Jan 28, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 6

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 6

 


वीणा आणि प्रीती ऑफिस जवळ आल्या,समरने त्यांना गेटवर सोडले, त्या दोघी आत निघून गेल्या समर बराच वेळ तिथेच गाडीत बसून होता, नंतर तो  ऑफिस कडे परत निघाला


"तुला असं नाही वाटत का विणा रोहित आपल्याशी खूपच चांगला वागत होता? , तो प्रेमा बिमात तर नाही ना पडला तुझ्या? कारण तो सारखा तुझ्याकडे बघत होता",....... प्रिति


"तू इम्पॉसिबल आहेस प्रीती.... तुला काही सुचत नाही का ग?  तो जेंटलमेन आहे, आपण एकटेच घरी येतो म्हणून त्याने आपल्याला ऑफिस पर्यंत सोडलं एवढच.... तु जास्तीचा विचार करून वेळ वाया घालवू नको ",....... वीणा


समर ऑफिसला जातांना अगदी हवेतच होता, वीणा सोबत घालवलेले क्षण आठवून आठवून त्याला हसू येत होते, तिला परत कसे भेटता येईल याचाच विचार तो करत होता, फोन नंबर तरी घेतला असता तिचा, नको  खूप घाई होईल, काय करता येईल.... ती साडेसहाला घरी जायला निघते तेव्हा भेटू का तिला, कस काय करता येईल.... कसं काय भेटता येईल? कारण काय द्यायचं भेटीचं, नको ती काय विचार करेन एक तर माझी ओळखही वेगळी सांगितली आहे तीला,काहीही करून वीणा हवी आहे मला, अरे हे असे काय विचार येता आहेत मनात वीणा किती भोळी आहे तिला माहिती नसेल की आपण तिच्याबद्दल असा विचार करत आहोत


विचार करत तो ऑफिसला पोहोचला, केबिनमध्ये येऊन बसला, तेवढ्यात मम्मीचा फोन आला


"कुठे गेला होता तु समर? माझ्या केबिन मध्ये ये लगेच महत्वाची मिटींग आहे",....... मॅडम


"हो येतो मी ",...... समर


समर केबीन मध्ये गेला मीटिंग सुरू झाली मिटिंग मध्ये सुद्धा समर लक्ष नव्हतं


"काय चाललं आहे समर? कुठे लक्ष आहे तुझं? मी केव्हाची हाका मारते आहे तुला ",..... मॅडम 


" सॉरी बोल ना काय म्हणतेस मम्मी ",...... समर


"ठीक आहे आपण उद्या बोलु, तू आज मूड मध्ये दिसत नाही आहेस",....... मॅडम


गोड विचारताच समर घरी आला, आजी आजोबा टीव्ही बघत बसले होती


" आज मूड खूप छान आहे का तुझा समर, काय झाल ",...... आजी


" काही नाही ग आजी", ....... समरने आजीला मिठी मारली


"अरे नक्कीच काहीतरी झालं आहे, मला नाही सांगणार का"?,..... आजी


" आजी तुझी आणि आजोबांची ओळख कशी झाली होती, सांगा ना"?,........ समर


"काय रे आज काय हे नवीन",..... आजी छान लाजली होती, आजोबा हसत होते


" सांग ना",...... समर


"तुझे आजोबा मला बघायला आले तेव्हा मी 18 वर्षीची होती, पाहिलच स्थळ होत ह ते, ते आले मी त्यांना बघितल आणि मी त्यांच्या प्रेमात पडले, तुझे आजोबांना ही मी खूप आवडली होती, लगेच होकार येऊन धुमधडाक्यात लग्न झालं आमच, छोट्याशा खोलीत संसार होता आमचा, पण कधीच काही कमी पडलं नाही ",...... आजी


आजोबा आजीकडे कौतुकाने बघत होते


" शेवटी काय लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, ज्यांना भेटायचं असतं ते जरूर भेटतात, आमचं लग्नाला आज एवढे वर्ष झाले  एकदाही भांडण नाही ",.... आजी


" खरच! एकदा ही नाही झाल भांडण "?,...... समर


" नाही बेटा , कस असत , जो आवडतो ना..... ज्याच्या वर प्रेम असत, त्याची कुठली ही गोष्ट खटकत नाही ",..... आजी


आजी आजोबा एकमेकांकडे खूप छान हसत बघत होतो,


" आजी तू आहेच एवढी गोड, कोणीही तुझ्या प्रेमात पडेल
, आजी हे खरं आहे का स्वर्गातल्या गाठी वगैरे",..... समर


