Aug 09, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 9

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 9

 

 


ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........
©️®️शिल्पा सुतार

.....
समर ऑफिस हून घरी आला, खूप थकलेला दिसत होता तो आजी-आजोबा समोरच बसलेले होते


"कसा गेला आजचा दिवस बेटा, भेटली का वीणा आज", ?........ आजी


"नाही ग आजी",........ समर, आजी..... आजोबा ऐकता आहेत सगळं


"हो त्यांना माहिती आहे... मी सांगितलं सगळ आणि  तुझे आजोबा खूप खुश आहेत ह",........ आजी


समर जाऊन आजोबां जवळ बसला,


"मग आता रे काय? पुढे काय ठरवलं आहेस तू", ?.......... आजोबा


"माहिती नाही आजी आजोबा , बघतो कस भेटता येईल तिला",........ समर


"पण आज का नाही नाही गेलास भेटायला",....... आजी


" आज जरा ऑफिसमध्ये काम होतं आणि विनाकारण त्यांच्या ऑफिसमध्ये कसं जाणार मी, वाटत तर होत, नाही गेलो मी आजी",........ समर


"कशी आहे रे तुझी वीणा",?........ आजोबा विचारात होते


" खर सांगू का आजोबा एकदम आजी सारखी गोड आहे वीणा, खूप समजूतदार, हुशार, सांभाळून घेणारी आहे , म्हणून का मला ती आवडली असेल",...... समर


आजी आजोबा कौतुकाने सगळं ऐकत होते
.........

वीणा तिच्या विचारातच ऑफिसहुन घरी जात होती, हे काहीतरी नवीनच प्रकरण सुरू झालेला आहे  समरच, आत्ताच काय ते राहूनशी लग्न कॅन्सल झाल, किती खराब वागले ते राहुलच्या घरचे माझ्याशी, लग्न म्हटलं की अंगावर काटा येतो, आता हा समरही कसा आहे? काही माहिती नाही, सुरुवातीला सगळे चांगलेच वागतात, पण जाऊ दे ना मी कशाला त्याचा विचार करते, तो कसा का असेना आपल्याला काय? यात पडायचा नाही थोडा वेळ हवा स्वतः साठी


तेवढ्यात आई  भाजी घेतांना दिसली


"आज काय सामान घ्यायला एकटीच आलीस तू, माझ्यासाठी थांबायचं ना",........ वीणा


"अगं फराळाची ऑर्डर पूर्ण करायची आहे म्हणून लवकर निघाली",.... आई


"आई आण ग ती पिशवी इकडे", ....  वीणाने  आईच्या हातातील भाजीची पिशवी घेतली


"अरे वा आज लवकर घरी आलीस तू  वीणा", ?......... आई


हो आई


आईने भाजी घेतली


" चल ना आई आपण ज्यूस पिऊ",..... वीणा


" नको ग ज्युस कशाला, आता घरी जाऊन चहा करते तुला छान, थोडं कामही आहे घरी",....... आई


"चहा तर रोज पितो ग ,चल आता ज्युस घेऊया ",.....वीणा


दोघीजणी ज्युस सेंटरला आल्या


"आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे",...... वीणा


"बोल ना बाळ, काही झालंय का",.... आई


" तुला माहिती आहे ना ते आम्ही मशिनच डेमो दिल ते परांजपे अंड कंपनी ",...... वीणा


"हो तू बोलली होतीस, त्याचं काय आता ",....... आई


"कस सांगू समजत नाही ग",......... वीणा


" काय झालाय? नीट सांग बेटा ",........ आई


"तिथला एक समर आहे ना, प्रिती बोलते की तो माझ्याकडे बघतो...... म्हणजे असं प्रीती म्हणते",..... वीणा


" कोण ग हा समर ",....... आई


" अगं तो परांजपे अंड कंपनीचा मालक आहे, ते मशीन विकत घेता आहेत साई इंटरप्राईजेसचे",.... वीणा


आई नीट लक्ष देऊन ऐकत होती


"मला एक समजत नाही आहे, तो माझ्याकडे का बघतो आहे? की हा माझा भ्रम आहे, पण होतंय काय आई प्रीती असं बोलल्यामुळे मला त्यांच्यासमोर नीट काम करता येत नाहीये, काय करू मी"?,....... वीणा


