Aug 18, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी....❤️भाग 19

Read Later
प्रित तुझी माझी....❤️भाग 19

 

 

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........    

 

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार..... 

 

©️®️शिल्पा सुतार. 

.......  

 

 

 

प्रकाश घरी आला, आनंदाने सांगायला लागला की त्याचा उद्या इंटरव्यू आहे, महेश इंजिनिअरिंग या कंपनीतुन कॉल आला होता, मला अस वाटतय काम होवुन जाईल या वेळी, दादाला खूप आनंद झाला, होता तो डिटेल्स विचारत होता ...... 

 

 

वीणा ला कळून चुकलं होतं की हे बहुतेक समरच काम आहे, कारण एवढे दिवस प्रकाश प्रयत्न करत होता तरी कोणीही इंटरव्ह्यूला बोलवत नव्हतं, कि साधा त्याचा प्रोजेक्ट ही कोणी बघत नव्हतं

 

 

प्रकाशने आवरून डॉक्युमेंट शोधले आणि तो लगेच तयारीला लागला, सगळे प्रकाश कडे कौतुकाने बघत होते, 

 

 

"कोणीच आवाज करू नका ग आता, प्रकाशला अभ्यास करू द्या",...... आई

 

 

"रमेश आहे का घरात"?,....... बाजूच्या रुमचे मालक आले होते चावी घेऊन, त्यांनी चावी रमेश दादाकडे दिली, सगळे खूप आनंदी होते, 

 

 

"चला आपण ती रूम बघून येऊ",....... दादा 

 

 

दादा, वहिनी, अभी, आरु, आई, वीणा सगळे नवीन रूम बघायला गेले 

 

 

" मी नंतर येईन दादा रूम बघायला मला जरा काम आहे ",....... प्रकाश 

 

 

"हो चालेल प्रकाश, तू तुझ्या उद्याच्या इंटरव्यू वर कॉन्सन्ट्रेट कर, आम्ही जातो म्हणजे तुला थोडा वेळ मिळेल अभ्यासाला ",........ दादा 

 

 

रूम खूप छान होती, स्वच्छ वाटत होती, मोकळी होती, आईला वीणा ला रूम खूप आवडली, अभी आरू तर नुसते इकडून तिकडून पळत होते, 

 

 

"सामान आलं की लगेच लावून घेऊ आपण सगळं",........ दादा आणि वहिनी सगळे ठरवत होते 

 

 

आई त्यांच्याकडे कौतुकाने बघत होती, वीणा अभी अरुला सांभाळत होती, नवीन गादी कपाट वगैरे सामान आलं तेवढ्यात, ते डायरेक या रूममध्ये उतरवून घेतलं, शेजारची रूम होती हे बरं झालं, खूप ये-जा करावी लागणार नाही, तेवढ्यात बाबा आलेच, त्यांनाही रुम बघितली 

 

 

"हे काम खूप छान झाल ह रमेश रूम आवडली मला",..... बाबा 

 

 

दादाला समाधान वाटत होत, सगळ आई बाबांन मुळे होतय, किती सपोर्ट आहे त्यांच्या 

 

 

सगळे घरी वापस आले, स्वयंपाक झाला 

 

 

" आत्या तुझ्या फोनवर कोणाचा तरी फोन येतो आहे",....... अभी सांगत होता 

 

 

वीणाने उठून बघितलं तर अनोळखी नंबर होता, एवढ्यात मेसेज आलाच 

 

 

हाय वीणा मी समर ....... 

 

 

विणाला समजत नव्हतं की काय कराव? परत फोन करून बघावा का? तेवढ्यात परत फोन आलाच, ती फोन घेऊन बाहेर गेली, फोन उचलला, तिचे हात थरथर कापत होते.... 

 

 

"हॅलो विणा ऐकतेस ना", ....... समर 

 

 

"हो बोला समर", ....... वीणा 

 

 

"सॉरी मी तुला न विचारता तुझ्या फोनवर फोन केला", ...... समर 

 

 

"काही हरकत नाही ",..... काय बोलाव हे वीणा ला सुचत नव्हत...... 

