Aug 09, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 11

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 11


"ऐक ना प्रीती, आज मी दहा पंधरा मिनिटे लवकर निघणार आहे ",......... वीणा


"का काय झाल"?,........ प्रिति


"अगं दादाचं काहीतरी बिनसलं आहे, बरेच दिवस झाले",....... वीणा


"काय झालं आहे दादाला"?,....... प्रिति


"तेच तर जाणून घ्यायच आहे वहिनी कडुन.... अगं घरी दादा आम्हाला बोलूच देत नाही, वहिनीने काही सांगण्याचा प्रयत्न केला की की तो गप्प बसवतो",......... वीणा ,


" हो घे भेटून वहिनीला, बघु काय चालल आहे ते, काही प्रॉब्लेम असेल तर मलाही सांग, मी ही मदत करेल",....... प्रिति


" हो गं तू तर आहेस",...... वीणा
.......

वीणा ऑफिस मधून लवकर निघाली, दादा ही लवकर घरी आला, मुलांचं खाणं करून आई आणि वहिनी ही देवळात यायला निघाल्या, दादा बघत होता वहिनी कडे पण ती पुढे निघून गेली


वीणा लवकर देवळात पोहचली, देवाचं सावकाश दर्शन घेतलं, अगदी शांत वाटत होत देवळात, तिथे डोळे मिटून वीणा शांत बसली, किती छान वाटतं नाही देवळात, अशी शांततेत स्वतःची स्वतःला नव्याने ओळख होते, असा वेळ नेहमी काढायला हवा, देवळात आल की मनात काहीही विचार नसतात, भगवंताला पूर्ण समर्पण असत, येणाऱ्या जाणाऱ्यांकडे वीणा बघत होती, असच शांततेचा आयुष्य गेलं तर किती छान होईल ना, आपल्याकडे एकही दिवस असा नसतो ज्या दिवशी टेन्शन नसतं, कोणाचं काहीतरी बिनसलेले असत, सगळे आहे त्या परिस्थितीत अडकलेले आहेत, प्रेम खूप आहे सगळ्यांमध्ये पण थोड्या थोड्या गोष्टीवरून सगळं अडत, दादा वहिनी तर एवढ्या मोठ्या कुटुंबात अडकून गेले आहेत, त्यांना प्रायव्हसी नाही, त्यांच एकमेकांशी बोलण होत नाही, मग भांडतात ते नेहमी, प्रकाश अत्यंत हुशार असून त्याच्या हुशारी ला वाव नाही आईला तर विश्रांतीच नाही, बाबा ही या वयात किती काम करतात, वीणा विचार करत होती, नकळत तिचे डोळे भरून आले, थोड्या वेळाने आई आणि वहिनी येतांना दिसल्या........


आई आणि वहिनीने देवाचं दर्शन घेतले, त्या मागे जाऊन बाकावर बसल्या, मागच्या बाजूला छोटी सुरेख बाग होती, आईने वीणाला प्रसाद दिला


"दादा आला का ग घरी",......... वीणा


"हो तो आला मग निघालो आम्ही",.....… आई


"वहिनी सांग काय झालं आहे दादाला? का एवढ भांडण होतय तुमचं",........ वीणा


"अहो ताई काय सांगू तुम्हाला.... मागे दोन महिन्यापूर्वी बाबांचं मोतीबिंदूचे ऑपरेशन केलं ना, तेव्हापासून यांचा पगार झाला नाही, बाबांच ऑपरेशन महत्त्वाचं होतं म्हणून यांनी सावकाराकडून कर्ज घेतले, घरखर्चासाठी म्हणून परत लागोपाठ दोन महिने कर्ज घेतलं, अजून यांचा पगार झालेला नाही, आता त्या सावकाराने पैशासाठी तगादा लावला आहे, कुठून देणार त्याला पैसे, तो धमकी देतो आहे",........ वहिनी


