प्रित तुझी माझी... ❤️ भाग 17

विणा बोलली तर खरं सगळ्यांशी समर बद्दल, घरातील सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की वीणाने आता राहुलचा ??


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार.
.......



दादा आणि वहिनीची रूम बघून झाली, छान होती रूम, एक मोठी रूम, बाजूला बाथरूम, दोघांनाही रुम आवडली, वहिनी आनंदाने लहान मुला प्रमाणे तिकडे फिरत होती आनंदाने,


"ठीक आहे आम्ही एक तारखेपासून ही रूम घेतो आहे भाड्याने, किती असेल रेंट साधारण",...... दादा


थोडेफार देण्या-घेण्याच्या गोष्टी झाल्या,....


"एक तारखेला आता सात आठ दिवस बाकी आहे, मी उद्या साफ करून तुम्हाला ही रूम देतो",.......... ओनर


वहिनीला आनंद झाला होता,....... "मी करून घेईल साफ रूम",


" काही गरज नाही, मी करून देतो साफसफाई ",...... मालक बोलला,..... " उद्या संध्याकाळी या चावी घेऊन जा, एक तारखेच्या सुमारास ऍडव्हान्स द्या चालेल "


दादा वहिनी तिथून निघाले


" चांगलं झालं ना रूम च आणि आपल्याला गरजेचीच आहे अजून एक खोली, ही रूम आता आपण सोडायची नाही प्रकाश च लग्न झाल्यावर अजून एक बाजू ची रूम भाड्याने घेऊ या, म्हणजे त्याचे आपल्या सारखे हाल नको व्हायला, रूम मध्ये ठेवायला थोडं सामान लागेल, गादी पडदे, एखादा छोटस कपाट घेऊन टाक, तू उद्या वीणा बरोबर जाऊन खरेदी करून घे, तुला जे आवडतं ते सगळ घ्या ",......... दादा खुश होता


"हो अगदी सगळ माझ्या मनासारखं झाल, झाला आहे का पगार आपला ",....... वहिनी


"आज थोडे पैसे मिळाले आहेत, एक तारखेच्या सुमारास बाकी बाकीचे उरलेले पैसे मिळतील, घरी गेलं की हे पैसे तुझ्याजवळ ठेव",......... दादा


" ठीक आहे ",....... वहिनीला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं तिच्याबाबतीत घडत आहे, वहिनी खुश होती, तिला बघून दादा ही खुश होता


दादा वहिनी घरी आले.....


" कुठे गेले होते तुम्ही, आज अगदी खुश दिसता आहेत दोघ, काय विशेष ",....... वीणा


" ऐका ना ताई आम्ही बाजूची खोली बघायला गेलो होतो, छान आहे खूप मोठी रूम आहे आणि बाथरूम ही आहे तिकडे, तर ती खोली आपण भाड्याने घेतो आहे",....... वहिनी


"हो आई बाजूच्या खोलीत मी सविता आणि मुलं शिफ्ट होतो म्हणजे मग मुलांना पण मोकळे राहता येईल आम्ही रात्री तिकडे जात जाऊ झोपायला",...... दादा


" काही हरकत नाहीये, आता मुलं मोठी होत आहे, त्यांना ही जागा लागते आणि तुमच्या दोघांनाही अजिबात प्रायव्हसी मिळत नाही, चांगला निर्णय घेतला आहे",........ आई


" कशी आहे रूम कधी ताब्यात मिळणार आहे आणि ते भाडं किती आहे ",....... वीणा


दादा ने सगळी माहिती दिली,......" उद्या साफसफाई करून देणार आहेत ते रूम",


अभी आरू आनंदी होते, मोकळी जागा मिळणार होती त्यांना अभ्यासाला, वेगळीच एक्साईटमेंट होती


स्वयंपाक झाला बाबाही घरी आले, दादाने बाबांना रूम विषयी सांगितलं


" चांगलं केलस तू, नाहीतरी या घरात खूप अडचण होते, मुलांनाही उठा बसायला अभ्यासाला जागा नाही ",...... बाबा


"तुम्हाला राग नाही आला ना आई बाबा, आम्ही झोपायला जात जाऊ बाजूला",........ दादा


"नाही रे बाबा त्यात कसला राग, तुम्हालाही तुमचा संसार आहे, सविताला थोडं मोकळं राहता येईल, तुम्हाला तुमचा वेळ मिळेल, तुमची अडचण समजत होती आम्हाला ",......... आई


