ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........
सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....
©️®️शिल्पा सुतार.
.......
लंच ब्रेक मध्ये, प्रीती डबा घेऊन वीणा जवळ गेली, वीणा तिची वाट बघत होती खर तर,........
"आज डब्यात चांगले पदार्थ दिसता आहेत बहुतेक, म्हणूनच एकटी एकटी डबा खाते आहे वाटतं" ,......प्रिति
तसं वीणाला हसायला आलं.....
" आता कशाला बोलते आहेस माझ्याशी? जेव्हा मी बोलली माझ्यासोबत थांब तेव्हा तू निघून गेली",..... वीणा
"मी सांगितल ना मला कबाब मे हड्डी बनायचं नव्हतं",....... प्रिति
"आमचा अजून कबाब तयार झालेला नाहीये मॅडम",....... वीणा
"हो बरं झालं आठवलं, काय बोलणं झालं काल समर सरांशी "?,...... प्रिति
" तू तर काही विचारूच नको प्रीती, गद्दार पार्टी आहेस तू",....... वीणा
तशी प्रीती हसत होती,......." सांग ना वीणा ",
"आम्ही बर्याच वेळ सोबत होतो, मी त्याला सांगितल आपली मॅच होणार नाही, समर ऐकायला तयार नाही , मला दोन दिवसाची वेळ दिली आहे, तो बोलतो सगळ सोडून फक्त माझा विचार कर ",...... वीणा
" म्हणजे काय", ....... प्रिति
"मला दोन दिवसात त्याला होकार किंवा नकार द्यायचा आहे ",........ वीणा
" कुठे गेले होते तुम्ही",....... प्रिति
" कुठेच नाही गं, कॉफी घेतली, समरने मला घरी सोडले",....... वीणा
" मग कुठे बोलण झालं एवढं ",....... प्रिति
"गाडीतच बोललो आम्ही, आणि मी दादा वहिनी आणि प्रकाशला सगळं सांगितलं समर बद्दल, त्यांना खूप आनंद झाला",......... वीणा
" बघ म्हटली होती ना मी, तू समर चा पॉझिटिव्ह विचार कर, चांगलं होईल, तू अजिबात काळजी करू नको आणि गरीब श्रीमंत मनात आणू नको, थोड्या दिवसात कळेल तुला ते लोक कसे आहेत? चिंता करू नको, मेन म्हणजे समर तुझ्या साईडने आहे ",....... प्रिति
" तुला माहिती आहे का प्रीती दादाचा ऑफिस मधला प्रॉब्लेम झाला होता ना, तो प्रॉब्लेम समरने ठीक केला ",....... वीणा
" काय बोलतेस काय, कसा काय", ?........ प्रिति
" अग दादाला राहिलेला पूर्ण पेमेंट मिळाला, अजून जास्तीचं कामही मिळालं, किती खुश होते काल दादा वहिनी, मागचे काही दिवस खूप टेंशन होत ग त्यांच्यात, समरने दादाच्या ऑफिसमध्ये फोन करून पेमेंट सुरळीत द्यायला सांगितल, जास्तीच काम ही मिळाल, समर मुळे नीट झाल सगळ ",........ वीणा
"बघ म्हणजे समर तुझा विचार करतो आहे आणि त्याने बोलल्याप्रमाणे तुझ्या फॅमिली ची पण काळजी घेत आहे, त्याला पण त्याला कसं माहिती दादा बद्दल"?,...... प्रिति
" केली असेल त्यांनी चौकशी कुठेतरी माझ्याबद्दल, मला तर खरंच खूपच चांगलं वाटत आहे, वहिनी आणि दादा ची काळजी मिटली ग, समरने केली मदत ",...... वीणा
" हो हो,.... किती ते कौतुक ग, मी तुला बोलले होते समर खूप चांगला आहे, त्याचा पॉझिटिव्ह विचार कर",....... प्रिति
