प्रित तुझी माझी... ❤️भाग 20

वीणा च घर आल, समरने गाडी थांबवली,..... "आजची संध्याकाळ मी कधीच विसरू शकत नाही वीणा, तू आज मला खूप छान ?

ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, नाव घटना जर सारख्या वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.........   

सगळ्या वाचकांचे खूप खूप आभार.....

©️®️शिल्पा सुतार
....... 

समरने गाडी सुरू केली,  त्याचं सगळं लक्ष विणाकडे होतं, आज वीणा अतिशय सुंदर दिसत होती, गुलाबी रंग तिच्यावर खूपच छान दिसतो, मोकळे सोडलेले केस पण किती सुंदर आहेत  वीणाचे, किती शांत आहे ही, कायमचा शांत राहील का? की आताच मुद्दाम आपल्यासमोर शांत राहते आहे ही, विचार करून समरला  हसू आलं, तो सारखा गाडी चालवताना विणा कडे बघत होता, वीणाच्या ते लक्षात आलं होतं.....

हा काय सारखा इकडे बघतो आहे, वीणाला खूप अवघडल्यासारखं झालं होतं, आज मी काय बोलू समरशी, ड्रेस जरा जास्तच झाल का? , अगदी नटल्या सारख दिसते आहे का मी? , वहिनी आणि आईच ऐकायला नको होत....

वीणा बोलत का नाही काही? , काय बरं झालं, काय विचार करत असेल ती, बहुतेक माझा विचार करत असेल की काय बोलू आज..... समर मनातल्या मनात विचार करत होता

मला याच्याशी बोलायचंच नाही आहे, संध्याकाळी किती वाट बघितली मी समरची, मनात नाही नाही ते विचार आले माझ्या, अस करतात का कोणी, त्याला जेव्हा हव तेव्हा बोलवतो मला भेटायला, ही काय वेळ आहे बाहेर जायची....

"काय राग आला आहे का वीणा तुला",....... समर

"नाही मला कशाचा राग येईल",..... वीणा

"मी तुला बोललो होतो की ऑफिस सुटल्यावर मी भेटायला येईल आणि मी आलो नाही",...... समर

"इट्स ओके मला राग नाही आला",....... वीणा

"चेहऱ्यावरचे स्पष्ट दिसत आहे तुझ्या", ...... समर हसायला लागला

वीणा ला अजून राग आला,.....

" पण तुला माहिती आहे का वीणा तू रागात अजून छान दिसते, मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, गुलाबी रंग तुझ्यावर खूप छान दिसतो, वीणा तुझे मोकळे केस मस्त वाटता आहेत",.........समर

वीणाला सुचतच नव्हतं काय करावं, काय बोलावं....

"आपण कुठे जातो आहोत",...... वीणा

" माझ्या मित्राचा एक हॉटेल आहे इथून जवळच तिथे आपण डिनर ला जात आहोत ",....... समर

" पण हे एवढे  डिनर वगैरे कशासाठी "?,.... वीणा

" तुला माहिती आहे ना वीणा, की तुला माझ्या तोंडून ऐकायचं आहे, दोन दिवसाची मुदत संपली मॅडम, काय म्हणण आहे तुझ मला ऐकायच आहे",....... समर

वीणाला काही सुचत नव्हत, काय बोलणार आहे मी याच्याशी, omg उगीच आलो,....