 

 

"कसा गेला आजचा दिवस",....... समर 

 

 

"चांगला गेला मशीनच्या डिलिव्हरी होणार आहे त्याबद्दलच काम झालं, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे समर",...... वीणा 

 

 

" बोल ना वीणा",...... समर 

 

 

"थँक यु व्हेरी मच, तुमची खूप मदत झाली",..... वीणा 

 

 

"कशाबद्दल, मला समजल नाही ",....... समर 

 

 

" रमेश दादा आणि प्रकाश यांचं ऑफिसमधलं काम व्यवस्थित झालं, दादाला त्याचा पगार मिळाला, प्रकाशचा ही उद्या इंटरव्यू आहे ",....... वीणा 

 

 

"हे दोघं तुझे भाऊ आहेत का? मला माहिती नाही ",..... समर 

 

 

" मला माहिती आहे हे काम तुम्हीच केलं आहे, खूप थँक्यू",....... वीणा 

 

 

समर काही बोलला नाही....... 

 

 

" उद्या भेटशील का वीणा मला, लक्ष्यात आहे ना मी तुला दोन दिवस दिले आहेत विचार करायला ",........ समर 

 

 

वीणाला इकडे काय बोलाव सुचत नव्हत..... 

 

 

" बोल ना वीणा काही तरी, मला अस घाबरवु नको, मला माहिती आहे की आपल्याला भेटून जास्त दिवस नाही झाले, पण मला तुझ्याबद्दल खूप आपुलकी आणि प्रेम वाटत आहे, हे माझं पहिलं प्रेम आहे वीणा आणि मी आता स्पष्टच सांगतो की ते मी मिळवणारच, तुझ्या मनात काय आहे ते मोकळं बोलना, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी व्यवस्थित देईल, पण प्लीज माझ्याबद्दल विचार कर ",........ समर 

 

 

वीणाला वाटत होतं की आत्ताच्या आत्ता बोलावं की माझा होकार आहे, तूच माझा आधार आहेस, मला तुझ्या सोबत रहायच आहे, पण ती तसं बोलली नाही, समर काय बोलतो आहे ते सगळं ऐकून घेत होती, त्याचा एक न ऐक शब्द तिच्या कानात हृदयात जागा करत होता, आपल्यासाठी कोणीतरी आहे जो आपल्यावर खूप प्रेम करत आहे, ज्याला आपण हव आहोत ही भावना खूप छान आहे...... 

 

 

"मी उद्या येते भेटायला, तेव्हा बोलू आपण" ,......... वीणा हिम्मत करून बोलली

 

 

समोरच्या चेहऱ्यावर हास्य होते, त्याला खात्री होती की वीणा होच बोलेल....... चला उद्या ची तयारी करावी लागेल 

 

 

"हो भेटू या संध्याकाळी ऑफिस नंतर वीणा........ मी उद्या संध्याकाळी ची वाट बघेन",......... समर

 

 

चालेल......... 

 

 

रात्री जेवणातही प्रकाश लक्ष नव्हतं... 

 

 

"काय चालला आहे प्रकाश तुझं"?,...... बाबा विचारात होते 

 

 

"बाबा माझा उद्या इंटरव्यू आहे, त्याची तयारी सुरू आहे, मेन म्हणजे हा इंटरव्यू माझ्या प्रोजेक्टसाठी आहे, हे काम झालं ना तर खूप चांगलं होईल, मी त्यांच्या कंपनीत हे प्रोजेक्ट लॉन्च करेल, त्या कंपनीला ही त्याचा फायदा मिळेल आणि एक पेटंट माझ्या नावावर येईल",....... प्रकाश एक्साईटेड होता किती माहिती देऊ आणि किती नाही असे त्याला होत होतं

 

 