आई नीट ऐकत होती,......... " श्रीमंत दिसता आहेत ते, काही वाईट हेतू तर नाही ना त्यांचा" ,


आई काळजी करत होती


" नाही ग आई, मुलगा खूप साधा आणि चांगला वाटतो",....... वीणा


" मग तू कशाला टेन्शन घेते त्यांच, तू तुझं दिलेलं काम नीट कर, बाकी पुढे त्या मुलाला तुझ्याविषयी काय वाटतं ते बघू आपण, पण तुला मुलगा पसंत आहे का ग", ??..... आई


" नाही ग आई, माझ्या मनात अस काहीही नाही, आणि एवढा श्रीमंत मुलगा माझ्यामागे का लागेल? ही प्रीती ना, काही पण विचार करते, आत्ताच तर माझं राहुलशी लग्न मोडल आहे आणि मला तुम्हा सगळ्यांना अजून वेळ द्यायचा आहे, दादाला मदत करायची आहे, प्रकाशला ही मदत करायची आहे आहे त्याचा प्रोजेक्टच अजून काहीही झालेल नाही",.......... वीणा


" झालं तर मग तू कशाला टेन्शन घेते आहेस, तुला काय करायचं आहे ते तुझ ठरलं आहे ना, मग तू बाकीच्या गोष्टीच तू टेन्शन घेऊ नकोस",...... आई


" ते काय आहे वहिनीचं, तिला मला काय सांगायचं आहे? दादा आणि वहिनीच काय सुरू आहे, काही बोलली नाही का ती"?,........ वीणा


"माहित नाही बाई, ती काही सांगत नाही मला, नाही बोलली काही",........ आई


" जेव्हा वहिनी मला काही सांगणार असते, तेव्हा  दादा  तिला गप्प करतो, काही प्रॉब्लेम आहे का त्यांना", ?....... वीणा


" मला काहीच कल्पना नाही" ,....... आई


" आपण बोलून बघुया का वहिनीशी? पण मला ती फक्त संध्याकाळीच भेटते तेव्हा दादा घरी असतो, तू एक काम करशील का आई, तू उद्या वहिनीला घेऊन देवळात ये, आपण तिथे दोघे मिळून वहिनीशी नीट बोलू ",..... वीणा


" चालेल असच करू,  उद्या दादा कामाला गेला की मी सविताला सांगते सगळ, अभी आणि अरुला सांभाळायचा प्रश्न आहे, संध्याकाळी दादा येतो ना लवकर, तू फराळ द्यायचं आहे, किंवा हळदीकुंकू वगैरे असं सांगून वहिनीला बाहेर काढ, मी ऑफिस वरून परस्पर येते",........ वीणा


"ठीक आहे तसेच करू आपण, काय आहे तो प्रॉब्लेम हे आपल्याला कळायला हवा  ",..... आई


वीणा आणि आई घरी गेले, वहिनी स्वयंपाक करत होती, मुल अभ्यास करत होते, दादा बसून बातम्या बघत होता, तेवढ्यात अभी उठून आला


" आत्या मम्मी पप्पांचा भांडण झालं",........अभी


तेवढ्यात दादा उठला आणी अभिला मारायला लागला, आई वीणा सगळे मध्ये पडले


" काय झालं दादा कशाला मारतोस त्याला, किती लहान आहे तो ", ?....... वीणा रागात होती


"कधी काय बोलावं हेच समजत नाही त्याला ",........ दादा


" माझा राग कशाला काढता आहात  त्याच्यावर", .... वहिनी मध्ये पडली


"काय झालय कशावरून भांडला तुम्ही", ... आई विचारत होती


" काय होणार आहे नेहमीचंच आहे आमचं... घरात खर्चायला पैसे मागितले म्हणून हे चिडले",...... वहिनी


" वाटेल ते खोटे सांगू नको सविता",..... दादा


" मग सांगा ना खरं घरच्यांना काय झाले ते",..... वहिनी


"सविता तू गप्प बस मी परत एकदा सांगतो आहे तुला",........ दादा


अभी आरु घाबरून रडायला लागले, तस विणा त्या दोघांना घेऊन बाहेर आली, तिने आईला खुणावलं की मी बघते या दोघांकडे, आईने आवरायला घेतलं


"आईस्क्रीम खायचं का मुलांनो",.......   वीणा बोलली,


तिघे कोपऱ्यापर्यंत गेले, वीणाने दोघांना आईस्क्रीम घेतलं, आरुने आईस्क्रीम खायला सुरुवात केली केली, अभी तसाच बसून होता