" हो करते आहे मग मी विचार, प्रीती सांग ना ...... हो बोलू का त्याला? पण पुढे काहीच माहिती नाही? समर ने त्याच्या घरी आई-वडिलांना माझ्याबद्दल सांगितलं आहे की नाही "?,....... वीणा
" तो त्याचा प्रश्न आहे, तू सगळ्याच बाजूची चिंता करू नको ",...... प्रिति
"हो तेही बरोबर आहे",....... वीणा
" तुला काय वाटतय ते महत्वाचे आहे, तू तुझ्या घरी सांगितल ना, तुझ्या बाजूने तू बरोबर केलस",...... प्रिति
" ऐक आहे प्रीती, मला राहुल बरोबर अस छान कधीच वाटलं नाही, समर सोबत असला की मला कसलीच चिंता नसते, तो सगळ सांभाळून घेतो, मला ही समजून घेतो तो खूप, असंच असेल का ग आमचं पुढच आयुष? मला विश्वास बसत नाहीये",......... वीणा
" हो चांगले लोक सोबत असले की चांगलच वाटतं, तू मनापासून त्याला आपला मानल, आता मागे फिरू नको",....... प्रिति
" I am sorry प्रीती, उगीच चिडली मी तुझ्यावर", ....... वीणा
" चल नौटंकी पुरे आता don\"t worry",....... प्रिति
"दोन दिवस थांबणार आहे का? की आज सांगणार समरला, घाई झालेली दिसते एका मुलीला",........ प्रिति चिडवत होती
तस वीणा प्रीती वर चिडली,..... "चूप ग प्रीती तुला ना काही सांगायला नको खरं, तुझं काय ठरलं पुढे मॅडम ",
"आम्ही जाणार आहोत उद्या त्यांच्या घरी, बहुतेक तिकडे बोलणी होतील लग्ना बद्दल ",........ प्रिति
" मज्जा आहे बाबा तुझी, पण चांगला वाटतोय सचिन ",....... वीणा
"हो ना वीणा, काल आला होता सचिन चा फोन चांगला बोलला तो माझ्याशी",....... प्रिति
" काल फोन आला होता? आणि तू मला सांगितलं नाही"?,...... वीणा रागात आहे अस दाखवत होती
" पागल त्यासाठीच तुला फोन करत होती मी, पण तू एवढी चिडलेली होती, मी तेच बघणार होती की तुझं काय बोलणं झालं आणि माझं काय बोलणं झालं ते तुला सांगणार होती, किती बोलायचा होत माहिती आहे तुझ्याशी, ऐ तू अस माझ्या वर रागवत जाऊ नको वीणा ",...... प्रिति
"नाही या पुढे नाही चिडणार ",.... वीणा
हसत हसत दोघी कामाला लागल्या.....
सोहा ने आशिष ला फोन केला,.......... "तुला आज मम्मी-पप्पांना ऑफिस मध्ये चार वाजता भेटायचं आहे",
आशिष गडबडून गेला,...... "तू प्लीज माझ्यासोबत चल ना सोहा",
"नाही मम्मी-पप्पांनी नाही सांगितला आहे मला, तुला एकट्यालाच बोलवलं आहे, समर दादा असेल तिथे पण तोही तुझ्या सोबत मम्मी पप्पांचे इथे येईल की नाही माहिती नाही, मी कॉलेजमध्ये असेल, त्या नंतर भेटू आपण",........... सोहा
"मी काय बोलणार आहे त्यांच्याशी? , सोहा तू प्लीज तुझ्या मम्मीला विचारून तिथे हजर राहणार का जरावेळ? प्लीज मला सपोर्ट कर",......... आशिष घाबरून गेला होता
" ठीक आहे, मी बघते मम्मीला विचारून, तू काळजी करू नको आणि मम्मी पप्पाच आहे माझे ते, एवढं कसलं टेन्शन घेतो आहेस",....... सोहा
" परीक्षा परवडली मला टेन्शन आल आहे ग ",...…. आशिष आणि सोहा हसत होते
सोहाने मम्मीला फोन लावला.........
