Aug 09, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 12

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 12

 

 

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा......... 

 

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार..... 

 

©️®️शिल्पा सुतार

....... 

 

दुसर्‍या दिवशी सकाळी वीणा उठली, आई फराळाच्या तयारीत होती, नवीन ऑर्डर आलेली होती, वहिनी स्वयंपाक करत होती, वीणाच आवरुन झाल, 

 

 

बाबांनी खुणेनेच वीणाला बाहेर बोलावले 

 

 

"तुला काही फरक जाणवतो आहे का दादा मध्ये"?,...... बाबा 

 

 

"काय झालं बाबा"?,....... वीणा 

 

 

"मला असं वाटतं आहे की दादा काहीतरी टेन्शनमध्ये आहे, त्याच आता हल्ली जेवणातही ही लक्ष नसतं, खूप विचारात असतो तो, तुला काही कळलं आहे का? काही करता येईल का", ?.......... बाबा 

 

 

" हो बाबा मला कालच कळलं आहे, त्याकरताच मी सविता वहिनीला बाहेर घेऊन गेली होती, पण प्लीज हे दादाला सांगू नका कारण तो मग वहिनीवर राग काढतो",........ वीणा 

 

 

" काय झालं आहे "?,...... बाबा काळजीत होते 

 

 

" काही नाही त्याचा पगार झाला नाहीये, दोन महिने झाले, घरखर्चासाठी त्याने सावकाराकडून पैसे घेतले, तुमच्या ऑपरेशन साठी सुद्धा त्याने पैसे घेतले आहे, तर आता तो सावकार पैशासाठी तगादा लावतो आहे",........... वीणा 

 

 

"किती आहेत पैसे द्यायचे आहेत?, त्यात एवढं टेंशन घेण्या सारख काय?,...... बाबा 

 

 

"ते माहिती नाही, मी वहिनीला सांगितले आहे की तू दादाकडे त्याची चौकशी कर",........ वीणा 

 

 

"मी विचारू का डायरेक्ट",..... बाबा 

 

 

"नको बाबा",........ वीणा 

 

 

"तुला काय वाटतं तो सविताला सांगेल का? किती पैसे बाकी आहेत असे",........ बाबा 

 

 

"नाही सांगणार",....... वीणा 

 

 

"ठीक आहे मग आपणच बोलून बघू ",......... बाबा 

 

 

तेवढ्यात एक जाढगेलास, सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला माणूस घर शोधत आला 

 

 

" हे रमेश चे घर आहे का ",......... 

 

 

"हो कोण पाहिजे आपल्याला "?,......... बाबा 

 

 

" रमेश इथेच राहतात ना ? माझं त्यांच्याकडे काम आहे",........ 

 

 

"या आत या ",..... बाबा 

 

 

"नाही असू द्या, माझं त्यांच्याकडे काही पैसे बाकी आहेत, ते न्यायला आलो आहे",........ 

 

 

तेवढ्यात दादा बाहेर आला, घाबरल्यासारखा त्या माणसाकडे बघत बघायला लागला, 

 

 

"मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की मी येतो भेटायला तुम्हाला, तुम्ही का आले घरी",....... दादा 

 

 

आई.... वहिनी ही बाहेर आल्या 

 

 

" असुदे रे दादा तू जरा शांत रहा ",....... बाबा 

 

 

" कोण आहेत हे",? ,......... आई 

 

 

वीणा आईला आत घेवून गेली, 

 

 

"तो सावकार आहे आई, पैसे न्यायला आला आहे",.… वीणा 

 

 

" तुमचे किती पैसे द्यायचे आहेत",? ..... बाबांनी विचारले 

 

 

"बाबा तुम्ही थांबा हा माझा हिशोब आहे,.. तुम्ही कशाला आले घरी"?, , ..... दादा काकुळतीला आला होता 

 

 

" तुझं माझं नाही आता काही रमेश, जो आहे तो आपला हिशोब आहे ",..... बाबा 

 

 

" तुमचे 75000 देणे आहे",... 

