Jan 28, 2022
प्रेम

प्रित तुझी माझी... ❤️भाग 3

Read Later
प्रित तुझी माझी... ❤️भाग 3

 

 

"आई बाबा आम्ही जरा फिरून येतो" ,.... दादा आणि वहिनी फिरायला निघाले, 

 

"तुम्ही कशाला वीणाच लग्न मोडायला पाठिंबा दिला? चांगल होत होतं ताईंचे लग्न, मी बोलत होते मध्ये मला ही बोलू नाही दिल, आता राहील सगळ, घरात परत एवढे लोक आहेत , कधी नीट होणार सगळ काय माहिती" ?... सविता वहिनी बडबड करत होती 

 

 

"पण तिला ते स्थळ पसंत नाही तर ती कशी राहील तिकडे? वीणाचा विचार नको का करायला आपण"?.... दादा

 

 

" आमच्या विचार कोण करणार? आम्ही कसे राहतो आहोत, आमच्याही काही अपेक्षा आहेत, मलाही वाटतं की आपल्या दोघांचा संसार असावा, एकमेकांसोबत वेळ घालवावा, तडजोड करावीच लागतं ना आयुष्यात"..... वहिनी 

 

 

" एक तर त्यांचं लग्न जमत नव्हतं, इथून जमलं तर त्यात किती कुचपट काढतात, करायच ना थोड ऍडजस्ट, आता कधी येईल पुढचं स्थळ? , कधी होईल त्यांचे लग्न"?.... वहिनीची बडबड सुरूच होती 

 

 

" सविता तू तुझा स्वभाव सोडणारच नाही आहेस का? तुला नाही वाटत की विणाने सुखी व्हावे? जर असे स्थळ आपण घेतलं आणि सहा महिन्यातच प्रॉब्लेम तयार झाला तर काय करणार आहोत आपण? याचा जरा विचार कर, किती नुकसान होईल वीणाच, शेवटी वीणाच सुखही महत्त्वाचा आहे",...... दादा समजावत होता 

 

 

"तुम्ही फक्त त्यांच्या सुखाचा विचार करा, माझ्याबद्दल कधी विचार करणार आहात की नाही? कसली हौस नाही की मौज नाही, ते काही नाही मला तुमच्या सोबत आरामशीर राहायच आहे "..... वहिनी 

 

 

" आता त्या विषयावरुन आपला विषय कुठे सुरू झाला? तू परत भांडण काढू नको सविता, आधीच मी काही कमी टेन्शनमध्ये नाही, माझा थकलेला पगार मिळाला की बघू, एखादी रूम घेवू अजून भाड्याने " ,..... दादा समजावत होता 

 

 

" का झाला नाही पगार? का देत नाही कंपनी आपले पैसे" ?..... वहिनी

 

 

"काय माहिती काही तरी फायनान्शिअल प्रॉब्लेम आहे, मी पगार मिळाल्यावर दुसरी नौकरी बघू का? या कंपनीच हे अस चालू राहील असे दिसत आहे",.......... दादा 

 

हो चालेल...... वहिनी 

 

"आपण घरी स्पष्ट का बोलत नाही आपल्या परिस्थिती बद्दल? तुम्हाला सगळ का करायच असत घरच्यांच हे मला समजत नाही "..... वहिनी 

 

 

" मी मोठा आहे घरचा, आपण आपली जबाबदारी कधी उचलणार आहोत मग सविता ".? ... दादा

....... 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आवरून रेडी झाले, ऑफिसला निघणार तेवढ्यात राहुलच्या वडिलांचा फोन आला, भेटायला यायचे आहे..... बोलत होते ते, 

 

 

" आता भेट घेण्यासारखं काही नाही, हे लग्न होऊ शकत नाही, वीणा आणी राहुल यांचे विचार पटत नाही, अजुन उशीर झाला नाही, मुलांनी घेतलाय निर्णय, त्यांना समजून घेवून पुढे चालयच".... बाबा बोलत होते 

 

 

"पण कारण काय समजेल का? मुलं लहान आहेत, आपण मोठ्यांने समजुतीने घ्यायला पाहिजे, देण्या घेण्या वरुन झालं का काही"?......... राहुलचे वडील 

 

 

" थोड समजुतीने घ्यायला हव होत राहुलरावांनी, जाऊ द्या, मुलांना जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? आमच्या मुलीचं या लग्नात मन नाही, पुढे जाऊन भांडण होण्यापेक्षा, हे लग्न होऊ शकत नाही",....... बाबा 

 

 

" ठीक आहे"..... त्यांनी फोन ठेवून दिला 

 

 

वीणा ऑफिसला पोचली, राहुल फोन आला, 

 

 

" वीणा मला भेटायच आहे तुला "...... 

