Jan 28, 2022
कथामालिका

प्रीत तुझी माझी... ❤️ भाग 2

Read Later
प्रीत तुझी माझी... ❤️ भाग 2

 

 

 


ऑफिस सुटलं वीणा निघाली...... जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये राहुलशी भेटायचं ठरलं,..... राहुल आला ,


"राहुल काय झालं? का केला होता फोन सकाळी आईंनी" ?....... वीणा


"आई विचारत होती कधी जाऊ या खरेदीला? लग्नाला आता कमी दिवस बाकी आहेत, आधी घेतलेल्या साड्या आवडल्या नाहीत तिला त्या ही बदलायच्या आहेत" ...... राहुल


"हो थांब जरा पगार होऊ दे माझा, तुझा कधी होणार पगार राहुल" ?....... वीणा बोलली


" माझ्या पगार याचा काय संबंध"?....... राहुल चिडला होता


" पैसे नको का खरेदीसाठी? जर आपले पगार झाले तरच खरेदी करता येईल ना"?.... वीणा बोलत होती


" मी माझ्या पगारातील एकही पैसा वापरणार नाही,
तुझ्या आई-वडिलांनी काही लग्नासाठी पैशाची व्यवस्था केली आहे की नाही"?..... राहुल चिडला होता


"अरे असं कसं बोलू शकतोस तू माझ्या घरच्यांनबद्दल ? माझं लग्न माझी जबाबदारी, प्लीज यापुढे असं बोलू नकोस, माझ्या आई बाबांचा मान तू ठेवायला हवा, खरं तर लग्नाचा खर्च आपण दोघांनी मिळून करायला हवा, मला वाटलं होतं एवढा समजूतदारपणा असेल तुझ्याकडे, बराच वेळ वाट बघितली मी की तू आता समजून घेशील पण नाही तू बदलायला तयार नाहीस, हे चुकीचं वागणं आहे, लग्न दोघांच खर्चही दोघांनी मिळूनच करायला हवा, आमच्याकडुन सगळी अपेक्षा ठेवलं चुकीच आहे",........ खूप दिवसा पासुन वीणाच्या मनात होत बोलायच, आज शेवटी बोललीच ती


" काय बोलतेस तू वीणा तुला तरी समजतंय का? लग्न ठरवतांना हे सगळं ठरलं होतं ना की खर्च कोण करणार ते ? तेव्हा तू काही नाही बोललीस, मग आता काय प्रॉब्लेम आहे"?.... राहुल बोलत होता


" तू स्वतःला चांगल्या विचारांचा समजतोस आणि हुंडा वगैरे मागतोस? तुला तरी हे पटतय का? तू स्वतः या गोष्टीचा विरोध करायला हवा होता, स्वतः सांगायला हवं होतं घरी की हे चुकीचं आहे, खर्च सगळ्यांनी मिळूनच करायला हवा, मला तुझ्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा होती" ... वीणा स्पष्ट बोलली


" मी निघते राहुल घरी जायला, आपल्या या बोलण्याला आता काही अर्थ नाही नाही", ..... वीणा चिडून घरी आली
..........

घरी आली तर गोंधळ सुरू होता..... वहिनी मुलांना मारत होती,


" काय झालं वहिनी?? काय चाललय हे"?...... वीणा मध्ये पडली


"तुम्हीच विचारा मुलांना ताई, गेली पंधरा दिवस झाले अभी शाळेत जात नाही, आज टीचरचा फोन आला होता, तेव्हा समजल, वाटलं होतं मुलांकडून थोडं सुख मिळेल, पण तेही तसेच निघाले, अजिबात ऐकत नाहीत" ,.... वहिनी रडत होती


" अगं हो आपण बोलू या विषयावर त्यांच्याशी, तू आधी शांत हो, आरू घाबरली आहे बघ , सोड ना ग वहिनी हो शांत",... वीणा समजवण्याचा प्रयत्न करत होती


" शांत होऊन काय करू ताई, जराही सुख नाही या घरात, काहीही मनासारखं होत नाही, तुमच्या दादांचा दोन महिने झाले पगार झाला नाही, काय करावं कोणाला सांगावे, घरात खाणारी एवढी माणसे, कस होणार"?..... वाहिनीचा धीर सुटला होता आता


"आम्ही आहोत ना वहिनी कशाला एवढी काळजी करतेस सगळे नोकरी करता आहेत, बाबा आहेत, मी आहे, प्रकाश आहे करू काहीतरी, तू आधी रडणं थांबवल बरं",


