प्रित तुझी माझी... ❤️भाग 4

वीणा आज जरा उशिराच घरी आली, आई वाट बघत होती, "काय ग आज उशीर झाला घरी यायला" ? "हो आई मी सांगितलं नव्हत

वीणा आज जरा उशिराच घरी आली, आई वाट बघत होती, "काय ग आज उशीर झाला घरी यायला" ? 

"हो आई मी सांगितलं नव्हतं का, नवीन ऑर्डर च काम होतं, उद्या मिटींग आहे ऑफिसमध्ये मोठी" ,..... वीणा 

"झालं का मग ते काम" ?...... आई 

"सुरू आहे, प्रीतीला बरं नाहीये, त्यामुळे माझी धावपळ होते", ...... वीणा 

"हो ना, कस वाटतय आता तिला"? ... आई 

" आता तर ताप हि आला आहे",... वीणा 

" वहिनी कुठे गेली"?..... 

" ती गेली दादासोबत बाहेर, केव्हाचे गेले ते आता येतीलच" ...... आई 

आशु आणि आरु बाहेर खेळत होते

दादा वहिनी वापस आली, त्रासिक चेहर्‍याने धाड धाड चपला काढून वहिनी आत आली, 

" काय झालं ग सविता"? ,...... आई 

मला विचार ना आई,....... "अग एक ठिकाणी पॅकिंगच काम होत, तिथे गेलो होतो आम्ही, तर ही कामाला नाही म्हटली, चांगला 7-8 हजार पगार होता",...... दादा चिडलेला होता 

"किती घाण कंपनी होती ती, काही सोय नव्हती, गरम ही किती होत होतं",..... वहिनी 

" मग शिक्षण किती झालाय आपल? एसी ऑफिस मिळेल का" ?..... दादा 

" मला नाही जमणार ते काम ",...... वहिनी 

" दुपारी 4 तास तर काम आहे, हे नाही जमणार ते नाही जमणार अस चालेल का" ?....... दादा 

" तुम्ही दोघ शांततेने घ्या बर, नका भांडू असे ",..... आई समजावत होती

" तुम्हीच बघा आई.... हे कसे बोलतात ते, रस्ताभर मला नको नको ते बोलले, तरीच म्हटलं आज मला कसं फिरायला नेलं"?,....... सविताच्या तोंडाचा पट्टा सुरू होता

"नसेल करायचं तिलाच राहुदे दादा, आपण करतोच ना सगळे , नाही तरी घरी कोणी तरी हव", ...... आई 

"म्हणजे काय? आपण बाहेरची कामे करतो, घरातली काम ही आपण च करतो, सविताची काहीही मदत होत नाही",....... दादा परत चिडला होता 

"जाऊ दे रे दादा, तिच्यावर आशु आणि आरु यांची जबाबदारी आहे",....... वीणा 

" राहिला तर मग... करायचा नाही आहे तिला काही, जरा थोडं काम केलं तर तिचं पण मन रमेल", ..... दादा 

बाबा आले रात्रीची जेवण झाली, 

" कुठपर्यंत आलंय काम बेटा वीणा प्रेझेंटेशन झाल का " ,? ...... बाबा 

" सुरू आहे बाबा, उद्या मिटिंग आहे",...... वीणा 

"आराम कर आता लवकर चला ",...... बाबा 

दुसऱ्या दिवशी पटापट आवरून वीणा ऑफिसला आली, प्रीती आलेली नव्हती, वीणाने तिला फोन केला तिच्या आईने उचलला त्यांच्याकडून समजल तिला ताप आहे ती आजही येणार नाही, सगळी जबाबदारी वीणावर आली होती 

लंच ब्रेक झाला, दुपारी दोनच्या सुमारास परांजपे आणि कंपनीचे तीन चार लोक मिटींगला आले, सरांनी वीणाला आत बोलावलं, सगळ्यांशी ओळख करून दिली, वीणाने प्रेझेंटेशन दिलं, मिस्टर दीक्षितांना प्रेझेंट प्रेझेन्टेशन खूप आवडल, वीणा प्रेझेंटेशन करून बाहेर गेली, 

सरांनी दीक्षित यांना विचारले....... "काय आहे डिसिजन" ?, "आवडल का प्रेझेंटेशन"? 

