Aug 18, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️ भाग 16

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️ भाग 16

 


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार.
.......


"एक मीनट समर मी कुठे ही येणार नाही, मला घरी जायच आहे",....... वीणा


"हो जाशील, मला तुझ्याशी बोलायचा आहे",...... समर


दोघ कॉफी शॉप कडे जातात, वीणा मनात ठरवून घेते की आज काहीही झालं तरी मी समर ला सांगणार की माझ्या मागे येऊ नको, मला आता खूप त्रास होतो आहे या गोष्टीचा,


समर ने वीणाला खुर्ची ऑफर केली, तेवढ्यात वेटर आला त्याला दोन कॉफी सांगितल्या


" वीणा मी सिरीयस आहे तुझ्या बद्दल, तू मला नेहमी भेटायचं का टाळत असते",....... समर


वीणा काहीही बोलली नाही, कुठून सुरुवात करू असं तिला वाटत होतं, एक मन सांगत होतं की समर खूप चांगला आहे, दुसरीकडे ती प्रॅक्टिकल होत होती, खाली मान घालून बसली होती......


"खरंच वीणा मी सिरीयस आहे तुझ्या बाबतीत, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तू म्हणशील तसं करू आपण, म्हणशील तर केव्हाही मी तुझ्या घरच्यांना भेटायला येईल",....... समर


"प्लीज.... एवढ्या पुढचा विचार का करता आहात तुम्ही? मला एवढ्यात डिसिजन घेता येणार नाही, समर मला विचार करायला वेळ हवा हवा आहे",....... धीर एकवटून वीणा बोलली


" तुझ्या तोंडून समर हे नाव किती छान वाटते वीणा, काय विचार करायचा आहे? काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर सांग आपण मिळून सोडवु ",........ समर


" तुम्ही प्लीज मला समजून का नाही घेत आहात, तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती आहे? मी एकदम गरीब घरातली मुलगी आहे, अतिशय छोट घर आहे आमचं, आम्ही रोज काम करू तरच आम्हाला जेवायला मिळते ",....... वीणा


" हेच तर बदलायच आहे ना आपल्याला, तू गरीब असली काय अन श्रीमंत असली काय त्याने काय फरक पडतो आहे वीणा, लग्न करायला मन जुळावे लागतात आणि मला तु आवडली आहे आणि मला वाटतं तुलाही काही यात प्रॉब्लेम नसेल",....... समर


" माझ्या बाजूचा विचार पण तुम्हीच करणार आहात का"?,..... वीणा


" नाही, सॉरी बोल तू",....... समर


" मी सांगितलं ना मला विचार करायला वेळ हवा आहे",...... वीणा


" ठीक आहे, वीणा मग तू तुझा वेळ घे, आपण दोन-तीन दिवसांनी भेटू आणि मला तुझ्या बद्दल सगळी माहिती आहे, तुझ्या परिस्थिती बद्दल तो चिंता करून नको, कसलीच काळजी करू नकोस, मी आहे सगळं सांभाळायला माझ्यावर विश्वास ठेव ",........ समर


वीणाने दोन मिनिट समर कडे बघितलं, तिला त्याच्या नजरेत विश्वास आणि प्रेम दिसला.......


कॉफी आली, दोघांनी कॉफी घेत घेतली,


" मला निघायला हवा आता ",....... वीणा


" मी सोडतो ना तुला घरापर्यंत वीणा",........ समर


" नाही मी जाईल माझी माझी, तुम्ही सोडायला आले तर आजूबाजूचे लोक बघतात",...... वीणा


"बघू दे ना मग काय फरक पडतो",..... समर


"मला पडतो फरक, ठीक आहे मी तुला थोडं दुर सोडतो, पण मी तुला असं एकट जाऊ देणार नाही ",........ समर


त्याची अशी काळजी घेण वीणाला आवडत होत


वीणा आणि समर निघाले, समरने कारचा दरवाजा उघडून वीणाला आत बसवलं, ते निघाले, बऱ्याच वेळ दोघं गप्पा होते नंतर समर बोलायला लागला