" तुमचं लग्न जवळ आले आहे ताई, त्याचा खर्च कसा होणार? कुठून आणायचे एवढे पैसे"?.... वहिनी काळजीत होती


"तू त्याची काळजी करू नकोस वहिनी, मी बघते काय करायचं ते, अभी अरू पुस्तक काढा... अभ्यासाला बसा आणि अभि आपण बोलणार आहोत थोडसं, हे जे चाललंय ना ते मला आवडलेलं नाही ओके",...... वीणाने समजावल


आई पडद्याआडून सगळं सगळं ऐकत होती,


बाबा यायची वेळ झाली आहे, डोळे पूस वहीनी मी बघते काय करायच ते....... वीणा समजावत होती


" काय झालंय अभी? तू शाळेत का जात नाहीस"?... वीणा विचारत होती," काही प्रॉब्लेम आहे का"?


" अभ्यास झालेला नाही आत्या माझा, माझं पुस्तक हरवल आहे , टीचर वर्गा बाहेर काढतात म्हणून मी घाबरून शाळेत गेलो नाही" ,...... अभी सांगत होता


"अरे वेड्या तू हे मला आधी सांगायचं ना, मी आत्या आहे ना तुझी "..... वीणाने अभीला जवळ घेतल

" आईला सांगितलं होतं पण ती थोड्या गोष्टीवरून खूप मारते म्हणून घाबरून गप्प बसलो",........ अभी


" यापुढे तुला अभ्यासात किंवा शाळेत कुठलीही अडचण असली तर तू आधी मला सांगणार आहेस आणि आपण उद्या खरेदीला जाऊ, तुला काय हवं ते शाळेचे सामान घेऊन घे आणि नीट अभ्यास कर, तू बघतो आहेस ना तुझ्या आई बाबांना किती टेन्शन आहे, आणी आपल्या मुळे त्यांच्या टेन्शन मध्ये वाढ नको, असं चांगल वागायला पाहिजे",....... वीणाने समजून सांगितलं


बाबा घरी आले जेवण झाले, नंतर आई आणि वीणा फिरायला गेले,


"झालं का बोलणं राहुलरावांशी"... आई विचारात होती

" हो झालं.... पण काही उपयोग नाहीये या सगळ्या गोष्टींचा आई , सगळे पैशासाठी हपापलेले आहेत ग , काहीच नीट बोलणं झालं नाही , नुसतच भांडण झालं आमच" ,..... वीणा सांगत होती


" कशाला भांडताय ग, समजुतीने घ्या" ,...... आई समजावत होती


" आई अगं नातं दोघी बाजूने असायला हव ना? समजुतीने फक्त मीच घेते, त्या साईडने फक्त मागण्याच आहेत, हे नाही दिलं ते नाही दिल, घेतलेल्या साड्या आवडल्या नाहीत, अग आताच अस तर पुढे कसं होणार" ? .... वीणा काळजी करत होती


" होईल ग नीट, करू आपण सगळ, मी सांगितलंय दादाला लोन बद्दल",...... आई ही काळजीत होती तरी ती वीणाला धीर देत होती


" आई अजिबात लोन घ्यायचं नाही आपण",.... वीणाचा विरोध होता


" अगं मग काय करणार आहोत आपण?? काय आहे तुझ्या मनात",...... आईला काळजी वाटत होती


"आई मी सांगते तुला, मला बोलायचं आहे तुझ्याशी, थोडा वेळ दे"....... वीणा


रात्री प्रीतीचा फोन आला,


"हॅलो विणा, झालं का ग बोलण राहुलशी"?


" हो झालं, आमचं भांडण झालं ग, ऐकायलाच तयार नाहीत ते लोकं, काय करू काही समजत नाही, मला तर असे लोक अजिबात आवडत नाहीत, घरी काय सांगू हि शकत नाही, सगळे लग्नाचे स्वप्न बघत आहेत" ,.... वीणाने सगळ सांगितल


"अगं पण झालं काय नक्की? तेच तर सांगशील का? तू बोलली का ते अर्धा खर्च वाटून घेऊ"?... प्रिति


" हो ग मी बोलली, त्यावरुन आमचं भांडण झालय उद्या सांगते ऑफिसमध्ये "..... ओके चल गुड नाईट