" मग आम्हाला सांगायचं ना.... आम्ही मदतीला तयार असतो, एवढा त्रास का करून घ्यायचा",......... वीणा


" हो ग सविता घर खर्चाचे पैसे मागून घ्यायचे",....... आई


" मी हेच म्हणत होते यांना की सगळे करतात मदत, आणी आपण एकत्र कुटुंबात राहतो, सुखदुःख सगळं शेअर करायला हव, सांगायला हव, आपला प्रॉब्लेम तो सगळ्यांचा प्रॉब्लेम, आई-बाबांना सांगितलं तर काहीतरी मार्ग निघेल, पण हे ऐकायला तयार नाहीत, त्यांचं म्हणणं आहे कि मी बघेल काय करायचं ते, त्यामुळे ते सावकाराचा फोन आला की टेन्शनमध्ये असतात, मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, पण हे बोलूच देत नाहीत, मला ही धमकी दिली आहे की जर मी घरी तुम्हाला सांगितलं तर ते मला माहेरी पाठवून देतील, तर आता ताई मी तुम्हाला हे सगळं सांगितला आहे असं सांगू नका",........ वहिनी


" पण मग आम्हाला कसं कळलं हे काय करायचं पुढे",....... आई


" आता दोन-तीन दिवस आपण गप्प राहू, मी बघते काय करायचं ते, आई तू बाबांना काहीही सांगू नको यातलं, मी बघते काय करायचं ते, साधारण किती पैसे बाकी असतील वहिनी"? ,....... वीणा


" ते मला काहीच माहिती नाही ताई, हे सांगत नाही त्या बद्दल आणि मला ही बोलू देत नाहीत",........ वहिनी


" तू एक काम करशील वहिनी, दादा कडून रक्कम द्यायची आहे ती माहिती काढशील, आणि गोडीगुलाबीने माहिती काढ उगीच भांडू नका तुम्ही ",.......... वीणा


"हो भांडू नका तुम्ही दोघ, आमचा जीव तुटतो तुमच भांडण बघून, माझ्याकडे ही आहे थोडे पैसे मी देते",....... आई


"मी पैसे लागले तर सांगते तुला आई, पण वहिनी तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना",....... वीणा


" हो ताई तुमचा आधार आहे, पण प्लीज मी सांगितलं हे सांगू नका ",........ वहिनी.........." आई आम्ही नाही भांडणार, तुम्ही काळजी करू नका "


" नाही भांडणार ते, तू टेन्शन घेऊ नको आई, चला आता आपण ज्यूस पिऊ या ",........ वीणा


तिघीजणी हॉटेलमध्ये गेल्या


"वहिनी घे तु तुला जे घ्यायचं ते ",....... वीणा


ताई तुम्हीच द्या ऑर्डर, आई तुम्ही काय घेताय",...... वहिनी


"नाही ग वहिनी तू सांग",...... वीणा


"सँडविच घ्या ना ताई मला खूप आवडत",...... सविता वहिनी


वीणाने 3 ज्यूस आणि सँडविच ची ऑर्डर दिली


आज बऱ्याच दिवसांनी तीही तिघी मस्त एन्जॉय करत होत्या, वहिनी ही खुश होती, आईला दोघींकडे बघून समाधान वाटत होते, ज्यूस पिऊन झाल्यानंतर मुलांसाठी खाण्याची ऑर्डर दिली, पार्सल घेऊन त्या घरी निघाल्या,


"मी पुढे निघते" .... वीणा बोलली,.... "तुम्ही पंधरा-वीस मिनिटांनी या, सोबत नको जायला",........


"हो ताई, पण काही सांगू नका घरी",....... वहीनी


"नाही हो वहिनी तुम्ही काळजी करू नका ",..... वीणा


वीणा घरी आली मुलांना आणि दादाला खाण्याचं सॅंडविचेस दिले


"आई आणि वहिनी आली नाही का अजून?...... वीणाने मुद्दाम विचारात होती


तिने हात पाय धुऊन कुकर लावला, तेवढ्यात बाबा ही आलेच, आई वहिनी आल्या",.........