" वीणा प्लीज माझा पॉझिटिव्ह विचार कर, माझ्या आयुष्यात यापूर्वी कोणीही मुलगी नव्हती, मला बरेच स्थळ सांगून आले पण तुझ्या बाबतीत मला जे वाटलं ते इतर कोणाच्या बाबतीत अस कधीच वाटलं नाही, मी तुला आश्वासन देतो की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही नाही, दादा वहिनी प्रकाश यांच ही सगळं नीट करेन मी, तेही माझ्या घरचे लोक आहेत, आता प्लीज माझा विचार कर कर मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ",....... समर


" मला तुमच्या बद्दल काहीच माहिती नाही, मला अंदाज येत नाही आहे की मला हे नातं पुढे वाढवायचं आहे की नाही",...... वीणा


" काय माहिती हवी आहे तुला माझ्याबद्दल, सगळं विचार मीच सांगतो, माझ्या घरी आजी आजोबा आहेत, मम्मी पप्पा माझी लहान बहीण सोहा आहे, आम्ही सगळे एकत्र राहतो, माझं माझ्या आजी वर खूप प्रेम आहे आणि आजीला मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, तुझ्या बद्दलही मी आजीला सगळं सांगितलं आहे वीणा",...... समर


" वीणा कौतुकाने आजी बद्दल सगळं ऐकत होती, लगेच ती भानावर आली तुमच्या घरचे मला एक्सेप्ट करतील का? मी एकदम साध्या घरची मुलगी आहे, श्रीमंत लोकांच्या चालीरीती मला काहीही माहिती नाही",...... वीणा


" आजी आणि सोहाला तू ऑलरेडी पसंत आहे, मम्मी पप्पांची मी बोललेलो नाही अजून, मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम असेल आणि तू घरात वागण्या-बोलण्यात ची चिंता करू नको, आम्हीही माणसंच आहोत, आमच्या घरी सगळे नॉर्मल राहतात, उठतात, बसतात आणि श्रीमंत गरीब असं काही नसतं, उद्या भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही, श्रीमंती मनाची हवी, अजून काही प्रश्न? तू छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करते वीणा आणि उगीच टेन्शन घेते, कधीकधी सगळं सोडून द्यायचं असतं आणि आपल्या मनाला वाटेल तेच करायचं असतं",...... समर


वीणा काहीच बोलली बोलली नाही, स्टॉप आला तसा समर नी गाडी थांबवली, ........"दोन दिवसाचा वेळ देतो आहे तुला वीणा, गरीब-श्रीमंत घरदार सगळं सोडून एकदा फक्त माझा विचार कर पूर्णवेळ आणि मग मला सांग तुला काय वाटत आहे ते, माझं मन मला सांगत आहे की तुला या नात्यात काही प्रॉब्लेम नाही येणार नाही विश्वास ठेव",....... समर


समर बोलत असताना वीणा काहीही बोलली नाही तिला पटत होतं समरचे विचार, करून बघू आपण विचार यांच्याबद्दल


" मी निघते",....... वीणा


" ओके गुड बाय",....... समर


समर वीणा कडे बघत होता, वीणा मुद्दामूनच त्याची नजर टाळत होती, हे समजलं समरला, गोड हसत त्याने गाडीच लॉक उघडलं ......


वीणा कार मधून उतरली आणि तिच्याच विचारात ती घराकडे यायला लागली, ती येत असताना प्रकाशने तीला बघितलं, थोडी पुढे आली ती, समर निघून गेला.....


