Aug 16, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 23

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️ भाग 23


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

मंडप आलेल्या पाहुण्यांनी गच्च भरलेल होत, सगळीकडे छान वातावरण होतं, उद्घाटनाचे वेळ जवळ आली, मिस्टर अधिकारी येऊन सगळ्यांशी बोलत होते,


"बी कम्फर्टेबल ",.... अधिकारी


"हो, आम्ही ठीक आहोत, थँक्स " ,......परांजपे साहेब


"धावपळीत लक्ष नाही तुमच्या कडे ",....... अधिकारी


"काही हरकत नाही, काळजी करू नका, तुम्ही कार्यक्रमाकडे लक्ष द्या आम्ही व्यवस्थित आहोत",..... परांजपे साहेब


"तुम्हाला काही मदत लागली तर सांगा",....... मम्मी


सिल्वर कलर ची साडी.... त्याला मॅचिंग असाच मॉडन ब्लाऊज... केस मोकळे सोडलेले निशा आली तेवढ्यात, ती आलेल्या पाहुण्यांची खूप छान काळजी घेत होती, आजीच्या ही आजूबाजूला होती, आजीला काय हवं नको ते देत होती, तिच्या उपस्थितीने सगळे भारावून गेले होते, एक वेगळाच कॉन्फिडन्स होता तिच्यात, एखादी गोष्ट हातात घेतली की ती व्यवस्थित पूर्ण करायची यात निशाचा हातखंडा होता


"एक मिनिट निशा इकडे ये",..... मिस्टर अधिकारी निशा ला घेऊन परांजपे कुटुंबीयांकडे आले त्यांनी ओळख करून दिली.....


"ही आमची निशा आणि निशा हे आहेत मिस्टर अँड मिसेस परांजपे, त्यांची दोन मुलं समर आणि सोहा",...... अधिकारी


सगळे उठून उभे राहिले, निशाने सगळ्यांना हाय हॅलो केलं, परांजपे सर निशा कडे बघत होते, समरचं लक्षच नव्हतं, तिथे काय चालले आहे यात त्याला इंट्रेस्ट नव्हता, सोहा चॅट मध्ये बिझी होती....


" सॉरी आम्ही बिझी आहोत तुमच्याकडे नीट लक्ष देता येत नाही आहे",..... निशा


"नो प्रॉब्लेम आम्ही कम्फर्टेबल आहोत यू कॅरी आॅन",...... पप्पा


"छान आहे ना ही निशा",.... पप्पा


" हो ना",..... मम्मी


मिस्टर अधिकारी हळूच येऊन आईला घेऊन गेले, सगळेजण उठून उभे राहिले, आईने रिबीन कापून उद्घाटन केलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळे आत गेले,


खूप सुंदर आणि स्वच्छ शाॅप होता, मोठमोठ्या मशिन्स व्यवस्थित रचलेल्या होत्या, प्रत्येक मशीन जवळ ऑपरेटर्स उभे होते, एका बाजूला पूजा सुरू होती, अधिकारी साहेब स्वतः फिरून सगळ्यांना शॉप आणि मशीनची माहिती देत होते, एका कोपऱ्यात चहा-कॉफी ची व्यवस्था केली होती, समरला खूप आवडली फॅक्टरी


"मस्त प्लॅन आहे ना पप्पा यांचा",..... समर


"हो खूप हुशार लोक आहेत हे",...... पप्पा


चहापाणी झालं......


"मम्मी पप्पा आम्ही घरी जाऊ का, आता झालं ना उद्घाटन, तुम्ही पार्टीला व्हा जॉईन, प्रत्येक ठिकाणी आमचं काय काम आहे" ,........ समर


"हो बरोबर बोलतो आहे दादा, आम्ही जातो घरी ",...... सोहा


"नाही तुम्हाला यावं लागेल पार्टीला ही" ,....... मम्मी


"मम्मी प्लीज काय करणार आहोत आम्ही आता पार्टीला येऊन, जेवण करायच आहे ना तिकडे जाऊन",...... सोहा


" हे बघ समर सोहा मला वाद नको आहेत, चला सगळ्यांनी, जाणार आहोत आपण पार्टीला, आणि काय करणार आहात तुम्ही घरी जावून? ",....... पप्पा


पप्पा बोलल्यामुळे समर आणि सोहोचा नाईलाज झाला......


उद्घाटनानंतर लगेच पार्टी होती, सगळ्या गाड्या घराकडे निघाल्या, पूर्ण लाइटिंग आणि फुलांनी सजलेला बंगला खूप छान दिसत होता, श्रीमंतीची आणि भव्य तेची प्रचीती येत होती, बाजूला पार्किंगची सोय होती, तिथे सगळ्या गाड्या पार्क केल्या.....