आई बाबा पूर्वी पासून खूप समजूतदार होते, सगळ्यांना सांभाळून घेण, कोणी काही केल की प्रोत्साहन देणे, खूप नीट वागतात ते, सगळे खुश होते


सगळे जेवायला बसले जेवण झालं, आवरून झालं, तसं वीणाने सांगितलं,....." मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे" ,


सगळे एकत्र बसले दादा वहिनी.... प्रकाश अभी आरू उत्सुकतेने बघत होते काय चाललय ते


"आई-बाबांना मी आधीच सांगितलं आहे, आज प्रकाशला ही सांगितला आहे",....... वीणा


"काय पण, काय बोलायचं आहे? बोल ना",....... दादा


" आमच्या ऑफिसचे जे मशीन परांजपे अंड कंपनी विकत घेत आहेत, त्या ऑफिस मधील समर ते माझ्या ओळखीचे आहेत",....... वीणाला काय बोलव सुचत नव्हत


बर मग.......


आई हसत होती, तिला समजलं वीणा लाजते आहे, कस बोलणार एवढ स्पष्ट, आईने बोलायला सुरुवात केली,.......... "त्यांनी वीणाला लग्नाची मागणी घातली आहे",


"काय करतात ते? कुठे राहतात? , मला नाव ऐकल्या सारख वाटतय",......... दादा विचारत होता


"फोटो आहे का त्यांचा एखादा, कुठे भेटले तुम्ही ताई, सगळी स्टोरी सांगा",....... वहिनी


"अरे दादा समर परांजपे,........ परांजपे आणि अंड कंपनीचा मालक आहेत ते, खूप मोठी इंडस्ट्री आहे ती, मोठा कारभार आहे त्यांचा, गारमेंट युनिट इतरही बरच काही",....... प्रकाश एक्साईटेड होता, बाबा ही आनंदाने एकत होते, सगळे वीणा कडे बघत होते


" म्हणजे त्या साहेबांनी तुला लग्नाची मागणी घातली आहे का "??,......... दादाला आनंद झाला होता


हो दादा........


" काय बोलतेस काय, त्यांना माहिती आहे का आपल्या बद्दल, आपल्या परिस्थिती बद्दल सगळं, आपण एकदम साधे माणस आहोत ",........ दादा


"हो दादा सगळं माहिती आहे आणि ते बोलले तुझी फॅमिली ला मी माझी फॅमिली मानतो, काय करावे मला सुचत नाही आहे",....... वीणा


"हो तरीच मला आमचे मॅनेजर विचारात होते समर परांजपे तुमचे कोण अस ",......... दादा


" म्हणजे कोणी विचारलं ",...... वीणा


आमच्या मॅनेजरने मला बोलवून घेतल, बर्‍याच गप्पा मारल्या त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं वाटतं समर परांजपे यांच्या शी


(ओ म्हणजे समरने आत माझी पूर्ण माहिती काढलेली दिसते आहे, त्यात त्यांना समजले असेल दादाच्या नोकरी चा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी तिकडे फोन करून पगार सुरळीत करायला सांगितलेल्या दिसतो आहे, तिला खूप आनंद झाला, म्हणजे मला न सांगता समर माझ्या फॅमिली साठी बरच काही करण्याचा प्रयत्न करतो आहे)


"पण ताई त्या साहेबांना कस काय माहिती की हे कुठे काम करतात ते",...... वहिनी


"अगं सविता ती माहिती काढणं काही अवघड आहे का? ते श्रीमंत लोक, त्यांचे असतात बरेच कॉन्टॅकस",...... दादा


"खूप श्रीमंत आहेत का ते",........ वहीनी


" हो ग सविता"........दादा


"स्वतःचं घर बिर गाडी सगळ आहे का त्यांचं ",...... वहिनी


सगळे हसायला लागले, वीणा ने वहिनी ची बाजू घेतली,..... "गप्प बसा सगळ्यांनी, वहिनी भोळी आहे, तिला काय माहित, बाकीचं जग कस आहे ते",


" हो, हसू नका तिला कोणी",....... आईनेही बाजू घेतली


"म्हणजे आत्या आता तुझं लग्न होणार आहे का" ?,....... अभी विचारत होता


"चूप रे, असं काही ही नाहीये अजून",....... वीणा हसत होती


"चेहरा बघा कसा लाल झाला आहे ताईंचा ",...... वहिनी


सगळे परत हसायला लागले........ बर्‍याच दिवसांनी सगळे एवढे आनंदी होते


"हे बघा, मला जर आता कुणी चिडवलं तर मी काहीही सांगणार नाही, आपण येथे डिसिजन घ्यायला जमलं आहोत ना",......... वीणा


