प्रित तुझी माझी... ❤️ भाग 1

पन्नास साठ घराची दोन मजली चाळ, दोन दोन खोल्यांची घरं , एका घरात आठ नऊ माणसं एकत्र राहत होती, मध्यम


पन्नास साठ घराची दोन मजली चाळ, दोन दोन खोल्यांची घरं , एका घरात आठ नऊ माणसं एकत्र राहत होती, मध्यमवर्गीय वस्ती होती ती, पहाटेची वेळ , पूर्ण चाळ निद्रावस्थेत....साखर झोपेत....


पहाटे पाचचा अलार्म झाला होता .... वीणा ने एका हाताने अलार्म बंद केला आणि आळस झटकत उठून बसली.... केसांना एकत्र पकडत वरती बांधत ती खिडकी जवळ गेली....खिडकीचे दार उघडले तशी पहाटेची गार फ्रेश हवा तिच्या चेहऱ्यावर आली, आकाश खूप सुंदर भासत होतं, सगळीकडे तांबड पसरले होते, रोज सूर्योदय होईपर्यंत वीणाच सगळं आवरत होत, नंतर ऑफिस.. रोजची कामाची धावपळ म्हणून हा सकाळचा वेळ तिचा होता, तोच फ्रेशनेस अनुभवून तिची दिवसाची सुरूवात प्रसन्न होत होती


वीणा पटापट स्वतःच आवरून रेडी झाली, डबा तयार केला. थोड्या वेळातच आई उठली .


" एकटीनेच आवरल का?मला उठायचं होतं ना" ...आई


" हो ग आई तुझी दिवसभर धावपळ असते, काल ही वेळ झाला तुला आवरायला... करत जा आराम"...वीणा डब्बे भरत बोलली ..


छान आवरुन वीणा देवा समोर उभी होती, श्री स्वामी समर्थ यांच्या तसबिरीला हार घातला फुले वाहिली, निरंजन ओवाळले, आईने वीणा सोबत नमस्कार केला.... " श्री स्वामी समर्थ"


तर ही आहे वीणा , आपल्या कथेची नायिका, पाणीदार काळेभोर डोळे अगदी कुणाच्याही मनाचा ठाव घेतील असेच, चाफेकळी नाक , नाजूक ओठ , लांब केस ... खूप समंजस.....परिस्थिला अगदी सांभाळून वागणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी ..


वीणा नुकतीच ग्राजुएट झाली होती ..तिला पुढे शिकायचं होते पण घरची परिस्थिती लक्षात घेऊन तिने जॉब सुरू केला होता, तेवढाच घरी खर्चाला हातभार


गुलाबी ड्रेस, कानात मोत्याच्या कुड्या, छान वेणी घातलेली, खूप प्रसन्न दिसत होती ती, हुशारी चेहर्‍यावर होती तिच्या,


"वीणा चहा न घेता जाऊ नकोस", आई बोलली


" हो आई झालीच आहे पूजा "... वीणा


इकडे बाथरूम मध्ये भांडण सुरू होत.... विणाच्या मोठ्या भावाच्या.....रमेश दादाच्या मुलांच


"आजी सांग ना हिला लवकर आवरायला, उशीर होतोय शाळेत जायला, माझा क्लास सुरू होईल", अभि आरु वर ओरडत होता


" भाऊ बहिणीची जोडी तशीच आहे तुझ माझ जमेना तुझ्या शिवाय करमेना..... आटोप ग आरू " छोटेसे अभी आरू शाळेत आहे, एकच बाथरूम, त्यात सगळ्यांना सकाळी शाळा ऑफिसला जायच असत म्हणून धावपळ होते


" हो तुला लवकर उठायला काय होत मग, रोजच आहे आधी उठत नाही, नंतर घाई करतो सगळ्यांना " सविता वहिनी चिडली होती


एकतर लहान  दोन रूमच घर, त्यात सगळे एकत्र, परिस्थिती जेमतेम होती त्यांची, घर स्वतच नव्हत, घरात वीणाचे आई बाबा, मोठा भाऊ रमेश , सविता वहिनी, त्यांची दोन मुल ,छोटा भाऊ प्रकाश, सगळे एकत्र कसे काय राहतात, काय माहिती?


रोज सकाळ अशीच होते त्यांची, पहाटे पाचला आई उठते, डब्बे न्यायचे असतात सगळ्यांना, वीणा तिचा भाऊ रमेश, बाबा ऑफिसला जातात, प्रकाश ही छोटी नौकरी करतो, वीणा सारखी त्याची नौकरी चांगली नाहिये, तो ही ग्रॅज्युएट आहे, पण त्याच फारस कामावर कोणाशी पटत नाही, दर 6 महिन्यांनी तो नवीन काम शोधतो, प्रकाशच एक ना धड भाराभर चिंध्या अस झाल आहे, पण दोघ भावांचा वीणा वर खूप जीव आहे,


