Aug 18, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 22

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️ भाग 22


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


नाश्त्याचे टेबल वर मम्मी पप्पा नाश्ता करत होते, सोहा खाली आली


"आज उशीर झाला का सोहा तुला",....... पप्पा


"आज फर्स्ट लेक्चर नाहिये पप्पा" ,........ सोह


"आजच लक्ष्यात आहे ना, लवकर ये घरी आपल्याला संध्याकाळी बाहेर जायच आहे",....... पप्पा


" कपडे रेडी आहेत का सोहा तुझे? काय घालणार आहेस" ?,...... मम्मी


"काही विशेष ड्रेस घालावा लागणार आहे का? आहेत माझ्याकडे ड्रेस एखादा घालेन ",...... सोहा


"एखादा नाही तसं चालणार नाही, छान ड्रेस घाल पार्टीवेअर",...... मम्मी


" ठीक आहे, आशिषच्या आई-वडिलांनी उद्या आपल्याला त्यांच्याकडे बोलवल आहे, तर तुम्हा सगळ्यांना आहे ना वेळ",...... सोहा


" हो आहे ना जाऊया उद्या आपण त्यांच्याकडे, आजी आजोबा ना ही घेवून जाऊ", ....पप्पा


" हो त्यांना ही सांगितल आहे, आजी आजोबा ना ही घेवून या, तसे ते फोन करतील उद्या सकाळी , मीच सांगितल की आज आम्ही बिझी आहोत",...... सोहा


समर खाली आला......


" काय रे समर, केव्हा आलास घरी, तू कुठे गेला होतास",..... मम्मी


" खूप उशिरा आला दादा",.... सोहा उगीच चिडवत होती


" नाहि मम्मी, काहीही काय सोहा, मी वेळेत आलो घरी ",...... समर सोहा कडे रागाने बघत होता


" काय सुरू आहे काही लपवताय का तुम्ही ",..... मम्मी


" नाही ग मम्मी ",...... समर


" आज लवकर यायचं आहे समर ऑफिस वरून लक्षात ठेव",...... मम्मी


"हो मी येतो चार वाजेपर्यंत",...... समर


" तुझी तयारी झाली आहे ना ",...... पप्पा


"हो मशीन आज येणार आहेत लगेच ट्रेनिंग सुरू करू ",........ समर


" ते नाही रे आज संध्याकाळी पार्टी ची",....... पप्पा


" त्याची काय तयारी करायची",...... समोर


" मी तेच म्हटली होती मम्मी पप्पांना",..... सोहा


"काही ड्रेस कोड आहे का फॉर्मल की पार्टी वेअर",..... समर


" पार्टी वेअर ठीक आहे",...... मम्मी

ठीक आहे, खर तुमच्या साठी मी होईन तयार, नाही तर काही गरज नाही एवढ नटण्याची, घालता येईल एखादा ड्रेस, आपल्या घरचा थोडी प्रोग्राम आहे",..... समर


" आपल गिफ्ट रेडी आहे का, आल का कुरियर",.... पप्पा


"हो गिफ्ट पॅक करून घेतल आहे मी",..... मम्मी


"बापरे मम्मी पप्पांची बरीच तयारी दिसते आहे पार्टीला जायची ",..... सोहा


मिस्टर अधिकारी पप्पांच्या खास मित्रान मधले एक आहेत",..... मम्मी


आजी आजोबा आले तेवढ्यात खाली, आजी समर कडे बघून छान हसत होती, डोळ्यानेच कोण विचारत होती... कुठे गेला होतास समरही हसत होता....


"काय झालं आहे, का हसतो आहेस तू समर",..... मम्मी


"काही नाही मम्मी ",...... समर


" तुमच्या दोघांच आजीशी छान जमतय बर का, आम्हाला काही सांगत नाही तुम्ही दोघं",..... मम्मी नाराज होती


"तसं काही नाही आहे मम्मी, तू माझी लाडकी आहे ",....... समर


नाश्ता करून समर ऑफिसला निघाला सोहा, कॉलेजला गेली, मम्मी-पप्पांना आज घरून निघायला जरा उशीर होता....
.....

