प्रीत नव्याने बहरली... भाग 5

Love story

प्रीत नव्याने बहरली...भाग 5

आज सानिकाच्या चेहऱ्यावर अजिबात स्माईल नव्हती, तिचं कुठेच लक्ष लागत नव्हतं. तिच्या मोबाईलवर कॉल आला. तिने उत्साहाने बघितलं, तिला वाटलं सौरभचा कॉल असेल पण सौरभचा कॉल नव्हता. ती उदास झाली.

ती कॉल रिसिव्ह करत नव्हती.

"सानू अगं तुझ्या मोबाईलवर कॉल येतोय, बघ ना कुणाचा आहे? सौरभचा आहे का?"

सानिकाने नकारार्थी मान हरवली.

"अगं मग घे ना, कुणाचा कॉल आहे? उचल ना."

"मला नाही बोलायचं कुणाशी?"

"कुणाशी बोलायचं नाहीये म्हणजे? कोण आहे? आणि का कॉल करतोय?"
 

"का करतो आहे आय डोन्ट नो करतोय मला कॉल."

मोबाईलवर वारंवार रिंग येत होती.
"सानू उचल ग फोन."

नाही नाही म्हणत सानिकाने फोन उचलला.

"हॅलो."

"हॅलो सानिका अगं कॉलेजमध्ये आहेस का?"

"हो बोल."

"मी इथे जवळच आलो होतो तर मी तुला पिकअप करायला येतो आणि बाहेर जाऊया."

"नको आज नको, मला थोडं काम आहे."

"असं कुठलं तुझं महत्त्वाचं काम आहे की तू मला नाही म्हणतेस."

"आहे थोडं काम, मला मैत्रिणीकडे जायचं आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत नाही येऊ शकणार."

"इट्स ओके ना मी थांबतो तुझ्यासाठी काही हरकत नाहीये, अग मला बोलायचे तुझ्याशी आणि अंकलने मला आज तुला डिनरला घेऊन जायला सांगितलंय सो तुला माझ्यासोबत यावचं लागेल."

"काय फालतुगिरी आहे यार." सानूला तसं बोलायचं नव्हतं पण तिच्या तोंडून तसं निघून गेलं.

"सॉरी काही बोललीस का तू?"

"नाही मी काहीच बोलले नाही, हे बघ खरंच माझा मूड नाहीये, प्लिज आपण कधीतरी जाऊया प्लिज. बाबांनी काही विचारलं तर तू सांग ना काही तरी तुझी मीटिंग होती किंवा अदर काहीतरी रिजन देना प्लिज अंशुमन."

अंशुमनला राग आला,

"ओके." त्याने रागात फोन ठेवला.

सानिकाचे डोळे पाणावले.
 

स्मिता तिच्या बाजूला बसली, तिच्या खांद्यावर हात ठेवला.

"कोण होता सानू?"

"अंशुमन.."

"कोण अंशुमन."

"ज्याची गाडी आपण खराब केली होती."

"काय? पण याने तुला का फोन केला होता?"

"काही नाही बाबांनी त्याला सांगितलं की तुम्ही दोघे कुठेतरी बाहेर जा म्हणून मला विचारत होता, बाबांच्या खास मित्राचा मुलगा आहे ना  बाबाचा लाडका आहे तो."

"मग तू नाही का बोललीस?"

"माझा मूड नाही आहे."

"सानू काय झालं? सकाळपासून का अपसेट आहेस तू? सौरभला मिस करते आहेस का?"

"नाही ग असं काही नाहीये."

"असं काही नाही मग काय झालं? सकाळी बाबा रुडली बोलले त्याचं वाईट वाटतंय?"

"माहिती नाही, मला काही कळतच नाहीये की माझं मूड का असा होतोय. मला ना आता खूप रडावंस वाटतंय, खूप एकट फिल होतंय."

सानिका तिथून उठली,

"मी घरी जात आहे, बाय गर्ल्स.."

सानिका घरी गेली दारात पाय ठेवत नाही तोच तिला अंशुमन दिसला, तिचा पुन्हा मूड ऑफ झाला.

"अरे सानिका तू आलीस देखील इतक्या लवकर. मला म्हणाली होतीस ना मैत्रिणीकडे जायचं उशीर होईल."

"जायचं होतं पण बरं वाटत नाहीये ना म्हणून नाही गेले."

"काय झालं सानू?"

किचन मधून गायत्री आली.

"नो मम्मा नथिंग." असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली.

सानिका रात्री न जेवता झोपली, गायत्रीने तिला खूपदा विचारलं पण ती काही बोलायला काही सांगायला तयार नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका खाली आली नाही म्हणून गायत्री तिच्या खोलीत गेली.

"सानू बाळा उठ, अजून अंथरुणाला खिळली आहेस तू, कॉलेजला जायचं नाही का? उशीर होतोय." गायत्रीने दोन-तीनदा आवाज देऊनही सानिका काही बोलली नव्हती. ती बोलत का नाही म्हणून तिने तिच्या अंगावरचे पांघरून काढलं.

गायत्रीला धक्काच बसला.

पांघरून काढलं आणि बघितलं तर सानिका तिथे नव्हती, तिने तिच्या जागेवर उश्या ठेवलेल्या होत्या. गायत्री एकदम किंचाळली.

खालूनच रमा आजीने विचारलं,

"काय झालं गायत्री?"

गायत्री लगबगीने खाली आली.

"आई सानू तिच्या खोलीत नाहीये."

"काय? तिच्या खोलीत नाहीये कुठे गेली ही मुलगी? इतक्या सकाळी तर कॉलेजला जाणार नाही, एक काम कर तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन कर."

"तिच्या बाबांना कळलं तर?" गायत्री घाबरली.

तिने स्मिता आणि साक्षीला फोन केला, त्या दोघींकडेही सानिका गेलेली नव्हती.
राज आणि राघव कडे जाणार नाही हे कन्फर्म होतं त्यामुळे त्यांना गायत्रीने फोन केलेला नव्हता. सौरभ बद्दल तर घरी कधीही सानू बोललेलीच नव्हती. आता काय करावे याच विचारात दोघीही डायनिंग वर बसल्या.

प्रताप खोलीतून बाहेर आले, त्यांना बघून दोघी एकमेकींकडे बघू लागल्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all