Jan 28, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 8

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 8

 


समर ऑफिस मध्ये वापस आला, त्याला काही सुचत नव्हत, मशिनरी चा डेमो झाला, पण त्याला जे अपेक्षित होते ते वीणाशी बोलता आल नाही, वीणाचा चेहेरा डोळ्या समोरुन जात नव्हता, केवळ तिच्या साठी ही डेमोची मीटिंग अरेंज  केली होती, खुपच हुशार आहे वीणा, काय मस्त डिझाइन्स सेट केल्या, पुढे जाऊन आपल्याला त्याचा खूप उपयोग होईल, समर गालातल्या गालात हसत होता, आता कधी भेटता येईल तिला? आज वीणा ही मला बर्‍या पैकी टाळत होती, तिला समजलं की काय मला ती आवडते, मी तिच्या कडे बघतो ते आणि एक बर झाल की तिला समजल मी रोहित नाही समर आहे, मला आमच्या नात्याची सुरुवात एका खोट्या गोष्टीपासून करायची नव्हती, जे झालं ते बरंच झालं

.........
वीणा घरी आली, आई वहिनी स्वैपाक करत होत्या, दादा टीव्ही बघत होता, मुल खेळत होती,


"काय ग वहिनी का आली नाही आज ऑफिसला? , काय घ्यायचे होत, तू येणार म्हणून मी सरांना सांगून एक तास आधी निघाली मग प्रीती सोबत शॉपिंगला गेली होती , चल दाखवते काय काय आणल ते",....... वीणा


वीणा बोलत असतांना वहिनी तिला डोळ्याने खुणावत होती नका बोलू म्हणून पण वीणाच लक्ष नव्हत


दादा वहिनी कडे रागाने बघत होता


वीणाने हाथ पाय धुतले, ती पुढे येवून बसली दादा जवळ, मुल ही पळत जवळ येवून बसली


" जा अभी डिश आण मी खावू आणलाय तुमच्या साठी" ..... वीणा


अभीने डिश आणल्या वीणाने समोसे जिलेबी सगळ्यांना वाढली,


"चला ग आई वहिनी खावून घ्या" ,..... वीणा


"बॅग मध्ये काय आहे आत्या".... अभी


"आई ह्या घे साड्या तुला" ... वीणा


"कशाला खर्च करत बसली ग, आहे ना ग मला साड्या",........ आई


" असू दे ग आई त्याच त्याच साड्या नेसतेस तू रोज, स्वतः साठी कधी काही घेत नाहीस, आवडल्या का साड्या" ?...... वीणा


" न आवडायला काय झालं, छान आहेत, कॉटन च्या आहेत का?, महाग वाटताय ग",..... आई


" आमच्यासाठी काय आणलं"?........ अभी आणि आरू विचारत होते


"तुमच्यासाठी या वेळी काही नाही आणल आहे, पण वहिनी साठी दोन ड्रेस आणले आहे" ,...... वीणा वहिनी कडे बघून बोलली


तशी वहिनी खुश झाली एकदम नीट सावरून बसली


"बघू बघू ताई ड्रेस ",...... वहिनी


वीणाने वहिनीला ड्रेस दाखवले कॉटनचे ड्रेस वहिनीला खूप आवडले


"मी असेच ड्रेस म्हणत होती ताई तुम्हाला, हा रंग तर माझा आवडीचा आहे ",.... वहिनी खूप खुश होती


" हो मला माहिती होतं वहिनी म्हणूनच मी हे ड्रेस तिथे दिसल्यावर तुला आणले",....... वीणा


"थँक्यू ताई ",...... वहिनी


" नुसत thank you काय घालून दाखव ड्रेस वहिनी",...… वीणा


हो ताई.......


"तुला काय आणलं आहे", .... आईने विचारलं


" मला दोन टॉप आणले आहेत",...... वीणा


" बघु कसे आहेत",....... वहिनी, " छान आहे तुमचे टॉप ताई",......