 

 

" राहुल आता या गोष्टीला काय अर्थ आहे? माझा निर्णय झालेला आहे, मी तुला किती समजावून सांगितले, तू तुझा हट्ट सोडायला तयार नव्हता, पुढे त्रास होण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं, मला खूप काम आहे, मी ठेवते फोन" ,....... वीणा 

 

 

"एक मिनिट वीणा..... मला एक चान्स दे, तू म्हणशील तसं करू आपण, लग्नाचा खर्च वाटून घेऊ, आता एवढं ठरलय तर समजुतीने घेऊ, I am sorry "...... राहुल 

 

 

" एक दिवस समजुतीने घ्यायच, एक दिवस भांडायचं असच सुरू आहे ना आपल, काही उपयोग नाही आहे या गोष्टीचा, उगीच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही, माझ्या घरची परिस्थिती नाजूक आहे, पुढे जावून देण घेण जमणार नाही, हे चालणार आहे का तुझ्या घरच्यांना? , आणि मला हे दिलं नाही ते दिल नाही हे रोज ऐकायला आवडणार नाही , यात काहीही प्रगती नाही, मला जमणार नाही, ठेवते मी फोन", वीणाने फोन ठेवून दिला

 

 

ऑफिसचं काम सुरू झालं, नवीन टारगेट मिळालं होतं, प्रेझेंटेशन काम पूर्ण व्हायचं होतं, प्रीती आणि वीणा त्यांनी काम सुरू केलं, गारमेंट फॅक्टरी मध्ये कशी मशिनरी लागेल याचा विचार करत होती वीणा, प्रेझेंटेशन मध्ये काय येईल ते प्रीती टाईप करत होती, आज बऱ्याच दिवसात वीणाला मनाप्रमाणे काम करत आल,

 

 

"झालं का बोलण घरी वीणा? सांगितलं का सगळं बाबांना" ? .... प्रिति 

 

 

"हो झालं बोलण, मी बोलली मोकळी आई-बाबांशी, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, यातून बाहेर पडण्याची गरज आहे, स्वतःच्या करियर कडे, कामाकडे लक्ष द्यायचा आहे आता, दादाला सपोर्टची गरज आहे, आता नाही मी परत त्यांना एवढ्या लवकर स्थळ बघू देणार, मला आधी घरचं थोडं फायनान्शिअली नीट करायच आहे",..... वीणा इमोशनल झाली होती," तुझ्याकडे कसं सुरु आहे प्रीती? काकू कशा आहेत"? 

 

 

" ठीक आहे सगळ, आईची तब्येत ठीक आहे, तिचीच काळजी वाटते ग, एक दोन स्थळ सांगून आले आहेत मला , बघू आता काय होते ते",.... प्रिति 

 

 

" अरे वा मॅडम लग्नाची तयारी सुरु केली की काय? , चला तुमची मजा आहे आता, तुझ्या लग्नात खूप मजा करायची आहे",.... वीणा 

 

 

" तुझं काहीतरी ह वीणा अजून लग्न तर ठरू दे, मुलगा आपल्या गावातला हवाय मला, नोकरी सोडायची नाहीये मला, स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं आहे, हा जॉब चांगला आहे, त्यादृष्टीने मी स्थळ बघते आहे"........ प्रिति सांगत होती 

 

 

" बरोबर आहे तुझं प्रीती..... जॉब नको सोडु, स्व: कमाई महत्त्वची आहे "....... वीणा 

 

 

लंच ब्रेक नंतर बॉस बरोबर मीटिंग ठरली, परांजपे अंड कंपनी यांच्या काय अपेक्षा आहेत ते नोट्स प्रीतीने लिहून घेतले, प्रीतीला थोडा गरगरल्यासारखं होतं, 

 

 

" काय होतंय ग प्रीती पटापट हात चालव जरा",..... वीणाला माहिती नव्हत की प्रितीला बर नाहिये 

 

 

" थकल्यासारखं होतंय मला वीणा" ....... प्रीती डेस्कवर डोकं टेकवून बसली

 

 

"इकडे आण मी करते ते काम, तू बस, पाणी देऊ का" ?.... 

