Aug 18, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 14

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 14

 

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा......... 

 

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार..... 

 

©️®️शिल्पा सुतार

....... 

भाग 13

 

https://www.irablogging.com/blog/prit-tuzi-mazi_7046

....... 

 

समर सोहा घरी आले...... 

 

 

 मम्मी पप्पा जेवण उरकून सोफ्यावर बसले होते, आजी आजोबा टीव्ही बघत होते 

 

 

सोहा समर हसत आत आले आणि एकदम गप्प झाले,..... 

 

 

" कुठे गेले होते तुम्ही दोघ, आणि आज सोबत वापस आले",....... पप्पा विचारात होते 

 

 

"सोहाच्या फ्रेंडला भेटायला गेलो होतो",...... समर 

 

 

"ठीक आहे जेवून घ्या दोघ", ...... पप्पा 

 

 

"मी फ्रेश होऊन येते ",...... सोहा

 

 

समर ही रूम मध्ये गेला, दोघ फ्रेश होऊन आले 

 

 

समर सोहाच जेवण झाल, मम्मी समर कडे बघत होती सारखी, समरला समजल ते, पण काही बोलू शकत नव्हता तो, आजीच समर कडे लक्ष होत, समरला ही आजीशी खूप काही बोलायचं होत 

.........

 

दादा घरी आला, खुशीत होता तो, बाबा ही आले, सगळे जेवायला बसले 

 

 

"बाबा आज मला मॅनेजर ने बोलवून घेतल होत, आमचे लवकरच पगार होतील, बहुतेक उद्याच होतील",........ दादा 

 

 

"अरे वा छान बातमी दिली", ..... बाबा खुश होते

 

 

दादा वहिनी कडे बघून सांगत होता..... "आज मला जास्तीचं काम देखील मिळाले, त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळतील" , 

 

 

सगळे खुश झाले घरातले, आईच्या चेहर्‍यावर समाधान होते, प्रकाश अजुन डिटेल्स विचारात होता, खूप आनंद झाला होता त्याला, पण वीणा तिच्याच विचारात होती, तीच जेवणात लक्ष नव्हत, आईच्या हे लक्षात आले होते, जेवण झाल आवरुन झाल 

 

 

 

" चल ग वीणा जरा फिरून येऊ आपण", ..... आई आणि वीणा बाहेर आल्या फिरायला 

 

 

"काय ग काय झालं आज? कसल्या विचारत आहेस, जेवली ही नाही तू नीट, तुमचे ऑफिसची सर आले होते का तुला सोडायला" ?,....... आई 

 

 

"नाही ग आई समर आला होता सोडायला" ,........ वीणा 

 

 

"आज भेटली का तू त्यांना आणि कुठे भेटले तुम्ही",..... ?....... आई 

 

 

" ते ऑफिसची नवीन मशिन घेत आहेत ना, तर आज उरलेल्या दोन मशीनचा परत डेमो होता, तिथे आले होते समर परांजपे ",........ वीणा 

 

 

"मग त्यांनी तुला घरी सोडलं की काय", ?...... आई

 

 

"अग आई मी नाही सांगत होती, पण ते माझ्या मागे मागे येत होते, रस्त्यावर तमाशा नको म्हणून मी आले त्यांच्या सोबत ",....... वीणा 

 

 

" काय म्हटले ग ते ",...... आई 

 

 

" आई अग काय सांगू? त्यांना मी आवडते असे सांगत होते, काय करू आई मी काही समजत नाही मला",........ वीणा 

 

 

" काय समजत नाही आहे तुला? मला सांग", ? ...... बाबा आले मागून 

 

 

तशी आई दचकली...... 

 

 

वीणा आईला बोलली...... "बाबांनाही सांगायचं आहे मला सगळ", 

 

 

"बाबा तुम्हाला माहिती आहे ना आमच्या ऑफिसची मशिन परांजपे अंड कंपनी घेत आहेत त्यांचाच सी ई ओ समर परांजपे मला भेटले होते आज ",....... वीणा 

 

 

" का ग कशाला, झाला का ते डेमो?, डील फायनल झाल की काय? ",........ बाबा 

 

 

"हो झाला बाबा", ..........वीणा 

 

 

" आईने पुढाकार घेतला, त्याचं म्हणणं आहे त्यांना आपली वीणा आवडते ",........ आई 

 

 

" काय सांगतेस काय? स्वतः समर बोलले का , कंपनी मोठी आहे ना त्यांची ",........ बाबा 

 

 

"हो बाबा खुप श्रीमंत आहेत ते ",........ वीणा 

 

 