सकाळी प्रकाशची आवरायची धावपळ झाली, आज इंटरव्यू होता त्याचा,

" सगळं व्यवस्थित घेतला आहे का प्रकाश",..... आई प्रकाश च्या मागे होती त्याला जे जे लागेल ते देत होती


" हो घेतल आहे सगळ, आई तू काळजी करू नकोस",......... प्रकाश


प्रकाश आई बाबांच्या पाया पडल्या, बाबा कौतुकाने प्रकाश कडे बघत होते, तो घाईघाईने ऑफिसला निघून गेला तिकडून तो इंटरव्यू ला जाणार होता......


विणा ऑफिसला आली, प्रिती प्रशांत आधीच आले होते, प्रशांत मशीनच्या डिलिव्हरीत बिझी होता, प्रीती हि काहीतरी काम करत होती


" प्रीती ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचं आहे",.....वीणा


"थांब वीणा, मला खूप महत्त्वाचं काम आहे",...... प्रिति तिची तिची बिझी होती


"ऐक ना प्रीती",...... वीणा खूप अधीर झाली होती


" वीणा तू लहान आहेस का? पाच मिनिट थांब ना, काही चूक झाली तर सर मला ओरडतील",....... प्रिति टेंशन मध्ये होती


सर बाहेर आले,.............." वीणा ट्रेनिंग मटेरियल रेडी आहे का? कोण टेलर काका येणार आहे तुझ्यासोबत? सगळ अरेंज कर",


"सर मी जायचं आहे का ट्रेनिंग घ्यायला",....... वीणा


" हो या मशीन ची माहिती तुला आहे, मला दुपारपर्यंत ट्रेनिंग मटेरियल रेडी करून प्रेझेन्टेशन दाखव",...... सर


"हो ठीक आहे सर",.... वीणा कामाला लागली प्रीती हसत होती


" आता कळल, आम्ही सगळे एवढे का बिझी आहोत, काय सांगायचं आहे लवकर सांग ",...... प्रिति


"जा आता नाही दुपारून सांगेल, पण तू खूप महत्वाची गोष्ट मिस केली आहे एवढंच आत्ता सांगते ",..... वीणा राग आल्यासारख दाखवत होती


"सांग ग बाई..... सांग" ,....... प्रिति


"आता माझ्या डोक्यात ट्रेनिंगसाठी खूप छान आयडिया आहे, आता माझ्याशी एक-दोन तास तरी तू बोलू नको, मला थोडं काम करू दे",.... वीणा


" घ्या कोण कोणाला डिस्टर्ब करते ते बघा",.... प्रिति


वीणाने प्रीतीकडे रागाने बघितला आणि तिने कामाला सुरुवात केली...


"ठीक आहे, कोणी तरी जरा जास्तच करत आहे अस नाही का वाटत ",...... प्रिति


प्रेझेंटेशन रेडी झालं, वीणा स्वतःच्याच कामावर खूश झाली, आता केव्हा जरी सरांनी विचारलं तरी दाखवायला रेडी होत प्रेझेंटेशन ...


लंच ब्रेक झाला........


वीणाने फोन बघितला तर समरचा फोन येऊन गेलेला होता, मेसेजही होता, वीणा ने समरला फोन लावला


"काय चाललं आहे आज दिवसभर बिझी आहेस का विणा"?,......... समर


"हो काम सुरू आहे, तिकडे मशीन द्यायचे आहेत ना तेच काम सुरू आहे",....... वीणा

Ok....