 

 

" ठीक आहे तुम्ही उद्या सकाळी येऊन पैसे घेऊन जा",....... बाबा 

 

 

" पण उद्या नक्की ना "?,...... 

 

 

" हो शंभर टक्के, मी आता बँकेत जातो आहे वाटलं तर संध्याकाळी सुद्धा येऊ शकता ",...... बाबा 

 

 

" नाही मी उद्या सकाळी येतो",...... 

 

 

तो मनुष्य निघून गेला, बाबा आत आले, दादा डोके धरून बसला होता, आई बाजूला उभी होती, बाबा येऊन दादा जवळ बसले, वीणा आणि वहिनी बाजूला उभी होती, 

 

 

" कशाला रे इतका त्रास सहन करतो तु, आम्ही आहोत ना, एकट्याने सगळं सहन केलं तू, आता काही नाही, आम्ही मदत करणार" ,..... बाबा 

 

 

"सांगायचं ना आम्हाला एवढा त्रास होता तर, आम्ही परके आहोत का"?, .... आई बोलली 

 

 

"आम्ही सगळे मदत करू, हा आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे दादा, घरातील खर्चाच तू एकटा एवढ टेंशन का घेतो"?,..... वीणा 

 

 

" हो बरोबर आहे तरी मी दर वेळी बोलतो घर खर्चाला पैसे मागून घेत चला ",...... बाबा 

 

 

" ऑपरेशनच्या वेळेस मी म्हणत होती की मी देते पैसे तर दादाने ऐकलं नाही", .... वीणा बोलत होती 

 

 

" आणि जर एकमेकाला मदत केली नाही तर आपल्या एकत्र राहण काय कामाचं ",..... बाबा समजावत होते 

 

 

" मला असं वाटतं की घरात मोकळ बोललं पाहिजे, जे काही प्रोब्लेम असतात असतील ते शेअर केले पाहिजे, दादा तू आम्हाला सांगायला पाहिजे होतं हे ",........ वीणा 

 

 

"माझं चुकलं बाबा, आई मला माफ कर, मी असमर्थ आहे आहे हे घर चालवायला, मला काहीही येत नाही, साधा आई-वडिलांनाही मी सांभाळू शकत नाही, मुलांचे पत्नीचे लाड करू शकत नाही, सविताला किती हौस आहे संसाराची, फिरण्याची , पण कधीही काहीही घेत नाही मी तिला, कुठेही नेत नाही, मुलांना ही अपेक्षा असतील माझ्याकडुन, त्यालाही मी पूर्ण पडत नाही उलट त्रास देतो मी सगळ्यांना ",...... दादा रडत होता 

 

 

"अरे असा हाताश का होतोस तू, मुळीच नाही तू एक अतिशय हुशार बाबा आहेस मुलांचा आणि बायकोची तू काळजी घेतोस, आता यावेळी एवढा त्रास झाला आहे, काळजी करू नकोस, होईल सगळ नीट ",........ बाबा 

 

 

वहिनी रडत होती.... 

 

 

"हे बघा कोणी काही टेन्शन घेऊ नका",..... आई 

 

 

"दादा तू हा जॉब करता करता दुसरा जॉब शोध, तुला मिळेल चांगला जॉब, तू हुशार आहेस ",........ वीणा 

 

 

" हो रमेश अजिबात हताश होऊ नकोस आणि आम्ही आहोत तुझ्या बरोबर ",..... बाबा 

 

 

" बाबा मी देते पन्नास हजार रुपये",...... वीणा बोलली, 

 

 

" माझ्याकडेही आहे पंधरा हजार रुपये",..... , आई बोलली

 

 

" झाले तर मग 65000 त साठले ",...... वीणा 

 

 

" कोणीही पैसे देणार नाही आहे माझ्याकडे आहे एक एफडी त्यातून मी पैसे देतो,......बाबा 

 

 

"नको बाबा एवढी एफडी नका मोडू हे 65000 घ्या आणि वरचे 10000 मी प्रकाशला द्यायला सांगते",..... वीणा 