" मम्मी आत्याने आज ही आमच्यासाठी खाऊ आणला",...... अभी


"हो ना पण पोळी भाजी खाण्यासाठी पोटात जागा ठेवा",........ वहिनी


हो.... मुले खेळायला पळाले


दादा काहीतरी हिशोब करत होता


" काय लिहित असतो तू सारखा"?, .... बाबांनी विचारले


" काही नाही बाबा" ,........ दादा दचकला


" सध्या ऑफिसचे काम घरी आणतोस का? काय सुरू आहे तुझ? कधीच बघतो आहे? तू नीट जेवत ही नाही, काही प्रॉब्लेम आहे का", ?........ बाबा


"नाही बाबा सगळ ठीक आहे",....... दादा


प्रकाशही आला घरी.......


सगळे जेवायला बसले, जेवण झाल, दादाने वाहिनीला हाक मारली


"चल ग सविता फिरून येवु ",......... दादा


वहिनी अजून नाराज होती, तिने दुर्लक्ष केल


दादाने अभिला आत पाठवल जा मम्मीला बोलव, वहिनी गेली नाही, शेवटी दादा आत येवून परत टीव्ही बघत बसला , वीणा येऊन दादा जवळ बसली प्रशांत तिथेच काहीतरी वाचत बसला होता


"झालं का प्रकाश तुझं काही प्रोजेक्ट च काम", ?....... वीणा विचारत होती


"नाही ग वीणा, त्यांनी दीलेलं कामच मी पूर्ण करतो आहे, एक काम संपलं की दुसरं काम सुरू होतं, माझं प्रोजेक्टचं सोडून सगळं बोलतो आम्ही, ते सर मला इतरच काम देत आहेत",........ प्रकाश


वीणा ला वाईट वाटत होतं, दादा ही सगळं ऐकत होता, आपण मदत करू शकत नाही भावाला म्हणून त्यालाही वाईट वाटत होते, दादाचे स्वतःचे प्रश्नच अजून सुटले नव्हते, तो अजून काय प्रकाश ला मदत करणार, वहिनी आवर सावर करत होती, आज तिच्या चेहर्‍यावर थोडं समाधान होतं
....

समर घरी आला आज मम्मी पप्पा जेवायला नव्हते


सोहा खाली आली


"आज तू चक्क घरी",......... समर


"काय रे दादा, का अस बोलतो, जा फ्रेश हो आपण बसू या जेवायला, तू माझ्या बद्दल कधी बोलणार आहे मम्मीशी",......... सोहा


हो बोलतो ",..... समर


कधी?????....... सोहा


" वेळ तर हवा ना",........ समर


"मग तो वेळ काढणार का", ??....... दादा प्लीज


"हो ग मला विचार करायला वेळ दे, मी फ्रेश होऊन येतो",........ समर


आजी आजोबा आले खाली...


झाल आता कसल होतय दादाशी बोलण, सोहा वैतागली होती, ती फोन घेवून बागेत जावून बसली


समर फ्रेश होवुन आला, आजी जेवायला घेत होती,


" सोहा कुठे गेली",..... समर


"ती काय बसली बागेत ",....... आजी


" मी घेवून येतो तिला",...... समर


समर बागेत आला,....... "काय ग राग आलाय का माझा"?,


"नाही रे दादा पण काहीही मनासारखं होत नाहिये, मम्मीची भीती वाटते, ती अजून माझ्याशी काहीही बोललेली नाही, तू म्हणतोस ना की त्यांना दोघांना माहिती आहे, मग तिने मला काहीच का नाही विचारलं? तिच्या मनात काय सुरु आहे मला काही समजत नाही, मला फारच भीती वाटते आहे, ति डिटेक्टिव पेक्षा डेंजर आहे", ..... सोहा


" काहीही बोलतेस तू सोहा",...... समर हसत होता


तसा समरला मिस्टर प्रभाकरांची आठवण झाली, त्या सोबत वीणाची आठवण झाली, एक गोड स्माईल त्याच्या चेहर्‍यावर आल, केली असेल का त्यांनी वीणाची माहिती गोळा, उगीचच सांगितलं त्यांना..... पण जाऊ दे आपण काही चुकीच काम नाही करत आहोत....