"समर सर सिंगापूरहून आल्यानंतर परत एकदा प्रेझेंटेशन सादर करू, आम्हाला तर हे आवडलं आहे, मी आजच मॅडमला सगळं सांगतो, ठीक आहे"......... मिस्टर दीक्षित 

सर वीणाच्या प्रेझेन्टेशन वर खुश होते

ऑफिसातून घरी येता येता वीणा प्रीतीच्या घरी गेली, प्रितीला बरं वाटत होत आता, 

" काय मॅडम कसं झालं प्रेझेंटेशन? कोण कोण आल होत त्या कंपनी तून ? , एखादा हॅन्डसम बिझनेस मॅन होता का मीटिंगला"?....... प्रितिने विचारले

"होता ना..... त्याने मला लग्नाची मागणी घातली,...... तू म्हणजे अश्यक आहेस ग प्रीती , तिथे प्रेझेंटेशन देतांना माझे किती हाल झाले, तुला मज्जा सुचते आहे, चांगलं आहे म्हणजे तू वेळेवर डच्चू दिला, माझ्यावर सगळी जबाबदारी आली",.... वीणा लटक्या रागात होती 

"तू होतीस म्हणूनच प्रेसेंटेशन नीट झालं, मी असती तर काय झालं असतं काय माहिती"?...... प्रिति हसत होती 

" ठीक आहे, पण आता उद्यापासून ये ऑफिसला, मला करमत नाही, आणी उद्या आपल्याला परांजपे अ‍ॅण्ड कंपनीत जायचं आहे त्यांचा शॉप फ्लोअर बघायला" ,.... वीणा 

"ठिक आहे, मी छान तयारी करून येईल", .... प्रीति अजून लाइट मूड मध्ये होती 

वीणाने डोक्याला हात मारून घेतला 

वीणा घरी आली घरी अभि... आरूचा अभ्यास सुरू होता, आई स्वयंपाक करत होती, वहिनी भाजी कापत होती, दादा बसून काहीतरी हिशोब करत होता, बाबा हि आले होते, वीणाने हात पाय धुतले, 

" चहा ठेवु का ग" ?,..... आई विचारात होती 

"नको प्रीतीकडे झाला आहे... डायरेक्ट जेवेन मी, आणि तू पोळ्या करायचं राहूदे, मी करेन", ..... वीणा 

"कशाला? एवढ ऑफिसमध्ये दमतेस तु, मी करेन", ... आई 

"कसं झालं प्रेझेंटेशन" ?,...... बाबांनी विचारलं 

"छान झालं बाबा, उद्या बोलावलं आहे आम्हाला त्यांच्या कंपनीत, शॉप फ्लोअर बघायचा आहे",....... वीणा 

वहिनी आई-दादा सगळे ऐकत होते 

" मोठी आहे का हो ताई ती कंपनी? छान झाड, सुंदर परिसर असेल नाही, हॉटेल आहे का तिथे? मी कधीच गेली नाही आहे अशा छान कंपनीत" ,.... वाहिनीला उत्सुकता होती 

" तुला काय करायच आहे कंपनी छोटी असो का मोठी? तुला काय काम आहे का तिकडे? कालच बघितल मी, तू काय करू शकते ते, तुला काहीही काम नको वाटत", .... दादा मध्येच डाफरला 

" प्लीज तुम्ही आता परत बोलचाल सुरु करू नका", ... आई रागवली," आणि का रे असा बोलतो सारख सविताला" , आईने बाजू घेतली, 

