Jan 28, 2022
कथामालिका

प्रित तुझी माझी... ❤️भाग 5

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 5

 

वीणा घरी आली, दादा काही तरी हिशोब करत बसला होता, वीणा ने हाथ पाय धुतले


"दादा तू घेशील का चहा" ?,..... वीणा


अ... अ


"कुठे आहे लक्ष दादा" ?,....... वीणा


"काही नाही",...... दादा दचकला होता


"काही प्रॉब्लेम आहे का? मी बघते दोन दिवसापासुन तू काही तरी हिशोब करतो आहेस",..... वीणा


"काही नाही",....... दादाने वहि बंद केली


चहा झाला वीणा आई बरोबर भाजी आणायला गेली


वहिनी दादा जवळ आली


" अहो तुम्ही सांगून का देत नाहीत ताईंना की सावकार पैसे मागतो आहे ते, बाबांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी 25000 घेतले होते कसे देणार आपण? आपलाच दोन महिन्यापासून पगार नाही" ,...... वहिनी


"तू जरा गप्प बसणार का सविता, मी काय करायच ते बघतो, पण तू जर वीणाला या बद्दल काही सांगितल तर बघ",...... दादा


"मी काय म्हणते....... वीणा, बाबा, प्रकाश सगळ्यांनी मिळून मदत केली तर ते कर्ज लगेच फिटेल, आपल्याला का हा त्रास" ??....... वहिनी


अभी आरू सगळं ऐकत होते


" काय झालं आई? कोणाचे पैसे द्यायचे आहेत" ?, ......... अभी


"काही नाही बाळा, तु इकडे लक्ष देऊ नकोस, नाहीतर इथे या घरात माझ कोण ऐकत आहे, काटकसर आपण करा, काहीही घेण्यासाठी आम्हालाच नकार, शिवाय काहीही बोलायचं नाही घरात, सारख आपल तू गप्प बस अस सुरू असत यांच", .... वहिनी बडबड करत स्वयंपाकाला लागली


बाजारात भाजी घेवून झाली, आई वीणा दोघी घरी यायला निघाल्या


"वीणा बेटा तू खुश आहेस ना",.... आई ने विषय काढला


" हो आई का ग"?,........ वीणा


" काल राहुलचा फोन उचलला नाही तू "?,........ आई


" झाल गेल विसरून पुढे जायला हव आई ",.... वीणा


" हो ग पण मला तुझी काळजी वाटते, काही मनात असेल तर बोलत जा",...... आई


" आई मी निर्णय बरोबर घेतला का"?,...... वीणा


"तुला त्रास दायक वाटत होत ना हे नात"?,....... आई


" हो आई",....... वीणा


"मग बरोबर केल तू बेटा, काळजी करू नकोस",........ आई


प्रकाश घरी आला, आज जरा नाराज दिसत होता, आई आणि वीणा भाजी घेऊन आली


"काय रे प्रकाश काय झालं", ?........ वीणा


" अगं ते मी तुला सांगतल ना प्रोजेक्टचं ते काम बहुतेक नाही होणार माझं",........ प्रकाश


" का काय झालं"?....... वीणा


" खूप पैसे पाहिजे त्या प्रोजेक्ट साठी, त्या लोकांना माझी आयडिया आवडली आहे पण बघू आता पुढे काय होते",...... प्रकाश


" तू नाराज होऊ नको ",...... वीणा


" नाराज नको होऊ तर काय होवू, आपण दुसऱ्याच्या हाता खालीच काम करणार आहे का कायम? मग ही हुशारी काय कामाची आहे "?,....... प्रकाश


बाबाही घरी आले, सगळ्यांचे जेवण सुरू होते , प्रकाश अजूनही नाराज होता, दादा ही विशेष जेवत नव्हता


" आज झालंय काय सगळ्यांना? उगीच मी एवढी धडपड करून स्वयंपाक करते, कोणी जेवत नाही",....... आई बोलत होती


वीणाने डोळ्याने बाबांना सांगितलं प्रकाशशी बोला


"प्रकाश काय चाललं आहे तुझं सध्या? तुझं जेवणात लक्ष नाही आज ",........ बाबा


"बाबा आज माझं महत्त्वाचं प्रोजेक्टच काम झालं नाही, पैशासाठी अडल सगळं,"....... प्रकाश


" किती पैसे लागत आहे? मी काही मदत करू का", ?...... बाबा


"नाही बाबा आपल्या आवाक्यातली गोष्ट नाहीये ती, जास्त पैसे लागतील, स्पॉन्सरशिप मिळाली तर बरं होईल",...... प्रकाश


