Aug 18, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 10

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 10

 

 

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा......... 

 

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार

 

©️®️शिल्पा सुतार

....... 

 

वीणा अभी आणि  आरुला घेऊन घरी आली, अभी अरु बरेच शांत झाले होते, बाबा आले होते ऑफिसहुन, ते आईशी बोलत बसले होते, वहिनी स्वयंपाक करत होती, दादा उगाच टीव्ही बघत होता, 

 

 

वीणाने घरात आल्यावर दादाकडे बघितलं, तिने खुणावल की मला तुझ्याशी बोलायचं आहे, बाबा समोर होते त्यामुळे स्पष्ट बोलू शकत नव्हते, 

 

 

वीणा बाहेर जाऊन उभी राहिली, दादा ही बाहेर आला, 

 

 

"काय झालं आहे  दादा? तू का असा चिडचिड करतो आहेस? तुला माहिती आहे का तुझ्या अशा वागण्याचा मुलांवर किती विपरीत परिणाम होतो आहे ते, अभी मोठा होतो आहे, आता तू असा त्याच्यावर एकदम हात उचलत जाऊ नकोस, कसलं टेन्शन आहे तुला? सांग तरी..... मोकळ बोल,  वहिनीशी का भांडत असतोस तू सारखा"?,...... वीणा 

 

 

दादा सगळं ऐकत होता, काहीही बोलत नव्हता, 

 

 

" अरे दादा बोल जरा काही, काय मनात आहे ते बोल, जर काही मदत करता आली मला तर मी करेल मदत, पण जर तू काहीच सांगितलं नाही तर कसं कळेल आम्हाला",....... वीणा 

 

 

" वेळ आली की सांगेन मी  वीणा, सध्यातरी विशेष काही नाही, तू टेन्शन घेऊ नकोस" ,....... दादा 

 

 

"अच्छा म्हणजे तुला अजूनही काही बोलायचं नाही, वहिनी काय म्हणत होती?... हिम्मत असेल तर खरं सांगा, काय आहे ते"?,...... वीणा 

 

 

" काही नाही ग सविता ना उगीच छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगते, तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव",..... दादा 

 

 

" नाही दादा, वहिनी चांगली आहे, तू काहीतरी लपवतो आहेस, तुला मी आपली वाटत नाही का"?....... वीणा 

 

 

" काय बोलते आहेस तु हे  वीणा, तुला माहिती आहे मला तू किती प्रिय आहेस, हे असं परत बोलू नकोस",...... दादा 

 

 

" मग काय बोलू दादा, तू काय मनातलं नीट बोलत नाहीस",..... वीणा 

 

 

प्रकाश घरी आला जेवण झाल, आई बाबा फिरायला गेले, दादा वहिनी टीव्ही बघत होते, दादाने अभिला जवळ घेतल तो परत रडायला लागला, 

 

 

" I am sorry अभी प्लीज रडू नकोस, आपण फ्रेंड्स होवू या का? , आपल झालेल भांडण विसरून जाऊ उद्या तू आणि मी फिरायला जाऊया का? मग तू मला सांग तुझे कोण कोण फ्रेंडस आहेत, शाळेत काय झालं",........ दादा 

 

 

"मी ही येईन सोबत ",..... आरू बोलत होती 

 

 

"हो हो आपण सगळे जाऊ, अभी आरु मम्मी पप्पा ",..... दादा 

 

 

दादा उगीच वहिनीशी बोलायचा प्रयत्न करत होता, पण वहिनी मुद्दाम टीव्ही बघते अस दाखवत होती 

 

 

प्रकाशच काहीतरी काम सुरू होत, वीणा पुस्तक वाचत होती 

 

 

" झालं का काही प्रोजेक्टच काम प्रकाश "?,...... वीणा 

 

 

"नाही त्यांनी माझं प्रोजेक्ट अजून नीट पाहिलं ही नाही, उलट मला अजून त्यांचं काम करायला दिल जास्तीच ",........ प्रकाश नाराज वाटत होता 

 

 

"असंच असतं प्रकाश खूप काम करून घेतात, त्या बदल्यात मोबदला काहीच मिळत नाही, थोडा विश्वास संपादन करायला वेळ लागेल, पण होईल तुझं काम",....... वीणा 

 

 

" हो बघू, एखादा जॅकपॉट लागायला पाहिजे, मग मिळालेल्या संधीचं सोनं मी कस करतो बघ तू ",...... प्रकाश

........ 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी वीणा आवरून तयार झाली, नाश्ता झाला, 

 

 

" आई एक मिनिट जरा बाहेर ये, आजचा संध्याकाळच लक्षात आहे ना", ?....... वीणा

 

 

" हो लक्षात आहे, मी जरा आवरलं की सविताला सांगते",....... आई

 

 

" दादाला हि सांग  की लवकर ये ऑफिस मधून, म्हणजे आपल्याला मुलांना त्याच्याजवळ सोडता येईल, नाहीतर मुलं सगळं सांगून देतील घरी",......... वीणा

 

 

" हो बरं झालं तू आठवण दिली",....... आई

....... 

