, समर सोहा तुम्ही आजी-आजोबांना घेऊन आशिष कडे जा आम्ही तिकडेच येतो एका तासात ",..... मम्मी


" कुठे चांगले आहेत तुम्ही मम्मी-पप्पा, पप्पा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आता",... समर


" फार महत्त्वाचं काम आहे का? आपण संध्याकाळी बोलू",.... पप्पा


समोरच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता


" काय झालं आहे काही इम्पॉर्टंट आहे का कंपनी बद्दल",.... पप्पा


" नाही पप्पा ",.... समर


" ठीक आहे मग संध्याकाळी बोलू आपण ",....... पप्पा


"मम्मी पप्पा नाष्टा तर करा ",..... समर


" नाही आम्ही नाश्तालाच बाहेर जात आहे ",..... पप्पा


मम्मी पप्पा बाहेर निघून गेले समर सोहा एकमेकांकडे बघत होते....


" काय आहे हे नवीन नक्की काय चाललं आहे या दोघांचा",..... समर


" मी तुला म्हटली होती दादा तू पप्पांशी लवकर बोल",..... सोहा


" अरे मग त्यासाठीच मी लवकर उठलो होतो, पप्पांना वेळच नाही, आता ही बघीतल ना नेमके कुठे गेले दोघ ",...... समर


"काय माहिती ",..... सोहा


"ठीक आहे, सगळ्यांनी आवरून घेऊन अर्ध्या तासाने खाली भेटू",....... समर रूम मध्ये गेला त्याने वीणा ला फोन लावला


" बोल समर",...... वीणा


" मला खूप टेन्शन आला आहे वीणा ",.... समर


" काय झालं समर",..... वीणा


" मला पप्पांशी बोलायचयं होत आपल्याबद्दल, पण आता पप्पा आणि मम्मी अचानक सकाळी बाहेर चालले गेले",....... समर


" अरे मग असेल त्यांचं काही काम",.... वीणा


"नाही वीणा, मला तर टेन्शन आला आहे ",.... समर


"का काही प्रॉब्लेम झाला आहे का ",.... वीणा


"हो आम्ही काल कार्यक्रमाला गेलो होतो ना, बहुतेक मला असं वाटत आहे त्याच अधिकारी साहेबांना भेटायला पप्पा गेले होते ",..... समर


"का पण",...... वीणा


" त्यांची मुलगी लग्नाची आहे तिच्या स्थळ बहुतेक मला आल आहे",..... समर


वीणा स्तब्ध होती........ "काहीतरी बोल वीणा",


"अरे मला सुचत नाहीये काही ",..... वीणा


" मलाही तसंच होत आहे ",..... समर


" हा फक्त तुझा अंदाज आहे ना, की तुला खात्री आहे ",..... वीणा


"नक्की माहिती नाही मला काही पण खूप भीती वाटते वीणा मला तुझ्या सोबत रहायच आहे",....... समर


"होईल सगळं नीट तू काळजी करू नको",..... वीणा


" तू ही सावध रहा वीणा",...... समर


" का काही प्रॉब्लेम होवु शकतो का",...... वीणा


" काहीही सांगता येत नाही, वीणा तू मला प्रॉमीस कर की कोणी काहीही बोलाल तरी तू माझी साथ कधी सोडणार नाहीस ",..... समर


"काहीही काय समर, काहीही होणार नाही, तू एवढ टेंशन घेऊ नको ",........ वीणा


"बोल ना प्लीज",...... समर


" ठीक आहे मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, अगदी हट्टी आहेस तू ",....... वीणा
...........

परांजपे मॅडम आणि सर एका रेस्टॉरंट मध्ये अधिकारी सर आणि मॅडम यांची वाट बघत होते, परांजपे मॅडम अजूनही संभ्रमात होत्या, काय करावे यांना सांगून द्याव का? पण वीणाची माहिती जमा करायला सांगितल आहे एकाला, त्याचा अजून फोन आला नाही, काय करावं........


