Aug 18, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 21

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️ भाग 21

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......


समर ने बाजूला गाडी पार्क केली, तो वीणा बरोबर गल्लीत शिरला, आजूबाजूच्या घरातील लोक वीणा आणि समर कडे बघत होते, एक दोन गल्ल्या ओलांडल्यानंतर आतल्या बाजूला वीणाचं घर होतं, वीणा घरात आली, दादा वहिनी अभी आरु बाजूच्या रूम मध्ये होते, घरात प्रकाश अभ्यास करत होता, बाबा आई बसून टीव्ही बघत होते


"बाबा आई समर आले आहेत" ,....... वीणा


आई-बाबा उठून उभे राहिले, प्रकाशही उठून उभा राहीला, वीणा सांगते यावर त्यांच्या विश्वास बसत नव्हता,


"काय..... कोण आलाय",..... बाबा


"समर बाबा",..... वीणा


समर आत आला, हॉल वजा रूम होती, ती पण खूप छान स्वच्छ नीटनेटकी होती, खाली दोन गाद्या घातलेल्या होत्या, आईने त्या उचलण्याचा प्रयत्न केला,


"राहु दे आई गाद्या" ,....... वीणा


प्रकाशने पटापट पुस्तक आवरले, बाबांनी समरला कॉटवर बसायला जागा केली, प्रकाश भारावल्यासारखा समरकडे बघत होता,


वीणाने ओळख करून दिली,...... "हे माझे आई बाबा, बाबांना ओळखता तुम्ही, हा प्रकाश",


"मी दादा वहिनी ला बोलवते तोपर्यंत तुम्ही बोलत बसा",..... वीणा


"वीणा तू थांब मी बोलवते दादाला ",...... आई दादाला बोलवायला गेली


पाच मिनिटात दादा वहिनी आले, अभी आरुही सोबत आली होती


"तुम्ही काय घेणार चहा कॉफी",..... आईने विचारले


" काहीच नाही मी फक्त तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलो आहे ",...... समर


" असं कसं काहीतरी घ्यावाच लागेल, कोल्ड्रिंग आणु का"?...... दादा बोलला


"नको मी कॉल्ड ड्रिंक पीत नाही, आता जेवण झाले आहेत आमचे",........ समर


" मी चहा करते",.... वीणा


"चालेल",.... समर बोलला तसे सगळे हसायला लागले


समर आरामशीर कॉटवर बसला होता, बाजूला बाबा बसले होते, दादा... प्रकाश खुर्चीवर बसले होते, समरने येता येता अभी आरु साठी चॉकलेट आणले होते, चला इकडे या आणि तुमचे नाव सांगा मग मी तुम्हाला चॉकलेट देतो


अभी आरुला आनंद झाला, पटापट नाव सांगून त्यांनी चॉकलेट घेतले,


"तुमचे खूप आभार समर सर ",.... दादा


"हो खूप थँक्यू सर, हो माझा पण उद्या इंटरव्यू आहे",....... प्रकाश


"काहीही काय? मी काहीही केले नाही, आणि सर नका बोलू, मला समर बोला, दादा, प्रकाश",....... समर


" आम्हाला माहिती आहे सगळं, तुम्हीच मदत केली आहे",...... दादा


वीणा चहा घेऊन आली, सगळ्यांना चहा दिला, समरने चहा पिला, सगळे समर कडे बघत होते


" चहा खूप छान झाला आहे" ,...... समर


"हो आमच्या वीणा ताईच्या हाताला खूप चव आहे, स्वयंपाकही ती खूप छान करते,..... वहिनी


"हो फक्त कधीकधी तिखट मीठ जास्त असतं",..... प्रकाश


तसे सगळे हसायला लागले,


"बाबा तुमचं घर खूप छान आहे, हे सगळे असे एकत्र असले की किती छान वाटतं नाही, तुम्ही सगळे खूप मनमिळावू आहात, चला मला आता निघावं लागेल", ........ समर उठला,