 

 

"हे बोलणं ऐकून दादा परत रडायला लागला, मी माझा पगार झाल्यावर सगळे पैसे परत करेन, 

 

 

" नको दादा वापस करू त्या पैसे ची fd कर मुलांसाठी",...... वीणा 

 

 

" आता पुरे हा विषय, चला नाष्टा करू मला खूप भूक लागली आहे",......... बाबा 

 

 

या सगळ्या गडबडीत वीणाला ऑफिसला यायला उशीर झाला, 

 

 

वीणा ऑफिसला पोहोचली 

 

 

"काय ग वीणा, आज कुठे गेली होतीस? , एवढा उशीर ऑफिसला यायला, ? सरांना सांगितलं होतं का"? ,....... प्रिति 

 

 

"नाही ग, सरांना सांगितल नव्हत, सर विचारत होते का?, अगं खूप गडबड झाली घरी... सांगते नंतर, झाली का कामाला सुरुवात",..... वीणा 

 

 

"दोन नव्या मशीन आल्या आहेत वेयरहाउसला, सरांचा फोन आला होता, तुला विचारत होते सर, तुला डिझाईन रेडी ठेवायला सांगितल्या आहेत, आणि अजून तुला माहिती आहे का वीणा ईकडे आता समर परांजपेचा फोन आला होता, सर तुलाच विचारत होते",........ प्रिति 

 

 

" काहीही काय ग प्रीती मला कशाला विचारतील ते, नवीन मशीन बद्दल विचारत असतील",..... वीणा 

 

 

" अगं खरं तू प्रशांतला विचार, समर सर तुलाच विचारत होते, विचारात होते माझी वीणा अजून का नाही आली"?,.......... ऑफिसला प्रीती हसत होती

 

 

" काहीही काय बोलते प्रीती तू, ऑफिसमध्ये आहोत आपण, जरा सिरीयस रहा", ......... वीणा ने राग आल्यासारखं दाखवलं, दुर्लक्ष केल्यासारखं दाखवलं, पण मनातन ती घाबरली होती.... विचार करत होती, आजही आला का समरचा फोन? काय कराव आता, टेन्शन आलं होतं तिला, 

 

 

समर ऑफिसमध्ये येऊन बराच वेळ झाला होता, कुठल्याही कामात त्याचं मन लागत नव्हतं आज काहीही करून वीणा ला भेटायचं, म्हणून त्याने वीणाला फोन लावला होता , फोन प्रीतीने उचलला, वीणा अजून ऑफिसला आली नव्हती, काय झालं असेल? , का उशीर झाला असेल वीणाला? घरी काही झालं असेल का? तो राहुल का कोण तो भेटला नसेल ना? बरेच प्रश्न समरच्या मनात होते, वीणाचा भाऊ रमेश त्याचं प्रकरण आज सोडवायला हव, प्रकाश साठी स्पॉन्सरशिप च काम बाकी आहे, वीणा ला आपलं मानलं म्हणजे तिच्या घरचे सुद्धा माझी जबाबदारी आहे, तेवढ्यात मिस्टर दीक्षित आत आले, 

 

 

"परेश ऑटोमोबाइल इंडस्ट्री वाले आपल्या ओळखीचे आहेत ना" ?,..... समर 

 

 

"हो सर",....... दीक्षित 

 

 

"त्या कंपनीत काही प्रॉब्लेम आहे का", ?........ समर 

 

 

"माहिती नाही सर",....... दीक्षित 

 

 

"त्यांचा नंबर मिळेल का मला? जरा पाठवून द्या",..... समर 

 

 

परेश ऑटोमोबाईल मध्ये वीणाचा भाऊ रमेश कामाला होता 

 

 

मिस्टर दीक्षितांनी नंबर पाठवून दिला, समर ने फोन लावला, मॅनेजर लाईनवर होते 

 

 

" हॅलो मी समोर परांजपे बोलतो आहे, तुमच्या कंपनीत रमेश काम करतात, त्यांच्या बद्दल बोलायचं आहे तुमच्याशी",...... समर 

 

 

थोडाफार बोलणे झाल्या नंतर समर ने समाधान ने फोन ठेवून दिला, रमेश दादाच काम झाल होत 

 

 

आता समर जवळ वीणाचा मोबाईल नंबर ही होता, करून बघू का फोन कि मेसेज टाकून बघु, आज काहीही झालं तरी मला तिच्याशी बोलायचं आहे, की जाऊनच बघू साई इंटरप्राईजेसला

 

 

ऑफिस मध्ये समरला सोहाचा फोन आला....... 