वीणा काळजी करत होती 

 

 

"मी जरा पडते थोडी सर्दी आहे बाकी काही नाही",..... प्रिति 

 

 

प्रीतीला घरी सोडून संध्याकाळी विणा घरी आली, अभी अरु अभ्यास करत होते, आई देवळात गेली होती, वहिनी भाजी चिरत होती, बाबा आणि दादा, प्रकाश अजून आले नव्हते, वहिनीला चान्स मिळाला, 

 

 

"अहो ताई मी काय म्हणते आपल्याला आयुष्यात थोडीफार तडजोड करावीच लागते, असे एवढ्या तडकाफडकी निर्णय तुम्ही घेऊ नका, आम्ही नाही कसं अॅडजेस्ट करतो, आणि राहुलराव चांगले आहेत" ,..... वहिनी 

 

 

"वहिनी प्लीज आपण नको बोलू या विषयावर, मी थकले आहे खूप, चहा ठेवते मी तुम्ही घेणार का"?..... वीणा कंटाळली होती त्याच त्याच विषयावर बोलून 

 

 

" राहिल बाई मला काय, मी नेहमी तुमचा चांगलाच विचार करत असते, बरं मी काय म्हणते तुमचं आवरल असेल तर आपण जाऊया का दुकानात? मला एक-दोन साड्यांवर ब्लाउज पीस घ्यायचे आहेत आणि आरुसाठी पण एखादा ड्रेस बघायचा आहे",...... वहिनी 

 

 

"हो चल ना वहिनी जाऊया" ,....... वीणा तयार झाली 

 

 

वहिनी वीणा आरु अभीच शॉपिंग झाल, मुलानी मस्त पाव भाजी आईस्क्रीम खाल्लं, मुलं खूप खुश होते

 

 

संध्याकाळी दादा घरी आला, नवीन फ्रॉक घालून आरू मिरवत होती, वहिनी खुशीत दिसत होती, 

 

 

" कुठून झाली एवढी खरेदी? लॉटरी लागली की काय"?..... दादाने विचारलं, 

 

 

" काही नाही हो संध्याकाळी आम्हाला खरेदीला नेलं वीणा ताईंनी" ,..... वहिनी खुशीत होती 

 

 

"कशाला करते तू अस सविता, तुला माहितीये ना पगार झालेला नाहीये ते आपला" ,.... दादा वाहिनीवर ओरडत होता, 

 

 

"खर्च वीणा ताईंनी केला हो, आणी तुम्हाला ना मी काही केलं की आनंद होत नाही, बायकामुलांना कपडेलत्ते लागतात, त्यांच्या ही काही गरजा आहेत, ह्याचे काही विचार आहे की नाही? आम्ही कधीही काही आणलं की तुम्हाला आनंद होत नाही, स्वतःतर काही घेत नाहीत आम्हाला , आम्ही आमचं घेतो तर तिथे ही आडकाठी आणतात"......... वहिनीची बडबड सुरू होती

 

 

 तेवढ्यात आई मंदिरातन आली, आई मधे पडली,... " असू दे रे दादा, घेतलं तिने स्वतःसाठी काही बर्‍याच दिवसांनी, काय फरक पडतो", 

 

 

" राहू दे रे दादा असं काय करतोस"..... वीणा ही समजवायला लागली 

 

 

बाबा घरी आले जेवण झाली, वीणाने बघितल राहुलचे दोन तीन मिस कॉल होते, काय वैताग आहे, आता हा का करतोय फोन, तिने फोन बाजूला ठेवून दिला, 

 

 

आई बाबा वीणा फिरायला निघाले, "काय झालं बेटा आज ऑफिस मध्ये" ?..... बाबा आणि वीणा नेहमी ऑफीसच्या कामाबद्दल बद्दल चर्चा करायचे

 

 

" बाबा येत्या आठवड्यात मोठी मीटिंग आहे आहे आमची, त्याचीच तयारी सुरू आहे, प्रेझेन्टेशन तयार करायचा आहे, मोठी ऑर्डर आहे ती आणि त्यात प्रीतीला बरं नाही, कामाची धावपळ होणार आहे बहुतेक, सुरू आहेत काम" ,...... वीणा 

 

 

"आज आला होता राहुलच्या वडलांचा फोन, झाल बोलण आमच, आता मग पुढे काय करायचं ठरवलंय तू बेटा"?... बाबा 

 

 

" सध्या तरी काहीच नाही बाबा, ऑफिसच्या कामावर लक्ष द्यायचं एवढेच ठरल माझ ",..... वीणा 

 

 

आई ऐकत होती सगळं, तिला वीणाचं कौतुक वाटत होतं, 

 

 

"काय झाल ग प्रीतीला" ?..... आई

 

 

" खूप सर्दी झाली बाकी काही नाही, वाटेल बर एक दोन दिवसात",........ वीणा 

 

 

