ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........
सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....
©️®️शिल्पा सुतार
.......
समर ऑफिस मध्ये पोहोचला, मिस्टर दीक्षित आत आले महत्त्वाच्या फाईल वर सही हवी होती,
"मशिनच काय झालं मिस्टर दीक्षित",...... समर
"ऑर्डर आलेली आहे सर, तुम्ही काल डेमो बघितला ना",....... दीक्षित
"हो ते नाही म्हणत आहे मी, काम कधी सुरू होणार, पुढे काय झालं, आपल्याला ती नवीन ऑर्डर लवकरात लवकर द्यायची आहे, त्यासाठी त्याचे डिझाईन सेटिंग साठी कोणाची मदत होते का ते बघायला हव, आजच काम सुरू करा ",......... समर
" सर आपण डिजाइनर पॉइंट करूया",........ दीक्षित
"हो डिजाइनर तर लागेलच आपल्याला, पण त्यासोबत साई इंटरप्राईजेस मध्ये सांगा, त्या मशीन नवीन आहेत, त्याबरोबर डिजाइन सेटप साठी टेलर आणि डिझायनर यांना थोडे दिवस बोलवुन घ्या, ट्रेनिंग लागेल आपल्याला, एकदा मशीन नीट सुरू झाली की काही प्रॉब्लेम नाही",....... समर
"ठीक आहे सर ",........ दिक्षित सर गेले
समर ला तेच हवं होतं तिकडचे डिजाइनर इकडे बोलवले म्हणजे बरोबर वीणा रोज इकडे येईल, ही मशीन सेटप साठी आणि आपली आणि तिची भेट होईल, तो कामाचा विचार करत होता तेवढ्यातच सोहा चा फोन आला
"काय झालं तू बोलला का मम्मीशी? ",....... सोहा
"हो माझं झालं बोलण",...... समर
"काय? काय..... म्हणत आहेस तू.... तू बोलला म्हणून",....... सोहा
"हो मी बोललो, पप्पा पण होते, मम्मी होती आजी आजोबा होते",..... समोर
"ओ माय गॉड, सगळ्यांना गोळा करून नको बोलायला पाहिजे होतं",........ सोहा
" मी कशाला बोलवु सगळ्यांना, ते होते नाश्त्याच्या टेबलवर हजर, आज संध्याकाळी घरी मिटींग आहे, त्यात ते सगळे तुझ्याशी बोलणार आहेत, आणि पप्पांना ही तुझ्याशी बोलायच आहे ",....... समर
" नाही दादा, मी काय बोलणार सगळ्यांशी? आता मला भिती वाटते, तु गाईड कर",....... सोहा
" माझे काय 10 लग्न झाले का? मी कस गाईड करणार
का"?,.......... समर
" दादा प्लीज काही तरी सांग",......... सोहा
" एक कर कोणी काही बोलला तरी अजिबात काही उलट बोलू नको",......... समर
" मी उलट बोलते का म्हणजे "?,...... सोहा
" हे असा आहे तुझ बघ",........ समर
" Ok sorry सांग",........ सोहा
" जा तुला करायचा ते कर",........ समर
" Sorry दादा, स्वीट दादा, प्लीज मी पण तुला गरज लागली की मदत करीन ना",......... सोहा
" Ok शांत रहा, ऐकून घे, आशिष ला सांग अलर्ट रहायला, तुझा स्वार्थ साधून घे",......... समर
"Ok दादा..... तुझ काय चाललय दादा? भेटली का आज तुला आमची वहिनी, झाल का काही बोलण",......... सोहा
"फोन ठेव सोहा खूप काम आहे मला",....... समर हसत होता
"प्लीज सांग ना दादा, नाव तरी सांग" ?......... सोहा मुद्दाम चिडवत होती
Mr मिस्टर दीक्षित आले, मी ठेवतो फोन, समरने फोन ठेवून दिला, त्याला खर तर ही चिडवा चिडवी आवडत होती
तिकडे ऑफिसमध्ये मिस्टर दीक्षितांनी साई इंटरप्राईजेस सरांना फोन केला,...... "आम्हाला थोडे दिवस मशीन बरोबर डिझाईनचा सपोर्ट ही हवा आहे",
"ओके तुम्हाला मिळून जाईल सपोर्ट ट्रेनिंग अरेंज करतो मी ",...... सर
.......