 

वीणा आवरून ऑफिसमध्ये पोहोचली, तेवढ्यात प्रीतीचा फोन आला 

 

 

" वीणा आज मला यायला उशीर होणार आहे",..... प्रीती

 

 

" ह मॅडम काय झालं "?,...... वीणा

 

 

" घरी पाहुणे येणार आहेत बघायला, ही आई ही असे कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी का नाही ठेवत काय माहिती? ",...... प्रीती

 

 

"ओ हो... तर ही तयारी आहे की काय.... मज्जा आहे बुवा",..... वीणा

 

 

" मजा काय त्यात वीणा काहीही ह... इथे मी वैतागली आहे, आईच्या आग्रहाखातर मी कार्यक्रमाला थांबली आहे, लंच ब्रेक पर्यंत येते, तू सरांना सांगून ठेव",...... प्रीती

 

 

" ओके, मूड ठीक कर आता, छान तयार होऊन फोटो काढ, मुलाचा फोटो घेऊन ये सोबत  आणि काय बोलणं झालं तेही सांग, आणि ये ऑफिसला नाही तर त्या मुलासोबत झट मंगनी पट ब्याह उरकशील ",........   वीणा

 

 

" काहीही ह, तू ठेव फोन",..... प्रीती

 

....... 

इकडे दादा ऑफिसला निघणार तसं आईने दादाला हाक मारली 

 

 

" आज शक्य असेल तर लवकर घरी ये, आज मला आणि सविताला कार्यक्रमाला जायचं आहे",..... आई

 

 

" कसला कार्यक्रम आहे आई", ?.... सविता ने विचारले 

 

 

"अगं माझी भजनी मंडळातील मैत्रीण आहे ना, तिच्या घरी बोलवल आहे, जर दादा लवकर घरी आला तर मुलांकडे तो लक्ष ठेवेल",........ आई

 

 

" ठीक आहे... मी येतो लवकर", .... दादा ऑफिसला निघून गेला, जाता जाता बघत होता तो सविता वहिनी कडे की येते का ती बोलायला, पण वहिनीने दादाकडे दुर्लक्ष केलं

 

 

" मला नाही यायचं आई भजनी मंडळाच्या कार्यक्रमाला, चांगली साडी नाही आहे मला एखादी",....... वहिनी

 

 

"अगं सविता तुला  वीणाला भेटायचं होतं ना? मग ते ठरवतो आहे आम्ही, संध्याकाळी आपल्याला काही भजनी मंडळाच्या कार्यक्रमाला जायचं नाही आहे, आपल्याला वीणाला भेटायला जायचं आहे देवळात, आणि नंतर चल माझ्यासोबत दोन चार चांगल्या साड्या घेवून घेवू तुला ",...... आई

 

 

"हो चालेल आई मी पटापट आवरते संध्याकाळ साठी एखादी भाजी पोळ्या करून ठेवते बाहेरून आले की कुकर लावता येईल",....... वहिनी

 

 

वहिनीच्या चेहर्‍यावर समाधान होतं 

...... 

 

ऑफिसमध्ये समर त्याच्याच विचारात गुंग होता, 

काय कराव? करावा का वीणाला फोन? , माझं तिच्यावर वर खूप प्रेम आहे, मला यापूर्वी कुठल्याही मुलीबद्दल असं वाटलं नव्हतं, बहुतेक मी माझी ओळख वेगळी सांगितल्यामुळे ती चिडली असणार, बोलून बघू का तिच्याशी, गडबडीत त्याने फोन लावला वीणा च्या ऑफिस ला 

 

 

फोन वीणाने उचलला 

 

 

Hello  This is साई इंटरप्राईजेस, कोण बोलतय...... 

 

 

एकदम गोड आवाज समरला ऐकू आला, ही वीणाच आहे, दोन मिनिटं त्याला प्रचंड धडधड झालं, 

 

 

"तुमसे कैसे बया करू मे हाल ए दील........ ये कहने की नही समझने के बात है" ........ 

 

 

काय झालय काय मला, अचानक शेरोशायरी वगैरे काय मनात येते आहे माझ्या, बोलू का तिच्याशी की फोन ठेवून देऊ, पण आता हिम्मत नाही दाखवली तर कधीच विणाशी बोलणं होणार नाही, तिकडे आजी-आजोबांना खूप घाई झाली आहे आणि मलाही.... आता वीणा पासून दूर राहवत नाही

 

 

Hello वीणा...... मी समर 

 

 

कोण? 