" तुझं काय चाललं आहे, काल उशीर तर नाही झाला ना घरी जायला ",........ वीणा


"नाही,... सोहा जागी होती, आज आम्हाला संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचं आहे मम्मी पप्पांसोबत, आज मी लवकर घरी जाणार आहे, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे वीणा ",...... समर


"बोल ना", ........ वीणा" मी मम्मीला आपल्याबद्दल सांगितलं नाही तर मला खूप गिल्टी फील होत आहे, मम्मीला ही थोडं फार समजलं की काय असं वाटत आहे, काय करू मम्मीला सगळं सांगून देऊ का ",....... समर


" हो सांगून दे मग मम्मीला ",...... वीणा


" कसं बोलू पण तू मला प्लीज सांग",....... समर


" एकदम प्रामाणिक रहा तु, तुला मनाला वाटतं ना ते सगळं मम्मी शी बोल, काय करतील त्या चिडतील किंवा प्रेमाने बोलतील, मम्मीचा आहे तुझी, त्यांना सगळ जाणून घ्यायचा अधिकार आहे, तू बोलून घे लगेच त्यांच्याशी",...... वीणा


" ठीक आहे मी मम्मी शी बोलून घेतो आणि मग सांगतो तुला काय झालं ते, आज मी संध्याकाळी येणार नाही तुला भेटायला",....... समर


" हो काही हरकत नाही ",...... वीणा


" मी सोहाला सांगितलं सगळं की तू होकार दिलास, तिला खूप आनंद झाला, तिला तुला भेटायच आहे, उद्या आम्ही सोहाच्या सासरी जाणार आहोत भेटायला ",........ समर


" अरे वा, कधी भेटायच ते सांग सोहाला",...... वीणा


" जमलं तर उद्या संध्याकाळी भेटू आपण, नाही तर ऑफिस मध्ये भेटू, नको ऑफिस मध्ये... आपण बाहेरच भेटू, तुला काय वाटतय ",........ समर


" हो चालेल, बाहेर भेटू ",..... वीणा


प्रीती आली........ वीणा तिचीच वाट बघत होती


" सांगणार आहेस का काय झालं ते आता तरी,.... भेटला होता का समर ",....... प्रिति


वीणा ने काहीही न बोलता प्रीतीला हातातली अंगठी दाखवली,..........


" काय साखरपुडा झाला की काय नाही ग",....... प्रिति आनंदात होती


"वहिनी पण तेच विचारत होती, असच समरने मला अंगठी दिली ग, छान आहे ना ",...... वीणा

" आशिच थोडी देतात अंगठी, कुठे भेटला होता समर? काल तो तर आलाच नव्हता ऑफिस सुटल तरी",....... प्रिति


"हो अगं नंतर मी घरी गेल्यावर समरचा फोन आला होता, मग आम्ही दोघं संध्याकाळी जेवायला बाहेर गेलो होतो",...… वीणा


" OMG डिनर डेट का, काय सांगतेस काय? काका-काकूंना सांगून गेली होती का ",...... प्रिति


" हो आणि रात्री समर आमच्या घरी आला होता",...... वीणा


"हे मला कधी सांगायचं सगळ झालेलं, आता तुमच्या दोघांकडून पार्टी हवी मला ",...... प्रिति


" तेच तर सांगत होती ना आल्यानंतर, मला अस झाल होत कधी बोलू तुझ्याशी, पण रात्री उशीर झाला, सकाळी तू काही ऐकायला तयार नाही",........ वीणा मुद्दाम तोंड फुगवून बसली


"बर बाई sorry,..... काय काय झालं नीट सांग",...... प्रिति


वीणा ने प्रीतीला सगळं काय काय झालं ते सांगितलं, मी समरला हो बोलले, मोठा केक मागवला होता समरने, फुल वगैरे सगळ होत, सांगताना ही वीणा लाजत होती, प्रिती कौतुकाने ऐकत होती ,.....


" सगळं होईल ना ठीक प्रीती, मला भिती वाटते आहे ",..... वीणा


" हो होईल ग, काळजी करू नकोस, काही अडचण नाही, सगळ तुझ्या मना प्रमाणे होईल बघ ",........ प्रिति


प्रिती वीणा ने प्रशांत ला हाक मारली,..... आज जेवायच नाही का प्रशांत? चल लवकर, तुझी आवडती भाजी आहे.......
........