"काय झालं अभी तू का खात नाही आईस्क्रीम" ?,...... वीणा


"आत्या मम्मी पप्पा का भांडण करतात? , पप्पांना मी आवडत नाही का? आता मम्मी पप्पा डिवोर्स घेतील का" ?..... अभी


"नाही रे बाळा असं नाही आहे काही",..... वीणा


"मी बघितला आहे टीव्हीत भांडण झालं की डिवोर्स घेतात, मला मम्मी पप्पा दोघं सोबत हवे आहेत",........ अभी


" असं काहीही होणार नाही, मी आहे ना",..... वीणा समजवण्याचा प्रयत्न करत होती


" पप्पा सध्या खूप टेन्शन मध्ये असतात ते आमच्यावर प्रेम करत नाही त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत म्हणून ते दोघे भांडत होते",....... अभी


" नाही रे बाळा असं काही नाही आहे, मी तुला प्रॉमिस करते, मी सगळं नीट करेन",..... वीणा


"नक्की ना आत्या",..... अभी


हो प्रॉमीस...


अभी आईस्क्रीम खात होता, वीणा विचारात पडली एवढं काय झालं आहे घरात? कसले पैसे? अभी सांगतो आहे म्हणजे काहीतरी नक्की पैशावरून वाद आहे, दादा का असा चिडचिड करतो? तो वहिनीला का काही सांगू देत नाही? जाऊदे उद्या आपण भेटणारच आहोत वहिनीला तेव्हा समजेल करू आपण हा प्रॉब्लेम सॉल्व
......

मम्मी पप्पा आजी आजोबा समर सगळे जेवायला बसले, सोहा आजही जेवायला  हजर नव्हती


"सोहा कुठे आहे? आत्ताच्या आत्ता फोन लाव तिला, तिचं काय सुरू आहे", ? ..... बाबांनी विचारले, ते आज खूप चिडलेले दिसले


समर बोलला.... "मी बोलतो तिच्याशी",


"मागे पण तू बोलला होता की मी बोलतो तिच्याशी, काय झालं का बोलण तेव्हा?? कुठे फिरत असते सोहा",....... पप्पा


" काय झालं पप्पा, "....... समर मम्मी कडे बघत होता


" आज आम्ही नाटकाला गेलो तेव्हा समोरच्या रस्ता वरून सोहा एका मुलाबरोबर बाईक वर जाताना दिसली, दोघ गप्पांमध्ये एकदम गुंग होते",...... मम्मी


" कोण होता तो",....... समर


" ते आम्हाला कस माहिती, तुला माहिती आहे का काही ",........ मम्मी


"नाही मी बघतो काय आहे हे",..... समर


" समजाव तिला, मला अजिबात आवडल नाही जे चालायला ते",....... पप्पा


आजी आजोबा मम्मी-पप्पा आणि समर गुपचूप जेवत होते, समरने चुपचाप फोन वरुन सोहाला मेसेज केला की,.......... "कुठे आहेस",


तिचा मेसेज आला की,........ "येतेच थोड्यावेळात ",


" पप्पा चिडलेले आहेत ",...... समर


" येते",...... सोहा


" ये लवकर ",....... समर


"झालं का मशीनचा डेमो? डिझाईन्स वगैरे आवडल्या का",...... पप्पा


"हो झाला",...... समर


आजी आजोबा समर कडे हसून बघत होते


"कधी देणार आहेत ते मशीनची डिलिव्हरी",....... पप्पा


" पंधरा दिवसातच मिळेल डिलिव्हरी",...... समर


"ॲडव्हान्स द्यायचा आहे का त्यांना काही", ?...... पप्पा


" हो पप्पा, 30% ऍडव्हान्स द्यायचा आहे",....... समर


"ठीक आहे माझी उद्या त्यांच्याशी फोनवर मीटिंग अरेंज कर, मी बघतो पुढे काय करायचं ते ",...... पप्पा


जेवण झाले सोहा आली, तसे आजीआजोबा मम्मी-पप्पा समर सगळे सोहा कडे बघायला लागले


" काय झालं"?,....... सोहा


" सोहा जेवून घे ",...... बाबा बोलले


"बाबा मी खाऊन आली आहे ",...... सोहा


" कुठे फिरत असते तू रोज संध्याकाळी?, अभ्यास वगैरे काही नाही का तुला? तुझी एम बी ए ची तयारी कुठपर्यंत आली",..... पप्पा