 

 

समर परांजपे 

 

 

वीणाचे हात लटलट कापायला लागले, आता का केलाय याने फोन इकडे? काय करू बोलू की नको? पण समजा जर मशीन साठी फोन केला असेल आणि मी जर तो कट केला तर.... सर मला ओरडतील आपण प्रोफेशनल राहायला हवं, त्याने कशावरून माझ्यासाठीच फोन केला असेल, त्याचं काम असू शकतो सरांकडे.... 

 

 

"सर एक मिनिट, हा मी फोन आमच्या सरांना देते",....... वीणा 

 

 

"एक मिनट वीणा, मी फोन तुझ्यासाठी केला आहे.... 

तुझ्याशी बोलायला केला आहे",..... समर 

 

 

"बोला ना सर... मशीन बद्दल काही माहिती हवी आहे का" ?,........ वीणा 

 

 

"नाही ग वीणा, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुला भेटायच आहे ",...... समर हिम्मत करून बोलला 

 

 

"का पण? बोला ना",..... वीणा 

 

 

" आपण भेटून बोलू या का "?,...... समर 

 

 

" नाही सर मला भेटायला येता येणार नाही ",..... समर 

 

 

" कारण काय पण वीणा, तू भेटत नाही का कोणाला"?,...... समर 

 

 

" मी उगीच विना कारण कोणाला ही भेटत नाही ",...... वीणा रागाने बोलली 

 

 

"कारण आहे वीणा",...... समर... "प्लीज बोल काही तरी, आपण भेटून बोलु या..... तुझा मोबाईल नंबर दे ", 

 

 

" सर मला जमणार नाही, तुम्ही प्लीज माझ्या मागे मागे करू नका, मला अजिबात इंट्रेस्ट नाही " ,...... वीणा

 

 

" चला म्हणजे हे तरी कळल तुला की मी तुझ्या मागे मागे करतो ",...... समर हसत होता 

 

 

वीणाने रागाने फोन ठेवून दिला 

 

 

वीणाचे हात थरथरत होते, आपला संशय खरा ठरला तर, काय हवा यांना माझ्याकडुन? काय बोलायचं असेल भेटून? पण मी भेटायला मुळीच जाणार नाही, एवढ्या श्रीमंत मुलाला माझ्यासारख्या गरीब  मुलीकडे काय काम  असेल, प्रीती पण नेमकी आजच उशिरा येणार आहे, पण बरं झालं ती नव्हती ते नाहीतर तिने अगदी मला त्रासून सोडलं असतं, उगीच चिडवत बसली असती ती

 

 

समरची अवस्था तीच होती, केला तर  खरी त्याने वीणाला फोन पण त्याचीही हृदयाची धडधड थांबत नव्हती, का होतय असं मला, किती मोठमोठे मीटिंग कॉनफरन्स टीव्ही शोज मुलाखाती एकट्याने हँडल केले आहेत मी, आणि हे  वीणाशी  बोलताना एवढं घाबरायला का होत आहे? कसं काय हॅण्डल करणार आहे मी हे मॅटर? वीणा तर बोलायलाही तयार नाही, तिचं कोणावर प्रेम आहे का? काहीही चौकशी आपण केली नाही,  तेवढ्यात  समर ने डायरी बाहेर काढली, एक नंबर डायल केला 

 

 

"हॅलो सर" , ....... 

 

 

"हॅलो प्रभाकर.... एक मदत हवी होती", ..... समर बोलला 

 

 

"बोला सर काय सेवा करू",....... प्रभाकर 

 

 

"एक नाव पाठवतो, सगळी माहिती हवी आहे",......... समर , 

 

 

ठीक आहे  

 

 

समर ने वीणाच नाव... कंपनीचे नाव सांगितलं 

 

 

"ठीक आहे, सर काम होऊन जाईल ",...... प्रभाकर 

 

 

"ही माहिती फक्त आणि फक्त मलाच द्या very confidential",....... समर 

 

 

"येस सर डोन्ट वरी ",....... प्रभाकर 

........ 