" मी बोलतो लवकर मम्मीशी ..... पण त्या आधी मला आशिषला भेटायच आहे" ,...... समर


"मी विचारते आशिषला, तू तुझ्या मीटिंग कधी आहेत ते बघून सांग उद्या ",...... सोहा


"हो सांगतो, अजून एक तू आजी-आजोबांशी बोलत नाही का? का अशी वागतेस त्यांच्याशी, खूप चांगले आहेत ते",...... समर


"माहीती आहे मला ते दादा, पण आता माझा कुठल्याच गोष्टीसाठी मूड नाहीये",.......... सोहा


जेवताना आजी समर कडे बघत होती त्याने डोळ्याने सांगितला काही बोलू नकोस


जेवण झाले मम्मी पप्पा ही आले सोहा... समर साठी येतांना ice cream आणल होत, मदतनीस मावशींनी ते सगळ्यांना दिल


सोहा काय झाल? कसला विचार चालायला आहे? खा की ते ice cream, मम्मी विचारात होती..... लहान पणी थोड सुधा ice cream द्यायची नाही कोणाला, तिच्यासाठी तिचे पप्पा रोज मुद्दाम खाऊ आणायचे


आजी कौतुकाने बघत होती..... सोहा येवून मम्मी जवळ बसली


"Ice cream संपलं असेल तर आराम करा आता",....... पप्पा बोलले


आजी आजोबा रूम मध्ये गेले मम्मी पप्पा ही आवरायला गेले


सोहाही रूम मध्ये जात होती,


"माझी आशिषशी भेट फिक्स करायचा लक्ष्यात ठेव सोहा",...... समर


"हो दादा पण तू प्रॉमीस कर उद्या बोलशील मम्मीशी",...... सोहा


"ठीक आहे I will try", ........समर


सोहाला फोन आला, आशिष चा होता तो फोन, आशिषशी बोलत रूम मध्ये निघून गेली


समर आजीच्या रूम मध्ये आला,


"तुझीच वाट बघत होते मी, बोला काय झालाय",...... आजी


"आजी मी आज केलेला फोन वीणाला" ,........ समर


"काय बोलण झाल", ..... आजी आनंदात होती


"मी सांगितलं तिला मला तू आवडते, तिने मला भेटायला यायला नकार दिला, रागाने फोन ठेवून दिला",....... समर


"का पण, का फोन ठेवून दिला ",........ आजी


" अरे आमची ओळख कुठे आहे अजून",........ समर


" मग वाढव ओळख",........ आजी


" हो, तिची माहिती काढायचं काम दिल आहे मी एकाला, मग बघू पुढे काय ते, तिच्या मनात कोणी दुसर नसेल ना ",?........ समर


" नाही रे राजा माझं मन सांगताय तुझीच होणार ती",......... आजी


"आजी काहीही हा ",....... समर


"लाजतोय तर खरी", ....... आजी आजोबा गोड हसत होते


समर हासत रूम मध्ये निघून गेला, त्याच्या मोबाईल वर मेसेज आला


" Check your mail sir", ..... प्रभाकर


रूम मध्ये जावुन समरने घाईने लॅपटॉप ऑन केला, मिस्टर प्रभाकर यांचा ई-मेल मेल आलेला होता, घाई घाईत मेल उघडला, समरचे हाथ थरथर कापत होते, काय असेल माहिती, उत्सुकता होती खूप, यावर माझ भविष्य अवलंबून आहे,


Hello Mr samar sending basic information about Miss Veena


वीणा ग्रॅज्युएट आहे,.....


पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा होत तिला, पण घरच्या परिस्थिती मुळे जॉब ला लागली........ (काही हरकत नाही इकडे आली की हव तेवढ शिक....... समर मनातल्या मनात )


घरी आई बाबा दोन भाऊ वहिनी त्यांची दोन मुले लहानश्या घरात एकत्र राहतात


भावाची नोकरी जेमतेम आहे सध्या त्याला खुप कर्ज आहे
(मी आहे......)


लहान भाऊ खूप हुशार आहे पण परिस्थिती मुळे काम नाही, एक प्रोजेक्ट रेडी आहे तो स्पाॅनसर शोधतो आहे,...... (होवुन जाईल काम.......)


वडील जातात जॉब ला, आई चा घरगुती फराळ करण्याचा बिझनेस आहे...... (थोडे दिवस......)


वीणा च नुकतच लग्न मोडला आहे, राहुल नावच्या मुलाशी लग्न ठरले होते, हुंडा पैसे बरेच मागत होते मुलाकडचे वीणाने नकार दिला........ (बर झाल......)


सध्या ती सिंगल आहे......... (समर गालातल्या गालात हसत होता....)


नौकरीला साई इंटरप्राईजेस ला आहे....... (माहिती आहे.......)


9-6.30 ऑफिसची वेळ........... मोबाईल नंबर......


समर सगळी माहिती भराभर वाचत होता, वीणाची माहिती वाचून त्याला फार बर वाटल, चला आपली लाइन आता क्लियर आहे, मनोमन हसत त्याने लॅपटॉप बंद केला, वीणाच्या स्वप्नात रंगून गेला....
.......

आज बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या पूर्ण दिवसात, त्यामुळे वीणाला झोप येत नव्हती, दादाला किती टेन्शन आहे, का सांगत नाही तो आम्हाला? किती काळजी करतो तो आमची, एवढं टेन्शन एकटाच सहन करतो, मी दादाच टेन्शन कमी करेल, माझ्याकडं जे होईल ते मी पूर्ण करीन, मला दादाला आनंदात बघायचं आहे...... प्रकाश किती हुशार आहे, देवा मदत करा, प्रकाशची मदत करा.......
आणि हे समरच काय करावं? नक्की काय म्हणणं आहे त्याचं, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? तो एवढा श्रीमंत आहे म्हणजे त्याच्या घरच्या लोकांना मी आवडेल की नाही? नाही तर चांगलं व्हायचं सोडून अजून त्रास सुरू व्हायचा, म्हणजे एका गोष्टीच्या एका त्रासातून सुटून दुसऱ्या त्रासात अडकण्यासारखं आहे, राहुल आणि ते मिडल क्लास होते तरी देण्या घेण्यावरून आणि पै पैशावरून किती त्रास झाला, समर तर किती श्रीमंत आहे आहे... त्या लोकांच्याही काही अपेक्षा असतील, त्या कशा पूर्ण करणार आहोत आपण, इथे साधे पूर्ण फॅमिलीला एकत्र कपडे घेणेसुद्धा आपल्याला जमत नाही, घरात सगळे कमावतो तरी पुर होत नाही, पुढे कस होईल? आणि एवढ श्रीमंत स्थळ असलं तर आई बाबा कसे काय त्यांच्या मागण्या पूर्ण करणार आहेत, मला असं वाटत आहे की या भानगडीत न पडलेलेच बर, समर थोडे दिवस मागे येईल आणि नंतर विसरून जाईल त्यांच्यात आणि आपल्यात जी मोठी दरी आहे ती कधीच भरून निघणार नाही, यातून त्रास होणार आहे, टेन्शन आहे, काय करावं कळत नाही, विचार करता करता वीणाला झोप लागून गेली..........

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now