वहिनी आई कडे प्रेमाने बघत होती 

" तर बाबा उद्या आम्ही जाणार आहोत, परांजपे अॅड कंपनीत, शॉप फ्लोर बघायला, ती गारमेंट फॅक्टरी आहे, मोठे मोठे मशीन लागतात तिथे, हे सगळं नीट जाऊन बघितलं की व्यवस्थित अंदाज येईल आम्हाला", .. वीणा माहिती देत होती, सगळे नीट ऐकत होते 

"प्रीतीला बर आहे का ग" ?, ........ आई ने विचारलं 

" हो बरं वाटतंय, उद्या येणार आहे ती ऑफिसला",....... वीणा 

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रीती आणि वीणा ऑफिसमध्ये पोहचले, 

" ऑफिस मधील प्रशांत यांच्यासोबत दुपारून परांजपे अॅन्ड कंपनी मध्ये जायचं आहे, तयार राहा", ..... सरांनी सांगितलं 

"काय काय न्यावे लागेल सोबत सर",..... वीणा 

" काही नाही नोट्स डायरी आणि घेऊन जा, सोबत लॅपटॉप असू द्या, त्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन द्यायला तर लागेल लॅपटॉप, परांजपे मॅडम बघतील काही वेळेस प्रेझेंटेशन ",....... सर

" ओके सर",..... 

दुपारी लंच ब्रेक नंतर तिघे टॅक्सीने जायला निघाले, तिघे कंपनीत पोहचले, एवढी मोठी आणि छान कंपनी बघून वीणा आणि प्रीतीचे भानच हरपले, तिघांना रिसेप्शनमध्ये बसायला सांगून एक मुलगी आत गेली, त्या मुली पाठोपाठ मिस्टर दीक्षित बाहेर आले, 

"हे आहेत का ग बॉस" ?,....... प्रीती विचारत होती 

"नाही ते मॅनेजर आहेत, बॉस आऊट ऑफ कंट्री आहे" ,.... प्रशांतने सांगितल, 

"आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला आपले काम महत्वाचा आहे, त्याकडे लक्ष द्या दोघांनी", ...... वीणाने दोघांना रागवले 

"चला आपण कंपनीचा फेरफटका मारू", .... मिस्टर दीक्षित 

तिघे शॉप फ्लोरला आले, अतिशय शिस्तबद्ध रित्या काम सुरू होतं, 

"हे तर शॉप फ्लोअर फुल आहे मग नवीन मशिनरी तुम्ही कुठे ठेवणार आहात"?.....…. वीणाने प्रश्न विचारल 

तसे दीक्षित त्यांना मागच्या बाजूला घेऊन गेले, तिथे एक नवीन कन्स्ट्रक्शन झालेला एक शॉप तयार होता, येथे नवीन मशिनरी फिक्स करायची आहे, त्यांनी दाखवल, वीणा प्रीती प्रशांत यांनी शॉप फ्लोअर बघितला, तिघे परत रिसेप्शनमध्ये परतले 

"तुम्ही बसा मी दोन मिनिटे... मी आमच्या मॅडम शी बोलून येतो", .... दीक्षित सर बोलले 

"आपल्याला येवढ्या मोठ्या फॅक्टरीत नोकरी लागली तर किती छान होईल ना" ,...... प्रीती बोलत होती 

"चुप ग तू, पाच मिनिटं शांत बसत नाही", ... वीणा चिडली होती 

"चहाही विचारला नाही त्यांनी आपल्याला",...... प्रीतीची बडबड सुरू होती 

 मिस्टर दीक्षित परांजपे मॅडमच्या केबिनमध्ये गेले, मॅडम कॉल मध्ये बिझी होत्या, त्यांनी खूणेने विचारलं, काय काम आहे? दीक्षितांनी सांगितलं..... मी पाच मिनिट थांबतो तसा मॅडमने फोन होल्ड वर टाकला 

" हा बोला काय काम आहे"?....... मॅडम 

"काल आम्ही गेलो होतो ना साई एंटरप्राइजेस मध्ये ते नवीन मशिनरी साठी प्रेझेंटेशन बघितलं, त्या कंपनीतले रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत, तुम्हाला भेटायचं आहे का त्यांना" ?....... दीक्षित 