लंच ब्रेक झाला प्रीती वीणाच्या मागेच होती
"काय झालं सांग वीणा",....... प्रिति
प्रशांत ही आला तेवढ्यात इकडे डबा खायला, वीणा ने प्रीतीला डोळ्याने सांगितले की थांब नंतर सांगते मी तुला सगळं, हसत खेळत जेवण झालं, प्रशांत लवकर उठून गेला तशी प्रीती सरसावून बसली......
हो सांगते आहे ग बाई,...... "आम्ही वेअर हाऊस ला गेलो होतो ना काल, डेमो झाल्यावर सरांनी समरला बोलवून घेतल, नंतर सरांना काम होतं तर सर निघून गेले, प्रेझेन्टेशन सुरू होत अजून, समर प्रशांत आणि मी तिघे होतो तिथे",........ वीणा
"ओहो हो",........ प्रिति
"प्रीती मला बोलायला देणार आहेस का"?,........ वीणा
" सॉरी तू बोल",........ प्रिति
" नंतर समरने मला आणि प्रशांतला बस स्टॉप वर सोडलं प्रशांत उतरून गेला आणि त्याची बस आली आणि मी समर सोबत राहिले ",........ वीणा
प्रीती हसत होती.........
"मी नाही सांगत काही, तुझ्याशीच बोलण्यातच काही अर्थ नाही, तिथे माझी काय हालत झाली तुला हसायला येत आहे ",........ वीणा चिडली होती
"सॉरी सॉरी सॉरी पुढे सांग काय झाले ते?, आता तु मध्ये थोडे जरी बोलली तरी मी काहीही सांगणार नाही ",........ वीणा
" ओके मी गप्प बसते",...... प्रिति
"प्रशांत निघून गेल्यावर मी कारमधून उतरले, तसा समर माझ्या मागे आला, उगाच बस स्टॉप पर तमाशा नको म्हणून आम्ही कॉफीशॉप मध्ये गेलो तर त्यानी मला चक्क प्रपोज केलं ",......... वीणा
" रेड रोज, अंगठी कुठे आहे, काय म्हटला तो होशील का गं माझी राणी",......... प्रिति
" प्रीती प्लीज जा तू, कामाला लाग मी काही सांगणार नाही, तू मला सारखी चिडवत असते ",...... वीणा
" नाही सांग ग वीणा, मी आता काही बोलणार नाही मध्ये",....... प्रिति हात जोडत होती...... हसत होती
नाही.................
" सॉरी सॉरी, सांग ग, इंटरेस्टिंग आहे ",.......... प्रीती हसू दाबत होती
" इंटरेस्टिंग काय, तिथे माझ काय झालं माहिती आहे, माझे हात पाय थरथरत होते, आणि तू सारखी काय हसते आहे, ऐक ना प्रीती हे बघ आता सिरीयसली सांगते आहे मी समर का माझ्या मागे लागला असेल? किती फरक आहे दोन कुटुंबांमध्ये, कुठे तो परांजपे ग्रुप चा राजकुमार आणी कुठे आम्ही, आज भाजी आहे तर उद्या नाही काय करू मी, किती तो फरक, खरच ते लोक पसंत करतील का मला, आणि तू ही हे चिडवणे बंद कर आधी ",........ वीणा
" जरा तू नीट सांगणार का काय म्हटला आहे समर ",..... प्रिति
" तो म्हटला मला तू आवडते, तुझ कुटुंब मी माझ समजतो, तू अजिबात काळजी करू नको, होईल सगळ नीट वगैरे, मी माझ्या आई-बाबांना पण समर बद्दल सांगितलं आहे ",........ वीणा
"काय बोलते आहेस तू? आई बाबांना सांगितलं? काय म्हटले मग ते? त्यांना आनंद झाला असेल",....... प्रिति
" काय बोलते आहेस तू प्रीती? आनंद कसला होईल ग"?,........ वीणा वैतागली होती
" अगं समर सारखा चांगला मुलगा तुला मिळतो आहे, आनंद होणार नाही का?, तूच वेडी आहे, तू समर चा चांगला विचार कर, नशीबच तुझं दार ठोठावत आहे त्याला नाही म्हणू नको ",......... वीणा
"अगं पण प्रीती कसं ऍडजेस्ट होणार आहे मी तिकडे, किती फरक आहे दोन कुटुंबात, नुसतं राहुल च स्थळ आम्हाला झेपलं नाही, हे एवढे श्रीमंत स्थळ कस होईल ग आणि त्याच्या घरी कोण आहेत काय आहेत ते माहिती नाही, ते लोक मला एक्सेप्ट करतील का? आपल्यासारखे त्यांच्या घरी हजारोने लोक असतील कामाला एवढ्या चांगल्या चांगल्या मुली सोडून समर ला मीच का आवडली",....... वीणा