"मम्मी आज तू भेटणार आहे का आशिष ला",...... सोहा
" हो आज भेटणार आहोत आम्ही",........ मम्मी
" मी येऊ का ऑफिसला ",......... सोहा
"तुझं काय काम आहे",....... मम्मी
" अगं आशिष नर्वस होतो आहे, तो कधीच तुम्हा लोकांना भेटला नाही, मी येते जरा इंट्रोडक्शन वगैरे करून देते मग वाटलं तर मी बाजूला जाऊन बसेन, मग तुम्हाला काय वाटलं ते बोला",........ सोहा
"अग तसं काही विशेष बोलायचं नाही ग फक्त बघायचा आहे आशिष ला, त्याच्याशी बोलायचा आहे, तस त्याच्या घरच्यांना बोलवायचा आहे आपल्या कडे, त्या आधी आशिष कसा आहे हे बघायच होत, ठीक आहे तू पण ये, तुझे क्लासेस नाहीत ना पण ",....... मम्मी
" नाही मी करते मॅनेज",....... सोहा
सोहाने आशिष ला फोन लावला,...... " मी येते आहे तुझ्यासोबत, तू काळजी करू नको" ,
आशिष ला आता बरं वाटत होतं, माहिती नाही काय बोलण होईल तिकडे, काही तयारी करू का, जे होईल ते होईल आता, omg I am nervous
मिस्टर दीक्षित आत आले समर कामात बिझी होता
"सर साई इंटरप्राईजेस मधुन फोन आला होता, मशीनची डिलिव्हरी फिक्स झाली आहे, उद्या ते लोक मशीन पाठवतील या आठवड्यात मशीन फिक्स होईल",...... मिस्टर दीक्षित
"चांगलं झालं, चला पुढे कळवून द्या तसं, नंतर ट्रेनिंग अरेंज करा",...... समर
हो सर
बरोबर चार वाजता सोहा आणि आशिष ऑफिसमध्ये आले ते समरच्या केबिनमध्ये आले, आशिष ऑफिस बघून पूर्ण भारावून गेला होता, अगदी परीक्षा असल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता,
खूपच श्रीमंत दिसता आहेत हे, आपण खूप साधे आहोत, मला समजत नाही सोहा कशी राहील माझ्या घरी, बोलून बघितलाय पूर्वी सोहाशी ती ऐकायला तयार नाही, पण सोहा वर माझ खूप प्रेम आहे, असेल तस राहू आम्ही,
"आशिष रिलॅक्स हो जरा तुला पाणी देऊ का"?,..... सोहा
"नाही मी ठीक आहे",....... आशिष
"दादा बघ ना जरा मम्मी पप्पा फ्री आहेत का"?,....... सोहा
समर मम्मीच्या केबीन मध्ये गेला
"मम्मी सोहा आणि आशिष आले आहेत",..... समर
"बोलव त्यांना इकडे, पप्पांना ही बोलव आणि शिपाई काकांना आत पाठव",........ मम्मी
काका आत आले,......" कॉपी पाठवा सगळ्यांसाठी"
ठीक आहे
" सोहा आशिष मम्मीने बोलवल आहे",...... समर
सोहा मम्मीच्या केबिनमध्ये गेली, आशिष बाहेरच उभा होता, पप्पा आत येत होते, त्यांना आशिष दिसला, हा बहुतेक आशिष असेल असं त्यांना वाटलं
Hi आशिष का.......
मी सोहाचे पप्पा.....
" हो मी ओळखतो सर तुम्हाला" ,....... आशिष
आशिष पाया पडायला खाली वाकला, तस पप्पांनी त्याला उठवलं, दोघांनी गळा भेट घेतली
"सर नको बोलू बेटा पप्पा बोल तू ही",...... पप्पा
"Ok सर...... पप्पा",........ आशिष
"Be comfortable, आज ऑफिस नव्हता का",....... पप्पा
"होत पप्पा सोहाचा फोन आला, मग इकडे आलो, आता परत जाईन साइट वर",........ आशिष
चेहर्यावरून मुलगा प्रामाणिक वाटत होता,....... "बेटा तुला माहिती आहे ना सोहा खूप लाडात वाढलेली मुलगी आहे, तिला कुठल्याही घरकामाची कसलीच सवय नाही, तुला खूप ऍडजेस्ट करावे लागेल तिच्यासोबत, सध्या तरी तीचा स्वभाव खूप शांत झाला आहे, पण पूर्वी ती खूप चिडायची, पेशन्स ची खूप कमी आहे तिच्यात, तिने खूप बदल केलाय स्वतः त, प्लीज तिला सांभाळून घे,पप्पा भावूक झाले होते ",....... पप्पा
"पप्पा तुम्ही काहीच काळजी करू नका, मला सोहा बद्दल सगळी माहिती आहे आणि मम्मी पप्पा ही जाणून आहेत, आता सोहा बरीच शांत झाली आहे, खूप चांगलं वागते ती माझ्याशी आणि माझ्या आई-वडिलांशी, ती व्यवस्थित राहील माझ्यासोबत, तुम्ही काळजी करू नका, आणि प्रत्येक व्यक्तीत काही चांगले गुण असतात तर काही वाईट, मी ही काही सर्वगुणसंपन्न नाही, उलट सोहा मला सांभाळून घेईन, एवढी समजूतदार आहे ती",...... आशिष