समर मम्मी च्या केबिन मध्ये गेला, मम्मी काम करत होती, समर येवून बसला


" बोल काही बोलायचं आहे का",..... मम्मी


" हो मम्मी पण कस सांगू समजत नाही",...... समर


"काल बद्द्ल बोलायच का",...... मम्मी


"हो तुला कस समजल"?,...... समर


" तू माझ बाळ आहे , आईला लगेच समजत मुलांमध्ये थोडा ही बदल झालेला",...... मम्मी


" मम्मी मला तुझ्या पासुन काही लपवायचं नाही I am sorry",...... समर


"अरे काय झालाय आता सांगणार का",...... मम्मी


"मम्मी मी काल माझ्या मित्रा कडे नव्हतो गेलो, मी वीणाला भेटायला गेलो होतो",...... समरने एका दमात सांगून टाकलं


"कोण वीणा",....... मम्मी


"मम्मी तू शांत पणे ऐकून घे प्लीज",...... समर


" अरे हो सांग तर खरी",..... मम्मी


" साई इंटरप्राईजेस मध्ये आहे वीणा कामाला, आपण मशीन घेतो ना तिथे",..... समर


" कुठे भेटले तुम्ही दोघ",...... मम्मी


" मशीन च्या डेमो च्या वेळी मी वीणाला बघितल",.... समर


" आता काय म्हणणं आहे तुझ",..... मम्मी


"मला वीणाशी लग्न करायच आहे",..... समर


" किती दिवस झाले तुम्ही भेटून, तू चौकशी केली का वीणा ची ",..... मम्मी


"हो मी केली चौकशी, एकदम साधी माणस आहेत ती, प्रामाणिक आहेत, वीणा खूप चांगली आहे मम्मी ",...... समरला सुचत नव्हत काय बोलाव


मॅडम विचार करत होत्या.......


" सोहाच्या वेळी कस आशिष ला आधी भेटलो आम्ही, तस वीणाला मी भेटेन मग सांगते मला काय वाटतय ते",...... मम्मी


" मम्मी वीणा खूप साधी मुलगी आहे, घरचे खूप साधे आहेत",.... समर


" तू भेटला का त्यांना",..... मम्मी


"हो मम्मी",...... समर


"आणि हे आजी आणि सोहा ला माहिती आहे",..... मम्मी


" I am so sorry मम्मी मला तुला सांगायचं होतं, मी आलो ना आता सांगायला",...... समर


मम्मी ला राग आला होता.....


समर उठून मम्मी जवळ गेला, .... "मम्मी राग सोड, प्लीज बोल ना माझ्याशी, माझ चुकलं ग",


"आता कशाला बोलतोस माझ्याशी, लहान पणी एक गोष्ट माझ्या पासून लपवायचा नाहीस तू आता खूप मोठा झाला आहेस",..... मम्मी


मम्मी.........


"ठीक आहे, नीट सांग मग सगळ",....... मम्मी


"मम्मी वीणा मला डेमो च्या वेळी भेटली, वीणाला काहीच माहिती नव्हतं की माझ्या मनात तिच्याबद्दल काय आहे, तिला पहिल्यांदाच बघितलं तेव्हा मला असं वाटलं की हीच ती, मला वीणा बरोबर खूप कम्फर्टेबल वाटतं, यापूर्वी कधीच मला कुठल्या मुलीबद्दल असं वाटलं नव्हतं मम्मी, पण मम्मी वीणा खूप साध्या घरची मुलगी आहे, खूप लहान घर आहे त्यांचं, वीणा तिचे आई वडील भाऊ बहीण सगळे एकत्र राहतात, घरात सगळे काम करतात ते ",....... समर


" ठीक आहे काही हरकत नाही, मला एकदा भेटू दे वीणाला मग मी बघते",...... मम्मी


" मम्मी तुला काही अडचण नाही ना",...... समर


" हे बघ समर मी दरवेळी हे सगळं बोलत नाही पण मी ही एका गरीब घरची मुलगी आहे, मला ही कामाचा बराच अनुभव आहे, पूर्वी मी नोकरी करायची, तुझ्या वडिलांनी मला पसंत केलं, गरीब-श्रीमंत असं काही नसतं, मला फक्त एवढेच हव आहे की तू खुश असावा, आणि मुलगी चांगली असावी, तुला माहिती आहे ना आपला केवढा मोठा व्याप आहे, ते सगळं सांभाळणारी असावी, तुझ्या खांद्याला खांदा लावून तिने काम करायला पाहिजे, ऑफिस सांभाळल पाहिजे, बाकी अपेक्षा नाही",....... मम्मी