"काय विचारात आहेस तू, काल ही बघितल मी तुझ्याच विचारात आहेस तू ",....... परांजपे सर


"काही नाही फक्त मी सांगते तेवढ ऐका, अधिकारी सर काहीही बोलले तरी तुम्ही त्यांना वचन देऊ नका",...... मॅडम


"का? काय झाला आहे?",..... सर


" एक गोष्ट आहे, मला तुम्हाला काल सांगायची होती पण जमलच नाही, मला कालच कळल आहे सगळ",....... मॅडम


" काय आहे, सांग मला ",...... सर


"हे बघा पण तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका, मी जे सांगेल ते शांत पणे ऐकुन घ्या ",...... मॅडम


"नाही बोल तर खरी, आता मला ही टेंशन आल आहे",.....सर


तेवढ्यात मिस्टर अँड मिसेस अधिकारी येताना दिसले.... तसे परांजपे मॅडम आणि सर उठून उभी राहिले


" हे बघा मी सांगते फक्त वचन देऊ नका काही, मी घरी जाताना गाडीत सांगते तूम्हाला, सगळं ठीक आहे, काळजी करू नका",..... मॅडम


आता परांजपे सर पर्यंत संभ्रमात पडले होते की नक्की काय सांगायचं आहे हिला आपल्याला, आणि अधिकारी साहेबांना का बोलते की काहीच वचन देऊ नका, नक्की समरचं काहीतरी आहे, आज सकाळी पण तो एवढ बोलत होता मला की तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, ऐकलं तरी असत त्याचं काय म्हणणं आहे, आपण काय एवढे जुने विचाराचे नाही आहोत,.......


" हॅलो गुड मॉर्निंग....... गुड मॉर्निंग",...... अधिकारी सर आणि मॅडम समोर बसले.....


वेटर आला चहा नाश्त्याची ऑर्डर दिली......


"कालचा कार्यक्रम खूप छान झाला बर का",.... परांजपे मॅडम


"तुमच्या कडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही खूप गडबडीत होतो आम्ही",..... अधिकारी मॅडम


"नाही हो, आम्ही खूप कम्फर्टेबल होतो, तुमच्या फॅमिली ला भेटून खूप छान वाटले",..... परांजपे सर


"sorry तुम्हाला सकाळी सकाळी त्रास दिला, आज एक महत्त्वाचं काम घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत आम्ही",....... अधिकारी सर


" बोला ना ",.... परांजपे मॅडम आणि सर एकमेकांकडे बघत होते


"काल पार्टीत मुलं एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल होते नाही ",...... अधिकारी सर


" हो ना",........ परांजपे सर


"त्याबद्दलच बोलायच आहे मला आज ",..... अधिकारी सर


" आमच्या डोक्यात असा विचार आहे की आमची निशा आणि समर यांची जोडी चांगली राहिली ना",....... हे बोलताना अधिकारी सरांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता,..." आमची मुलगी सगळ्या बाजूने सुस्वरूप आहे, शिकलेली आहे, आणि एकुलती एक आहे, तुमचा समरही खूप चांगला मुलगा आहे तर आम्ही जे रिक्वेस्ट करत आहोत याचा विचार करा ",..... अधिकारी सर इमोशनल झाले होते


" खूप छान विचार आहेत तुमचे, पण मी आता तुम्हाला याबद्दल काहीही सांगू शकत नाही, कारण मला याबद्दल समरशी बोलाव लागेल, आणि समर जो निर्णय घेईल तो अंतिम असेल, मला या बाबतीत मुलांवर बळजबरी केलेली आवडत नाही, निशा खरंच खूप चांगली मुलगी आहे, ति आमच्या घरी आली तर या पेक्षा जास्त आनंद मलाच होणार आहे, पण मुलांच्या पुढे जाता येत नाही मला समर बद्दल काहीही माहिती नाही, एकदा मी जरा समर शी बोलतो आणि मग आपण परत भेटू किंवा तुम्ही आमच्या घरी या",........ परांजपे सर


" बरोबर बोलत आहात तुम्ही, शेवटी लग्न त्या दोघांना करायचा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण आधी बघायला पाहिजे, जर त्या दोघांची इच्छा असेल तर त्यांनी पहिले भेटलं पाहिजे आणि मग आपण पुढे सगळं ठरवू, पण हे जर नातं झालं तर यापेक्षा तर मला खूप आनंद होईल, केव्हा ना केव्हा तर मुलीचं लग्न करायचं आहे पण तुमच्या घरात आमची मुलगी आली तर खूप चांगलं होईल" ,...... निशा बद्दल काळजी अधिकारी सरांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती


ईतर चर्चा झाल्या त्यांच्यात नाश्ता झाला...


" चला आता आम्ही निघतो, तुम्हाला जर माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर माफ करा ",....... परांजपे


" नाही मला कसला राग येईल, हो आणि समर आणि निशा बद्दल माहिती नाही काय होईल, पण आपली मैत्री अशीच राहील",...... अधिकारी


"Yes sure",..... परांजपे


परांजपे सर... मॅडम गाडीत येवून बसले , मॅडम चा फोन वाजत होता, मॅडम बर्‍याच वेळ बोलत होत्या फोन वर, एक वेगळच समाधान होत त्यांच्या चेहर्‍यावर......