थोडं पुढे गेल्यानंतर एका शांत ठिकाणी एक छान टुमदार हॉटेल होतं, सुंदर वातावरण होत, बाहेर लाॅन झाडे मन मोहून घेत होती, गेट मधुन आत मध्ये गेल्यानंतर वीणा गाडीतुन उतरली, समरने पुढे जाऊन कार पार्क केली, तो गाडी लावून येतच होता, वीणाच त्याच्या कडे लक्ष होत,

समर आज खूपच छान दिसत होता, एकदम हँडसम.... व्हाइट डिझाईनचा शर्ट, ब्लॅक पॅन्ट खूपच चांगलं दिसत समरला, वीणाची नजर समरवर होती, अगदी मला हवा असाच आहे हा, काही तरी नक्कीच पुण्य केल असणार मी म्हणून मला समर भेटला, नुसता दिसायला चांगला नाही तर समर वागायला ही नीट आहे, किती सांभाळून घेतो मला आणि माझ्या घरच्यांना ही

समरला समजलं कि मी त्याच्याकडे बघते आहे तर विचार करूनच वीणाला हसू येत होतं, समजले तर समजू दे मी काहीही करू शकत नाही, तो एवढा  हँडसम का दिसतो आहे मग, माझं खरंच प्रेम बसला आहे का समर वर, आज तो दोन तास उशिरा आला तर मला किती राग आला,........ विणा विचार करत होती

समर आला, दोघ आत गेले, छान लॉन मध्ये कोपर्‍यातील टेबल बुक केला होता, लाइट म्युझिक सुरू होत, दोघं जाऊन खुर्चीवर बसले, छान आहे नाही वातावरण इथलं,

वीणा भारावून गेली होती, समजतच नव्हतं काय करावं असं पहिल्यांदाच ती कोणातरी सोबत बाहेर जेवायला आली होती, राहुल बरोबर तिचं लग्न एक महिना ठरलेलं होतं, पण बाहेर जेवायला जाणं काय साध फोन वरही तो नीट बोलला नव्हता, सदोदित आपल्या मागण्या मागण्या, जाऊ दे, झालं ते चांगल्यासाठीच झालं, आता काय आपण त्याचा इथे विचार करतो आहोत

समर वीणा कडे बघत होता, गार वार्‍याने वीणाचे केस छान उडत होते, ते ती उगीच सारखे करायचा प्रयत्न करत होती, खुप निरागस दिसते आहे वीणा आज

वेटर आला.....

"वीणा ऑर्डर दे, काय घेवू या, तुझी आवड काय आहे" ..... समर

"तुम्ही सांगा",...... वीणा

"काय झालं हे हॉटेल आवडलं नाही का तुला",........ समर

"मी कधी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलेले नाही, त्यामुळे मला माहिती नाही काय ऑर्डर द्यायचे ते",....... वीणाने प्रामाणिक पणे सांगितले

" ठीक आहे तुला चाईनीज आवडतं का इंडियन  घेऊया",...... समर

" चायनीज चालेल, वीणाने एक दोन डिश सांगितल्या ",........ वीणा समर उठला थोडा बाजूला गेला  त्याने वेटरला बर्‍याच ऑर्डर दिल्या आणि तो जागेवर येऊन बसला

" वीणा तू माझ्याबद्दल काय विचार करतेस",...... मी खूप उत्सुक आहे, प्लीज सांग मला

तसं वीणा ला अजूनच अवघडल्यासारखं झालं एक तर ती पहिल्यांदाच अशी बाहेर आली होती, त्यात नवीन ड्रेस वगैरे, वहिनीने जास्तच केलं जरा, लहान मुलांसारखे नवीन कपडे वगैरे

समरला समजलं की वीणा कम्फर्टेबल नाहीये, डोन्ट वरी वीणा उगाच फॉर्मॅलिटी नको ठेवूया, तू कम्फर्टेबल राहा, सगळ्या गोष्टी बोलूनच समजतात असं नाही,

वीणा ला एकदम बरं वाटलं, किती चांगला आहे हा

"तुमच्या घरी कोण कोण आहे",........ वीणा

"एक मिनिट वीणा, तू मला जवळचा  मानते की नाही..... मला हे असं अहो-जाहो  घालणं बंद कर, मला प्लीज फक्त समर असं म्हण",........ समर

"ठीक आहे, कोण कोण  आहे तुझ्या घरी समर",...... वीणा

आता समरच्या चेहऱ्यावर हसू होतं, आता छान वाटत आहे,........ "माझ्या घरी माझी आई, बाबा, आजी आजोबा आणि लहान बहीण  सोहा आहे, सोहा च लग्न जमत आहे, तुला माहिती आहे वीणा सोहा खूप छान आहे तिला मी आपल्याबद्दल सांगितल आहे, खूप समजून घेते ती मला",......