" कुठपर्यंत काम आल आहे तुझ बेटा वीणा, झाल का पूर्ण "?,..... बाबा


"बाबा ते लोक आम्हाला सारखं प्रेझेंटेशन द्यायला सांगत आहे, उद्या परत प्रेझेन्टेशन आहे ",......... वीणा


" आवडली का त्यांना मशिनरी"?,....... बाबा


" हो मशिनरी आवडली आहे, पण त्या मेन परांजपे मॅडम आहेत त्या अजूनही आम्हाला भेटल्या नाहीत",...... वीणा


रात्री बघते तर परत राहुलचे दोन तीन मिस कॉल होते


सकाळी आवरून वीणा ऑफिसला निघाली, बस स्टॉप वर पोहचली, राहुल तिला तिथे भेटला


"हॅलो वीणा ",.......राहुल


तशी वीणा दचकली


" ओळखलं नाही का मला",?...... राहुल


" तू इथे काय करतो आहेस? राहुल",...... वीणा


"मी तुलाच भेटायला आलो होतो, तू माझे फोन उचलत नाही" ,..... राहुल


"आता तुझे फोन उचलण्याचा काहीही प्रश्न येत नाही राहुल आणि तू प्लीज मला फोन करण बंद कर",....... वीणा


"तू म्हटले म्हणून तुटलं का सगळं आता नात",....... राहुल


" हो माझ्यासाठी तर ते तुटलेला आहे, यापुढे प्लीज मला भेटायचा प्रयत्न करू नको नाहीतर मी तुझ्या घरी कंप्लेन करेन ",..... वीणा


" मला एक चान्स दे वीणा, माझं चुकलं, तू म्हणशील तस करू आपण",...... राहुल


"आता या गोष्टीला उशीर होऊन गेलेला आहे, राहुल मी खूप पुढे निघून गेलेली आहे, आपण यापुढे नको भेटूया",........ वीणा


बस आली वीणा बस मध्ये बसून निघून गेली


वीणा ऑफिसला पोहोचली, प्रीती आलेली होती, तेवढ्यात सर आले सगळे उठून उभे राहिले


" दीक्षित यांचा कंपनीतुन फोन येईल 11 नंतर, मग मी सांगतो तुम्हाला जायचा की नाही ते ",...... सर


" ओके सर.", ... दोघीही कामाला लागल्या


"ऐक ना प्रीती, आज राहुल भेटला होता बस स्टॉपवर सकाळी",........ वीणा


"आता कशाला भेटतो आहे तो तुला" ?,...... प्रिति


" बोलत होता एक चान्स दे ",..... वीणा


" तू लक्ष देऊ नको त्याच्याकडे वीणा ",..... प्रिति


"नाही ग मी कशाला लक्ष देईल त्याच्याकडे",....... वीणा


" आधी तू चांगली होती ते तेव्हा तुझ्याशी भांडायचा तो आणि आता काय मागे मागे येतो आहे"?,....... प्रिति
..........

समरही ऑफिस मध्ये आला होता, त्याने साई इंटरप्राईजेसची फाईल मागून घेतली,


"किती मशिनरीची ऑर्डर दिली आहे मिस्टर दीक्षित"?,..... समर


"सर सध्यातरी दहा मशीन सांगितल्या आहेत ",....... दीक्षित


" त्याचा सेटअप कोण करणार आहे"?,........ समर


"त्यांच्याकडूनच येतील रिप्रेझेंटेटिव्ह",........ दीक्षित


"त्यांना माहिती आहे ना आपल्याला फॉरेन हुन ऑर्डर आलेली आहे ते? एक्सपोर्ट क्वालिटीचे गारमेंट पाहिजे आपल्याला, प्रेसेंटेशन कुठे आहे"? ,...... समर


"आज येणार आहेत ते लोक ",....... दीक्षित


"ओके बोलवुन घ्या त्यांना दुपारी, मी माझी मिटिंग शेड्युल बघतो आणि सांगतो",...... समर


दुपारी लंच नंतर मिटींग ठरली वीणा आणि प्रीती, परांजपे अंड कंपनीच्या ऑफिस मध्ये पोहोचल्या, त्यांना रिसेप्शन मध्ये बसायला सांगून मिस्टर दीक्षित आत गेले


"सर साई इंटरप्राईजेस हुन रिप्रेझेंटेटिव्ह आले आहेत",....... मिस्टर दीक्षित


"ओके मॅडम येणार आहेत का मिटींगला",.. ?........ समर


"मला माहिती नाही सर, पण मॅडम आणि सर बिझी आहेत कॉल मध्ये"......... दीक्षित


समर आईला फोन लावला.........