"काळजी घेत जा ग तुम्ही मुलींनो, नुसत आपल काम काम, जेवायला पाहिजे भरपूर",...... आई बोलत होती, वीणा बाबा हसत होते 

 

 

वीणा आई बाबा घरी आले, दुसऱ्या दिवशीच्या डब्याची तयारी केली, रोजच आवरून पुस्तक घेतलं वाचायला, रोज दोन पानं वाचले तरच झोप येत होती तिला, 

 

 

प्रकाश काही तरी काम करत होता, 

 

 

" बिझी आहेस का प्रकाश "?..... वीणा 

 

 

"हो वीणा मस्त प्रोजेक्टच काम होवू शकत माझ, हे बघ डिटेल्स",......... प्रकाशच्या डोळ्यात चमक होती 

 

 

वीणाने ते पेपर वाचले, छान होईल हे काम झालं तर 

 

 

हो ना..... 

 

 

दोघ बहीण भावांच खूप छान बॉण्डिंग होत

 

 

दुसर्‍या दिवशी प्रकाश लवकर आवरून कामावर निघून गेला 

........... 

 

परांजपे अँड कंपनीच्या ऑफिस मध्ये रोजची कामाची धावपळ सुरू होती, खूप मोठ पॉश ऑफिस होत , मोठ-मोठ्या केबिन, मागे मोठा वर्क शॉप होता , पुढे बगीचा, सगळीकडे स्वच्छता, शोभेची झाडे छान लावलेली होती , समोरच छान रिसेप्शन होता, ऑफिस स्टाफ भरपूर होता त्यांच्याकडे, सगळेजण कामात बिझी होते, 

 

 

एक आलिशान गाडी गेटच्या आता आली, दार उघडायला वॉचमनची धावपळ उडाली, सुटाबुटातील उंच हँडसम मुलगा खाली उतरला, हातात ब्रँडेड घड्याळ, डोळ्यावर गॉगल, त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन वॉचमन त्याच्यामागे धावपळीने आत गेला, तो ऑफिसमध्ये शिरला, सगळेजण उठून उभे राहीले. 

 

 

"गुड मॉर्निंग सर" ..... गुड मॉर्निंग

 

 

सगळ्यांचा अभिवादन घेत तो तरुण केबिनमध्ये शिरला, तर तो आहे "परांजपे अंड कंपनी" चा सीईओ "समर परांजपे", परदेशात शिक्षण झालेला समर फॅमिली बिझनेस खूप चांगल्या प्रकारे हॅण्डल करत होता, 

 

 

घरी आजी, आजोबा, मम्मी पप्पा , एक लहान बहीण सोहा होती, मम्मी आणि आजीचा विशेष लाडका होता समर , मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून तो प्रसिद्ध होता, श्रीमंत घराण्यातील स्थळ त्याला सांगून येत होते, नातेवाईकांमध्ये ही बऱ्याच मुली समरच्या मागे होत्या, पण समर कोणाकडे लक्ष देत नव्हता, आपण भलं की आपलं काम भलं, हाच तर त्याचा एटीट्यूड सगळ्या मुलींना आवडत होता.......... 

 

 

मम्मी पप्पा बिझनेस कामातच बिझी असायचे, कारभार मोठा होता त्यांच्या, बहिण कॉलेजला होती, समरच्या आईने बाबांना बिजनेस वाढवायला तेवढीच मदत केली होती, प्रत्येक काम परफेक्ट लागायच त्यांना, एक सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून त्यांची ओळख होती, अगदी शून्यातुन सगळ साम्राज्य त्यांनी निर्माण केलेलं होतं, त्यामुळेच का त्यांना खूप अभिमान होता स्वतःबद्दल, 

 

 

बाबा स्वभावाने शांत होते, ऑफिसच्या वेळात ऑफिसला येणे, महत्त्वाच्या गोष्टीत डिसीजन देणे ते व्यवस्थित करत होते, त्यांच्या विचारांचा समरवर पगडा जास्त होता, एवढा शिकलेला समर मम्मी पप्पांच्या शब्दाबाहेर नव्हता, आजीची दोघ नातवंडांवर विशेष माया होती, त्यांना काय आवडतं काय नाही याकडे आजी लक्ष देऊन होती घरचं बहुतेक आजी बघायची

 

 

मिस्टर दीक्षित मॅनेजर होते तिथले, तेच बहुतेक सगळा आर्थिक व्यवहार बघायचे 

 

 

दीक्षित केबिनमध्ये आले 

 

 

"काय झालं मशिनरीजच्या ऑर्डरच? , आपली गारमेंटची ऑर्डर महत्वाची आहे ह",...... समर विचारत होता, 