त्याने बाबांच्या पाया पडला,


" हे योग्य नाही, आता सारख्या पाया पडायच्या नाही",...... बाबा


समर आईजवळ गेला,....." तुम्ही खूप छान आहात आई, माझी आई.... माझी आजी अशीच आहे, आणि तुम्ही खूप सुंदर दिसतात",


आई च्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती,... "तुम्ही वीणाला खूप समजून घेतल, वीणा खूप सांगते तुमच्या बद्दल, तिने जस सांगितल तसेच आहात तुम्ही ",...... समर


"आई प्लीज फक्त समर बोला ",....... समर


" आई आज मी वीणाला लग्नासाठी विचारल, तिने होकार दिला मला, मी अजून कोणाला सांगितल नाही, तुम्ही पाहिल्या आहात ज्याना ही आनंदाची बातमी दिली मी , माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही वीणा ची अजिबात काळजी करू नका,मला माहिती आहे एका आई साठी मुलगी आनंदात असणे किती महत्त्वच आहे ",...... समर


" वीणाला सांभाळून घ्या, ती खूप साधी मुलगी आहे, नीट सांगितलं प्रेमाने बोललं तर ती काहीही करायला तयार असते, अगदीच मेहनती आहे आमची वीणा",...... आई


" हो मला माहिती आहे ते आई, तुम्ही काळजी करू नका",........ समर


बाबा ही आले, आई बाबा समर मस्त बोलत होते....


" तुमच्या घरी माहिती आहे का वीणा बद्दल",...... बाबा


" नाही अजून पण मी सांगणार आहे एक दोन दिवसात, तेव्हा मी करेन तुम्हाला फोन ",....... समर


" हो काही हरकत नाही",...... बाबा


"निघतो मी आई बाबा ",...... समर


"हो खूप छान वाटल तुम्ही आले तर, या परत",..... बाबा


"हो येईन लवकरच मम्मी पप्पांना घेवून येईल आता",..... पण एका अटीवर, मला फक्त समर म्हणा तुम्ही


वहिनी ही बाजूला उभी होती.....


प्रकाश वीणा दादा वहिनी बाहेर पर्यंत आले सोडायला," "प्रकाश all the best, नीट दे interview आणि मला भेटायला ये ऑफिस मध्ये पुढच्या आठवड्यात ",...... समर


"हो नक्की thanks",...... प्रकाश


"चला दादा वहिनी, वीणा good night",....... समर


समर घरी पोहोचला सोहा जागीच होती,


"आज कुठे होता दौरा दादा",...... सोहा


"तू अजून जागी कशी" ?,......... सोमवार समर


"फोन सुरु होता, आशिष चा ",.... सोहा


"काय म्हणतो आशिष, त्याने घरी सांगितल का , आज तो मम्मी-पप्पांना भेटला असं",..... समर


"हो सांगितलं त्याने सगळं, बहुतेक आपल्याला रविवारी त्यांच्या घरी जायचं आहे ",..... सोहा


"अरे वा चालेल जाऊया आपण सगळे, मम्मी पप्पा झोपले का? आजी आजोबा कुठे आहेत" ?,....... समर


" सगळे झोपले जेवून, तू घरी काय सांगितलं होतं, सगळे तुझी खूप वाट बघत होते",...... सोहा


" का काही झालं का"?,...... समर


" मम्मी पप्पा खूप चिडलेले आहेत",...... सोहा


"चल खोटं बोलू नकोस, मी सांगून गेलो होतो त्यांना की मी मित्राकडे पार्टीला जात आहे",...... समर


" सोहा हसायला लागली, नाही रे दादा सगळं ओके आहे, मला माहिती होतं तू चीडशील, कुठे गेला होता? खरं सांग",....... सोहा


" मी वीणा बरोबर डिनर डेट ला गेलो होतो",..... समर


" काय.......? मजा आहे बुवा, काय झालं बोलण? सांग ना दादा? हो बोलली का वहिनी"?,...... सोहा