" पण ते लोकं तयार आहेत का खर्च करायला"?,........ बाबांचेही बरोबर होतं कोण कशाला आपल्या प्रोजेक्टसाठी एवढा खर्च करेल

 

 

" हो बाबा ते लोकं तयार आहेत, हेच बोलायच आहे उद्या जाऊन, ते लोक बघतील त्यांना या प्रोजेक्टचा काय फायदा होईल, त्यांना योग्य वाटलं तरच ते स्पॉन्सरशिप देतील ",...... प्रकाश 

 

 

"होऊन जाईल काम तुझं तू कॉन्फिडन्ट वाटतो आहेस",.... बाबा कौतुकाने प्रकाश कडे बघत होते, खूपच हुशार झाला आहे सध्या प्रकाश एक वेगळेच तेज त्याच्या चेहऱ्यावर आला आहे, आता त्याला कुणीही थांबवू शकत नाही

..............

 

समर सोफ्यावर बसून ऑफिसच्या काम करत होता 

 

 

"काय करतोस समर "?,........आजी विचारत होती,...." भेटली का वीणा आज"? , 

 

 

"नाही आजी आज बिझी होतो जरा, सोहा आणि आशिष ऑफिस मध्ये आले होते मम्मी-पप्पांना भेटायला",.... समर 

 

 

" झाली का भेट मग? काय बोलणं झालं? कसा आहे आशिष? ",........ आजी

 

 

" खूप छान आहे आशिष, एकदम समजूतदार आहे, ते सगळे येणार आहेत दोन-तीन दिवसात आपल्या घरी भेटायला",........ समर 

 

 

"बरं झालं, तू काय ठरवलं आहेस तुझ",...... आजी 

 

 

"मी उद्या वीणा ला भेटणार आहे आजी, आत्ताच फोन केला होता तिला ",......... समर 

 

 

" तुझ्या मम्मी शी कधी बोलणार आहेस तू वीणा बद्दल",.......... आजी 

 

 

" ते अजून ठरवलं नाही आजी, तू सांग काय करू मी",....... समर 

 

 

"लवकरात लवकर सांगून टाक मम्मी-पप्पांना, बाहेरून कळल तर चांगल नाही वाटणार ",...... आजी 

 

 

" हो तसंच करावं लागेल आजी",..... समर लाजत होता....... आजी हसत होती

 

....... 

दुसर्‍या दिवशी.... समर आवरून नाश्त्याच्या टेबलवर आला, मम्मी पप्पा नाश्ता करत होते, 

 

 

"उद्या आपल्याला मिस्टर अधिकारी यांच्या कडे कार्यक्रमाला जायचं आहे लक्षात आहे ना",...... पप्पा 

 

 

"हो पप्पा लक्षात आहे किती वाजता जायचं आहे",........ समर 

 

 

"संध्याकाळी चार वाजता निघू आपण, सोहाला ही सांगून ठेव",........ पप्पा 

 

 

"पप्पा आज साई इंटरप्राईजेस हुन मशीन इकडे येणार आहेत, मशीन फिक्स करून पुढच्या आठवड्यात काम सुरू होईल",..........समर

 

 

"बरं होऊन जाईल ,कारण पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला ऑर्डरच काम सुरू करावे लागेल, फॉरेनला मिटिंग फिक्स झाली का "?,........ पप्पा 

 

 

" सोमवारी आहे ती मी मीटिंग, पप्पा तुम्ही जॉईन करणार का ती मीटिंग ",........ समर 

 

 

" हो येईन मी मीटिंगला",....... पप्पा 

 

 

वीणा आवरून ऑफिसला आली, मशीनच्या डिलिव्हरी साठी प्रशांत ची धावपळ होत होती 

 

 

"आज लवकर आलास का तू प्रशांत ऑफिस मध्ये",.......वीणा 

 

 

"हो आज मशीन शिफ्ट करायचे आहेत ना परांजपे अंड कंपनीत म्हणून लवकर आलो",........ प्रशांत 