" तू त्याला तसं स्पष्ट विचारून घे ना मग घरी कोण कोण आहे, तुझी परिस्थिती सांग",....... प्रिति
" नाही मला नाही बोलायच त्याच्याशी, येईल थोडे दिवस मागे वापस चालला जाईल ",....... वीणा
" असं करू नको वीणा चांगला मुलगा आहे तो ",..... प्रिति
" तू ओळखते का त्याला?, लगेच काय त्याची बाजू घेते ",....... वीणा
" नाही ग पण दिसण्यावरून वागण्यावरून कळतच ना की चांगलं कोण आणि वाईट कोण, तरी पण तू एकदा त्याचा विचार करावा",...... प्रिति
"ठीक आहे तू म्हणते तर मी करीन विचार, पण चल आता कामाला नाहीतर सर आपल्याला शोधत ईकडे येतील, आणि त्या प्रशांत समोर हा विषय काढू नको",....... वीणा
" ठीक आहे ",.... प्रिति
" तुझ काय झालं ते स्थळ आल होत ते ",....... वीणा
" होकार आलाय तिकडून ",..... प्रिति
" ओह हो मग हे कधी सांगणार? काही ठरल का पुढचा प्रोग्राम कधी आहे लग्न वगैरे कधी ",....... वीणा
" डायरेक्ट लग्न कस, आधी बैठक होईल",........ प्रिति लाजत होती,.... "बघु या रविवारी आम्ही जाणार आहोत त्यांच्या कडे",
वीणाला आनंद झाला होता..... आता वीणा प्रितीला चिडवत होती....... फोन नंबर काय आहे त्यांचा........सचिन ना नाव...... सचिन प्रीती....... मस्त ग........काय बोलण झाल, आम्हाला ही सांग........ मेसेज तरी दाखव....... चूप ग वीणा....... आता का....... बोल.......
दोघीजणी ऑफिसमध्ये गेल्या, प्रशांत फोनवर बोलत होता तो हसून वीणाकडे बघत होता, ओके ओके म्हणून फोन ठेवून दिला त्यांने नंतर तो वीणा आणि प्रीती उभी होती तिकडे आला आला
"वीणा समर सरांनी तुला तिकडे बोलवलं आहे ",..... प्रशांत
" आता काय आणि नवीन? ",...... वीणा
"त्यांना जे मशीन घेतले आहेत त्या सोबत डिझायनर हि हवा आहे त्यांना, मशीन सेट ऑफ अप होईपर्यंत आपल्याला तिकडे जावे लागेल",........ प्रशांत
"ठीक आहे",...... वीणा
प्रीती हसत होती ,....." कायमचा घेवून जा म्हणा आमचा डिझायनर, बघ वीणा मी म्हणते आहे ना, तू जेवढी त्याच्यापासून दूर पळशील तेवढं तुला तिकडे काम कराव लागेल , करमत नाही वाटतं समर सरांना तुझ्या शिवाय",........
काहीही काय बोलतेस प्रीती? काम करूया का आपण", ?........... वीणा रागाने तिच्या खुर्ची वर जाऊन बसली
आता समरच अति होत चालला आहे, जेवढ आपण त्याच्यापासून दूर जात आहोत तेवढाच तो आपल्या मागे येतो आहे, काय कराव? एकदा बोलून बघावं का त्याच्याशी स्पष्ट? सांगावं की मला अजिबात इंटरेस्ट नाहीये, प्लीज मागे मागे येऊ नका,....... वीणाला प्रचंड टेन्शन आलं होतं
साई इंटरप्राईजेसला फोन करून समर प्रचंड खुष होता तेवढ्या आनंदातच त्यांने दोन-तीन मिटिंग पटापट उरकल्या, आज संध्याकाळी काहीही करून जायचं आणि वीणाला भेटायचं आहे त्याचं ठरलं होतं,
शिपाई आत आला,..... "सर तुम्हाला मॅडम बोलवत आहेत",
आता काय काम असेल मम्मीला?, समर मम्मीच्या केबीन मध्ये गेला, बाहेरूनच जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते, आत मध्ये मम्मी-पप्पा आणि अजून एक सर मॅडम होत्या, समर आत आला तसे सगळे उठून उभे राहिले...