परांजपे सर आणि मॅडम यांना अधिकारी सर आत घेऊन गेले, त्यांची घरातल्या लोकांची ओळख करून द्यायची होती, हळू हळू चालत असल्यामुळे समर आणि सोहा मागेच राहिले


"मम्मी पप्पा कुठे गेले, खूप बोर होत आहे ना दादा",..... सोहा


"हो ना आपण काय करतो आहोत इथे असं वाटत आहे",....... समर


"आपण मग पप्पांच ऐकायला हवं का"?,.... सोहा


"जेवढं जमेल तेवढं करायचं आपण, इतर वेळी तर आपण आपल्या मनाने आयुष्य जगतो ना, कधीकधी थोडासा त्यांना वेळ द्यायचा ",...….. समर


" हो बरोबर आहे, तुला असं नाही वाटत का दादा आपण आल्यापासून सगळे आपल्याकडेच बघत आहेत",...... सोहा


" बघू दे त्यांना बघायचं तर, I don\"t care ",...... समर


" हो पण त्यामुळे कम्फर्टेबल वाटत नाही ना ",....... सोहा


" हो मला ही तेच वाटत आहे आता, केव्हा ही पार्टी संपते काय माहिती? दोघं जरा नाखुशीनेच आत केले",....... समर


मिस्टर अधिकारी समर आणि सोहाला भेटायला आले...... " मला असं वाटत आहे की तुम्ही दोघं कम्फर्टेबल नाही आहात,.... निशा... निशा इकडे ये ",.......


अधिकारी साहेबांनी ओळख करून दिली,....." ही माझी कन्या निशा,..... निशा हे दोघं आहेत समर परांजपे आणि सोहा, तुम्ही तिघे बोलत बसा मी आलोच ",....


वेगळच वातावरण होत तिकडे कोणी जास्त बोलत नव्हत......


"तू कॉलेजला आहेस का सोहा",....... निशा


"हो मी लास्ट इयर ला आहे",..... सोहा


"तु काय करतोस समर",....... निशा


"मी आमचा बिझनेस जॉईन केला आहे, दिवसभर ऑफिसमध्ये असतो मी",..... समर


" What about you.... निशा",..... सोहा


" मी ही एवढ्यातच पप्पांच ऑफिस जॉईन केल आहे आणि ऑफिस मध्ये काम करायला खूप मजा येत आहे, टार्गेट्स आणि अचिव्हमेंट मस्त ",....... निशा


कॉलेज कुठल् तुझ....... बर्‍याच वेळ दोघ निशाशी बोलत होते


निशा आज खूपच छान दिसत होती, व्हाईट स्काय ब्लू कलरचा इव्हिनिंग गाऊन तिने घातला होता, त्यावर ओरिजनल डायमंड ज्वेलरी मस्त दिसत होती, तिच्याकडे बघूनच कळत होतं की ती किती श्रीमंत आहे, वागण्या-बोलण्यात तिचा एक वेगळाच आत्मविश्वास होता, एकदम करीयर ओरीएंटेशन होती निशा, पार्टी आलेले बरेच लोक निशा कडेच बघत होते, हे तिला माहीत होत त्यामुळे ती अजूनच ऐटीत इकडे तिकडे फिरत होती


सोहा समर निशा बराच वेळ गप्पा मारत होते, हे बघून मिस्टर अधिकारी आणि परांजपे साहेब दोघांच्या चेहऱ्यावर समाधान होतं.....
............

वीणा ऑफिस हून घरी आली,


"आई प्रकाश आला का ग",..... वीणा


"नाही अजून, का ग",....... आई


"त्याच्या काही फोन, interview होता ना म्हणून उत्सुकता आहे",....... वीणा


"नाही आला फोन, येईल अग तो, तू चहा घेशील का ",....... आई


"तू बस मी करते चहा",...... वीणा


दादा वहिनी बाजूच्या रूम मध्ये होते, बाबा अजून आले नव्हते ऑफिस हून


" काय झाल वीणा आज शांत आहेस",....... आई


" काही नाही ग आई ",...... वीणा


"समर भेटला होता का आज"?,...... आई


" नाही आज समर एका प्रोग्रामला जाणार होता, आई आज तो त्याच्या आई शी बोलणार होता आमच्या बद्दल, काय झाल काय माहिती"?,........ वीणा


प्रकाश आला तेवढ्यात......