" हो वीणा ने मला होकार दिला",....... समर


" काय बोलतोस काय दादा",..... सोहा


" हो खरं आहे",.... समर लाजत होता


" मज्जा आहे बाबा तुझी, पार्टी दे चल आता, घरी कधी सांगतो आहेस",........ सोहा


" उद्या तर वेळ नाही, आपल्याला पार्टीला जायचं आहे लक्षात आहे ना",...... समर


" जायलाच हवा का तिकडे", ?........ सोहा


" हो पप्पांचा आग्रह आहे, मिस्टर अधिकारी त्यांचे बेस्ट फ्रेंड आहेत, पप्पांसाठी तरी जावंच लागेल कार्यक्रमाला ",...... समर


" किती बोर रे दादा",...... सोहा


" हो ना",..... समर


" बरं सांग मला सगळं काय काय झालं ते",...... सोहा


समर सोहा बऱ्याच वेळ बोलत बसले होते, समर वीणा सोबत कुठे गेले, काय काय झालं, ते सगळं सोहाला सांगत होता , वीणाचे फोटो दाखवले,


" वा खूप सुंदर आहे वीणा वहिनी, वा दादा केक फुल वगैरे, छान झालं खूप, OMG आणि हे काय रिंग दिली की काय",...... सोहा


" हो,... कशी वाटली डिझाईन",...... समर


" वहिनीच्या हातात रिंग खूप छान दिसते आहे, कधी गेला होता तू खरेदीला" ,...... सोहा


"आज संध्याकाळी घेतली अंगठी, विचार नव्हता पण रस्त्याने जात असताना दुकान दिसलं, मग केली खरेदी",...... समर


" वा छान झालं, फोटो वरुन तर असं वाटत आहे वीणा वहिनी खूप शांत आहे",...... सोहा


" हो तशीच आहे ती खूप समजूतदार, शांत आहे, तुला माहिती आहे सोहा आज विणा खूप छान दिसत होती, बराच वेळ समर वीणा बद्दल सोहाला सांगत होता",....... समर


" किती कौतुक चालल आहे",...... सोहा छान हसत होती


" म्हणजे दादा तू डायरेक्ट त्यांच्या घरी गेला होता",...... सोहा


"हो मी तिच्या आई-वडिलांना भावांना सगळ्यांना भेटलो ",...... समर


" कसे वाटले ते लोक",.... सोहा


" खूप चांगले आहेत सगळे, खूप साधे आहेत, आपल्या बेडरूम एवढं घर आहे त्यांचं, पण खूप छान वाटत होतं बरं घरात ",....... समर,......


" वीणा चे आई-वडील खूप चांगले आहेत म्हणून वीणा बरोबर एवढा छान वाटतं असणार ",......... सोहा


" तू भेटशील का वीणाला सोहा"?,...... समर


" हो नक्की आपण भेटूया",...... सोहा


" सोमवारी वीणा बहुतेक येईल आपल्या ऑफिसला, नवीन मशीनच ट्रेनिंग आहे, तेव्हा तू येशील का ऑफिसला",.... समर


" हो चालेल ना दादा मि येईन, मला ही भेटायच आहे वाहिनीला ",...... सोहा


" मी ठरवतो तस, सांगतो वीणाला",....... समर


" हो चालेल दादा, उद्या सकाळी मी मम्मी पप्पांची बोलून घेईन, आशिष च्या घरी जायच त्या बद्दल ",...... सोहा


Ok......


समर रूम मध्ये गेला, आजी-आजोबांच्या रूमचा लाईट बंद दिसत होता, जाऊ देत आजी-आजोबा झोपले असतील, उगीच डिस्टर्ब नको करायला, फोन बघितला तर वीणा चा मेसेज आला, तिला गुड नाईट पाठवुन समर हातात पुस्तक घेऊन बसला, पण वाचायचं मन होत नव्हत, शेवटी पुस्तक बाजूला ठेवून समरने झोपून घेतल
.....