"काय करते सोहा",...... वीणा

"ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे, कॉलेजमधल्या ग्रुप मधला आशिषला तीने पसंत केलय, आज सोहा आणि आशिष दोघ ऑफिस मध्ये आले होते मम्मी-पप्पांना भेटले",....... समर

" मी तुझ्या मम्मी पप्पांना अजून एकदाही बघितलेले नाही",....... वीणा

" जाऊया आपण घरी मम्मी-पप्पांना भेटायला",....... समर

" तू तुझ्या मम्मीला माझ्याबद्दल सांगितलं की नाही अजून",...... वीणा

" नाही सांगितलं, घरी  सोहा च्या लग्नाची बोलणी सुरू आहेत , पण मी आजीला सगळं सांगितलं आहे, आजी आजोबा खूप छान आहेत, माझी मम्मी पप्पा ही छान आहेत, मम्मी थोडी स्ट्रिक्ट आहे, पप्पा तर खूपच शांत आणि मनमिळाऊ आहेत तू एकदा भेटशील ना त्यांना एवढे गप्पा मारतील ते तुझ्याशी की खूप वर्ष झाले ओळखता आहात तुम्ही दोघे एकमेकांना, समोरच्याला खूप कम्फर्टेबल करतात ते, तुझे बाबा हि खूप छान आहेत विणा किती समजून घेतात तुला ",........ समर

" हो माझे बाबा खूप गोड आहेत, खुप आधार आहे त्यांचा मला, नेहमी खूप प्रोत्साहन देतात,  त्यामुळेच कुठली गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवण्याची मला गरज भासली नाही, शाळेत कॉलेजमध्ये काहीही झालं की मी आधी घरी येऊन बाबांना सगळं सांगायचे, आताही मी तुझ्याबद्दल सगळ्यात आधी आई-बाबांना सांगितलं ",......... वीणा

" काय म्हणणं आहे तुझ्या आई-बाबांचं ",....... समर

" आई-बाबांनी हा निर्णय माझ्यावर सोडला आहे, माझ यापूर्वी एक लग्न मोडलं आहे त्यामुळे ते काळजीत होते ",...... वीणा

" अच्छा...... दादा वहिनी प्रकाश कसे आहेत सगळे",.... समर

" दादा एकदम भोळा आहे स्वभावाने , वहिनी साधी आहे, एकदम प्रकाश खूप हुशार आहे, त्याचे स्वप्न खूप मोठे आहेत, एक काम हातात घेतले की खूप छान काम करतो प्रकाश आणि दादा वहिनी चे अभी आणि  आरु दोन मुले आहेत, दोघ खूप गोड आहेत ",...... वीणा

समर आणि वीणाचं मस्त बोलणं सुरू होत, हेच तर हवं असतं नात्यात, एकमेकांन बरोबर कम्फर्टेबल राहण आवश्यक आहे, दोघे एकमेकांना खूप आवडतात पण ते प्रत्यक्षात न बोलता एकमेकाशी नीट राहणे, एकमेकांच्या घरच्यांना जपणे, एकमेकांचे विचार  समजून घेणे हेही खूप महत्त्वाचे आहे,

दोन वेटर आले तेवढ्यात, एकाच्या हातात केक होता, दुसऱ्याकडे फुलं होती, वेटरने केक टेबलावर  ठेवला, अतिशय सुंदर पांढरा आणि गुलाबी केक मस्त दिसत होता, फुलही निशिगंधाची होती, खूप सुंदर दरवळ सगळीकडे पसरला होता, वीणा ही सगळी तयारी बघून खूपच लाजली होती, टेबल सजवून दोघं वेटर गेले, समर समोरून उठून वीणा जवळ येऊन बसला,

"प्लीज ऑकवर्ड होउ नको वीणा, हा केक हे फुलं आपल्यासाठी आहे दोघांसाठी, आजचा दिवस आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे" ,...... समर

हा केक  वाट बघतो आहे वीणा, त्याआधी तुला मला काही सांगायचं आहे का.....