" कसा झाला interview",...... वीणा इक्सायटेड होती


"एकदम छान झाला, प्रेझेंटेशन ही आवडल त्यांना, माझ्या प्रोजेक्टचा बराच फायदा होवू शकतो त्यांना ",....... प्रकाश


"आता पुढे काय म्हटले ते",..... वीणा


"सांगितील ते एक दोन दिवसात",..... प्रकाश


"सॅलरी वगैरे किती, प्रोजेक्ट पेटंट तुझ्या कडे राहील ना",....... वीणा


" हो ते मी देणार नाही, माझ्या नावावर राहील, पेमेंट बहूतेक या पेक्षा दुप्पट ",...... प्रकाश


"वा पार्टी दे प्रकाश ",....... वीणा


"वीणा समर ला जर फोन केला तर माझ्याकडून थँक्यू सांग",..... प्रकाश


" हो नक्की",...... वीणा


आई दोघांच् बोलणं कौतुकाने ऐकत होती......


परांजपे कुटुंब कार्यक्रमाहून घरी आले.. आजी आजोबा हॉलमध्येच बसलेले होते, समर सोहा आजीजवळ जाऊन बसले, मम्मी पप्पा बाजूला बसले


"कसा झाला कार्यक्रम",..... आजी विचारत होती


"खूप छान झाला कार्यक्रम",..... पप्पा


"कसली फॅक्टरी आहे ती",..... आजोबा


" इंजिनिअरिंग युनिट आहे",....... पप्पा


चला आम्ही खूप थकलो आहोत, हो मला मेल ही चेक करायच्या आहेत, आज काहीही काम झाल नाही, मम्मी पप्पा आवरायला गेले.....


"काल झाली का समर वीणा शी भेट, आपल बोलण झाल नाही ना काल पासुन ",....... आजी


" हो आजी भेटली काल वीणा, आम्ही दोघं जेवायला बाहेर गेलो होतो",...... समर


" आजी साखरपुडा सुद्धा झाला ",....... सोहा


"कधी? आम्ही कुठे होतो? आम्हाला नाही बोलवलं"?,...... आजी


"मलाही नाही बोलवलं ",...... सोहा....... "पाहिलं ना आजी कसे लोक असतात ते",......


आजी आजोबा खूप छान हसत होते, आपल्याला सोडून समर राहील का, उगीच चिडवू नको तू त्याला सोहा,....." आता मग घरी कधी सांगणार आहे ",.


" मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं सांगायच आहे, आज मी मम्मीला वीणा बद्दल सगळ सांगितलं",...... समर


" काय बोलतोस काय तू दादा, काय म्हटली मम्मी",...... सोहा


"काहीच नाही म्हटली ती, बोलली कि ती आधी वीणा ला भेटेल आणि मग सगळं ठरवेल, तिने होकार पण दिला नाही नकार पण दिला नाही",....... समर


" हे डेंजरस आहे",...... सोहा


" हो ना मला पण तीच काळजी वाटते आहे, पण मम्मी म्हटली की मला तुझ्या सुखा पेक्षा जास्त काही नको आहे, त्यामुळे जरासा रिलॅक्स आहे मी ",...... समर


" पप्पांना सांगितलं का "?,....... सोहा


" नाही अजून, मम्मी बोलली कि आधी ती वीणा ला भेटेल मग पप्पांना सांग",....... समर


" का पण अस ",.... सोहा


" माहिती नाही ",.... समर


" काहीतरी गडबड वाटते आहे मला समर",... सोहा


" ती बोलली पप्पा बिझी आहेत तू नंतर बोल त्यांच्याशी",..... समर


" अस का बोलली असेल मम्मी ",..... सोहा


" माहिती नाही ",...... समर


" सोहा बरोबर आहे तू विचार करते आहे ते, आपण सगळ्या शक्यतांचा विचार करायला पाहिजे, बरोबर आहे मम्मीने मला तेव्हाच पप्पांना का सांगू दिले नाही सगळं, काय करू मी आता ",........ समर


"काही नाही आता लवकरात लवकर तु सगळ पप्पांना सांग आणि तू तुझ्या निर्णयावर ठाम रहा, बरच काही होईल ते लोक तुला बोलतील ",...... सोहा


" पण मम्मी-पप्पांनी तुझ्या लग्नाला तर होकार दिला ना, मग मलाच का असं करतील ते ",....... समर


" ते मला माहिती नाही, पण मला असं वाटत आहे की काहीही होऊ शकत ",..... सोहा


" मलाही असच वाटत आहे समर",...... आजी बोलली


" जेव्हा खूप मोठ कारभार मागे असतो श्रीमंती असते, तेव्हा बरेच लोक तुमच्यावर डोळा ठेवून असतात",..... आजोबा