समरी घरी येऊन गेल्यामुळे सगळे खूप भारावले होते... आई बाबा दादा वहिनी प्रकाश


"खूपच चांगले वाटत आहेत समर परांजपे, एक काळजी मिटली ",....... आई


"हो ना किती छान व्यक्तिमत्त्व आहे, अगदी भेटल्या बरोबर छाप पडते त्यांची",....... दादा


"एकदम छान झाल वीणाताई तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात, बरं झालं पण घर आवरलेलं होत",...... वहिनी


प्रकाश तर अजूनही भारावलेला होता,...." हे असं होता आलं पाहिजे आयुष्यात, आपल्या नुसत्या उपस्थितीने सगळे स्तब्ध झाले पाहिजे, भारावले पाहिजे, एखादं काम हातात घेतलं की भराभर पूर्ण करता आले पाहिजे, समर नुसता उपस्थित असला तरी सुद्धा सगळे व्यवस्थित वागतात ",....


बाबा कौतुकाने सगळ्यांचं बोलणं ऐकत होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं


वीणा आत आवरायला गेली,.... वहिनी मागे आली


"सांगा ना ताई काय बोलण झाल आज ",...... वहिनी


"चूप ग वहिनी नको त्रास देवू",....... वीणा


"कुठे गेले होते तुम्ही, काय काय झालं",....... वहिनी


"वहिनी.... जा ग दादा वाट बघतो आहे",..... वीणा


"चेहेरा एकदम लाल झाला आहे तुमचा, सांगा ना",.... वहिनी


"वहिनी मी हो बोलले समरला",...... वीणा


म्हणजे ताई.....


" अगं वहिनी समरने मला लग्नाबद्दल विचारलं आणि मी होकार दिला ",...... वीणा


" काय सांगताय काय ताई, प्रकरण बरच पुढे गेलेले दिसतंय, मला वाटलं घरी येतात की नाही आज, की डायरेक्ट सासरी ",.…..... वहिनी


"काहीही काय ग वहिनी",....... वीणा हसत होती, मुद्दाम लटका राग दाखवत होती, पण खरंतर वीणाला हे सगळं चिडवलेलं आवडत होतं


वीणाने अंगठी दाखवली, अतिशय सुंदर अंगठी खूप छान चमकत होती


" साखरपुडा झाला की काय ताई, किती छान अंगठी आहे , महाग वाटते आहे",....... वहिनी


"हळू वहिनी किती जोरात बोलतेस",....... वीणा


"दिसणार आहे सगळ्यांना हातातली अंगठी, लपवून उपयोग नाही, काय सुंदर दिसते आहे तुम्हाला, अजून काय बोलण झाल",....... वहिनी


आई ही आत आली......


"आवडला का समरचा स्वभाव आई, कसा वाटतोय ग समर",...... वीणा


"छान आहे समर",..... आई


" आई ताईं खुश आहेत ना, त्यांच्या हात बघा",...... वहिनी


" काय ग काय झालं हाताला ",...... आई


" आई ताईंनी होकार दिला...... अंगठी बघा",...... वहिनी


आई बाबा दादा प्रकाश कौतुकाने अंगठी बघत होते


" आई बाबा मी ठीक केल ना",....... वीणा


" हो बेटा तुझी चॉईस चांगली आहे ",....... बाबा


आईच्या डोळ्यात पाणी होत, बाबा इमोशनल झाले होते


वीणाने वहिनी दादाला मिठी मारली, प्रकाश येवून भेटला त्यांना


सगळे खूप खुश होते
......

सकाळी 6 चा गजर झाला, एका हाताने मोबाईल चाचपडत निशाने अलार्म बंद केला, सुरेख लांब केस तिने एकसारखे केले, सिल्क चा गावुन छान शोभत होता तिला, असच आरामात लोळत पडाव अस वाटत होत तिला, उठायचा कंटाळा आला होता, पण आज खूप कामे होती, उठावच लागेल, निशा उठली अर्धा तास योगा केला, स्वतः च आवरून खाली आली


निशा अधिकारी.....