"काय ठरवलं आहे मग तू पुढे ",........ बाबा 

 

 

"काही नाही बाबा, मी सांगितलं की आपल्यात खूप तफावत आहे, तू श्रीमंत आहेस आम्ही गरीब आहोत आपला मेळ होणार नाही, राहुलच बघितलं ना तुम्ही बाबा आपल्यासारखाच तो मध्यमवर्गीय होता तरीही पैशावरून किती अडचणी आल्या, एवढ श्रीमंत स्थळ म्हणजे कसं होईल "?,........ वीणा 

 

 

"तुला नाही आवडला का तो" ?........ बाबा 

 

 

" नाही बाबा मी तसा विचारच केला नाही त्याबद्दल, मला थोडा वेळ हवा आहे ",........ वीणा 

 

 

" आणि राहुलची काय पैशावरून फिस्कटला आहे का? तुझ्या मनात आहे का राहुल बद्दल काही", ?........ बाबा 

 

 

" नाही बाबा माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे ",......... वीणा 

 

 

"ठीक आहे मग जास्त विचार करू नको, जे होईल ते होईल ",.......... बाबा 

 

 

आई सगळे लक्ष देऊन ऐकत होती...... 

 

 

" तू काहीतरी विचार केला असेलच वीणा, पण मी सांगतो सगळी मुलं सारखीच नसतात, असेल समर परांजपे चांगला, तुला आयुष्यात पुढे जाव लागेल ",........ बाबा 

 

 

"हो बाबा चांगलेच आहेत ते, पण असे आम्ही किती वेळा भेटलो आहोत? एक दोनदा तर भेट झाली, आणि त्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही, त्यांची कंपनी बघितली आहे ना मी केवढी आलिशान आहे... . चकचकीत अगदी पाय ठेवायला ही भीती वाटते तिकडे आणि एवढ्या श्रीमंत मुलाला मी एवढी साधी अशी मी कशी काय आवडली"?,....... वीणा 

 

 

" असं काही नसतं वीणा तू अत्यंत हुशार जबाबदार आणि चांगली मुलगी आहे तू काही सामान्य नाही",........ बाबा 

 

 

" बाबा तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी असंच वाटत, तसं बघितलं तर मला बरंच ऑफिसमधलं कामही जमत नाही काही हुशार वगैरे नाहीये मी" ,...... वीणा 

 

 

" ठीक आहे बघू हा विषय पुढे आपण, पण मला असं वाटतं की तू आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघावं, गरीब-श्रीमंत असं काही नसतं जोडीदार नेहमी समजून घेणारा असावा लागतो, श्रीमंत असले म्हणजे तिथे खूप प्रेम असतं, आयुष मजेत असत अस नाही, समजूतदारपणा कामाला येतो, झाल गेल सोडून द्यायच.... असं होत कधी कधी अचानक प्रेम करणारी व्यक्ती सापडून जाते, तू आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघ वीणा ",...... बाबा 

 

 

" पुरे हम बाबा आता",......... , वीणा लाजत होती 

 

 

" तुझे बाबा बोलता ते बरोबर आहे बेटा, तू नीट विचार कर",....... आई 

 

 

वीणा नीट ऐकत होती सगळ,......." आई मला उद्यासाठी भाजी घ्यायची आहे", 

 

 

" हो चल बघ तुला काय घ्यायचं आहे ते",........ आई 

 

....... 

 

दादा आणि वहिनी फिरायला निघाले होते 

 

 

"मला माफ कर..... सॉरी सविता, एवढ्या सहा महिन्यात खूप चिडचिडा झालो आहे मी, तुझ्याशी वाटेल तसं वागलो मी" ,....... दादा 

 

 

" जाऊ द्या हो, विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती, मलाही समजत होत ती अडचण, पण तुम्ही एकटेच ते सहन करत होता म्हणून माझी धडपड सुरू होती",...... वहिनी 

 

 

" हो...... काय कराव ते समजत नव्हत मला, पण आता नाही, आता आपण एकमेकांना सांभाळून घ्यायचं सविता, बाकीच्या परिस्थितीचा आपल्या नात्यावर परिणाम होता कामा नये, माझ काही चुकलं की सांगत जा, पण अबोला धरू नको, घरात सगळ्यांन समोर नीट बोलता ही येत नाही आपल्याला, तू रागावली की जीव तुटतो माझा",........दादा 

 

 

" हो मी बोलेन या पुढे स्पष्ट, जास्त नका विचार करू, झाल गेल ते, आता या पुढे आपण असंच करू, एकमेकांचे मन नीट सांभाळू ",..... वहिनी 

 

 

" मॅनेजर माझा पगार वाढवायचं म्हणतो आहे, कामही वाढवणार आहे, आपण बाजूची खोली ही भाड्याने घेऊ, रात्रीच आपण तिकडे झोपायला जाऊ म्हणजे तुलाही मोकळे राहता येईल, मला माहिती आहे की मी तुझा कधीच विचार केलेला नाहीये, पण मी तरी काय करणार परिस्थिती आणि पैशाचं सोंग करता येत नाही ",...... दादा 

 

 

वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद होता,... " मला का कळत नाही का ते, काळजी करू नका, खर बोलताय तुम्ही? मी उद्या बोलू का त्या मालकाशी ",... 

 

 

" हो तू बोल, लवकरच ती खोली आपण भाड्याने घेऊ, मुलांना आणि तुला काय लागतं ते पण मागवून घेत जा, पुस्तक शाळेची फी याची काळजी नको",....... दादा......... "आज खरं सांगू का बर्‍याच दिवसांनी बरं वाटतं आहे, पण आपल्याला आलेले पैसे बाबांना वापस करावे लागतिल "

 

 

"हो ते मी तुम्हाला सांगणार हो होती की त्यांचे पैसे देऊन टाकू आपण ",...... वहिनी 

 

 

आईसक्रीमच्या दुकानाजवळ थांबून दादाने आईस्क्रीम घेतलं, फिरत फिरत ते घरी आले 

 

 

त्यांना कोणालाच माहिती नव्हतं की त्यांचे हे चांगले दिवस येत आहे ते केवळ आणि केवळ समर परांजपे मुळेच...... 

 

......... 

 

समरच्या रूमचा लाईट चालू दिसला, आजी आत आली, आजी काय ग? मला बोलवायचं ना, ये ना आत, आजी मला तुला काही सांगायच आहे 

 

 

"बोल ना बेटा ",....... आजी 

 

 

"मी सोहा सोबत आशिषला भेटलो, खूप चांगला आहे मुलगा, मला आवडला, चांगला शिकलेला मेहेनती मुलगा आहे, तो सोहा मस्त राहतील खात्री आहे, आजी मला सोहाची काळजी वाटायची की हीच कस होईल पण आता बर वाटतय",.......... समर 

 

 

आजी सगळ नीट ऐकत होती तिच्या चेहर्‍यावर समाधान होते,......." तुझ्या मम्मी पप्पांनशी कधी बोलणार आहेस तु सोहा बद्दल ", 

 

 

" उद्या बोलतो, मम्मीच काही टेंशन नाही, पप्पा काय म्हणतील काय माहिती ",...... समर

 

 

" आजी दोन मिनिटे बस ना मला तुला एक गोष्ट दाखवायची आहे ",..... समर 

 

 

"बोल बेटा ",....... आजी 

 

 

समरने वीणाचा गुलाबी पांढरा रुमाल आजीला दाखवला 

 

 

" हे काय आता.... प्रकरण बरंच पुढे गेलेल दिसत आहे, आजी हसत होती, तू तर बोलला कि वीणा बोलत नाही तुझ्याशी"?,....... आजी 

 

 

"हो आजी आज मी वीणाला घरी सोडायला गेलो होतो, तिचा हा रुमाल गाडीत विसरली ती",........ समर 

 

 

"मग आता उद्या पासून पूजा का या रुमालाची" ?..... आजी चिडवत होती 

 

 

" आजी प्लीज ",........ समर 

 

 

 आजचा दिवस खूपच छान होता, बर झाल वीणाशी बोलण झाल, ती बोलते तस खरच खूप फरक आहे का आपल्या दोन फॅमिलीत? त्याने मला काही फरक पडत नाही, मी सगळ्यांना सांभाळेन, वीणाच्या घरचे जड नाहीत, मला पहिल्यांदा कोणी मुलगी आवडली आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार, तिच्या लाइफ मध्ये कोणी नाही सध्या, आणी वीणा खूप गोड साधी मुलगी आहे ती सगळ सांभाळून घेईन मला ही घरच्यांना ही, वीणा च्या गोड स्वप्नात समर रंगून गेला होता 

....... 

 

 

वीणा आई बाबा फिरून आले, आवरुन झाल, प्रकाश काही तरी काम करत होता, वीणा त्याच्या जवळ येवून बसली, 

 

 

"काय करतो आहेस प्रकाश"? ,...... वीणा 

 

 

"काही नाही काम दिल आहे ऑफिसने".,........ प्रकाश , 

 

 

"तुझ प्रोजेक्ट च काय झालं"?,.... वीणा , 

 

 

"कशात काही नाही अजून, एक इंजिनिअरिंग युनिट आहे तिकडे केलय परत रिप्लाय अप्लाय उद्या फोन करेन मी",...... प्रकाश 

 

 

"होईल बघ तुझ काम, दादाचा पगार होईल एक दोन दिवसात ",..... वीणा 

 

 

" हो ना ते बर झालं",....... प्रकाश 

 

 

वीणाने पुस्तक वाचायला घेतल 

 

 

 वीणा विचारात होती, काय करायचा पुढे? समर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे का? की अजून फसेन मी त्यात समजत नाही? , आई बाबांना सांगितलाय मी, बाबांना आनंद झालेला वाटला मला, काय करू मी? जर मी समरला हो बोलले आणी त्याच्या घरच्यांनी मला नकार दिला तर, ते लोक श्रीमंत त्यांच्या उठण्या बसणाच्या वागण्याच्या काही पध्दती असतील, जमणार आहे का ते सगळ आपल्याला, कसे असतील त्याच्या घरचे, कोण कोण आहे तिकडे काय माहिती, घर ही बरच मोठ असेल त्यांच, विचार करत वीणा झोपली, 

 

 

सकाळी तयार होवुन वीणा ऑफिसला जायला निघाली, पैसे न्यायला तो सावकार आला होता, त्याला बाबांनी पैसे दिले तो आभार मानून निघून गेला, 

 

 

बाबा आवरुन तयार झाले, ते निघणार तेवढ्यात आई आवरून बाहेर पडली...... 

 

 

"थांबा मला यायचा आहे सामान घ्यायला",.......... आई ,

 

 

 बाबांना ते अपेक्षितच होतं, आई-बाबा बाहेर आले 

 

 

"काय करायचं आहे हो वीणाच"?,...... आई

 

 

"बघू आता पुढे काय होतं ते, तू समर बद्दल बोलतेस ना",........ बाबा 

 

 

"हो, पण एवढ्या श्रीमंत मुलाला आपली मुलगी कशी आवडली, काही चिंता करण्यासारखे नाही ना ", ?....... आई

 

 

"वीणा म्हणजे गुणांची खाण आहे, तिला बघताच क्षणी सगळ्यांना ती आवडते, एवढी समजूतदार मुलगी कोणाला नाही आवडणार, तिकडे पैसेची कमी नाही माणस हवी त्यांना चांगली",....... बाबा 

 

 

" चांगलेच असतील ते, त्यांनी पसंद केलाय वीणाला हे सगळ ठिक आहे हो पण झेपेल का आपल्याला हे स्थळ", ?........ आई 

 

 

" बघू पुढे अजुन काय होतंय ते आत्ताच ठरवायला नको, आणी तु काळजी करु नको ",......... बाबा 

 

 

बाबा ऑफिसला निघून गेले 

........ 

 

वीणा ऑफिसला पोहोचली, ती विचार करत होती की आपण प्रशांतला सांगू की काल बद्दल प्रीतीला काही सांगू नको, उगीच चिडवत राहील ती मला 

 

 

बघते तर प्रशांत आणि प्रीती बोलत बसलेले 

 

 

" या या मॅडम तुमचीच वाट बघत होतो", ...... प्रीती मिश्कील आवाजात बोलली,........ "काय चाललय काय मॅडम? काय लपवत आहात", 

 

 

"मॅडम मॅडम काय आणि", ?... वीणा चिडली होती 

 

 

"आता काय बाबा तुला मॅडम म्हणायला पाहिजे",...... प्रिती 

 

 

"कामाला लाग प्रीती बोर करू नको",...... वीणा 

 

 

तेवढ्यात सर आले सगळे उठून उभे राहिले, सरांनी त्या दिवसाचं काम सगळ्यांना समजून सांगितलं, सर आत गेले 

 

 

तसं परत प्रीतीचा सुरू झालं.... "सांग ना वीणा काल काय झालं?.. झालं का काही बोलणं समरशी", ? 

 

 

"हो झालं ना बोलण, आमचं लग्न आहे पंधरा दिवसात, तयार राहा" ,.... वीणा चिडली होती 

 

 

"असच होउदे",........ प्रीती 

 

 

"गप्प ग",....... वीणा लटक्या रागात होती 

 

 

प्रशांत हि हसत होता 

 

 

"तुला काय झालं आहे प्रशांत हसायला? तू चुगली केलेली दिसते ",........ वीणा 

 

 

"खरंच सांग ना वीणा काल काय झालं", ?.......... प्रशांत 

 

 

" प्रशांत तू ही", ?.......... वीणा 

 

 

" लंच ब्रेक मध्ये सांगते, आता काम करा रे",....... वीणा 

.......... 