 

 

प्रीती आलीस तेवढ्यात ऑफिसला...... घाई घाईने टेबल कडे गेली कामाला ही लागली 

 

 

"प्रीती कसली एवढी धावपळ",....... वीणा 

 

 

"सरांचा फोन आला होता, बिल तयार करायचे आहेत, मशीन ची डिलिव्हरी आहे ना आज ",....... प्रिति 

 

 

" Ok मला सांग काही काम असेल तर",........ वीणा 

 

 

"तुला पुढच् काम आहे, ट्रेनिंग वगैरे, सासरी जाव लागल त्या साठी" ,....... प्रीती हसत होती,......." बर मी हे काम संपवते मग बोलू",......... 

 

 

" ठीक आहे",..... वीणा ही हसत होती 

 

 

प्रीतीच काम झाल..... 

 

 

"झाली का खरेदी वहिनी सोबत काल ",.... प्रिति 

 

 

"हो खूप मजा आली आमची, खूप छान रूम मिळाली आहे, बाजूची हवेशीर आहे रूम, त्याच दोघांसाठी सामान घ्यायला गेलो होतो आम्ही मी आणि वहिनी ",..... वीणा 

 

 

"अरे वा मग वहिनी खुश असेल एकदम",...... प्रिति 

 

 

"हो मग काय", ........ वीणा 

 

 

" तुझ झाल का काही बोलणं घरी वीणा",........ प्रिति 

 

 

" मला वहिनी बोलत होती की लग्नानंतर कुठल्याही घरी ऍडजेस्ट व्हायला वेळच लागतो, गरीब असो की श्रीमंत थोडा फरक पडतोच, तर मग आवडत्या मुलाशी लग्न करायला काय हरकत आहे",....... वीणा 

 

 

" बरोबर बोलते आहे वहिनी वीणा, झालं का काल काही बोलणं समर शी",....... प्रिति 

 

 

" काल तर मी शॉपिंग ला गेलेली तुला माहिती आहे ना",........ वीणा 

 

 

" पण काय सांगावं शॉपिंग सेंटरला जर समर आला तुझ्या मागे तर ",........ प्रीती उगाच चिडवत होती 

 

 

"नाही तो नव्हता आला शॉपिंग च्या इथे पण संध्याकाळी त्याचा फोन आला होता ",...... वीणा 

 

 

"मग हे कधी सांगणार, अरे वा फोन कॉल सुरू झाले वाटत, काय बोलला समर",....... प्रिति 

 

 

" आज संध्याकाळी आम्ही भेटणार आहोत ",....... वीणा 

 

 

" ओ हो मीटिंग सुरू झाल्या वाटतं, काय म्हटला समर ते तर सांग ",........ प्रिति 

 

 

" मी त्याच्याशी व्यवस्थित बोलले त्याला थँक्यू बोलली दादा आणि प्रकाश च काम त्यानेच केलं तर",........ वीणा 

 

 

"आता कौतुक सुरु झाला वाटतं, साहेबांच",...... प्रिति 

 

 

सर आले कामाला सुरुवात झाली...... 

 

 

समर ऑफिस ला आला मिस्टर दीक्षित केबिनमध्ये आले 

 

 

"निघाली का मशीन तिकडंन",...... समर 

 

 

" हो आता जरा वेळात निघतील, उद्या वगैरे फिक्स होतील मशीन",...... दीक्षित 

 

 

"सोमवार पासून ट्रेनिंग सुरू करू आपण ",..... समर 

 

 

हो चालेल....... 

 

 

ऑफिस सुटल्यावर वीणा प्रीती घरी निघाली, आज दिवस भर समर चा फोन नाही, त्याला लक्ष्यात आहे ना की आपला भेटायच ठरल होत ते 

 

 

"समर येणार होता ना आज संध्याकाळी",....... प्रिति 

 

 

"हो ना बहुतेक बिझी असेल तो ",....... वीणा 

 

 

" असा कसा बिझी झाला अचानक, फोन करून बघ",........ प्रिति 

 

 

"नको जाऊ दे",...... वीणा 

 

 

वीणाला समर चा खुप राग आला होता, आज पहिल्यांदा तिला वाटत होतं की समरने याव भेटायला, तर तो कुठे आहे माहिती नाही, प्रीती म्हणते तस फोन करून बघू का? नको कश्याला, काय झालं असेल, काय करू मी समजत नाही, अस कस करू शकतो समर, काय कराव जाव का घरी

 

 

विचार करत वीणा घरी आली,...... "काय ग आज तू बाहेर जाणार होतीस ना वीणा, लवकर कशी आलीस, समर आला नाही का? ",...... आई विचारात होती 

 

 

"हो ना आई, का आला नाही तो माहिती नाही ",...... वीणा 

 

 

वीणाच सगळ लक्ष फोन कडे होत, दादा आला घरी चहा झाला 

 

 

वीणा चा फोन वाजला..... समर चा नाव बघून वीणाला आनंद झाला 

 

 

"हाय वीणा, मी महत्त्वाच्या कामात थोडा बिझी होतो म्हणून तुझ ऑफिस सुटलं तेव्हा तिकडे आलो नाही, दहा मिनिटात तुझ्या घराजवळ येतो आहे मी, तू रेडी होऊन बाहेर ये, आपण डिनरला जाणार आहोत",...... समर 

 

 

खरं तर मनातन वीणाला खूप आनंद झाला होता, पण तसं न दाखवता ती बोलली,......" मला जमणार नाही आता, इतक्या उशिरा मी बाहेर येणार नाही", 

 

 

" तुझा राग समजू शकतो मी वीणा, पण प्लीज ट्राय कर, मला तुझ्या सोबत वेळ घालवायचा आहे, मी यायला हव होत संध्याकाळी, प्लीज ये वीणा",......... समर विनवणी करत होता 

 

 

" ठीक आहे, मी येते पण डिनर वगैरे नको, 10 मिनट भेटू आपण ",....... वीणा 

 

 

समरने फोन ठेवला 

 

 

"काय ग कोणाचा फोन होता",.... आई विचारत होती 

 

 

" आई समर चा फोन होता, तो म्हणतो आहे जेवायला बाहेर जाऊया, तर मी जाऊ का बाहेर ",....... वीणा 

 

 

"हो जा की, एक काम कर वीणा नवीन ड्रेस घालून जा",...... आई 

 

 

" काहीही काय तुझ आई, नवीन ड्रेस कशाला हवा आहे आत्ता",......... वीणा 

 

 

वहिनी आली,..... "हो ताई चांगला नवीन ड्रेस घालून जा, तो गुलाबी खूप छान दिसतो तुम्हाला ", 

 

 

वहिनी तु ही काय ग....... 

 

 

हो नाही करता करता वीणा ने गुलाबी ड्रेस घातला, सुरेख लांब केस मोकळे सोडले, हलकासा मेकअप केला, अतिशय सुरेख दिसत होती ती, तिची हृदयाची धडधड वाढली होती, कुठे जायचं आहे आम्हाला आणि मी काय बोलणार आहे समर शी, आज दोन दिवसाची मुदतही संपते आहे, तो नक्कीच विचारणार हो की नाही, मी कसं बोलणार आहे त्याच्याशी...... 

 

 

"अरे वा एवढी तयारी करुन कुठे चालली आहेस तू विणा",.... दादा मुद्दाम चिडवत होता 

 

 

"चूप रे दादा, मी म्हणत होती ना वहिनी हा ड्रेस जास्त वाटतोय, बदलून येवू का? ",..... वीणा 

 

 

"नाही हो ताई तुम्ही त्यांचा ऐकू नका, छान दिसता आहात",...... वहिनी 

 

 

"लवकर ये वीणा",..... आई कौतुकाने बघत होती 

 

 

" आई बाबा आले नाही का अजून? त्यांना सांगितलं नाही मी बाहेर जाते ते ",....... वीणा 

 

 

" मी सांगून देईन बाबांना. तु जा",...... आई 

 

 

ठीक आहे.... 