"बेटा तिचं काही चुकलं किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तू मला आधी सांगशील, तिच्यावर ओरडलं तर तिला काही सुचत नाही, थोडं प्रेमाने सांगितलं की लगेच समजतं तिला",........ पप्पा
" हो पप्पा तुम्ही काहीच काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मला माहिती आहे एका वडिलांचे मुलीवर किती प्रेम असतं, वडिलांना नेहमी असच वाटत असतं की आपल्या मुलीने सुखी राहावं, तिला कुठलाही त्रास कधीच होऊ नये, मी नेहमी सोहाला सुखात ठेवायचा प्रयत्न करीन",........ आशिष
पप्पा खूप इमोशनल झाले होते, त्यांना सारखं असं वाटत होतं की सोहाचा कसं होईल?, पण आज आशिष ला बघून भेटून ते खूप रिलॅक्स झाल्यासारखे वाटत होते, चांगला मुलगा आहे आशिष समजूतदार वाटतो आहे, सोहाला संभाळून घेईन, निश्चिंत मनाने ते आता केबिनमध्ये जायला तयार झाले, बरं झालं आशिष बाहेर भेटला, सगळ्यांसमोर एवढा मनमोकळं बोलता आलं नसतं आशिषही आता बऱ्यापैकी कम्फर्टेबल झाला होता, त्यालाही वाटत होतं की मी काय बोलणार आहे सोहाच्या आई-वडिलांशी, खूपच साधे वाटत आहेत हे लोक
पप्पा आशिष ला घेऊनच आता आले,
"बाहेरच बोलत बसले होते का तुम्ही दोघे जण",..... मम्मी
सोहाने ओळख करून दिली आशिष हे माझे मम्मी पप्पा.... मम्मी पप्पा हा आशिष
तसा आशिष पाया पडायला उठला मम्मी ने त्याला खुर्चीवर बसतं केलं, समर बाजूला उभा होता सोहा ने सरकुन त्याला त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसायची जागा दिली
आम्ही भेटलो आता बाहेर दोघ
"कोण कोण आहे घरी बेटा", ....मम्मी
"मी आई बाबा आजी आजोबा",....... आशिष
Be comfortable, don\"t worry...... मम्मी
Yes मॅडम...... आशिष
"मॅडम नको बोलू बेटा मम्मी बोल", .... मम्मी
"आमची सोहा आवडते तुला, तूला सगळी माहिती आहे ना सोहा बद्दल",........... मम्मी
" हो all the best बरका ",....... समर उगीच वातावरण लाइट करायचा प्रयत्न करत होता
तशी सोहा कान टवकारून ऐकत होती,...." काय सांगते आहेस मम्मी तू माझ्याबद्दल",
" कराटे चॅम्पियन आहे ती, तिला काहीही घर काम येत नाही" ,........ मम्मी
" उशीरा उठते, मॅगी येते फक्त बनवता"..... समर
"चूप रे दादा, त्या दिवशी केला होता मसाले भात आणि मला सगळ्या रेसीपी माहिती आहेत, ऑनलाईन आहेत avilable ",....... सोहा
मम्मी पप्पा हसत होते......
" काहीही प्रॉब्लेम नाही, माझ बोलण झाल सोहा शी, ती थोडा ऍडजेस्ट करणार थोड मी, आणि स्वैपाकाला मदतनीस आहे आमच्या कडे ",..... आशिष
" गुड समजुतीने घ्यायला पाहिजे ",...... पप्पा
" घरी माहिती आहे का तुमच्या बेटा",.... मम्मी
"हो सांगितलं मी घरी सगळ",....... आशिष
" तुम्ही सगळे घरी या आमच्या बोलू मग निवांत ",....... मम्मी
कॉफी आली सगळे आता बर्या पैकी रीलॅक्स झाले होते, मम्मी पप्पा आशिष शी छान गप्पा मारत होते,
मोकळ्या मनाचा आशिष दोघांनाही आवडला होता, चांगला मुलगा निवडला आहे सोहाने, मम्मी पप्पा खुश होते,
"आपण या वीकेंडला दोन्ही फॅमिली भेटू, तुमचे आजी-आजोबा मम्मी-पप्पा सगळ्यांना घेऊन तुम्ही आमच्याकडे या, मी तसं फोन करेनच तुमच्या आई वडिलांना" ,......... पप्पा
"पप्पा प्लीज मला अहो जाहो घालू नका फक्त आशिष म्हणा",...... तसे सगळे परत हसायला लागले
...........