" लॉटरी लागली का ग" ?........ दादा विचारत होता, एवढी एकदम खरेदी केलीस ते, मला ही काही तरी आणायच


" नाही रे दादा, असू दे, कधीचे ड्रेस घ्यायचे होते वहिनीला, आज प्रीती सोबत शॉपिंगला गेले मग घेऊन आले ड्रेस, खरंतर वहिनीच्या पसंतीनेच ड्रेस घेणार होतो पण वहिनी आलीच नाही",...... वीणा


" का येणार होती सविता तुझ्या ऑफिसला"?,....... दादा


"माहिती नाही तिने सांगितल नाही ",.... वीणा


दादा रागात होता


आई स्वैपाकाला लागली


दादाने वाहिनीला बाहेर बोलवले


" तू का जाणार होतीस वीणाच्या ऑफिसला "?,..... दादा


" काही नाही हो, ते खरेदी करायची होती आणि ऑफिस ही बघायच होत, ताई कधीच्या बोलवत होत्या, प्रीती सोबत बाहेर जाणार होतो आम्ही पार्टी ला",...... वहिनी


"हो का? मग का नाही गेलीस, की मी लवकर घरी आल्या मुळे नाही गेलीस ",..... दादा


" हो...... हो तसच आहे आणि आईंन वर एकटीवर स्वैपाकाचा ताण येतो ना त्यात मुलांचा अभ्यास म्हणून नाही गेले मी ",...... वहिनी


" हो का एवढ काम करते का तू घरी, हे बघ सविता मी तुला आधीच सांगतो जर त्या सावरकाराच्या लोन बदल वीणा ला तू काहीही सांगितल ना तर माझ्या पेक्षा वाईट कोणीच नाही, मी सांगितल ना तुला मी बघेन काय ते लोनच, अजिबात आगावू पणा नको आहे समजलं का"??..... दादा चिडला होता


"अहो पण मी काही बोलणारच नव्हते", .... वहिनीने बोलून बघितल


" मला माहिती आहे तुझा स्वभाव, मी काही आज नाही ओळखत तुला", ....... दादा चिडला होता


तशी वहिनी रागाने आत निघून गेली


सविता....... सविता.....


दादाला माहिती होते वहिनी काहीतरी गडबड करणार आहे


बाबा घरी आले सगळे जेवायला बसले," आज काय अर्धीच पोळी अभी, अजून घे ना "


" आजोबा आज आत्याने खाऊ आणला होता समोसे जिलेबी तुमच्या साठी ही आहे",......... अभी ,


"या दोघांना दे ग... मी लहान आहे का",..... बाबा


"खाल्ले त्यांनी तुम्ही खा बाबा", ..... वहिनी बोलत होती


"मुलांनी भाजी पोळी ही खायला पाहिजे", ..... आई बोलली


" प्रकाश का आला नाही अजुन "?, ...... बाबा विचारात होते


" आज त्याचा interview होता एका ठिकाणी आणि तो प्रोजेक्ट साठी एका ठिकाणी जाणार होता",...... वीणा


तेवढ्यात प्रकाश आला, "जा प्रकाश हात पाय धुवून ये, लगेच वाढते मी तुला जेवायला", ...... आई


प्रकाश थकून कॉट वर बसला होता


" आटोपला की नाही प्रकाश", ?....... आई


तसा प्रकाश उठला," मला जेवायच नाही", म्हणून बाहेर निघून गेला


आई बाबा एकमेकांना कडे बघत होते, वीणा उठली प्रकाश मागे गेली


"काय झालाय प्रकाश "?,........ वीणा


" काय होणार वीणा, आज ही नाही मिळाली स्पॉन्सरशिप",....... प्रकाश


"Interview च काय झाल",? ........ वीणा


"8 दिवसानी समजेल", ........ प्रकाश


"मी loan साठी apply करू का तुझ्या साठी",....... वीणा


"नाही वीणा हया कामाच काही एकदा loan घेतल आणि झाल अस नाही, भरपूर पैसे लागतील स्पॉन्सर मिळाले तर बर होईल",...... प्रकाश


"तू नाराज का होतोस"?,....... वीणा


"मग काय करू मी तू सांग", ..... प्रकाश


"चल आधी जेवून घे मग बोलू, आई काळजीत आहे",...... वीणा
............