वहिनी घरी असते, ती विशेष काही घरकामात मदत करत नाही. घरातील परिस्तिथीचा राग ती नेहमी सगळ्यांवर काढत असते .तिला कधी नवर्‍या सोबत एकटे आरामात राहायला मिळल नाही, हौस ना मौज, परिस्थिती अशी आहे, सासर माहेर दोन्हीकडे सारखी , ती त्यात भरडली गेली होती , तिची चूक नव्हती त्यात, पण ती आनंदी नव्हती, मागितलेल सामान मिळत नव्हत, हातात पैसे नाही, वहिनी त्यामुळे वैतागलेली होती , तीच कधीच आवरलेल नसत, काम ही हळू हळू , कोणी केलेल्या कामात कुचपट  काढायच काम फार छान येतं तिला, सगळे तिच्या स्वभावाला कंटाळले होते


आईचा फराळ करायचा बिझनेस होता, कधी स्वयंपाकाच्या ऑर्डर घ्यायच्या त्या, कोणीही जाऊन ऑर्डर डिलीव्हरी करून यायचं घरपोच ऑर्डर द्यायचे ज्यादा पैसे घ्यायचे ते, नेहमी लहान मोठ्या समारंभाच्या ऑर्डर मिळायच्या त्यांना, तेवढीच संसाराला हातभार,


आई , वीणा वहिनिकडे दुर्लक्ष करायच्या, रोज उठून भांडण नको वाटायचे, वीणाला दादाची काळजी वाटायची,


चहा नाष्टा आईनेच बनवला, वहिनी दादाशी काही तरी बोलायचा प्रयत्न करत होती , उगीच वाद नको म्हणून दादा दुर्लक्ष करत होता


दादाला माहिती होतं वहिनीला काहीतरी हवं असणार उगीच भांडण नको सगळ्यांसमोर म्हणून तो आता गप्प होता


"आवरलं का मुलांनो".... वहिनीने घोषा लावला,
रोज शाळेत जायला उशीर होतो, कधीच आवरत नाही कार्टी लवकर, तिने मुलांना चहा नाश्ता दिला, बाहेर रिक्षा आली तेवढ्यात.... मुलं आवरून शाळेत गेल


दादाची पण तयारी झाली ऑफिसला जायची
आई येतो ग मी,.... तो निघाला,... तशी वहिनी दादा मागे पळत गेली, काही तरी बोलायचा असेल.


"झाला का पगार काल? तुम्ही विचारला का काही पैशाबद्दल ऑफिस मध्ये " ? वहिनी विचारत होती,


"नाही झाला, मी लोन बद्दल विचारू का ऑफिसमध्ये, लग्ना साठी लागतील पैसे " ?..... दादा वहिनीच्या होकाराची वाट बघत होता


वीणाच लग्न ठरलं होतं, त्याच्या खर्चासाठी दादा लोन घ्यायचा विचार करत होता


" नाही अजिबात नाही, आपण लोन घ्यायचं नाही, ते लोन कसं फेडणार आपण? आधीचे ते सावकाराचे पैसे द्यायची बाकी आहेत आपले, लक्षात आहे ना तेव्हा ही तुम्ही असच केल, प्रकाश वीणा पैसे देत होते ते ही घेतले नाही तेव्हा बाबांनच्या ऑपरेशनच्या वेळी, आणि आमचा काही विचार आहे की नाही? मुलं मोठी होता आहेत, त्यांचा शाळेचा खर्च आहे, सगळे पैसे घरातच खर्च नका करू, वीणा काय लग्न होऊन सासरी जाईल, इकडे सगळा खर्च आपल्या वाटेवरच येईल", वहिनी चिडली होती


" अगं मग कसा होईल लग्नाचा खर्च? आणि ते काय परके आहेत का? असा संकुचित विचार का करते? जरा समजून घे",..... दादा समजावत होता


" आई-बाबा आहेत ना ते बघतील, इतक्या वर्षाची शिल्लक असेल ना काही त्यांची, वीणा प्रकाश ही नौकरी करतात, नाहीतरी ते आई बाबांनी साठवलेले पैसे कधी वापरणार आहेत?? मी त्यादिवशी ऐकलं आई सांगत होत्या बाबांना पैसे विषयी, आहेत त्यांच्याकडे",..... वहिनी चिडली होती


" सविता....... जरा तोंड सांभाळून बोल, मला तुझे हे असे विचार अजिबात आवडत नाहीत, जरा तरी वीणाचा विचार कर",..... दादा रागाने ऑफिसला निघून गेला
........