वीणा....... वीणा प्रकाश हाक मारत होता, तशी वीणा दचकली,


"कोण होतं ते तुझे बॉस होते का" ?....... प्रकाश


"नाही रे प्रकाश, ते होते समर परांजपे",..... वीणा


"समर परांजपे......... सिरीयसली, तू कस काय ओळखतेस त्यांना",....... प्रकाश


"खरं सांगू का, मी आई-बाबांनाही सगळं सांगितलं आहे, ते मला लग्नासाठी विचारता आहेत",... वीणा


" काय बोलतेस काय तू वीणा, तुला माहिती आहे का ते कोण आहेत? परांजपे आणि अंड कंपनी खूप मोठा ग्रुप आहे, तुम्ही लोक कसे भेटलात? काय झाले मला जरा सांगशील का वीणा",......... प्रकाश


" चल प्रकाश आपण ज्युस घेऊ या?, थोड बसुन बोलू या का, मी तुला सगळं सांगते",......... वीणा


दोघ ज्यूस शॉप ला जातात, प्रकाश वीणा कडे बघत असतो,..........." हो सांगते रे आधी ज्यूस ऑर्डर कर, ही काही खूप जुनी गोष्ट नाही प्रकाश, माझं राहुल शी लग्न मोडल्यानंतर मला समर भेटला, आम्ही त्यांच्या कंपनीत प्रेझेन्टेशन साठी जात होतो, मला काहीही कल्पना नव्हती की समरच्या मनात माझ्या बद्दल काही आहे",........... वीणा


"हे आई बाबांना कधी सांगितलं तू विणा "?,........ प्रकाश


" हो काल सांगितलं आहे, त्यांनी सगळा निर्णय माझ्यावर सोडला आहे ",......... वीणा,........" तुला काय वाटत आहे प्रकाश, तुझ मत माझ्या साठी महत्त्वाच आहे ",


" मला असं वाटत आहे की तू यावर पॉझिटिवली विचार करावा, समर एक अतिशय चांगला मुलगा आहे, अस एकल आहे त्याच्या बद्दल, खूप सुखी राहशील तू त्याच्या सोबत, जर समर आपल्या आयुष्यात आला  तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील खूप चांगला मनुष्य आहे , समर च्या रूपाने नशीबच आपलं दार ठोठावत आहे",....... प्रकाश


" प्रीती ही मला तेच म्हणत होती प्रकाश",........ वीणा


" तू काय ठरवलं आहेस वीणा "?,......... प्रकाश


" मी अजून काहीही ठरवलेले नाहीये प्रकाश, समजत नाही काय करू ",....... वीणा


" तुला कोणी दुसरे आवडतं का ",...... प्रकाश


" नाही  माझ्या आयुष्यात कोणीही नाही ",...... वीणा


" राहुल त्याचं काय आहे ",....... प्रकाश


" तो विषय मी कधीच संपवला आहे, ठीक आहे मग तर सगळ्यात साईडने काही प्रॉब्लेम नाही, आता तर तू समरचा विचार करायला काही हरकत नाही ",........ प्रकाश


"पण दोन घरात मध्ये किती फरक आहे प्रकाश, ते किती श्रीमंत आपण गरीब, आपल्याला राहुल स्थळ झेपलं नाही",........ वीणा


" तू राहुल आणि समर यांचं कम्पॅरिझन करू नकोस, राहुल सगळ मागणारा होता आणि समर सगळं देणार आहे, तू अजूनही ओळखलं नाही का त्याला"?,.......... प्रकाश


वीणा विचार करत होती, सगळे समर बद्दल चांगलं बोलत आहे आहे काय करू मी? मी त्याला हो बोलू का? पण त्याचा स्वभाव कसा असेल? श्रीमंत लोक कसे उठतात बसतात वावरतात मला काहीही माहिती नाही? जर मी कधी त्यांच्या घरी गेली, तर मी काय करणार आहे? मला अजिबात कॉन्फिडन्स नाही, मी साध समर शी नीट बोलू शकत नाही, बाकीचे भेटले तर काय होईल, काय करू मी मी समर आहे खूपच चांगल आहे आणि तो घरच्यांनाही सांभाळून घेईल, मला असाच नवरा हवा होता जो माझा आणि घरच्यांचा आधार होईल, काय करू मी काही समजत नाही आहे??