 

वीणा ने घरी आईला फोन केला 

 

 

"सांगितलं का ग वहिनीला आपल्या भेटीबद्दल",..... वीणा

 

 

"हो सांगितलं.... आम्ही दोघी येणार आहोत संध्याकाळी देवळात",....... आई

 

 

"दादाला काही कळलं नाही ना"?,....... वीणा

 

 

नाही........ आई

 

 

"वेळेवर ये, तू आणि वहिनी",..... वीणा

 

 

"हो, तुही वेळेवर ये",....... आई

 

 

लंच ब्रेक मध्ये प्रीती ऑफिसला आली 

 

 

वीणा जेवत होती.... आपल्याच विचारात हरवली होती ती 

 

 

प्रीतीने वीणा साठी शिरा आणला होता 

 

 

" कुठे लक्ष आहे मॅडम"?,. .... हे घे शिरा आईने दिला आहे 

 

 

"अरे वा पाहुण्यांसाठी शिरा वगैरे... काय झालं ठरलं का लग्न ",...... वीणा 

 

 

"नाही ग आत्ताशी पाहुणे पाहून गेले, किती बोर ते तयार व्हा वगैरे ",....... प्रिति 

 

 

"हो ना मी ही गेली आहे यातून, तू नीट ठरवून घे ग आधीच, कसा वाटला मुलगा", ?...... वीणा 

 

 

"हो बोलणी कडे तर मी विशेष लक्ष देणारच आहे, विशेष बोलणं नाही झालं आमचं, पण हुशार वाटतोय मुलगा , इंजिनीयर आहे, चांगली नोकरी आहे, स्वतःचा ब्लॉक आहे, मेन म्हणजे इथलाच आहे, ही नौकरी मला continue करता येईल",........ प्रिति लाजली होती बोलता बोलता 

 

 

"बस बस बस बस किती ते होणाऱ्या नवऱ्याची तारीफ, नाव काय ते तरी सांग ",..... वीणा 

 

 

" सचिन नाव आहे ",...... प्रिति 

 

 

" फोटो काढले का, दाखव तरी",...... वीणा 

 

 

प्रीतीने मोबाइल मधले फोटो दाखवले 

 

 

" छान आहे ग मुलगा, जोडी छान शोभेल तुमची, आता आढेवेढे घेऊ नकोस, चांगलं स्थळ आहे ",...... वीणा 

 

 

" हो ग मी सकाळी बोलले होते तुला, पण मलाही हे स्थळ आवडल आहे", .... प्रीती सांगत होती 

 

 

वीणा प्रीती कडे बघून खुश होती तेवढ्यात तिला आठवलं समरचा फोन येऊन गेला ते सांगाव का प्रीतीचा? नको एवढ्यातच, ती तिच्या विचारात आहे, उगीच चिडवत राहील ती 

 

 

" शिरा छान झाला आहे काकूंना सांग आणि गोड शिरा बद्दल बरोबर बातमीही छान दिली ",..... वीणा 

 

 

"तुझं काय चाललं आहे सकाळपासून ऑफिस मध्ये काम? परांजपे अंड कंपनीतुन कोणी आलं होतं का", ?..... प्रिति 

 

 

"नाही ग कशाला येतील ते",.... वीणा 

 

 

"नाही मला वाटलं की समर परांजपे आले होते की काय तुला भेटायला ",...... प्रिति हसत होती 

 

 

" आता अति होत चाललं आहे प्रीती... जरा गप्प बसणार का", ?..... वीणा लटक्या रागात होती 

 

 

तस वीणाला मनातून फार छान वाटत होतं... हे काय होतं आहे आपल्याला समरचं नाव घेऊन कोणी आपल्या चिडवलं की छान का वाटत आहे

 

...............

परांजपे मॅडम केबिन मध्ये काम करत होत्या, मिस्टर दीक्षित बाजूला उभे होते, मॅडम सांगतील ते इन्स्ट्रक्शन लिहून घेत होते, बाजूच्या केबिन मध्ये सर कोणाशी तरी फोनवर बोलत होते, समर आत आला 

 

 

 "मम्मी एक मिनिट थोडं बोलायचं आहे",...... समर,

 

 

"आपण बोलू जरा वेळाने",....... मॅडम ने मिस्टर दीक्षित यांना सांगितले 

 

 

मिस्टर दीक्षित बाहेर गेले, समर खुर्चीवर बसला 

 

 

"झालं का बोलणं तुझं सोहाशी काल"?,..... मम्मी 

 

 

"हो त्याबद्दलच बोलायचं आहे, सोहाने सांगितलं मला कि तीला आशिष आवडतो आणि तिचा आशिष वर प्रेम आहे",...... समर

 

 

" कसा आहे मुलगा कोण आहे काही चौकशी केली का", ?........ समर

 

 

"चौकशी नाही केली अजून पण मुलगा इंजिनियर आहे, त्याच्या वडिलांचे इंजिनियरिंग फर्म आहे तो तिथेच काम करतो, मी भेटणार आहे त्याला ",...... समर

 

 

मम्मी विचार करत होती,........ " हो हे ठीक राहील तू भेटून बघ मुलाला, मग पुढे ठरवू काय करायचं ते, पण आतच सोहाला काही बोलू नकोस", 

 

 

" हो मम्मी",...... समर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now