"आई बाबा काय म्हणता आहेत".... दादा विचारात होता


"आम्ही तो निर्णय वीणा वर सोपवला आहे, पण तरी मला असं वाटतं की वीणा ने पुढचा निर्णय घ्यायला हवा, जर मुलगा चांगला असेल तर होकार द्यायला काही हरकत नाही ",...... बाबा


" पण तरी आपल्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे बाबा, समर ने अजून घरी सांगितलेले नाही की त्याने गरीब घरची मुलगी पसंत केली आहे, त्यामुळे ते लोक काय विचार करतील काहीही माहिती नाही",..... वीणा


" वीणा तू गुणांची खाण आहेस, त्यामुळे तू स्वतःला अजिबात कमी समजू नकोस आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाही, आपण खाऊन-पिऊन सुखी आहोत, त्याच्यामुळे तू हे जे मनात धरल आहे की आपण एकदम कमी आहोत ते सोडून दे",..... बाबा


" बाबा बरोबर बोलत आहेत वीणा तू स्वतःला अजिबात कमी समजू नकोस",...... दादा


" हो ना वीणा ताई हुशार आहेत ",..... वहिनी


" आज खूपच प्रेम आलाय का सगळ्यांना माझ्या वर, पुरे आता कौतुक",....... वीणा


प्रकाश ला तर असं झालं होतं कधी वीणाच लग्न जमतं आणि मी समरला भेटतो


विणा बोलली तर खरं सगळ्यांशी समर बद्दल, घरातील सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की वीणाने आता राहुलचा विचार सोडून पुढे जायला हरकत नाही, काय करावे सुचत नाही आहे? , ........ वीणा विचार करत होती ज्याला समर बद्दल सांगावं त्याला समर पसंत आहे, आई बाबांचे हि तेच म्हणणं आहे, दादा वहिनी आणि प्रकाश ला ही समर आवडल आहे, प्रीती प्रशांत सगळ्यांचंच म्हणणं आहे की मी हो बोलावे......... काय करू मी काही समजत नाही?

कस आहे समर खूप चांगला आहे, त्याने दादा ची मदत केली, आज बघितला ना दादा आणि वहिनी किती खूष आहेत, मला तसंच माझ्या घरच्यांना खूप सुखी आणि आनंदी बघायच आहे, खूप सहन केल सगळ्यांनी, आई बाबा प्रकाश दादा वहिनी सगळेच खुष झाले तर आनंदी राहिले तर किती छान होईल, तसा समरही खूप चांगला आहे, जेवढ्या लोकांशी बोलले सगळेजण त्याला चांगलंच बोलत आहे, आता राहिला प्रश्न त्याच्या घरच्या लोकांचा, एका चांगल्या माणसासाठी बाकीच्यांना सहन करायची माझी तयारी आहे, आणि कशावरून ते लोक खराब असतील? घाबरायच नाही आता ......... मी काय विचार करते आहे हा, जवळजवळ त्याला होकार द्यायची तयारी सुरू आहे माझी,.... विचार करूनही वीणाला लाजायला लागली,


आज पहिल्यांदा ती चांगला विचार करत होती समर बद्दल, खरंच खुपच हँडसम दिसत होता आज समर गाडी चालवतांना, तो पांढरा शर्ट त्याला खूपच छान दिसतो, त्याचं बोलणं... त्याचा कॉन्फिडन्स खूपच छान आहे आणि जेव्हा तो माझ्याकडे बघतो तेव्हा मी त्याच्याकडे बघू शकत नाही, एवढा डॅशिंग दिसतो, विचार करूनच वीणा एकटीच हसत होती,


काय करत असेल आत्ता समर? ती विचारात पडली कसं असेल त्याचं घर? श्रीमंत लोकांचे घर कसं असतं? आपल्याला काहीच माहिती नाही, विचार करता करता वीणाला झोप लागली........
..........