वीणा आणि प्रशांत घरी पोहोचले, आई स्वयंपाक करत होती, दादा आणि वहिनी बाजूची रूम बघायला गेले होते, अभी अरू अभ्यास करत होते, बाबा अजून आले नव्हते


"आज उशीर झाला तुला वीणा" ,........ आई


"हो आई मला आज समर भेटायला आला होता",........ वीणा


"हो का गं काय म्हणत होते ते"?,........ आई


"मला काही समजत नाही आहे आई काय करू",..... वीणा


तेवढ्यात प्रकाश तिथे आला..... "मी तर बोललो वीणा ला की तू समरचा विचार कर",


"यालाही माहिती आहे का ग सगळं ",...... आई


" हो आई मीच सांगितलं त्याला, आत्ता आणि मी दादा वहिनीला हे सगळं सांगणार आहे",........ वीणा


" हो हो सांग त्यांना, तुझ्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घ्यायचा अधिकार आहे त्यांना ही ",....... आई


वीणा आवरत होती तेवढ्यात प्रीतीचा फोन आला


" वीणा अग तुझा फोन वाजतोय बघ", ......
आईने सांगितलं


वीणाने पुढे येऊन फोन कट केला, परत फोन वाजायला लागला परत वीणाने कट केला


" अगं काय चाललंय काय वीणा",....... आई


" काही नाही ग आई, मला प्रीती शी बोलायचं नाहीये",..... वीणा  


"का? काय झालं? भांडल्या की काय तुम्ही परत ",...... आई हसत होती


"भांडण उद्या होणार आहे ग आई" ,....... परत प्रीतीचा फोन वाजत होता वीणा फोन उचलला,..... "काय काम आहे प्रीती? कशाला सारखा फोन करते आहे",?,....... वीणा


" अरे यार काय झालं, तू केव्हा घरी आली",....... प्रिति


" आता बर काळजी वाटते आहे तुला? तेव्हा मला एकटीला टाकून गेलीस, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे प्रीती तू परत मला सारखा सारखा फोन करू नको ",...... वीणा


" अरे पण झालं काय आहे वीणा, काय सांगणार की नाही? , तुझ्या चांगल्या साठी मी गेली ना, उगीच कबाब मे हड्डी नको ",........ प्रिति हसत होती


" काही बोलायची गरज नाही माझ्याशी, मी सांगितलं ना की फोन करू नको ",....... वीणा


" अरे एक मिनिट काय बोलण झाल समरशी, मला वाटल की आज तुला समर लग्न करून घेवून गेला की काय, तेच बघायला फोन केला होता, एवढा अग्रेसिव्ह वाटत होता आज तो, omg...... ",........ प्रिति  


" चूप ग",.......... तसा  वीणा ने फोन ठेवून दिला, वीणा लाजत होती


" अग काय झालं वीणा काय चाललं आहे तुमचं"?,....... आई


" आई अगं ऑफिस सुटलं तेव्हा मी आणि प्रीती घरी येत होतो तसा समर भेटला ",...... वीणा


" मग समर भेटल्यावर काय झालं बोल ना", ?....... आईला आनंद झाला होता, उत्सुकता स्पष्ट दिसत होती आई च्या चेहर्‍यावर


"तुम्ही सगळे समरच्या नाव काढलं की असे काय करतात, तो खूप चांगला जसा आणि मी वाईट ",....... वीणा


" पण मी तुला कशाला वाईट बोलेल ग वीणा, तू उगीच चिडली आहेस ",...... आई हसत होती तिला कळल होत की चांगला मुलगा भेटला आहे वीणा ला


वीणालाही वाटला उगीच चिडलो आई वर,...." बर बाई सॉरी",


" आता सांगणार का आता काय झालं ते",..... आई


" हो,...... तर ही प्रीती सरळ घरी निघून गेली, माझी किती फजिती झाली माहिती आहे ",........ वीणा