"काय झाल कोणाचा फोन होता" ,....... सर


"मला तुम्हाला खूप काही सांगायच आहे",...... मॅडम


"बोल ना समर बद्दल आहे की काय, काय झालं काही प्रॉब्लेम आहे का? तू मला का बोलली अधिकारी साहेबांना कोणतही वचन देवू नका",...... सर


"हो समर बद्दल बोलायचं आहे, काल त्याने मला सगळ सांगितल तुम्ही मीटिंग मध्ये होता, रात्री आपण प्रोग्रामला गेलो आणि सकाळी त्याला तुमच्याशी बोलायच होत वाटत",........ मॅडम


" हो मला ही वाटला समरला माझ्याशी बोलायच आहे अस, काय झालं आहे",........ सर


"समरने एका मुलीला पसंद केले आहे, वीणा नाव आहे तीच, साई इंटरप्राईजेस मध्ये आहे ती नौकरीला, मी तिची चौकशी केली होती, चांगला रीपोर्ट आलाय, मला आधी वाटल की ती समरला जाळ्यात तर नाही ना ओढत आहे म्हणून चौकशी केली , पण समजल साधी आहे मुलगी",....... मॅडम


" कधी ठरल हे सगळ? ते दोघ कधी पासून ओळखतात एकमेकांना",...... पपपू


" मला ही विशेष माहिती नाही, काल आजी सोहा समरला चिडवत होती तेव्हा मला समजलं",... मम्मी


" म्हणजे त्या दोघींना सगळं माहिती आहे का"?,..... पप्पा


" हो वाटतं, समरने सांगितलं असेल",..... मम्मी


" तुला काय वाटतंय, काय करूया ",..... पप्पा


" आधी आपण वीणाला भेटू मग ठरवू सगळ",.... मम्मी


"चालेल तू म्हणतेस तस मी काय रिऍक्ट होवू आता",..... पप्पा


" तुम्हाला काही माहिती नाही अस दाखवा, समर सांगेल तुम्हाला बरोबर",...... मम्मी


अधिकारी मॅडम आणि सर कार ने घरी जायला निघाले...


" तुम्हाला काय वाटतंय... परांजपे सर असं का म्हटले की आधी समरला सगळं विचारावे लागेल? समर परांजपे चे काही ठरलं आहे का आधीच?",...... मॅडम


" मलाही तोच विचार वाटतो आहे की ते असे का म्हटले?, मी एक काम करतो समरची चौकशी करतो सगळी, तो काय करतो? काय नाही? कोणाशी उठन बसण आहे? कोण ओळखीचे आहेत त्याच्या, सगळं बघतो, तू काळजी करू नकोस, हे काही खूप अवघड काम नाहीये, एवढा चांगला मुलगा सहजासहजी हातचा जाऊ द्यायचा नाही",....... अधिकारी सर जरा रागातच होते


" मला खरंच निशाची खूप काळजी वाटते हो, हा एक चांगला मुलगा नजरेत होता, तर ते लोकही विशेष इंट्रेस दाखवत नाही, लाखात एक अशी आपली मुलगी आहे, वैभव म्हणाल तर तेही काही कमी नाही, आपल्याला वाटलं होतं की आपण प्रपोजल टाकलं की ते लोक लगेच पाघळतील, पण हे झालं वेगळंच",....... मॅडम


" हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, आपले खूप कॉन्टॅक्ट आहेत, परांजपेंना कसे सरळ करायचे ते मला बरोबर माहिती आहे ",........ सर


अधिकारी मॅडम आता आनंदी दिसत होत्या,....." तुम्ही जे काय करायचं ते लवकरात लवकर करा",


" हो मी लगेच कामाला लागतो",........ अधिकारी सरांनी लगेच मॅनेजरला फोन लावला, ते डिटेक्टिव्ह भोसले आपल्या ओळखीचे आहेत ना, त्यांना अकरा वाजता माझ्या ऑफिस मध्ये बोलवा, सरांनी मॅनेजरला बर्‍याच सूचना दिल्या......... जेव्हा अधिकारी सर फोनवर बोलत होते, तेव्हा मॅडम च्या चेहऱ्यावर समाधान होते, समर परांजपे च काही निघायला नको बाहेर, आणि आपल्या निशाच लग्न समरशी होऊ दे, अशा त्या मनोमन प्रार्थना करत होत्या,.......

🎭 Series Post

View all