"बाबा असंच मैत्रिणींसोबत गेली होती मी प्रोग्रामला",..... सोहा


" कुठल्या मैत्रिणी",..... पप्पा


"पप्पा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का"?,..... सोहा


" तसं नाही पण हे रोजच झालेला आहे तुझं, मला तुझ्या बद्दल काहीही माहिती नाही, ",...... पप्पा


"पिकनिक झाली की मी स्टडी ला लागणार आहे पप्पा, आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचे आहे, मी सांगेन वेळ आली की, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा", ..... सोहा बोलली


" विश्‍वास तर आहेच तुझ्यावर डोन्ट वरी... आज संध्याकाळी कुठे होतीस तू ",?...... पप्पा


"क्लासला गेली होती मी",..... सोहा


तसंच समर आणि आजी एकमेकाकडे बघायला लागले सोहाने ते बघितलं


" ठीके जा आवरून घे आणि झोप उद्या सकाळी कॉलेज असेल ना",..... मम्मी


मम्मी पप्पा ही झोपायला गेले,


" सोहा खोट बोलती आपल्याशी, आपण बघितलं तिला तिकडे मेन रोडवरील असताना आणि ती आपल्याला बोलली की मी क्लासला गेली होती, आपण समरशी बोलायला हवं" ,...... मम्मी


"जाऊदे सांगेल ती, ती बोलली ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे",..... पप्पा


त्यांनी समरला आत बोलावलं


" तू जाऊन सोहाला त्या मुला बद्दल सगळी माहिती विचार, कोण आहे? काय आहे? नक्की काय म्हणणं आहे तिचं"?,....... मम्मी


" ठीक आहे",...... समर


समर सोहाच्या रूम मध्ये गेला,


" कुठे फिरते सोहा तू? कुठे गेली होतीस तू कोण होत सोबत आज"?,....... समर


"गेट टुगेदर होत दादा",....... सोहा


" तू अजूनही खर बोलत नाही आहेस, घरच्यांपासून गोष्टी लपवतेस ",..... समर


"हो दादा काही तरी आहे मी सांगणार होते",.... सोहा


"आता बोलणार का जे खरं आहे ते? आपल्या घरचे काही एवढ्या छोट्या विचाराचे लोक नाहीत, एवढी लपवालपवी करायची काही गरज नाही ",..... समर


"दादा तू कोणाला बोलू नकोस",...... सोहा


" माहिती आहे सगळ्यांना तुला जे सांगायचं आहे ते",......... समर


" आज मम्मी पप्पांनी बघितल तुला मोटर सायकल वर",........ समर


" काय कुठे? खरं बोलतोयस तू दादा"?,.......... सोहा


" मेन रोड वर, कोण होत सोबत"?,...... समर


" दादा तो आशिष होता, आमच प्रेम आहे एकमेकांवर आम्हाला लग्न करायचं आहे",...... सोहा ने एका दमात सगळं सांगून टाकलं


" मग हे आधी नाही का सांगता येत, काय करतो मुलगा"?,...... समर


" तो इंजिनीयर आहे, त्याच्या वडलांची स्वतःची इंजीनियरिंग फर्म आहे तो तिथे जॉईन झाला त्याच्या वडलांना मदत करतो तो",........ सोहा


" Ok चांगल आहे ना",...... समर


"पण दादा तो आपल्या एवढा श्रीमंत नाही म्हणुन मी मम्मी-पप्पांना सांगत नव्हते",...... सोहा