वीणा आधी काहीच बोलली नाही, पण तिला वाटलं हा चान्स आहे, मन मोकळ करण्यासाठी

" हो मला बोलायच आहे",..... विणा हिम्मत करून बोलली, काय बोलू कसं सुरु करु मला काही माहिती नाही या बद्दल, पण एवढेच वाटत आहे की मला तुझ्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटतं आणि असं वाटतं सगळं तुझ्यावर सोडून देऊन मी आरामात राहावं, आधी मला वाटलं होतं की मला खूप घाई होते आहे, तुझ्यासोबतच हे रिलेशनशिप मला जमेल का? पण मी आता विचार करते आहे की जे होईल ते होईल, पण....... पण मी तुला हो बोलते आहे, आज पासून तू जे बोलशील ते मी करेन, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, तू खूप आवडतो मला, तु ही जी माझी काळजी घेतो ना त्याने खूप स्पेशल फिलिंग येत, थँक्यू माझ्यावर एवढं प्रेम करण्यासाठी....

समर बघतच राहिला  वीणा कडे, त्याला अपेक्षा होतीच होकाराची, पण त्यापेक्षा जास्त मिळालं, खर बोलतेस हे वीणा, मी स्वप्नात तर नाही ना, खूप छान विचार आहेत  वीणा तुझे, मला नेहमी तुला भेटल्यावर असंच वाटतं की मी तुला खूप वर्षापासून ओळखतो, तुझ्याबरोबर मी खूप कम्फर्टेबल आहे, thank you for this confirmation dear, I am overwhelmed, आता आपल्या मध्ये कधी कोणी येवू शकत नाही

वीणा बोलली तर खरी सगळं मनातलं, पण आता ती एकदम लाजून चूर झाली होती,  समर कडे बघायची पण तिची हिम्मत नव्हती, समरला  समजतच नव्हतं काय सुरू आहे, तो एकदम भारावून गेला होता, त्याने खिशातुन एक डबी बाहेर काढली, नाजूक अंगठी होती त्यात , अतिशय सुंदर हिऱ्याची  अंगठी त्याने वीणा पुढे  धरली, हळूच अंगठी वीणा च्या या नाजूक बोटांनी मध्ये घातली, काय होतंय हे वीणाला समजतच नव्हतं,

"मी ही अंगठी घेऊ शकत नाही,  ही अंगठी खूप महाग वाटते आहे",...... वीणा गडबडली एकदम

"काय झालं विणा, तू आत्ताच होकार दिला ना",...... समर गोंधळला

"हो होकर आहे माझा, पण एवढं महाग गिफ्ट , खूप जास्त होतय",...... वीणा

स्पेशल व्यक्ती साठी स्पेशल गिफ्ट, महाग स्वस्त असं काही नसतं वीणा, एवढाच विचार कर की  मला ही अंगठी  तुला द्यावीशी वाटते आहे, छान नाजुक अंगठी वीणाच्या हातात खूप शोभत होती, समरने हळूच वीणाचा हात हातात घेतला आणि हलकेच ओठ टेकवले, तस वीणाने झटकन हात त्याच्या हातातून सोडवून घेतला,

"बी कम्फर्टेबल, घाबरू नकोस वीणा, आपल्या दोघांमध्ये एकमेकाच्या संमतीशिवाय काहीही होणार नाही, this is just token of love ",..... समर