गुड नाईट..... बाय


सकाळी आईच्या तोंडावर ताण स्पष्ट दिसत होता, वहिनी ही चिडलेली होती, तिने दादाला अभी विषयी सगळ सांगितल होत, अभी खाल मानेने शाळेसाठी तयारी करत होता, दादा अभीवर चिडलेले दिसत होता, सगळे बाबा बाहेर जायची वाट बघत होते, बाबांसमोर काही बोलायची अजूनही कोणाची हिम्मत नव्हती, आईने बाबांना चहा-नाश्ता दिला,


"वीणा इकडे ये बेटा मला बोलायचं आहे तुझ्याशी" ,.... बाबा बोलले, "राहुल रावांचा फोन आला होता मला काल, काय बोलणं झालं तुमचं? भांडलात का तुम्ही? तू काही बोलली का त्यांना" ?


"हो बाबा..... पण तुम्ही टेन्शन घेऊ नका" ,..... वीणा


"हे बघ बेटा उगाच देण्यात घेण्यावरून त्यांच्याशी भांडू नकोस, आपण करू काहीतरी, तुझ्यासाठी सगळं आहे आनंदी राहा",...... बाबांना वीणाच्या सुखा शिवाय अजून काय हव होत


" पण बाबा आमचे विचार जुळत नाहीत, मला काहीच महत्व देत नाही राहुल, प्रेम वाटत नाही त्याच्या कडे बघून, आमचं पटत नाही, भेटलो की भांडण होतात, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी, आपण संध्याकाळी बोलू",...... वीणा


" ठीक आहे बेटा, मी ऑफिसला जाऊन येतो",


बाबा ऑफिसला निघून गेले तिकडे दादाने अभिला मारायला सुरुवात केली,


" दादा अरे काय करतो आहेस तू? माझं आणि अभिच बोलणं झालं आहे, मी हॅण्डल करीन हे सगळं, मी अभीचा आणि आरुचा अभ्यास घेणार आहे रोज, तू आणि वहिनी यात पडू नको, जा बरं ऑफीसला आवरुन घे",.... वहिनी याला चहा-नाश्ता दे,


दादा ऑफिसला निघाला, वीणा मागे गेली, प्रकाश ही आला सोबत


" दादा..... प्रकाश मला बोलायचं आहे तुमच्या दोघांशी थोडं, लोन घ्यायचा विचार करतो आहे ना दादा तू, ते करू नकोस आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे राहुल माझ्याशी नीट वागत नाही, मला हे लग्न करायचं नाहीये" ,..... वीणा


"काय बोलतेस तू हे वीणा? काय झालं? मी मध्यस्थी करू का"?..... दादा

" नाही दादा हे मला पटण्यासारखं नाहीये, आमचे विचार जुळत नाहीत, आत्ताच राहुल ऍडजेस्ट करत नाही तर पुढे जाऊन काय होणार आमच्या संसाराच? नंतर लग्न करून पस्तावा होण्यापेक्षा आत्ताच काय तो योग्य निर्णय घेतलेला बरा",...... वीणा


" ठीक आहे पण मला असं वाटतंय की तू अजून या गोष्टीवर विचार करावा, तुला जर हवा असेल तर मी बोलून बघू का राहुल रावांशी"?.... दादा


" नाही दादा त्याची गरज नाहीये मी सांगेन काही लागलं तर",...... वीणा


" ठीक आहे घे काळजी आपण बोलू संध्याकाळी"..... दादा ऑफिसला गेला


वीणा प्रकाश घरी आले,..... " तुला ऑफिस नाही का प्रकाश"?


" हो जातो जरा वेळाने , जातांना आईची फराळाची ऑर्डर पोहोचवायची आहे" ,..... " तुला खरच हे लग्न नाही करायचा का वीणा" ?.. प्रकाश

"नाही प्रकाश विचित्र लोक आहेत ते, मला आता वैताग आलाय" ,... वीणा

बाबांशी बोल मग नंतर तस..... प्रकाश


हो..... एक प्रकाश तर होता ज्याच्याशी वीणा मोकळ बोलू शकत होती, दोघांच्या वयात जास्त अंतर नव्हत, दोघांना एकमेकांचे बोलण नीट समजत होत, प्रकाश खूप हुशार होता अभ्यासात, त्याला पुढे जावून काही तरी मोठ करायचा होत, स्वतःचा व्यवसाय वगैरे, पैसे साठी सगळ अडल होत, त्याल मशिनरी खूप इंट्रेस होता,