"नाही मला आता वेळ नाहीये मी बिझी आहे, समर कधी येतो आहे? तो आला की तो देईन लक्ष यावर, तसेही काही इतके अर्जंट नाहीये",....... मॅडम 

" ओके मॅडम, तसे ते प्रेझेंटेशन द्यायचा तयारीने आलेले आहेत ",...... दीक्षित 

" इट्स ओके यू कॅरी ओन, मी बिझी आहे सर कुठे आहेत? त्यांना दाखवा प्रेझेंटेशन",...... मॅडम 

" मॅडम सर घरी गेले, घरून सोहा मॅडमचा फोन आला होता",...... दीक्षित 

" का काय झालं? सोहाने का बोलवून घेतले"?....... मॅडम 

माहिती नाही मॅडम 

परांजपे मॅडमने घरी फोन लावला, फोन सरांनी उचलला, 

" घरी का गेले तुम्ही असे अचानक? मला का नाही सांगितलं" ?,...... मॅडम 

" अगं तू बिझी होती कॉल मध्ये, बाहेर निरोप दिला होता मी शिपाईकडे"....... आज समर येणार आहे सिंगापूर हून तर आम्ही दोघं त्याला घ्यायला एअरपोर्टला चाललो आहोत, सोहाने केला हा प्लॅन",....... सर

"मला सांगून जायच ना, किती घाबरले मी",...... मॅडम 

" अग हो , आज लवकर ये घरी, ok",...... सर

हो चला मी आवरते ऑफिसचे कामे

समर घरी आला, घरात पाऊल टाकल्या टाकल्या सोहाने त्याच्याकडून बॅग काढून घेतल्या, 

"काय आणलं आहे माझ्यासाठी दादा सिंगापूर हून" ?,..... सोहा

"काही नाही, मी काही तिथे शॉपिंग ला गेलो होतो का" ?,..... समर

समर उगाच सोहाला चिडवत होता, बाबा ते बघून हसत होते 

"इकडे आण त्या बॅग, तू दिलेल्या लिस्ट प्रमाणे सगळं आणलं आहे",....... समर

सोहा आनंदी झाली," थँक यु दादा "

समर लटक्या रागात पप्पांना बोलला...." सोहाच्या शॉपिंग मुळे मला उशीर झाला बाबा, किती सामान घेणार आहे ती फॉरेन हून काय माहिती" ? 

तेवढ्यात परांजपे मॅडम आल्यास ऑफिसहुन 

" काय रे कशी झाली तुझी फॉरेनची ट्रीप? झालं का काम" ?...... मॅडम 

"हो मम्मी, बरीच मशनरी बघितली मी आणि एक दोन ठिकाणच्या ऑर्डरही फिक्स केल्या, त्यांना एक्सपोर्ट क्वालिटीचे ड्रेसेस हवेत आता तशीच मशिनरी बघू इकडे, मेहेनत घ्यावी लागेल आपल्याला",.... समर

"बरं झालं, आता उद्यापासून ऑफिसला ये, साई इंटरप्राईजेस काय मशिनरीज मॅटर आहे ते साॅल्व्ह कर ",..... मॅडम 

ओके 

" पुरे झाल तुमचं ऑफिसच बोलणं, आता जेवायचं का?, 

समरला भूक लागली असेल ",...... आजी बोलत होती 

" काय केलंय आज जेवायला आजी , बाहेरच खावून कंटाळा आलाय ",..... समर आजी जवळ जावून लाडाने बोलला 

" सगळं तुझ्या आवडीचा आहे समर ",.... आजी 

" मला माहिती होतं की सगळं समरच्या आवडीच असत घरात, मला काय आवडतं हे माहिती आहे का कोणाला"?........ सोहा सामान बघता बघता लटक्या रागात बोलत होती