" हो रे... खरं आहे,"...... आजी


"माझ्यासाठी पण कोणी बनल आहे का "?,...... समर


"हो नक्कीच",....... आजी


"किती छान वाटतं ना कोणी प्रेमाचं माणूस सोबत असलं की",....... समर


" हो, पण आज झालय काय तुला, प्रेमाबिमात पडला की काय तू? असं काही असेल तर मला आधी सांग ",...... आजी


"असं काही नाही ग, सहज विचारतो आहे",...... समर अजुन ही गालातल्या गालात हसत होता


सोहा घरी आली कॉलेजहून तिच्यासोबत तिची मैत्रीण शनाया ही होती, समरला बघून शनायाचे डोळे चमकले


" हाय समर ",...... शनाया


" हॅलो शनाया",...... समर


चल आजी मी आवरून येतो


"एक मिनिट समर, काय झालं? मी आले कि तू निघून का जातोस? तू आमच्यात मिसळत का नाहीस, आमची गॅंग खूप कुल आहे,  तु एन्जॉय करशील आमची कंपनी",...... शनाया


"सॉरी शनाया, मला वेळ नाही आणि तुम्ही मुली फिरण्या पेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या जरा , मी आत्ताच ऑफिस हुन आलो आहे, मी फ्रेश होऊन येतो",..... समर


सोहाने आजी कडून रिमोट घेऊन शनायाला दिला


" तु टीव्ही बघत बस शनाया, मी येते आवरून",...... सोहा


तसा समरने  शनायाच्या हातून रिमोट काढून घेतला आजी-आजोबांना परत दिला


" आजी बघते आहे ना  टीव्ही, तो सोहाला बोलला, बघ ग आजी तू टीव्ही ",...... समर


तशी  सोहा आपल्या खोलीत रागाने निघून गेली समरही त्याच्या खोलीत फ्रेश व्हायला गेला


शनाया त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे बघतच बसली


कामवाल्या मावशी सरबत घेऊन आल्या, शनायाने तुच्छतेने त्यांच्याकडे बघितलं,


"सरबत घ्या ताई",


"ठेव टेबलावर" ,....... शनाया


मावशी सरबत ठेवून आत निघून गेल्या, आजी आजोबा तिच्याकडे बघत होते


"बस ग शनाया",...... आजीने ने सांगितला


"नको मी ठीक आहे",...... शनाया


अतिशय छोटे कपडे भडक मेक अप केस कापलेले, शनाया आजीला अजिबात आवडत नव्हती, शनायाला नेहमी राग आलेला असतो, आत ही कामवाल्या मावशीशी कशी वागली ती, आताही तिच्या छोट्या स्कर्ट मुळे तीला खाली बसता येत नव्हतं


"आजी तुम्ही दिवसभर बोर होत नाही का घरात "?,..... शनाया


"नाही ग काम असतात मला खूप",..... आजी


"तुम्ही क्लब का नाही जॉईन  करत, फोर फन.... किती बोरिंग लाइफ आहे तुमची, कपडेही सेम बोरिंग साडी असते तुमची",...... शनाया


आजी-आजोबा हसत होते


"तुला कसं कळलं की आमची लाईफ बोरिंग आहे ",...... आजी


" सारखं घरात बसून कंटाळा नाही येत का , सकाळी काय करता तुम्ही जिम लावली का? ",...... शनाया


" नाही ग, आम्ही बागेत जातो फिरायला",....... आजी


" कमॉन आजी, तुम्ही स्वतःला थोडा वेळ द्यायला पाहिजे",....... शनाया


आजी आजोबा छान हसत होते


थोड्या वेळाने सोहा खाली आली


" आजी आम्ही  वाढदिवसाला जातो आहोत मैत्रिणीकडे, थोडा उशीर होईल, आईला सांगितले आहे तसे, येतो आम्ही ",....... सोहा


" उशीर करू नको ग सोहा",....... आजी


" हो आजी", ....... सोहा


" समर जॉईन होतो आहे का आपल्या सोबत", ?....... शनाया अजून वरच्या रूम कडे बघत होती


" नाही ग तो आणि त्याच ऑफिसचं काम, तो जास्त सोशल नाही ",....... सोहा


" विचारुन बघ ना एकदा त्याला",..... शनाया


" तु चलणार  आहेस का आता? की मी जाऊ",....... सोहा


दोघी निघून गेल्या


तसे आजोबा बोलले......." सोहाने ने त्या शनाया बरोबर राहायला नको, आगाऊ मुलगी वाटते आहे ती ",