 

 

"तू आज फ्री आहेस का दादा? , आशिषला भेटतोस का आज? तस सांगू का मी त्याला",....... सोहा

 

 

"मी माझ कॅलेंडर बघून सांगतो, जरा एक दोन महत्त्वाचे कामे आहेत, मी करतो तुला फोन",..... समर

 

 

"ठीक आहे दादा मी वाट बघते, आता काय बाबा तुम्ही बिझी लोक",....... सोहा

 

 

समर हसत होता

 

 

समर ने फोन लावला....," मिस्टर दीक्षित काय झालं ते मशिनच, दोन मशीन राहिले होते ते नंतर येणार होते ते चेक करा", 

 

 

" मशीन आले आहेत तिकडे, आज सांगतो त्यांना मशीन चालवून बघायला, एक वेगळं मशीन आपण सांगितलं होतं त्याचा डेमो बघावा लागेल एकदा सर",....... दीक्षित

 

 

"हो आपल्याला घाई आहे हे त्यांना कळवले नाही का", ?...... समर

 

 

" मी फोन लावतो सर",....... दीक्षित

 

 

मिस्टर दीक्षितांनी साई इंटरप्राईजेस ला फोन लावला, फोन प्रशांत न उचलला 

 

 

" सर बाहेर गेले आहेत",....... प्रशांत

 

 

" ठीक आहे कुठपर्यंत आले आमच्या मशिनच्या ऑर्डर्सच काम? दोन नवीन मशीन सांगितल्या त्या आल्या का", ?.......... दीक्षित

 

 

" सर सगळं रेडी आहे, आल्या आहेत त्या मशीन त्यांचा फायनल डेमो बाकी आहे, तो कधी होतो ते बघून मी तुम्हाला सांगतो",...... प्रशांत

 

 

"जरा लवकर करा",...... दीक्षित

 

 

" ओके",....... प्रशांत

 

 

मिस्टर दीक्षितांनी सगळी माहिती समरला कळवली 

 

 

जरा वेळाने सर वापस आले ऑफिसला, प्रशांतने सरांना मशिनरी साठी फोन आल्याबद्दल सांगितलं, 

 

 

" प्रशांत तू वेअरहाऊसला जायची तयारी कर , बाकीच्या मशीनचा डेमो झाला आहे या नवीन दोन मशीनच बाकी आहेत, वीणा टेलर काकांना फोन कर, त्यांना त्यांना वेअर हाऊस ला यायला सांगा, आजच डेमो पूर्ण करून टाकू, मला दहा मिनिटे द्या, महत्वाचा मेल आहे ते करून येतो म्हणून सर केबिनमध्ये गेले",........ सर

 

 

पंधरा मिनिटांनी सर बाहेर आले,........ " प्रशांत विणा आपल्याला दहा मिनिटात निघायचा आहे, मशीन नीट चालतंय का ते बघून टाकू आणि वीणा तू डिझाईनच्या सोबत घे "

 

 

" यस सर",...... वीणा

 

 

" प्रीती तुम्ही आज ऑफिसच काम बघा, सगळ्यांची काही गरज नाही आहे डेमो ला",......... सर

 

 

"हो सर",........ प्रीती हसून वीणाकडे बघत होती

 

 

वीणा......प्रशांत ,सरांसोबत ऑफिस मधून गेले, दोघी मशीनचे डेमो छान झाले, मस्त चालत होत्या मशीन, सर खुश होते, ही ऑर्डर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे बरं झालं या नवीन मशीनही नीट चालत आहेत , वीणाने छान डिझाइन्स टेलर काकांना दिल्या होत्या, डेमो सक्सेसफुल झाला, सर खुश होते, 