 

समर रेडी होऊन नाश्त्यासाठी खाली आला, आजी आजोबा चहा घेत होते, सोहा कॉलेजला गेली होती 

 

 

"मम्मी नाही आली का नाश्त्याला आजी", ?........ समर 

 

 

"हो येईल आत्ताच ",...... आजी 

 

 

तेवढ्यात मम्मी पप्पा आलेच खाली,  

 

 

आता काढावा का सोहा चा विषय? समर विचार करत होता 

 

 

"नाश्ता गार होतो आहे तुझा, कसला विचार चालला आहे समर", ?.... मम्मी विचारत होती 

 

 

मम्मी-पप्पांनी नाष्टा करायला घेतला , पप्पांना अर्जंट कॉल आला, पप्पा उठून साईडला गेले, हीच वेळ आहे समरने विषय काढला 

 

 

"मम्मी मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे",...... समर

 

 

"बोल ना मग, झाली का काल भेट आशिषशी",...... मम्मी 

 

 

" हो भेटला तो",....... समर 

 

 

"कोण भेटले काल"?,....... पप्पा विचारात होते, "काय चाललं आहे", 

 

 

"काही नाही समरला काहीतरी बोलायचं आहे",..... मम्मी 

 

 

"काय रे सांग ",...... पप्पा 

 

 

मम्मी पप्पा दोघे एकमेकांकडे बघत होते 

 

 

" आता आम्ही दोघ आहोत ईथेच तर तुला सांगायचं असेल तर सांगून टाक",..... मम्मी 

 

 

" बहुतेक त्याला मला सांगायचं नसेल", .... पप्पा बोलले 

 

 

नाही पप्पा तसं काही नाही, मला तुमच्या दोघांशी सोहा विषयी बोलायचं आहे, माझ आणि मम्मीच झाल बोलण, त्याप्रमाणे मी काल आशिष ला भेटलो 

 

 

"कोण हा आशिष ",...... पप्पा 

 

 

" सोहा बरोबर आपण तो मुलगा बघितला होता त्याच नाव आशिष आहे ",........ मम्मी 

 

 

"कुठे भेटला तो?, कसा आहे मुलगा, काय म्हणण आहे सोहाच",....... पप्पा 

 

 

 "हो सांगतो आजी आजोबा ना ही बोलवतो, आजी आजोबा ईकडे या, तुम्हाला ही आपला मत द्यायच आहे, सोहाने एका मुलाला पसंत केला आहे आशिष त्याचं नाव आहे, त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे आणि त्या दोघांना लग्न करायचं आहे, मम्मी पप्पा सोहाला तुम्हाला दोघांना कधीची ही गोष्ट सांगायची होती, पण तिची हिम्मत होत नव्हती, मी स्वतः भेटलो आहे मुलाला, मुलगा चांगला आहे इंजिनीयर आहे, MBA झाल आहे, तो त्याच्या बाबांच्या कंपनीत काम करतो इंजिनिअरिंग युनिट आहे ती, "........ समर 

 

 

" तुला पाहिल्या पासून माहिती होते का हे समर ",....... मम्मी 

 

 

" नाही मम्मी मला तू त्या दिवशी सांगितल तेव्हा समजल ",..... समर 

 

 

" काय करू या आता",....... मम्मी आजीला विचारत होती, तुम्हाला काय वाटतं आहे 

 

 

" मुली मुलांच्या सुखा पुढे आपण नाही आहोत, तुम्ही मुलाची सगळी चौकशी करा, जमलं तर भेटायला बोलवून घ्या आशिष च्या घरच्यांना ",...... आजी 

 

 

" हो हे योग्य राहील",........ मम्मी , 

 

 

"पण मला त्या आधी सोहाशी बोलायच आहे थोड",...... पप्पा 

 

 

मम्मी पप्पा यांनी संध्याकाळी परत घरातच बोलायचं ठरवलं 

 

 

ऑफिसला निघायला बराच उशीर झाला होता, मम्मी पप्पा त्यांच्या कामासाठी बाहेर गेले, 

 

 

समर ऑफिसला निघाला, रस्त्यात ही तो वीणाचा विचार करत होता, एकदा सोहाच लग्न झालं की आपलेही लग्नाचं बोलून बघू मम्मी पप्पांशी, विचार करून त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण वीणा अजूनही आपल्याशी बोललेली नाही, मनवु आपण तिला, तिने नकारही दिलेला नाही तसा, आपल्यात कसली कमी नाही, का नकार दिली ती, think positive............ 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now