समर घरी आला आजी आजोबा टीव्ही बघत बसलेले होते, तो खुर्चीवर टेकला


" काय रे काय झालं समर? आज थकलेला दिसतो आहेस? कसा झाला डेमो"?....... आजी


"मम्मी पप्पा आले का",...? .....समर


हो आले जा फ्रेश होऊन ये, जेवायला बसू ,तेवढ्यात बाबा आले खाली, सोहाही आज जेवायला हजर होती


"कसा गेला आजचा दिवस सोहा"?,... बाबा विचारात होते


" पप्पा मी पिकनिकला पैसे भरलेत",...... सोहा


" कधी जाणार आहे पिकनिक"?,....... पप्पा


"पुढच्या आठवड्यात, मला थोडी खरेदी करायची आहे",....... सोहा


"किती खरेदी करणार आहे सोहा तू"?, ......... समर मुद्दाम तिला चिडवत होता


" चूप रे दादा",..... सोहा


"तू कुठे गेला होता मधेच समर "?,...... मम्मी


"साई इंटरप्राईजेसच्या वेअरहाऊस मध्ये गेलो होतो, मशिनरी लाईव्ह डेमो होता",....... समर


" कसा झाला मग डेमो, मशीनची कशी आहे "?,...... मम्मी


" चांगला झाला डेमो, छान आहे मशीन कॉलिटी",..... समर


" मम्मी तुला उद्या वेळ आहे का? ते मशीनरीच फायनल करायची आहे",..... समर


" नाही उद्या मी आणी पप्पा एका ठिकाणी जाणार आहोत उद्घाटनाला",.... मम्मी


"ठीक आहे मग मी मशीनरीच फायनल करून टाकतो",..... समर


"हो चालेल,. नाहीतर अजून वेळ लावण्यात काही अर्थ नाही, ती ऑर्डर आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे",..... मम्मी


जेवण झाल, मम्मी पप्पा समर ऑफिस कामा बद्द्ल बोलत बसले होते, सोहा मोबाईल वर काही तरी chat करत बसली होती, जरा वेळाने मम्मी पप्पा झोपायला गेले, सोहा ही तिच्या रूम मध्ये गेली


" आजी तुला एक गोष्ट सांगायची आहे",...... समर आजी जवळ बसला


" हो बोल",...... आजी


"आजी पण तू कोणाला सांगणार नाही ना",......... समर


"नाही रे राजा बोल ना",....... आजी


"आजी तुला माहिती आहे ना आपण गारमेंट साठी मशीन घेतो आहोत ते",....... समर


"हो माहिती आहे बेटा, चालू असत तुमच बोलण रोज, सांग ना काय म्हणतोस ते",...... आजी


"त्या दिवशी प्रेझेन्टेशन होत ना, तिथे मला साई इंटरप्राईजेस ची वीणा भेटली, ती प्रेझेंटेशन करत होती, पहिल्या भेटीतच मला ती खूप आवडली आजी, तिला बघून असं वाटलं की आपलं कोणीतरी भेटल आहे, असं होतं का ग आजी... कधी कुणाला बघून, मला वीणा फार आवडते आजी".... समर लाजला होता


" अरे व्वा कोण ही लकी गर्ल, कधी झाल हे, तरीच आता मशीन चे बरेच डेमो सुरू असतात, सगळ नीट सांग",....... आजी


" कुठे राहते वीणा"?, ....... आजी


" माहिती नाही आजी", ........ समर


" घरी कोण कोण आहे तिच्या", ....... आजी


" माहिती नाही आजी", ....... समर


" तिचा होकार आहे का", ......... आजी


"माहिती नाही आजी", ......... समर


" पूर्ण नाव काय तीच "?,....... आजी


"माहित नाही आजी",...... समर


"अरे काय माहिती आहे मग? सारखं काय.... माहित नाही माहित नाही", ........ आजी


"आजी दोनदा बघितल वीणाला , पण जेव्हा मी तिला बघितला मला वाटला हीच आहे ती",......... समर


" अरे हो पण आम्ही कधी भेटणार वीणाला",...... आजी


"आजी अग अजून कशात काही नाही",....... समर


"होईल रे सगळ तुझ्या मनासारखं , तू माझा गुणी बाळ आहेस, तुझ्या सारख नवरा तिला मिळाला तर ती कुठे नाही म्हणणार आहे",..... आजी


" तुला तर मी नेहमी चांगलाच वाटतो आजी, पण वीणाला चांगला वाटला पाहिजे ना",...... समर


"चांगलाच वाटशील तिला तू, मला काहीही शंका नाही आहे त्याच",....... आजी


" उद्या जाणार आहे मी तिच्या कंपनीत, पण ती टाळते मला आजी, बघतही नाही ती माझ्याकडे",......... समर


"अरे नवीन आहे सगळ अजून, अशी कशी लगेच बोलेल ती तुझ्याशी ",..... आजी


" आता पासून तू तिची बाजू घेतेस आजी",....... समर लटक्या रागात होता


आजी खुश होती


"जा झोप आता",...... आजी


" आजी तुलाच फर्स्ट सांगितल प्लीज कोणाला बोलू नकोस, वचन दे",........ समर


"नाही रे बोलणार, पण रोज रीपोर्ट द्यायचा काय झालं ते",........ आजी


"हो आजी",...... समर
.......

वीणा सगळं आवरून पुस्तक वाचत होती, तेवढ्यात तिला आठवला संध्याकाळचा प्रसंग.... खरंच का तो समर.... प्रीती बोलते तसं माझ्याकडे बघत असतो का? , मला ही असच वाटलं होतो त्याच्या नजरेतून, काय कारण असेल? असं कितीदा भेटलं आम्ही? काही ओळखही नाही एकमेकांना ? या आधी मी त्याला एकदाही कुठे बघितलं नाही, मी काही खूप सुंदर ही नाही? मला वाटतय ते खर आहे की भ्रम आहे, बघू नंतर, पण येवढ्यात मला या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही, नाहीतर त्याचा असा काही उद्देश नसेल, ही प्रीती मला जास्त सांगते सगळ, आपण प्रीती कडे लक्ष द्यायच नाही, विचार करता करता तिला झोप लागली....


दुसऱ्या दिवशी सकाळी वीणा तयार होऊन ऑफिसला पोहचली, प्रीती अजून यायची होती, ती समरचा विचार करत होती, तेवढ्यात प्रीती आली,


"हॅलो मॅडम काय विचार चालला आहे, वाटतंय की समरचा विचार चालला आहे, त्याला बहुतेक हो बोलणार असं दिसत आहे",......... प्रिति ,


"हो ग प्रीती ती तुला कसं समजलं, आज ठरवून टाकते सगळं लग्नाबद्दल,........ वीणा ,....... बर झाल तु विषय काढला या पुढे प्रीती तू जर सारख समर समर केल तर बघ, मला ऑकवर्ड होत ग त्याच्या पुढे" ,


प्रीती हसत होती


"झाल का हसून, तुझ आटोपला असेल तर कामाला लाग, आणि तुझं काय झालं ते 2-3 स्थळांच", ?....... वीणा


"अजून काही नाही, मला नाही आवडले ते स्थळ, एक बरा आहे मुलगा पण आम्ही भेटलोही नाही, विचार सुरू आहे",...... प्रिति


" ओह हो मॅडम, छान चाललय तुझ, नाव काय त्यांच, आम्हाला नाही सांगणार का", ?....... वीणा ही लाइट मूड मध्ये होती


" सांगेन ह... मला समजलं की सांगेन त्याच नाव गाव",..... प्रिति
........