" हो ना आजी बोलल्या, .... श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी तिला अजिबात सामान्य परिस्थितीची माहिती नाही, रोजच्या जीवनात काय कामे असतात हेही तिला माहिती नसेल, तिची नजर बघितली का कशी आहे? सारखी समर च्या मागे मागे करत असते ती, आज दृष्टच काढते  समरची",


मम्मी पप्पा घरी आले खाली फ्रेश होऊन जेवायला आले समर ही खाली आला, भूक लागली आहे मम्मी


" चला मी जेवणाचे पान घ्यायला सांगते",..... मम्मी


सगळे जेवायला बसले आजी आजोबा समर मम्मी पप्पा 


" आजही सोहा नाही का जेवायला"?....... पप्पांनी विचारलं, " काय चाललय तीच"?


"मैत्रिणीकडे गेली आहे वाढदिवसाला", ... मम्मी ने सांगितले


"आठवड्यातून चार-पाच दिवस ती बाहेरच असते, अस चांगल आहे का? काय चालू आहे तीच सध्या",?..... पप्पा


"हो ना", .... आजी बोलली..... मग अचानक  ती  गप्प झाली


"मी बोलतो उद्या  सोहाशी",....... समर बोलला


"मीही  उद्या बोलणार आहे तिच्याशी, विशेष अभ्यास नसेल तर ऑफिस जॉईन कर ना म्हणा, थोडं काम शिकून घे",..... पप्पा
...........

वीणा घरी आली.... दादा फोन वर कोणाशी तरी विणवल्या सारखं बोलत होता, वीणाला बघून तो बाजूला गेला


" काय ग वहिनी कोणाचा फोन आला आहे दादा ला", ?..... वीणा


आहो ताई ते........


तेवढ्यात दादा आत आला, वहिनी गप्प बसली


" ह सांग ना कोणाचा फोन होता वहिनी"?,....... वीणा


दादा वाहिनी कडे रागाने बघत होता ती काही बोलली नाही


"हो मी बोलत होते की मला माहिती नाही हे कोणाशी बोलता आहेत ते ",........ वहिनी


प्रकाश, बाबा ऑफिस हून आले, सगळे जेवायला बसले,


"कस झाल प्रेझेंटेशन? आवडलं का त्यांना"?...... बाबा विचारत होते


"अजून सुरूच आहे का तुमचं? प्रेझेन्टेशनच, फिक्स नाही झाली का ऑर्डर", ?......... दादा विचारत होता


" हो रे दादा, सुरू आहे  काम, एवढी महाग वस्तू आहे, घेण्याआधी ते  प्रेझेन्टेशन मागतीलच",...... वीणा


" तु ना वीणा खूप चांगली आहे, कोणी किती जरी त्रास दिला तरी तू सहनच करशील ",....... दादा


" अरे त्यात काय त्रास दादा, माझं काम आहे ते करावाच लागेल",....... वीणा


आई कौतुकाने सगळं ऐकत होती


" आत्या तू घरी नव्हती ना, तेव्हा आई-बाबांच भांडण झालं" ,..... छोटा  अभी सांगत होता.......


" काय रे रे दादा? भांडला का वहिनीशी? काय झालं",..... वीणा


"नाही ग ते असंच, थोडसं सामान नव्हत ना, म्हणुन झाल, सविता अति करते",....... दादा


"मी अति करते का? बघितल ताई कसे बोलतात मला सारखे हे ",........ वहिनी


" कशाला भांडता रे? ... घरखर्चाला जर अजून काही पैसे लागले तर तर मागून घेत जा", ... बाबा बोलले


वहिनी दादा फिरायला निघाले,


" मी बोललो होतो तुला सविता, वीणाला काही सांगू नको असा",....... दादा


" अहो पण मी काही बोलले नाही आणि तुम्ही बघितल का, काल बाबा सांगत होते प्रकाशला की आहेत त्यांच्या कडे पैसे, मी देवू का, मग तुम्ही एवढा त्रास का करून घेतात? एकत्र राहतो ना आपण, मग आपले सुख दुःख वाटायला नको",...... वहिनी


" ते मला माहिती नाही सविता, पण मी बोललो होतो की मी करेन खर्च आणि आता पैसे मागायचे ते बर दिसत का",?....... दादा ,


" काहीही करा, नाही तर तुम्ही कुठे काही ऐकता माझ, फक्त टेंशन घेवू नका, मला तुमची खूप काळजी आहे ",...... वहिनी


" काळजी आहे तर का भांडते माझ्याशी",?....... दादा


" तस नाही हो तुमची धड पड दिसते मला ",....... वहिनी


" मिळाला का पगार? कधी होणार आपला पगार? आता खूप जास्त झाला आहे हा ",..... वहिनी


" नाही मिळाला, पैसे मिळाले असते तर तुला  दिले असते ना हातात",..... दादा


हो....... वाहिनीच्या डोळ्यात पाणी होत


"पुरे सविता आता, मी चुकलो, बस पुरे कर  ग, आपण नको भांडू या, या परिस्थितीत भरडलं गेलो आहोत आपण",...... दादा


"हो ना, मी सांगते ते ऐका ना, घेऊया ना घरून पैसे, वाटलं तर नंतर वापस करता येतील",...... वहिनी


"ठीक आहे मी बोलतो नंतर बाबांशी,  पण तू बोलू नकोस",....... दादा


" ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं",......... वहिनी


चल आपण थोडे फळ भाजी घेवू


प्रकाश काही तरी काम करत बसला होता


" मिळाली का स्पॉन्सरशिप "?,....... वीणा


" नाही अजून, एक दोन कंपन्यांना अप्लाय केला आहे बघू आता काय होतं ते ",?...... प्रकाश


"प्रेझेंटेशन रेडी आहे का तुझं प्रकाश"?,....... वीणा


"हो रेडी आहे, जरा बघतेस का"?,...... प्रकाश


प्रकाशने प्रेझेंटेशन विणाला दाखवलं, वीणा सगळं वाचत होती, "खूप छान झाला आहे रे, मस्त हेच प्रेझेंट करत जा, बघ तुझं काम होईन पटकन ",...... वीणा


"व्हायलाच पाहिजे काम", ...... प्रकाश

............

घरातले सगळे झोपले तरी समर जागा होता, त्याला झोप येत नव्हती, खाली हॉल मध्ये बसुन तो लॅपटॉप वर काम करत होता, तस त्याच मन लागत नव्हत, मनात वीणाचे विचार येत होते, काय करत असेल वीणा आता, ती कुठे राहते, घरात कोण कोण असेल, झोपली असेल का ती, एका सुंदर छोट्याशा बेडरूम मध्ये कॉटवर सुंदर वीणा लोळून पुस्तक वाचत असेल का? तिचे सुंदर मोठे केस तिने मोकळे सोडले असतील, झुळझुळीत गुलाबी पडदे पंख्याच्या वार्‍याने हलते असतील त्याबरोबर वीणाची केसाची एखादी अल्लड बघ सारखी चेहर्‍यावर येत असेल आणि ती ते नीट करण्याचा उगीच प्रयत्न करत असेल, मी जर तिथे असतो तर काय केलं असतं, खूप गप्पा मारल्या असता विणाशी खूप बोलायचं आहे तिच्याशी, अजून ओळख वाढवायची आहे, विचार करून समरला हसू आलं पण काय करणार,


मम्मी आली खाली


" काय काम सुरू आहे समर, झोप येत नाही का", ?....  मम्मी


" काही नाही ग मम्मी, थोड्या ईमेल चेक करतो आहे",...... समर


"डोक्याला तेल लावू का" ?....... मम्मी


"नको तू बस इथे धावपळ होते तुझी रोज",....... समर ,


"सोहा आली का" ?,..... मम्मी


"नाही अजून" ,...... समर

" फोन करून बघ तिला" सोहाला समजत नाही का? आज पप्पा किती चिडले होते" ,......  मम्मी


"हो ना, तू काळजी करू नकोस मम्मी, मी बोलून बघतो सोहाशी",........ समर


"मी जावून झोपते, तू ही आराम कर",..... मम्मी


Ok मम्मी......


समर सोहाला फोन लावतो


"आलीच आहे इथेच आहे",....... सोहा फोन ठेवते


परांजपे मॅडमच खुप प्रेम आहे समर अणि सोहा वर त्यांच थोड ही इकडे तिकडे थोडही झालेलं त्यांना चालत नसे, मुलांच्या लहान पणा पासुन ऑफिस सांभाळून खूप छान सांभाळ केला आहे त्यांनी मुलांचा, म्हणून मुल ही खूप प्रेम करतात त्यांच्या वर, खूप लळा आहे,


"सोहा.... come here हि काय वेळ आहे घरी यायची",..... समर


Chill bro.....


"लाईटली घेवू नकोस, आज पप्पा ही विचारात होते तू नेहमी बाहेर असते, कुठे फिरत असते", ??....... समर


"सांगितला होत birthday ला गेली होती",..... सोहा


"सगळया प्रोग्रामला जायला हव का? स्टडी कसा सुरू आहे तुझा? परीक्षा कधी आहे", ?........ समर


"ऐक न दादा... मला तुला एक गोष्ट सांगायची आहे",....... सोहा


" हो सांग ",...... समर


तेवढ्यात ममाने खाली डोकावलं," आली का सोहा? जेवलीस का तू"?


हो  मम्मा........


" झोप मग लवकर सकाळी कॉलेज आहे ना"?..... मम्मी


ओके हो आवरते.....

दादा बोल काय म्हणतो आहेस तू


" पप्पा म्हणत होते तुला अभ्यास नसेल तर ऑफिस जॉईन कर ",..... समर


"अभ्यास नाही म्हणजे काय? आहेच मला अभ्यास, थोडसं सोशल नाही व्हायचं का मी? कुठे जाऊ नको का", ?........ सोहा


" जा तू पण जरा कंट्रोल ठेव, आता तू आठवड्यात चार-पाच दिवस बाहेर असते, एक-दोन दिवस जा, बाकीचे दिवस घरच्या लोकांसोबत बाबांसोबत घालव ",.... समरसोहा समर शी बोलताना दोन-तीनदा तिचा फोन वाजला, तो तिने कट केला,


" काय झाला आहे सोहा तू फोन का कट करते आहे", कोणाचा आहे फोन ?....... समर


"मी आज बोलणार होते तुझ्याशी दादा, आम्हाला गर्ल्स चला पिकनिकला जायचं आहे, तू प्लीज मला मदत कर बाबांशी बोलायला",...... सोहा


"कठीण काम दिले तू मला, पप्पांचा मुड कसा आहे ते बघावं लागेल आधी, कुठे जाणार पण पिकनिकला ",?..... समर


"गोवा ला ",...... सोहा


समर हसायला लागला,......." काय माहिती पप्पा काय म्हणतील, तू तुझं सांगितलं तर अजून फरक पडेल",.......


" ठीक आहे मी करते ट्राय",..... गुड नाईट दादा


" गुड नाईट सोहा


दुसर्‍या दिवशी पप्पा डायनिंग टेबलवर सकाळी हजर होते, सोहा कॉलेजला जायला निघाली


" गुड मॉर्निंग सोहा",........ पप्पा


" गुड मॉर्निंग पप्पा",........ सोहा


" काल केव्हा आलीस तू घरी" ?...... पप्पा


" पप्पा मी बर्थडे ला गेली होती मैत्रिणीच्या, मम्मीला सांगून गेली होती" ",...... सोहा" तू आजकाल बरेच बाहेर फिरत असते",...... पप्पा" ग्रुप  इतका मोठा आहे आमचा, कोणाचा न कोणाचा बर्थडे असतो, एकाच्या बर्थडेला गेलं दुसऱ्याच्या नाही गेलं तर राग येतो",...... सोहा"कॉलेज कसे सुरु आहे तुझं? जमलं तर थोडे दिवस ऑफिस जॉईन कर, थोडं काम शिकून घेणार  तुझ्या मम्मीच्या हाताखाली ऑफिसच" ,...... पप्पा


" येस पप्पा, एका महिन्याने आमचे 2 लेक्चर कमी होणार आहे तर मी दुपारपासून जॉईन होईल ऑफिसला",..... सोहा


" ठीक आहे",..….. पप्पा


" अजून एक विचारायचं आहे पप्पा, आम्ही गर्ल्स गॅंग गोव्याला जात आहोत, मी जाऊ का त्यांच्यासोबत, कोणकोण जात आहे, क्लासमधल्या सगळ्या मुली, वीस-पंचवीस आहोत आम्ही, लास्ट इयर आहे ना आमचं ही ट्रीप मेमोरेबल करायची ठरवली आहे आम्ही",...... सोहा


" ठीक आहे, दे तुझ नाव ",..... पप्पा


लव यु पप्पा..... सोहाने अत्यानंदाने पप्पा मिठी मारली, मी कॉलेजला जाऊन येते पप्पा,


ठीक आहे लवकर ये ग.....


सोहा कॉलेजला निघून गेली

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now