समर रात्री त्याच्या खोलीत आला तेवढ्यात आजी आली त्याला भेटायला


"आज कुठे गेला होता रे समर",..... आजी


"आजी मी वीणा ला भेटायला गेलो होतो",.... समर


"झालं का बोलण काही, काय म्हणण आहे वीणा च",..... आजी


"आजी मी तिला दोन दिवसांची मुदत दिली आहे, त्यानंतर बहुतेक ती होकार देईल, पण मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आजी, मी मम्मीला काय सांगू वीणा बद्दल, मला टेंशन आल आहे, वीणाच ही म्हणण आहे ती साध्या घरची आहे एकदम ",...... समर


" तू तुझ्या मम्मीच टेन्शन घेऊ नको, ती दिसते अशी पण खूप चांगली आहे मनाने, तिला काही प्रोब्लेम नसेल बघ, ती तुझ्यावर आणि सोहावर खूप प्रेम करते, तुमच्या दोघांचं सुख तिला हवं असतं ",....... आजी


" आजी असं झालं ना तर खूप चांगलं होईल, कारण मला मम्मी-पप्पांना ही दुखवायचं नाही आणि मला वीणा ही हवी आहे ",....... समर


" सगळं तुझ्या मनासारखं होईल बेटा",........ आजी


आजी गेली तिच्या रूम मध्ये, समर त्याच्याच विचारात हरवला होता, कमी वयात किती हुशारी आहे वीणाच्या वागण्यात, परिस्थितीने तिला एकदम कणखर बनवल आहे तिला, तिच्यावर मी एवढं प्रेम करतो तरी तिला विश्वास बसत नाही, एक अनुभव वाईट येऊन गेल्या मुळे मुळे बहुतेक ती विश्वास ठेवत नसेल लवकर कोणावर , मी काय करू म्हणजे वीणा ला माझा विश्वास वाटेल, मला वीणाला खूप सुखी ठेवायचं आहे, कसली चिंता नसली पाहिजे तिला, माझ्या भरोशावर राहून तिने आरामात राहिलं पाहिजे,.... पण मला खात्री आहे आहे वीणा होच बोलेल, माझं मन मला सांगत आहे चांगलंच होणार आहे
.........

वीणा आवरून ऑफिसमध्ये गेली प्रीती अजून आली नव्हती, वीणाने पूर्ण ठरवलं होतं की प्रीतीशी बोलायचं नाही


प्रीती आली तेवढ्यात, खूप छान हसून गुड मॉर्निंग बोलली, वीणा ने प्रीती कडे दुर्लक्ष केलं....


"आईने गजरा दिला आहे आज, एका मुलीला नसेल बोलायचं तर मी गजरा परत बॅगेत ठेवून देते ते",....... प्रिति


तसं वीणा ने न बोलता फक्त हात पुढे केला, प्रीतीने दिलेला गजरा वीणाने केसात माळला, प्रीतीच्या चेहऱ्यावर हसू होते


ही माझ्याशी न बोलता जास्त वेळ राहू शकत नाही, उगीच नाटकं करते आहे, दोघी चुपचाप कामाला लागल्या, प्रशांत सगळ बघत होता


" काय चाललंय आहे वीणा? काल भेटले होते का समर सर"?,...... प्रशांत


तशी प्रीती कान टवकारून ऐकत होती.....


"तुला काय करायचं आहे प्रशांत, बाकीचे ऐकायला टपलेले असतात ",....... वीणा लटक्या रागात बोलली


प्रशांत आणि प्रीती हसत होते,


"लंच ब्रेक मध्ये सांगेल रे ती सगळं",... प्रीतीला कॉन्फिडन्स होता


सर ऑफिसमध्ये आले,..... "प्रशांत मशीन ची डिलिव्हरी फिक्स झाली आहे, तुला दुपारून वेयरहाउस ला जायला लागेल, मशीन येत्या आठवड्यात तिकडे फिक्स होतील, मग त्या नीट चालत आहे की नाही वगैरे ते बघावं लागेल",


हो सर......... प्रशांत


समर सकाळी नाश्त्याच्या टेबलवर हजर होता, सोहा ही खाली आली

"दादा मम्मीला काय बोलायचं असेल आशिष शी",...... सोहा


"तू काळजी करू नको, मम्मीला बघायचं असेल कसा आहे आशिष, ते तर सहाजिकच आहे, तिला तुझी काळजी आहे, एकदा भेटले बोलले की ते आपोआपच रिलॅक्स होतील, काल काही विशेष विरोध केला नाही ना त्यांनी"?,........ समर


"नाही उलट मला समजूनच घेतलं त्यांनी, एक खूप मोठ टेन्शन कमी झाला आहे दादा, तू आज आशिष आणि मम्मी पप्पांची भेट घडवून आण",........ सोहा