 

 

वीणा घरातुन निघाली कोपऱ्यापर्यंत गेली असेल तेवढ्यात बाबा भेटले 

 

 

" कुठे चालली आहेस विणा, छान दिसते आहेस आज",...... बाबा 

 

 

" बाबा समर येतो आहे आत्ता मला भेटायला, आम्ही दोघे जेवायला बाहेर जातो आहोत ",...... वीणा 

 

 

" चालेल जाऊन या, लवकर ये घरी" ,...... बाबा 

 

 

"तुम्ही चला ना बाबा मेन रोड पर्यंत, तुमची ओळख करून देते समरशी ",..... वीणा 

 

 

" चालेल चल........ बघू तरी समर परांजपे कसे आहेत",..... बाबा 

 

 

बाबा काय हे दोघ हसत होते 

 

 

बाबा आणि वीणा मेन रोड वर गेले, पाच मिनिटातच समरची गाडी आली समोरून, बाबांना बघून समर गडबडून गेला, पुढे जाऊन बाजूला त्याने गाडी पार्क केली, धावतच तो विणा आणि बाबांना भेटायला आला, आल्या आल्या त्याने बाबांच्या पाया पडल्या, 

 

 

वीणा ने ओळख करून दिली,...... "समर हे माझे बाबा,...... बाबा हे आहेत समर परांजपे" ,  

 

 

बाबा समर कडे कौतुकाने बघत होते,......" जवळच आमचं घर आहे, चला जरा वेळ घरी ", 

 

 

"तुमच्या घरी यायचं आहे पण आता नको मी व्यवस्थित सांगून येईन, आता जरा घाईत आहे ",....... समर 

 

 

"हो आता तुम्हाला बाहेर जायचं आहे ना दोघांना",...... बाबा 

 

 

"तसं काही नाही बाबा",......... समर 

 

 

" जा जाऊन या लवकर या आणि लवकर या घरी",..... बाबा 

 

 

एक मिनिट बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे,........ "तुम्ही खूप छान आहात बाबा, आज मी तुम्हाला पहिल्यांदा भेटतो आहे, पण असं वाटत आहे की खूप जुनी ओळख आहे आपली, खूप आपुलकी वाटली तुम्हाला भेटून, मी वीणाला घेऊन जातो आहे डिनर साठी, मी घरी सोडून देईल तिला, तुम्ही काळजी करू नका", 

 

 

"काळजी कसली, वीणा तुमच्यासोबत आहे, यातच सगळं आलं आणि मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला ",...... बाबा 

 

 

" हो ना बाबा मग मला अहो बोलू नका मला फक्त समर म्हणा तेच आपुलकीचं वाटतं ",....... समर 

 

 

वीणा बघत होती माझ्या आयुष्यातले हे दोघ महत्वाचे पुरुष किती लवकर कम्फर्टेबल झाले एकमेकांसोबत, जसे काही खूप जुनी ओळख आहे, बाबा आनंदी आहेत म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, त्यांना माणसांची खूप छान पारख आहे, 

 

 

अगदी पाच मिनिट भेटले बाबा आणि समर पण किती गप्पा झाल्या त्यांच्यात, बाबांच्या चेहऱ्यावर समाधान वाटत होते, खूप चांगला शांत आणि समजूतदार मुलगा आहे समर याची त्यांना खात्री पटली, मीना गाडीत बसली आणि ते दोघे डिनर डेट साठी निघाले

....... 

 

पुढच्या भागात........ काय असेल वीणाच्या मनात ती होकार देईल का? , समर च्या मनाप्रमाणे होईल का?, 

 

वीणा..... समर ची पहिली डिनर डेट....... ❤️

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now