सकाळी समर आवरुन खाली आला आजी-आजोबा नाश्ता करत होते, सोहा कॉलेजला गेली होती, मम्मी पप्पा चहा घेत होते


" गुड मॉर्निंग आज काय प्लॅन आहे मॉम, डायरेक्ट ऑफिसला येणार की प्रोग्राम ला जाणार ",....... समर


" आम्ही जरा वेळाने निघतो आहोत, आधी उद्घाटनाचा प्रोग्राम अटेंड करून मग ऑफिसला या येऊ आणि संध्याकाळी आम्ही दोघं नाटकाला जाणार आहोत",.... मम्मी


"अरे वा वा वा छान कार्यक्रम ठरला आहे तुमचा एन्जॉय",....... समर


मम्मी-पप्पा छान हसत नाश्ता करत होते," हो मग आम्हालाही आमचा वेळ हवा",.......


समर टेबल वर बसला नाश्तासाठी आजी आजोबा समोर होते आजीने खुणेने विचारल..... आज भेटणार का वीणाला, आजी चूप समर खुणावत होता कोणाला सांगू नको, त्यांनी मानेने हो बोलल, आजोबा बघत होते सगळ,


"काय चाललय काय" ,...... आजोबा


" सांगते तुम्हाला नंतर ",...... आजीने सांगितले
.........

समर ऑफिसला आला केबिन मध्ये बसताच मिस्टर दीक्षित आत आले


एक दोन क्लायंट आले होते भेटायला


"सर मीटिंग आहे आता",..... दीक्षित


"हो चला अॅटेन करू",...... समर


"सर त्याआधी या फाईलवर एकदा नजर टाका महत्त्वाचं आहेत, लगेच डिसिजन घ्यायचे आहेत, सही ही करा ",...... दीक्षित


"ओके बघतो मी" ,.... समर


"ओके, मॅडम येणार आहेत का आज",?...... दीक्षित


"हो येणार आहे, पण मम्मीला उशीर होईल, काही काम असेल तर मला सांगा ",...... समर


Ok सर.........
.......

लंच ब्रेक झाला, प्रिती परत वीणाला चिडवत होती


" प्रीती तुला खरच काही काम नाही का? सारख काय तू समर बद्दल बोलत असते ",...... वीणा


"अग खरं बोलते मी, काल ही त्याच पूर्ण लक्ष तुझ्यावर होत, जर सर आले नसते ना वेअर हाऊस ला तर तो काल ही आपल्याला सोडायला आला असता इथे पर्यंत, मी बघितल स्वतः तो तयार होता , सारखं आपल्या कडे बघत होता",...... प्रिति


" गप ग तू अति वाढवून सांगते प्रीती, त्यांची आपली कधी बरोबरी होणार नाही, समरला आपल्या बद्दल सहानुभूती वाटत असेल फक्त",..... वीणा


" नाही ग, माझ्या वर विश्वास ठेव",...... प्रिति


चला मॅडम कामाला लागा, पुरे झाल........


वीणा आणि प्रीती कामाला लागल्या,


वीणा ने प्रीतीला गप्प केले खर, तिच्या मनात विचार सुरू होते खरंच का समरला मी आवडत असेल आणि तो खरंच का माझ्याकडे बघतोय? एवढा श्रीमंत मुलगा माझ्याकडे कशाला बघेल? काय म्हणणं असेल त्याचं? काल मी त्याच्याकडे बघितलंच नाही, काय सुरु आहे नक्की समजायला मार्ग नाही, पहिल्यांदाच त्याने स्वतःची खोटी ओळख काम संगितली असेल? की तो निव्वळ एक योगा योग होता, बहुदा गंमत केली असेल समर ने आमची. काय कराव समजत नाही.....

..................
ही कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे, या कथेचा कोणाशी काहीही संबंध नाही ©️®️शिल्पा सुतार

सगळ्या वाचकांचे खूप आभार, तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे मला पुढे लिहिण्याचं बळ मिळतं❤️?

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now