पप्पा पुढे आले त्यांनी ओळख करून दिली,...... " हे आहेत मिस्टर अँड मिसेस अधिकारी, यांची आणि माझी बिजनेस मिटमध्ये दोन वर्षांपूर्वी ओळख झाली, मोठा बिजनेस आहे त्यांचा, फार मोठा विस्तार ते एकट्याने सांभाळतात,
समर समोर पुढे झाला त्याने अधिकारी सर यांच्याशी हातमिळवणी केली, मॅडमला नमस्कार केला आणि तो खुर्चीवर बसला, अधिकारी जोडी समर कडेच बघत होती, समर अजूनच अवघडला, तो कंफटेबल होत नव्हता,
काय चाललं आहे हे..... असे का बघत आहेत माझ्याकडे
अधिकारी सर अत्यंत करारी चेहरा, श्रीमंती त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत होती, प्रत्येक गोष्टीवर बोलण्यावर त्यांची एक वेगळीच पकड होती, कोणीही त्यांच्याशी बोलताना एकदम इम्प्रेस होऊन जात होत, अधिकारी मॅडम ही तशाच होत्या, अतिशय सुंदर, उंच, नाके डोळे सुबक, दोघे पती-पत्नी एकमेकाला अनुरूप होते,
" समर सध्या काय काम सुरू आहे तुझ"?,.......... मिस्टर अधिकारी
"काही विशेष नाही, रोजचेच काम चाललेले आहे",....... समर
"विशेष का नाही, आमच्या समर एकट्याने सगळी कंपनी हँडल करतो, डिसिजन घेतो, ही इज फॉरेन डिग्री होल्डर, गोल्ड मेडलीस्ट",....... पप्पा अभिमानाने सांगत होते
" ओके मोस्ट एलिजिबल बॅचलर, मी इम्प्रेस झालो आहे",...... अधिकारी सर
" आम्ही इथे तुम्हाला इन्व्हाईट करायला आलो आहोत, आमच्या नवीन फॅक्टरीचे उद्घाटन आहे, त्या कार्यक्रमानंतर रिसेप्शन आहे, त्याकरता तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडे यायचं आहे आणि हे आग्रहाचे निमंत्रण आहे ",....... अधिकारी सर
" हो आम्ही जरूर येऊ" ,....... परांजपे सर
ते चौघे बराच वेळ गप्पा मारत होते, नंतर ते जायला निघाले, अधिकारी मॅडम समर कडे सारख्या बघत होत्या
कधी जातील हे लोक असं समरला झालं होतं
........
संध्याकाळ झाली समर वीणा च्या ऑफिस कडे निघाला, वीणा प्रीती निघाल्या होत्या घरी
" वीणा समोर बघ, वाटतय की ती समर परांजपे ची कार आहे",...... प्रिति
"ओह येस नोट अगेन, मी काय बोलणार आहे आता त्याच्याशी, तो का सारखं मागे येतो, तू माझ्या सोबत थांब प्रीती ",......... वीणा
Hi वीणा..... प्रीती
Hi समर सर..... प्रीती बोलली
"सर काय समर बोल सरळ, घरी निघाल्या का तुम्ही दोघी, मी सोडवायला येवू का ",....... समर
" नाही मी जाईन माझी माझी",....... प्रिति वीणा कडे बघत होती
" थांब ना प्रीती आपण कॉफी घेवू या का", ?........ समर
"सॉरी समर मला उशीर होतो आहे, वीणा आणि तू carry on, चल वीणा मी निघते ",....... प्रिति
" प्रीती थांब एक मीनट, मी बोलली ना जाऊ नकोस, मी ही येते तुझ्या सोबत",....... वीणा
"वीणा एक मिनट मला बोलायचा आहे तुझ्याशी",....... समर
" सॉरी समर पण मला त्रास देवू नका मला तुमच्याशी अजिबात बोलायचा नाही",....... वीणा
" मी काय केल आता, मी फक्त कॉफी घ्यायची का हे विचारतो आहे, त्यात काय त्रास दिला",........ समर
" चल प्रिती",....... वीणा
" प्रीती थांब ",...... समर
" काय हे तुम्ही दोघ,...... वीणा तू थांब, नीट बोलून घे, समरशी, मी निघते ",........ प्रीतीने वीणा चा हात सोडवून घेतला तिच्या हातातून, आणि ती निघून गेली
वीणाचा नाईलाज झाला, ती तशीच उभी होती
"चल वीणा ",...... समर गोड हसत होता........
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा