प्रित तुझी माझी... ❤️भाग 13

समर तिच्या कडे बघत होता, एवढी दमलेली आहे ही तरी किती छान दिसते आहे ही, खूप काम पडत हिला, या पुढे ना?


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
.......

सरांना अर्जेंट काम आल्यामुळे सर ऑफिसला निघून गेले, प्रशांत आणि वीणाने उरलेला डेमो पूर्ण केला, समर उगाच प्रश्न विचारत बसला, नाहीतर डेमो झाला म्हणून ते दोघंही सरांबरोबर ऑफिसला वापस गेले असते आणि समरला वीणाशी बोलायचं राहून गेलं असतं


"डेमो छान झाला, काहीही प्रॉब्लेम नाहीये मशीन मध्ये थँक्यू प्रशांत वीणा, चला मी तुम्हाला दोघांना सोडू का घरी", ?....... समर


"नाही आम्ही जाऊ",...... प्रशांत बोलला


"आता इथून बस स्टॉप बराच लांब आहे, वेळ ही झाली आहे, चला माझ्यासोबत",........ समर ,


Ok......


प्रशांत गाडीत जाऊन बसला, वीणाचा नाईलाज झाला, दोघे समर सोबत गाडीने निघाले, बस स्टॉप आला प्रशांत खाली उतरला, वीणा खाली उतरणार तेवढ्यात समर बोलला.....


" वीणा एक मिनिट मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे",......... समर


वीणाला हे अपेक्षितच होतं, समोर प्रशांत होता म्हणून वीणाला काही बोलता आलं नाही


"बोला सर",....... वीणा


"ईथे नको, आपण कॉफी घेऊया का" ?......... समर


"मला उशीर होतो आहे सर, आपण नंतर बोलुया ",......... वीणा


" फक्त दहा मिनिटे आहेत का तुझ्या कडे" ?......... समरला समजत होतो की वीणा आपल्याला टाळते आहे तरी त्याने हिम्मत सोडायची नाही असं ठरवलं


तेवढ्यात प्रशांतची बस आली, प्रशांत दोघांचा निरोप घेऊन बस मध्ये बसून निघून गेला, वीणा रागाने गाडीतून उतरली, बस स्टॉप वर जाऊन उभी राहिली, समर ने घाईघाईने पुढे जाऊन बाजूला कार पार्क केली, तोही पळत बस स्टॉप वर आला


"वीणा एक मिनिट थांब",....... समर


"सर प्लीज तुम्ही माझ्या मागे मागे करू नका, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये, सगळे लोकं बघत आहेत, कस वाटतय अस वागण",....... वीणा


"म्हणूनच म्हणतो आहे मी की चल जाऊन कॉफी घेऊया",........ समर


"काही प्रॉब्लेम आहे का मॅडम" ?,....... एका माणसाने विचारले


"काही नाही",........ वीणा


उगीच बसस्टॉपवर शोभा नको म्हणुन वीणा समर सोबत कॉफी शॉप कडे निघाली, दोघे एका साध्याशा कॉफी शॉप मध्ये पोहोचले, जवळ तेवढंच एक कॉफी शॉप होतं


" काय घेणार तु वीणा", ?......... समर


" माझा आत्ताच वर्कशॉप वर चहा झाला आहे, मला काही नको, जे काय बोलायचं आहे ते पटकन बोला", ... वीणा घड्याळाकडे बघत होती


तसं समरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं,...... "एवढी काय घाई आहे" ,


वीणाला कळून चुकल तिची काय चूक झाली आहे.... ती गडबडली....." मी जाते", .. वीणा लटक्या रागात म्हणाली


" एक मिनिट थांब ग वीणा, तुला राग खूप येतो का? थोड्या वेळ बस बोलू आपण, मग मी घरी सोडतो तुला",...... समर


वीणा शांत बसून होती


समर तिच्या कडे बघत होता, एवढी दमलेली आहे ही तरी किती छान दिसते आहे ही, खूप काम पडत हिला, या पुढे नाही, आपण वीणाला खूप आरामात ठेवू, सगळी सुख तिच्या पायाशी लोळण घेतील, कसली चिंता नसेल तिला, खूप प्रेम देवू तिला..........


वेटर आला कॉफी घेवून, कॉफी सर्व करून गेला तो


"आपण ओळखतोस एकमेकांना ना.... वीणा",....... समर


वीणाने समर कडे आश्चर्याने बघितलं...


"म्हणजे ओळखत नसेल तर एकमेकाची आता ओळख करून घेऊ... मी समर परांजपे, इंजीनियरिंग एम बी केल, आमचा फॅमिली बिझनेस आहे",.......


"तुम्ही ही तुमची ओळख मला का सांगता आहात.... सर मी ओळखते तुम्हाला ",...... वीणा


" नाही ओळखत तू, बोलत नाही माझ्याशी, आणि मला सर म्हणतेस म्हणून मी माझी पर्सनल ओळख करून देतोय ,मला वाटलं तुला माझ नाव माहिती नाही, तुझ्या घरी कोण कोण असतं वीणा "?,...... समर


" माझे आई बाबा दोन भाऊ वहिनी त्यांची दोन मुले आणि मी, आम्ही सगळे एकत्र राहतो",........ वीणा


" हा जॉब कधीपासून आहे "?,...... समर


" मी एक दीड वर्षापासून आहे या कंपनीत ",....... वीणा


समर मुद्दामून वीणाला बोलत करत होता


" आपण मैत्री करायची का वीणा", ?...... समर


" का पण सर ",...... वीणा


" तू मला आधी हे सर म्हणण बंद कर ",....... समर


"नाही सर ऑफिशियली रिलेशनशिप राहू द्या, मला अजिबात मैत्री वगैरे काहीही करायची नाहीये",....... वीणा


"पण का"?,...... समर


"तुम्हाला माझ्या बद्दल काहीही माहिती नाही सर, मला असं वाटतं की आपण आपली ओळख ऑफिशिअली ठेवलेली बरी ",........वीणा


" मला ओळख वाढवायची आहे, I really like you वीणा, belive me ",....... समर


तशी वीणा उठून उभी राहिली, खूप गोंधळली होती ती, "मला घरी जायचं आहे ",.....


" काय आहे घरी? कार्यक्रम आहे का? प्लीज बस जरा",...... समर


" आम्ही खूप गरीब घरचे आहोत, फार प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे, तुम्हाला जर सगळी माहिती कळली तर तुम्ही माझ्याशी बोलणार सुद्धा नाहीत , आपला मेळ बसणार नाही, उगाच ओळख वाढवण्यात काहीही अर्थ नाही",....... वीणा


" वीणा तू काळजी करू नकोस, आणि कम्फर्टेबल रहा, मला माहिती आहे तू अजून या रीलेशनशीप साठी तयार नाहीस ",....... समर


कॉफी पिऊन झाली समरने बिल भरल दोघ कार कडे निघाले,


" काही तरी बोल वीणा, काय वाटतय तुला ",...... समर


" हे बघा सर तुम्ही खूप चांगल्या घरचे आहात, मला वाटत हे नात न वाढवलेला बर, तुम्ही कधी बघितली नाही एवढी गरिबी आहे आमच्याकडे, आपला कुठल्याच गोष्टीचा मेळ नाही, अजून काहीही नाही तर या गोष्टीचा विचार करा सर तुम्ही",........ वीणा


" आणि मला काय वाटतय ह्याचा विचार कोण करेन वीणा मी एक चांगला मुलगा आहे तुझी परिस्थिती कशी जरी असली तरी मी तुला कधी अंतर देणार नाही प्लीज belive me give me one chance ",........ समर


" तुम्हाला काही माहिती नाही माझ्या बद्दल, माझ नुकताच लग्न मोडल आहे कारण काय तर आम्ही गरीब आहोत, होणारा खर्च झेपला नाही आम्हाला, सर तुम्ही अशी माझी मस्करी करू नका प्लीज leave me alone",........ वीणा


"सगळे मुल सारखे नसतात वीणा आणि मला तुझ्या बद्दल सगळी माहिती आहे, हेच तर बदलायचा आहे आपल्याला, तुला साथ द्यायची आहे, माझं खरोखर तुझ्यावर प्रेम आहे",....... समर


"माझा तुमच्या वर अविश्वास नाहिये, पण माझ कुटुंब खूप वेगळ आहे आपला मॅच नाही होवू शकत",...... वीणा


"एवढ्या घाईने निर्णय नको घेवू, वेळ दे स्वतःला विचार कर, नुसती तू नाही तर तुझी फॅमिली ही मी आपली मानतो",........ समर


वीणाने आश्चर्याने समरकडे बघितलं........


दोघं कारने निघाले, संपूर्ण रस्ता समर विणाला समजावत होता


वीणा ची गल्ली आली, ती कार मधून उतरली आणि भर्रकन आत निघून गेली, समर ती गेली तिकडे बघत राहिला, बाजूच्या सीट वर खरच वीणा इतक्या वेळ आपल्या सोबत होती हे खरच वाटत नव्हत त्याला, एवढ्या वेळ तो एका मुली सोबत होता हे पहिल्यांदाच घडलं होतं, किती छान वाटतं नाही आपल्या आवडत्या माणसं सोबत वेळ घालवायला, समर त्याच विचारात हरवलेला होता, बाजूला लक्ष गेल तर वीणाचा रुमाल पडला होता सीट वर, समरने तो रुमाल हातात घेतला गुलाबी पांढरा तो सुवासिक सुंदर रुमाल, स्वतःवर खुश होवुन समरने गाडी स्टार्ट केली


वीणा घरा जवळ आली तरी तिची धड धड अजून थांबली नव्हती, राहुलला आपण भेटायचो तेव्हा अस कधी व्हायचं नाही ही वेगळीच हुरहूर आहे समरला भेटावं असेही वाटतं आणि नाही भेटावे असेही वाटते, ती दोन मिनट तिथेच उभी राहिली ती मोकळा श्वास घेतला


"काय ग इथे काय करते" ?,......... बाजूच्या काकू विचारत होत्या


"काही नाही काकू", ... वीणा पटकन तिथून निघून घरात गेली


आई ऑर्डरच काम करत होती, मुल अभ्यास करत होते, वहिनी भाजी निवडत होती, दादा, बाबा, प्रकाश आले नव्हते अजून


"काय झाल ताई",....... वहिनी


" कुठे काय, काही नाही",....... वीणा


"चेहर्‍यावरचा रंग उडालाय तुमचा ",...... वहिनी


बाजूच्या काकू आल्याच तेवढ्यात तिथे,......... "काय ग कोण आल होत सोडायला? मोठी गाडी होती चकचकीत, ऑफिस मधले बॉस होते का"?,


"हो आमचे सर आले होते ",........ वीणा


"झाला का ताई फराळ बांधुन की येवू मदतीला",........ काकू


" नाही मी करते आहे, या ना आत " ,.......... आई


"नाही हो कामे पडली आहे घरात, मी येते",....... काकू निघून गेल्या


आई वीणा कडे बघत होती, वीणा आवरायला आत गेली

........
समर घरी आला, खूप आनंदी दिसत होता तो


" काय रे, काय झाल आज"?,......... समर आजी विचारात होती


" आजी तुला एक गोष्ट सांगायची आहे, कोणी नाही का घरात",........ समर आनंदात होता


"नाही सोहा बाहेर गेली आहे, तुझे मम्मी पप्पा एका प्रोग्रामला गेले आहेत",.......... आजी


"आजी आज वीणाला भेटलो मी, बरच बोलण झाल आमचं, माझ्या मनातलं सगळ सांगितल तिला मी, पण ती अजून तयार नाही या नात्या साठी",........ समर आनंदी होता खुप


"वेळ लागतोच रे मुलींना, लगेच कशी हो म्हणेल ती, तू विचारल का तिला लग्ना बदल",........ आजी


"नाही ग आजी, इतक्यात कुठे? ती तर बोलायला तयार नाही माझ्याशी, लग्न लांब राहील",........ समर


" काय म्हणते ती "?,........ आजी


" आपल्यात खूप तफावत आहे, तू श्रीमंत मी गरीब असा बरच काही ",......... समर


होत रे तस, पण मनापासून तु तिला आपला मानल आहे ना, मग प्रॉब्लेम नाही, गरीब श्रीमंत काही नसत, मन जुळणे महत्त्वाचे असते संसारात


आजीने समरला समजावलं खरी आता, पण आता आजीलाही काळजी वाटायला लागली होती, खरंच ती मुलगी खूप गरीब असेल आणि साधीभोळी असेल तर काही खरं नाही या कुटुंबात तीच, तिला अॅडजेस्ट करायला खूप त्रास होईल, पण समर आहे चांगला तिला सांभाळून घेईल


"आजी वीणाला काय वाटत असेल माझ्या बद्दल",........ समर

"आवडत असणार तिला बघ तू, माझ गोड बाळ, जा आता आवरून ये आम्ही थांबलोय जेवायच",...... आजी


तेवढ्यात सोहा चा फोन आला समरला,........ "कुठे आहेस दादा तू"?,.......


मी घरी पोहोचलो आहे, समरला आठवलं की आज संध्याकाळी आशिषला भेटायचं होतं........


" कुठे आहेस तू सोहा, मी पोहोचतो तिकडे ",........... समर


सोहाने कॉफी शॉप चा पत्ता दिला समर आवरून खाली आला

"आता यावेळी कुठे जातो आहे समर",?......... आजी


" आजी थोडं काम आहे सोहा सोबत, ते करून येतो तुम्ही दोघं जेवून घ्या, मला थोडा उशीर होईल, मी मम्मीला सांगतो तसं",....... समर

"ठीक आहे लवकर ये रे घरी",........ आजी


समर ने मम्मीला फोन लावला,......." मी सोहा सोबत आहे आशिषला भेटणार आहे आज, थोडा उशीर होईल यायला, आम्ही दोघे सोबतच येऊ",..........


"ठीक आहे लवकर या दोघांनी",........ मम्मी


"तू कुठे आहेस, आजी वाट बघते आहे घरी ",.......... समर


" हो येतोच आहे आम्ही अर्ध्या तासात घरी, झाला आहे कार्यक्रम ",........ मम्मी
............

" दादा चा फोन होता का तुझ्या ",?....... आशिष


"हो आशिष.... दादा येतो आहे इकडे, तुला भेटायला",......... सोहा


" मला खूप घाबरायला होतं आहे सोहा, मी काय बोलणार आहे समर दादाशी, तो किती हुशार आहे, एवढा मोठा बिझनेस मॅन, मी स्वतः जायला हवं होतं समर दादा ला भेटायला, असं त्याला इकडे बोलवणं चांगलं नाही",......... आशिष


" अरे समर दादा खूप चांगला आहे, तू बघशील ना तो आपल्याला बरोबर समजून घेईल, डोन्ट वरी",........ सोहा

.......
समर कॉफी शॉप ला पोहोचला, एका बाजूच्या टेबलवर सोहा एका मुलासोबत बसलेली होती, मुलगा तर लांबून चांगला वाटत होता, उंच होता हँडसम होता, समर जवळ गेला तसा सोहा आणि आशिष उभे राहिले, आशिष ने समरशी हॅन्ड शेक केला, सोहा दादाला भेटली, काय बोलावं सुचत नव्हतं तिघांना,

"दादा हा आहे आशिष आणि आशिष माझा दादा समर दादा",...... सोहा

आशिष भारावल्यासारखा समर कडे बघत होता,...... "मी खूप ऐकलं आहे तुमच्याबद्दल सर, मागच्या आठवड्यातच तुमचा इंटरव्यू बघितला मी टीव्हीवर, खूप छान माहिती दिली तुम्ही, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, मी तुमची माफी मागतो, खरं तर मीच तुम्हाला भेटायला यायला हवं होतं, तुम्हाला असे इथे बोलावलं",........

"प्लीज आशिष मला सर म्हणण बंद कर, सगळे मला सर का म्हणतात काही कळत नाही (त्याच्या मनात आत्ताही वीणाचे विचार होते) मला तू समरच म्हण",........ समर


"मी तुम्हाला दादा म्हणू का सोहा सारखं",....... आशिष


"हो चालेल पण आहो जाहो नाही घालायच, फक्त समर दादा म्हण",....... समर


आता वातावरण थोडं हलकं झालं, तेवढ्यात वेटर आला, समरने सोहाला विचारलं, काय घेणार तुम्ही?,... सोहाने तिघांसाठी कॉफी संगितली


"कुठे भेटलात तुम्ही, तुमची ओळख कशी झाली, पुढचा काय प्लॅन आहे, सांगा चला पटापट डिटेल्स ",....... समर


तसे आशिष सोहा लाजले....


"दादा please",...... सोहा


"अरे म्हणजे लग्न वगैरे कधी करताय, तुमच्या घरी माहिती आहे का सगळ",......... समर


"हो माहिती आहे, आई बाबांना सोहा पसंत आहे",..... आशिष


"चला एक बाजू क्लीअर आहे, आता प्रश्न आमच्या घरचा आहे",...... समर


"दादा तू बोललास का मम्मीशी"?,....... सोहा


"तुम्ही दोघांनी टेंशन घेवू नका, होईल सगळ नीट, सोहा तुझ MBA बाकी आहे, लग्ना नंतर तुला ते पूर्ण कराव लागेल, आशिष तुझ झालाय ना MBA ",...... समर