अधिकारी ग्रुपची एकुलती एक वारस, अतिशय सुंदर... उंच.. कॉन्फिडन्ट कामात वाघ, नेहमी वेस्टन क्लोथ मध्ये निशा वावरायची, परदेशात शिक्षण झालेली निशा एकदम बोल्ड होती, उच्च शिक्षित होती ती , ऑफिस च काम एका हाती नीट हँडल करायची, कॉन्फिडन होती एकदम, ऑफिसमध्ये तिच्यासमोर कोणाला काही बोलायची बिशाद नव्हती, ठरलं म्हणजे ठरलं, अतिशय लाडात वाढलेले निशा आई वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती, वडिलांची लाडकी निशा, ती जे सांगेन ते समोर हजर करायचे तिचे डॅडी


अधिकारी यांच्या बंगल्यात आज सकाळ पासून कामाची गडबड सुरू होती, आज नवीन फॅक्टरी युनिट च उद्घाटन त्यासाठी सगळे बिझी होते होते,


अधिकारी कुटुंबाचा कारभार मोठा होता, आलिशान घर, समोर मोठ गार्डन, महागड्या गाड्या, नौकर चाकर आजुबाजूला, कुठल्याही गोष्टीची कमी नाही, सिक्युरिटी गार्ड, मॅनेजर सगळ कस व्यवस्थित


काही लोक घराची सजावट करत होते, काही लोकं गार्डनमध्ये काम करत होते, संध्याकाळच्या पार्टीसाठी लागणार टेबल खुर्च्या कोणी रचून घेत होते, अतिशय सुंदर फुलांच्या सजावटीच कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलं होत, तेच काम सुरू होता आत्ता, कुठल्याही गोष्टीची कमी राहता कामा नये असं सांगण्यात आलं होतं


अधिकारी साहेब स्वतः देखरेख करत होते, ते उपस्थित असल्याने एक वेगळच दडपण वातावरणात होत, सगळं काम व्यवस्थित झालं की नाही ते बघत होते, उद्घाटनानंतर घरी बंगल्यावरची मोठी पार्टी होती, कसलीच कमी नको पडायला हाच उद्देश होता त्यांचा

"चला चहा नाष्टा करून घ्या",..... मिसेस अधिकारी बोलवत होत्या


"निशा कुठे आहे? निशा रेडी झाली का" ?........ डॅडी


"हो डॅडी मी रेडी आहे",..... निशा


फॉर्मल पॅन्ट त्यावर व्हाईट टॉप मोकळे सोडलेले केस अतिशय सुंदर दिसत होती निशा


अधिकारी कुटुंब नाश्त्याला बसले


" झाली का डॅडी संध्याकाळच्या प्रोग्राम ची तयारी",...... निशा


" हो पूर्ण झाली आहे तू एकदा बघून घे",...... डॅडी


" तुम्ही बघितली ना, मग काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कामात एकदम परफेक्ट आहात, मला ऑफिसला जावं लागेल, दोन तास महत्त्वाचं काम आहे",........ निशा


" अगं आज तरी घरी थांब, तुझा ड्रेस वगैरे सिलेक्ट झाला आहे का" ?,..... मम्मी

" संध्याकाळसाठी तूच सिलेक्ट कर ड्रेस मम्मी, तू म्हणशील तस तयार होईल मी ",..... निशा


" लवकर ये पण ऑफिस हून घरी पार्लर वाली येणार आहे",..... मम्मी


" हो येते दोन तासात",...... निशा


निशा ऑफिस ला निघून गेली


" संध्याकाळचे आमंत्रण गेले आहेत ना सगळ्यांना ",...... अधिकारी


" हो सांगितलं आहे ",...... मॅडम....... " तुम्ही निशाशी बोलले की नाही अजून ",


" मी काही बोललो नाही तिच्याशी, कसा काय विषयी काढणार, आज संध्याकाळी भेट होईल तसं तिची कार्यक्रमात परांजपे फॅमिलीशी, कार्यक्रमानंतर मी बोलेल परांजपे साहेबांशी",......... अधिकारी साहेब


" चालेल पण उशीर करू नका मुलगा खूप चांगला आहे",.... मॅडम


" तू निशाला विचारलं का तिच्या आयुष्यात कोणी आहे का",....... अधिकारी साहेब


" हो विचारलं, तिने सगळा निर्णय आपल्यावर सोडला आहे",...... मॅडम


अधिकारी जोडी निशा च्या लग्नाच्या सुंदर स्वप्ना हरवून गेली..............

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now