ऑफिस मध्ये वहिनी चा फोन आला,....... "आज तुम्ही किती वाजता घरी येणार आहात ताई",
" येते लवकरच काही काम आहे का वहिनी",....... वीणा
" हो मला नवीन रूम साठी थोडं शॉपिंग करायचं आहे तर आपण सोबत जाऊया का? ",........ वहिनी
"हो चालेल मी येते लवकर, मी निघाले की फोन करते, मग तु बस स्टॉप वर ये, आपण तिथूनच मार्केटला जाऊ",........ वीणा
"हो चालेल, मी आवरते लवकर ",........ वहिनी
वीणा लवकर निघाली ऑफिसहुन तिनेही वहिनीला सांगितलं त्यानुसार वहिनी बस स्टॉप वर आली, नवीन रूम साठी गादी बुक केल्या, तो एक तासाने घरी आणून देणार होता, चादरी पडदे उषा घेतल्या, छोट कपाटही बुक केलं, वहिनी खूप आनंदात होती, अगदी मनसोप्त खरेदी झाली होती, काय घेवू काय नको असं झालं होतं वहिनीला, दोघी मग ड्रेस च्या दुकानात गेल्या, छान कॉटनचे ड्रेस घेतले दोघींनी
"आज खूप मस्त वाटत आहे ना ताई, असं रिलॅक्स आयुष्य किती छान आहे ना",....... वहिनी
"हो ग वहिनी तु खुश आहेस ना",..... वीणा
"हो ताई बर झाल, यांचा ऑफिस मधला सगळा पगार मिळाला हे सगळं समर साहेबांमुळे शक्य झालं",....... वहिनी
हो ग.......
"तुमचं काय ठरलं आहे ताई? आज भेटल्या का तुम्ही त्यांना ",........ वहिनी
" नाही ग अजून आमचं कशातच काही नाही, असं रोज भेटत नाही आम्ही",...... वीणा
" सगळे सांगतात त्यावरून खूप छान मुलगा भेटला आहे ताई तुम्हाला आता मागे फिरू नका",..….... वहिनी
"नाही ग वहिनी पण मला समजत नाही आहे मी ऍडजेस्ट होईल ना तिकडे",....... वीणा
"हो ताई काही चिंता करायची नाही, नाही तरी लग्न कोणाशी जरी झालं तरी त्या घरात ऍडजेस्ट व्हायला खूपच वेळ लागतो, प्रत्येक घराच्या चालीरीती वेगळ्या असतात, खूपच समजून घ्यावे लागतात प्रत्येक गोष्टी, जर सगळे शिकायच आहे तर मग आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न करायला काय हरकत आहे ",........ वहिनी
" बरोबर बोलते आहेस वहिनी तू, म्हणूनच मला तुला हे सगळं सांगायचं होतं, तुझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं होतं, मी हो बोलू का मग त्यांना",....... वीणा
" हो ताई बिंदास हो बोला ",....... तशा दोघीजणी हसायला लागल्या
" फोटो दाखवा ना ताई आहे का त्यांचा",....... वहिनी
" नाही ग माझ्याकडे फोटो नाही आहे पण इंटरनेटवर असेल समरचा फोटो",...... वीणा
"कम्प्युटर मध्ये कसं काय आहे त्यांचा फोटो",..... वहिनी
" टीव्हीवर कार्यक्रम होतात त्यांचे ईन्टरव्यूचे वगैरे",...... वीणा
" हिरो आहेत का ते",...... वहिनी
वीणा खूप हसत होती,......." अगं वहिनी कामाच्या निमित्ताने इंटरव्यू होतात त्यांचे टीव्हीवर हो आणि समर हिरोचा आहे", वीणा खूप लाजत होती, वहिनी तिला चिडवत होती.......
दोघी जणी मस्त शॉपिंग करून घरी आल्या, आई भाजी निवडत होती, दादा घरी आला होता तो अभी आणि आरु चा अभ्यास घेत होता वीणाने मुलांना खाऊ आणलेला दिला, वहिनी आईला आणि झालेली शॉपिंग दाखवत होती खूप आनंदी होती वहिनी, दादा समाधानाने आई आणि वहिनी कडे बघत होता................
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा