प्रित तुझी माझी... ❤️ भाग 7

साई इंटरप्राईजेसच नाव काढताच समरला वीणाची आठवण झाली, एकदम फ्रेश वाटायला लागल त्याला ..... काय करा?

सकाळी वीणा उठली, आई स्वैपाक करत होती 

"दे ग आई मी करते पोळ्या" ,....... वीणा 

"नको तू आवरुन घे, दिवस भर काम असत ग तुला " ,........ आई 

तेवढ्यात वहिनी आली किचन मधे, 

"वीणा ताई मला तुम्हाला काही सांगायचे आहे",..... वहिनी 

"हो बोल ना वहिनी, अशी घाबरलीस का" ?,........... वीणा 

"shuu....... हळू बोला तुमचा भाऊ ऐकतील" ,...... वहिनी 

"काय झालं आहे" ?...... वीणा 

"तुम्ही मला आज भेटाल का बाहेर"? ,...... वहिनी 

"हो चालेल, काय झालं पण काही प्रॉब्लेम आहे का" ?....... वीणा 

"सांगते नंतर एवढ टेंशन घेवू नका",...... वहिनी 

....... 

वीणा आवरुन ऑफिसला आली, प्रिती प्रशांत आलेले होते, 

" आला होता का रोहित स्वप्नात" ?....... प्रिति परत चिडवत होती",......... प्रिति s.. s

"गप्प बस ग काही काम आहे की नाही तुला, परत तेच सुरु करु नको, त्याचा आणि माझा काही संबंध नाही ",..... वीणा 

तेवढ्यात सर आले 

" गुड मॉर्निंग सर." ...... 

"परांजपे अंड कंपनी तून फोन आला होता का" , ? ........ सर 

"नाही मी करून बघतो आता  "....... प्रशांत 

....... 

तिकडे समर ही ऑफिसला आला होता, रोजच्या फाईल चेक करून झाली, ई-मेल चेक करून झाले, 

" साई इंटरप्राईजेसच काय करायच आहे" ?........... मिस्टर दीक्षित विचारत होते 

साई इंटरप्राईजेसच नाव काढताच समरला वीणाची आठवण झाली, एकदम फ्रेश वाटायला लागल त्याला ..... काय कराव जाऊन बघावं त्या कंपनीत? असं कसं जाणार पण, ते सर मला ओळखतात 

"मिस्टर दीक्षित साई इंटरप्राईजेस बरोबर कॉल सेट करा संध्याकाळी ",...... समर 

" ओके सर ",....... दीक्षित 

मिस्टर दीक्षित यांनी कॉल केला.... "आम्हाला ऑर्डर कन्फर्म करायची आहे, पण त्या आधी आम्हाला एकदा मशीन वर लाईव्ह गारमेंट स्टिचिंग बघायचे आहे, तर आज डेमो बघता येईल का, आमचे डिझाईन जसे आहेत तसेच थोडे फार सारखे पॅटर्न दाखवा ", 

"Ok काही प्रॉब्लेम नाही, मी ती व्हिजिट अरेंज करतो, तिकडचा सेट अप रेडी झाला की मी करतो फोन "....... सर 

...... 

"प्रीती आज मला लवकर जायचं आहे एक तास , वहिनी येणार आहे ऑफिसला",..... वीणा 

"का ग शॉपिंग की काय? ",..... प्रिति 

"नाही ग, वहिनीला काही तरी बोलायचा आहे माझ्याशी",..... वीणा 

"काय झालं काही प्रॉब्लेम आहे का ",..... प्रिति 

"माहिती नाही  मी ही तोच विचार करते आहे, वहिनीने नीट काही सांगितल नाही ",...... वीणा 

सरांनी मीटिंग बोलावली,  विणा, प्रशांत आणि प्रीतीला  केबिनमध्ये बोलवलं, परांजपे अँड कंपन कंपनीला लाइव्ह गारमेंट स्टीचींगचा डेमो हवा आहे, तर तुम्हाला फॅक्टरी साइट ला जाव लागेल, पुढचे इन्स्ट्रक्शन मी देतो " ,....... सर 

Ok... तिघे बाहेर आले 

"वीणा पण तुला लवकरच जायचं होतं ना आज ",?... प्रिति 

" हो ग पण जाऊदे ऑफिसच काम महत्त्वाचे आहे... वहिनीला  सांगता येईल, संध्याकाळी जाऊ आम्ही ",.......वीणा 

थोड्यावेळाने वहिनीचा फोन आला......." निघू का मी घरातून ताई? किती वाजता भेटायचं आहे"? 

" वहिनी मी सांगते ना तुला, माझं काम अजून झालेलं नाही, काय झाला आहे फोनवर सांगता येईल का" ? ......वीणा 

"नाही ताई मला इथून बोलता येणार नाही",....... वहिनी 

"अग मेसेज टाक",....... वीणा 

"नको एवढं, मोबाईल वापरणं मला  जमत नाही",........ वहिनी 

" ठीक आहे मी एका तासात सांगते ",....... वीणा 

फॅक्टरी साईटला डेमो साठी अपॉइंटमेंट फिक्स झाली तस समर खूप आनंदात होता... आज परत वीणाला भेटता येईल.... तिच्याशी बोलता येईल... कधी तिकडे जाऊ असं झालं होतं... आज कशी दिसत असेल वीणा.... तिला माझ्या मनातील भावना समजतील का.... मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे..... हा डेमो वगैरे ही मीटिंग तिच्या साठी अरेंज केला आहे मी 

तेवढ्यात सोहाचा फोन आला,........ " मला पप्पा हो म्हटले दादा पिकनिकला जायला, आज सकाळीच बोलले मी त्यांच्याशी", 

"अरे वा चांगला आहे,..... एन्जॉय पैसे की हवे आहेत का", ?......... समर 

" नाही पैसे मम्मीने दिले आहेत",...... सोहा

"तू ही एक मग पप्पांनच आता, वेळ दे जरा घरी, फिरण कमी कर".,...... समर 

" हो रे दादा, तू ही ना लगेच उपदेश सुरू करतो ",..... सोहा 

....... 

समरन मिस्टर दीक्षित सोबत मीटिंगला जायला निघाला 

वीणाच्या सरांनी बाहेर येवून सांगितल आपल्याला वेअर हाउस कडे निघावे लागेल मिटिंग थोड्यावेळात आहे

"सर मी वेअर हाऊस हुन मार्केट ला जाऊ का डायरेक्ट थोडं काम आहे",...... वीणा 

" हो चालेल तु आणी प्रीती तुम्ही दोघं जाऊ शकता तिकडूनच घरी",....... वीणा 

वीणाने वहिनीला फोन केला,...... " ऑफिसला थोड काम आहे तू एक तास उशीरा ये "

" ताई  मला नाही जमणार उशिरा  यायला, आज तुमचे भाऊ लवकर येतं आहेत घरी, आम्हाला जायचं एका ठिकाणी",...... वहिनी 

"काय सुरू आहे तुमचं वहिनी, काही नीट सांगणार का काय झालं ते",....... वीणा 

"आपण बोलू उद्या",........ वहिनी 

"हे बघ वहिनी मला अस रोज रोज लवकर नाही येता येणार ऑफिस हून,मी आज सरांना विचारल, वेअर हाऊस होऊन डायरेक्ट गेलो असतो खरेदीला, आज संपवल असत तुझ काम, काही घ्यायच आहे का तुला , काय काम आहे ",........... वीणा 

" ताई मला काही सामान नकोय, ते घेवू नंतर, आपण बोलू नंतर मी ठेवते फोन ",....... वहिनी 

" प्रीती अग ही वाहिनी बघना, तिच्या साठी मी सरांशी बोलली, आता वाहिनी येत नाही म्हणे दादा येणार आहे घरी, का अशी करते ग ती ",...... वीणा 

" ठीक आहे ग त्या दोघांचा असेल काही तरी प्रोग्राम, एक तर त्यांना एकत्र घरात एकमेकांना साठी वेळ मिळत नसेल",....... प्रिति 

" हो  बरोबर आहे तुझ आता काय करू या आपण दोघी जाऊ या का खरेदी ला",?...... वीणा 

"चालेल आपण दोघी जाऊ शॉपिंगला मला ड्रेसेस बघायचे आहेत".... प्रिति 

" सर हो बोलले आहेत , मीटिंग झाली की निघू ",.... वीणा 

ऑफिसच वातावरण अगदी चांगला होत सर ही खूप काळजी घ्यायचे सगळ्यांची, ऑफिस मधले सगळे त्या मुळे घरच्या सारखं काम करायचे 

......... 

रोहित येणार आहे ना? समरने विचारल

"नाही सर तो अजून आला नाही",........ दीक्षित 

का काय झालं?.... समर 

" माहिती नाही मी बघतो फोन करून", .... दीक्षित 

समर त्याच्या विचारात हरवला, वीणा असेल ना तिथे प्रेझेंटेशन द्यायला, कधी एकदाच वीणाला बघतोय असं झालं होतं, पण हा रोहित का आला नाही अजून, आपण हे जे असं वीणाला चुकीची ओळख देतो हे बरोबर नाही, ही ओळख वाढण्याच्या आधी वीणाला सगळी बरोबर माहिती द्यायला हवी, नाहीतरी आज जर रोहित आला नाही तर त्यांना कळणारच आहे की मीच आहे  समर परांजपे, 

वीणा आणि प्रीती ऑफिस मध्ये डेमो चि तयारी करत होत्या तेवढ्यात सर आले 

"झाली का तयारी आजच्या प्रेझेंटेशनची,... डेमोची? कोण दाखवणार आहे आजचा लाईव्ह डेमो? प्रीती तू लीड घे, वीणा प्रशांत तुम्ही ही वेअर हाऊस ला जा आणि प्रशांत मशिनरीचा डेमो द्यायला  जे वर्कर्स आहेत ते तेथे पोचले की नाही व कापड दोरे वगैरे सगळी एसेसरीज अरेंज कर" ,..... सर 

एस सर..... 

" प्रीती तू प्रेझेन्टेशन कर. वीणा डिझाईन रेडी आहे का? आपल्याला फ्री  स्टिच एम्ब्रोईडरी वगैरे दाखवायच्या आहेत",...... सर 

"सर तुम्ही ही येणार ना"?,...... प्रशांत 

" बघतो मी माझं काही नक्की नाही, एक दोन मिटींग आहेत मला त्या जर आवरल्या तर येईन मी",..... सर 

ओके सर...... 

वीणा आणि प्रीतीने  जेवून घेतलं आणि जायची तयारी केली  

"प्रशांत, कसे जाणार आहोत आपण तिकडे वेअर हाऊस ला"?,........ वीणा 

टॅक्सी बुक केली आहे सरांनी आमच्यासाठी  

वीणा तू रोहित बरोबर ये..... प्रीती उगीच चिडवत होती

" पुरे ग प्रीती तुझं, इथे प्रेझेंटेशनच टेन्शन आहे, काय काय डिझाईन प्रेझेंट करायच्या त्याचा विचार करते आहे मी, आणि तू काय चिडवते आहेस मला", ...... वीणा 

प्रीती आणि प्रशांत हसत होते 

प्रीतीच बोलणं वीणाने टाळलं खरी पण आता तिला रोहित म्हणजेच समरचं टेन्शन आलं होतं, प्रिती बोलते तस... तो खरच बघतोय का माझ्याकडे? आणि मी आज त्याला  कसं तोंड देणार आहे हे समजत नाहीये, दुर्लक्ष करू का मी त्याच्याकडे की नीट बोलू, सुचत नाही आहे, त्याच्या मनात काही नसेल  आपणच उगीच काहीतरी समज करून घेतो आहोत, प्रीती जास्तच करतोय आहे, तिने हे माझ्या मनात भरला आहे, आपण नॉर्मलच वागून या 

टॅक्सी आली ते टॅक्सी ने वेअर हाऊसला निघाले, वीणाची धड धड वाढली होती, वेअर हाऊसला पोहोचले, अजून वर्कर आलेले नव्हते, 

"प्रशांत प्लिज फोन करून बघ ना त्यांना" ,...... वीणा 

"हो करतो,..... येता आहेत ते अगदी पाच मिनिटात पोहोचतील",.... प्रशांत 

समर आणी मिस्टर दीक्षित पोहचत आले होते , रोहित अजून आला नव्हता, ते वेअर हाऊसला पोहोचले, सगळे आले होते, वीणा प्रीती प्रशांत दोन-तीन वर्कर होते 

" सॉरी सर आमचे सर नाही येऊ शकले म्हणून मी आलो आहे,.... मी साई इंटरप्राईजेसचा मॅनेजर आहे प्रशांत",....... 

त्यांनी हात मिळवले ... 

वीणा आणि प्रीती लांब  उभे होते, समरच सगळं लक्ष वीणा कडे होतं,

"आपण सुरु करायचा का लाईव डेमो सर",..... प्रशांत 

ओके.. 

सगळे शॉप मध्ये गेले, शॉप मध्ये निरनिराळ्या मशीन रांगेत लावलेल्या होत्या, ज्या मशीन परांजपे अ‍ॅण्ड कंपनी  घेणार होत्या ते प्रशांत दाखवले, वीणा पेपर वर काही तरी लिहीत होती, प्रीती लॅपटॉप ओन करून प्रेझेंटेशनची तयारी करत होती, समर त्यांना भेटायला गेला 

"हॅलो वीणा", ..... प्रीती 

"हॅलो रोहित", ... प्रीती बोलली, तसं प्रशांत मध्ये येऊन बोलला, "हे रोहित नाही आहे हे आहेत समर परांजपे" , वीणा आणि प्रीती समरकडे बघतच बसल्या तेवढ्यात मिस्टर दीक्षित यांनी समरला हाक मारली, तो तिकडे गेला, 

"अरे प्रशांत हा रोहित आहे, आम्ही मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा समर सरांना बघितलं" ,....... प्रिति 

"नाही हे समर परांजपे आहेत, मी ओळखतो त्यांना, परवा टीव्हीवर इंटरव्यू झाला" ,...... प्रशांत 

मग त्या दिवशी आम्हाला असं का सांगितलं त्यांनी, 

गंमत केली असेल तुमची, 

" असू दे ग प्रीती आपल्याला काय? आपल्याला आपलं काम करून घरी जायचं आहे, ते कोणी का असे ना, समर या रोहित ", ..... वीणा बोलली

वीणाने वर्कर सोबत मशिनरी सेटप केली त्यांना डिझाईन दाखवली स्टिचिंग पॅटर्न  समजवला प्रीतीही बरोबर होती, प्रीतीने प्रशांतला हाक मारली, 

" सर चला मशीन रेडी आहे  ",...... प्रिति 

तसे मिस्टर दीक्षित आणि समर मशिनरी जवळ आले, वीणा आणि प्रीती बाजूला झाले, टेलर काकांनी एक पॅटर्न शिवुन दाखवला त्यावर एम्ब्रोईडरी करून दाखवली, मशीन खूप छान होती, स्पीड खूप होता, फटाफट कपडे शिवले जात होते, मस्त झाला डेमो सगळे ऑफिस मध्ये येवून बसले 

"फूल automatic machine आहे हे एकदा पॅटर्न लावला की बरेच गारमेंट शिवून होतात ",....... प्रशांत माहिती देत होता 

प्रशांत ने सगळ्यांसाठी कॉफी मागवली तेवढ्यात वीणाचे सर आले 

"आवडला का डेमो? ... वीणा सगळे पॅटर्न दाखवले का", ?....... सर 

येस सर...... वीणा 

" प्रेझेंटेशन बघायच का परत एकदा मिस्टर समर ",...... सर 

" नाही छान आहे मशीन, delivery च्या वेळी एकदा आमच्या फॅक्टरीत याव लागेल demo आमच्या टेलरला दाखवा त्याला training द्यावा लागेल ",....... समर 