 

"येत्या आठवड्यात आहे मीटिंग सर, आपल्याला जायचं आहे साई इंटरप्राईजेसला, या काही महत्त्वाच्या फाईल आहेत त्यावर सह्या हवी आहे",..... मिस्टर दीक्षित 

 

 

ठीक आहे मी करतो सही...... समर 

 

 

" सर मॅडम बोलवता आहेत तुम्हाला",.... शिपाई काका आले होते 

 

समर मम्मीच्या केबीन मध्ये गेला, बऱ्याच वेळ महत्त्वाचे विषयावर मीटिंग चालली होती त्यांची 

 

 

" तुला उद्या मीटिंग साठी सिंगापूरला जाव लागेल समर, मीटिंग महत्त्वाची आहे, गारमेंटची ऑर्डर फिक्स कर, एक्सपोर्ट क्वालिटीची ऑर्डर बनवावी लागेल आपल्याला" ..... मम्मी सांगत होती

 

 

"ठीक आहे मम्मी मी करतो तयारी",..... समर 

 

 

समर घरी आला, सोहा त्याची बहीण नुकतीच कॉलेज मधून आली होती, सोहा म्हणजे एक डॅशिंग गर्ल होती, नवीन विचाराची, तिला कोणाचं वर्चस्व मान्य नव्हतं, ती आपला तोरा सांभाळून होती, घरच्या श्रीमंतीचा तिला खूप गर्व होता, तिला सगळं काम तिला परफेक्ट लागायच, जरा इकडे तिकडे झालं की घरच्या नोकर मंडळींचा पाण उतारा करायची, तिला साथ द्यायला तिची मित्रमंडळी होतीच, समरला आजीला आणि बाबांना हे आवडत नव्हतं पण मम्मीची नेहमी तिला साथ होती पण तिचं आपल्या भावावर समर वर खूप प्रेम होतं 

 

 

"झालं का कॉलेज बहिणाबाई" ?..... समर 

 

 

"हो रे, नाही तर काय होतं कॉलेजमध्ये काहीही शिकवत नाही, उगीच टाइमपास आणि बहिणाबाई काय? मला आवडलं नाही",.... सोहा

 

 

 

सोहा बरोबर तिची प्रिय मैत्रीण शनाया ही घरी आली होती, शनाया ही श्रीमंत घरची एकुलती एक मुलगी होती, ती समर वर लक्ष ठेवून होती, आजही समर ऑफिसहुन आल्यापासून शनाया त्याच्याकडेच बघत होती आणि समरच नेहमीप्रमाणे तिच्याकडे लक्षच नव्हत 

 

 

" हाय समर" ........ मी इकडे आहे 

 

 

"ओह हाय शनाया" ...... कुठे दौरा आज सोहा? 

 

 

"बर्थडे आहे एका मैत्रिणीचा डिनरला जातो आहोत आम्ही",...... सोहा

 

"तुम्हा मुलींना अभ्यास आहे की नाही काही" ?..... समर

 

 

" मला अकाउंट अवघड जात आहे, तू समजून सांगणार का समर ",...... शनाया उगीच समरशी बोलायला बघत होती

 

 

"कमॉन शनाया तू सुरू होऊ नको परत , तू जा रे दादा इथून" ,...... सोहा

 

 

समर तिथुन निघून गेला, तो जात असताना शनाया त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती

 

 

दुसऱ्या दिवशी समर सिंगापूरला मीटिंग साठी निघून गेला

........ 

 

ऑफिसमध्ये मीटिंगची पूर्ण तयारी झाली, प्रीतीला अजून हवं तसं बरं वाटत नव्हतं, सगळी जबाबदारी वीणावर येऊन पडली होती, परांजपे अंड कंपनी मधून वारंवार फोन येत होते, मिटींग्स टेन्शनच आलं होतं, तेवढ्यात सर बाहेर आले, 

 

 

"हॅलो वीणा झाली का तयारी उद्याच्या मीटिंगची" ?...... सर

 

 

"हो सर थोड काम बाकी आहे, मी करते आहे" .... वीणा 

 

"प्रीती कशी आहे, येईल का ती उद्या मीटिंग साठी" ?..... सर काळजी करत होते 

 

 

"ठीक आहे सर ती, मी बघते फोन करून प्रीतीला "...... वीणा 

 

 

उद्या आपल इम्प्रेशन पडायला पाहिजे, हि ऑर्डर आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ही ऑर्डर मोठी आहे... आपल्यालाच मिळायला पाहिजे 

 

 

 येस सर I will try my best...... 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now