वीणा खाली बघत होते, हे जे क्षण आपण अनुभवतो आहे हे खरं आहे की स्वप्न हेच समजत नव्हत, असच दाखवतात ना चित्रपटात कि एक राजकुमार येतो.... राजकन्येने साठी त्याच्याकडे खूप गिफ्ट असतात, सुंदर फुल असतात, तो त्या राजकन्येची खूप काळजी घेतो, तिने बोलायचा सावकाश की शब्द झेलायला तो तयार असतो, पिक्चर बघायचो तेव्हापासून वाटायचं हे खरं असेल का? आज प्रत्यक्षात हे माझ्या सोबत घडत आहे, असच सुरू राहू दे देवा, सगळ नीट होवु दे

"चल केक कापू या" ,..... वीणा आणि समरने दोघांनी केक कापला, समरने वीणाने एकमेकांना केक भरवला,

"तुझा फोटो हवा आहे मला वीणा, घेवू का",...... समरने विचारले

हो.......

समरने वीणाचे खूप फोटो घेतले,..... "वीणा मला समजतच नाही हे स्वप्न आहे की हे खरं सुरू आहे",....

"मी तुझ्या साठी काही गिफ्ट आणल नाही समर, मी नंतर देईन",........ वीणा

"बर झाल नाही आणल काही, मला जे हव ते घेता येईल ",...... समर

जेवण आलं तेवढ्याच समर आणि वीणा ने गप्पा मारत मारत जेवण केलं, आता बरीच comfortable झाली होती वीणा,

बराच उशीर झाला आहे.....

समर आता आपल्याला निघायला  हवं, समर आणि वीणा घरी जायला निघाले

भारावल्या सारखच वातावरण होतं सगळं, अगदी एक महिन्यापूर्वी जरी कोणी सांगितलं असतं वीणाला की तुझ्या आयुष्यात इतका छान राजकुमार येणार आहे तरी तिला खरं वाटलं नसतं....

"हे सगळं खरं आहे का समर",...... वीणा

"हो वीणा हे सगळं खरं आहे",..... समर

"आपल आयुष्य यापुढे असच असणार आहे का",.....

"हे आपल्या हातात आहे वीणा, तुला आणि मला वाटत आहे ना की आपलं आयुष्य सुखात एकमेकांना जपत जाव, तर ते तसंच राहीन कोणीही आपल्या सुखाच्या मध्ये येता कामा नये, लग्नात संसारात हेच महत्त्वाचं असतं,  म्हणजे हेच कि तू माझ्यावर विश्वास दाखवलास खूप छान वाटत आहे मला, मी तुझा विश्वास कधीच तोडणार नाही, आता यापुढे काहीही होउदे आपण दोघांनी एकमेकापासून दूर जायचं नाही

"हो समर थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग",....... वीणा

"तुलाही खूप थँक्यू वीणा, तू माझ्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन आली आहेस",...... समर

वीणा च घर आल, समरने गाडी थांबवली,..... "आजची संध्याकाळ मी कधीच विसरू शकत नाही  वीणा, तू आज मला खूप छान सुखद धक्का दिला आहे, मी माझ्या मम्मी-पप्पांना लवकरच आपल्याबद्दल सांगेन आणि काहीही झालं तरी कोणी काहीही म्हटलं तरी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, तु ही कोणी काहीही म्हटलं तरी माझ्यावर विश्वास कायम ठेव",....... समर

वीणा खूप आनंदात होती.....

" घरी चलतोस का समर जरावेळ , पण तुला आवडेल का आमच्या घरी ",....... वीणा

" का काय झालं न आवडायला ",....... समर

" आमचं घर खूप लहान आहे,  आणि गल्ली पण खूप छोटी आहे ",....... वीणा

" पण मन मोठे आहेत ना तुमच्या लोकांचे, तेच खूप महत्त्वाचं असतं, चल येतो मी तुझ्यासोबत, तुला घरापर्यंत सोडून देतो खूप रात्र झाली आहे ",....... समर

🎭 Series Post

View all