"तुला प्रॉब्लेम आहे का त्याच्या फायनान्शिअल कंडिशन वर",....... समर


" नाही अजिबात नाही, मला आशिष जसा आहे तसा पसंत आहे",......... सोहा


" मग झाल तर आणि बाकी मम्मी पप्पांन च मी बघून घेईल",......... समर


" दादा लव you ",...... सोहा


" हे अस चालणार नाही कधी भेट होईल आमची आशिषशी",........ समर


" हो दादा मी सांगते",....... सोहा


सुहा खूपच खुश होती


" कुठे भेटले तुम्ही दोघ जरा मला ही सांग ग लव स्टोरी तुमची",........ समर


" Shut up दादा जा रे",....... सोहा


" Please सोहा ",........ समर मुद्दामून चिडवत होता


" जा रे दादा",...... सोहा


सोहा भाव देत नाही ते बघून समरने वेगळीच आयडिया काढली


"माझ्या सपोर्टची गरज आहे तुला मॅडम",......... समर


" ये इकडे सांगते",....... सोहा


" आमचा कॉलेजमध्ये ग्रुप आहे हे माहिती आहे ना तुला, त्यातला सोहमचा मित्र आहे आशिष, तिथेच भेट झाली आमची, तुला माहिती आहे का दादा आशिष हुशार मुलगा आहे, तो त्याच्या ऑफिसचा काम सोडून कुठेही बाहेर जात नाही, अगदी तुझ्यासारखाच दादा सगळ्या घरादाराची काळजी घेतो तो, खूप चांगला आहे तो",...... सोहा


" हो हो हो किती ते कौतुक, तरीच आजकाल बरेच गेट-टुगेदर खूप वाढला आहे तुझं सोहा",...... समर


" नाही ह दादा, बऱ्याच वेळा आशिष नसतो आमच्या सोबत, तू मम्मी-पप्पांना समजावशील का",...... सोहा


" हो बघतो बोलून ",...... समर

........
आजी-आजोबाही रूम मध्ये होते, समर आजी-आजोबांच्या रूम मध्ये गेला,  त्यांची झोपायची तयारी सुरू होती


" आजी येवु का" ?......... समर


" कोण समर ये रे ",...... आजी


समर जाऊन आजी जवळ बसला


" आजी मला तुझ्याशी बोलायचं आहे ",..... समर


सोहा बद्दलच ना आजी ने ओळखल,....... "तसं काही नाही घरातल्या सगळ्यांना सांगशील तेव्हा आम्हाला सांगितलं तरी चालेल"


आजी ऐक ना?


" अगं आजी सोहाने एका मुलाला पसंत केला आहे, आशिष नाव आहे त्याच, मुलगा चांगला आहे" ,....... आत्ताच सोहाने संगितले


" मग कुठे अडल आहे", ... आजीने विचारले, "त्याला आणि त्याच्या  घरच्यांना बोलव भेटायला, कसा आहे रे मुलगा, तुला आहे का काही माहिती? ",


"नाही आजी काही माहिती नाही, अजून मम्मी-पप्पांशी बोलावे लागेल मला",......... समर


" काय झालं  काही अडचण आहे का",....... आजी


" मम्मीचे  सोहा बाबतीत काय विचार आहेत ते अजून माहिती नाही, ते माहिती झाले की मग मी शब्द टाकेन",......... समर


" तुला जसं योग्य वाटेल ते कर, पण तीही अशी रात्री-अपरात्री भटकत राहते ते आम्हाला आवडत नाही, आशिष बरोबरच असते वाटतं ना ती आणि ती एक शनाया, तू दूर रहा समर त्या शनाया पासून",...... आजी


" आजी तू पण ना? काय करणार आहे ती शनाया मला",...
........समर हसत होता


"तुला माहिती नाही तिची नजर वेगळीच आहे, आगाऊ वाटते ती मुलगी आणि जे काय मम्मी-पप्पांना सांगायचं ते लवकर सांगा, तुझं काय झालं आणि आज? पुढे काय ठरवलं आहे? ,वीणा ला कधी भेटणार आम्ही", ?...... आजी


" माहिती नाही आजी, मला तर भेटू दे आधी, तू सांग ना एखादी आयडिया" ,....…... समर


" असं कर तू वीणाला डायरेक्ट जाऊन भेट",....... आजी


" कसं शक्य आहे, काय बोलू मी तिच्याशी",....... समर


" लग्नाच विचारून टाक सरळ",...... आजी


तसा समर लाजला," अजून तिच्या मनात काय आहे तेही माहिती नाही मला, ती कुठे राहते नाव, गाव, काय? घरी कोण कोण आहे,  हे ही माहिती नाही", ....... समर


" मग कधी करणार आहेस तू तिची चौकशी? एवढा उशीर मला अजिबात चालणार नाही", ..... आजीने विचारलं


" हो आता करतो",...... समर


"नेक काम मे देर किस बात की", ........ आजी


" वा आजी एकदम हिंदी  बिंदी", .... समर


हसतच समर झोपायला गेला

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now