" मम्मी मी पप्पांना कधी सांगू वीणा बद्दल ",...... समर


" आधी मला वीणाला भेटू दे, मग सांग नाहीतरी पप्पा आता सध्या बीजी आहेत, सोहाच्या लग्नाच फिक्स होवु दे मग तुझ्या लग्नाचं फिक्स करू आपण ",...... मम्मी


" मम्मी तुला हे सगळं सांगून माझ्या डोक्यावरून किती मोठं ओझ उतरला आहे तुला मी नाही सांगू शकत आणि तू हे माझं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि वीणा ला भेटायची तयारी केली खूप छान वाटलं मम्मी",..... समर


" हे बघ समर यापुढे माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवू नकोस",...... मम्मी


" नाही मम्मी",....... समर


समोर त्याच्या केबिनमध्ये निघून गेला, परांजपे मॅडमने एक फोन फिरवला, समोरून फोन उचलला गेला, बराच वेळ परांजपे मॅडम फोनवर बोलत होत्या, त्यांनी समाधानाने फोन ठेवून दिला......
........

निशा ऑफिस हून आली, घरी पार्लर वाली आली होती, मम्मी तिच्या सोबत तयार होत होती, निशा हि जॉईन झाली, डॅडी ही बिझी होते, ते तयार होवुन पुढे फॅक्टरी साइटला गेले होते,


समर मम्मी पप्पा सोहा घरी आले,...... "सोहा तयारीला लाग, तूला उशीर लागतो",


"किती वेळ आहे पार्टी",....... सोहा


"रात्री येवू आपण",...... मम्मी


"आम्ही उद्घाटनाला येतो, पार्टीला मम्मी पप्पा तुम्ही जा",..... समर


"दोघी ठिकाणी आपण सगळे जाणार आहोत, उगीच गडबड नको",....... पप्पा


सगळे तयार झाले,..... फॅक्टरी साईटला जायला निघाले


मिस्टर अँड मिसेस अधिकारी फॅक्टरी साइटवर उपस्थित होते, गेट सुंदर फुलांनी सजवलेल होतं, आतही शॉप मस्त सजवलं होतं, इंजिनिअरिंग युनिट होते ते, पाहुण्यांना बसायला गेटच्या बाहेर एक तंबू उभारला होता, तिथे गालीचा अंथरला होता, खुर्च्या टाकलेल्या होत्या, सगळ्यांची धावपळ होत होती, उद्घाटन मिस्टर अधिकारी यांच्या आईच्या हस्ते होत, आई येऊन खुर्चीवर बसलेल्या होत्या, सगळे येऊन त्यांच्या पाया पडत होते,


परांजपे कुटुंब कार्यक्रमाचे ठिकाणी आले.....


"फॅक्टरी मस्त मोठी वाटते आहे नाही छान",...... मम्मी


"हो ना केवढी भव्य दिव्य आहे फॅक्टरी, यांचं कामाच वेगळ आहे",..... पप्पा


सगळे गाडीतून उतरले, एक मदतनीस गाडी पार्क करायला घेऊन गेला, परांजपे मॅडम आणि सर जसे पुढे आले तसे अधिकारी जोडी त्यांच्या स्वागताला पुढे आली, समर आणि सोहा ही सोबत होते हे बघून त्यांना समाधान वाटलं, मम्मी पप्पा अधिकारी यांच्या आईला भेटले, त्यांनी दाखवलेल्या जागेवर जाऊन बसले, सोहा आणि समरही मम्मी पप्पांच्या शेजारी बसले, अधिकारी यांच्या आई सारख्या परांजपे कुटुंबीयांकडे बघत होत्या.......
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now