वीणा ऑफिसला आली, प्रीती भेटली,


"झाल का बोलणं तुमचं दोघांतच" ? प्रिति विचारत होती


"नाही ग..... मला तर इच्छाच नाहीये बोलायची राहुलशी, काय करावं समजत नाही" ?..... प्रीतीलाही राहुलच वागणं अजिबात आवडल नाही, बोलून बघ त्याच्याशीच


ठीक आहे, संध्याकाळी भेटते,


तेवढ्यात सर केबिन मधून बाहेर आले," वीणा प्रीती इकडे या आपल्याला आत्ता एक अर्जंट मीटिंग घ्यावी लागेल, माझ्या केबिन मध्ये या",


" सर येस"....... दोघी केबिन गेल्या


"पुढच्या पंधरा दिवसात आपल्याला एका कंपनीला भेटायला जायच आहे त्यासाठी प्रेझेंटेशन बनवा, परांजपे अँड सन्स ही कंपनी आपल्या मशिनरीत इंटरेस्टेड आहे, त्यांची कंपनी गारमेंटचे काम करते त्यासाठी आपली मशिनरी त्यांना हवी आहे, छान मॉडेल बनवा, एखादं छान डिझाईन तयार करा, ऑल द बेस्ट",..... सर


ओके सर,.... दोघी केबिन बाहेर आल्या


चला आता कामाला लागाव लागेल, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार ऑफिसच्या वेळेत तरी करायला नको," "तुला माहिती का प्रीती, दादाचा दोन महिने झाले पगार झाला नाहीये आणि तरी तो माझ्यासाठी लोन घ्यायचं म्हणतोय, त्याची मुले मोठी होत आहेत, मी हे नाही करू शकत, मला हे लग्न करता येणार नाही, मी अजून दादा, आई-बाबांना कर्जात टाकू शकत नाही, आज बोलतेस मी राहुलशी",... प्रिती सगळ ऐकत होती, बरोबर आहे तुझ वीणा


तेवढ्यात राहुलचा फोन आलाच,


" राहुल तू माझ्या बाबांना फोन केला होता का"?.... वीणा


" हो केला होता, का करू नये? तू ही अशी वागतेस माझ्याशी, म्हणून सांगितलं त्यांना सगळं".... राहुल


" तू बाबांच्या वयाचा तरी विचार करायचा, मी जर तुझ्या घरच्यांशी असे वागले तर चालणार आहे का? नाही ना, तू मात्र कसं वागायचं? यापुढे माझ्या बाबांना फोन करू नकोस, जे काही बोलायचं आहे ते मला बोल",..... वीणा चिडली होती

" तू दुसरे टोक गाठते आहेस वीणा, मलाही आता सिरियसली विचार करायला हवा",...... राहुल

" आज भेटतोस का संध्याकाळी"...... वीणा विचारत होती

" आता या भेटण्याचा, बोलण्याला काही अर्थ नाही वीणा" ,..... राहुल


" तुला आमच्या घरची परिस्थिती माहिती आहे राहुल, ते नाही करू शकत एवढा खर्च, आपण आत्ताच हा निर्णय घेतला पाहिजे, लग्न मोठी जबाबदारी आहे, जर आत्ताच आपलं पटलं नाही विचार जुळले नाही तर पुढे जाण्यात काहीही अर्थ नाही, हे आत्ताच थांबलेलं बरं, आणि हे बघ राहुल तू मला असं इमोशनली ब्लॅकमेल करू शकत नाही, नसेल करायचं लग्न तर स्पष्ट सांग, पण बाबांना फोन करू नकोस, यापुढे माझ्याकडून किंवा माझ्या घरच्यांकडून तुला पैशाची मदत होणार नाही, हा निर्णय मी घेतला आहे आणि मी ठाम आहे यात बदल होणार नाही"..... वीणा


" हे जे तू ठरवलं आहेस ते तुझ्या घरच्यांना माहिती आहे का? , काल तुझ्या बाबांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्यांना यातलं काहीही माहिती नाही"..... राहुल अंदाज लावत होता


" त्यांचा काहीही संबंध नाही यात, माझा निर्णय एकटीचा आहे, माझी लाईफ आहे आणि ती जर चुकीच्या पद्धतीने जात असे तर ते तिथेच थांबणे गरजेचे आहे".... वीणा


" म्हणजे तुला एवढा त्रास होत आहे माझा माझ्या फॅमिली चा"?.... राहुल अजून ही समजून घेत नव्हता


"हो होतोच आहे त्रास नुसताच नुसताच मानसिक नाही तर फाईनशिअली सुद्धा हा त्रास आहे आणि माझं या गोष्टीला विरोध आहे"..... वीणा ठाम होती" ठीक आहे तर मग आपण भेटू सगळे आणि सांगून मोकळं होऊ तुझ्या मनात जे आहे ते मीटिंगमध्ये" ,... राहुल चिडला होता,


वीणा घरी आली, हात पाय धुतले, देवापुढे दिवा लावला, देवाला नमस्कार केला," काय करायचा आहे स्वयंपाक आई"?