"आई आज मला ऑफिसहुन यायला उशीर होईल"..... वीणा

" राहुल रावांना भेटणार आहेस का?" ...आई


राहुल वीणा च्या होणार्‍या नवऱ्याच नाव आहे


" हो "...वीणा बोलली


" कालच राहुलच्या आईचा फोन आला होता, बघते काय म्हणताय ते"....तेवढ्यात वीणाचा फोन वाजला, "आई येते ग मी" फोनवर बोलत वीणा ऑफिसला निघाली,


हॅलो राहुल "निघतेच आहे मी ऑफिसला.... आपण भेटू संध्याकाळी"


फोन वर बोलत बोलतच वीणा जवळचा बस स्टॉप होता तिथे आली....तिचा हा नेहमीचा बस स्टॉप... तिथून ती बस घ्यायची, बस मध्ये तिची प्रिय मैत्रीण प्रीती


दोन महिन्यापूर्वीच वीणाच राहुलशी लग्न जमलं होतं, अरेंज मॅरेज होत ते, जवळच्या नातलगांनी हे स्थळ आणल होत, राहुल चांगल्या ठिकाणी नोकरीला होता, राहुल तसा चांगला मुलगा होता पण त्याच्या घरच्यांच्या या लग्ना कडून फार अपेक्षा होत्या, आमचा एकुलता एक मुलगा आहे, लग्न थाटामाटात झाले पाहिजे असा आग्रह होता, राहुल आणी त्याची फॅमिली लग्न जमवतांना बोलले की आम्हाला काही नको फक्त लग्न करून द्या, पण आता मात्र त्यांच्या मागण्या वाढत चालल्या आहेत, रोज एक एक सामान पैसे मागतात ते, वीणा प्रचंड त्रासली आहे यामुळे, सामान्य परिस्थितीत वीणाच्या आई-वडिलांना हे जमण्यासारखे नव्हत, रोजचा खर्च कसा तरी ते करत होते, पण राहुलला  वीणा पसंत होती म्हणून त्यांनी राहुलच्या घरच्यांकडे दुर्लक्ष करायचं ठरवल .



विणा ऑफिसला आली, ऑफिसचे काम सुरू झालं. अतिशय व्यवस्थित काम करत असल्यामुळे बॉसला तिचं काम पसंत पडायचं, तिच्या शिवाय ऑफिसच्या लोकांचा पान ही हलायचा नाही, कामाचे वेळी इतर गोष्टींकडे तिचं लक्ष नसायचं त्यामुळे ती ऑफिसमध्ये आवडीची होती,


टी ब्रेक झाला तशी प्रीती वीणा जवळ आली, चल ना वीणा आपण चहा घेवू ... प्रीती बोलली


प्रितीला वाटल होत वीणा टेंशन मध्ये आहे, पण अति चांगल्या स्वाभावामुळे ती काही कळू देणार नाही, प्रितीला वीणाची काळजी होती


प्रीती , अगं थांब पाच मिनिट काम आहे.......वीणा


काय झालं वीणा? काही विचारात आहे का? ...प्रीती


काहीच नाही ग ... पण वीणाचा चेहरा सगळ सांगत होता


घरी सगळं ठीक आहे ना?... प्रीति विचारत होती


हो , का ग?" ....वीणा


तू शांत वाटते आहे आज....प्रीती


नाही तसं काही नाही ...वीणा


वहिनी काही बोलली का नाही ग? ...प्रीति अंदाज लावत होती


तुला तर माहिती आहे ना मी लक्ष देते का वहिनी कडे आणि वहिनीच्या मनात काही नसत ग ....वीणा


राहुलचा काही फोन ? ...प्रीती


तू ना प्रीति डिटेक्टिव व्हायला हव होत प्रीती किती ते
प्रश्न?...वीणाने डोक्याला हाथ लावला,


So I got it....... प्रीतिने ओळखल


काय म्हटला राहुल, भेटायला बोलावलं की काय एकटीला?, तरीच रंग उडालाय चेहर्‍यावरचा... प्रीती उगीच वातावरण हलक करत होती

तू अगदि अश्यक आहेस प्रीति काम करू दे ग बाई, सांगते लंच ब्रेक मध्ये....वीणा



लंच ब्रेक झाला वीणा आणि प्रीती जेवायला गेले, काय झालंय आता सांगणार का?


हो बाई सांगते, काल फोन आला होता राहुलच्या घरून, परत पैशाची मागणी झाली आहे , साड्या खरेदी बाकी आहेत, घरी काय सांगणार आहे मी, वैताग आलाय, नाही होत ग आता एवढा खर्च ..... वीणा


तू एकदा सगळं सांगून का देत नाही त्यांना की एवढा खर्च जमणार नाही , ठरल्या पेक्षा जास्त मागण्या वाढल्या,....... प्रिती चिडली होती


हो ना, काय बोलणार आता, काही इलाज नाही,... वीणा विचार करत होती


तुझ्या या चांगुलपणाचा जास्त फायदा घेत आहेत ते , प्रिती चिडली होती, राहुल चांगला आहे ग स्वाभावाने पण तो त्यांचा आई बाबांच ऐकतो, अति आहारी जातो त्यांच्या, हेच पुढे जावून त्रास दायक होणार आहे, विचार करायला हवा मला


आता पुढे काय ठरवलं आहेस मग तू.... प्रिति


बघू आता जे होते ते.... वीणा
.....

 

🎭 Series Post

View all