आई आणि बाबा हसायला लागले

दुसऱ्या दिवशी समर ऑफिसला पोहोचला 

"मिस्टर दीक्षित साई इंटरप्राईजेसची फाईल आणा, किती मशीनरी फायनल केली आहेत? कधी देताय ते डिलिव्हरी? कशी वापरायची मशीनरी? प्रेझेंटेशन कुठे आहे" ?,...... समर 

"काल त्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते, मी करतो त्यांना फोन आणि प्रेझेंटेशन ही अरेंज करतो परत" ,..... दीक्षित 

" चालेल, पण जे काय करायचे ते लवकरात लवकर करा, कारण आपल्याला सिंगापूरहुन ऑर्डर यायची शक्यता आहे",...... समर

"मिस्टर दीक्षितांनी साई इंटरप्राईजेस ला फोन केला", फोन वीणाने उचलला उचलला

" प्रीती आज आपल्याला परत परांजपे अंड कंपनीत जावं लागणार आहे, त्यांचे बॉस फॉरेनहुन आले आहेत, त्यांना प्रेझेंटेशन हव आहे",....... वीणा 

" काय कटकट आहे यार... एकदा काय ते फायनल करा म्हणा, किती वेळा प्रेझेंटेशन करायचं"?....... प्रिति 

"असं काय करतेस प्रीती, अग मशिनरी किती महाग आहे आणि त्याचा सेटअपही गरजेचा आहे, एवढी महाग वस्तू घेतांना ते विचार करतीलच की आणि हा आपला जॉब आहे मॅडम करावाच लागेल ",...... वीणा 

" हो बाई हो... तू म्हणजे ना लगेच सुरू होते, जसं काही मी येणारच नव्हते, चल आताच जायचयं की लंच ब्रेक नंतर "..... प्रिति 

परांजपे अंड कंपनीत गेस्ट आले होते, त्यांना तयार झालेल्या ऑर्डर बघायच्या होत्या, त्यात समर बिझी झाला, त्याला प्रेझेंटेशन्स लक्षात राहिलं नाही, नंतर कॉल सुरु झाले 

" आज करायचा आहे का प्रेझेंटेशन सर "?,..... मिस्टर दीक्षित विचारत होते 

" आज नको उद्या ठेवा, मला आता थोडं महत्वाचं काम आहे" ,...... समर 

मिस्टर दीक्षितांनी साई इंटरप्राईजेसला फोन करून कळवलं की आज प्रेझेंटेशन नाही आहे उद्या आहे  

समर घरी आला 

"आज खूप थकलेला दिसतो आहे समर",..... आजी काळजी करत होती 

"होना आजी खूप काम होत ऑफिसमध्ये",..... समर

"आज आपल्याकडे मॅरेज ब्युरो वाले काका आले होते,दोन तीन स्थळ आहेत़ म्हणे",..... आजी सांगत होती 

"त्यांचं काय काम आहे आता परत इकडे? त्यांना मम्मीने बोलवलं होत का"?,....... समर 

" नाही मम्मी नव्हतं बोलावलं ते स्वतः आले होते, तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस बेटा"?.... आजी 

" म्हणजे असं काही विचार करायचा असतो का लग्नाचा? , कोणी आवडायला तर हव त्यासाठी" ,.... हो ना आजोबा 

आजोबा छान हसत होते, 

" तुझी पसंत काय आहे ते आम्हाला सांग ना" ?,.... आजोबा 

" आजी आजोबा आज हे काय नवीनच आज, मला भूक लागली आहे, आजी काहीतरी खायला दे", ...... समर 

"ठीक आहे, तू फ्रेश होऊन ये मी तुला चहा नाष्टा देते",..... आजी

"सोहा कुठे गेली आहे"? ........समर 

"गेली असेल फिरायला मैत्रिणींसोबत, तुझ्या मम्मीला सांगितलं तिने काहीतरी",...... आजी 

"ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो"...... समर 

.....................

सदर कथेतील पात्र पूर्ण काल्पनिक आहे त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही

🎭 Series Post

View all