" अच्छा म्हणून का आज मम्मी पप्पा आम्हाला कार्यक्रमाला घेऊन गेले ",..... सोहा


" बहुतेक असंच असेल आजी आजोबा, पण त्यातून त्यांचा काय हेतू असेल",..... समर


" समर तू खूपच साधा आहेस, तुला काही कळत नाही, निशा बघितली का तू आज किती मागेपुढे करत होती आपल्या, मिस्टर अधिकारीही सगळ्यांशी आपली ओळख करून देत होते, त्या आजीसुद्धा सारखे आपल्याकडे बघत होत्या, मम्मी पप्पा किती खुश होते, यावर न तू काय ठरवायचं ते ठरवा ",....... सोहा


" ओ माय गॉड.... बरोबर बोलते आहे सोहा तू, मी काय करू आता ",..... समर टेंशन मध्ये आला


" तुला मम्मी-पप्पांना विश्वास द्यावा लागेल कि वीणा तुझ्यासाठी सगळ्यात चांगली आहे ",....... सोहा


" आहेच ती चांगली, आणी मला तिच्या सोबत रहायचा आहे ",...... समर


"मला माहिती आहे, पण हे त्यांना सांगावं लागेल ना, नाहीतर त्यांना असं वाटायचं वीणा ची फॅमिली पैशासाठी तुला जाळ्यात उडते ओढते आहे ",..... सोहा


" अरे पण असं काही नाही आहे, काहीही आहे हे ",...... समर


" हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे वीणा किती चांगली आहे ते, पण थोडा त्रास होईल ",....... सोहा


" पप्पांना अधिकारी कुटुंब खूप आवडतात, त्यांनी काही विचार केला असेल तुझ्या साठी",...... सोहा


"हो आज पप्पा फार इम्प्रेस झाले होते त्यांची फॅक्टरी बघून, मला टेंशन आला आहे आता",..... समर


तेवढ्यात वीणा चा फोन आला....


मी जरा फोन घेतो ह..., आजी आजोबा रूम मध्ये गेले, ते ही काळजीत होते, सुहाने ही आशिष ला फोन लावला


" झाला का कार्यक्रम, केव्हा आले तुम्ही सगळे घरी ",...... वीणा

" हो आत्ताच आलो आम्ही घरी ",...... समर


" आज प्रकाश चा इंटरव्यू होता, त्याचा इंटरव्यू खूप झाला, त्याने तुला thank you सांगितलं आहे",..... वीणा


Ok....


" काय झाल समर काही टेंशन, तू तुझ्या मम्मीला सांगितलं का आपल्याबद्दल, तुझा आवाज असा का? ",...... वीणा


" हो झालं माझं बोलणं पण तुला सांगायचं राहिलं लगेच आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो ",...... समर


" काय म्हटल्या त्या ",...... वीणा


"मम्मीला तुला भेटायचं आहे, मग ती सांगणार आहे, अजून काहीच निर्णय दिलेला नाही",...... समर


" पप्पा काय म्हटले ",..... वीणा


"त्यांना अजून सांगितलं नाही",...... समर


" का सोबत नव्हते का मम्मी पप्पा",..... वीणा


" नाही पप्पा बिझी होते, हीच गडबड झाली, दोघांना सोबत सांगायला पाहिजे होत ना मी, उद्या बोलणार आहे मी पप्पांन शी",... समर


"हे बघ समर काळजी करू नकोस होईल सगळं नीट",..... वीणा


" जमलं तर उद्या भेटू आपण, तसं मी सांगतो तुला, बहुतेक सोहा असेल सोबत",..... समर


" हो चालेल",..... वीणा


समरने फोन ठेवला, वीणा आता काळजीत होती, काय झालं असेल नेमकं तिकडे, समर का काळजीत होता ऐवढा? त्याने मला बहुतेक सगळं सांगितलं नाही, नक्कीच काहीतरी झालं आहे तिकडे पार्टीत, नुकतीच सुरुवात झाली आहे आता आमच्या नात्याला, मला आता समर सोबत रहाव असं वाटू लागलं आहे, आता काही यात अडचण नको यायला, समरच्या घरच्या लोकांचं म्हणणं काय आहे तेही समजत नाही आहे,......


आजी आजोबा रूम मध्ये गेले,.... "मला खूप काळजी वाटते आहे समरची ",...... आजी


"तू काही काळजी करू नको, सगळं होईल नीट",.... आजोबा


" काय म्हणणं आहे या दोघांच समर बद्दल ते समजत नाही",....... आजी


"हो ना पण सगळं मुलांच्या मनासारखं झालं तर बरच आहे, गरीब-श्रीमंत असे काही ते मानणार नाहीत, थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, आणि असं काही असेल तर मी स्वतः बोलेल त्या दोघांशी, पण सगळं तुझ्या मनासारखं होईल आता काळजी सोड",...... आजोबा


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now