"आई तु येते आहेस का मिटींगला? एकदा प्रेझेंटेशन बघून घे ना ",......समर


" नाही मी बिझी आहे, बाबा हि बिझी आहेत कॉल मध्ये, तू बघ प्रेझेंटेशन",........ मॅडम


ओके..... समर


समर कॉन्फरन्स हॉलकडे यायला निघाला, वीणा प्रीती ऑल रेडी कॉन्फरन्स हॉल मध्ये येउन बसल्या होत्या, मिस्टर दीक्षित काहीतरी घेण्यासाठी बाहेर गेले होते, त्यांनी प्रीती आणि वीणा साठी कॉफी सांगितली, शिपाई कॉफी घेऊन आत येतच होता तेव्हा समरचा धक्का कॉफीच्या ट्रे ला लागला, थोडीशी कॉफी शिपायाच्या हातावर सांडली,


"ओह आय एम सॉरी, जा तू हाथ धुऊन घे, हि कॉफी मी नेतो",....... समर


म्हणून समर त्याचा कोट बाहेर काढून हातात कॉफीचा ट्रे घेऊन आत आला, वीणा आणि प्रीती ला कॉफी देऊन तो तिथेच उभा राहिला, आधीच कंटाळलेल्या प्रितीने विचारले


"कधी येणार आहेत मिस्टर दीक्षित? त्यांना काही वेळेच भान नाही का? असे कसे ऑफिसमधले लोक"? ...... प्रिति


"अगं हो येतीलच" , वीणा समर कडे बघुन बोलली... "प्रितीच्या वतीने मी तुमची माफी मागते, प्रीती कंटाळली आहे, या प्रेझेंटेशनसाठी आम्ही दोन-तीनदा इकडे येऊन गेलो ना म्हणून ती चिडचिड करते आहे",


समरला समजतच नव्हतं काय सुरू आहे, मी ईथला बॉस आहे हे त्याने त्या दोघींना माहिती नव्हते, त्यांची मजा बघत समर तिथेच उभा राहिला


तेवढ्यात मिस्टर दीक्षित तिथे आले दारातच समरने त्यांना अडवल व सांगितले की मी बॉस आहे हे बोलू नका,


"का सर" ?........ दीक्षित


"आहे एक गंमत सांगतो नंतर, चला आता आत जाऊ ",...... समर


मिस्टर दीक्षित यांचे असिस्टंट रोहित त्यांच्यासोबत होता समर बोलला रोहितला आपण बॉस म्हणून प्रेझेंट करू


तेवढ्यात रोहित गडबडून गेला


"नाही सर मला हे जमणार नाही",..... रोहित


समरने काही एकल नाही, रोहितला आपला कोट घातला आणि त्याचे कपडे नीट केले


"अरे तुला काही कुठल्या पेपरवर सही करायची नाहीये, फक्त प्रेझेंटेशन बघायचा आहे आणि आम्ही तिथे उपस्थित असणारच आहोत, चल आत",....... म्हणून बळजबरी रोहितला आज घेऊन गेले, जसा रोहित आत गेला तसे वीणा आणि प्रीती उठून उभे राहिले, मिस्टर दीक्षित यांच्या चेहऱ्यावर हलक हास्य होतं, त्यांनी ओळख करून दिली हे आमचे बॉस समर सर........ समर परांजपे, रोहित बॉस च्या खुर्चीवर जाऊन बसला, मिस्टर दीक्षित आणि समर उभे राहिले,


"प्रेझेन्टेशन सुरू करा" ,........ रोहित बोलला


वीणा उठली आणि प्रेझेंटेशन सुरू केल, तिच मुद्देसूद बोलण..... हुशारी वाखाणण्याजोगी होती, तिचं बोलणं समर मन लावून ऐकत होता, एक एक मुद्दे ती नीट मांडत होती, छान समजवुन सांगत होती, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती, प्रीती हि तिला छान मदत करत होती, पुढची स्लाईड प्रेझेंट करायला लॅपटॉप प्रीती वापरत होती, समरला प्रेझेंटेशन खूप आवडलं, मशिनरी चांगली होती, एक्सपोर्ट कॉलिटी चे गारमेंट्स नक्कीच बनतील त्यात त्याला खात्री वाटत होती,


सगळ्यात जास्त समरला आवडलं होतं ते वीणाचं बोलण, अतिशय समजुतदारपणा.... हुशारी तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होती, तीच अतिशय सुंदर दिसण मनमोहक होत, त्याला हे प्रेझेंटेशन संपू नये असं वाटत होतं, कुठे तरी सुमधूर संगीत कोणी तरी छेडत आहे असा आवाज होता वीणाचा, हे असं का होत आहे मला? एवढ छान गोड कोणी या आधी का वाटल नाही मला? समर मनातच विचार करत होता, यापूर्वी कधी कसं झालं नाही,


कॉलेजमध्ये असताना बऱ्याच ब्युटी क्वीन समरच्या मागे असायच्या, मोठ्या मोठ्या घराण्यातील श्रीमंत स्थळे समरला सांगून येत होते पण कोणालाही समरने कधीच भाव दिला नाही, आज मात्र वीणा कडे बघून वेगळंच वाटत होतं, आपलं कोणीतरी भेटल असं वाटत होतं, लव्ह अॅट फर्स्ट साईट तर नाही ना? , वीणा आहेच तशी गोड, समर गालातल्या गालात हसत होता,


सर सर.............


मिस्टर दीक्षित हाका मारत होते...... लक्ष कुठे आहे


"कसं वाटलं प्रेझेंटेशन सर" ?........ वीणा रोहितला विचारत होती


तसा रोहित गडबडून गेला आणि दीक्षित सरांकडे बघायला लागला,


दीक्षित सर बोलले.... "प्रेझेन्टेशन तर खूप छान होतं, आम्हाला मॅडमशी बोलावे लागेल मी करतो तुमच्या सरांना फोन"


"ठीक आहे तर मग आम्ही निघतो सर ",...... वीणा


समर गप्प उभा राहून वीणा कडे बघत बसला होता, वीणा प्रीती निघताय म्हणताच समर पुढे झाला, "चला मी सोडतो तुम्हाला तुमच्या ऑफिस पर्यंत "....


" नको सर आम्ही जाऊ",....... प्रिति


" कसे जाणार एवढ्या दुपारचे? मी आहे ना, मी सोडतो तुम्हाला ",..... समर


समर पुढे झाला, वीणा आणि प्रीती त्याच्या मागे जाऊ लागल्या, ते मागच्या दाराने पार्किंग लॉटमध्ये गेले .. तसा ड्रायव्हर पळत आला, ड्रायव्हर कडून कारची चावी घेऊन समर स्वतः ड्रायव्हिंग करणार होता, त्याने वीणा साठी कारचं दार उघड, प्रीती वीणा कडे बघत होती, वीणा पुढे बसली समर सोबत, प्रीती मागे बसली, रस्त्याने समरने वीणा आणि प्रीतीची चौकशी करत होता


"तुम्ही दोघी मैत्रिणी आहात का? किती वर्ष झाले एकाच ऑफिसमध्ये आहात" ?........ समर


"हो आम्ही कॉलेज पासून एकत्र आहोत आणि नोकरीला एकत्र लागलो, आधी वीणाला नौकरी लागली मग तिने मला या जॉब बदल सांगितल", ..... प्रितिने सांगितल,


"तुम्हाला परांजपे आणि कंपनीमध्ये किती वर्ष झाली? समर परांजपे स्वभावाने कडक वाटतात? आम्हाला असं वाटलं होतं की थोडा वयस्कर मनुष्य असेल कोणी केली", ... प्रितिची बडबड सुरू होती


" तुम्ही नाही बोलत का काही मिस वीणा", ..... समर वीणाला विचारात होता


"नाही तस नाही काही, मी विचारात होती जरा", .... वीणा


" कसला विचार करताय? आम्हाला सांगता येईल का"??...... समर


" हेच की ही मशिनची ऑर्डर आमच्या आमच्या कंपनीसाठी खुप इम्पॉर्टंट आहे, ही ऑर्डर आम्हाला मिळाली तर फार चांगलं होईल आम्ही फार मेहनत घेतली आहे या प्रोजेक्ट वर ",...... वीणा


" मग तुम्हाला ही ऑर्डर मिळाली तर असं समजा",..... समर


" तुम्ही खूप कॉन्फिडन्ट दिसत आहात, तुम्हाला असं का वाटतंय "?,....... वीणा


" कारण मी बघितलंय समर सरांना प्रेझेन्टेशन आवडले होते",..... समर


" तुमचं नाव काय आहे "?,....... प्रिति


" रोहित नाव आहे माझं, मी दीक्षित सरांचा असिस्टंट आहे",......... समर


समरच्या चेहऱ्यावर हसू होतं.... सांगून टाकु का सगळ की मी समर आहे, की नको अजून गंमत करावी? काही सुचत नव्हतं समरला,


"किती वेळ असतं तुमच ऑफिस"?,....... समर


"आम्ही साडे सहाला घरी जायला निघतो",......


पुढच्या भागात बघू समर आणि वीणाची परत भेट कशी होते.........

............

भाग 4 चि लिंक देत आहे

https://www.irablogging.com/blog/prit-tuzi-mazi_6711

हि कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now