" तू राहू दे वीणा, अभी आणि आरूचा अभ्यास काय आहे ते बघ, मी बघते स्वयंपाकाचं, काही झालं का बोलणं राहुलरावांशी"? , ... आई


" हो आई सांगते रात्री बाबा आले की" ,


वीणा अभी बरोबर जाऊन सामान घेऊन आली त्यासोबत आईस्क्रीम हे आणलं मुलं खूश होती, "आता छान अभ्यास करायचा बर का दोघांनी" ,


हो.... मुल खुश होते

.............

घरी बाबा आले होते, दादा, प्रकाश ही आला होता, जेवायला बसले सगळे, दादा आईकडे बघत होता, नजरेने विचारत होता, विचारू का वीणाला? आई डोळ्यानेच नाही बोलली, जेवणे आटपली...

आई बाबांना बोलत होते...." थोड वीणाशी बोलून घ्या, ती नकार द्यायच म्हणते आहे राहुलला.... मला काळजी वाटते हो खूप"...


"तू नको काळजी करू वीणा योग्य तो निर्णय घेईल" ..... बाबा


बाबा दादा आई वहिनी प्रकाश सगळे जमले, बाबांनी विषय काढला,


"वीणा काय आहे तुझं म्हणणं" ?


"बाबा मला हे लग्न करायचं नाही" ,... वीणा


"अस काय झालं ताई? काय बोलता तुम्ही? आयुष्यात थोडी तडजोड करावी लागते", ... वहिनी


"सविता तू जरा गप्प बस" ..... दादा बोलला


"आई बाबा मला तुमची काळजी कळते, पण मी जर हे लग्न केलं तर सुखी नाही राहू शकणार, माझं आणि राहुलच एकमेकांशी पटत नाही, माझं मन सांगताय हे जे होतय ते चुकीच आहे, त्यांना माझ्या बद्दल अजिबात प्रेम जिव्हाळा नाही, सारखे पैसे पैसे, खरेदी अस हव त्या लोकांना" ..... वीणा अगतिक झाली होती


" हे जर कारण असेल तर ठीक आहे बाळा, प्रॉब्लम पैशाचा तर नाहीये ना? तसं असेल तर आपण करू काहीतरी सोय ",..... बाबा


" नाही बाबा हे स्थळ आता माझ्या मनातुन उतरले आहे, काहीही झालं तरी मी तिथे सुखी नाही होऊ शकत नाही",..... वीणा


" ठीक आहे बेटा तू बोलली ना झाल या पुढे हा विषय नको घरात, पुढे काय करायचं ते मी बघतो, तू निश्चिंत रहा",...... बाबा


" दादा तुला काय वाटतं या बद्दल"?.... बाबा विचारात होते


" शेवटी मलाही वीणाच सुख महत्वाचं आहे ती जो निर्णय घेईल तो योग्य आहे आणि तू राहुल ची काळजी करू नकोस, पुढे काय करायचं ते आम्ही बघतो",..... दादा


" बर्‍याच दिवसांनी वीणा खुशीत दिसत होती, राहुलच स्थळ एक बोझा होता तिच्या वर, आता तो बोझा उतरला होता, टेन्शन न घेता ती आईच्या मांडीवर आरामात पहुडली होती, आईच्या चेहर्‍यावर ही समाधान दिसत होतं, उद्या काय होईल ते बघू पुढच्या पुढे, पण हे संकट टळल हे महत्त्वाचं" ,


" बाबा आता काय करायचं पुढे"?...... दादा विचारत होता


" आता उद्या येईल त्या लोकांचा फोन तेव्हा बघू, तोंड द्यावे लागणार आहे या परिस्थितीला",..... बाबा विचार करत होते


पुढच्या भागात बघू काय होतय ते..... कथेतील पात्र, कथा पूर्ण काल्पनिक आहेत..


 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now