 

 

सरांनी समरला फोन लावला 

 

 

"तुमच्या दोघी मशीन साठीचा डेमो सक्सेसफुल झाला आहे, आम्ही आता तिकडेच आहोत वेयर हाऊसला, तुम्हाला बघायच्या असतिल तर या आता" ,..... सर

 

 

"ठीक आहे, मी येतो तिकडे पंधरा मिनिटात मला बघायचं आहे मशीन",....... समर

 

 

"ओके आम्ही थांबतो, म्हणजे आज हे डेमो संपून जाईल",....... सर

 

 

" मला पुढेही मशीन रेग्युलर सुरू होईपर्यंत तुमच्या मदतीची गरज आहे",...... समर

 

 

त्या दोघांचं बोलणं वीणा ऐकत होती.... आता हा कशाला येतो आहे इकडे, त्याला तर चान्स हवा आहे इकडे यायचा, वैतागच आला आहे, आपल्याला काय जाऊ दे, त्याला मशिन घ्यायची आहे तो बघणारच मशीन, आपण डेमो द्यायचं काम करू, त्याच्यासमोर कॉन्फिडन्स वीक होतो, तो माझ्याकडेच बघत बसतो, विचार करूनच वीणाला लाजायला झालं, आपण असं करूया का त्याच्याकडे बघायलाच नको, थोड अनोळखी व्यक्तीला प्रेझेंटेशन देतो आहे असं करून..... वीणा विचार करत होती

 

 

वेअर हाऊस ला जायला मिळतय म्हणून समर आनंदात होता, यावेळी त्याने मुद्दामच कोणालाही सोबत घेतले नाही, त्याचा विचार होता की चान्स मिळाला तर वीणाशी बोलून बघू...... तेवढ्यात परत सोहाचा फोन आला, 

 

 

"दादा काय करायचे आज भेटतो आहेस का आशिषला"?,........ सोहा

 

 

"मला आता एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी जावे लागणार आहे, एक काम कर आज रात्री नाहीतर उद्या दुपारी नक्की भेटू आपण",...... समर

 

 

"ठीक आहे, मी विचारते आशिषला, त्याला जर असं साडेसात आठला वेळ असेल तर आपण भेटू",......सोहा 

 

 

" हो चालेल तसं मला कळव",....... समर

 

 

समर पोहोचला वेअर हाऊसला सरांनी स्वागत केलं, टेलर काका अजुन थांबले होते 

 

 

" वीणा समर सरांना डेमो दाखव",....... सरांनी सांगितले तस समर ची कळी खुलली 

 

 

" Yes सर या ईकडे",..... वीणा

 

 

समर मशीन जवळ गेला, 

 

 

" हाय वीणा",...... समर

 

 

" हॅलो सर ",...... वीणा 

 

 

"तू मला सर नको बोलत जाऊ वीणा",....... समर

 

 

"आपण डेमो बघूया का"?,...... वीणा 

 

 

"ठीक आहे तू म्हणशील तसं ",...... समर

 

 

वीणा ने समर कडे रागाने बघितल, समर हसत होता

 

 

तेवढ्यात प्रशांत तिथे आला आणि नवीन मशीन ची माहिती सांगू लागला, टेलर काकांनी भराभर पॅटर्न शिऊन दाखवले, प्रशांतने टेक्निकल माहिती अतिशय छान देत होता, समर सगळं ऐकून घेत होता, वीणा बाजूला उभा राहून सगळं ऐकत होती, 

 

 

सरांना फोन आला,......... "मला अर्जंट जावं लागेल मिस्टर समर", 

 

 

"यू कॅरी अॉन सर",....... समर

 

 

"प्रशांत समर सरांकडे लक्ष दे",........ सर

 

 

"येस सर",........ प्रशांत

 

 

सर निघून गेले............. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now