"तू आशिष ला सांगून ठेव सगळं",...... समर


"हो पण तो नर्वस आहे दादा, तू त्याच्या सोबत राहा",..... सोहा


"मी राहिन आशिष सोबत पण मम्मी ने मला जायला सांगितलं तर, मला तिथे थांबता येणार नाही",..... समर


"हो तुझं बरोबर आहे दादा",..... सोहा


दोघांनी नाष्टा केला


आजी-आजोबाही आलेच खाली,..... चला आजी आजोबा नाष्टा करून घ्या,


" तुमचा आवरलं का आज दोघांचं",..... आजी


" सोहा मज्जा आहे बाबा तुझी",....... आजी चिडवत होती


" तू पण ना आजी",...... सोहा लाजत होती


सोहा कॉलेजला गेली, समर ऑफिसला गेला, थोड काम झाल एक दोन मीटिंग अरेंज केल्या होत्या त्या संपल्यावर समर शॉप मध्ये गेला, मशीन कुठे फिक्स करणार वगैरे सगळ बघितल



ऑफिस मध्ये जरा वेळाने परांजपे मॅडमने समरला बोलवल


"आज आमची मीटिंग फिक्स कर आशिष सोबत, इथेच ऑफिसमध्ये साधारणता चार वाजता सोहा नाही आली तरी चालेल",......... मम्मी


"ठीक आहे मम्मी",...... समर बाहेर आला त्याने लगेच सोहाला फोन लावला आशिष ला आज चार वाजता ऑफिस मध्ये बोलवलं आहे, त्याला एकट्याला तुला नाही


"ठीक आहे मी सांगते आशिष ला",....... सोहा


मिस्टर दीक्षित आत आले,...... " सर ते महेश इंजीनियरिंग वाले मिस्टर महेश भेटायला आले आहेत",.......


" ठीक आहे पाठवा त्यांना आत मध्ये",...... समर


ते लोक आत आज आले, मीटिंग झाली, समर ला वीणाचा भाऊ प्रकाश ची आठवण झाली.....


समरने महेश यांना प्रकाश चा नंबर दिला,..... "या मुलाकडे चांगलं प्रोजेक्ट आहे, बघा तुम्हाला काही फायदा होतो आहे का, याच नाव प्रकाश आहे ",


" कोण आहेत हे ",....... मिस्टर महेश विचारत होते


"घरचेच मेंबर आहेत असं समजा",....... समर


चला म्हणजे आता प्रकाशच प्रोजेक्ट या लोकांना आवडलं तर प्रकाशही काम होऊन जाईल, कसं असतं ना काही लोकांसाठी काम मिळण हा प्रॉब्लेम खूप मोठा असतो आणि काही लोक अश्या गोष्टी चुटकीसरशी सोडवतात, सगळं पैसा स्टेटस यावरच अवलंबून असत,


मिस्टर महेश यांनी प्रकाशची सगळी माहिती घेतली, लगेच फोन लावला


प्रकाश त्याच्या ऑफिस मध्ये काम करत होता, त्याचा फोन वाजला


मी महेश इंजीनियरिंग कंपनी तून बोलतोय, तुमच्या प्रोजेक्ट बद्दल समजल


"उद्या तुम्हाला इंटरव्ह्यूला येता येईल का मिस्टर प्रकाश",........ प्रकाश ला खूप आनंद झाला, त्याचं काम होऊ शकतं, थोड बोलून त्याने फोन ठेवून दिला आणि उद्याच्या इंटरव्यू ची तयारी सुरू केली


लंच टाईम झाला वीणा एकटीच डबा घेऊन कॅन्टींग कडे गेली प्रीती आणि प्रशांत बघत होते


" काय झालंय आज वीणाला "?,..... प्रशांत


"अरे काल समर सर आले होते ना संध्याकाळी, तर मी घरी निघून गेली वीणा ला सोडून, म्हणून तिला राग आला आहे, आता तूच मी कशाला थांबू तिथे आणि विणाच समर सरांबरोबर लग्न जमलं तर त्यापेक्षा चांगलं काही नाही, तिला समजत नाहीये, ती कनफ्यूज आहे थोडी, जरा वेळाने होईल नीट, ति ही आपल्यावर जास्त वेळ राग ठेव ठेवू शकत नाही ",....... प्रिति


" हो तेही आहे, काय बोलले समर सर ",..... प्रशांत


" तेच सांगत नाही ना वीणा मॅडम",...... प्रिति, प्रशांत दोघे हसत होते......

 

🎭 Series Post

View all