" Yes sure.... आम्ही अरेंज करतो तस ",....... सर 

सगळ्यांनी कॉफी घेतली, सर, समर आणि मिस्टर दीक्षित बाहेर बोलत उभे होते , वीणा प्रीतीने आवरायला घेतल डिझाईन नीट ठेवले लॅपटॉप सगळ समान नीट ठेवल 

दोघी निघाल्या तसा समर उठून पुढे आला, वीणाने बघितल तो खरच तिच्या कडे बघत होता, हे माझ्या मनाचा भ्रम आहे की प्रीती बोलते तस हा खरच माझ्या कडे बघतोय, तिने त्याच्या कडे दुर्लक्ष करायच ठरवल, 

"Thank for your time वीणा प्रीती, तुम्हाला घरी सोडू का मी", ?....... समर 

"नाही आम्हाला बाहेर जायच आहे जरा, सर आम्ही निघू का",...... प्रिति 

Yes sure thanks......, सर 

See you वीणा प्रीती ... बाय 

बाय... भेटू उद्या सर 

दोघी निघाल्या, वीणा मुद्दाम समर कडे बघायच टाळत होती, समरला ते लक्ष्यात आल तो गालातल्या गालात हसत होता 

समर चा मूड खूप छान झाला होता , अगदी काय करू काय नको असं झाल होत त्याला, 

प्रीती आणि वीणा ऑफिस मधून  निघाल्या, सरळ मार्केटला पोहोचल्या, प्रीतीने दोन-चार ड्रेस घेतले, वीणाने  ही वहिनी साठी दोन ड्रेस घेतले, स्वतःसाठी दोन टॉप आणि आईसाठी साडी घेतली, अगदी मनसोक्त झाली खरेदी 

"खूप थकलोय ग प्रीती, सकाळपासून ऑफिसमध्ये काम सुरू होतं, चल आपण कॉफी घेऊया",.... वीणा 

"हो आणि काहीतरी खाऊ या ",..... प्रिति 

म्हणून दोघीही कॉफी शॉप  कडे निघाल्या कॉफी शॉप मध्ये पोचल्यावर कोपर्‍यातले टेबल बघितलं, शॉपिंग बॅग ठेवले, वेटर जवळ आला, त्याला कॉफीची आणि सँडविचची ऑर्डर प्रीतीने दिली 

" बर झाल वीणा तू वहिनी साठी ड्रेस घेतले ",...... प्रिति 

"हो ग काय सांगायचं होतं तिला काय माहिती, आवड आहे तिला शॉपिंगची, का आली नाही आज काय माहिती? , आहे ती जरा चीडकी पण मनाने चांगली आहे ती खूप" ,...... वीणा 

"एकदा ये ना आई आणि वहिनी ला घेवून माझ्याकडे",.... प्रिति 

नक्की....... 

" समर परांजपे बघितला किती खोट बोलला आपल्याला...... आधी का वेगळ नाव सांगितल पण", ?...... प्रिति 

" जाऊ दे ना आपल्याला काय? तो कोणी ही असे ना ",...... वीणा 

" पण तो तुझ्या कडे बघतो हे नक्की ",.... प्रिति 

" काही तरी काय हे तुझ प्रीती, तो एवढा मोठ्या कंपनी चा बॉस मालक का बघेन माझ्याकडे? तू हा विषय थांबव बर आता ",....... वीणा 

" अग मी खर बोलते आहे तू प्रशांतला विचार", ....... Ohh Ho मॅडम तेरी तो निकल पडी,..... प्रिति

" काहीही ह प्रीती, तू तुझ्या मनातून काढून टाक ग हे, समरला काही काम नाही का? तो कश्याला बघेल माझ्या कडे ",...... वीणा 

प्रितीचा फोन वाजतो ती फोन वर बोलत असते, वीणा तिच्या विचारात हरवते...... खरच समरला मी आवडते का?

🎭 Series Post

View all