आई हसत होती


"तुला काय होतय ग आई हसायला",..... वीणा


"काही नाही ग, तू काय ठरवलं आहेस वीणा, नीट सांग ग नुसती चीड चीड करते आहेस तू, तुझ्या मनात काय आहे, तुला आवडतात का ते, बोल ग",...... आई


" आई तू पण ना,....... म्हणून वीणा हसत आवरायला आत गेली,


आईला जे समजायचं ते समजल होत, आई खुश होती, नाही तर एका आई ला काय हव असत, मुलगी सुखी आनंदी..... तर आई आनंदी

.............
सोहा कॉलेज होऊन घरी आली, ती तिच्या रूम मध्ये आवारात होती, पप्पा आत आले


"बिझी आहेस का बेटा"?,...... पप्पा


"नाही पप्पा आज तुम्ही लवकर घरी आलात",...... सोहा


"तुझ्या साठी आलो आज लवकर, थोड बोलायचा होत तुझ्याशी" ,........ पप्पा


"बोला ना पप्पा",....... सोहा


"समर शी बोललो आज मी, काय म्हणणं आहे तुझं बेटा तुझ्या मनात जे असेल ते मोकळ बोल",....... पप्पा


तशी सोहा ने येवून पप्पांना मिठी मारली, पप्पा हि खूप हळवे झाले होते


" पप्पा मला आशिष आवडतो आणि मला त्याच्याशी लग्न करायचा आहे, I am sorry पप्पा मी तुम्हाला हे आधी सांगायला हव होत",........ सोहा


" काही हरकत नाही बेटा, कुठे भेटले तुम्ही कसा आहे आशिष",......... पप्पा


"पप्पा आशिष सेम तुमच्या सारखं आणि समर दादा सारखा आहे, खूप चांगला, आम्ही कॉलेज मध्ये कॉमन फ्रेंड मुळे भेटलो, तुम्ही भेटा त्याला त्याच्याशी बोला तुम्हाला नक्की आवडेल तो",...... सोहा


"हो बेटा नक्की भेटेल, एक सांग तू खरोखर एकदम रेडी आहेस ना या नात्या साठी, कुठल्याही परिस्तिथीत रहायची तयारी आहे ना तुझी ",...... पप्पा


" हो पप्पा कोणत्याही परिस्थितीत मला आशिष सोबत रहायचा आहे",........ सोहा


" तू आनंदी रहाव तेच हवय मला, तुझ्या सुखा शिवाय काही नको, खूप लाडात वाढविली आहे तुला आम्ही, तुला एवढस जरी लागल ना तरी आम्ही हळवे व्हायचो, आता तू तुझ्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेतला आहे, तुझ्या मना सारख होवू दे, तुझ चांगल व्हाव अस वाटत, आमचा पाठींबा आहे ",........ पप्पा


पप्पा रडत होते, सोहाही रडायला लागली


ते दोघ बोलत असतांना मम्मी आली तिथे सोहा जावून मम्मीला भेटली


"काय चाललय दोघांच आम्हाला कळेल का? , एवढा इमोशनल होवू नका पुढे कसे राहणार तुम्ही सोहा शिवाय",....... मम्मी


मम्मी पप्पा सोहा बराच वेळ बोलत बसले होते, सोहा तिच्या आणि आशिष बद्दल मम्मी-पप्पांना सगळं सांगत होती पप्पांना थोडा विश्वास वाटत होता


समर घरी आला, फ्रेश होऊन खाली आला, सगळे सोहाच्या रूम मध्ये जमले होते, समर ही तीकडे गेला आजीने बाजूला सरकून समर ला जागा दिली


"आज सगळे घरी मस्त योग आहे",....... समर


"हो पण तू कुठे फिरत होता, तू तर 6.30 ला निघाला ना ऑफिस मधून",...... मम्मी


"थोड काम होत, बाहेर गेलो होतो",....... समर


आजी आजोबा सोहा समजून गेले समरच काम


"चला जेवून घ्या, मी बघते ताट वगैरे घेते ",....... आजी आजोबा उठून पुढे हॉल मध्ये गेले