"हो दादा माझ झालाय पोस्ट ग्रॅज्युएशन, मी ही हेच बोललो सोहाला, शिक्षण पूर्ण कराव लागेल ",...... आशिष


"आणि लग्नानंतर सोहा तुझी इच्छा असेल तर तू आपला ऑफिस जॉईन करशील I need you",....... समर


"हो नक्की दादा",..... सोहा.,...... आता पुढे काय आता दादा? तू मम्मी पप्पांशी बोल


ठीक आहे मी बोलून बघतो आणि आशिष तुझ्या घरच्यांना तिकडे बोलवून एक मिटिंग अरेंज करू, पण ह्या गोष्टीला थोडा वेळ लागेल, मी अजून मम्मी पप्पांशी नीट बोललेलो नाही अजुन, मम्मीच काही नाही पण पप्पांचा काय म्हणणं आहे अजूनही मला समजलं नाही आणि तुम्ही दोघेही सगळ्या गोष्टीला तयार रहा, माहिती नाही मम्मी पप्पा कसे रिऍक्ट होतील, सोहा तू डोकं शांत ठेव ",..... समर


" हो रे दादा, तू म्हणशील तसंच करेल मी, तू काळजी करू नकोस",...... सोहा


कॉफी झाली आणि ते तिघं निघाले आशिष समर आणि सोहाला कार पर्यंत सोडायला आला


" भेटू मग लवकर आशिष चलो बाय ",........ समर


बाय......


समर सोहा निघाले


" छान आहे ग आशिष ",........ समर


"हो दादा तो मनाने खूप चांगला आहे, तो गरीब असो श्रीमंत असो मला फरक पडत नाही, मला फक्त आणि फक्त त्याच्या सोबत रहायच आहे",....... सोहा


"हो, बरोबर बोललीस तू, प्रेमात अस असत, मन गुंतत, समोरचा असा काही आवडून जातो, आपण भान हरपतो, त्या शिवाय काही सुचत नाही" ,........ समर


" हो ना दादा........एक मिनिट दादा........ काही गडबड आहे का? , तू आज खूप छान छान बोलतो आहेस, आणि आज काल खुप आनंदी असतोस तू",........ सोहा


समर फार हासत होता..........


" नाही ग बाई अस काही नाही ",........ समर


" खोट बोलतोस तू दादा.... खर सांग कोण आहे",..... सोहा


" कोणी नाही, तू तुझ बघ आधी लग्नाच माझ्याकडे लक्ष देवू नको",......... समर परत खूप हसत होता


" नंतर समजल तर बघ दादा, मी कस तुला सगळ सांगते तू काही लपवले तर बघ, आणि तू का हसतो आहेस एवढा",....... सोहा


"काही तरी आहे, पण अजून नाही...... वेळ आली की सांगेन मी तुला ",........ समर


" Yes yes मला वाटला होत, कोण आहे सांग,.... दादा मला खूप आनंद झाला आहे",........ सोहा


" तुला वाटत तस नाही ग अजून",........ समर


म्हणजे??.........


" माझ्या साईडने हो आहे.. तिकडून नाही ",...... समर मुद्दामून तोंड उतरल अस दाखवत होता


" OMG हे काय नवीन, तिला माहिती नाही का, तू कोण आहेस? ........ समर परांजपे...... एवढ्या छान गुणी भावाला होकार द्यायला चक्क वेळ लावते म्हणजे काय?? तुला कोणी मुलगी आवडली म्हणजे ती मुलगी स्पेशलच असेल कोणी, प्लीज नाव सांग",......... सोहा


"चूप सोहा" ...... समर


"आता का?? दादा बोल फास्ट ,......आता शनायाच काय होईल ",......... सोहा उगीच चिडवत होती


" तीच काय मधेच आता" ?........ समर..........." आणि जरा घरी गेल की तोंड बंद ठेव ",


" हे घरी कोणाला माहिती आहे का ", ??......... सोहा


"आजी आजोबांना माहिती आहे फक्त ",...…. समर


" ओह्ह हो,......... दादा तू मला नवीन फोन घ्यायच बोलला होता?? काही आठवत का", ???....... सोहा


" ब्लॅक मेल नको ह....... नाही तर मी तुला मदत करणार नाही, ...... बर ठीक आहे बघु, पण तू प्लीज कोणाला काही बोलू नको",........... समर परत लाजत होता


" ये हुई ना बात येस येस ",........ सोहा


नाव सांग ना दादा वहिनी च.......


नाही.......


दोघ बोलत घरी आले.....
 

🎭 Series Post

View all