"हो आम्ही फ्रेश होऊन येतो ",..... मम्मी पप्पा रूम मध्ये गेले


"काय झालं का बोलण मम्मी पप्पांशी सोहा, पुढे काय ठरलं ",...... समर


" मम्मीला आशिष ला भेटायचा आहे",....... सोहा


"हो काही हरकत नाही, ते भेटणारच आधी, बोलून बघतील",........ समर


" त्या नंतर आशिष च्या घरच्यांना भेटायच ठरत आहे",....... सोहा


"दादा कुठे गेला होता तू संध्याकाळी",....... सोहा


समर हसत होता


" सांग रे, सकाळी पण तू टाळले मला ",..... सोहाच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती


समरने आजुबाजूला बघितल कोणी नाही ना,........ "मी वीणाला भेटायला गेलो होतो, एक तास सोबत होतो आम्ही",


"काय म्हटली वीणा, होकार दिला का ",....... सोहा


"नाही अजून, तिने वेळ मागितला आहे, पण बोलेल हो ती नक्की, मला विश्वास आहे",........ समर


"तुझ्या मना सारख होवू दे दादा",..... सोहा


"ऐक ना सोहा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, वीणा बद्दल ",........ समर


बोल........


" शांत पणे ऐक रिएक्ट होवू नको",...... समर


" इथे नको थांब, चल आपण गार्डनमध्ये बसू ",...... सोहा


" सोहा वीणा एकदम साध्या घरची मुलगी आहे, साध्या म्हणजे खूपच साध्या, राहायला घर सुद्धा नाही त्यांना, दोन खोल्यांच्या घरात सहा सात माणसं राहतात ते, घरातले सगळे काम करतात त्यांच्या, मला खूप विचार पडतो आहे कि मम्मी वीणाला एक्सेप्ट करेल का?, वीणाला ही हीच काळजी आहे ",......... समर


" हे बघ दादा वीणा गरीब असो की श्रीमंत काही फरक पडत नाही, मला आता समजलं आहे, चांगलं मन चांगली माणसं महत्त्वाची, तुझं तिच्यावर खरंच खूप प्रेम असेल आणि तुला काही अडचण नसेल तर तू बाकीच्यांचे विचार करू नको आणि राहिला प्रश्न गरिबीचा तर तू आहेस ना, आपली एवढी श्रीमंती काय कामाची, आपण त्यांच्या फॅमिलीला पण घेऊन पुढे जाऊ",....... सोहा


" हाच विचार महत्त्वाचा असतो सोहा, तू खूप चांगल्या विचारांची मुलगी आहे आहेस ",....... समर


" नाही दादा मी आधी नव्हती अशी, आता आशिष बरोबर राहून माझे पण विचार थोडे बदलले आहेत ",........ सोहा


" आशिष ला मला थँक्यू बोलावंच लागेल ",........ समर


सोहा चिडली ती समर ला मारायला धावली, दोघांची पळापळी सुरू होती


मम्मी पप्पा आले खाली जेवायला,....


"अरे पुरे काय हे चला जेवून घ्या ",....... मम्मी


आजी आजोबा मस्त हसत होते


सगळे जेवायला बसले........


" या विकेंडला आपल्याला एका पार्टीला जायच आहे, लक्षात ठेवा, समर.... सोहा इतर प्लॅन करू नका",....... पप्पा


"कुठे जायच आहे",......... सोहा


"मिस्टर अधिकारी यांच्या कडे, त्यांच्या नवीन प्रोजेक्टच उद्घाटन आहे त्या नंतर पार्टी, ते माझे खास मित्र आहे, ते स्वतः आले होते आमंत्रण द्यायला आले होते ",...... पप्पा

" आम्ही यायला हव का", ?........ समर सोहा एकदम बोलले


"हो कम्पल्सरी आहे",....... पप्पा बोलले

.......
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now